LIVE | परभणीत हलक्या पावसाला सुरुवात, वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
LIVE NEWS & UPDATES
-
परभणीत हलक्या पावसाला सुरुवात, वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू
परभणीत हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागात विजांचा कडकडाटही सुरु आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे येथे नागरिकांची तारांबळ अडाली आहे. सध्या वातावरणात गारवा आहे.
-
पंढरपूर शहर आणि तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात
सोलापूर : पंढरपूर शहर आणि तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात
वादळी वारा, विजेचा कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरवात
द्राक्ष, डाळींब, ज्वारीसह रब्बी पिकाला धोका
द्राक्ष बागायतदारांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता
बळीराजा धास्तावला ग्रामीण भागात बत्ती गुल
-
-
कुख्यात गुंड गजा मारणे याला जामीन
पुणे : कुख्यात गुंड गजा मारणे याला जामीन
शिवाजीनगर सत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर
प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचा जातमुचलक्यावर झाला गजा मारणे आणि साथीदारांना जामीन
-
भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले आहेत. उदयनराजेंच्या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. खासदार उदयनराजे भोसलेंनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली होती.
-
नागपुरात कोरोना रुग्णांच्या संखेत पुन्हा वाढ
नागपुरात कोरोना रुग्णांच्या संखेत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 535 नवीन रुग्णांची नोंद, 5 हजार 383 तपासण्या करण्यात आल्या, त्यत आकडा पुन्हा 500 च्या वर गेल्याने वाढली चिंता, तर काल 382 जणांनी केली कोरोनावर मात, 6 जणांचा मृत्यू झाल्याने, प्रशासनाची वाढली चिंता
-
-
पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा
पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा ,उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भावरती चक्रीय चक्रवाताचा प्रभाव तयार, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा, 17 आणि 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा, तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, पुणे हवामान वेधशाळेनं वर्तवला अंदाज
-
नागपूरसह पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे, हवामान विभागाचा अंदाज
नागपूर – नागपूरसह पूर्व विदर्भातील पुढचे दोन दिवस पावसाचे आणि गारपिटीचे राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज, वातावरणातील हा संभाव्य बदल लक्षात घेता, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढचे ४८ तास अवकाळी पावसाचे राहणार आहेत, नागपूरसह भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ही शक्यता वर्तविण्यात आली आहे, काही भागात रात्री पासूनचं सुरू झाला रिमझिम पाऊस, सकाळ पासून पावसाचं वातावरण
-
जायकवाडी धरणातून उन्हाळ्यासाठी सोडणार पाच वेळा पाणी, रब्बी आणि खरीप हंगाम मिळून 8 आवर्तने सोडण्यात येणार
औरंगाबाद – जायकवाडी धरणातून उन्हाळ्यासाठी सोडणार पाच वेळा पाणी, रब्बी आणि खरीप हंगाम मिळून 8 आवर्तने सोडण्यात येणार, 1 मार्च रोजी पाहिले उन्हाळी आवर्तन सोडने प्रस्तावित, 31 जुलै 2021 पर्यंत पाणी वितरणाचे नियोजन, मोठ्या प्रमाणात साठा असल्याने सिंचनास पूर्ण क्षमतेने पाणी देणे शक्य, पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचन क्षेत्र वाढवण्यावर भर देण्याच्या मंत्री सुभाष देसाई यांच्या सूचना
-
काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना कोरोनाची लागण
नागपूर – काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना कोरोनाची लागण, सोमवारी सायंकाळी आरटीपीसीआर टेस्ट केली होती, मंगळवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय तपासणीनंतर ते घरीच उपचार घेत आहेत
-
चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यत्रंणा सज्ज
पुणे – चाकण येथील आगामी येणाऱ्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यत्रंणा सज्ज झाली असून, 23 प्रभागांच्या निवडणूक प्रारूप मतदार याद्या नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, मात्र या प्रारूप मतदारयाद्यांमध्ये प्रचंड चुका झाल्याचे समोर आल्याने नागरिकांनी नगरपरिषदेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त, प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांची नावे गायब झाली, तर काहींची नावे गेली दुसऱ्या प्रभागात,तर काहींची नवे शेजारील ग्रामपणाचायत हद्दीत गेली नावे, याबाबत 15 ते 22 फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदारयादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याचे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी केले आहे.
