LIVE | ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
ऊर्जा विभागातील भरतीचा मार्ग मोकळा, SEBC संवर्गातील उमेदवारांना आता EWS मधून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार, ऊर्जा विभागाने काढले परिपत्रक
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
Devendra Fadnavis Press conference : देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
केंद्राच्या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया आल्या. अर्थसंकल्प न वाचता महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, निवडणुकीच्या राज्यांचा अर्थसंकल्प अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या. म्हणून मी स्वत: अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन, त्यातून महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्रावर अन्याय झालाय का, याची माहिती मी घेतली. ती माहिती मी आपल्यासमोर मांडणार आहोत.
३ लाख ५ हजार ६११ कोटी रूपये महाराष्ट्राच्या वाट्याला
राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळालं आहे.
१० हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील
मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं या प्रोजेक्टसाठी ३ हजार कोटी रूपये
घरोघरी पाणी मिळाव यासाठी १ हजार कोटी रूपये
शेतकरी सन्मान निधी अंतर्गत ६ हजार ८२३ कोटी
यातला जो प्रोजेक्ट सुरू होईल त्यांची संपूर्ण तरतूद
मुंबई मेट्रो तीन म्हणजे आरे कारशेडवाली यालाही १८३२ कोटी रूपये
रेल्वे प्रकल्पांसाठी ८६६९६ कोटींची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी ७ हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत
पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला वर्षाला मिळाले. हा मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे
बीड परळी रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत
लातूर तुळजापूर सोलापूर या मार्गालाही पैसे मिळाले
मुंबईच्या लाईफलाईन लोकलसाठी साडे ६ कोटी रूपये दिले
हे शरजीलचं सरकार आहे, त्याला संरक्षण देणारं हे सरकार आहे, असं आम्ही म्हणत असेल तर चूक काय?
सरकार कुणाला वाचवू पाहतंय?
अमित शाहांनी युतीबाबत स्पष्ट केलंय, कोणताही शब्द शिवसेनेला दिला नव्हता
मुंबईतील खड्डे, तुंबणारे पाणी, मुंबई महापालिकेतील बजेटचे आकडे आणि भ्रष्टाचाराचे आकडे याचा मेळच बसत नाही. त्यामुळे जनतेला त्याचा काही फायदा होईल असं वाटत नाही
तीरा कामत हा श्रेयाचा मुद्दा नाही, मी पत्र लिहिलं, त्यानंतर पीएमओशी संपर्क साधून कागदपत्रांची जुळवाजुळव केली. पाच दिवसात निर्णय झाला, मोदींचे धन्यवाद, केंद्रातील सरकार संवेदनशील आहे
राहुल गांधींनी बजेटमधील पाच आकडे सांगावे, राहुल गांधींना कोणीतरी लिहून देतं, त्यावर ते प्रतिक्रिया देतात, त्यामुले त्यावर काय बोलायचं?
शिवसेनेला शब्द दिला नव्हता हे अमित भाईंनी यापूर्वी दोनदा मुलाखतींमध्ये स्पष्ट केलंय
सर्जीलला अटक केली जात नाहीये पण त्यासाठी आंदोलन करणा-यांना डिटेन केलं जातंय
ट्विटची चौकशी करणार म्हणणा-यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे
विधानसभा अध्यक्ष साधारणपणे एकमताने आम्ही निवडतो, पण सरकार विरोधकांशी कसं वागतंय, यावर आम्ही आमचे मित्र पक्ष एकत्र बसू आणि ठरवू
भंडारा – सरकार कोणाला वाचवू पाहतंय हे पाहिलं पाहिजे
सरकार या प्रकरणी असंवेदनशील आहे
सरकार कोणत्या तरी कारणांमुळे घाबरतंय, लवकर एफआयआर दाखल केले पाहिजे
मुंबई मनपानं खड्डे, साचणारं पाणी याकडे लक्ष दिलं पाहिजे
बजेट आणि भ्रष्टाचाराचे आकडे याचा मेळ बसत नाहीये
तीरा कामत – हा श्रेयाचा विषय नाहीये पण कराचा विषय आल्यावर तीराच्या वडीलांचं पत्र घेऊन ते पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवलं आणि त्यांनी पाच तासात कारवाई केली. कागदपत्रं घेऊन पाच दिवसात हा प्रश्नी मार्गी लागला, कोणी काय केलं यावर काही बोलायचं नाहीये
राहुल गांधी – पहिले त्यांनी क्रोनीचा अर्थ समज़ुन सांगावा
ट्विट्सची चौकशी होऊ शकत नाहीये, ही त्यांची मानसिकता दिसते
जलेबी फाफडा कार्यक्रमाचं काय झाले ? यांच्या या गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही
अर्बन नक्षल प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रिलिफ दिलेला नाहीये
१२ आमदारांचा मुद्दा – कायदेशीर निर्णय राज्यपाल घेतील, तो योग्य नाही वाटला तर सरकार काय तो निर्णय घेतील
मंत्र्यांची भाषा राज्यपालांबद्दल कोणत्या संविधानात बसते ?
