LIVE |  मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, जिल्हा शालेय चिकित्सकांची माहिती

| Updated on: Feb 19, 2021 | 11:50 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, आयपीएल लिलाव, हवामान अपडेट, महाराष्ट्र कोरोना लॉकडाऊनसह सर्व बातम्या एकाच ठिकाणी

LIVE |  मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचे 10  रुग्ण, जिल्हा शालेय चिकित्सकांची माहिती
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Feb 2021 10:09 PM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचे 10 रुग्ण, जिल्हा शालेय चिकित्सकांची माहिती

    जळगाव :  मुक्ताईनगर तालुक्यात  10 कोरोनाचे रुग्ण आढळले

    – 3 रुग्णांनी मुक्ताईनगर तालुक्यात मात करून घरी परतले आहेत

    – मुक्ताईनगर सेंटरमध्ये 13 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत

    जिल्हा शालेय चिकित्सकांची माहिती

  • 18 Feb 2021 09:34 PM (IST)

    मानसरोवर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड, 10 मिनिटांनतर वाहतूक सुरळीत

    नवी मुंबई : मानसरोवर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या रेल्वेच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड, 10 मिनिटांनतर वाहतूक सुरळीत

    पनवेल-सीएसटी हार्बर मार्गावर वाहतूक ठप्प

    मानसरोवर रेल्वे स्थानकात रेल्वेच्या रेल्वेच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड

    10 मिनिटांनतर वाहतूक सुरळीत

  • 18 Feb 2021 09:05 PM (IST)

     कांदिवली, मलाड  बोरीवलीमध्ये वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पाऊस

    मुंबई : मुंबई तसेच उपनगरात काही ठिकाणी पाऊस

    कांदिवली, मलाड  बोरीवली  या भागात वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पाऊस

  • 18 Feb 2021 09:04 PM (IST)

    नाशिकमध्ये काही तालुक्यात मध्यम आणि तुरळक स्वरुपाचा पाऊस

    नाशिक : जिल्ह्यात काही तालुक्यात मध्यम आणि तुरळक स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. बागलाण तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

  • 18 Feb 2021 08:40 PM (IST)

    नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, 644 नवे रुग्ण

    नागपूर  : आज 644 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    तर 250 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या  141028

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 131670

    एकूण मृत्यू संख्या -4253

  • 18 Feb 2021 08:18 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

    गडचिरोली : जिल्ह्यात वादळासह अवकाळी जोरदार पाऊस

    धानोरा तालुक्यात 15 मिनिटे अवकाळी पाऊसाची नोंद

    जिल्ह्यात अनेक ठिकाणी सांयकाळी सहा वाजल्यापासून  वादळी वारे

  • 18 Feb 2021 08:16 PM (IST)

    मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात, बत्ती गुल, संपूर्ण शहरात अंधार

    मनमाड : मनमाड शहर परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात

    वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात

    पाऊस सुरू होताच शहराची बत्ती गुल ,संपूर्ण शहरात अंधार

  • 18 Feb 2021 08:13 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत ढागाळ वातावरण, पावसाची शक्यता

    राज्यात अनके जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसल्यायत. कल्याण-डोंबिवलीमध्येसुद्धा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. येथे जोराने वारे वाहू लागले असून ढागाळ वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • 18 Feb 2021 05:55 PM (IST)

    15 दिवसाची नोटीस देऊन वीज खंडित करणार, नितीन राऊतांचा इशारा

    चालू वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसाची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार आहे. नागपूर शहराला अंडर ग्राउंड केबल टाकण्याचा प्रकल्प मंजूर केला. पहिल्या टप्प्यात शहरी भागात तर दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात काम, जनतेला थकबाकीदार बनविण्याचं काम भाजपने केलं, केंद्र सरकार महावितरणला खाजगी कंपन्यांसाठी खड्ड्यात घालण्याच्या तयारीत आहे, सरकारी कंपनी ही सरकारी असते त्यात सवलती मिळतात, खाजगीकरनाचा घाट केंद्र सरकार घालत आहे, 100 युनीट वीज बिल माफी देणार असं मी सांगितलं नव्हतं , मी सांगितलं होतं यासाठी एक समिती बनविली होती त्याची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

  • 18 Feb 2021 05:17 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब लाईव्ह

    अनिल परब, परिवहन मंत्री

    पूर्वी ठरलेला 3 आठवड्यांचा कार्यक्रम आजच्या बैठकीत मांडण्यात आला

    अधिवेशनाचे कामकाज कसे चालेल यावर देखील चर्चा झाली.

