LIVE | पुजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
पुजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका : देवेंद्र फडणवीस
पुजा चव्हाण आत्महत्येची चौकशी करा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करु नका. व्हायरल ऑडिओ क्लिपचा तपास व्हावा : देवेंद्र फडणवीस
-
बर्ड फ्ल्यूची अफवा रोखण्यासाठी “चिकन फेस्टीवलचे आयोजन
-बीडमध्ये युवा उद्योजक संघाकडून “चिकन फेस्टिव्हल”चे आयोजन.
-बर्ड फ्ल्यूची अफवा रोखण्यासाठी “चिकन फेस्टीवलचे आयोजन.
-फेस्टिव्हलमध्ये जिल्ह्यातील अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी सहभाग
-
-
शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याच्या निर्णयाविरोधात क्रांती मोर्चा आक्रमक
औरंगाबादच्या क्रांती चौकात शिवजयंतीच्या निर्णयाची करणार होळी.
मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते चौकात दाखल.
शिवजयंती दणक्यात साजरी करण्यावर क्रांती मोर्चा ठाम.
सरकारी निर्णयाविरोधात क्रांती मोर्चाचे जोरदार आंदोलन.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघरहून निघाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पालघर दौरा संपला, मुख्यमंत्री पालघरहून निघाले
-
राज्यपालांचा अवमान करण्याचा विचार महाविकास आघाडी कधीच करणार नाही – उपमुख्यमंत्री
राज्यपालांच्या मुद्याबाबत मी काय बोलायचं आहे, त्यावर काल मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेस नोट आली आहे, त्यात सर्व स्पष्ट करण्यात आलं आहे, राज्यपालांचा अवमान करण्याचा विचार महाविकास आघाडी कधीच करणार नाही,
-
-
पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले….
पूजा चव्हाणच्या आत्महत्येबाबत उपमुख्यमंत्री म्हणाले, चौकशी पोलीस करतच असतात, आत्महत्या का केली याची चौकशी केली जाईल, त्यामध्ये सत्य पुढे येईल, आता काही पक्षांना काहीही काम नसल्याने ते असे आरोप करतात, आरोपात तथ्य असेल तर त्यात लक्ष घातलं पाहिजे, पण, चौकशी होत असताना, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी हे सर्व करतात, चौकशी झाल्यावर अहवालाची कॉपी तुम्हाला देईन,
-
मला विश्वास आहे की तरुण शिव जयंतीचे सर्व नियम पाळतील – उपमुख्यमंत्री
कोरोनाचं संकट वाढता कामा नये, सरकार म्हणून त्याचाही विचार करावा लागतो, गेलं वर्षभर किती सण किती महत्त्वाच्या जयंत्या, हे सर्व आपण सरकारने ठरवलेल्या नियमांनुसार साजरं केलं, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची दिंडी किती मोठी असते ते देखील आपण साधेपणाने साजरं केलं, मला विश्वास आहे की तरुण शिव जयंतीचे सर्व नियम पाळतील
-
पूर्वीच्या तुलनेत जिल्हा नियोजन समितीला, जिल्हा वार्षिक योजनेला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न
अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं, आम्ही पूर्वीच्या तुलनेत जिल्हा नियोजन समितीला, जिल्हा वार्षिक योजनेला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न
-
8 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार – अजित पवार
8 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार, लवकरच अर्थसंकल्पाच्या कामाला लागणार, यामध्ये काही महत्वाच्या विभागांना कट लावलेला नाहीये
-
कोल्हापूरसाठी 375 कोटी रुपये मंजूर
कोल्हापूरसाठी 375 कोटी रुपये सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ साठी मंजूर
सोलापूरसाठी 470 कोटी मंजूर केलेत
सांगलीसाठी 320 कोटी मंजूर केलेत
सातारासाठी 375 कोटी मंजूर केलेत
पुण्याला 680 कोटी मंजूर केलेत,
-
पालघर या जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे – मुख्यमंंत्री
मी सवंग लोकप्रियतेसाठी आलेलो नाही, मी कुठलीही घोषणा करणार नाही, आज मी हेच सांगतो की पालघर या जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे, जिथे लक्ष देण्याची गरज आहे तिथे गरज शासन पूर्ण करेल,
-
अमित शहांच्या टिकेवर बोलायला मुख्यमंत्र्यांचा नकार
अमित शहांच्या टिकेवर बोलायला मुख्यमंत्र्यांचा नकार, इथं आलोय तर इथलेच प्रश्न घेऊ
-
बंद दाराआड चर्चा केली, भाजपाला मुख्यमंत्र्यांचा टोला
बंद दाराआड चर्चा केली, भाजपाला मुख्यमंत्र्यांचा बोलता बोलता टोला, जव्हारच्या दाराआड बंदच्या चर्चेवर टोला, मी आलोय तर आजपासून पालघरच्या विकासाला सुरुवात झाली आहे, मी कॅलेंडर घेऊन तुम्हाला सांगू शकत नाही पण इमारतीचा आराखडा तयार, जिल्हा कार्यालयाची इमारत होत आली आहे
