Maharashtra News Live Update: एसटी कर्मचारी संपावर ठाम, अजय गुजर यांचा निर्णय अमान्य

| Updated on: Dec 21, 2021 | 6:03 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

Maharashtra News Live Update: एसटी कर्मचारी संपावर ठाम, अजय गुजर यांचा निर्णय अमान्य
Breaking

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 54 वर पोहोचली आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. एसटी संपाप्रश्नी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Dec 2021 11:18 PM (IST)

    मुंबई

    म्हाडाचे वेळापत्रक जाहीर

    परीक्षा 1-15 फेब्रुवारी 2022 ला ऑनलाईन होणार

  • 20 Dec 2021 09:27 PM (IST)

    अजय कुमार गुजर 121

    कर्मचाऱ्यांकडून मी पैसे जमा केलेले नाही

    काही कर्मचारी भावनिक झाले आहेत

    उद्यापर्यंत संप च्या बाबत कर्मचारी आंदोलन आता माघार घेतील

    गुणरत्न सदावर्ते यांनी भडकवण्याच काम करू नये

    आम्हाला आंदोलन हायजॅक करण्याची भीती नाही

    आता आजाद मैदानात जाऊन आम्ही कर्मचऱ्याना ही भूमिका सांगणार

  • 20 Dec 2021 09:16 PM (IST)

    मुंबई

    अजय गुजर यांचा निर्णय आम्हाला अमान्य

    अजय गुजर यांनी काहीतरी सेटिंग करुन संप मागे घेतलेला आहे

    संप सुरुच ठेवणार

    पुणे आणि आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांचा निर्धार

  • 20 Dec 2021 09:08 PM (IST)

    अजय गुजर

    संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेने दिली होती . आणि आम्ही हिच संघटना हा संप मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत

    कर्मचारी भावनावष होत आहेत . पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतलीय

    आम्ही कोणाकडून पैस घेतले नाही, कोणी जमा केले आम्हाला ठाऊक नाही

    आमच्यात आणि सदावर्ते कोणतीही फूट पडलेली नाही

    आम्हाला सदावर्ते न्याय देतील, अशी आम्हाला खात्री आहे

    आता चर्चा करण्याची तयारी नाही, आम्ही संप मागे घेतला आहे

    आम्ही पुकारलेल्या संप मागे घेतला

  • 20 Dec 2021 09:07 PM (IST)

    पुणे

    शिक्षण विभागाकडून राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे निलंबित ,

    टीईटी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे आहे अटकेत,

    आज तुकाराम सुपेला निलंबित करण्याचा घेतला निर्णय,

    पोलिसांनी कारवाईचा निर्णय सोपवला होता शिक्षण आयुक्तांकडे

    आज निलंबनाचा घेण्यात आला निर्णय!

  • 20 Dec 2021 09:04 PM (IST)

    अजय गुजर

    सम्पकर्यांवर कारवाही झालीय ती मागे घ्यावी . मंत्र्यांनी ते मान्य केलंय

    लेखी आश्वासन आम्हाला दिलेले आहेत

    आम्ही संप पुकारला होता , तो आज झालेल्या बैठकी नंतर आम्ही मागे घेत आहोत . कर्मचाऱ्यांनी विलीकर्णाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे . न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल .

    राज्यभरातील कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेल्या लढा चर्चा केल्या प्रमाणे आता थांबवून, दिनांक 22 डिसेंम्बर पर्यँत कामावर हजर व्हावे

  • 20 Dec 2021 09:01 PM (IST)

    अजय गुजर

    21 ऑक्टोबर रोजी संघटनेने दिलेल्या नोटीस नुसार 3 नोव्हेम्बरच्या मध्य रात्री पासून कनिष्ठ एसटी कर्मचारी वेतन श्रेणी संघटनेने संप पुकारला

    एवढे दिवस संप सुरू आहे ,

    2 ते 3 वेळेस परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या

    काल शरद पवार साहेब्यांच्याशी नवी दिल्लीत प्रदीर्घ चरचा झाकी , तेव्हा विलींकरणाबाबत त्यांनी मान्य करण्याचं ठरवलं

    विलीनीकरण करावं ही आमची प्रमुख मागणी आहे , आम्ही त्यावर ठाम आहोत

    पण गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे

    20 जनेवारी 2022 समितीची मुदत तारीख आहे ,

    न्यायालयात आज प्राथमिक अहवाल सादर झालाय , 22 जानेवारीला पूर्ण अहवाल येईल

    आज आम्ही मंत्र्यांची भेट मागितली

    2 वाजल्यापासून आता पर्यँत चर्चा झाली

    विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय येईल तो आम्हा दोघांना मान्य आहे

