LIVE | संजय राठोड यांची दोन तासांची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त दोन मिनिट चर्चा

| Updated on: Feb 25, 2021 | 12:19 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | संजय राठोड यांची दोन तासांची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त दोन मिनिट चर्चा

वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची तब्बल दोन तास वाट पाहिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, ही भेट अवघ्या काही क्षणांची झाली. दोन मिनिटांच्या चर्चेनंतर राठोड आपल्या चर्चगेट येथील शासकीय निवासस्थानी निघाले, अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Feb 2021 10:09 PM (IST)

    दोन तासांची प्रतिक्षा, मुख्यमंत्र्यांसोबत फक्त दोन मिनिट चर्चा

    वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी मुख्यमंत्र्यांची तब्बल दोन तास वाट पाहिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, ही भेट अवघ्या काही क्षणांची झाली. दोन मिनिटांच्या चर्चेनंतर राठोड आपल्या चर्चगेट येथील शासकीय निवासस्थानी निघाले, अशी माहिती समोर येत आहे

  • 24 Feb 2021 09:16 PM (IST)

    भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नियमांचं उल्ल्ंन

    पिंपरी चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मिस ऍण्ड मिसेस फॅशन शो मध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौर उषा ढोरे यांच्या मुलावर गुन्हा दाखल, याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात आज दखलपात्र गुन्हा दाखल, जवाहर मनोहर ढोरेंवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल, जवाहर हे महापौर उषा ढोरे यांचे चिरंजीव

  • 24 Feb 2021 09:13 PM (IST)

    जळगावात दिवसभरात 363 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    जळगाव कोरोना अपडेट :

    आज वाढलेले रुग्ण -363 आज झालेले मृत्यू – 02 आज बरे झालेले – 137

    एकूण रुग्ण – 59585 एकूण मृत्यू – 1379 एकूण बरे झालेले – 13376 एकूण उपचार घेत असलेले रुग्ण – 1790

  • 24 Feb 2021 09:12 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

    सातारा जिल्हयात कोरोनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाचा निर्णय, हॉटेल, रिसॉर्ट, लॉन्स, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी गर्दी आढल्यास व्यवस्थापकाकडून पहिल्यांदा चूक झाल्यास 25 हजार होणार दंड, दुसऱ्यांदा चुक केल्यास 1 लाख रुपये दंड आणि गुन्हा होणार दाखल, कार्यक्रम आयोजित करणाऱ्या व्यक्तीला 10 हजार रुपयांचा होणार दंड

  • 24 Feb 2021 08:24 PM (IST)

    राज्यात कोरोना रुग्णांचा स्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजार 807 नवे रुग्ण

    राज्यात कोरोना रुग्णांचा स्फोट, दिवसभरात तब्बल 8 हजार 807 नवे रुग्ण, त्यामुळे चिंता वाढली आहे

  • 24 Feb 2021 08:16 PM (IST)

    संजय राठोड वर्षा बंगल्यावरुन निघाले, नेमकं काय घडलं?

    वनमंत्री संजय राठोड पावणे दोन तासांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ताटकळत बसले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली का हे अद्यापही अस्पष्ट आहे. पण संजय राठोड वर्षा बंगल्यावरुन बाहेर निघाले आहेत. ते आता त्यांच्या चर्चगेट येथील शासकीय निवासस्थानाकडे निघाले आहेत.

  • 24 Feb 2021 08:11 PM (IST)

    वसई-विरारमध्ये 39 नवे रुग्ण, सध्या 277 रुग्ण सक्रीय

    मागच्या 24 तासांत 39 कोरोना पाॅझिटीव्ह रुगणाची वाढ, 01 कोरोना बधितांचा मृत्यू, तर 10 जणांची कोरोनावर मात,  नवे 39 रुग्ण पकडून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या 30,202 वर पोहोचली, वसई विरार क्षेत्रात कोरोनाबाधित मृत्यूची संख्या 898 झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 29,027 झाली आहे. सध्या 277 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

  • 24 Feb 2021 08:05 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी संजय राठोड दीड तास ताटकळत, मुख्यमंत्र्यांची भेट नाहीच

    वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मात्र, गेल्या दीड तासांपासून त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालेली नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

  • 24 Feb 2021 07:03 PM (IST)

    अमरावतीत कोरोनाचा स्फोट, तब्बल 802 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    अमरावती कोरोना फ्लॅश

    अमरावती जिल्हात कोरोनाचा स्फोट

    अमरावती जिल्हात आज तब्बल 802 नवीन कोरोना बाधित रुग्ण..

