LIVE : आमदार राम सातपुतेंच्या विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर
मुंबई: राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पोलिसांकडून आमदार राम सातपुतेंच्या विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश
माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासल्याप्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या लग्नाला हजारो लोक उपस्थित असून कार्यकर्ते आणि नेते विनामास्क दिसून आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.
-
नागपुरात दिवसभरात 341 नव्या रुग्णांची नोंद, तर 305 बाधितांची कोरोनावर मात
नागपूर : नागपुरात दिवसभरात 341 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 305 जणांची कोरोनावर मात, नागपुरात आतापर्यंत 1 लाख 20 हजार 628 रुग्ण कोरोनाबाधिच, यापैकी 1 लाख 12 हजार 707 कोरोनामुक्त, नागपुरात आतापर्यंत 3 हजार 864 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
-
-
चंद्रपुरात महापालिका हद्दीत नाईट कर्फ्यू, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मुक्त संचार करण्यास मनाई
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत नागरिकांना रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मुक्त संचार करण्यास राज्य शासनाचे निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मनाई आदेश काढला आहे. हा आदेश दिनांक 22 डिसेंबर 2020 पासून 5 जानेवारी 2021 या कालावधीसाठी लागू राहील. वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवेतील तसेच कर्तव्यावर असणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू राहणार नाही.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्याविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड सहिता, साथरोग कायदा व इतर संबंधीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
-
ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत निवडणुकीनंतर, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका
नागपूर : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतिच्या निवडणुका राज्यभर सुरू आहेत. पण ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी एक महत्वपूर्ण याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठातील वकील देविदास शेळके यांनी ही याचिका सादर केली आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाची आरक्षण सोडत काढणे हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याची भूमिका या याचिकेत घेण्यात आली आहे. ही याचिका अद्याप न्यायालयाने दाखल करून घेतलेली नाही. मात्र याचिकेवर निर्णय घेण्यासाठी कोर्टाने 7 जानेवारी रोजीची तारीख दिली आहे. 7 तारखेला न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालय काय निर्णय देईन याकडे राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
-
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फ़णसळकर यांनी जारी केले संचारबंदीचे आदेश
ठाण्यात आज रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी. या दिवसांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी असेल. विनाकारण फेरफटका मारण्यास, सायकल, मोटारसायकल किंवा गाडीने अनावश्यक बाहेर पडल्यास, कलम 188 द्वारे कारवाई केली जाणार आहे. घराच्या बाहेर, इमारतीच्या गच्चीवर साजरे होणारे खाजगी समारंभ कोठेही रात्री ११ नंतर बाहेर येण्यास कार्यक्रम करण्यास मनाई.
-
-
परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी
बीडमधील परळी वैद्यनाथ साखर कारखान्यात 37 लाख 84 हजार 914 रुपयांची चोरी झाली आहे. हा कारखाना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. कारखान्याच्या गोदाम आणि स्टोअररुममधून चोरी झाली.याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक
सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यासाठी पूर्व तयारी करण्यासाठी आढावा घेऊन चर्चा करण्यात आलीय. या बैठकीत मविआ नेते आणि सुप्रीम कोर्टात आरक्षणासंदर्भात बाजू मांडणाऱ्या वकिलांशी सल्लामसलत करून सविस्तर चर्चा करण्यात आलीय.
-
नगर अर्बन बँकेत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल. काही संचालकांनी मिळून कट रचून, संगनमत करुन, बँकेस खोटे कागदपत्र तयार केले. बँकेच्या रकमेचा अपहार करुन ठेवीदार आणि सभासद यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. आरोपींमध्ये नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ यांचाही समावेश. 2017 साली दिलीप गांधी चेअरमन असताना झाली होती फसवणूक. भारतीय दंड विधान कलम 406 , 420 , 465 , 467 , 471 , व 120 ब या कायदयाअंतर्गत फिर्याद दाखल
-
कोरेगाव-भीमा येथे मानवंदना देण्यासाठी गर्दी करु नये, राज्य सरकारच्या सूचना
मुंबई : दरवर्षी कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो नागरिक जमतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरेगाव-भीमा येथे गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनप्रमाणे 1 जानेवारीला दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून या सोहळ्याचे प्रसारण दिवसभर सुरू राहणार आहे. तर, कोरेगाव-भीमा येथे कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
-
इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी निकाल
मुंबई : इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा उद्या निकाल. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. निकाल उद्या दुपारी 1 वाजता वेबसाईटवर पाहता येणार. www.maharesults.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार.
