LIVE | हिंगोलीत संचारबंदी लागू, 7 मार्चपर्यंत निर्बंध

| Updated on: Feb 28, 2021 | 12:04 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | हिंगोलीत संचारबंदी लागू, 7 मार्चपर्यंत निर्बंध
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2021 08:17 PM (IST)

    हिंगोलीत जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च कडक संचारबंदी

    हिंगोली : जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च कडक संचारबंदी, जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने संचारबंदी, औषधी दुकाने, दवाखाने ,दूध, कृषी विषयक वाहने, वगळता सामान्य नागरिकांसाठी पेट्रोल पंप देखील बंद राहणार, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

  • 27 Feb 2021 07:36 PM (IST)

    राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 8 हजार 623 रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 8 हजार 623 रुग्ण गेल्या 24 तासात 3 हजार 648 जणांना डिस्चार्ज गेल्या 24 तासात 51 जणांचा मृत्यू आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण 21 लाख 46 हजार 777 वर आतापर्यंत कोरोनामुळे 52 हजार 92 जणांचा मृत्यू आतापर्यंत 20 लाख 20 हजार 951 जणांना डिस्चार्ज मुंबईत आज 987 जणांना कोरोनाची लागण आज दिवसभरात मुंबईत 4 जणांचा झाला मृत्यू

  • 27 Feb 2021 07:23 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच, 640 रुग्णांची नोंद

    अमरावती कोरोना अपडेट

    अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच….

    आज अमरावती जिल्हात 640 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

    आज 8 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू

    -आज 498रुग्णांनी केली कोरोनावर मात…

    -जिल्हात आतापर्यंत 34225 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…..

    -आतापर्यंत28856 रुग्णांनी केली कोरोनावर मात…

    -503 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू….

    -4866 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू

  • 27 Feb 2021 06:17 PM (IST)

    शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक

    शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक, संध्याकाळी 6.30 वाजता बैठक, शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार, सोमवारपासून सुरु होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन, वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत वाद, भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका, याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी चर्चा होण्याची शक्यता, शिवसेनेची रणनीती ठरणार

  • 27 Feb 2021 06:15 PM (IST)

    रायगडमध्ये दोन चिमूकल्या मुलांचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू

    रायगड : रोहा तालुक्यातील वाशी गावामध्ये मन हेलवणारी दुखत घटना घडली. कुडंलीका नदीच्या उपनदीत सकाळी 11 ते 12 दरम्यान वेदांत मनोज मगर (10), किसन खडक सिंग खडका (12)  येथील कुडंलिका उपनदीच्या पात्रात पोहायला गेले असताना पाण्याचा अदांज नं आल्याने बुडून मरण पावले. गावातील तरूणांना नदीच्या कडेने जात असतानाच काहीतरी आवाज आला असताना त्या तरुणांना तात्काळ मुलांना बाहेर काढून डॉ. जाधव येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

  • 27 Feb 2021 06:10 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 126 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात दिवसभरात नवे 126 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर 43 जण कोरोनामुक्त, जिल्ह्यात गेल्या चार दिवसात 824 नवे रुग्ण, सध्या 1276 रुग्णांवर उपचार सुरु

  • 27 Feb 2021 04:51 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात पुढील 7 दिवस संचार बंदी वाढवली

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुढील 7 दिवस संचार बंदी वाढवली. अमरावती, अचलपूर ,अंजनगाव सूर्जी शहर कंटेन्मेंट झोन घोषित, या 3 शहरात लॉकडाऊन दि. ८ मार्चपर्यंत राहणार, जीवनावश्यक वस्तू दुकाने वेळ तशीच राहणार, त्यानंतरची स्थिती पाहून पुढील निर्णय घेणार.