    आज तब्बल 10 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू…

    -जिल्हात आज497 रुग्णांनी केली कोरोनावर मात…

    -अमरावती जिल्हात आतापर्यंत 31925 कोरोना बाधित रुग्ण…

    -481 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू ..

    -आतापर्यंत 27255 रुग्णांनी केली कोरोनावर मात…

    -4189 रुग्णांवर उपचार सुरू

  • 24 Feb 2021 06:34 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 743 कोरोना रुग्णांची वाढ

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात ७४३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३८२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. ०१ रूग्ण पुण्याबाहेरील. – २०७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १९९६९६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३५५९. – एकूण मृत्यू -४८३७. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९१३००. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६५१४.

  • 24 Feb 2021 06:33 PM (IST)

    गडचिरोलीत 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    गडचिरोली कोरोना अपडेट

    गडचिरोलीत आज 9 नवीन कोरोनाबाधित तर 9 कोरोनामुक्त

    आज जिल्हयात 9 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9482 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9307 वर पोहचली. तसेच सद्या 70 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद!!

  • 24 Feb 2021 06:32 PM (IST)

    येवला कोरोना अपडेट

    येवला :- आज दिवसभरात 19 कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, आतापर्यंत 53 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली १२४३, कोरोनावर ११७१ जणांनी मात करत केली घरवापसी, उर्वरित १९ जण कोरोनाउपचार घेत आहे

  • 24 Feb 2021 06:24 PM (IST)

    संजय राठोड ‘वर्षा’वर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार

    कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंशी भेट, राठोडांचा राजीनामा की अभय, निर्णयाकडे राज्याचं लक्ष

  • 24 Feb 2021 06:20 PM (IST)

    अहवाल आल्यावर कारवाई होईल – नवाब मलिक 

    पोहोरादेवीला गर्दी जमण्याचे कारण काय, कोणी नेत्यांनी आवाहन केलं होतं, राजकीय पक्षाने दिलं होतं का? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना अशी गर्दी जमते, त्यावर निश्चित अहवाल आल्यावर कारवाई होईल – नवाब मलिक

  • 24 Feb 2021 06:15 PM (IST)

    राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाचा आढावा : नवाब मलिक 

    राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनचा आढावा घेण्यात आली. राज्यातील कोरोना चाचणीची संख्या वाढवली पाहिजे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यायला हवा – नवाब मलिक

  • 24 Feb 2021 06:03 PM (IST)

    राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली

    मुंबई : सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन तास  चर्चा, वनमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती

  • 24 Feb 2021 05:45 PM (IST)

    राज्यात वीजदर कमी करून शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करा : उर्जामंत्री डॉ नितीन राऊत

    राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले. नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना 8 तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे व रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

    राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा 8 तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  • 24 Feb 2021 04:40 PM (IST)

    महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासली : नारायण राणे 

    हा काही संत आहे का? संजय राठोड लगे रहो. कुठल्याही समाजाने अशा लोकांच्या पाठीमागे जावू नये.भाजप अशी प्रकरण उजेडात आणणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा हाच उद्योग धंदा, महाराष्ट्राच्या प्रतीमेला काळीमा फासली : नारायण राणे

  • 24 Feb 2021 04:32 PM (IST)

    सरकार अशा लोकांना पाठीशी घालतंय : नारायण राणे

    कोण आला रे कोण आला, बंजाऱ्यांचा वाघ आला, पूजा चव्हाण आत्महत्या झाली की खून झालाय हे अजून समजलेलं नाही, संजय राठोड हा पंधरा दिवस फरार. त्याच्यावर आरोप आहेत. सरकार अशा लोकांना पाठीशी घालतंय, नारायण राणेंची टीका

  • 24 Feb 2021 04:22 PM (IST)

    धुळ्यात मनसेचे खळ्ळखट्याक, महावितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड

    धुळ्यात मनसेचे खळ्ळखट्याक, महावितरण कंपनीच्या कार्यालयात खुर्ची टेबलची तोडफोड, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, अधिकारी नागरिकांना त्रास देत असल्याचा मनसेचा आरोप, जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे पदाधिकारी कार्यकर्त्याकडून कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

  • 24 Feb 2021 03:40 PM (IST)

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराच्या दर्शन वेळेत बदल

    कोल्हापूर : वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे आंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिराची दर्शन वेळेत बदल करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय, दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी होती. ती 25 फेब्रुवारीपासून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली. दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार, शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक, सोशल डिस्टन्सिंगसह सँनिटायजर हातावर घेऊन दर्शन करण बंधनकारक

  • 24 Feb 2021 03:38 PM (IST)

    वनमंत्री संजय राठोड सह्याद्रीवर दाखल

    वनमंत्री संजय राठोड सह्याद्रीवर दाखल झाले आहे. संजय राठोड मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. थोड्याच वेळात ही मंत्रिमंडळ बैठक सुरु होणार आहे.