    25 तारीखला पुन्हा एकदा बैठक होईल आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम आखला जाईल

    राज्यपालांचे पत्र आलेले आहे

    निवडणूक कुठल्या दिवशी घ्यायची हे कॅबिनेटच्या बैठकीत  ठरेल

    राज्यपालानी जशी अर्थ संकल्पिय अधिवेशना बाबत काळजी दाखवली त्याप्रमाणे काळजी दाखवत 12 विधान परिषदेच्या ज्या जागा रिकाम्या आहेत. अधिवेशनाआधी राज्यपालांनी त्याबाबत निर्णय घ्यावा

    ज्या पद्धतीने कोरोना वाढतोय त्यामुळे पुन्हा काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला आम्ही अधिकार दिले आहेत

    आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली

    अधिवेशनास संदर्भातील 

    विषय देखील सांगण्यात आले आहेत सरकार कुठल्या चर्चेला घाबरत नाही

    कोरोना रुग्णांची संख्या पाहता त्यावर चर्चा झाली

    अधिवेशनाच कामकाज हे दोन टप्प्यात होईल.. 25 तारखेला पुन्हा बैठक होईल, त्यात अंतिम निर्णय होईल

    बजेट 8 तारखेला मांडण्याच ठरलं आहे.. पण अंतिम निर्णय 25 तारखेला होईल

    राज्यपाल आलेल आहे

    त्यांचं पत्र आलं आहे.. रिक्त पदासंदर्भात कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला जाईल आणि मग तो निर्णय राज्यपाल यांना कळवलं जाईल

    राज्यपाल यांनी घटनात्मक विचार आणि काळजी व्यक्त केली त्यांना आम्ही विधान परिषदेच्या 12 रिक्त जागेची आठवण करून देतो..

    लॉकडाउन 

    त्या 3 शहरांच्या जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत

    संजय राठोड – त्यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री बोलले आहेत.. मुख्यमंत्री ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.. दोषींवर कारवाई होईल

    अधिवेशनाची रूपरेषा ठरलेली आहे

  • 18 Feb 2021 05:15 PM (IST)

    मोठी बातमी, कोरोनाचा धोका वाढला, यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन

  • 18 Feb 2021 05:06 PM (IST)

    औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा बंद

    औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शाळा बंद, 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता इतर वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद, विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून दिली सूट, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांची माहिती, कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सूट

  • 18 Feb 2021 05:05 PM (IST)

    यवतमाळपाठोपाठ अमरावती जिल्हाही लॉकडाऊन

    अमरावती : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्हा लॉकडाऊन, अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊनची घोषणा, रविवारी जिल्हा बंद,केवळ अत्यावश्यक सेवा राहतील सुरू, अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची माहिती

  • 18 Feb 2021 01:02 PM (IST)

    Pooja Chavan Case | अरुण राठोडची नार्को चाचणी करा, पूजाच्या आजीची मागणी

    बीड: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड ची नार्को चाचणी करा, पूजाच्या आजी शांताबाई राठोड यांची मागणी, पूजाच्या कुटुंबांचे मोबाईल डिटेल्स तपासा, यात कोण दबाव टाकतोय स्पष्ट होईल, विलास चव्हाणलाही ताब्यात घेतलं पाहिजे, पुजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांची मागणी

  • 18 Feb 2021 11:02 AM (IST)