  • 27 Feb 2021 04:29 PM (IST)

    संजय राठोड यांची चौकशी सुरू, मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील : एकनाथ शिंदे

    संजय राठोड यांची चौकशी सुरू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. कोरोना अजून संपलेला नाही. सर्वांनी मुख्यमंत्र्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मास्क घातला पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे आंदोलन करताना नियम पाळले पाहिजे .करोनामधल्या काळात कमी झाला होता. दुर्दैवाने त्याचा प्रमाण आता वाढताना दिसत आहे ही चिंतेची बाब आहे : एकनाथ शिंदे

  • 27 Feb 2021 04:23 PM (IST)

    शहापूरमध्ये महावितरणची तब्बल 3 कोटी रुपये थकबाकी

    कोरोना काळात शहापूर मध्ये महावितरणची थकबाकी तब्बल 3 कोटी रुपये, थकबाकी मध्ये सर्वसामान्य नागरिकांपेक्षा शासकीय कार्यालय, दवाखाने, नळ पाणी योजनां यांचीच थकबाकी 3 कोटी रुपये आपण आपली थकित वीज बिल मार्च 21 च्या पहिल्या 7 दिवसात भरून महावितरण कार्यालयास सहकार्य करावे. अन्यथा वीज कनेक्शन कट केले जाईल, व कटकेलेले कनेक्शन जर कुणी स्वतः पुन्हा आपल्या हाताने जोडले तर त्या ग्राहकांवर महावितरण मार्फत फोसदारी गुन्हा दाखल केला जाईल. अशी वरनिंग शहापूरचे महावितरणचे या अभियंता अविनाश कटकवार यांनी दिला आहे.

  • 27 Feb 2021 03:29 PM (IST)

    आम्हाला सरकार द्या मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर : आम्हाला सरकार द्या मराठा समाजाचे आरक्षण टिकवून दाखवतो, येणाऱ्या सुनावणीमध्ये तरी सरकार पूर्ण तयारी करून उतरेल अशी अपेक्षा करूया, सांगली महापालिकेत सत्ताधारी पक्षांनी घोडेबाजार करण्यात आला, आम्ही शांत बसलो, आमच्या कार्यकर्त्यांना शांत केलं अन्यथा दंगली उसळला असत्या, वाईट गोष्टींना प्रोत्साहन देत असतील तर ओके, संबधित नगरसेवकांना कारवाईची नोटीस पाठवली जाईल – चंद्रकांत पाटील

  • 27 Feb 2021 03:08 PM (IST)

    सोमवारपर्यंत राठोड यांचा राजीनामा घ्या – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर- सोमवारपर्यंत राठोड यांचा राजीनामा घ्या, राजीनामा घेऊन चौकशी झाली नाही तर विधानसभेत तोंड उघडू देणार नाही – चंद्रकांत पाटील

  • 27 Feb 2021 03:08 PM (IST)

    चित्राताई वाघिणी सारख्या त्या घाबरणार नाहीत – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर – चित्रा वाघ यांना आताच कसा त्रास द्यायला सुरुवात होतो, अनेक मंत्र्यांवर गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर कारवाई का नाही, चित्राताई वाघिणी सारख्या त्या घाबरणार नाहीत, चौकशीची भीती दाखवून त्यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नाही – चंद्रकांत पाटील

  • 27 Feb 2021 03:07 PM (IST)

    पोलिसांनी ऑडिओ क्लिपमध्ये राठोड यांच नाव नाही हे पाहिलं का? – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर – वानवडी पोलिसांनी काय काय तपास केला हे एकदा जाहीर करावं, पोलिसांनी ऑडिओ क्लिपमध्ये राठोड यांच नाव नाही हे पाहिलं का?