  • 24 Feb 2021 03:06 PM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, समाजाची ढाल पुढे करुन जातपंचायत सक्रिय झाल्याचा अंनिसचा आरोप

    नाशिक – पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, समाजाची ढाल पुढे करुन जातपंचायत सक्रिय झाल्याचा अंनिसचा आरोप, जात पंचायत हस्तक्षेप करुन पूजाच्या कुटुंबावर ही दबावतंत्राचा अवलंब करत आहे, नायकांच्या बैठका म्हणजेच जातपंचायत प्रमुखांच्याच बैठका आहेत, राज्यात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात असूनही मंत्र्याकडूनच कायदा आणि न्याय व्यवस्थेला आव्हान, पोहरादेवी मंत्र्यांनी भूमिका मांडण्याची गरज काय, समाजाची मते आपल्याकडे रहावी यासाठी संजय राठोड पोहरादेवी ला गेले, धार्मिक संत महंत यांच्यां उपस्थितीत भूमिका मांडण्याची गरज का, संजय राठोड यांनी मुख्यमंत्री यांच्यापुढे आपले स्पष्टीकरण देणे आवश्यक होते, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी करावाई करण्याची मागणी

  • 24 Feb 2021 03:02 PM (IST)

    नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील मोहमद अल्ली चौकात एकाची हत्या

    नागपूर – नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील मोहमद अल्ली चौकात एकाची हत्या, मुलाने वडिलांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती, मृतकांचे नाव शेख युसूफ, तर शेख अनिस आरोपीचे नाव, प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

  • 24 Feb 2021 03:01 PM (IST)

    नाशिक आदिवासी आयुक्त कार्यालयातील 7 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह

    नाशिक – आदिवासी आयुक्त कार्यालयातील 7 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह, अप्पर आयुक्त कार्यालयातील क्लेरीकल विभागाचे कर्मचारी, 7 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आदिवासी आयुक्त कार्यालय हाय अलर्टवर

  • 24 Feb 2021 02:59 PM (IST)

    पुण्यात कोरोना रुग्णांसाठी 4,457 बेड्स उपलब्ध

    पुणे – शहरात सध्या कोरोना रुग्णांसाठी एकूण बेडची संख्या 4457, त्यापैकी आयसीयु बेडची संख्या आहे 233, या आयसीयु बेडपैकी 155 रिकामे आहेत, व्हेंटिलर बेडची संख्या आहे 383, त्या व्हेंटिलर बेडपैकी 211 रिकामे आहेत,  ऑक्सिजन बेडची संख्या आहे 2384, त्यापैकी 1532 ऑक्सिजन बेड रिकामे आहेत, आयसोलोशन बेडची संख्या आहे 2896, त्यापैकी 1212 आयसोलोशन बेड रिकामे आहेत, पुण्यात सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आहे 2896, त्यापैकी 164 रुग्ण गंभीर आहेत,  पुण्यात आतापर्यंत 197964 कोरोना रुग्णांची नोंद झालीय

  • 24 Feb 2021 11:16 AM (IST)

    मुंबईतील ओव्हल मैदान पुढील 15 दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाचा निर्णय

    मुंबईतील ओव्हल मैदान पुढील 15 दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाचा निर्णय, शुक्रवार म्हणजेच 26 फेब्रुवारी पासून हे मैदान बंद, इथली गर्दी पाहता पालिकेचा निर्णय, त्यासंदर्भातील पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं, या मैदानात विरार वसई यासह अनेक ठिकाणची मुलं क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात, एकाचवेळी क्रिकेटच्या 5 ते 6 क्रिकेटच्या मॅचेस होण्याची क्षमता या मैदानाची आहे

  • 24 Feb 2021 10:13 AM (IST)