    Breaking| पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात

    – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण – अरुण राठोड चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात – तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता – पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता – चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग – अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख – यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला – अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख – वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार – एकूण तीन पथक चौकशी करताय काम – याअगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आलाय – अद्यापही गुन्हा दाखल नाही, आकस्मिक मृत्यूचीच नोंद

  • 18 Feb 2021 11:01 AM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोड चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

    पुणे – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण,  अरुण राठोड चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात,  तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता, पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता,  चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग

  • 18 Feb 2021 10:58 AM (IST)

    पुण्यात शेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी रेल रोको

    पुणे – पुण्यात शेतकरी आंदोलनाच्या पाठींब्यासाठी रेल रोको, भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी, डीआरएम ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 18 Feb 2021 10:58 AM (IST)

    औरंगाबादेत पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ, नागरिक हैराण

    औरंगाबादेत पेट्रोलचे दर शंभरीच्या जवळ, पेट्रोल 97.46 रुपये लिटर, तर डिझेल 88.47 रुपये लिटर, पेट्रोल डिझेल दरवाढी मुळे नागरिक हैराण

  • 18 Feb 2021 10:54 AM (IST)

    औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे होणार सील

    औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना बाधित रुग्णांची घरे होणार सील, घर सील करून घरावर लावणार स्टिकर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगलाही देणार गती, औरंगाबाद महापालिकेचा निर्णय, वाढता कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद महापालिका ऍक्शन मोडवर

  • 18 Feb 2021 10:53 AM (IST)

    पुण्यातील हॉटेल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स, मंगल कार्यालये आणि आस्थापनांना पालिका आयुक्तांचा इशारा

    पुण्यातील हॉटेल्स, मॉल्स, मल्टिप्लेक्स, मंगल कार्यालये आणि आस्थापनांना पालिका आयुक्तांचा इशारा,गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाचे नियम न पाळल्यास कारवाईचे दिले आदेश, कारवाईसाठी स्वतंत्र पथकांची केली नेमणूक, भरारी पथकं करणार कारवाई, बाधित क्षेत्रातील हायरिस्क कॉन्टॅक्ट शोधून चाचण्या वाढवण्यावर पालिका देणार भर, चाचण्याऐवजी लसीकरण वाढवण्याच्या सूचना, वाढती कोरोनाची परिस्थिती पाहता महापालिका आयुक्त अँक्शन मोडमध्ये

  • 18 Feb 2021 10:52 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या 60 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली

    रत्नागिरी- जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अवघ्या 60 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी करोनाप्रतिबंधक लस घेतली, 40 टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरविली, तर रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 10 हजार जणांना करोनाची लागण, पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात आशा, अंगणवाडी कार्यकर्त्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते, दोन्ही टप्प्यात मिळून आतापर्यंत सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांनीच करोनाप्रतिबंधक लस घेतली, त्यामुळे लसीकरण मोहिमेला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद नाही.

  • 18 Feb 2021 10:50 AM (IST)

    गुंड गजानन मारणे आणि समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    पुणे – तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्‍या गुंड गजानन मारणे आणि समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा आणखी एक गुन्हा दाखल, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा पवना पुल ते चांदणी चौक या दरम्यान बंगलुरु – मुंबई हायवे रोडने तळोजा कारागृहातून सुटलेला गुन्हेगार गजानन पंढरीनाथ मारणे हा त्याच्या पांढर्‍या रंगाच्या गाडीमधून केला प्रवास, त्याने त्याच्या गाडीच्या आजू बाजूला सुमारे 100 ते 150 समर्थकासह 30 ते 35 चारचाकी गाड्या चालवून, गाड्यांचे बाहेर प्लॅटफार्मवर धोकादायक पद्धतीनं उभं राहून इतर वाहनांना केला अडथळा निर्माण

  • 18 Feb 2021 10:49 AM (IST)