  • 27 Feb 2021 03:04 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या की हत्या या बाबत आजून ही खुलासा होत नाही – चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर – गेल्या काही महिन्यात मंत्र्यांशी संबधित गुन्हे दाखल होत आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात काहीच भूमिका घेत नाहीत, पूजा चव्हाण आत्महत्या की हत्या या बाबत आजून ही खुलासा होत नाही – चंद्रकांत पाटील

  • 27 Feb 2021 02:23 PM (IST)

    वाशिममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    वाशिम : वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील सोनखास परिसरातील मृत आढळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा आला अहवाल, लागण आढळलेला कुक्कुट फार्म आणि 1 किलो मीटर परिसरातील कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी दिले आदेश

  • 27 Feb 2021 02:21 PM (IST)

    खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली

    भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील आज कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले, त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करुन ते पाटीदार भवन हॉल येथील कार्यक्रमासाठी गेले, यादरम्यान पाटील यांच्या ताफ्यातील स्कॉर्पियो गाडी रस्त्यावर उभी असताना गाडीने अचानक पेट घेतला

  • 27 Feb 2021 12:13 PM (IST)

    आज जर राठोड सुटला, तर उद्या आणखी उद्योग करेल – चित्रा वाघ

    संजय राठोडवर कारवाई व्हावी अस पूजाच्या परिवाराला वाटत नाही का?, आम्ही कशाला तिची बदनामी करू?, आज जर राठोड सुटला, तर उद्या आणखी उद्योग करेल, पूजाच्या परिवारावर 100 टक्के दबाव, साधे माणस आहेत ते, एवढ्या बलाढ्य शक्तीविरोधात कसे लढणार- चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 12:02 PM (IST)

    मी गप्प बसणार नाही – चित्रा वाघ

    माझ्यावर कितीही अटॅक केले तरी मी शांत राहणार नाही, मी गप्प बसणार नाही, जोपर्यंत संजय राठोडांवर कारवाई होणार नाही, तोपर्यंत मी रोज बोलेण – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 12:00 PM (IST)

    पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यावर मला विश्वास – चित्रा वाघ

    पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेब यांच्यावर मला विश्वास, कॉन्फरन्सवर कॉलवरील हा मोबाईल नंबर कोणाचा आहे – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:58 AM (IST)

    तुम्हाला पुरुन उरले नाही तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही – चित्रा वाघ

    तुम्हाला सगळ्यांना मीच पुरुन उरणार आहे, नाही तुम्हाला पुरुन उरले नाही तर चित्रा वाघ नाव सांगणार नाही, तुमच्या सोबत 30 वर्ष राहिले आहे – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:57 AM (IST)

    न्याय व्यवस्था जिवंत आहे, सरकार सारखी मुर्दाड नाही – चित्रा वाघ

    माझ्या घरी जाऊन नोटीस देण्याचं काम एसीबीने दिली, माझ्या नवऱ्याला व्हॉट्सअपवर नोटीस, माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल झाला हे कळायला मला अधिकार नाही का, माझ्या नवऱ्याला हररेश केलं जातंय, या केसमध्ये त्यांना किशोर वाघ सह चित्रा वाघ हवी होती, रोज माझ्या नवऱ्या बोलवलं जातंय आणि टॉर्चर केलं जातंय, गुन्हा दाखल केल्याचा गम नाही, न्याय व्यवस्था जिवंत आहे, सरकार सारखी मुर्दाड नाही, तुमच्या 2011 पासूनच्या केसेसचं काय? – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:56 AM (IST)

    2011 पासूनच्या कित्येक केसेस एसीबीच्या अद्याप पेंडिंग – चित्रा वाघ

    2011 पासूनच्या कित्येक केसेस एसीबीच्या अद्याप पेंडिंग, विचारुन घ्या, अजुनही कोणावर गुन्हा नाही, या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे ज्याने पैसे घेतले तो गाधी रुग्णालयाचा सुप्रिटेंडेंट डॉ. गजानन भगत तो मुख्य आरोपी, त्याची अजून चौकशी सुरु आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा, वाह गृहमंत्री तुम्हाला तीनवेळा सॅल्यूट  – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:53 AM (IST)

