LIVE | संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज, सूत्रांची माहिती
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
भुसावळमध्ये 35 वर्षीय महिलेवर बलात्कार, जळगाव जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या
मुक्ताईनगर (जळगाव) : भुसावळ येथे आज 35 वर्ष महिलेवर बलात्कार, तर काल एका 17 वर्षीय मुलीवर मुक्ताईनगर तालुक्यात बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ होत आहे.
-
संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनावर शरद पवार नाराज, सूत्रांची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राठोड यांच्या पोहरादेवीतील शक्तिप्रदर्शनावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त
-
-
पुण्यात 661 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
पुणे : दिवसभरात 661 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात 358 रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत 7 रुग्णांचा मृत्यू. 3 रूग्ण पुण्याबाहेरील. – 201 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १९८९५३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३२०१. – एकूण मृत्यू -४८३४. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९०९१८. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४६०६.
-
भिवंडी कोरोना अपडेट
भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये करोना स्थिती अजून आटोक्यात
भिवंडी महानगरपालिका व तालुका ग्रामीण क्षेत्र एकत्रित आकडेवारी
आज वाढलेले रुग्ण – 03 आज झालेले मृत्यू – 00 आज बरे झालेले – 00
एकूण रुग्ण – 14004 एकूण मृत्यू – 00582 एकूण बरे झालेले – 13374 एकूण उपचार घेत असलेले – 00048
-
नागपूर कोरोना अपडेट
नागपूर कोरोना अपडेट –
नागपुरात आज 691 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
तर 477 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 144534
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 133775
एकूण मृत्यू संख्या – 4291
-
-
लातूरात एका शाळेतील 45 विदयार्थी कोरोना पॉझिटिव्ह
लातुर- शहरातील midc भागातल्या शाळेचे एकूण 45 विदयार्थी कोरोना पॉझिटिव्ह, काल 40 विद्यार्थ्यांना लागण, तर आज आढळले 5 विद्यार्थी पॉझिटिव्ह, 366पैकी 360 विद्यार्थ्यांची केली तपासणी, 6 विद्यार्थी होते अनुपस्थित, शाळा पुढील 10 दिवस बंद ठेवण्याच्या सूचना, मनपाच्या आरोग्य विभागाचे पथक घेतेय बाधित मुलांची काळजी, शिक्षक आणि वसतिगृहाच्या मेस मधील कर्मचा-यांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह..
-
परभणी कोरोना अपडेट
परभणी कोरोना अपडेट
आज दिवसभरात 29 रुग्णांची भर 10 रुग्णांनाचा डिस्चार्ज एकूण रुग्ण संख्या 8 हजार 319 आतापर्यंत डिस्चार्ज 7 हजार 793 एकूण मृत्यू 321 उपचार सुरू असलेले रुग्ण 205
-
पुण्यात दिवसभरात 661 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
पुण्यात दिवसभरात 661 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ, तर दिवसभरात ३५८ रुग्णांना डिस्चार्ज, पुण्यात करोनाबाधित 7 रुग्णांचा मृत्यू, यामधील 3 रूग्ण पुण्याबाहेरील, सध्या 201 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू, पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 198953 वर, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 3201 वर, आतापर्यंत एकूण 4834 रुग्णांचा मृत्यू, आजपर्यंतच एकूण 190918 रुग्णांना डिस्चार्ज
-
गर्दी जमली संजय राठोडांमुळे कारवाई मात्र महंतावर, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
वाशिम : वाशिम पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड येणार होते. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून वाशिम पोलिसांनी येथील महंतांना नोटीस दिल्या होत्या. मात्र तरीही बंजारा समाज बांधव मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे आल्यानं कायद्याचा भंग झाला. त्यामुळे मानोरा पोलिसांत या महंतावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासनाने याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे….
-
रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
रत्नागिरी : जिल्ह्यात संचारबंदी लागू, जिल्हाधिकार्यांचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार संचारबंदी, संचारबंदीमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या
-
अमरावतीत कोरोनाचा स्फोट, दिवसभरात 992 रुग्णांची नोंद
अमरावती कोरोना अपडेट
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट, आज दिवसभरात सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आज सकाळपासून आढळले 992 कोरोना बाधित रुग्ण
आतापर्यंत जिल्ह्यात आढळले 31123 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत 26758 कोरोना बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात
3894 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत 471 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
-
राज्यात नव्या 6218 कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा, राज्यात नव्या 6218 रुग्णांची नोंद, तर 51 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
पुणे पोलिसांचा धडाका, मास्क न घालणाऱ्या 2 लाख 28 हजार जणांवर कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची शहरात धडक कारवाई, आज दिवसभरात ९०२ जणांवर मास्क न घातल्याने कारवाई, दिवसभरात ४ लाख ४६ हजार दोनशे रुपये दंड वसूल, तर आतापर्यंत एकूण दोन लाख २८ हजार ५६० जणांवर मास्कची कारवाई, आतापर्यंत एकूण ११ कोटी सहा लाख रुपयांचा दंड वसूल.