-
2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलवा, जरूर येईन: उद्धव ठाकरे
अनेक उद्योजक मला उद्घाटनासाठी आमंत्रित करत असतात. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही 2050 मध्येही मला मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला बोलावलं तरी मी येईन. महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर नेणं सोपं नाही. तुम्ही उद्योजक म्हणजे आमचं कुटुंब आहात. हे कुटुंब तोडणं सोपं नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
-
एक उद्योजक, एक उद्योग मित्र ही संकल्पना चांगली : उद्धव ठाकरे
महाराष्ट्र मॅग्नेटिक आहे. घरातून बळ मिळत असल्यामुळे देशात गुंतवणूक वाढत आहे. प्रत्येक उद्योगाला एक उद्योग मित्र देणार. महाराष्ट्रात उद्योजक हेच ताकद. महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर नेणं सोपं नाही. हे कुटुंब तुटू शकत नाही, उद्योजक हे माझं कुटुंब आहे.
-
एक उद्योजक, एक उद्योग मित्र ही संकल्पना चांगली : उद्धाव ठाकरे
महाराष्ट्रात मॅग्नेटिक आहे. राज्यात गुंतवणूक वाढत आहे. प्रत्येक उद्योजकाला एक उद्योग मित्र देणार. उद्योजक हेच महाराष्ट्राची ताकद.
-
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भीती पुन्हा वाढलेय: मुख्यमंत्री
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे राज्यातील भीती पुन्हा वाढली आहे. कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही.
-
नाशिक येथून निघालेला शेतकरी मोर्चा धुळ्यात दाखल; शेतकऱ्यांचे नागरिक, स्थानिक शेतकऱ्यांकडून स्वागत
नाशिक येथून निघालेला शेतकरी मोर्चा धुळ्यात दाखल. धुळ्यात शेतकऱ्यांचे नागरिक, स्थानिक शेतकऱ्यांकडून स्वागत. नाशिकचे शेतकरी शिरपूरकडे मार्गस्थ.
-
अहमदनगर जिल्ह्यात भाजपला धक्का, अनेक भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
अहमदनगर : जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का, अनेक भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर नवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब पांडे, पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश जगताप यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
-
आता महापालिका क्षेत्राबाहेरही नाईट कर्फ्यु शक्य, जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले नाईट कर्फ्युचे अधिकार
मुंबई : आता महापालिका क्षेत्राबाहेरही नाईट कर्फ्यू शक्य, जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले नाईट कर्फ्युचे अधिकार, मुख्य सचिवांना विचारुन लावता येणार संचारबंदी, आजपासून 27 महापालिका क्षेत्रात संचारबंदी, रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राहणार संचारबंदी, अत्यावश्यक सेवा संचारबंदीतून वगळल्या
-
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासोबत देशाचं नेतृत्व करावं अशी अनेकांची इच्छा : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासोबत देशाचं नेतृत्व करावं अशी अनेकांची इच्छा : संजय राऊत
अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपल्याकडे येत आहेत, तीन पक्ष एकत्र आहेत, त्यामुळ इनकमिंग एकाच पक्षातून होणार, महाराष्ट्राचं नेतृत्व तीन पक्षाच्या नेत्यांनी करायचं ठरवलं आहे. आमचा एकही फुटणार नाही म्हणताहेत, पण थोडे दिवस थांबा, काय काय होतंय दिसेल. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्या भूकंपाचं केंद्रबिंदू शिवेसेनाभवन असेल, गेल वर्षभर महाराष्ट्रात अनेक संकटे, उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय कार्यकर्ते सेनेत प्रवेश करताहेत, ते कुठे होते हे आपण आता बोलायचं नाही, आज हे सभागृह भरलं असतं पण कोरोनाच्या अडचणी आहेत. उद्योग आघाडी शिवसेनेसोबत आली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासोबत देशाचं नेतृत्व करावं अशी अनेकांची इच्छा आहे. शिवसेना फक्त एक पक्ष नाही, सेना एक कुटुंब आहे. बाळासाहेबच आमचे कुटुंब प्रमुख
आजही उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करताहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करु. नाशिक आणि धुळे दोन्हीही शहरं महत्वाची आहेत. नाशिकच्या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. नाशिक कायम सेनेचा बालेकिल्ला. मागच्या 5 वर्षात काय झालं ते सोडा.
