LIVE | नागपूर -औरंगाबाद महामार्गावर वाहतूक जाम, ट्रक आणि दुचाकीचा अपघात

महाराष्ट्रासह जगभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट
LIVE NEWS & UPDATES
-
नवीन वर्षाच्या स्वागताचे बोर्ड हटवा, महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या सूचना
नवीन वर्षाच्या स्वागताचे बोर्ड लावले हटवायला, महसुलमंत्री बाळासाहेब थोरातांचे फोटो असलेले बोर्ड, संगमनेर बस स्थानकासमोरचे बोर्ड हटवले, कोणत्याही कार्यकर्त्याने माझेच नव्हे तर कोणाचेही फ्लेक्स लावून विद्रुपीकरण करू नये, सुंदर परिसर त्यामुळे विद्रुप होतोय, न.पा बस स्थानक आणि पोलीस प्रशासनालाही केल्या सूचना
-
एक रकमी FRP मिळावी या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाळला सरकारचा पुतळा
सांगली जिल्ह्यात ऊसाची एक राकमी FRP मिळाली तात्काळ मिळावी आणि केंद्र सरकारने लादलेल्या तीन जाचक अटी, कायदे रद्द करावी यासाठी आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी नांद्रे येथे ‘सरकारचा पुतळा जाळला ‘ आणि सरकारचा निषेध केला. तसेच जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर फुडील काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे ही शेट्टी इशारा दिला आहे.
-
-
नामांतर मुद्यात शिर्डीचे शिवसेना खासदार लोखंडे यांची उडी
नामांतर मुद्यात शिर्डीचे शिवसेना खासदार लोखंडे यांची उडी, औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्याच नामांतर करण्याची मागणी, अहमदनगर जिल्ह्याच अंबिका नगर नामांतर करावे, अनेक वर्षांपासून ही आमची मागणी, काँग्रेस विरोध करत असली तरी त्यांना योग्य बुद्धी होईल आणि दोन्ही जिल्ह्याच नामांतर होईल, सेना खासदार सदाशिव लोखंडे यांची मागणी
-
अजित पवार आणि फडणवीसांच्या कार्यक्रमात तणावपूर्ण वातावरण
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. या कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने येऊन घोषणा देऊ लागले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं.
-
फडणवीस आणि अजित पवार एका व्यासपीठावर असताना कार्यक्रमात गोंधळ
फडणवीस आणि अजित पवार एका व्यासपीठावर असताना कार्यक्रमात गोंधळ, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने, जोरदार घोषणाबाजीला सुरुवात
-
-
पुण्यात भाजप-NCP चे कार्यकर्ते आमने-सामने, कार्यक्रमात गोंधळ
पुण्यात भाजप-NCP चे कार्यकर्ते आमने-सामने, कार्यक्रमात गोंधळ झाल्याची माहिती
-
ज्या शहरात पिण्याचं पाणी व्यवस्थित वाढतं, ती शहर झपाट्याने वाढतात – अजित पवार
– ज्या शहरात पिण्याचं पाणी व्यवस्थित वाढतं, ती शहर झपाट्याने वाढतात
– काही शहरांना रेल्वेने पाणी द्यावे लावलं
– मी पण दोन चार दिवस पाहिलं त्याच त्याच बातम्या
– बातम्या दाखवलाय काही नसलं की ते हे दाखवणार
-
पुण्यात अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात
– पुणे वाढतय, लोकसंख्या प्रचंड वाढली
– साडेअठरा टीएमसी पाणी शहराला लागतय
– दोन लाख एकराला बारा महिने पुरेल एवढं पाणी पुणेकरांना देतोय
– अर्थात त्यात उपकार करत नाही, ती शहराची गरज आहे
– ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यावर पुण्याचे आठ आमदार, पंचायती समितीचे प्रतिनिधी सगळे मिळून बैठक घेऊ
– सगळे प्रश्न कोणतेही राजकारण न करता मार्गी लावू
– पुणेकर जेव्हा पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघरच चांगलं पाणी घेणार, तेव्हा खालच्या लोकांना खराब पाणी देण्याचा त्यांना अधिकार नाही
– त्यामुळं नदीत खराब पाणी सोडले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल
– नदी सुधार प्रकल्प, जायका प्रकल्प प्रभावीपणे राबविला पाहिजे
– पाण्यापासुन वीज निर्मिती करण्याचे काम टाटाने थांबवलं पाहिजे
-
वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला पेलवणारा नाही – देवेंद्र फडणवीस
– वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला पेलवणारा नाही
– पाण्याचा योग्य वापर करावा लागेल
– पाणी हे इकॉनॉमी कमोडिटी आहे
– जरी ते निसर्गाने दिल असलं तरी
– त्याचा योग्य वापर झाला पाहिजे
– पुण्याकडे राज्याची तिजोरी आहे त्यामुळं चिंता करायची गरज नाही
-
आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार – फडणवीस
पुण्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर, पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती, फडणवीसांचा टोला
– आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार – फडणवीस
– दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या
– विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे
– अलीकडच्या काळात प्रचंड शहरीकरण होत आहे
– सद्यस्थितीत शहरीकरण अपरिहार्य आहे
– महत्वाचे काय करत शहरीकरण मॅनेज करणं
– वाढत्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्राला पेलवणारा नाही
-
शिवसेनेने जर औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले नाही तर शिवेसनेने हिंदुत्व सोडावे – अंकुश कदम
शिवसेनेने जर औरंगाबादचे नाव संभाजीनगर केले नाही तर शिवेसनेने हिंदुत्व सोडावे. शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आहे. मराठा क्रांती मोर्चा, समनव्यक अंकुश कदम यांची टीका – संभाजीनगर नाव केले नाही तर महाराष्ट्रात आंदोलन केली जातील – ही आंदोलन आहेत ती गनिमी काव्याने केली जातील – काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतली आहे – क्रूर औरंगाबादहे नाव बदलण्यावर शिवप्रेमींनी मागणी केली आणि ते बदलण्यात येणार आहे – परंतु बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केले की नावात बदल होणार नाही – काँग्रेसच मूळ हे मुस्लिम असल्याने त्यांना खुश करण्याचा प्रयत्न आहे – त्यामुळे यांनी वरिष्ठांचे तळवे चाटणे बंद करा – या सरकारमध्ये शिवसेना हिंदुत्व म्हणून वावरत असतात. शिवसेनेला आता हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे – संभाजी नगर नाव करण्यात किती धाडस आहे हे सिद्ध होईल – सामनाचे संपादक संजय राऊत हे वारंवार म्हणतात की आम्हाला हिंदुत्व शिकवू नका तर आता त्यांना हिंदुत्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे – आमचं आरक्षण आहे ते दिल जात नसेल तर आम्ही हिसकावून घेईन – ओबीसी समाजाच्या आरक्षणांतून जर आरक्षण दिले तर आम्ही घेणार आहोत पण त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही – आम्ही मागनी करतोय की आम्हाला आरक्षण हे ओबीसी मधूनच मिळावे – याविषयी एकमत होण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय बैठक घेणार आहे – आरक्षण कसं द्यायचं हे सरकारने ठरवावे – कोणालाही धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळत असताना काही नेते आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते – त्यामुळे आता आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण द्यावे ही भूमिका येत्या काळात असेल – सरकार मधील मंत्र्यांनी वारंवार तेढ निर्माण होईल अस वक्तव्य करत आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा देखील द्यावा अशी मागणी आमची कायम राहील
-