    पवार साहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय – चित्रा वाघ

    पवार साहेब आज मला तुमची खूप आठवण येतेय, ५ जुलै २०१७ ला गुन्हा दाखल झाला आणि ७ जुलैला मला साहेबांनी बोलावून घेतलं, एफआयआरची कॉपी माझ्याकडे मागितली, साहेबांनी सगळं वाचलं, मला म्हणाले यात तुझा नवरा कुठेच नाही, त्यानंतर केस झाली, अजूनही न्यायालयात केस सुरु, आता एसीबी सर्वाचा एफआयआरच्या कॉपी देत आहेत, तर कृपया सर्वांना कळू द्या की माझ्या नवऱ्याने पैसे घेतले की नाही ते, माझा नवरा होता त्या ठिकाणी की नाही, माझा नवरा तिथे नव्हता, तरीही त्याच्या नावाने न्यायालयात केस,  –

  • 27 Feb 2021 11:49 AM (IST)

    माझ्या पतीवर गुन्हा दाखल केला, हे मला पत्रकारांकडून कळालं – चित्रा वाघ

    माझ्या पतीवर गुन्हा दाखल केला, हे मला पत्रकारांकडून कळालं, काय केलं माझ्या पतीने, आमचे काही कारखाने नाहीत, गुन्हा दाखल केल्याचा साधा नोटीसही नाही, चौकशीसाठी स्वत: घरी येऊन नोटीस दिली मग आता काय लोक संपले पोलिसांचे, व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठवली आहे – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:47 AM (IST)

    मॉर्फ फोटोचा मला काहीही फरक पडत नाही – चित्रा वाघ

    मॉर्फ फोटोचा मला काहीही फरक पडत नाही, फोन येत आहेत, त्रास देत आहेत, धमक्यांचे फोन येत आहेत, आम्हाला त्रास दिला जातोय, पण मी थांबणार नाही – चित्रा वाघ

  • 27 Feb 2021 11:45 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे – चित्रा वाघ

    मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, तुमच्यावरचा दबाव तुम्ही झिडकारुन लावाल याची आम्हाला खात्री आहे, तुम्ही इतरांसारखे नाही, हिच तुमची छवी आहे

  • 27 Feb 2021 11:43 AM (IST)

    हे व्यभिचाराच उदात्तीकरण – चित्रा वाघ

    पुरोगामी माहाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब, आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच?, पण तरी आम्ही विचारतच राहू, व्यभिचाराच उदात्तीकरण

  • 27 Feb 2021 11:43 AM (IST)

    धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव? – चित्रा वाघ

    मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, साहेब तुमच्यावर प्रेशर नाही ना?धनंजय मुंडेंना सोडलं, आता राठोडला सोडण्यासाठी दबाव नाही ना?, मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या, मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार आणि बोलतच राहणार

  • 27 Feb 2021 11:41 AM (IST)

    पोलिसांच्या ताब्यात असताना अरुण राठोडला का सोडलं, प्रत्यक्षदर्शींना सोडून का दिलं – चित्रा वाघ

    पोलिसांच्या ताब्यात असताना अरुण राठोडला का सोडलं, प्रत्यक्षदर्शींना सोडून का दिलं, त्याचा मोबाईल जप्त का नाही केला, कंट्रोलला फोन केल्यानंतर दुसऱ्या नंबर वर फोन करायला सांगण्यात येत, म्हणे आम्हाला नाव सांगता येत नाही, या केसमध्ये इतके योगायोग, यवतमाळच्या हॉस्पिटलमध्ये अबोर्शन झालं त्या दिवशी डॉक्टर सगळं करुन निघून गेला, त्यानंतर डॉक्टर गायब झाला, लगेच राठोडच्या घरात चोरी झाली, आता कोणी मला सांगितलं की अरुण राठोडला कोरोना झाला तरी मला आश्चर्य वाटणार नाही

  • 27 Feb 2021 11:39 AM (IST)

    10 लाख लोक आणले म्हणजे तुम्ही निर्दोष होता का? – चित्रा वाघ

    10 लाख लोक आणले म्हणजे तुम्ही निर्दोष होता का, आम्हाला मारुन टाकायच्या धमक्या द्या, म्हणून तुम्ही निर्दोष होत नाही