-
कोल्हापुरात महाविद्यालयं सुरु झाली मात्र वसतिगृहे अद्याप बंदच
कोल्हापूर – महाविद्यालयं सुरु झाली मात्र वसतिगृहे अद्याप बंदच, बाहेरील विद्यार्थ्यांना होते राहण्याची गैरसोय, बहुतांशी वसतिगृहे बंदच तर काही अजूनही प्रशासनाच्या ताब्यात, वसतिगृहे तातडीने सुरू करण्याची विद्यार्थ्यांमधून होतेय मागणी
-
कोल्हापुरात एकाच गावातील तरुण तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या
कोल्हापूर – एकाच गावातील तरुण तरुणीची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या, तरुणांनी राहत्या घरी तर तरुणीने पाचगाव येथे नातेवाईकाच्या घरी केले विष प्राशन, अनिकेत पाटील अस तरुणाचं तर सानिका व्हनाळकर अस तरुणीच नावं, दोघांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्यान गावात चर्चेला उधान, प्रेमाला विरोध झाल्यानं टोकाचं पाऊल चालल्याची चर्चा, मात्र तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीत लग्नासाठी कर्ज व्हायला नको यासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख
-
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहरात भीषण अपघात, अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर 7 जण जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता, कन्नड शहरातील चौधरी पेट्रोल पंपाजवळ झाला भीषण अपघात, ट्रक आणि क्रूझर वाहनात झाला अपघात, लग्नासाठी निघालेल्या वाहनावर काळाचा घाला
-
उरुळी कांचन परिसरातील 10 कृषी ग्राहक 18 लाख 50 हजार रुपयांचा भरणा करून झाले थकबाकीमुक्त
पुणे – उरुळी कांचन परिसरातील 10 कृषी ग्राहक 18 लाख 50 हजार रुपयांचा भरणा करून झाले थकबाकीमुक्त, पुणे परिमंडलात कृषीपंपधारक शेतकरी व कृषी ग्राहकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी व्याज, विलंब आकारात तसेच मूळ थकबाकीमध्ये 50 टक्केपर्यंत माफी देणाऱ्या योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरु, मुळशी विभाग अंतर्गत उरळी कांचन, कुंजीरवाडी, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबा या गावांतील 10 कृषिपंपधारक शेतकरी व कृषीग्राहकांकडे वीजबिलांपोटी सुमारे 41 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी, थकबाकीमुक्तीच्या योजनेतील सवलतीप्रमाणे या ग्राहकांनी सोमवारी 18 लाख 50 हजार रुपयांचे धनादेश उरळीकांचन कार्यालयात केले जमा
-
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे यांच्या तीन समर्थक नगरसेवकांची वर्णी
पुणे – महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे यांच्या तीन समर्थक नगरसेवकांची वर्णी, स्थायी समितीवर रिक्त झालेल्या आठ जागांसाठी भाजपकडून विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने, राहुल भंडारे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील, मनीषा कदम आणि महेश वाबळे निवड, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू तात्या गायकवाड व प्रदीप गायकवाड यांची निवड, भाजपकडून स्थायी समितीवर संधी देताना प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नेमणुका
-
लॉकडाउन हा अंत्यत शेवटचा पर्याय असेल – राजेश टोपे
दोन गोष्टी ठरवल्या आहेत, त्या त्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, नियमांच पालन केले नाही तर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना पुर्ण आदेश दिले आहेत, लॉकडाउन हा अंत्यत शेवटचा पर्याय असेलय़
-
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर फास्ट टॅग वरून वादावादी
कोल्हापूर : मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची किणी टोल नाक्यावर फास्ट टॅग वरून वादावादी, फास्ट टॅग सुरू होण्यास काही तास असताना टोल नाक्यावर वादवादीला सुरूवात, टोल नाक्यावर 5 ते 6 किमी रांगा लागल्याने रुपाली पाटील ठोंबरे यांनी विचारला जाब, रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील आणखी गाडी चालक देखील धावले
Published On - Feb 17,2021 11:03 PM