राजकारणात जनतेचे उत्तरदायित्व जे विसरतात, त्यांना जनता विसरते – फडणवीस
देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील मुद्दे
– राजकारण जनतेचे उत्तरदायित्व जे विसरतात, त्यांना जनता विसरते
– सत्ता 5 वर्षांसाठी टिकते
– आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं काम उल्लेखनीय
– कोरोनाच्या काळात भाजपच्या नेत्यांनी दाखवून दिलं की आम्ही जीवाची पर्वा न करता काम करू शकतो
– नेतृत्व लोकांना आश्वासक वाटायला हवं
– नेतृत्वाची कसोटी अवमानच्या काळात लागते
– लोकप्रतिनीधींनी पायाला भिंगरी बांधली पाहिजे. लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे
– भाजपमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सेवकाची भूमिका स्वीकारलेली आहे
– महापालिकेत आमची सत्ता आहे, चांगलं काम करतोय
– अलीकडच्या काळात अजित पवारांसोबत कार्यक्रम केला की दोन दिवस आणि दोन दिवस नंतर बातम्या चालतात
– विरोधाला विरोधाची भूमिका न घेता, जे योग्य आहे त्याला पाठींबा द्यायचा अशी आमची भूमिका आहे
– आमदार मंत्र्यांला भेटला की त्याने पक्ष बदलल्याच्या बातम्या केल्या जातात, याकडे दुर्लक्ष करायचं
-
मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलीस आक्रमक, मांजा विक्री केल्यास गुन्हा दाखल
मांजा विक्रेत्यांविरोधात नाशिक पोलीस आक्रमक, मांजा विक्री केल्यास, वापरल्यास होणार गुन्हा दाखल, नुकताच एका महिलेचा मांजाने गळा चिरुन झाला होता दुर्दैवी मृत्यू, मांजा वापरुन विनाकारण कोणाला हानी पोहचू नका नाशिक पोलीसांच आवाहन
-
यवतमाळात कोरोना काळात कोव्हिड केयर सेंटरला काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
यवतमाळात कोरोनाच्या काळात कोव्हिड केयर सेंटरला काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जिल्ह्यातील 200 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश, कोरोनाच्या कठीण काळात याच कर्मचाऱ्यांनी, टेस्टिंग केल्या, Ccc सांभाळले, पॉझिटीव्ह रुग्णांना मदत केली, जिल्ह्यातील 200 कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत
-
तुमचं कर्तृत्व हे सूर्य प्रकाशा इतकं स्वच्छ आहे, मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलिसांची पाठ थोपटली
संचारबंदी आणि जमावबंदी यात फरक आहे, ते तुम्ही सांगितलं ते बर झालं, मुद्देमाल परत करता ही मोठी गोष्ट आहे, तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, तुमचा प्रत्येक क्षण ताणतणावात असतो, माझ्या बहाद्दर लोकांच्या सोबत वेळ घालवायला मी आलो आहे, तुमचं कर्तृत्व मोठं आहे, तुमचं कर्तृत्व हे सूर्य प्रकाशा इतकं स्वच्छ आहे
-
वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? – मुख्यमंत्री
वर्क फ्रॉम होम करा हे मीच सांगितलं, पण जर पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं?, अजूनही धोका गेलेला नाही, इतर देशांमध्ये हा धोका आणखी वाढला आहे, त्यामुळे जर सर्व उघडलं तर ते चुकीचं ठरेल
-
काही पोलीस कोव्हिडने शहीद झालेत – मुख्यमंत्री
काही पोलीस कोव्हिडने शहीद झालेत, काही हजार पोलिसांना कोरोनाने ग्रासलं, त्यांना कुटुंब नाही का, ते का शहीद झाले,
-
मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे – उद्धव ठाकरे
पोलीसही माणसं आहेत, पण तरी तुम्ही दक्ष राहाता, म्हणून आम्ही सण साजरे करु शकतो, त्यामुळे मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे
-
उसाचा प्रश्न सोडवण्याचा अल्टीमेटम संपला, साखर आयुक्त कार्यालयाला शेतकरी टाळे ठोकणार