-
आदिवासींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे – मुख्यमंत्री
आदिवासींना चांगला रोजगार मिळाला पाहिजे, संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, दळण-वळण, उद्योग, पर्यटन, त्या सर्वांचा विचार झाला पाहिजे
-
पर्यटन विकास कसा करता येईल ते पहातोय – मुख्यमंत्री
पर्यटन विकास कसा करता येईल ते पहातोय, राजेंनी जमीन मेडिकलसाठी वगैरे देऊ केली आहे
-
मला पालघरचा विकास करायचा आहे – मुख्यमंत्री
पालघर हा नव्यानं जाहीर झालेला जिल्हा, काही नव्या सुविधा निर्माण करणं गरजेचं, कुपोषण पूर्णपणे थांबवायचं आहे, ह्या विभागाचा पूर्ण विकास करणं गरजेचं, ही माझी धावती भेट,जव्हारमध्ये आलोय पण विकास संपूर्ण पालघरचा करायचा आहे
-
नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
काँग्रेस नेते नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला, यावेळी बाळासाहेब थोरातांसह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित, अनेक काँग्रेस कार्यकर्तेही उपस्थित, ऑगस्ट क्रांती मैदानात सोहळा पार पडला
-
प्रताप सरनाईक यांना ईडी समन्स पाठवणार
प्रताप सरनाईक यांना ईडी पाठवणार समन्स, टॉप्स सेक्युरिटी घोटाळा प्रकरणात पाठवलं जाणार समन्स, यापूर्वी प्रताप सरनाईक यांना पाठवण्यात आलं होतं समन्स मात्र, ते आजारी असल्याने चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत, आजारी असल्याने हजर राहू शकले नाहीत, यामुळे त्यांना आता पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावलं जाणार आहे
-
इकबाल मिर्ची प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा ईडीचा समन्स
प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा ईडीचा समन्स, इकबाल मिर्ची प्रकरणात पुन्हा पाठवलं जाणार समन्स, यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांना काही वेळा समन्स पाठवण्यात आलं होतं मात्र ते आले नाहीत, यामुळे त्यांना पुन्हा समन्स पाठवलं जाणार आहे
-
उद्धव ठाकरे यांची जामसर खरवंद येथील अंगणवाडी केंद्राला भेट
पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामसर खरवंद येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली, ठाकरे यांनी अंगणवाडीत प्रवेश करत अंगणवाडीची पाहणी करत शासकीय कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली, यावेळी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र पाठक, आमदार सुनील भुसारा हे देखील उपस्थित होते
-
जेव्हा पडळकर-मिटकरी एकमेकांविरोधात ‘आरे तुरे’वर येतात
जेजुरीतल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद टोकाला, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फटाके वाजवत या पुतळ्याचं अनावरण केलं, याच पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं ठरलेलं, पण त्यापूर्वीच पडळकरांनी अनावर केल्यानं राजकीय वाद पेटला, टीव्ही 9 मराठीवर बोलताना पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातही वाद, दोन्ही आमदारांनी हमरीतुमरीवर येऊन एकमेकांना आरे तुरेची भाषा वापरली
-
गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल
जेजुरी : जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा, जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा, जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
-
पटोले स्वस्त लोकप्रियतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात : चंद्रशेखर बावनकुळे
नाना पटोले स्वस्त लोकप्रियतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात, मोदीजींबद्द बोललं तर राहूल गांधी जवळ करेल असं नाना पटोले यांना वाटतेंय, काँग्रेस राज्यात पाचव्याच नंबरवर जाईल
-
लोकांनी डिसक्नेशन करु देऊ नका संघर्ष करा – बावनकुळे
लोकांनी डिसक्नेशन करु देऊ नका संघर्ष करा, लवकरंच भाजप राज्य सरकारविरोधात मोठं आंदोलन करणार, या सरकारला राज्यातील जनता कंटाळली आहे, केंद्र सरकारचं नाव सांगून हे सरकार आपलं पाप झाकण्याचं काम करत आहेत, राज्य सरकारने लावलेला ३८ रुपये कर कमी करावा, काँग्रेसचं आंदोलन नाटक आहे
-
या सरकारने वीज बिल माफीचं आश्वासन पाळलं नाही – चंद्रशेखर बानवकुळे