-
नियम सर्वांना सारखे, पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई दि २३: वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत
आज राज्यातही कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे एका बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.
मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
-
शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा, कोरोना संदर्भात बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. कोरोना रुग्णांची वाढ, लॉकडाऊन याबाबतच्या चर्चेसाठी शरद पवार- उद्धव ठाकरेंची बैठक
-
हिंगोलीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढला, 38 जणांना लागण
हिंगोली : आज 38 जणांना कोरोनाची लागण, तर एका 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दिवसभरात 3 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हिंगोलीतील करोनाबधितांची संख्या 3954 इतकी झाली आहे. त्यापैकी 3755 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सद्यस्थितीत 140 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
बुलडाण्यातील उर्वरित 8 नगरपालिकांच्या हद्दीत लॉकडाऊन, सैलानी यात्रेवरही बंदी
बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातील उर्वरित 8 नगरपालिकांच्या हद्दीत आज सायंकाळी ६ वाजेपासून लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शहरी भागातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना आज सांयकाळी 6 पासून 1 मार्च रात्री ८ पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावर्षी २५ मार्चपासून सुरु होणाऱ्या सैलानी यात्रेवरही जिल्हा प्रशासनाने बंदी घातल्याची माहिती दिली आहे.
-
बीडच्या एसपी ऑफिससमोर डोकं फोडून घेतल्याने तरुण रक्तबंबाळ
बीड: एसपी ऑफिससमोरच युवकाने डोकं फोडून घेतलं, भररस्त्यात तरुण रक्तबंबाळ, कारण अद्याप अस्पष्ट युवक मनोरुग्ण असल्याची शक्यता, पोलिसांनी युवकाला घेतलं ताब्यात
-
शिर्डी साईदर्शनाला मर्यादा, दिवसभरात केवळ 15 हजार भाविकांना दर्शन
साईदर्शनाला आता मर्यादा. आता सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंतच साईदर्शन… पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भाविकांना नो एंट्री … रविवार,शनिवार , गुरूवार आणि सुट्टयांमध्ये ऑनलाईन पास घेणं बंधनकारक… शिर्डीतील ऑफलाईन पास काऊंटर गुरूवार , शनिवार , रविवार आणि सुट्टीच्या दिवशी राहणार बंद… दिवसभरात केवळ पंधरा हजार भाविकांनाच दर्शन.. दर्शन रांगेतील भक्तांपैकी 150 ते 200 भक्तांची होणार दररोज कोरोना टेस्ट.. दर गुरूवारची साईपालखी देखील बंद… कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संस्थान प्रशासन अलर्ट… ऑनलाइन पास www.sai.org.in या वेबसाइट वरून घेण्याच आवाहन….
-
यवतमाळ कोरोना अपडेट
यवतमाळ कोरोना अपडेट
यवतमाळमध्ये आज कोरोनाचे 246 जण पॉझिटिव्ह रुग्ण 2 जणांचा मृत्यू, तर 158 जण कोरोनामुक्त
आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 16501
सद्यस्थितीत 1138 रुग्णांवर उपचार सुरु
14913 जण कोरोनामुक्त 450 जणांचा मृत्यू
-
पालघरमधील सामूहिक विवाहसोहळा रद्द, राज ठाकरेंचे आदेश
पालघर : विक्रमगड येथे 26 फेब्रुवारी रोजी होणारा सामूहिक लग्न सोहळा राज ठाकरे यांच्या आदेशनुसार रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे
-
ऐरोलीत विजेचा झटका लागून लहान मुलाचा जागीच मृत्यू
नवी मुंबई : ऐरोलीत विजेचा झटका लागून एकाचा लहान मुलाचा जागीच मृत्यू, परांची ट्रॉलीला हायटेन्शन वायर चिटकल्याने मुलगा आगीत भस्म, सिग्नलवर पिशव्या विकणाऱ्या एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू, 10 मिनिटात त्या मुलाचे शरीर जळून खाक, सर्व घटना Cctv कॅमेऱ्यात कैद, ऐरोली सेक्टर 8 शिवशंकर प्लाझा येथे घडली घटना
-
पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, दुपारपर्यंत 650 रुग्णांची नोंद
पुणे : पुण्यात मंगळवार दुपारपर्यंतच दिवसभरातील कोरोना रुग्णांची संख्या 650 च्या पुढे, यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता. काल 328 रुग्ण आढळ्याने काहीसा दिलासा, पण आज रुग्णसंख्येत वाढ
-
डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, 80 वर्षीय आजीबाईंचं मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न
डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, 80 वर्षीय आजीबाईंचं मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न, आजीबाईच्या प्रतिकाराने चोरटा पसार, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
-
लातुरातील शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोना
लातूर शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या एका शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत, 320 विद्यार्थी, 10 शिक्षक आणि 20 इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे
