LIVE | कायदा-सुव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार : अनिल देशमुख
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)
महाराष्ट्रासह देशातील घडामोडींचे वेगवान अपडेटस एका क्लिकवर
LIVE NEWS & UPDATES
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, पुढील वर्ष आरोग्यदायी जाण्यासाठी स्वयंशिस्त पाळूया असं मुख्यमंत्र्यांनी आव्हान केले आहे.
-
थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांवर पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नागरिकांनी संचार बंदीचे उल्लंघन करू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी घरातच राहून नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पवार यांनी केले आहे. पोलिसांनी सहा ठिकाणी नाकाबंदी लावली असून थर्टी फर्स्टच्या दरम्यान संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी 6 पीआय, 25 एपीआय चारशे पोलीस आणि तीन राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 11 ते 6 यादरम्यान संचारबंदी असून त्यावर ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे.
-
-
इचलकरंजी शहरातील आय जीएम रुग्णालयाला आणलेल्या 18 कोटी निधीवरून खासदार व आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला
– इचलकरंजी शहरातील आय जीएम रुग्णालयाला आणलेल्या 18 कोटी निधीवरून खासदार व आमदारांमध्ये श्रेयवाद रंगला
– शहरातील आय जीएम रुग्णालये सर्वसामान्यांसाठी सध्या आधार बनत आहे जिल्ह्यातील नेत्यांनी यासाठी निधी मंजूर करण्यात सुरुवात केली आहे
– शहरातील रुग्णालय निधी कोणीही मंजूर करू दे पण पूर्ण क्षमतेने हे रुग्णालय सुरू होऊ दे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होऊ लागली आहे
– आमदार प्रकाश आवडे समर्थकांनी काल के एल मलाबादे चौकामध्ये साखर पेढे वाटून निधी आणल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला होता
– शहरातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज पत्रकार बैठक घेऊन हा निधी सर्व जिल्ह्यातील नेत्यांनी आणला आहे असा खुलासा केला आहे
-
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार – चंद्रकांतदादा पाटील
– कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक कोणीही कसेही लढले तरी भाजप पूर्ण ताकतनिशी लढणार – चंद्रकांतदादा पाटील
– मागील वर्षी आर्थिक गाडी रुळावरून घसरली ती नविन वरश्यात रुळावर येईल असे नववर्ष्याच्या शुभेच्या चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले
– चंद्रकांतदादा पाटील हे श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दिल्या प्रतिक्रिया
-
गोव्यात सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी वेळागर बीचवर पर्यटकांची गर्दी
या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यावर गर्दी. पर्यटकांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी समुद्रस्नान करून घेतला सूर्यास्ताचा आनंद. जिल्ह्यात लाखाच्या घरात पर्यटक दाखल. गोव्यात आलेले पर्यटक ही सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी वेळागर बीचवर. परदेशी पर्यटकांची मात्र पाठ.
-
-
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात कापसाच्या गोदामाला आग
औरंगाबादमध्ये कापसाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीत दीड हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला परिसरात आग लागली आहे. व्हाईट लोटस फॅक्टरीच्या गोदमाला भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
-
नंदूरबारच्या नवापूरमध्ये सहकार विभागाचे छापे, अवैध सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरी छापा
नंदुरबार: नवापूर शहरात अवैध सावकारी करणाऱ्या दोघांच्या घरावर सहकार विभागाने छापा टाकला आहे. मोठ्या प्रमाणात अवैध सावकरीची कागदपत्रं आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. सहकार विभागाकडून नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
-
न्यू ईयर सेलिब्रेशनला मुंबईकर बाहेर पडले, मुंबई पुणे एक्सप्रेसवर लांबच लांब रांगा
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी मुंबईत रात्रीची सचांरबंदी असल्याने मुंबईकर बाहेर पडले. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून बाहेर पडणा-या पर्यटकांच्या वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोलनाक्यावर मुंबईतून बाहेर पडणा-या वाहनांची दीड किमी पर्यंत रांग लागली आहे. तर, पुण्या कडून मुंबईला येणाऱ्या वाहनांचे प्रमाण कमी आहे.