लोकल – सरकारी कार्यालयात कोणतीही शिस्त दिसत नाहीये, ५० टक्केच उपस्थिती
नाना पटोले हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाबद्दल काहीही बोलू शकतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये
नगरसेवक येणं जाणं फार मोठी गोष्ट नाहीये
नगरपालिकेत सगळेच जण भाजपचे
आरक्षणामुळे लढू शकत नाही म्हणून प्रवेश
-
कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी प्रदूषणच्या विळख्यात, शिरोळ बंधाऱ्यात पडला मृत माशांचा खच
कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी प्रदूषणच्या विळख्यात, शिरोळ बंधाऱ्यात पडला मृत माशांचा खच, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पसरली दुर्गंधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले अनोखे आंदोलन, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ बंधाऱ्यात उतरून शासनाचा केला निषेध, पंचगंगा नदी प्रदूषण प्रकरणी प्रांताधिकारी यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयात बोलवली बैठक
-
-
कळमनुरी नगर परिषद गार्डनमधील साहित्याला आग, लाखोंच साहित्य जळून खाक
हिंगोली-कळमनुरी नगर परिषद गार्डनमधील साहित्याला आग, गार्डन मधील लाखोंच साहित्य जळून खाक,कोट्यवधी रुपये खर्च करून उभारले गार्डन उद्घाटना पूर्वीच लागली आग, कार्डन सुरू करण्यासाठी काही दिवसा पूर्वीच केले होते मनसे ने आंदोलन -
कोरोनाच्या उपायोजनेकरीता नाशिक जिल्ह्याला 70 कोटी : अजित पवार
कोरोनावर उपायोजना करण्याकरीत नाशिक जिल्ह्याला 70 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यावेळेस आर्थिक ओढाताण असली तरी कोणतीही वार्षिक योजनेला थांबवलेली नाही, असेही अजित पवार म्हणाले.
-
सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न
जिल्हा कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तीन वर्षांपासून आत मध्ये असल्यामुळे जामीन मिळत नसल्याने केले कृत्य, व्यंकटेश शंकर कोंबेकर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कैद्याचे नाव, कोंबेकर पत्नीच्या खुनानंतर 2018 पासून कारागृहात, जामीन मिळत नसल्याने निराश होऊन केला आत्महत्येचा प्रयत्न, कारागृहातील फरशी पडून करून घेतले गळ्यावर वार, जेल पोलिसांना लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी केले दाखल, जेलरोड पोलिसात गुन्हा दाखल
-
-
सोलापुरात पाच दिवसानंतरही अल्पवयीन मुलीच्या मृत्युच्या उलगडा होईना
सोलापूर – पाच दिवसानंतरही अल्पवयीन मुलीच्या मृत्युच्या उलगडा होईना, अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथे नऊ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला होता मृतदेह, गावाजवळील विहिरीतच आढळला होता स्नेहा अरविंद दीक्षित या मुलीचा मृतदेह, मृतदेह आढळून आल्याच्या पाच दिवसानंतरही मृत्यू मागच्या कारणांचा उलगडा अद्याप झाला नाही, चौथीमध्ये शिकणारी स्नेहा अरविंद दीक्षित 5 फेब्रुवारी रोजी दुपारी झाली होती अचानक गायब
-
कोरोनाकाळात पुणे शहरात आतापर्यंत दोन हजार 649 टन जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती
पुणे – कोरोनाकाळात पुणे शहरात आतापर्यंत दोन हजार 649 टन जैव वैद्यकीय कचऱ्याची निर्मिती, त्यापैकी एक हजार 75 टन कचरा हा केवळ कोरोनामुळे निर्माण झाला, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नुकतीच मार्च 2020 ते जानेवारी 2021 पर्यंतची आकडेवारी जाहीर, यानुसार शहरात सर्वाधिक जास्त ‘कोविड-19’ जैव वैद्यकीय कचरा हा जुलै 2020, 198 टन, तर पिंपरी चिंचवड येथे सप्टेंबर 2020, 55 टन इतका निर्माण झाला, पिंपरी चिंचवडच्या तुलनेत पुणे शहरात जैव वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यातून स्पष्ट
-