-
अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात यंदा भाविका विना संपन्न होणार गुरुप्रतिपदा सोहळा
सोलापुर – अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात यंदा भाविका विना संपन्न होणार गुरुप्रतिपदा सोहळा, 28 फेब्रुवारी रोजी होणारा माघी गुरुप्रतिपदा उत्सव भाविकांना विना होणार संपन्न, मंदिर समितीचे सदस्य आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार लघुरुद्र अभिषेक, आरती, कोरोना संसर्गाच्या नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय, अक्कलकोट शहरातून भजन, दिंड्यासह, सवाद्य निघणारा पालखी सोहळा आणि सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द
-
नाशकात दोन पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणि अटकेत असलेल्या आरोपींची काढण्यात आली धिंड
नाशिक – दोन पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आणि अटकेत असलेल्या आरोपींची काढण्यात आली धिंड, देवळाली परिसरत काढण्यात आली धिंड, देवळाली परिसरात शिवजयंती दिवसी रात्रीच्या सुमारास करण्यात आली होती दगडफेक, या घटनेत दोन पोलिस कर्मचारी झाले होते जखमी
-
माण तालुक्यातील दहीवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
सातारा : माण तालुक्यातील दहीवडी शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, दहीवडी शहरात मागील आठवडा भरात 70 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय, आजपासून दहीवडी शहरात पुढील आदेश येई पर्यंत कडक लाॅकडाऊन, अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचे प्रशासनाकडून आदेश
-
नाशकातील झाकीर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन रावते कोरोना पॉझिटीव्ह
नाशिक – झाकीर हुसैन रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नितीन रावते कोरोना पॉझिटीव्ह, पालिकेचे मुख्य कोव्हिड रुग्णालय असलेल्या झाकीर हुसेन रुग्णालयात ,रुगणांची संख्या झाली दुप्पट, 20 रुग्णांवरून आकडा पोहोचला थेट 45 रुग्णांवर, रावते यांच्या सह काही कर्मचारी देखील पॉझिटिव्ह असल्याची माहिती, रुग्ण वाढत असल्याने अतिरिक्त खाटांची व्यवस्था सुरू
-
नाशकात एकाच दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 226 जणांवर कारवाई
नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, एकाच दिवसात विना मास्क फिरणाऱ्या 226 जणांवर कारवाई, एकाच दिवसात तब्बल 50 हजारांचा दंड वसूल, सातपूर आणि नाशिकरोड विभागात सर्वाधिक कारवाई
-
नागपुरात रुग्ण संख्येत वाढ सुरुच, गेल्या 24 तासात 710 नवीन रुग्णांची भर
नागपुरात रुग्ण संख्येत वाढ सुरुच, गेल्या 24 तासात 710 नवीन रुग्णांची भर, तर 8 जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या पोहचली 6262 वर, सप्टेंबर नंतर काल मोठ्या प्रमाणात 9852 संशयितांची करण्यात आली तपासणी, एकूण रुग्ण संख्या 143843 झाली तर एकूण मृत्य ची संख्या 4283 वर गेली
-
पुण्यात दोन दिवसात मास्क न वापरणाऱ्या 1 हजार 713 जणांवर कारवाई
पुणे – दोन दिवसात मास्क न वापरणाऱ्या 1 हजार 713 जणांवर कारवाई, त्यांच्याकडून आठ लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल, तर आत्तापर्यंत एकूण 2 लाख 53 हजार जणांवर मास्क न वापरल्याची कारवाई
-
पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट सुरू, सुनील महाराज यांच्या वतीने करण्यात येतेय सजावट
पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिरात सजावट सुरू, सुनील महाराज यांच्या वतीने करण्यात येतेय सजावट, साडेअकरा वाजता मंत्री संजय राठोड याच मंदिरात घेणार आहेत दर्शन, जगदंबा मंदिरात होम हवन आणि पूजेची करण्यात येतेय तयारी, मंदिरात होम हवन आणि सजावटीला सुरुवात
-
नाशिकातील काही दिवसांपासून बंद केलेले जिल्हा परिषदेचे कोव्हिड केअर सेंटर पुन्हा सुरु
नाशिक – काही दिवसांपासून बंद केलेले जिल्हा परिषदेचे कोव्हिड केअर सेंटर पुन्हा सुरु, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने घेतला निर्णय, ग्रामीण भागात दररोज सरासरी 15-20 रुग्णांची वाढ, नाशिक, सिन्नर, निफाड मध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ, कोरोना विषाणूंमधे बदल होत असल्याने सिरो तपासणी करण्याचा निर्णय
-
नाशिक शहरात नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी
नाशिक – शहरात नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी, शहर पोलिसांकडून शहरात मध्यरात्री ठिकठिकाणी नाकाबंदी, रात्री 11 नंतर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची पोलिसांकडून तपासणी, अत्यावशक सेवा वगळून विनाकारण घर बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई, शहराच्या सातपूर, सिडको,पंचवटी,नाशिक रोड, द्वारका भागात नाकाबंदी करत कारवाई
-
नागपुरात कुख्यात गुंड निलेश नायडूची हत्या