-
अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत, सगळी इनकमिंग एकाच पक्षातून होणार
मुंबई : अनेक पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत, सगळी इनकमिंग एकाच पक्षातून होणार. राज्यात तिन्ही पक्षांच सरकार आहे. त्यामुळे इनकमिंग एकाच पक्षातून होणार.
-
क्रांतीवार लहूजी साळवे चौकात शेतकऱ्यांना पेलिसांनी रोखलं, नेत्यांच्या भाषणास सुरुवात
मुंबई : पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना अडवले, क्रांतीवार लहूजी साळवे चौकातर अडवल्यामुळे रस्त्यावरच नेत्यांचे भाषण सुरु, शेतकरी नेते राजू शेट्टी, बल्लूभाऊ जवंजाळ, अजय तापकीर, प्रतिमाताई शिंदे, जयंत पाटील , रवी तुपकर, कपिल पाटील आदी नेते ऊपस्थित. शेतकऱ्यांना पुढे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, राज्यमंत्री बच्चू कडू अद्याप आंदोलनस्थळी पोहोचले नाहीत. बच्चू कडू यांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
-
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक, सोनिया गांधींशी चर्चा करुन निवडणुकीची तारीख ठरणार
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच नवडणूक. निवडणुकीची लवकरच घोषणा होणार. निवडणूक प्रक्रियेबाबत काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री आणि विद्यमान अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात लवकरच चर्चा. चर्चा करुन लवकरच निवडणुकीची तारीख निश्चित केली जाणार
-
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पंढरपुरात दाखल
सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पंढरपुरात दाखल, तालुक्यातील भंडिशेगाव, कासेगाव, उपरी, टाकळी गावामध्ये पथकाकडून पाहणी, पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात 30 हजार हेक्टर जमिनीवरील डाळिंब, द्राक्ष, केळी पिकांचे झाले होते नुकसान.
-
पुण्यातील रानगव्याला न पकडता नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचे प्रयत्न
पुणे – रानगव्याला न पकडता त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्याचे वन विभागाचे प्रयत्न सुरु, रानगवा ज्या भागात आहे तो जंगलसदृश्य परिसर, यावेळी नागरिकही गडबड गोंधळ न करता सहकार्य करत आहेत. रानगवा मुख्य रस्त्यावर येऊ नये, याची काळजी. या भागात गवे असल्याची स्थानिक नागरिकांची माहिती. लवकरच रानगव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवलं जाईल, पुणे उपविभागीय वन अधिकारी राहुल पाटील यांची माहिती
-
बीकेसी आणि खेरवाडीसह मातोश्रीच्या पूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त
मुंबई : बीकेसी आणि खेरवाडीसह मातोश्रीच्या पूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचेही नियोजन, मोर्चा इथेच थांबवणार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांंची माहिती, बीकेसी परिसर हाय सेन्सिटिव्ह भाग असल्यामुळे शेतकरी संघटनाच्या नेत्यांनाही विनंती केल्याची माहिती
-
मातोश्री परिसराला छावणीचं स्वरुप, शेतकरी संघटनांच्या मोर्चामुळे रस्ते बंद
मुंबई : वांद्र्यातील मुख्यमंत्री निवासस्थान मातोश्री परिसराला छावणीचं स्वरुप, शेतकरी संघटनांच्या मोर्चामुळे मोठा पोलीस बंदोबस्त, कलेक्टर ऑफिसमागील सर्व रस्ते पेलिसांकडून बंद, लहूजी लाळवे चौकातच मोर्चेकऱ्यांना थांबवलं