यंदाच्या शिवजयंतीला हिरवी मशाल गडावर नेण्याचं सिनेअभिनेते सयाजी शिंदेचं आवाहन
पुणे – यंदाच्या शिवजयंतीला हिरवी मशाल गडावर नेण्याचं सिनेअभिनेते सयाजी शिंदेचं आवाहन, यंदाच्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर लावणार 400 झाडे, सह्याद्री बोडका झालाय, आता झाडांची गरज आहे, झाडे लावूया असा व्हीडीओ केला शेअर, सह्याद्रीच्या गडांवर वनराई फुलवण्याच केलं आवाहन,
-
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणारी महाविद्यालय पंधरा फेब्रुवारी पासून सुरु होणार
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणारी महाविद्यालय पंधरा फेब्रुवारी पासून सुरु होणार, महाविद्यालये सुरू करायला विद्या परिषदेची मान्यता, यावर्षी सर्वच अधिविभागांचा 20 टक्के अभ्यासक्रम कमी होणार, विद्यापरिषद सभेत निर्णय
-
कोल्हापूर जिल्हा परिषदेची 22 फेब्रुवारीला विशेष सभा घ्या, सर्वपक्षीय सदस्यांची अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्याकडे मागणी
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेची 22 फेब्रुवारीला विशेष सभा घ्या, सर्वपक्षीय सदस्यांची अध्यक्ष बाजीराव पाटील यांच्याकडे मागणी, विरोधी पक्ष नेते विजय भोजे यांच्या वरील विनयभंगाच्या गुन्ह्या नंतरचे आक्रमक पडसाद, विशेष सभेत शिक्षण विभागातील घोटाळा, शिक्षक बदली, शिक्षकांची वादग्रस्त वेतनवाढ यावर होणार चर्चा
-
अडीच वर्षात पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांनावर केलेला साडे 18 कोटींचा दंड थकीत
पिंपरी चिंचवड : बेशिस्त वाहनचालकांना मशिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने दंड आकाराला जातो, मात्र हा दंड जमा करण्याचे प्रमाण अत्यल्प, मागील अडीच वर्षात पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांनावर केलेला साडे 18 कोटींचा दंड थकीत, आधी हे दंड फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जात होते आता मात्र हे रोख स्वरूपात देखील स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे मात्र वाहनचालक हा दंड भरण्यास करतात टाळाटाळ
-
मराठी पाट्या न लावणाऱ्या 53 हजार दुकानांना महापालिका बजावणार नोटीस
नाशिक – मराठी पाट्या न लावणाऱ्या 53 हजार दुकानांना महापालिका बजावणार नोटीस, महापालिका आयुक्तांच्या निर्णयाचं सर्वपक्षीयांकडून स्वागत, दुकानांना अन्य भाषेतील फलक दिसल्यास थेट कारवाईचे प्रशासनाला आदेश, उर्दू , इंग्रजी अथवा अन्य भाषेतील फलक लावल्यास शासन नियमानुसार थेट कारवाई, आयुक्तांच्या भूमिकेचं मनसे , सेनेकडून स्वागत
-
नागपुरातील स्कूल ऑफ स्कॉलर शाळेला शिक्षण विभागाचा दणका
नागपुरातील स्कूल ऑफ स्कॉलर शाळेला शिक्षण विभागाचा दणका, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वसूल केलेली 1 कोटी 44 लाख 93 हजार रुपये परत करण्याचे आदेश, 2017-18 आणि 2019-20 या वर्षात वसूल केलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे आदेश, शाळा अतिरिक्त शुल्क वसूल केल्याच्या पालकांनी केल्या होत्या तक्रारी, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते चौकशीचे आदेश, नागपुरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ, नारायणा शाळेनंतर शहरातील आणखी एका शाळेला शिक्षण विभागाचा दणका
-
नाशकात साहित्य संमेलनाला निधी देण्यावरून भुजबळ आणि महापौरांमध्ये दुमत
नाशिक – साहित्य संमेलनाला निधी देण्यावरून भुजबळ आणि महापौरांमध्ये दुमत, संमेलनाला 50 लाखांच्या निधीची पालकमंत्री भुजबळ यांनी अपेक्षा, तर कोरोना काळात तोट्यात असलेल्या महापालिकेला एवढा निधी देता येणार नसल्याचं महापौरांच मत, महापालिकेला तीन लाखांची अनुदान मर्यादा असताना 50 लाख कुठून देणार, पालकमंत्र्यांच्या मागणीमुळे महापालिकेवर दडपण, मार्च महिन्यात होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निधीचा वाद चिघळण्याची शक्यता