    पगार वाढ वेतनश्रेणी चुकीची आहे याबाबत आम्ही सांगितलं, त्यावर सुधारणा करण्याचा चर्चा करून विचार करण्याच महामंडळाने सांगतीलय

    जे 54 आत्महत्या केलेलं कर्मचारी आहेत , त्यांना न्याय देण्यासाठी महामंडळ लवकर निर्णय घेईल , आर्थिक मदत 50 लाख आणि कुटुंबियातील व्यक्तीला तात्काळ नोकरीची आम्ही मागणी केलीय

    राज्यात 306 कर्मचारी करोना काळात मृत्युमुखी पडले त्यांना आर्थी अद्याप मिळालेली नाही , त्यावर लवकरच निर्णय व्हावा

  • 20 Dec 2021 08:52 PM (IST)

    अनिल परब

    जे संपासाठी कर्मचारी मुंबईत आले आहेत , त्यांनी दोन दिवस त्यांना आम्ही देतो , त्यांनी कामावर हजर रहावं

    शरद पवार यांनी या प्रकरणात आम्हाला मदत केली , मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि मार्गदर्शन आम्ही घेतोय , अजित दादा देखील सूचना देतायत

    महाराष्ट्राची लालपरी आता सुरू व्हावी हवी आशा आहे , कामगारांनी देखील आम्हाला सहकार्य करावा

    आज लेखी करार झालेला आहे ,

  • 20 Dec 2021 08:50 PM (IST)

    अनिल परब

    ज्या कर्मचारी संघटनेच्या नोटीस वर एसटीचा संप सुरू होता , 54 दिवस संप सुरू आहे

    आम्ही सतत संपकऱ्यांशी बोलत होतो

    उच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं होतं , संप करू नका असे न्यायालय म्हणाल होत ,

    शासकीय कर्मचार्याप्रमाणे त्यांना वेत मिळाव अशी मागणी होती ,

    उच्च न्यायालयाने तरी सदस्यीय समिती स्थापन आपण केली आहे। , 12 आठवड्यात अहवाल मुख्यमंत्र्यांना ही समिती देईल , तो अहवाल आम्ही कोर्टात नंतर सादर करू

    चर्चेची दार खुली असल्याचं आम्ही म्हटलं होतं

    दरम्यान च्या काळात आम्ही 5 हजार रुपये 1 ते 10 वर्ष सेवा देणाऱ्यासाठी वाढवेल , 10 ते 20 वर्ष सेवा देणाऱ्यांना 4 हजार आणि 20 वर्षाहून अधिक काम करणार्यांना अडीच हजार दिले

    आमच्या चर्चेला प्रतिसाद देत , एसटी कर्मचारी वेतन श्रेणीचे अध्यक्ष अजय गुजर आणि सरचिटणीस यांच्या संघणेच्या सर्व पद्धधिकार्यनशी आज आमची चर्चा झाली , आमचे सगळे लोक होते .

    चर्चेअंती काही गोष्टी आमही मान्य केल्या आहेत

    विलीनीकर्णाच्या मुद्यावर टत्रीसमितीच्या अखत्यारीत हा मुद्दा आहे , येणारा अहवाल आम्हाला मान्य असेल

    आर्थिक मागण्यांच्या बाबतीत त्यांची मागणी होती की शासकीय कर्मचार्यांप्रमाणे त्यांना पगार हवा होता , आम्ही त्यावर चर्चा करायला तयार आहोत

    कर्मचाऱ्यांनी संपत माघार घ्यावी , आमही त्यांच्यावरचे कारवाही मागे घेऊ

    फौजदारी कारवाही ज्यांच्यावर झाली आहे , ती कायदेशीर बाबी तपासून मागे घेऊ

  • 20 Dec 2021 08:49 PM (IST)

    अनिल परब

    समितीचा विलिनीकरणाचा अहवाल आम्हाला मान्य असेल

    एसटी कर्मचारी आणि प्रशासनाला मान्य असेल

    10 तारखेच्या आत महामंडळाचा पगार होईल

    अजय गुजर प्रणित एसटी कामगार संघटनेची संपातून माघार

    आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याबाबत शिफारस करु

    ज्यांच्यावर कारवाई झाली आहे ते कामावर हजर झाले तर कारवाई मागे घेऊ

  • 20 Dec 2021 08:43 PM (IST)