-
अलविदा 2020!!! रशियात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत
रशिया आणि न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये नयनरम्य आताषबाजी करण्यात आली.
-
विरारच्या नवापूर जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी
विरार: 2020 या सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागता सर्वजण सज्ज असताना विरारच्या नवापूर गावात जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. हाणामारीचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लाकडी बांबू व लाथा बुक्याने जमिनीच्या मालकाला मारहाण करण्यात आली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनास्थळावरून 20 ते 25 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
-
गडचिरोलीत पहिल्या टप्प्यात 1653 ग्रामपंचायतीसाठी 2370 अर्ज दाखल
गडचिरोली: जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 1653 जागांसाठी सहा तालुक्यातून 2370 अर्ज आले आहेत. काल (30 डिसेंबर) रात्रीपर्यंत ही प्रकिया सुरू होती. गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा, धानोरा, कोरची या तालुक्यातील 199 ग्रामपंचायतीत पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. मतदान 15 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. तर दुसर-या टप्प्यात होत असलेल्या नामांकन स्वीकारण्याची अंतिम तारीख १ जानेवारी असून आजही काही उमेदवारांनी नामांकन दाखल केले.
पहिला टप्पा अर्ज तालुका निहाय
गडचिरोली:555
देसाईगंज:340
आरमोरी:380
कुरखेडा:572
धानोरा:378
कोरची:145
-
आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती : राजेश टोपे
पुढील काही महिन्यात साधारण आठ हजारपेक्षा जास्त जागांवर आरोग्य आणि ग्रामविकास विभागात नोकरभरती केली जाणार आहे. कोव्हिड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक पदांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुढील दोन महिन्यात नोकर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य क्षेत्राशी निगडीत पद भरली जाणार आहेत. राज्य शासनानं भरतीला मान्यता दिली असल्याचं टोपे यांनी सांगितले.
-
अंबड परिसरात टवाळखोरांवर पोलिसांचा लाठीचार्ज, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आक्रमक
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आक्रमक झाले आहेत. अंबड परिसरात टवाळखोरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. 30 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.आज देखील रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे.
-
भीम आर्मीप्रमख चंद्रशेखर आझाद दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचले
भीम आर्मीप्रमख चंद्रशेखर आझाद दादरच्या चैत्यभूमीवर पोहोचले आहेत. सध्या ते महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
-
नवीन वर्षात पोलिसांच्या घराचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावणार: अनिल देशमुख
कधी आयुष्यात पाहिले नाही असे प्रसंग कोरोना काळात पाहायला मिळाले. सर्व बंद अशी परिस्थिती होती, लॉकडाऊन झाल्यानं सर्व व्यवहार बंद झाले, ठप्प झाले होते.नाईलाजानं लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. पण, लोकांनी सहकार्य केलं, कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवता आली यासाठीलोकांचं करावं लागेल. नवीन वर्षात पोलिसांच्या घराचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पोलिसांची घरं नीट राहिली तर कार्यक्षमता त्यांची वाढू शकते. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नीट राहावी कोरोनाचं संकट पुढच्या वर्षभरात टळावं हीच अपेक्षा, आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
-
धुळ्यानंतर रायगडमध्ये शिवसेनेला यश, पनवेल तालुक्यातील खानावळे ग्रामंपचायतीवर भगवा
रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील पहिल्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. खानावळे ग्रामपंचायतीच्या 9जागांपैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पनवेल तालुक्यामध्ये 24 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
-
उल्हासनगर मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, प्लास्टिक गोडाऊनचा कोळसा
उल्हासनगर मध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग लागली असून एक प्लास्टिक साहित्य बनवणाऱ्या कारखान्यालाही आग लागली. प्लास्टिक गोडाऊनचा झाला कोळसा, तीन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पेरूमल कंपाऊंडमध्ये आग लागली आहे.