या सरकारने वीज बिल माफीचं आश्वासन पाळलं नाही, सरकारने १०० युनिट माफीचं आश्वासन पाळलं नाही, बील दुरुस्तीचं आश्वासन पाळलं नाही
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघरमध्ये दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघरमध्ये दाखल झाले आहेत, या दौऱ्यात पालघर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करणार आहेत, या जिल्ह्यातील कुपोषण, पाणी, पर्यटन यावरही अधिकारी यांच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे पालघरचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली
-
औरंगाबादेतील हॉटेल व्यावसायिकांना पर्यटन मंत्रालयाचा मोठा दिलासा
औरंगाबाद : औरंगाबादेतील हॉटेल व्यावसायिकांना पर्यटन मंत्रालयाचा मोठा दिलासा, हॉटेलवरील सर्व कर औद्योगिक दराने घेण्याचा निर्णय, यापूर्वी व्यावसायिक दराने घेतले जात होते कर, हॉटेल व्यवसायाला पर्यटन मंत्रालयाकडून दिला उद्योगाचा दर्जा, उद्योगाचा दर्जा देण्यात आल्यामुळे कर प्रणालीत 40 टक्क्यांची घाट
-
रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा ऐरणीवर, 15 गावातील 29 महसुली गावांना नोटीस
रत्नागिरी – रत्नागिरी शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा ऐरणीवर, 15 गावातील 29 महसुली गावांना नोटीस, ग्रामसभेत ठराव घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाला पत्र, 31 मार्च पर्यत ग्रामसभांना बंदी असल्याने हद्दवाढीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता, ग्रामसभेत ठराव करण्याचा कालावधी निश्चित नसल्याने ग्रामपंचायतींचा गोंधळ
-
औरंगाबादेत 13 सरकारी रुग्णालयाचे ऑडिट सुरू, भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑडिटला सुरुवात
औरंगाबादेत 13 सरकारी रुग्णालयाचे ऑडिट सुरू, भंडारा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑडिटला सुरुवात, फायर, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात, ऑडिट मध्ये देण्यात आलेल्या सूचनांची तीन महिन्यांत होणार पूर्तता, जिल्हा नियोजन निधीतून दिला जाणार सुधारणांसाठी निधी
-
नागपुरात खाद्यतेलाच्या महागाईनंतर वाढली भेसळखोरी
नागपुरात खाद्यतेलाच्या महागाईनंतर वाढली भेसळखोरी, नागपुरात खाद्यतेलाची भेसळ करणाऱ्यांवर कारवाई, अन्न व औषधी विभागाने केली मोठी कारवाई, इतवारी भागातील चार कंपन्यांवर कारवाई, ब्रॅण्डेड कंपन्यांचे लेबल लावून भरले जात होते भेसळयुक्त तेल, कारवाईत पावणेचार लाखांचा माल जप्त
-
पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात
पुणे शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात, आठवडाभर 150 च्या आसपास असणाऱ्या रुग्णसंख्येनं ओलांडला 250 चा टप्पा, काल दिवसभरात झाली 256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, शहरात सध्या 1617 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या त्यापैकी 133 रुग्ण गंभीर अवस्थेत तर 234 रुग्ण अजूनही ऑक्सिजनवरती, मात्र शहरातील कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 97 टक्क्यांवर,
-
पुणे शहरातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यास महापालिका आयुक्तांची परवानगी
पुणे शहरातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरु करण्यास महापालिका आयुक्तांची परवानगी, शहरातील हॉटेल्स सुरू राहणार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, दूकानांचीही वेळ वाढवली रात्री 11वाजेपर्यंत दूकानं राहणार सुरू, तर तब्बल 9 महिन्यांनंतर शहरातील जलतरण तलाव सुरू करण्यास पालिकेची परवानगी, पालिकेनं मद्यदूकानांचीही वाढवली वेळ, न्यू नॉर्मलमध्ये पालिकेची व्यवसायांना शिथीलता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश
-
औरंगाबादेत महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी, इच्छुकांचे उमेदवारी अर्ज घ्यायला भाजपकडून सुरुवात, आतापर्यंत आले तब्बल 1200 उमेदवारी अर्ज, अजूनही अर्ज करण्याचे भाजपचे आवाहन, प्रबळ उमेदवार निवडण्यावर भाजपचा असेल जोर
-
नागपूरातील थकबाकीदारांना महावितरणचा ‘शॅाक’, नागपूरातील 1161 थकबाकीदारांची वीज खंडीत