-
खालापूर दुय्यम निबंधक लाच घेताना रंगेहाथ
रायगड : खालापूर दुय्यम निबंधक लाच घेताना अटकेत, पाच लाखांच्या मागणीनंतर साडेतीन लाखांवर तडजोड, सुरेंद्र शिवराम गुप्ते रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात, तक्रारदाराच्या कुटुंबियांच्या नावे जमीन नोंदणी दस्त करण्यासाठी मागितली लाच, मुंबई-पुणे जुन्या मार्गावर हॉटेलमध्ये कारवाई
-
आमदार सुनील भुसारा यांच्याकडून जनतासंवादच्या माध्यमातून विविध योजनांचा आढावा
पालघरचे विक्रमगड विधानसभा आमदार सुनील भुसारा आणि पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष आज विक्रमगड विधानसभेच्या अंतर्गत वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात जनतासंवाद च्या माध्यमातून विविध योजनांचा आढावा घेत आहेत
-
ई-बालभारती कार्यालयाबाहेरील आंदोलन तापलं, महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा
पुण्यात ई-बालभारती कार्यालयाबाह्रील आंदोलन तापलं, तारादुतांनी घेतला आक्रमक पवित्रा, 10 मिनिटांत प्रवेश न मिळाल्यास आत घुसण्याचा इशारा, सारथी संचालक मंडळाची बैठक सुरु, गेले 17 दिवस आंदोलनात दखल न घेतल्याने मराठा समाज व संघटना आक्रमक पवित्र्यात, कार्यकर्ते यांची जोरदार घोषणाबाजी, बैठकीत न बोलविल्यास आत घुसणार असल्याचा इशारा, सारथी संस्था व्यवस्थित चालविणार नसाल तर बंद करुन टाका अशी मागणी, सारथी आंदोलनामध्ये शासन दखल घेत नसल्यामुळे काही चुकीचे घडल्या प्रशासन जबाबदार, आजपासून महाराष्ट्रभर आंदोलन पेटणार असा इशारा
-
राज्यमंत्री बच्चू कडू अखेर चार तासानंतर नागपूरहून मुंबईकडे रवाना
राज्यमंत्री बच्चू कडू अखेर चार तासानंतर मुंबईकडे रवाना, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे रवाना, नागपूर पोलिसांनी त्यांना चार तास रोखलं होतं, चोख पोलीस बंदोबस्तात बच्चू कडू रवाना, प्रशासनाचा गैरसमज झाल्यामुळे मला रोखलं होतं, वरीष्ठांशी बोलल्यानंतर पोलीस जाऊ देत असल्याचं बच्चू कडू ने सांगितलं
-
22 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कुठलंही विमान युकेला जाणार नाही : एअर इंडिया
22 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत कुठलीही फ्लाईट युकेसाठी उड्डाण घेणार नाही, एअर इंडियाचा ट्वीट करत माहिती, लंडनहून आलेले पाच जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आले, त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा निर्णय
#FlyAI: In view of the @MoCA_GoI directive of suspension of all flights to/from UK from 2359 hrs of 22nd December to 2359 hrs of 31st December, 2020, no Air India flight will operate to the UK during this period.
Please stay tuned for further updates.
— Air India (@airindiain) December 21, 2020
-
भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार : सूत्र
कोरोना व्हायरसची दुसरी लाट पाहता भारतात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना व्हायरस वरील लसीकरण ला सुरुवात करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी कोरोना लसीकरण करण्यासाठी सर्व तयारी केली असल्याची सूत्रांची माहिती. यूकेमधील कोरोनाची लाट पाहता भारत आपातकाळ कोरोना वरील लस वापर करणार असल्याची सूत्रांची माहिती.