    मुंबई

    परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषद सुरु

    12 आठवड्यात समिती विलिनीकरणाचा अहवाल देणार – परब

    एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी अजय गुजर यांच्याशी चर्चा – परब

    एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी दारं खुली – परब

  • 20 Dec 2021 08:37 PM (IST)

    पुणे

    राज्यासाठी आज दिलासादायक बातमी,

    राज्याज आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णाची नोंद नाही,

    मात्र आतापर्यंत 54 जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद !

    54 पैकी 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय,

    सध्या 23 रुग्णांवर उपचार सुरू …

  • 20 Dec 2021 06:51 PM (IST)

    नवी दिल्ली

    गेल्या वर्षात वाघाच्या हल्ल्यात 44 जणांचा मृत्यू

    देशभरात 106 वाघांचा मृत्यू

    पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची लोकसभेत माहिती

    वाघांचे अस्तित्व आणि संवर्धनाबाबत प्रश्नावर उत्तर देताना लोकसभेत माहिती

  • 20 Dec 2021 06:28 PM (IST)

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 33 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ – दिवसभरात रुग्णांना 77 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 00 मृत्यू. -81 रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508323 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 830 – एकूण मृत्यू – 9109 -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498384 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4269

  • 20 Dec 2021 06:15 PM (IST)

    दादा भुसे

    शिवसनेत कोणताही गट नाही

    छत्रपतींना मानणारा एकच गट आहे आणि उद्धव ठाकरे हे आमचे पक्षप्रमुख आहेत नेते आहेत

    मुख्यमंत्री काय करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे सांगायची गरज नाही

    मात्र घरातला विषय घरातचं मिटवता आला असता हे सांगायची गरज नाही

    शिवसेना मंत्री दादा भूसेंची अप्रत्यक्ष रामदास कदमांवर टिका

    मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटूंबप्रमुख आहेत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी काम केलंय

    मुख्यमंत्री शिवसैनिकांना वेळ देत नाहीत रामदास कदमांच्या वक्तव्यावर दादा भूसेंचा टोला

  • 20 Dec 2021 05:51 PM (IST)

    गुणरत्न सदावर्ते

    पगारवाढ हा मुख्य मुद्दा नव्हताच

    निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फ केलं जातंय

    अनिल परब हे तोडगा काढत नाही

    अनिल परब फक्त अल्टिमेटम देत आहेत

    अनेकांवर बदल्यांची, बडतर्फची कारवाई केली

    जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांना त्रास दिला जातोय

    आझाद मैदानावर काहीच सुविधा नाहीत

  • 20 Dec 2021 05:16 PM (IST)

    पुणे

    – टीईटी परीक्षेतील गैरव्यवहारबाबत पुणे पोलीस देणार शिक्षण आयुक्तांना पत्र,

    – तर आरोग्य भरती पेपर फुटीप्रकरणी आरोग्य संचालकांना पत्र,

    – पत्राच्या माध्यमातून आतापर्यंतच्या तपासाची माहिती दोन्ही विभागांना दिली जाणार,

    – पुणे पोलिसांच्या तपासावर संबधित विभाग कारवाई करणार,

    – टीईटी परीक्षा गैरव्यवहारात अडकलेले तुकाराम सुपे यांच्यावरील कारवाईचा निर्णय शिक्षण आयुक्त घेणार

  • 20 Dec 2021 05:09 PM (IST)

    मुंबई

    अजय गुजर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ अनिल परब यांच्या भेटीला..

    एककीकडे न्यायालयात सुनावणी सुरू असताना अजय गुजर परबांच्या भेटीला

  • 20 Dec 2021 05:08 PM (IST)

    पुणे

    ठाकरे सरकारनं महिला शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वपुर्ण निर्णय,

    2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्षे म्हणून राज्य सरकारनं केलं जाहीर,

    शेती योजनांमध्ये आणि अन्नधान्य प्रक्रीया योजनांमध्ये 30टक्के निधी ठेवणार राखीव,

    तर आतापर्यंत 2 हजार 450 कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली

    राज्याचे कृषिमंत्री दादा भूसे यांची माहिती,

    अवकाळी पाऊस, चक्रीवादळ , या सगळ्यात शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासन मिळून,