  • 27 Feb 2021 11:38 AM (IST)

    षंढासारखं बसून राहणार हे सरकार नामर्द सरकार – चित्रा वाघ

    षंढासारखं बसून राहणार हे सरकार नामर्द सरकार, मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षा, सातत्याने आम्ही बोलतोय, साधा एफआयआर होत नाही, खुर्चीत बसल्यावर एवढी वाईट परिस्थिती, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं

  • 27 Feb 2021 11:37 AM (IST)

    रेणू शर्मावर गुन्हा दाखल का केला नाहीत? – चित्रा वाघ

    धनंजय मुंडे प्रकरणी आम्ही तोंडघाशी पडला आहात असं म्हणण्यात आलं, मग का रेणू शर्मावर गुन्हा दाखल केला नाहीत, सरकार तुमचं, पोलीस तुमचे, गुन्हा दाखल करायची हिम्मत दाखवा, मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी बसला

  • 27 Feb 2021 11:36 AM (IST)

    ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोडचा हे शेंबडं पोरगंही सांगेल – चित्रा वाघ

    ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोडचा हे शेंबडं पोरगंही सांगेल, काहीही कारवाई नाही, तक्रार नाही, कोण आहे यांचा बाप हे सर्व करवून घेणारा, मी याआधी या तिन्ही पक्षाची एकी कुठेही पाहिली नाही,  एकी कुठे झाली तर बलात्काऱयाला वाचवण्यात झाली, एकाने खुर्ची वाचवली, दुसरा त्याच मार्गावर चालला आहे,

  • 27 Feb 2021 11:32 AM (IST)

    पुण्याच्या पोलिसांकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, ढळढळीत पुरावे असताना बलात्काऱ्याला वाचवलं जातंय – चित्रा वाघ

    पुणे कंट्रोल रुमने कोणाचा नंबर दिला, कोणत्या अधिकाराने दिला, तिसरा माणूस ज्याने पुन्हा एकदा सगळं वदवून घेतलं तो माणूस कोण होता, पुण्याच्या पोलिसांकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, ढळढळीत पुरावे असताना बलात्काऱ्याला वाचवलं जातंय, ही काय शिवशाही.. छे.. ही तर मोगलाई.., महाराजांचं नाव घेऊन सत्तेत आलात, मी मुख्यमंत्र्यांना ट्विट केलं, महाराजांप्रमाणे काम करा आणि राठोडला हाकला

  • 27 Feb 2021 11:31 AM (IST)

    चित्रा वाघ यांच्याकडून अनेक खुलासे

    अरुण राठोडने पूजाच्या मृत्यूच्या दिवसी 100 नंबरवर कॉलकरुन सर्व कबुली दिली, यात माझा कुठलाही हात नाही, हे सर्व संजय राठोड यांच्यामुळे असं त्याने सागितलं, त्यानंतर त्याला समोरच्या कंट्रोल रुमच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने एक नंबर दिला, तो 9146870100 हा नंबर, त्यांनी त्याला या नंबरवर कॉल करायला सांगितलं, या नंबरवर सकाळी ८.४० मि. फोन गेला, मग अरुण राठोडने पुन्हा सर्व कबुली या क्रमांकावरील व्यक्तीला दिली, त्यानंतर अरुणला थांबवण्यात आलं, त्यानंतर या क्रमांकावरुन तिसऱ्या व्यक्तीला कॉन्फरन्स कॉलवर घेतलं, त्या कॉलवर पुन्हा एकदा सर्व सांगण्यात आली, आता ते दोन व्यक्ती कोण

  • 27 Feb 2021 11:24 AM (IST)