-
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, काढणीला आलेली पीकं मातीमोल
सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला, त्यामुळं शेतकऱ्यांची ऐन काढणीला आलेली खरीप आणि रब्बीची पीक मातीमोल झाली, अद्याप राज्य शासनाची पुरेशी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये, असं शेतकऱ्यांचा आरोप, त्यात आजपासून केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झालं, आज लांबोटी, कोळगाव पेनूर या ठिकाणी पाहणी करून हे पथक पुढे पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार
-
लंडनहून आलेले 5 प्रवाशी कोरोना पॉझिटीव्ह
लंडनहून आलेले 5 प्रवाशी कोरोना पॉझिटीव्ह, रात्री लंडनहून विमान दिल्लीत दाखल, 266 प्रवाशांपैकी 5 जण कोरोना पॉझिटीव्ह
Five out of 266 passengers & crew members of a flight which arrived at Delhi airport from London last night have tested positive for COVID-19. Their samples have been sent to NCDC for research & they have been sent to care centre: Nodal officer for COVID-19
— ANI (@ANI) December 22, 2020
-
थोड्या वेळात मोर्चा अंबानींच्या बीकेसी कार्यालयावर धडकणार, हजारो शेतकऱ्यांकडून निषेध
लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिनिधीतत्व करणारे प्रतिभा शिंदे आणि किशोर ढमाले आनंदनगर चेक नाका येथे पोहोचले, त्यांच्यासोबत गाड्यांच्या ताफ्यात शेतकरीदेखील पोहोचले, केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायदा रद्द करण्याची मागणी, अंबानी-अदानींना देखील इशारा, हा संघर्ष मोठ्या प्रमाणात असणार, आनंद नगर चेक नाका मुंबईच्या वेशीवर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा बाजी, थोड्या वेळात अंबानी यांच्या बीकेसी कार्यालय येथे धडकणार, हजारो शेतकरी करणार निषेध
-
आहार संस्थेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल टिरेडर्स वेलफेयर असोसिएशनचा मुंबईच्या कर्फ्युला विरोध
आहार संस्थेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल टिरेडर्स वेलफेयर असोसिएशनचा मुंबईच्या कर्फ्युला विरोध, कोरोनासोबत व्यापाऱ्यांच्या हिताचाही सरकारने विचार करावा ही मागणी, लाॅकडाऊनमध्ये हाॅटेल, बार, दुकानदारांचं कंबरडं मोडलं, त्यामुळे सरकारने पुन्हा विचार करावा, हेल्थ परवाने, दुकानाचे परवाने, प्राॅपर्टी टॅक्स, पाणी बील यात मनपानेही सूट द्यावी अशी मागणी, जर बिझनेस बॅद झाला तर टॅक्स कसा भरणार असा सवाल
-
पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन, नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन
पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन, पाषण तलावाजवळ रानगवा आढळला, नागरिकांनी हायवे आणि बावधन परिसरात गर्दी करु नये, प्रशासनाने आवाहन
-
चांदवडला रात्री मुक्काम केल्यानंतर किसान सभा मोर्चा सकाळी मालेगावकडे रवाना
मनमाड येथील चांदवडला रात्री मुक्काम केल्यानंतर किसान सभा मोर्चा सकाळी मालेगावकडे रवाना झाला
-
नाशकात बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेना आक्रमक
नाशकात बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेना आक्रमक, नाशिक, धुळे जिल्ह्यातून भाजपचे शेकडो नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकारी करणार आज शिवसेनेत प्रवेश, दुपारी तीन वाजता मुंबईच्या शिवसेना भवनमध्ये होणार प्रवेश सोहळा, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी करणार सेनेत प्रवेश, बाळासाहेब सानप यांच्या घर वापसी नंतर शिवसेना-भाजपा जुंपली
-
हिंगोलीत एकाच रात्रीत चोरट्यांनी दहा दुकाने फोडली
हिंगोलीत एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली दहा दुकाने, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील मेन बाजार पेठेतील तब्बल 10 दुकाने फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोख रक्कम पळवली, बाळापूर ठाण्याच्या वार्षिक तपासणी साठी येणाऱ्या पोलीस अधीक्षकांना चोरट्यांची सलामी, अज्ञात चोरट्या विरोधात बळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 353 नवीन रुग्ण दाखल, तर आठ जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 353 नवीन रुग्ण दाखल, तर आठ जण दगावले, नाशिक शहरातील रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन पुन्हा अलर्टवर, दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाची तयारी सुरु