साखर आयुक्त कार्यालयाला शेतकरी ठोकणार टाळे, बीड जिल्ह्यातील शेतकरी साखर कार्यालयाला ठोकणार टाळे, शिल्लक उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर संचालकांना दिला होता अलटीमेटम, साखर कारखाने हद्दीबाहेरील उसाचं करतायत गाळप, साखर कारखान्याच्या हद्दीतील उसाला प्राधान्य देण्याची शेतकऱ्यांची मागणी, सोमवारी झाली होती शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक, बैठकींनंतरही तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी ठोकणार टाळे
-
अँटी नारकोटिक्स सेलची नववर्षाची पहिली मोठी कार्रवाई, 52 लाख रुपयांचं कोकेन जप्त
अँटी नारकोटिक्स सेलची नववर्षाची पहिली मोठी कार्रवाई, बांद्रा यूनिटने 52 लाख रुपये किमतीच्या 204 ग्राम कोकेन जप्त, एका नायजेरियन आरोपीला अटक, नैनो कारमध्ये ड्रग घेऊन आला होता आरोपी, वाकोला सांताक्रुज पूर्वमध्ये पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी केली अटक
-
हाऊसिंग फॉर ऑलचं स्वप्न नक्की पूर्ण होईल – मोदी
हाऊसिंग फॉर ऑलचं स्वप्न नक्की पूर्ण होईल, असा विश्वास मला आहे, गावातही या अंतर्गत काम सुरु आहे, शहरातही याचा वेग वाढवायचा आहे, त्यासाठी आपल्या सर्वांना एका दिशेने एका वेगाने जाणं महत्त्वाचं आहे,
-
श्रमिकांसाठी अफॉर्डेबल रेंटल हाऊस तयार करणार – मोदी
कोरोनाने श्रमिकांच्या सामर्थ्यला सन्मान मिळवून दिला, शहरात या श्रमिकांना जागा मिळत नाही, त्यांना लहान लहान खोल्यांमध्ये राहावं लागतं, मात्र या लोकांनाही राहण्यासाठी चांगली घरं मिळाली, त्यासाठी उचित रेंटल हाऊस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे
-
या घरांच्या चावीने अनेक दारं उघडली जात आहेत – मोदी
मध्यमवर्गीयांना एक निश्चित होम लोनवर सूट दिली जात होती, कोरोना काळातही ते दिलं गेलं, त्याशिवाय त्यांच्यासाठी २५ हजार कोटींचं वेगळं फंडही देण्यात आलं, हे रेरामुळे शक्य झालं, रेराने लोकांना हा विश्वास दिला की त्यांना त्यांची घरं मिळतील, आज देशात 60 हजार घरं रेरामध्ये नेंदणीकृत आहेत, सर्वांसाठी घर या लक्ष्यच्या प्राप्तीसाठी जे काम केलं जात आहे त्यामुळे लोकांच्या जीवनात परिणाम घडवून आणत आहेत, या घरांच्या चावीने अनेक दारं उघडली जात आहेत
-
गेल्या सहा वर्षात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता नागरिक स्वत:चं घर घेऊ शकत आहेत – मोदी
गेल्या सहा वर्षात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता नागरिक स्वत:चं घर घेऊ शकत आहेत, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत लाखो घरं तयार करुन दिली आहे, यामध्ये इनोव्हेशन आणि इम्पिमेंटशन दिसत, यामध्ये तुम्हाला पाणी, वीज, गॅस सर्व सुविधा देण्यात येत आहे, पारदर्शकता दाखवण्यासाठी प्रत्येक घराची जियो ट्रकिंग केली जात आहे
-
देशात आधुनिक हाऊसिंग टेक्नोलॉजीसाठी प्रयत्नशील आहोत – मोदी
शहरात राहणारे गरिब असो वा मध्यमवर्गीय यांचं स्वप्न हे घराचं असतं, गेल्या काही काळापासून लोकांची आपल्या घरावरील विश्वास तुटत चालला होता, जीवनभराचं बचत लावूनही घर फक्त कागदावर होतं, पैसे भरुनही घर मिळायचं नाही, याचं कारण म्हणजे घराच्या वाढलेल्या किंमती, तसेच, कुठल्या परिस्थितीत कायदेव्यवस्था आपल्यासोबत उभी राहणार की नाही याचाही त्यांना विश्वास नव्हता
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’चं उद्घाटन
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’चं उद्घाटन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी या योजनेचं उद्घाटन केलं, नव्या वर्षातील मोदींचा हा पहिला कार्यक्रम आहे
-