    औरंगाबादेत आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात

    औरंगाबाद : आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात, रेल्वे रुळावर पोलीस आणि कार्यकर्त्यांत जोरदार झटपट, पोलिसांकडून रेल्वे रूळ मोकळा करायला सुरुवात

  • 18 Feb 2021 10:34 AM (IST)

    रावेर खासदार रक्षाताई खडसे करोना पॉझिटीव्ह

    रावेर खासदार रक्षाताई खडसे करोना पॉझिटीव्ह, काल रात्री अचानक प्रकृती बिघडली असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कारोना टेस्ट केली असता; रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे, मुक्ताईनगरच्या खासदार कार्यालयाकडून माहिती देण्यात आली, सध्या प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले

  • 18 Feb 2021 09:18 AM (IST)

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

    राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण, जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली, जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत

  • 18 Feb 2021 08:44 AM (IST)

    रत्नागिरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंधाचे संकेत

    रत्नागिरी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंधाचे संकेत, गेल्या चार दिवसात 67 कोरोनाचे रुग्ण, जिल्हा प्रशासनाची आज महत्वपtर्ण बैठक, खेड तालुक्यातील वरवली गावात आणखी 10 रुग्ण, वरवली गावातील कोरोना रुग्णांची संख्या 41 वर, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने वरवली गाव कंन्टेंमेट झोन जाहीर

  • 18 Feb 2021 08:41 AM (IST)

    नाशकात लग्न समारंभाला 100 पेक्षा जास्त लोक असल्यास थेट कारवाई

    नाशिक – लग्न समारंभाला 100 पेक्षा जास्त लोक असल्यास थेट कारवाई, कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता काढले आदेश, निर्बंध आणखी कठोर करण्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे संकेत, प्रतिबंधात्मक क्षेत्राचे फलक पुन्हा लावण्यास सुरुवात, रुग्ण आढळून आल्यास संपर्कात आलेल्या सर्वांची होणार तपासणी, नाशिकसह राज्यातील 9 जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने प्रशासन पुन्हा हाय अलर्टवर

  • 18 Feb 2021 08:40 AM (IST)

    आमदार नारायण कुचे यांचा कार्यकर्त्याच्या लग्नात डान्स

    जालना – आमदार नारायण कुचे यांचा कार्यकर्त्याच्या लग्नात डान्स, डीजेच्या तालावर कुचेंचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल,  भोकरन तालुक्यातील उमरखेड इथल्या लग्नात कुचेंचा डान्स

  • 18 Feb 2021 08:39 AM (IST)

    पुण्यात शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन

    पुणे – पुण्यात शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वशाटोत्सवाचं आयोजन, शरद पवार यांच्यासह संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे राहणार उपस्थित, राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक वशाटोत्सवाला येणार, एकीकडे कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन मग वशाटोत्सवाला परवानगी कशी, वारकरी संप्रदायातील काही लोकांच्या आक्षेपामुळे वशाटोत्सवात आयोजित ‘ संगीत संत तुकाराम’ हे नाटक करावं लागलं रद्द

  • 18 Feb 2021 08:38 AM (IST)

    गरज पडल्यास नाशकात मिनी लॉकडाऊन, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा

    नाशिक – गरज पडल्यास शहरात मिनी लॉकडाऊन, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा इशारा, शहरात वाढत्या कोरोना बाधितांची संख्येनंतर प्रशासन हाय अलर्टवर, सार्वजनिक ठिकाणी तपासणीसाठी पथक तयार करणार असल्याची आयुक्तांची माहिती, निर्बंधांच्या कडक अमलबजावणीला महापालिका करणार सुरुवात

  • 18 Feb 2021 08:37 AM (IST)

    नाशकात साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी जिल्हा परिषदेकडे 50 लाखांची मागणी