    तळेगांव दाभाडे शहरातील रविवारचा आठवडे बाजार राहणार बंद

    पुणे – तळेगांव दाभाडे शहरातील रविवारचा आठवडे बाजार राहणार बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तळेगांव दाभाडे नगरपरिषदेने घेतला निर्णय, या पुढे हा आठवडी बाजार सुभाष मार्केट येथे न भरता नागरिकांच्या सोयीसाठी पूर्वी प्रमाणे संभाजीनगर भागात भरविण्याचा नगरपरिषदेचा निर्णय

  • 24 Feb 2021 09:45 AM (IST)

    संजय राठोड आजच्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार

    संजय राठोड यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, संजय राठोड यवतमाळहून नागपूरच्या दिशेने रवाना, सकाळी सव्वा अकराच्या विमानाने मुंबईकडे रवाना होणारा, आजच्या कॅबिनेट बैठकीला हजेरी लावणार

  • 24 Feb 2021 09:44 AM (IST)

    पूजा चव्हाण प्रकरणी मी माझी भूमिका मांडली आहे – संजय राठोड

    पूजा चव्हाण प्रकरणी मी कालच माझी भूमिका मांडली आहे,  आता मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही

  • 24 Feb 2021 09:43 AM (IST)

    लोकांनी कोरोना संदर्भात सिरीयस झालं पाहिजे, लोकांना गांभीर्य नाहीये – संजय राठोड

    माझं रितसर काम सुरु झालंय, माझ्या शासकीय कामांना सुरुवात करतोय, मंत्रिमंडळ बैठकीला मी रवाना होतोय, लोकांनी कोरोना संदर्भात सिरीयस झालं पाहिजे, लोकांना गांभीर्य नाहीये,

  • 24 Feb 2021 09:33 AM (IST)

    महाविकास आघाडी विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचं आज कोल्हापुरात लाक्षणिक उपोषण

    कोल्हापूर : महाविकास आघाडी विरोधात आज शाहू जनक घराण्याचे वंशज आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच आज लाक्षणिक उपोषण, दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याखाली बसून करणार आंदोलन, आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली तरीही समरजित घाटगे आंदोलनावर ठाम, कर्जमाफी, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदाना सह लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी साठी समरजित घाटगे आक्रमक, थोड्याच वेळात होणार आंदोलनाला सुरुवात, आंदोलनापूर्वी समरजित घाटगे घेणार करवीर निवासिनी अंबाबाईच दर्शन

  • 24 Feb 2021 09:08 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, ईडीने एकनाथ खडसे यांच्या विरोधात मनी लॉनडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे, हा गुन्हा रद्द करावा यासाठी खडसे यांनी ही याचिका केली आहे, या याचिकेवर आता पर्यंत तीन वेळा सुनावणी झाली आहे, पुणे येथील एमआयडीसी लँड घोटाळाच्या अनुषंगाने ईडीने हा गुन्हा दाखल आहे.

  • 24 Feb 2021 09:06 AM (IST)

    राज्यात शाळाबाह्य आणि स्थलांतरित मजूरांच्या मुलांचा घेतला जाणार शोध

    पुणे – राज्यात शाळाबाह्य आणि स्थलांतरित मजूरांच्या मुलांचा घेतला जाणार शोध,  शोधमोहीमेतून शाळाबाह्य मुलांची पटावर केली जाणार नोंदणी, मुलांना आणलं जाणार शिक्षणाच्या प्रवाहात, शोध मोहीमेसाठी 11 नोडल अधिकाऱ्यांची केली नियुक्ती, उद्यापासून सर्वेक्षणाला होणार सुरुवात, 19 मार्चपर्यंत मुलांची पटावर नोंदणी करून शाळेत भरती करण्याचे आदेश, 24 मार्चपर्यंत राज्याच्या शिक्षण उपसंचालकांना द्यावी लागणार माहिती,  शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आदेश, पुणे जिल्ह्यातही शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहीमेला होणार सुरुवात, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आदेश

  • 24 Feb 2021 09:05 AM (IST)

    नाशकात स्थायी समितीच्या 8 सदस्यांच्या नियुक्तीसाठी आज महासभा

    नाशिक – स्थायी समितीच्या 8 सदस्यांच्या नियुक्तीसाठी आज महासभा, ऑनलाईन पद्धतीने होणार आजची नियुक्तीची विशेष सभा, न्यायालयाने निर्णय दिल्याने सेनेचा एक सदस्य वाढणार, तर भाजपाचा एक सदस्य कमी होणार, मनसे ठरणार भाजपासाठी तारणहार ?, भाजपाचा कोणता सदस्य कमी होणार आणि सेनेचा कोणता सदस्य वाढणार याकडे लक्ष