नागपूरातील थकबाकीदारांना महावितरणचा ‘शॅाक’, नागपूरातील 1161 थकबाकीदारांची वीज खंडीत, वीज कनेक्शन तोडू द देण्याचा भाजपने दिला होता इशारा, देवेंद्र फडणवीसांच्या शहरातंच महावितरणंची धडक मोहिम, वीज कनेक्शन तोडण्याला भाजपचा विरोध मावळला?, थकबाकीदार ग्राहकांकडून विचारला जातोय प्रश्न
-
नाशिक महालक्ष्मी चाळ खून प्रकरण, पोलिसांनी काढली आरोपींची धिंड
नाशिक – महालक्ष्मी चाळ खून प्रकरण, पोलिसांनी काढली आरोपींची धिंड, रस्त्यातच काढायला लावल्या आरोपींना उठाबशा, आरोपींना बघताच परिसरात गर्दी झाल्याने काही काळ तणाव, पोलिसांनी आठही संशयितांची काढली धिंड, प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरार
-
वडमुखवाडी परिसरातील रेड झोनमधील सलग दोन दिवसांच्या कारवाई मध्ये 79 अनधिकृत बांधकामे भुईसपाट
पिंपरी-चिंचवड : वडमुखवाडी परिसरातील रेड झोनमधील सलग दोन दिवसांच्या कारवाई मध्ये 79 अनधिकृत बांधकामे भुईसपाट, त्या भागात अद्याप 10 ते 15 घरे शिल्लक, आता कारवाई थांबली असली तरी भीती मात्र कायम आहे
-
शिवजयंती कार्यक्रमावरील बंदीचा निर्णय मागे घ्या, निर्णयाचा निषेध करत निर्णय मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची राज्य सरकारकडे मागणी
पुणे – शिवजयंती कार्यक्रमावरील बंदीचा निर्णय मागे घ्या, निर्णयाचा निषेध करत निर्णय मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची राज्य सरकारकडे मागणी, राज्य सरकारने कोरोनाचे कारण पुढे करीत शिवजयंती कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते महाराष्ट्रभर कार्यक्रम घेत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद दौरा चालू आहे, त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळते, मात्र शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का?, पदवीधर आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का?, संभाजी ब्रिगेडचा राज्य सरकारला सवाल
-
भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून साहित्य संमेलनास 10 लाखांचा आमदार निधी
नाशिक – भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून साहित्य संमेलनास 10 लाखांचा आमदार निधी, लोकप्रतिनिधींपैकी निधी देणाऱ्या देवयानी फरांदे पहिल्या आमदार, साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला निधी, आमदार फरांदे यांनी निधी दिला असला, तरी शहरातील अन्य लोकप्रतिनिधींकडून मात्र अद्याप निधीची प्रतीक्षा
-
शिवजयंतीला यावर्षी पन्हाळ गडावर प्रवेश नाही
कोल्हापूर – शिवजयंतीला यावर्षी पन्हाळ गडावर प्रवेश नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचा निर्णय, शिवजयंती ला शिवज्योत नेण्यासाठी राज्यासह सीमाभागातून येतात हजारो शिवभक्त, शिवभक्तांनी सहकार्य कराव नगराध्यक्षा रुपाली धडेल यांच आवाहन
-
महापालिकेतर्फे 59 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान, 6 लाख 71 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा
नाशिक – महापालिकेतर्फे 59 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान, 6 लाख 71 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणार, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती, शहरातील खेळाडूंबाबत महापालिकेच्या धोरणामुळे क्रीडाप्रेमींमध्ये समाधान
-
‘दिल्लीत नेत्यांना खुश करण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य’
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर भाजपचा हल्लाबोल, ‘दिल्लीत नेत्यांना खुश करण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य’, राज्य सरकार विरोधात नाना पटोले यांनी आंदोलन करावं, पेट्रोलवर राज्य सरकारचा ३८ रु. कर आहे, तो कमी करण्यासाठी आंदोलन करावं, महाविकास आघाडी सरकार विरोधात जनमत वाढतंय, राज्य सरकारने विदर्भ विकासाच्या अनेक योजना बंद केल्या, या विरोधात नाना पटोलेंनी करावं, भाजपचे प्रदेश सरचीटणीस चंद्रशेखर बावनकुळेंचा टीका
-
नाशकात आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याचं अमिष देत लूट
नाशिक – आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याचं अमिष दाखवून लूट, पेसाअंतर्गत सुरू असलेल्या शिक्षकांच्या विशेष भरतीत नोकरी लावून देण्याचं दिल आश्वासन, तिघा ठाकसेनाना पोलिसांनी केली अटक, अनेकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार आला समोर, गोर गरीब शिक्षकांकडून लुटले तब्बल 44 लाख रुपये, आणखी किती जणांना ता तिघांनी लुटले याचा सध्या शोध सुरू