    पूजाच्या मोबाईलवर संजय राठोडांचे 45 मिस्ड कॉल

    पूजाच्या मोबाईलवर संजय राठोडांचे 45 मिस्ड कॉल, तो मोबाईल पोलिसांकडे आहे, त्याबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिलेली नाही, आपल्याला फक्त अंदाज बांधायचे आहेत,कारण मराहाष्ट्रातील जनतेला काहीही माहिती नाही की पूजा चव्हाण प्रकरणात नेमकं काय झालं

  • 27 Feb 2021 11:23 AM (IST)

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांची नाशकात पत्रकार परिषद

    पूजा चव्हाण प्रकरणी एफआयआर का नाही

    संजय राठोड सारख्या बलात्काऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न

    सरकारकडे काहीही उत्तर नाही

    पोलिसांकडे आमच्या प्रश्नाचं काहीही उत्तर नाही

  • 27 Feb 2021 10:53 AM (IST)

    मुलुंड टोलनाक्यावर भाजपचं चक्काजाम आंदोलन, मोर्चेकरी महिला पोलिसांच्या ताब्यात

    भाजपचं आज संजय राठोड विरोधात राज्यभर चक्काजाम आंदोलन, मुलुंड टोलनाक्यावर भाजपचं चक्काजाम आंदोलन, मोर्चेकरी महिला पोलिसांच्या ताब्यात

  • 27 Feb 2021 10:34 AM (IST)

    राज ठाकरे शिवाजी पार्कात कार्यक्रमस्थळी दाखल, राज यांनी मास्क लावलेला नाही

    मुंबई  : राज ठाकरे शिवाजी पार्कात कार्यक्रमस्थळी पोहोचले

    राज ठाकरे यांनी आजही मास्क लावलेला नाही

    मराठी भाषादिनानिमित्त मनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीम

    मनसेच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. परंतु मनसेने आक्रमक होत कार्यक्रम घेणारच, असा पवित्रा घेतलाय.

    सध्या, शिवाजी पार्कात मनसे कार्यकर्त्यांची गर्दी आहे.

  • 27 Feb 2021 10:20 AM (IST)

    चित्रा वाघ यांच्या पतींविरोधात गुन्हा, लाचलुचपत विभागाची कारवाई

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी 2016 मध्ये एका प्रकरणात लाच घेताना अटक झाली होती.

  • 27 Feb 2021 10:00 AM (IST)

    गुहागरमधील भातगावमध्ये लागलेल्या वणव्यात आबा, काजूच्या अनेक बागा भस्मसात

    रत्नागिरी – गुहागर तालुक्यातील भातगाव मध्ये लागलेल्या वणव्यात आबा, काजूच्या अनेक बागा आगीत भस्मसात, बागायतींसह शेतीसाठी जमा केलेले गवत आणि लाकडेही आगीच्या भक्ष्यस्थानी, महावितरणच्या तारेचा शॉर्ट सर्किटमुळे लागला वणवा, भातगावसह परिसरातल्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, ऐन हंगामात हाता तोंडाशी आलेला घास वणव्यात खाक झाल्यामुळे शेतकरी हवालदिल

  • 27 Feb 2021 09:59 AM (IST)

    नवी मुंबई मनपा निवडणूक अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तारखेस मुदतवाढ

    नवी मुंबई मनपा निवडणूक अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या तारखेस मुदतवाढ, राज्य निवडणूक आयोगाची मुदतवाढ, मतदार यादी घोळ असल्याच्या एकूण 3697 हरकती, प्रसिद्ध यादीत 90 हजार बोगस नावं; राष्ट्रवादी आणि भाजपचा आरोप, नव्याने फेर मतदान याद्या तयार केल्या जात नाही ती पर्यंत निवडणूक नकोच- शशिकांत शिंदे

  • 27 Feb 2021 08:32 AM (IST)

    पुणे जम्बो कोव्हिड सेंटरच कंत्राट उद्या संपणार, जम्बो कोव्हिड सेंटरचा निर्णय अजित पवारांनी स्थानिक प्रशासनावर सोपवला