    राज्य सरकारच्या प्रयत्नानं 2 हजार 459 कोटी रुपये वितरीत केल्याची दिली माहिती,

    ठाकरे सरकार 2022 हे वर्षे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून करणार साजरा

  • 20 Dec 2021 05:08 PM (IST)

    कोल्हापूर

    राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवलेली नाहीत.राज्यपालांनी याबाबत जे होतंय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे.हे सरकार मात्र राज्यपालांचे अधिकार मात्र कमी करत सुटल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय.चंद्रकांत पाटलांच्या या मुद्द्याने मात्र राष्ट्रपती राजवटच्या मुद्दाने पुन्हा जोर धरलाय

  • 20 Dec 2021 05:03 PM (IST)

    कोल्हापूर

    चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व गटात उमेदवारी अर्ज भरलेत..दोन जागा मिळवल्याशिवाय भाजप आपले उमेदवार मागे घेणार नाही…असं नाही झालं तर सर्व जागांवर निवडणूक लढवली जाईल..

    अमित शाह गेले दोन दिवस महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आले होते..सहकारातील खूप कळणारा माणूस सहकार विभागाला मिळाला

    कोण आजारी आहे. कोण जेलमध्ये आहे. राज्यात गोंधळ सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेसमोर जा. कळेल जनता कुणाला स्वीकारते..

    यांना जे जे त्रासदायी होईल ते यांना नको आहे. तपास यंत्रणा यांचा आणि भाजपचा कोणताही संबध नाही.. लोक विचार करून आपलं मत ठरवतात…

    एक दोन नव्हे तर तीन प्रकारचे पेपर फुटले. या सगळ्यांची पाळंमुळं राजकीय व्यक्तीपर्यंत पोहचत आहेत..त्यावरून सीबीआय चौकशीची मागणी आम्ही लावून धरणार आहे…

    कोणते उद्योग गुजरातमध्ये गेले याची सुभाष देसाई यांनी द्यावी…काही गेले असतील तर त्याची कारण वेगळी असतील…

    देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील हे प्रचाराच्या पहिल्या सभेपासून सुरू होतं… त्यावेळी का विरोध केला नाही..

    गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत संपादक, संजय राऊत प्रवक्ते, संजय राऊत हेच सरकारचे प्रवक्ते पाहायला मिळाले…सगळ्यांना बाजूला केलं गेलं..त्यामुळे सेनेतील घुसपट बाहेर पडतील…उद्या सामनामधून टीका होणार यात शंका नाही..

  • 20 Dec 2021 04:08 PM (IST)

    पालघर

    जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ

    जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ

    अलीकडील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या (6 डिसेंबर 518) कमी होताना दिसत होती

    मात्र मागील तीन दिवसात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा 900 पार

    नागरिकांना जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

    नाताळ व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

    लसीकरण मोहीम अधिक जोमाने चालवा, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांचे आवाहन

  • 20 Dec 2021 04:03 PM (IST)

    पालघर

    पालघर जिल्ह्यात तलासरी, मोखाडा आणि जव्हार मध्ये नगरपंचायत निवडणूक

    उद्या 7: 30 ते 5 वाजे पर्यंत मतदान

    तलासरी नगरपंचायत 17 प्रभागासाठी 19 मतदान केंद्र ,

    तलासरी नगरपंचायत क्षेत्रात कुठल्याही मोठ्या नेत्यांच मतदान नाही

  • 20 Dec 2021 03:49 PM (IST)

    कोल्हापूर

    प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे निधन

    कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात जोशी यांच्यावर सुरु होते उपचार

    वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास

    हिंदी आणि मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले

    चंद्रकांत जोशी यांनी कला शिक्षक म्हणून 40 वर्ष सेवा केली

  • 20 Dec 2021 03:43 PM (IST)

    वसई

    जातीच्या दाखल्यासाठी वसई तहसील कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा एल्गार

    1000 च्या श्रमजीवी महिला, पुरुष कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात घेराव

    6000 जातीचे प्रलंबित दाखले तात्काळ द्यावेत ही प्रमुख मागणी घेऊन श्रमजीवी संघटनेचे आंदोलन सुरू

  • 20 Dec 2021 03:42 PM (IST)