निवडणूक समोर ठेऊन शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव : देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन विधानसभेचे विरोदी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. या वर्षात सरकारने शेतकरी आणि मजुरांना मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय शिवसेना हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता वापरते असी टीका फडणवीस यांनी केलीय. निवडणूक आल्यामुळे शिवसेनेनं औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
-
पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार, सुनिल केदार यांची माहिती
पशू संवर्धन विभागात मेगा भरती होणार, माफसू विद्यापीठातंही लवकरच भरती प्रक्रिया सुरु करणार, नवीन वर्षात राबवणार भरती प्रक्रिया, पशू संवर्धन विभागात तीन हजार जागा भरणार, ग्रामीण भागात गोटफार्म आणि दुग्ध व्यवसाय वाढवणार, अशी माहिती सुनिल केदार यांनी दिली
-
श्रीक्षेत्र नरसिंह वाडीमध्ये नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
श्रीक्षेत्र नरसिंह वाडीमध्ये नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, पोलीस प्रशासन देवस्थान समितीकडून योग्य नियोजन दर्शन घेण्यासाठी कर्नाटक मुंबई-पुणे-नाशिक अन्य भागातून, नरसिंह वाडीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जय घोषात वाडी दुमदुमली
-
कोरोना लसीकरणाची उद्या नागपुरात रंगीत तालीम
कोरोना लसीकरणाची उद्या नागपुरात रंगीत तालीम, लसीकरणाच्या ड्रायरनसाठी जिल्ह्यातील तीन केंद्राची निवड, मनपाचं प्राथमिक आरोग्य केंद्र, डागा रुग्णालय, आणि कामठी ग्रामीण रुग्णालयात ड्रायरन, प्रत्येक केंद्रात लसीकरणाच्या ड्रायरनसाठी २५ जणांची निवड
-
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांची मंदिरांबाहेर गर्दी
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककरांची मंदिरांबाहेर गर्दी, नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पहाटे पासून दर्शनासाठी लागल्या रांगा, नव्या वर्षांची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविक नतमस्तक
-
नंदुरबार जिल्ह्यामधील 87 ग्रामपंचायत निवडणूक पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध
नंदुरबार जिल्ह्यामधील 87 ग्रामपंचायत निवडणूक पैकी 8 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, या ग्रामपंचायत नंदुरबार तालुक्यातील असून यामध्ये शनिमांडळ, तिलाली, खर्दे, बलदाने, मांजरे, विखरण, आराळे आणि निंभेल या ग्रामपंचायतीच्या समावेश आहे, आज महागावच्या दिवस असल्याने आणखीन काही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होता का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
-
नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीसाठी 2047 नामांकन दाखल, 44 अर्ज बाद
नंदुरबार जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीसाठी 2047 नामांकन दाखल करण्यात आले, काल झालेल्या छाननीमध्ये 44 नामांकने अवैध, यामध्ये नंदुरबार 14, धडगाव 7, अक्कलकुवा 6, नागपूर 2 तर शहरातील 14 नामांकन अवैध ठरले आहेत, तर 2004 नामांकन वैध ठरले असून आता माघार इकडे लक्ष लागले आहे
-
भाजप नेते वसंत गीतेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, मनसेचं नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना
नाशकात भाजप नेते वसंत गीतेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, मनसे जिल्हाध्यक्षांकडून पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आदेश, भाजपात नाराज असलेल्या वसंत गीते यांची आज ‘मिसळ डिप्लोमसी’, कार्यकर्ते , समर्थक यांच्याशी चर्चा करुन ठरवणार पुढची दिशा