-
पनवेलमधील पहिल्या ग्रामपंचायतीवर भगवा फडकला, 9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध
रायगड जिल्ह्यातील पनवेलमधील पहिल्या ग्रामपंचायतीवर फडकला भगवा, 9 पैकी शिवसेनेचे 5 उमेदवार बिनविरोध, शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिल्या नवनिर्वाचित सदस्यांना शुभेच्छा, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पनवेल तालुक्यातून २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका, काही दिवसाआधी गिरवले गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत केला होता जाहीर प्रवेश
-
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे फरार, खंडणी, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा
सोलापूर: खंडणी व शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी वेगवेगळया ठिकाणी पथके रवाना झाली आहेत. सदर बझार पोलीस स्टेशनला राजेश काळेंवर गुन्हा दाखल झाला आहे.
-
नव्या वर्षात सर्व राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेची नांदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय
नव्या वर्षात सर्व राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेची नांदी, दोन जानेवारीपासून सर्व राज्यात ड्राय रनला परवानगी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय
-
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापुरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सध्या तळकोकणात पर्यटक दाखल, मुंबई, पुणे, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात, गेल्यावर्षीच्या तूलनेत यावर्षी पर्यटकाची संख्या कमी, मात्र नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांमध्ये उत्साह, येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांची तपासणी करुन कोरोनाचे सर्व नियम पाळून स्वतःची काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात येत आहे
-
विरारमध्ये बुलेटचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जण जखमी
मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत बुलेटचा भीषण अपघात, विरार हद्दीत खाणीवडे ब्रिजवर भरागाव वेगात जाणारी बुलेट चालकाचे नियंत्रण सुटल्याने बुलेट स्लीप होऊन माहामार्गावर अपघात, एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी, आज सकाळी 11 वाजताची घटना
-
वसईच्या तुंगारेश्वर मंदिरातून 11 पंचधातूंच्या मुर्ती लंपास
वसईच्या तुंगारेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या अमृत धाम जैन मंदिरात मध्यरात्री 3 च्या सुमारास चोरट्याने 11 पंचधातूंच्या मुर्ती लंपास केल्या, या मुर्तींची किंमत लाखोंच्या घरात, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन संपूर्ण घटनेचा पंचनामा केला, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, वसईमध्ये नववर्षाच्या आदल्या दिवशी अशी चोरी झाल्याने जैन बांधवांमध्ये भीतीचे वातावरण
-
नागपुरातील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर, कोबिंग ॲापरेशन सुरु
नागपूर शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर, काल रात्रीपासून पोलिसांचं कोबिंग ॲापरेशन सुरु, रात्रभरात 400 ते 500 रेकॅार्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती, रेकॅार्डवरच्या गुन्हेगारांची पोलिसांकडून शोध मोहीम, नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोबिंग ॲापरेशन, आज दिवसभर आणि रात्रीही राबवलं जाणार कोबिंग ॲापरेशन, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागपूर पोलीस सज्ज
-
ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांच्या रिपोर्टची आद्यपही प्रतिक्षाच, रिपोर्ट येण्यास 15 दिवस लागणार