    सुभाष देसाई

    – मुख्यमंत्री आजारी असल्यानं राज्याच्या कारभारात काही फरक पडलेला नाही. ते कॅबिनेटमध्ये नेहमी असतात – मुख्यमंत्री अधिवेशनात सहभागी होतील.सोशल मिडियावर काय येतंय ते माहिती नाही – रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखलच घेतली जाईल. – दोन वर्षांनी ते हे बोलतायत. ही त्यांची निराशा आहे. आणखी 3 वर्षे वाट पहा.नियमांप्रमाणेच तेव्हा मुकाबला आहे. काय होतंय ते पहा – हिंदुत्वावर संकट येईल तेव्हा हेच लोक शेपूट घालून बसतील – मी काही त्या पार्टीत नव्हतो…बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय नेहमी. – आमचे प्रेम तीनचाकीवरच आहे…

  • 20 Dec 2021 03:42 PM (IST)

    सुभाष देसाई

    – 2014 ते 2021 पर्यंत केवळ दोन मेडिकल कॉलेज मंजूर. युपीला मात्र 27 मेडिकल कॉलेज मंजूर झाली. याकरता युपीला 2700 कोटी व महाराष्ट्राला फक्त 263 कोटी दिले गेले – सर्वात जास्त कोरोना रूग्ण महाराष्ट्रात असतानाही सर्वात कमी रेमडेसिवर दिले गेले -6340 कोटींची जीएसटी थकबाकी केंद्राकडे आहे – आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र तात्काळ मंजूरी द्या – तुमच्या आवडीचे सरकार नसले तरी तुमच्या निर्णयांचा फटका जनतेला बसतोय

  • 20 Dec 2021 03:41 PM (IST)

    सुभाष देसाई

    – अमित शहांनी काल राजकीय भाष्य केले होते. राज्याला गतवैभव मिळवून देण्यात राज्य सरकार हतबल ठरतंय, असे ते म्हणाले. पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे असलेले वैभव पळवून नेण्याचे काम केंद्राने व गुजरातने थांबवावे – कोरोना काळात आम्ही २ लाख कोटी रूपये आम्ही आणलेत – केंद्राकडून नेहमी राज्यावर अन्याय केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही पळवापळवी झाले. पण ते गप्प बसले. आम्ही नाही गप्प बसणार – जागतिक आर्थिक केंद्राचा मान हा मुंबईलाच हवा. कारण आर्थिक केंद्र हे मुंबईतच आहे. पण गिफ्ट त्यांनी गुजरातला सुरू केले. जे चालतच नाही. – दत्तोपंत ठेंगडी कामगार शिक्षण संस्था नागपुरात होती, ती दिल्लीला हलवली गेली – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याचे सर्व पुरावे देवूनही केंद्र सरकार निर्णय घेत नाही

  • 20 Dec 2021 02:52 PM (IST)

    नवी दिल्ली

    ईडी कार्यालयात ऐश्वर्या रायची चौकशी सुरू

    ईडीच्या अधिकार्‍यांकडून ऐश्वर्या कडे चौकशी सुरू

    ऐश्वर्याच्या चौकशीतून काही नावं समोर येण्याची शक्यता

    चौकशीला येण्यापूर्वी ऐश्वर्याने सगळी माहिती संकलित करून ठेवल्याची सूत्रांची माहिती

  • 20 Dec 2021 02:35 PM (IST)

    नवी दिल्ली

    ऐश्वर्या राय दिल्लीच्या ईडी कार्यालयात पोहोचली

  • 20 Dec 2021 02:33 PM (IST)

    बीड

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

    राष्ट्रवादी नेते महेबूब शेख यांनी दाखल केला दावा

    महेबूब शेख हे बलात्कारी असल्याचं केलं वाघ यांनी वक्तव्य

    बीडच्या न्यायालयात महेबूब शेख यांनी दाखल केला दावा

    50 लाखांचा दावा दाखल

    चित्रा वाघ बीडच्या न्यायालयात हजर

  • 20 Dec 2021 02:33 PM (IST)

    यवतमाळ

    2 एकर शेतातील शेतकऱ्याचा ऊस आगीत जळून खाक

    नारायण भरवाडे फुलसावंगी रोड महागाव यांच्या शेतातील शॉर्ट सर्किटमुळे दोन एकर मधील ऊस जळून खाक

    घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले आहे

    आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सूरु

    100 टन उसाचे नुकसान झाल्याची माहिती

  • 20 Dec 2021 02:32 PM (IST)

    पुणे

    – पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील बोगस भरती प्रकरण

    – 14 ग्रामसेवक आणि 2 कृषी विस्तार अधिकारी निलंबित,

    – 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा,

    – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची मोठी कारवाई

  • 20 Dec 2021 02:32 PM (IST)

    कोल्हापूर

    दीपाली सय्यद बाईट

    On कुस्ती उपक्रम

    Dbs रेसलिंग फौंडेशन ची सुरवात आज पासून करतोय

    क्रिकेट प्रमाणेच कुस्तीला चालना दिली पाहिजे

    …..