-
बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज, ‘टीव्ही 9’ला सूत्रांची माहिती
नाशकात बाळासाहेब सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक नगरसेवक नाराज, टीव्ही9 ला सूत्रांची माहिती, सानप यांच्या घरवापसीने भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, पक्षातील अनेक नाराज नगरसेवक पक्षाला जयश्री राम करण्याच्या तयारीत, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपात मोठा गृहकलह होण्याची शक्यता
-
राज्यातील महिलांना बंदुक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडीची कोल्हापुरात मागणी
राज्यातील महिलांना बंदुक परवाने द्या, वंचित बहुजन आघाडी ची कोल्हापुरात मागणी, महिला अत्याचारात वाढ होत असल्याच सांगत मागितली शस्त्र बाळगण्याची परवानगी, मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे केलं सादर
-
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख व्यक्तींना केलं जाणार कोरोना लसीकरण
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात साडेनऊ लाख व्यक्तींना केलं जाणार कोरोना लसीकरण, पूर्व नोंदणी केलेल्या व्यक्तींना दिली जाणार लस, लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्हा कृती दल समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली बैठक
-
पुण्यात सायबर गुन्ह्यात मात्र दुप्पटीने वाढ, आतापर्यंत 5200 गंभीर गुन्हे दाखल
पुण्यात कोरोनामुळे एकूण गुन्ह्यात घट झालेली असताना शहरात सायबर गुन्ह्यात मात्र दुप्पटीने वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सायबर गुन्हे दुप्पट झाले आहेत, यावर्षी करोनामुळे गंभीर गुन्ह्यांत घट झाली असून आतापर्यंत 5200 गंभीर गुन्हे दाखल, तर सायबर गुन्ह्यांच्या जवळपास 14 हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत, सायबर पोलीस ठाण्याकडे गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यांचे 7795 तक्रार अर्ज आले होते, यामध्ये सोशल मीडियावरून होणारे गुन्हे, ऑनलाइन खरेदीमध्ये फसवणूक या गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
-
हातकणंगले पंचायत समिती सभापती अविश्वास ठराव दाखल
कोल्हापूर हातकणंगले पंचायत समिती सभापती अविश्वास ठराव दाखल, 22 पैकी 16 सदस्यांनी केला सभापती महेश पाटील यांच्या विरोधात ठराव, पाटील यांच्याकडून निधीचा परस्पर वापर करत असल्याची सदस्यांची तक्रार, अविश्वास ठराव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला, अविश्वास ठरावा मुळे आमदार प्रकाश आवाडे गटावर नामुष्कीची वेळ, अविश्वास ठराव मागे घेण्यासाठी आवडे गटाकडून सदस्यांची मनधरणी
-
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय, आम्हाला अपेक्षा आहे की जनता याचं पालन करेल : नवाब मलिक
लोक हितासाठी निर्णय, महाराष्ट्राची जनचा याच पालन करेन, जनता मुख्यमत्र्यांच्या या निर्णयाच पालन करेल, कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे हा निर्णय घेतला आहे, आम्हाला अपेक्षा आहे की जनता याचं पालन करेल, ममता आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाली, राज्यातील बदल्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अधिकार हा राज्याचा आहे, परंतु केंद्र सरकार यात हस्तक्षेप करत आहे, यासाठी शरद पवार ममता बँनर्जीच्या भेटीसाठी जाऊ शकतील
-
परभणीत आजही थंडीची लाट, परभणीचा पारा 5.1 सेल्सिअसवर
परभणीत आजही थंडीची लाट, परभणीचा पारा 5.1 सेल्सिअसवर, थंड वारे वाहत असून दाट धुके आसल्याने परभणीकरांची पाहट उशीराने सुरु होणार, उब मिळविण्यासाठी उबदार कपडयांचा वापर आणि शेकोट्यांचा आधार
-
निफाडचा किमान पारा घसरला, 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची यंदाच्या हंगामातील निच्चांकी नोंद