    पुणे जम्बो कोव्हिड सेंटरच कंत्राट उद्या संपणार, जम्बो कोव्हिड सेंटरचा निर्णय अजित पवारांनी स्थानिक प्रशासनावर सोपवला, स्थानिक प्रशासनानं निर्णय घेण्याच्या दिल्या सूचना, महापालिका ,पीएमआरडीए ,आणि राज्य सरकार पुन्हा जम्बो सेंटर सुरू करणार का, आज प्रशासनाला निर्णय घेणं बंधनकारक, उद्या जम्बोचं सीओईपीच्या मैदानाचंही कंत्राट संपणार, प्रशासनानं निर्णय घेऊन कळवा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत सूचना, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती, जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू होणार का

  • 27 Feb 2021 08:31 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रकरनाणे जोर धरला

    मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या प्रकरनाणे जोर धरला, अधिवेशना पूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे, भाजपा महिला पदाधिकारी आज संपूर्ण राज्यात याबाबत आंदोलन छेडणार आहेत, संजय राठोड राहत असलेल्या चर्चगेट येथील छेडा सदन या इमारतीच्या समोर महिला सुरक्षा पथका सह पोलिसांचा बंदोबस्त ही  तैनात करण्यात आला आहे
  • 27 Feb 2021 08:28 AM (IST)

    सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टंसिंग फज्जा

    सोलापूर – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोशल डिस्टंसिंग फज्जा, भाजीपाला खरेदी,शेतीमाल लिलावासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती तोबा गर्दी, बाजारात व्यापारी आणि नागरिक फिरत आहेत विनामास्क, प्रशासनाच्या अहवानाला कृषी उत्पन्न बाजार समितीत केराची टोपली

  • 27 Feb 2021 08:28 AM (IST)

    औरंगाबादेत 247 रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा 49,813 वर

    औरंगाबाद : औरंगाबादेत 247 रुग्णांची वाढ, रुग्णांचा आकडा पोचला 49813 वर, सध्या रुग्णालयात 1691 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर काल दिवसभरात 2 कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 2164 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

  • 27 Feb 2021 08:00 AM (IST)

    नाशकात बेकायदा गौण खनिज उपसा करणाऱ्या 8 जणांची मालमत्ता शासनजमा

    नाशिक – बेकायदा गौण खनिज उपसा करणाऱ्या 8 जणांची मालमत्ता शासनजमा, बँक खाते गोठवून, लवकरच होणार मालमत्तेचा लिलाव, थकीत 3 कोटींची दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी बँक खाते गोठवले, बेकायदा गौण खनिज उपसा आणि साठवणुकीच्या गोरखधंदा जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असल्याचे आलंय समोर

  • 27 Feb 2021 07:59 AM (IST)

    भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत आणखी वाढ, गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशीला सुरुवात

    औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या अडचणीत आणखी वाढ, गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशीला सुरुवात, घोटाळा प्रकरणातील चौकशीसाठी लेखपरिक्षकांची नेमणूक, प्रादेशिक साखर संचालकांनी केली लेखपरिक्षकांची नेमणूक, साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणी तीन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश, गंगापूर साखर कारखान्यात 15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा प्रशांत बंब यांच्यावर आरोप

  • 27 Feb 2021 07:58 AM (IST)

    पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात पुन्हा मोठं कृषी संकट, वर्षभरात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात तब्बल 290 शेतकरी आत्महत्या

    पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात पुन्हा मोठं कृषी संकट, वर्षभरात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात तब्बल 290 शेतकरी आत्महत्या, यंदा जानेवारी महिन्यात 22 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन, नापिकीने घेतला 290 शेतकऱ्यांचा जीव, यंदा कापूस, सोयाबीन, तूरीच्या नापिकीने शेतकरी मोठ्या संकटात, पूर्व विदर्भात गेल्या 10 वर्षांत 4612 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन

  • 27 Feb 2021 07:56 AM (IST)