  • 24 Feb 2021 09:03 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात जनावरं तस्करीचं मोठं रॅकेट सक्रिय, नागपूरच्या मौदा परिसरातून 110 बैलांची राजस्थान, तैलंगणात तस्करी

    नागपूर जिल्ह्यात जनावरं तस्करीचं मोठं रॅकेट सक्रिय, नागपूरच्या मौदा परिसरातून 110 बैलांची राजस्थान, तैलंगणात तस्करी,  ध्यान फाऊंडेशनच्या मदतीनं झाली पोलीस कारवाई,  मौदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल,  भंडाऱ्याच्या मातोश्री गौशाला येथे पाठवले रेस्क्यू केलेले बैल, मातोश्री गौशालेत गैरप्रकार होत असल्याचा ध्यान फाऊंडेशनच्या,  110 बैल मातोश्री गौशालेत सोपवण्याच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा

  • 24 Feb 2021 09:03 AM (IST)

    येरवडा कारागृहाच्या कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह बांधले जाणार

    पुणे – येरवडा कारागृहाच्या कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह बांधले जाणार, कारागृहाच्या शेजारी असलेल्या जागेत केवळ कच्च्या कैद्यांसाठी नवीन कारागृह बांधले जाणार आहे, येरवडा मध्यवर्ती कारागृहात एकूण कैदी क्षमतेपेक्षा दुपटीच्यावर कैदी दाटीवाटीने राहत आहेत, नवीन कारागृहासाठी पावणे दोनशे कोटींच्या निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे पाठवलाय,- शाखा अभियंता अजय देशमुख यांची माहिती

  • 24 Feb 2021 07:52 AM (IST)

    विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची दंडाची रक्कम कमी करा, नगरसेवक राहुल दिवे यांची स्थायी समितीच्या सभेत मागणी

    नाशिक – विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची दंडाची रक्कम कमी करा, 1000 ऐवजी 200 रुपये दंड करा, नगरसेवक राहुल दिवे यांची स्थायी समितीच्या सभेत मागणी, इतर शहरात देखीक दंडाची रक्कम कमी असल्याचा निर्वाळा, अडचणीत आलेल्या नागरिकांना आणखी त्रास देऊ नये – राहुल दिवे यानाची मागणी

  • 24 Feb 2021 07:51 AM (IST)

    नाशकात विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई, 127 नागरिकांकडून दंड वसूल

    नाशिक – विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई, 127 नागरिकांकडून दंड वसूल, महापालिकेने एका दिवसात वसूल केला सव्वा लाख रुपयांचा दंड, नाशिकरोड विभागात सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधिक दंड वसूल

  • 24 Feb 2021 07:50 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करणार

    पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क परत करणार, कोरोनामुळे गेल्यावर्षी अंतिम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात आला होता, या विद्यार्थ्यांची परीक्षा न झाल्याने त्यांचे परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे, मात्र ही प्रक्रिया राबविताना झालेला खर्च यातून वगळण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलाय, अभाविप कार्यकर्त्यांनी परीक्षा शुल्क परत करावे, यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

  • 24 Feb 2021 07:49 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोलीस गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर खंडणीचाही गुन्हा दाखल करणार

    पिंपरी चिंचवड पोलीस गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर खंडणीचाही गुन्हा दाखल करणार, तळोजा कारागृहातून पुण्याला येत असताना द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर त्यांनी टोल भरला नसल्याचं समोर, दमदाटी करत इतर वाहनं बाजूला केली आणि रॅलीतील सर्व वाहनं मोफत पुढे केली, असं सीसीटीव्हीत कैद, त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस खंडणीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली माहिती, आतापर्यंत गजा मारणेच्या 31 साथीदारांना अटक करून 13 वाहनं पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलीत

  • 24 Feb 2021 07:48 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांकडून सक्त दंडाची कडक वसुली

    पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात मास्क न वापरणाऱ्यांवर ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून आज सक्त दंडाची कडक वसुली, जिल्ह्यातील 13 तालुक्याच्या ग्रामपंचायतीकडून 913 जणांकडुन 2,98,800 रुपयांची तर ग्रामीण पोलीसांनी 793 जणांकडुन 1,97,800 रुपयांच्या दंडाची आज दिवसभरात सक्त दंडाची वसुली, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती, ग्रामीण भागातही गर्दी न करणे,मास्क वापरणे पुढील काळात बंधकारक;होणार दंड