ब्रिटनहून परतलेल्या प्रवाशांच्या रिपोर्टची आद्यपही प्रतिक्षाच, नव्या विषाणू संदर्भातील रिपोर्ट येणास 15 दिवस लागणार आरोग्य विभागाची माहिती, नाशिकमधील 5 जणांचे रिपोर्ट पुण्यातील लॅबमध्ये पाठवण्यात आले, रुग्णांना रिपोर्टसाठी 15 दिवस प्रतिक्षा करावी लागणार असल्याने रुग्णांचा मनस्ताप
-
औरंगाबादेत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वेरुळ लेणीत पर्यटकांची गर्दी
औरंगाबादेत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर वेरुळ लेणीत पर्यटकांची गर्दी, लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, ऑनलाईन पास काढूनच मिळतोय पर्यटकांना लेणीत प्रवेश, ऑनलाईन पासमुळे अनेक पर्यटकांची होतेय निराशा, वर्षाच्या शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी अनेक पर्यटक लेणीत दाखल
-
जातपंचायतीच्या दंडासाठी उस्मानाबादमध्ये एकाचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जातपंचायतीच्या दंडासाठी उस्मानाबादमध्ये एकाचा खून, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील येरमाळा येथील घटना, 30 डिसेंबर रोजी उघडकीस आली घटना, जात पंचायतीने ठोठावलेला 2 लाखांचा दंड देत नसल्याच्या कारणावरुन दिली फाशी, मयत सुनिल काळे याचा मृतदेह येरमाळा शिवारातील एका झाडाला आढळून आला, मयताच्या आईच्या फिर्यादीवरुन तिघांविरुद्ध येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल
-
अॅमेझॉननंतर आता मनसेचा मोर्चा डॉमिनोजकडे, लवकरच मराठी भाषेचा समावेश करु, डॉमिनोजचे मनसेला पत्र
अॅमेझॉननंतर आता मनसेचा मोर्चा डॉमिनोजकडे, डॉमिनोज पिझ्झाच्या अॅपवर मराठी भाषा उपलब्ध व्हावी यासाठी मनसे आग्रही, लवकरच मराठी भाषेचा समावेश डॉमिनोज अॅपवर करणार असल्याचे डॉमिनोजचे मनसेला पत्र
-
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची लोणावळ्याकडे पाठ, लायन्स पॉईंटवर पर्यटकांची संख्या तुरळक
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची लोणावळ्याकडे पाठ, कोरोना चा प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे फिरवली पाठ, लायन्स पॉईंटवर पर्यटकांची संख्या तुरळक
-
औरंगाबादेत कारमधील सामानाची चोरी करण्यासाठी वापरला जातोय नवा फंडा
औरंगाबादेत कारमधील सामानाची चोरी करण्यासाठी वापरला जातोय नवा फंडा, औरंगाबाद पोलिसांनी जारी केलं नव्या फंड्याचं सीसीटीव्ही फुटेज, गाडी थांबवताच चोरटे उघडून ठेवतात कारचे दार, कार लॉक करुन गेल्यानंतर उघडं राहतं चोरट्यानं उघडलेलं दार, कारचालकाच्या दुर्लक्षामुळे चोरटा करु शकतो लीलया हात साफ, कार चालकांनी सावध राहण्याचं औरंगाबाद पोलिसांचं आवाहन
-
डोक्यावरुन ट्रेलर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, तळोजा भुयारी मार्गावरील घटना
डोक्यावरुन ट्रेलर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू, तळोजा भुयारी मार्गावरील घटना, तळोजा येथील भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने वारंवार घडत आहेत अपघात, स्कुटी चालक महिलेचा नवरा सुदैवाने वाचला
-
त्र्यंबकेश्वर महादेवाच्या पिंडी भोवती चांदीची पाळ अर्पण
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या पिंडी भोवती चांदीची पाळ अर्पण, औरंगाबादचे व्यावसायिक देसरडा यांनी केलं त्र्यंबकेश्वर चरणी अर्पण, 18 किलो वजनाची आणि 12 लाख किमतीची चांदीची पाळ केली अर्पण, पिंडी भोवती लावण्यात आली चांदीची पाळ
-
सोलापूर उपमहापौर राजेश काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