-
नाशकात बांधकाम व्यावसायिकांसह कंत्राटदारांचा आज संप
नाशिक – बांधकाम व्यावसायिकांसह कंत्राटदारांचा आज संप, स्टील दरवाढी विरोधात बांधकाम व्यावसायिक आक्रमक, सिमेंट व स्टील मध्ये होणारी अवाजवी वाढ रोखण्याची मागणी, स्टील सिमेंटच्या दरात तीन महिन्यात 50 टक्क्याने वाढ, स्टील मधील दरवाढीमुळे बांधकाम दरात 40 टक्क्याने वाढ, संपादरम्यान नाशिक जिल्ह्यातील बांधकाम आज राहणार बंद
-
नाशकात शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिम अधिक तीव्र
नाशिक – शहरातील अनधिकृत होर्डिंगविरोधातील मोहिम अधिक तीव्र, सलग दुसऱ्या दिवशी शहरातील 21 मोठे अनधिकृत होर्डिंग हटवले, आयुक्तांच्या कारवाईने राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले, फक्त होर्डिंग हटवणार नाही, तर कारवाई देखील होणार, महापालिका आयुक्तांसोबत पोलीस प्रशासन देखील एक्शन मोड मध्ये
-
गोल्डमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणी तिघांना अटक
पुणे – गोल्डमॅन सचिन शिंदे हत्या प्रकरणी तिघांना अटक, सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना जेरबंद करण्यात लोणीकंद पोलिसांना यश, याप्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना अटक करण्यात आलीय, मंगळवारी दुपारी गोल्डमॅन सचिन शिंदेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, गुन्ह्यात वापरलेलं हत्यार आरोपींकडून जप्त करण्यात आलं, सदर गुन्हा आरोपींनी साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती समोर, अद्याप तरी या हत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही.
-
नाशिक जिल्ह्यातील अडीच लाख ग्राहकांना वीज जोडण्या तोडण्या बाबत नोटीस
नाशिक – जिल्ह्यातील अडीच लाख ग्राहकांना वीज जोडण्या तोडण्या बाबत नोटीस, थकीत बिल 15 दिवसात न भरल्यास कारवाईचा इशारा, महावितरणचा थकीत वीजबिल ग्राहकांविरोधात आक्रमक पवित्रा, कृषिधारकांकडे सर्वाधिक थकबाकी, लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव बिलांबाबत मात्र महावितरण विभागाची चुप्पी, महावितरणच्या नोटीस सत्रामूळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
-
15 फेब्रुवारी पासून महाविद्यालयं होणार सुरु, नागपूर विद्यापीठाचे नवीन दिशानिर्देश जारी
15 फेब्रुवारी पासून महाविद्यालयं होणार सुरु, नागपूर विद्यापीठाचे नवीन दिशानिर्देश जारी, विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग, संलग्नित महाविद्यालयं होणार सुरु, महाविद्यालये आणि वसतीगृहाचं इलेक्ट्रीक ॲाडिट अनिवार्य, 75 टक्के उपस्थितीची अट बंधनकारक नाही
-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट, जिल्ह्यात 66 दिवसानंतर पुन्हा 24 तासांत 500 नवे रुग्ण
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट, जिल्ह्यात 66 दिवसानंतर पुन्हा 24 तासांत 500 नवे रुग्ण, चार दिवसांत 1398 नव्या रुग्णांची भर, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या पोहोचली 137498 वर, 24 तासांत 5 मृत्यू, एकूण मृत्यूसंख्या पोहोचली 4315, अनेक ठिकाणी मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, अनेक लोक कोवीडचे नियम पाळत नसल्याने वाढतोय संसर्ग
-
नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 554 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात 554 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर 4 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय
-
हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित
हिंगणघाटच्या निवासी शाळेतील 75 विद्यार्थी कोरोनाबाधित, एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली असून त्यातील 75 विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत
-
सिंधुदुर्गातील 70 पैकी 69 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूक, भाजपचं 44 जागी वर्चस्व
सिंधुदुर्गातील 70 पैकी 69 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूक पार पडली, यात भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं, भाजपकडे 44, शिवसेनेकडे 23 तर ग्रामविकास आघाडीकडे 1 आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडे 1 ग्रामपंचायत गेली आहे
Published On - Feb 12,2021 6:02 PM