    आरोपी न्यायालयाच्या संरक्षणास आणि जामीनास मात्र नाही, नागपूर खंडपीठातील जजला मॅसेज

    उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील जजला व्हॅाट्सअॅप मॅसेज, ‘आरोपी न्यायालयाच्या संरक्षणास आणि जामीनास मात्र नाही’, अशा आशयाचा व्हॅाटसप मॅसेज न्यायमूर्तींना पाठवला, न्यायालयाने व्यक्त केली तीव्र नाराजी,  मॅसेजची चौकशी करुन पाच मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

  • 27 Feb 2021 07:30 AM (IST)

    महावितरणच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद; 23 दिवसांत 579 कोटींचा वीजबिल भरणा

    पुणे – वीजबिलांच्या अभूतपूर्व थकबाकीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरण कंपनीच्या आवाहनाला पुण्यासह पश्चिाम महाराष्ट्रातील अनेक ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. या विभागातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ४ लाख ५४ हजार थकबाकीदार वीजग्राहकांनी गेल्या २३ दिवसांमध्ये ५७९ कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

  • 27 Feb 2021 07:00 AM (IST)

    पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवडाभर पुढे ढकलण्यात आला

    पुणे – शहरातील सध्याची कोरोनाची स्थिती पाहाता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) आठवडाभर पुढे ढकलण्यात आला, पिफला येत्या 4 मार्चपासून प्रारंभ होणार होता, मात्र आता पिफ 11 ते 18 मार्च दरम्यान होणार

  • 27 Feb 2021 06:59 AM (IST)

    पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेली गावे ही पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

    पुणे – जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत असल्याने कोरोनामुक्त झालेली गावे ही पुन्हा कोरोनाच्या विळख्यात, सध्या जिल्ह्यात नव्याने ७२१ कंटेन्मेंट झोन, तर कोरोनाचे १ हजार ८०५ सक्रिय रुग्ण

  • 27 Feb 2021 06:55 AM (IST)

    पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच दिवस तर कोल्हापूर-नागपूर मार्गावर आठवड्यातून दोन वेळा विशेष रेल्वे

    पुणे – पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच दिवस तर कोल्हापूर-नागपूर मार्गावर आठवड्यातून दोन वेळा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे, 1 मार्चपासून या गाड्या सुरु होतील

  • 27 Feb 2021 06:24 AM (IST)

    इचलकरंजीत डॉक्टरवर प्राणघातक हल्ला आणि गाडीची तोडफोड

    इचलकरंजी – शहरातील लगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला व गाडीची केली तोडफोड, कबनूर रुई रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याजवळ काही अज्ञातांनी बने डॉक्टर यांच्यावर केला प्राणघातक हल्ला, हल्ल्यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल, कबनूर रोडवर काही काळ वाहतूक विस्कळीत डॉक्टर वर हल्ला झाल्यामुळे भीतीचे वातावरण

  • 27 Feb 2021 06:22 AM (IST)

    भ्रष्टाचार म्हणजे काय?- सामना अग्रलेख

    सत्तेतून पैसा, पैशातून पुन्हा सत्ता या चक्रात आज सगळेच सापडले आहेत व पैसा जमवण्याचा मार्ग यंत्रणेतले अधिकारीच दाखवत असतात. निवडणूक हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे श्री बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत, ही भ्रष्ट गंगोत्री साफ करणारे एकच शेषन निर्माण झाले. बाकी सब घोडे बारा टके! भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचा भाग झाला. तुम्ही-आम्ही काय करणार?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे

  • 27 Feb 2021 06:19 AM (IST)

    आदेश बांदेकर यांची ‘माथेरान पर्यटन राजदूत’ म्हणून निवड

    आदेश बांदेकर यांची ‘माथेरान पर्यटन राजदूत’ म्हणून निवड, गिरिस्थान नगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत, ”माथेरान पर्यटन राजदूत’ म्हणून निवड करण्यात आली

Published On - Feb 27,2021 10:00 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.