नागपुरात आणखी एक हत्या, कुख्यात गुंड निलेश नायडूची हत्या, हत्या करून आरोपी फरार, सोनेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली घटना, रात्री ची घटना , पोलीस तपास सुरू
-
आज संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन नाही, पोहोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांचे वक्तव्य
“वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवीत आल्यावर सुरुवातीला जगदंबा मातेचं दर्शन घेणार आहे”, पोहोरादेवीतील सराव मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पुजेचं नियोजन, कोरोनामुळे लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन आम्ही केलंय, आज संजय राठोड यांचं शक्तीप्रदर्शन नाही, पोहोरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांचे वक्तव्य
-
नागपुरातील कुख्यात डॉन संतोष आंबेकर विरोधात 1863 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर
नागपुरातील कुख्यात डॉन संतोष आंबेकर विरोधात 1863 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर, कोट्यवधींची जमीन हडपून ती दुसऱ्याला परस्पर विकल्यानंतर मूळ जमीनमालकाला जीवे मारण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याची टोळी संचलित करणारा त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार, तसेच प्रवीण अशोकराव महाजन आणि नीतेश पुरुषोत्तम माने यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेने मकोकाचे दोषारोपपत्र (चार्जशिट) न्यायालयात दाखल केले, संतोष आंबेकर सध्या जेल मध्ये आहे
-
बाळासाहेब ठाकरे स्मारकाच काम जैसे थेच ठेवण्याचे औरंगबाद खंडपीठाचे आदेश
औरंगबाद – बाळासाहेब ठाकरे स्मारकाच काम जैसे थेच ठेवण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठाचे आदेश
-
नागपुरात मंगल कार्यालयात कोरोनाचे 8 रुग्ण, मंगल कार्यालय सील
नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला १० मार्च पर्यंत सील केले, या मंगल कार्यालयात कोरोनाचे ८ रुग्ण मिळाले होते, या मंगल कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचा-यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, यापैकी आठ कर्मचारी कोरोना पॉजिटीव्ह निघाले, यामध्ये स्वयंपाक काम करणा-या कर्मचा-यांचाही समावेश आहे, या परिसराला कन्टेनमेंट (विलगीकरण) क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे.
-
वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवी येथे साडे अकरा वाजता पोहोचणार
पोहोरादेवी येथे साडे अकरा वाजता पोहोचणार वनमंत्री संजय राठोड, पोहोरादेवीत बाँम्ब डिस्पोजल वॅन दाखल, पोलीस प्रशासन सज्ज, पोहोरादेवी येथे पोहोचणाऱ्या रस्त्यांवर बॅरीकेट्स लावण्याचं काम सुरु, अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांकडून घेतली जातेय काळजी
-
जळगाव जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जाहीर
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आजपासून रात्रीची संचारबंदी जाहीर केली, रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू, यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना बाहेर पडण्यासाठी निर्बंध असतील, संचारबंदीच्या पहिल्या दिवशी अपवाद वगळता सर्वच ठिकाणी नागरिकांनी रात्रीच्या संचारबंदीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले, आज संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, यापुढच्या काळात मात्र, नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे
-
पिंपरी-चिंचवड शहरात आज पासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्र संचारबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात आज पासून रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 28 फेब्रुवारीपर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे, त्यानुसार, पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली असून पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत, संचारबंदीच उल्लंघण करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगरात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिल्याच पाहिला मिळालं -
माघ वारी निमित्ताने विठ्ठल मंदिर फुलांनी सजले
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर बंद आहे, असे असले तरी आज माघी एकादशी असल्याने पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागांना झेंडू, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडू, निळ्या रंगाचा ब्ल्यू डिजे, पिवळा झेंडू, कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, ऑरकिड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे, यासाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे, विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे, विठुरायाचे आजचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे
Published On - Feb 23,2021 9:57 PM