  • 24 Feb 2021 07:45 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडकराची चिंता वाढली, कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट काही दिवसांतच 5 टक्क्यांवरुन 23 टक्क्यांवर

    पिंपरी-चिंचवडकराची चिंता वाढली, कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्ह रेट काही दिवसांतच 5 टक्क्यांवरुन 23 टक्क्यांवर, पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला, शहराचा पॉझिटिव्ह रेट काही दिवसांतच 5 टक्क्यांवरून 23 टक्यांपर्यंत गेला असून ही चिंतेची बाब, नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. तर, भविष्यात लॉकडाऊनची परिस्थिती होऊ शकते, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली जात आहे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज, मास्कचा वापर करावा, वारंवार हात सॅनिटायझ करावेत.कोरोनाची लक्षणे असलेल्यांना आयसोलेट करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे

  • 24 Feb 2021 07:43 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका, जिल्ह्यात 59 कन्टेंनमेंट झोन

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका, जिल्ह्यात 59 कन्टेंनमेंट झोन,  गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील 691 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, जिल्ह्यात काल एकाच दिवसांत तब्बल 11 हजार कोरोना चाचण्या, जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णालयांचं फायर आणि सेफ्टी ॲाडीट करण्याचे आदेश, विभागीय आयुक्तांनी दिले आदेश

  • 24 Feb 2021 07:41 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेची पाणीपट्टी अभय योजना फेल

    नागपूर महानगरपालिकेची पाणीपट्टी अभय योजना फेल, अभय योजनेला फक्त 17 टक्केच थकबाकीदारांचा प्रतिसाद, 2.57 लाख थकबाकीदारांकडे 104.43 कोटींची होती थकबाकी,  थकबाकीदारांना दंडातून सूट मिळवण्यासाठी होती अभय योजना, पाणीपट्टी थकीत असल्याने मनपाला मोठा आर्थिक फटका

  • 24 Feb 2021 07:39 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील एकाच गावात 155 कोरोनाचे रुग्ण

    बुलडाणा – जिल्ह्यातील एकाच गावात 155 कोरोनाचे रुग्ण, जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील प्रकार, गावात काही दिवसांपूर्वी धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता, प्रशासनाने गावात सर्वांची तपासणी सुरु केली, एवढ्या प्रमाणात संसर्ग कसा झाला याचा शोध प्रशासनाकडून सुरू

  • 24 Feb 2021 07:20 AM (IST)

    नांदेडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

    नांदेड – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल,  बियर बार चालकाकडून मागितली एक लाख रुपयांची लाच,  निरीक्षक सुभाष खंडेराय यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागातील लाचखोरी प्रथमच झालीय उघड, लाचखोर खंडेराय हे वर्षानुवर्षे नांदेडमध्येच आहेत तळ ठोकून

  • 24 Feb 2021 07:08 AM (IST)

    16 जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा, नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सील

    16 जणांना एकाचवेळी कोरोनाची बाधा झाल्यामुळे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूर महापालिकेने केले सील, पॉझिटीव्ह आलेले सर्व जण हे महाविद्यालययातील प्राध्यापक आणि कर्मचारी आहेत, लक्ष्मीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांनी महाविद्यालया समोर प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं फलक लावलं

  • 24 Feb 2021 06:25 AM (IST)

    नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता उपलब्ध होणार

    नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता उपलब्ध होणार, त्यासोबतच जळगाव आणि अहमदाबादला येजा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरु होणार, नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करुन दिलीय, त्यामुळे नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे

  • 24 Feb 2021 06:23 AM (IST)

    वसईच्या कामन परिसरात भरलेल्या आठवडी बाजारात नागरिकांनी तुफान गर्दी

    वसई विरारमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी आयुक्त गंगाथरण डी यांनी निर्बंध लावण्यास सुरवात केली, पण वसई ताल्युक्यात भरणाऱ्या आठवडी भाजारात मात्र शासनाच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडत असतानाचे चित्र, वसईच्या कामन परिसरात भरलेल्या आठवडी बाजारात नागरिकांनी तुफान गर्दी केलेली पाहायला मिळाली

Published On - Feb 24,2021 10:09 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.