    On 21 वर्ष वय

    उत्तम निर्णय आहे

    आई वडिलांसाठी तर खूपच उत्तान

    या वयात ती निर्णय चांगला आणि विचार पूर्णावक घेऊ शकते …………..

    On कुस्ती स्पर्धा खासबाग मैदानात मोठ्या कुस्ती स्पर्धा लवकरच घेणार

    मैदान मिळत नसल्याने कुस्तीपटू नाराज आहेत ………………..

    On महापूर मदत

    कोकण रत्नागिरी मध्ये मदत पोहचवली आहे

    टीम या बाबत काम करत आहे

    कोल्हापूर मध्ये येणारा पूर कसा बंद होईल यावर माझं काम सुरु आहे

    प्रशासकीय पातळीवर मदत सहजासहजी मिळत मिळत नाही पण मी करून दाखवेन …….. On गुलाबराव पाटील

    महिलंबदाल अपशब्द वापरतात कशाला

    महिलांचा आदर राखलाच गेला पाहिजे

    आपण कोणा बदल काय बोलतो याचा विचार केला पाहिजे ……………

    On छत्रपती शिवाजी महाराज अवमान

    ही चुकीची गोष्ट आहे

    ज्या प्रमाणे कर्नाटक आपल्या भाषेसाठी आग्रही आहे तसच आपण ही राहील पाहिजे

  • 20 Dec 2021 02:31 PM (IST)

    नाशिक

    – नाशकात दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग, सिडको परिसरातला धक्कादायक प्रकार – उत्तम नगरच्या ओम कॉलनीत दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग – सकाळी 11 वाजेदरम्यान घडला प्रकार – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 60 वर्षीय महिलेला घराबाहेर बोलवून चेनस्नॅचिंगची घटना – महिलेला बोलण्यात गुंतवून गळ्यातील दीड तोळ्याचं मंगळसूत्र ओढून चोरटे फरार – संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद

  • 20 Dec 2021 02:30 PM (IST)

    जळगाव

    एकनाथ खडसेंच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर

    मी माझ्या मतदारसंघात विकास गेला आहे बोदवड परिसर सिंचन सारखे योजना माझ्या मतदारसंघात रखडलेले नाही मी आजही धरणगावला वेळेवर पाणी देतोय अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे

    एकनाथ खडसे यांनी भाज्या मतदारसंघात रस्ते मंजूर केले असतील ते मंत्री म्हणून त्यांनाही मंत्री बाळासाहेबांनी केलं हे त्यांनी लक्षात ठेवावं अशा शब्दात गुलाबराव यांनी घणाघात केला आहे

  • 20 Dec 2021 02:30 PM (IST)

    बीड/ आष्टी

    भाजप आमदार सुरेश धस 121

    मागच्या वेळेस 15 पैकी 13 जागा निवडून आले होते. आम्ही काम केलं आहे म्हणून जनतेनी आम्हाला आशीर्वाद दिला आहे आमची दादागिरी नाही

    बोगस मतदान मुळात नाहीच, राज्याच्या निवडणूक आयोगापेक्षा मोठं कुणीही नाही

    नवाब मलिक साहेब जे बोलतात ते त्यांना उलट कोर्टात जाऊन माफी मागतात हे इतिहास आहे

    पाच ठिकाणी नगरपंचायत निवडणुका आहेत. माझ्या मतदारसंघातील सर्व नागरपंचायतीवर आमचाच झेंडा राहील….

  • 20 Dec 2021 01:38 PM (IST)

    देशाच आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा अपमान होतो त्या वेळेला तुम्ही शांत का बसता ?: अरविंद सावंत

    छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद भाजपसोबत होते त्याचं पुढं काय झालं ?

    कर्नाटकातील घटनेबाबत खासदार सावंत यांचा सवाल

    देशाच आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा अपमान होतो त्या वेळेला तुम्ही शांत का बसता ?