    नाशिक – साहित्य संमेलनासाठी आयोजकांनी जिल्हा परिषदेकडे 50 लाखांची मागणी, तरतूद नसल्याने एवढा निधी कुठून द्यायचा असा जिल्हा परिषदेपुढे पेच, राज्य शासनाकडून 50 लाखांचा निधी, तर महापालिकेकडून देखील भरघोस निधीची मागणी, मात्र कोरोना काळात आर्थिक फटका बसल्याने शासकीय आस्थापनांचा एवढा निधी देण्यास नकार

  • 18 Feb 2021 08:36 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील राजुरा, अमनवाडी परिसरात अवकाळी पाऊस सुरु

    वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील राजुरा, अमनवाडी परिसरात अवकाळी पाऊस सुरु, या पावसामुळे रब्बीतील हरभरा, गहू, पिकासह भाजीपाला पिकाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या चिंतेत अधिकच वाढ झाली

  • 18 Feb 2021 08:35 AM (IST)

    कोलेहापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

    कोल्हापूर – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून तयारीला सुरुवात, रेकॉर्डवरील 60 गुन्हेगारांची कुंडली तयार, सर्वांच्या हद्दपारीचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे सादर, तर काही टोळ्या वर मोक्का अंतर्गत कारवाई चीही पोलिसांकडून तयारी

  • 18 Feb 2021 08:34 AM (IST)

    सोलापुरात तीन दिवसात वाढला 80 ते 87 टक्के पर्यंत फास्टटॅगचा वापर

    सोलापुर – तीन दिवसात वाढला 80 ते 87 टक्के पर्यंत फास्टटॅगचा वापर, पहिल्या दिवशी फास्टट्रॅक वापरण्याचे प्रमाण 72 ते 75 टक्के होते, तिसऱ्या दिवशी 80 ते 87 टक्के पर्यंत फास्टट्रॅक वापराचे प्रमाण

  • 18 Feb 2021 08:33 AM (IST)

    कोल्हापुरात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता

    कोल्हापूर – जिल्ह्यात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी होण्याची शक्यता, राज्यातील काही भागात रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होत असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी, दोन दिवसात कारवाई बाबतचे आदेश काढले जाण्याची शक्यता, कोल्हापूर जिल्ह्यात सध्या तरी कोरोना रुग्ण वाढ नियंत्रणात

  • 18 Feb 2021 08:32 AM (IST)

    जिल्ह्यातील दोनशे मंगलकार्यालायला नोटीस, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बजावली नोटीस

    औरंगाबाद : जिल्ह्यातील दोनशे मंगलकार्यालायला नोटीस, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बजावली नोटीस, गर्दी कमी राखून कोरोना नियम पाळण्याचे निर्देश, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा नोटीसीत दिला ईशारा

  • 18 Feb 2021 08:32 AM (IST)

    दहा दिवसात कारवाईच्या धसक्याने सोलापूर जिल्ह्यात ते 40 कोटींची वसुली

    सोलापूर – दहा दिवसात कारवाईच्या धसक्याने जिल्ह्यात ते 40 कोटींची वसुली, दहा महिन्यात येतो रुपयाही न होणाऱ्या वीजथकबाकीदारांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची सुरु आहे मोहीम, दहा दिवसात शहरात 2319 तर ग्रामीण भागात 8 हजार 615 असे जिल्ह्यातील अकरा जणांचा विद्युत पुरवठा खंडित, विद्युत पुरवठा खंडित केलेल्या वीज थकबाकीदारांकडून नऊ कोटी 96 लाखांची थकबाकी, कारवाईच्या धक्‍क्‍याने जिल्ह्यात 43 कोटी 66 लाख 89 हजार रुपये वसुली

  • 18 Feb 2021 08:26 AM (IST)

    सोलापुरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या

    सोलापूर – सोलापुरात सकाळच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, रात्रीपासून शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण

  • 18 Feb 2021 08:26 AM (IST)