सोलापूर उपमहापौर राजेश काळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, पोलिसांनी नाकारली मोर्चाला परवानगी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता मोर्चा, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर आयुक्त उपायुक्त यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी झाला आहे गुन्हा दाखल
-
31 डिसेंबरला पुण्यात फुड होम डिलेव्हरीवरही निर्बंध
31 डिसेंबरला पुण्यात फुड होम डिलेव्हरीवरही निर्बंध, 31 डिसेंबर रोजी हॉटेलमधून येणारी होम डिलेव्हरीही केवळ पावणे अकरापर्यंत सुरु राहणार, पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फुड कोर्ट आणि रेस्टॉरंट तसेच बार रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत, नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले
-
औरंगाबाद शहरात एका वर्षात 22 खुनाच्या घटना
औरंगाबाद शहरात एका वर्षात 22 खुनाच्या घटना, तर 76 महिलांवर घडल्या बलात्काराच्या घटना, औरंगाबाद पोलिसांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती, 22 खुनांपैकी 21 खून उघड करण्यात पोलिसांना यश, 76 बलात्काऱ्यांपैकी 75 आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गुन्हे सिद्धदोषांचे प्रमाण 34 टक्क्यांवरून पोचले 42 टक्क्यांवर
-
नागपूर जिल्ह्यात 1198 जागांसाठी 3121 उमेदवार रिंगणात
नागपूर जिल्ह्यात 1198 जागांसाठी 3121 उमेदवार रिंगणात, जिल्ह्यात 130 ग्राम पंचायतीत निवडणुकीचा आखाडा, कशमेश्वर तालुक्यातील सोनपूर आदासा ग्रामपंचायत अविरोध, सोनपूर आदासा ग्रामपंचायतीत 9 जागांसाठी नऊ अर्ज दाखल, आज होणार उमेदवारांच्या अर्जाची छाणणी, चार जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
-
लंडनवरुन नागपुरात परतलेल्या महिलेसह सहा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण
लंडनवरुन नागपुरात परतलेल्या महिलेसह सहा वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण, नव्या कोरोनाच्या संशयितांची संख्या पोहोचली सातवर, सर्व रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले, नव्या कोरोना संशयित रुग्णांची प्रकृती स्थिर, नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 378 नवे रुग्ण, 8 मृत्यू, जिल्ह्यात 24 तासांत 366 रुग्ण झाले कोरोनामुक्त
-
नागपुरात काँग्रेसच्या गटबाजीची परंपरा कायम, महापौर निवडीचे काँग्रेसचे दोन उमेदवार
नागपुरात काँग्रेसच्या गटबाजीची परंपरा कायम, महापौर निवडीचेही काँग्रेसने दिले दोन उमेदवार, मनपातील 151 सदस्यात काँग्रेसचे अवघे 29 नगरसेवक, भाजपला स्पष्ट बहूमत असल्याने काँग्रेसचा महापौर अशक्य, तरिही काँग्रेसकडून मनोज गावंडे आणि रमेश पुणेकर यांनी महापौर पदासाठी केला अर्ज, भाजपकडून दयाशंकर तिवारी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार, भाजपकडून उपमहापौर पदासाठी मनीषा धावडेंना उमेदवारी
-
नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय, शहरातील सर्व स्मशान भूमीमध्ये विद्युतदाहिन्या लावल्या जाणार
नाशिक महापालिकेचा मोठा निर्णय, शहरातील सर्व स्मशान भूमीमध्ये लावल्या जाणार विद्युतदाहिन्या, नाशिक शहराच्या सर्व सहा विभागातील स्मशान भूमीच होणार आधुनिकीकरण, वायू प्रदूषण टाळण्यासाठी घेण्यात आला निर्णय
-
सोशल डिस्टन्सिगकडे दुर्लक्ष करत जात पडताळणीसाठी गर्दी, ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांकडून कोरोना नियमांचा भंग
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांकडून कोरोनाच्या नियमांचा सरार्स भंग, फिजीकल डिस्टनसिंगकडे दुर्लक्ष करत जात पडताळणीसाठी गर्दी, नाशिकच्या समाजकल्याण विभाग कार्यालयात कोरोनाचे नियम धाब्यावर, भावी लोकप्रतिनिधींमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य मात्र धोक्यात
-