  • 20 Dec 2021 01:00 PM (IST)

    तुम्ही काढलेलं ऊसतोड मजुरांचे महामंडळ बंद पडलं ते मी सुरु केलं: धनंजय मुंडे

    ताई साहेब तुम्ही मंत्री असताना 12 डिसेंबर 2014 ला ऊसतोड मजुरांचे महामंडळ काढले ते बंद पडले. मी ते महामंडळ नव्याने सुरू केले. हातात कोयता आणि दसरा मेळावा घेऊन ऊसतोड मजुरांचे प्रश्न सुटत नसतात, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.

  • 20 Dec 2021 12:34 PM (IST)

    या अधिवेशनात नवा विधानसभा अध्यक्ष मिळेल: बाळासाहेब थोरात

    महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवा अध्यक्ष मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. अध्यक्ष कोण असेल ते पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 20 Dec 2021 11:17 AM (IST)

    संविधानानं दिलेल्या अधिकाराचा अपमान करु नका

    मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या कामाची पद्धत कळली आहे. आशिष शेलारांना सांगायचंय की तुम्ही आमदार झालात, मंत्री झालात तरी तुमचा जीव महापालिकेत का घुटमळतोय. त्या जीवाला तुम्ही केलेला आरोप सिद्ध करुन मोकळ करा.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानं दिलेल्या अधिकाराचा अपमान करु नका. तो कोणतरी मंत्री होता त्याचं नाव पुराव्यासह सिध्द करा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

  • 20 Dec 2021 11:14 AM (IST)

    Kishori Pednekar : आमदार झालात, मंत्री झालात मग महापालिकेत जीव का घुटमळतोय, किशोरी पेडणेकरांचा आशिष शेलारांना सवाल

    आपल्याला राजकीय सत्ता हवी असते, तुम्हाला तर सत्ता हवीच असते. मी मुंबईची प्रथम नागरिक आहे. तुम्ही आमच्यावर शिंतोडे उडवले. मी त्याला बघेनचं, महिला आघाडी, महाविकास आघाडी सरकार म्हणून बघून घेऊ, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

    तुमच्या घाणेरड्या पत्रानं खचून जाणारी किशोरी पेडणेकर नाही. तुम्हाला आता एक चॅलेंज आहे. तुम्ही त्यांना विचारा नक्की कोण होता. आता त्यांना पुरावे देण्याची मागणी करावी. नक्की कोण मंत्री होता याची माहिती द्या नाहीतर जनता आणि माध्यमांची माफी मागा,असं आव्हान किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांना दिलं आहे.

    मुख्यमंत्र्यांशी बोलले, आयुक्तांशी बोलले आहे. कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये म्हणून पंतप्रधान जागरुकता पसरवत असतात. माझा सवाल आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटक एकाच पटलावर आहे. माझा सवाल आहे त्यांना महाराष्ट्राला एक न्याय आणि कर्नाटकला एक न्याय का? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केलाय.

  • 20 Dec 2021 10:49 AM (IST)

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शिवसेना संसदेत मागणी करणार

    नवी दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरण

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    शिवसेना खासदार संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का ? शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा सवाल

  • 20 Dec 2021 10:38 AM (IST)

    मुंबईच्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं एकवटले एसटी कर्मचारी

    मुंबईच्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येनं एकवटले एसटी कर्मचारी… घोषणाबाजीने दुमदुमला परिसर…

    – पोलिसांनी आझाद मैदानाचा गेट केला बंद…

    – संपुरेण मैदानात एसटी कर्मचारी पेहोचले…

    – आज न्यायालयात एसटी कर्मचार्यांच्या बाजूने निकाल लागेल असे मेसेज फिरत असल्याने हजारोंच्या संख्येनं लोक आझाद मैदानात पोहोचले…

    – काही झालं तरी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहणार,

  • 20 Dec 2021 09:34 AM (IST)

    इडी, सीबीआय हे भाजपाचे चिलखत – राऊत

    पेट्रोल शुल्क कपातीवरून संजय राऊतांचा भाजपाला टोला

    इंधनाचे दर दहा रुपयांनी वाढवायचे, आणि चार रुपयांनी कमी कारयचे

    इडी, सीबीआय हे भाजपाचे चिलखत, पण आम्हाला फरक पडत नाही

    संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला

  • 20 Dec 2021 09:30 AM (IST)

    संजय राऊत यांची पत्रकार परिषद

    संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल

    पुण्याच्या भूमित येऊन खोटं बोलू नका

    संजय राऊत  यांचा अमित शहांना टोला

    विधानसभा निवडनुकीत 50-50 टक्के सत्तेचे सुत्र ठरले होते.