निफाडचा किमान पारा घसरला, 6.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची यंदाच्या थंडीच्या हंगामातील निच्चांकी नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद
-
बुटीबोरी MIDC इंडोरामाच्या 2500 कर्मचाऱ्यांना लॅाकडाऊमधील वेतन मिळणार, गडकरींच्या मध्यस्थीने दिलासा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मध्यस्थीने अडीच हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, बुटीबोरी MIDC तिल इंडोरामाच्या 2500 कर्मचाऱ्यांना मिळणार लॅाकडाऊमधील वेतन, कामगारांनी संपावर जाण्याचा दिला होता इशारा, भाजप नेते बबलू गौतम त्यांच्या पुढाकाराने गडकरींनी सोडवला प्रश्न, लॅाकडाऊनमधील 50 टक्के वेतन देण्यास इंडोरामा कंपनी तयार, अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा
-
तोतया पोलिसांच्या टोळीवर मकोका, सात जणांच्या टोळीवर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर तोतया पोलिसांच्या टोळीवर मकोका, सात जणांच्या टोळीवर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, तोतया पोलिसांनी राज्यभर महिला आणि वृद्धांना लुटले, तोतया पोलिसांकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, तोतया पोलिसांच्या टोळीवर राज्यभर 26 गुन्हे दाखल
-
नवीन वर्षाची नागपूरकरांना भेट, पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार
नागपूर शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ, शहरासाठी 173.5 दलघमी पाणी आरक्षित केले जाणार, पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश, नागपूरकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न लागणार मार्गी, नवीन वर्षाची नागपूरकरांना भेट
-
बँकेशी संबंधित कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या, सलग तीन दिवस बँका बंद
सलग तीन दिवस बँका बंद राहणार बँकेशी संबंधित कामे गुरुवारपर्यंतच उरकून घ्या, शुक्रवार 25 डिसेंबर बँकांना सुट्टी असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील, कारण, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते, यानंतर 27 डिसेंबर रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार, अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार
-
केंद्राच्या निमंत्रणावर शेतकरी संघटनांचा आज निर्णय
केंद्राच्या निमंत्रणावर शेतकरी संघटनांचा आज निर्णय, केंद्र सरकारने आत्तापर्यंत शेतकरी नेत्यांशी विज्ञान भवनात घेतलेल्या तीन बैठका अपयशी ठरल्यानंतर रविवारी रात्री उशिरा कृषी मंत्रालयाकडून 40 शेतकरी नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रणाचे पत्र, शेतकरी संघटनांनी बैठकीची तारीख निश्चित करावी, असेही केंद्राकडून कळवण्यात आले, पंजाबमधील शेतकरी नेते तसेच संयुक्त किसान मोर्चा व उत्तर प्रदेशमधील नेत्यांची रविवारी बैठक, आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय, त्यामुळे सोमवारी शेतकरी संघटनांनी प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला नाही
-
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद
ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 22 डिसेंबर रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत ही वाहतूक बंद राहणार, आता जे लोक भारतात येतील त्यांची विमानतळावरच RT-PCR चाचणी केली जाणार
-
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री कोणालाही रस्त्यावर सोडण्याची परवानगी नाही
अत्यावश्यक सेवा वगळता रात्री कोणालाही रस्त्यावर सोडण्याची परवानगी नाही, फ्लाइट आणि फ्लाइट स्टॉपनंतर तेथून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळात मानपा पोलिस आणि सीआयएसएफच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे, बीएसटीचे डझन लोक विमानतळावर सेटल झाले होते तेथून प्रवासी होते, थेट हॉटेलमध्ये पाठविले जात होते, जिथे त्याची आरटी पीसीआर चाचणी 5 ते 7 दिवसानंतर होईल, विमानतळावर सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
-
राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू
राज्यात आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारी पर्यंत ते लागू राहणार आहे