-
थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करण्याची महावितरणची कारवाई, नागपूर शहर विभागाअंतर्गत 200 च्या वर कनेक्शन कापले
थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करण्याची महावितरणची कारवाई, नागपूर शहर विभागाअंतर्गत 200 च्या वर कनेक्शन कापले, वीज कनेक्शन कापण्याच्या मोहीमेला होतोय विरोध, नागपुरातील गांधीनगर परिसरात लाईनमेनला मिटर रुममध्ये केलं बंद, पोलीस कारवाईच्या धमकीनंतर २० मिनीटांनी सोडले लाईनमेनला, कोरोनामुळे अनेक थकबाकीदार मोठ्या आर्थिक संकटात असल्याने होते विरोध
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा 15 मार्चपासून ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय, विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय, ही परीक्षा ऑनलाइन होणार असली तरी ती विद्यार्थ्यांच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर होणार की महाविद्यालय स्तरावर याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसात समजणार, गुणवत्ता, गैरप्रकारांना रोखणे, विद्यार्थ्यांची सोय यावर चर्चा करुन परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे, द्वितीय वर्ष ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होतील.
-
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा भागात अवैध गौण खनिज उत्खनन, 35 कोटींच्या दंडाची नोटीस
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा भागात अवैध गौण खनिज उत्खनन, खळतकर कन्स्ट्रक्शन कंपनीला ३५ कोटींच्या दंडाची नोटीस, हिंगणा तहसीलदार संतोष खांडरे यांनी बजावली नोटीस, कंपनीच्या मालकांना हाजीर राहण्याचे आदेश, कडवस आणि पेंढरी भागातील गौणखनीज उत्खननाबाबत होत्या तक्रारी
-
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नागपुरात
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज नागपुरात, सकाळी 11 वाजता नागपूर विमानतळावर आगमन, प्रदेशाध्यक्ष झाल्यावर प्रथमच नागपूरात आगमन, काँग्रेस कडून नाना पटोले यांचं होणार जंगी स्वागत, विमानतळावरून दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंदिर आणि ताजबाग ला दर्शन, सायंकाळी 5 वाजता मिट द प्रेस
-
देवभूमीतील हाहाकार प्रकल्पांचे प्रहार थांबवा, उत्तराखंडबाबत सामनात अग्रलेख
एकीकडे हिमालयाला देशाचे कपाळ म्हणायचे, उत्तराखंडला देवभूमी म्हणून संबोधायचे आणि दुसरीकडे दानव बनून त्याच देवभूमीच्या कपाळावर अहोरात्र खोदकाम करून जीवघेणे प्रकल्प उभे करायचे याला काय म्हणावे ? देवभूमीत जो हाहाकार झाला ती नैसर्गिक आप्पती नव्हतीच. आपणच आपल्या हाताने पायावर मारलेली ती कुऱ्हाड आहे. केवळ हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करून देवभूमीचे रक्षण होणार नाही. त्यासाठी देवभूमीवरील प्रकल्पांचे प्रहार थांबवावे लागतील, अन्यथा भविष्यातील पिढयांना यापेक्षाही मोठे हाहाकार बघावे लागतील!
-
औरंगाबादेत भाजी मंडई हटवण्यावरून भाजप कार्यकर्त्यांचा गदारोळ
भाजी मंडई हटवण्यावरून औरंगाबादेत हाय होलटेज ड्रामा, मध्यरात्रीच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांकडून गदारोळ, रात्रीच्या सुमारास रस्त्यावर पेटवले टायर, पोलिसांनी लावलेल्या बॅरिगेटची केली तोडफोड, परिसरात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, भाजप कार्यकर्त्यांचा वाळूज परिसरात जमला मोठा जमाव, जमावाकडून मोहटादेवी परिसरात तोडफोड आणि जाळपोळ, 25 वर्षांपूर्वीची भाजी मंडई हटवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न, भाजीमंडई हटवण्याला भाजप आणि नागरिकांचा तीव्र विरोध तीव्र विरोध
Published On - Feb 10,2021 3:39 PM