LIVE | मानखुर्दमध्ये केमिकल गोदामाला आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड झाली आहे. नाना पटोलेंनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंच्या रुपानं महाराष्ट्र काँग्रेसला आक्रमक चेहरा मिळाला आहे. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
मानखुर्दमधील केमिकल गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी
मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील केमिकलच्या एका गोदामाला भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या गोदामातील आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेजारच्या स्क्रॅप गोदामालाही आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 15 ते 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे, परंतु ही आग आटोक्यात आलेली नाही.
-
मानखुर्दमध्ये केमिकल गोदामाला आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
-
-
Nana Patole Maharashtra Congress : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंची निवड
Nana Patole Maharashtra Congress महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाना पटोलेंची निवड झाली आहे. नाना पटोलेंनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोलेंच्या रुपानं महाराष्ट्र काँग्रेसला आक्रमक चेहरा मिळाला आहे. यापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद होते.
Nana Patole has been appointed as the President of Maharashtra Pradesh Congress Committee. (File photo) pic.twitter.com/YdbnalZ5hU
— ANI (@ANI) February 5, 2021
-
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी
मराठा आरक्षणासंदर्भात 8 ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. 8, 9 आणि 10 मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. 12,15 आणि 16 मार्च सह 17 मार्चला या प्रकरणातील इतर बाजू ऐकून घेतल्या जातील. त्यानंतर महाधिवक्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान मराठा आरक्षणावर सुनावणी होईल.
-
संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर
बीड: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गहिनीनाथ गडावर, संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंडे गडावर, धनंजय मुंडेंनी केली महापूजा, थोड्याच वेळात भाजप नेत्या पंकजा मुंडे पोहचणार गडावर, मुंडे बहीण- भाऊ येणार एकाच व्यासपीठावर
-
-
शेतकऱ्यांचे आंदोलन आमची ताकद – संजय राऊत
गेल्या 3 महिन्यांपासून आंदोलन चालू आहे, हे तीन राज्यांच आंदोलन नाही, ते आंदोलन करतात ते कलिस्तानी झाले, हे आंदोलन आमची ताकद – संजय राऊत
-
अर्णब गोस्वामी, कंगना रनौत देशप्रेमी आहेत, संजय राऊतांचं टीकास्त्र
अर्णब गोस्वामी देशप्रेमी आहेत, ज्यांच्यामुळे एका निरपराध व्यक्तीने महाराष्ट्रात आत्महत्या केली, कंगना रनौत ही देशप्रेमी आहे
-
शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत राज्यसभेत आक्रमक
शेतकरी आंदोलनावरुन संजय राऊत राज्यसभेत आक्रमक, शेतकऱ्यांवर आयपीसीचे कलम हटवून देशद्रोहाचे गुन्हे, शेतकऱ्यांना बदनाम केलं जातं, बहुमत हे अहंकाराने चालत नाही, संजय राऊतांनी सरकारला खडसावलं
-
कोराडीच्या वीज कंपनीत चंद्रशोखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन
वीज कनेक्शन तोडीविरोधात भाजपचं आंदोलन, नागपुरात सहा ठिकाणी भाजपचं आंदोलन, कोराडीच्या वीज कंपनीसमोर चंद्रशोखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन
-
बीडमध्ये वाढीव वीजबीलाबाबत भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयाला घातले कुलूप
बीड: वाढीव वीजबीलाबाबत भाजप आक्रमक, महावितरणच्या कार्यालयाला घातले कुलूप, कार्यालयासमोरच भाजपचे ठिय्या आंदोलन, महाविकास आघाडी सरकारच्या नावाने मारल्या बोंबा
-
नागपूर शहरात आणखी 80 आपली बसच्या फेऱ्या वाढल्या
नागपूर शहरात आणखी वाढल्या 80 आपली बस च्या फेऱ्या, कोरोना काळात ठप्प झालेली शहर बस सेवा येत आहे पूर्व पदावर, आता जवळपास पूर्ण क्षमतेने सुरू झाली बस सेवा, बस सेवेचे प्रवाशी वाढल्याने दोन दिवसात 80 बस नागरिकांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या, 72 मार्गावर आता 250 बस धावू लागल्या, 64 हजार च्या वर प्रवाशी घेत आहे बस सेवेचा लाभ, यामुळे महसुलात सुद्धा वाढ झाली
-
नाशिक शहरातील 80 महाविद्यालय होणार 15 तारखेपासून सुरु
नाशिक – शहरातील 80 महाविद्यालय होणार 15 तारखेपासून सुरु, 50 टक्के उपस्थितीत देखील कॉलेज सुरू करण्याचा कॉलेज प्रशासनाचा निर्णय, नियमांचं पालन करून करणार कॉलेज सुरु, रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्याना बोलावले जाणार, विद्यार्थ्याना कॉलेज मध्ये येण्याची सक्ती करणार नसल्याची कॉलेज प्रशासनाची भूमिका
-
सचिन तेंडुलकरचा भारतरत्न काढून घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे : सचिन तेंडुलकरचा भारतरत्न काढून घ्या, संभाजी ब्रिगेडने केली मागणी, सचिन तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत असल्याचा संभाजी बिग्रेडचा आरोप
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर, दुपारी 12 वाजल्यापासून होणार दौऱ्याला सुरुवात, जिला क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर पाणीपुरवठा जलकुंभाच्या कामाचीही करणार पाहणी, तर विभागीय आढावा बैठकीलाही मुख्यमंत्री रहाणार उपस्थित, औरंगाबाद शहरासाठी मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडेही लक्ष
-
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड, औरंगाबाद पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते ताब्यात
औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांची धरपकड, औरंगाबाद पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते ताब्यात, औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याचा पार्श्वभूमीवर मनसेचे कार्यकर्ते ताब्यात, तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते ताब्यात, औरंगाबाद शहर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात, मुख्यमंत्रांचा दौरा संपेपर्यंत कार्यकर्त्यांना ठेवणार ताब्यात
-
नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 145 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 145 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तर 143 रुग्णांनी कोरोनावर केली मात, सुदैवाने गेल्या 24 तासात एक ही रुग्णाचा मृत्यू नाही, जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा झाला आहे 2054
-
पिंपरी-चिंचवड शहरातील 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु, पहिल्यादिवशी 21 टक्के विद्यार्थी उपस्थित
पिंपरी-चिंचवड शहरातील 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु, पहिल्यादिवशी खासगी, महापालिका अशा 1 लाख 19 हजार 200 विद्यार्थ्यांपैकी अवघे 25 हजार 745 म्हणजे 21 टक्के विद्यार्थी उपस्थित, पहिल्यादिवशी अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आला
-
वीज बिलाबाबत भाजपचं आंदोलन
वीज बिलाबाबत भाजपनं आंदोलन पुकारलं आहे, त्यासाठी भाजपचे नेते वेगवेगळ्या शहरांमध्ये ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत.
-
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभर आंदोलन
पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभर आंदोलन करणार आहे, त्यासाठी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना केंद्र सरकारविरोधात आंदोलन करणार आहे
Published On - Feb 05,2021 4:06 PM