    मराठवाड्यात विजबिलाची तब्बब 777 कोटी रुपयांची थकबाकी

    औरंगाबाद : मराठवाड्यात विजबिलाची तब्बब 777 कोटी रुपयांची थकबाकी, महावितरणचे तब्बल 777 कोटी रुपये थकले, शेकडो कोटी रुपये वसूल करण्याचे महावितरण समोर आवाहन, गेल्या दहा महिन्यातील सर्वाधिक थकबाकी, सहा लाख ग्राहकांची 777 कोटी रुपये थकबाकी, महावितरणचे सर्वच कर्मचारी थकबाकी वसुलीच्या कामात, तरीही थकबाकी वसुलीला थंड प्रतिसाद

  • 18 Feb 2021 07:26 AM (IST)

    कराडमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस

    कराडमध्ये अवकाळी मुसळधार पाऊस, विजेच्या कडकडाटासह पहाटेपासून अवकाळी पाऊसाला सुरुवात, आकाश काळ्याकुट्ट ढगांनी गच्च

  • 18 Feb 2021 07:25 AM (IST)

    नागपुरात पुन्हा कोरोना ब्लास्ट, 24 तासात 596 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात पुन्हा कोरोना ब्लास्ट

    24 तासात 596 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 5 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याने वाढली चिंता

    नवीन वर्षातील हा उच्चांकी आकडा

    गेल्या सात दिवसात 3289 रुग्ण आढळून त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली

    एकूण रुग्ण संख्या – 140384

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 131420

    एकूण मृत्यू संख्या – 4247

  • 18 Feb 2021 07:22 AM (IST)

    सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

    पुणे – सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, भविष्यात रुग्ण संख्या कमी न झाल्यास परिस्थितीचा आढावा घेऊन हा भाग कंटेन्मेंट झोन करणार

  • 18 Feb 2021 07:21 AM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील बंगल्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

    नागपूर – गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सिव्हिल लाइन्समधील बंगल्यावर तैनात पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला, ही घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे घडली, संजय धनराज नानवरे, असे मृतकाचे नाव आहे, संजय हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर गार्ड होते, संजय हे गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर गार्ड होते

  • 18 Feb 2021 07:18 AM (IST)

    पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलएम 122 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन

    पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएलएम 122 ठिकाणी उभारणार चार्जिंग स्टेशन, पीएमपीच्या बसबरोबरच दुचाकी, मोटारी आणि रिक्षांना या ठिकाणी चार्जिंग करता येणार, यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू, पीएमपीएलएमच्या ताफ्यात डिसेंबरअखेर टप्प्याटप्प्याने 500 ई-बस दाखल होणार, सध्या 150 ई-बस आहेत, त्यांच्यासाठी चार्जिंगची व्यवस्था भेकराईनगर आणि निगडी डेपोत व्यवस्था, काही महिन्यांत आणखी ई- बस दाखल होणार असल्यामुळे चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पीएमपीएलएमचा पुढाकार

  • 18 Feb 2021 07:09 AM (IST)

    पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

    पुणे – शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता, येत्या शुक्रवार पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता, तसेच दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा, मात्र त्यानंतर शहर व परिसरात हवामान कोरडे राहणार, पुणे वेधशाळेने दिली माहिती

  • 18 Feb 2021 06:24 AM (IST)

    वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात

    वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे, या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू, हरबरा पिकासह भाजीपाला पिकांना धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे

  • 18 Feb 2021 06:22 AM (IST)

    परंडा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस

    परंडा , तुळजापूर , उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट

  • 18 Feb 2021 06:20 AM (IST)

    गोंदियात जोरदार अवकाळी पाऊस

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, गाराही बरसल्या, पिकांना मोठा फटका

  • 18 Feb 2021 06:19 AM (IST)

    सांगली आणि मिरज शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस

    चक्क हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस पडला आहे, अचानक रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आहे

  • 18 Feb 2021 06:17 AM (IST)

    परभणीत विजांच्या कडकडाटासह पाऊस, काही भागात गाराही बरसल्या

    परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला, तसेच काही भागात गाराही बरसल्या, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती

Published On - Feb 18,2021 10:09 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.