  • 20 Dec 2021 08:17 AM (IST)

    निफाडचा पारा घसरला

    – निफाडचा पारा घसरला….

    – उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफडच्या किमान तापमनात मोठी घसरण…..

    – निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर 8.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची राज्यातील निच्चांकी नोंद….

  • 20 Dec 2021 07:53 AM (IST)

    दुबईवरुन नागपुरात आलेल्या तरुणाला कोरोनाची बाधा

    – दुबईवरुन नागपुरात आलेल्या तरुणाला कोरोनाची बाधा

    – जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पुण्याला पाठवले, रिपोर्टची प्रतिक्षा

    – 24 तासांत जिल्ह्यात 4 नव्या कोरोना रुग्णांची भर

    – 24 तासांत 10 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    – नागपूर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ४० वर

  • 20 Dec 2021 07:43 AM (IST)

    नाशिक  युवा सेनेचे नाशिकला अधिवेशन

    नाशिक  युवा सेनेचे नाशिकला अधिवेशन

    निवडणुकीच्या तोंडावर युवा सेनेला सक्रिय करणार आदित्य ठाकरे

    8 आणि 9 जानेवारीला नाशिकमध्ये होणार अधिवेशन

    एकनाथ शिंदे,संजय राऊत यांची उपस्थिती

    तर आदित्य ठाकरे करणार अधिवेशनाचा समारोप

    सातपूर येथे होणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून 2 हजार युवा सेना पदाधिकारी राहणार उपस्थित

  • 20 Dec 2021 07:43 AM (IST)

    संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार

    – पुण्यात तिळावर दरवाढीची संक्रात,

    – मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देशात तिळाचे उत्पन्न साधारणतः 25 टक्क्यांनी घटणार आहे,

    – त्यामुळे संक्रांतीच्या तोंडावर तिळाच्या दरात तेजी कायम राहणार,

    – चार महिन्यांत तिळाच्या दरात 40-50 रुपयांनी वाढ झाली आहे.

  • 20 Dec 2021 07:22 AM (IST)

    टीईटी, म्हाडा परीक्षेतील घोटाळ्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक राज्यभर रवाना

    – टीईटी, म्हाडा परीक्षेतील घोटाळ्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक राज्यभर रवाना,

    – पुणे पोलिसांच्या सायबर व गुन्हे शाखेची आठ पथके राज्यभरात तपासासाठी रवाना,

    – या प्रकरणांमधून आणखी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे,

    – या प्रकरणामध्ये अनेक खासगी क्‍लासचालक, दलालांचाही सहभाग असल्याची पोलिसांना माहिती.

  • 20 Dec 2021 07:21 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेचे मिशन क्लिन ट्रान्सपोर्ट

    – नागपूर महानगरपालिका तीन महिन्यात 167 बसेस ‘सीएनजी’त बदलणार

    – मार्च 2022 पर्यॅत 167 बसेस ‘सीएनजी’त बदलणार

    – नागपूर महानगरपालिकेचे मिशन क्लिन ट्रान्सपोर्ट

    – नागपूर शहरात आणखी ६० इलेक्ट्रिक बसेस येणार

    – शहरातील वाढतं वायू प्रदुषण कमी करण्यासाठी मनपाचे प्रयत्न

  • 20 Dec 2021 06:48 AM (IST)

    हायकोर्टात आज सुनावणी शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेनं रवाना

    शेकडो एसटी कर्मचारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेयत…

    – आज उच्च न्यायालयात संपाबद्दल असलेल्या सुनावणीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत…

    – महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने 3नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप अद्याप सुरूच आहे.

    – उच्च न्यायालयाने एसटीच्या विलीनीकरणावर राज्य शासनाला समिती गठीत करण्याचे आदेश देऊन प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी मागितला होता.

    – संपकऱ्यांनी 20 डिसेंबर पर्यंत संप सुरूच ठेवावा, विलीनीकरण पक्के असल्याचा दावा वेळोवेळी करण्यात आला होता…

  • 20 Dec 2021 06:09 AM (IST)

    राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 54 वर

    महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 54 वर पोहोचली आहे.

Published On - Dec 20,2021 6:06 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.