नायलॅान मांजाने विद्यार्थ्याचा गळा चिरला, नागपुरातील मानकापूर परिसरातील घटना
नायलॅान मांजाने विद्यार्थ्याचा गळा चिरला, नागपुरातील मानकापूर परिसरातील घटना, जखमी आदित्य संतोष भारद्वाज या विद्यार्थ्यावर उपचार सुरु, बंदी असतानाही नागपुरात सर्रास नायलॅान मांजाची विक्री
-
नवीन वर्षात नाशिक शहरातील 260 शाळा पुन्हा सुरु होणार, तयारी पूर्ण
नवीन वर्षात नाशिक शहरातील 260 शाळा पुन्हा सुरु होणार, नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याची तयारी पूर्ण, सोशल डिस्टन्सिग आणि इतर काळजी घेऊन होणार शाळा सुरु, मात्र शाळा प्रवेश असणार ऐच्छिक, महापालिका आयुक्त अकॅशन मोडमध्ये
-
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर नाशिक पोलिसांची करडी नजर, 3000 पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर नाशिक पोलिसांची करडी नजर, 3000 पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर, शहरातील 30 महत्वाच्या पॉईंट्सवर नाकाबंदी, 11 नंतर हॉटेल बाहेर पडणाऱ्या ग्राहकांवर देखील कारवाई, ड्रन्क अँड ड्राईव्ह केसमध्ये थेट पोलीस कोठडीत होणार रवानगी, नवीन वर्षाचं स्वागत घरातच करण्याचं पोलिसांचं नाशिककरांना आवाहन
-
रत्नागिरीतील कशेडी घाटात 50 फुट दरीत बस कोसळली, सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू
रत्नागिरीतील कशेडी घाटात 50 फुट दरीत बस कोसळली, सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, मुंबई-सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाट येथील दरीमध्ये कोसळली, बसमध्ये 27 प्रवासी होते, मदत कार्य सुरु, बहुतेक प्रवासी संगमेश्वर येथील, तर एक वृद्ध अजून गाडीत अडकून, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची मोफत रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या 108 रुग्णवाहिका घटनास्थळी कार्यरत, जखमी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल
-
मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणूक, 1155 जणांचा निवडणुकीसाठी अर्ज, आज उमेदवारी अर्ज छाननी
मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणूक, निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 51, एकूण प्रभाग 165, एकूण सदस्य संख्या 453, एकुण प्राप्त फॉर्म 1155, ऑफलाइन 168 फॉर्म, 31 डिसेंबरला उमेदवारी अर्ज छाननी
-
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना भाजप शहराध्यक्षांची नोटीस
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना भाजप शहराध्यक्षांची नोटीस, शिस्तभंगाच्या कारवाई संदर्भात नोटीस, 24 तासाच्या आत खुलासा करण्याची मागणी, कॅबिनेट पद भूषवित असताना पदाला साजेसे वर्तन नसल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचा नोटीसमध्ये उल्लेख, बेशिस्त वर्तनाबाबत नगरसेवकांच्या सुद्धा अनेक तक्रारी
-
उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतीत निवडणूक, 9,925 उमेदवारी अर्ज दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यात 428 ग्रामपंचायतीत निवडणूक, 1 हजार 377 प्रभागातून 3 हजार 652 सदस्य निवडले जाणार, 9 हजार 925 उमेदवारी अर्ज दाखल, उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांची माहिती
-
खासदार नवनीत राणा 3 महिन्यांचा पगार शहीद जवान आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देणार
खासदार नवनीत रवी राणा यांचा 3 महिन्याचा खासदारकीचा पगार चायना सीमेवर शहीद झालेले जवान कैलाश दहिकर यांच्या कुटुंबियांना आणि आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता अमरावती शासकीय विश्रामगृह येथे समर्पित करणार
Published On - Jan 01,2021 6:35 AM