-
नाशिक शहराच्या अनेक भागात उद्या पाणीपुरवठा नाही
नाशिक शहराच्या अनेक भागात उद्या पाणीपुरवठा नाही, सिडको, नाशिक पूर्व विभागातील पाणी पुरवठा राहणार पूर्णपणे बंद, मुकणे धरणातून केल्या जाणाऱ्या जलवाहिणीच्या दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार पाणीपुरवठा
-
नाशकात बहुचर्चित बस सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता, बीएस 4 बस फिरु देणार नसल्याचा शिवसेनेचा इशारा
नाशकात नवीन वर्षात शहरातील बहुचर्चित बस सेवा लांबणीवर पडण्याची शक्यता, शहरात प्रदूषणकारी बीएस 4 बस फिरु देणार नसल्याचा शिवसेनेचा इशारा, उशिरा ने आलं शिवसेनेला शहाणपण, 25 जानेवारीपासून सूरु होणार आहे शहर बस सेवा, पहिल्या टप्प्यात शहरात धावणार 50 बस
-
औरंगाबादेत ग्रामपंचायतीत शिवसेना मंत्री संदीपान भुमरेंचा धमाका, 17 पैकी 3 सदस्य बिनविरोध
औरंगाबादेत पाचोड ग्रामपंचायतीत शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांचा धमाका, 17 पैकी 3 सदस्य काढले बिनविरोध, आता फक्त 14 सदस्यांसाठी होणार निवडणूक, भुमरे यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप तीनही पक्षांची झाली होती आघाडी, तीनही पक्षांच्या आघाडीला नमवत तीन जागा काढल्या बिनविरोध, उर्वरित 14 जागांसाह पाचोड ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी संदीपान भूमरेंची मोर्चेबांधणी
-
साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत
साईदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत, पहाटेपासूनच दर्शनाच्या लांबच लांब रांगा, 31 डिसेंबर रोजी 48 तासात चाळीस हजारांहून अधिक भाविकांचं दर्शन, आज पहाटे 4 वाजेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत 9 हजार भाविकांनी घेतले साईंचे दर्शन, गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांची कसरत तर सोशल डिस्टंन्सचाही फज्जा
-
नववर्षाची पार्टी करुन परतताना घेतला एकाचा बळी, वर्ध्यातील घटना
वर्ध्यातील बॅचलर रोड मार्गावर विचित्र अपघात, भरधाव वेगात असलेल्या कारने पादचाऱ्यांला चिरडले, मॉर्निंग वॉक करत असलेल्या नागरिकाला उडवत कारची विद्युत खांबाला धडक, धडकेत पायदळ जात असलेल्या रौनक सबाने या इसमाचा मृत्यू, कारमधील सर्व मद्यप्राशन करुन असल्याची माहिती, नववर्षाची पार्टी करुन जाणाऱ्यांनी घेतला एकाचा बळी, पहाटे दरम्यान घडली घटना, घटनेनंतर कारमधील सर्व वाहन सोडून पसार, या कारमध्ये एक पोलीस कर्मचारी सुद्धा असल्याची चर्चा
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आखणी चार गावं दत्तक घेतली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आखणी चार गावं दत्तक घेतली, सांसद आदर्श ग्राम योजनेतून घेतली गावं दत्तक, निहारवाणी, गुमथाळा, बोरखडी आणि कळमेश्वर तालुक्यातील वरोडा गाव घेतलं दत्तक, सांसद आदर्श ग्राम योजनेला शिवसेनेकडून, सेना खासदार कृपाल तुमाने यांच्याकडून प्रतिसाद नाही
-
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा आखाडा, छाणणीत 14 अर्ज बाद
नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा आखाडा, छाणनीत 14 उमेदवारांचे अर्ज झाले बाद, जिल्ह्यात 1898 जागांसाठी 3128 उमेदवारांचे अर्ज वैध, चार जानेवारीला स्पष्ट होणार अंतीम लढतीचं चित्र, गावा गावात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात
-
प्रकाश आंबेडकरांकडून जयस्तंभाला अभिवादन
प्रकाश आंबेडकर भीमा-कोरेगावला पोहोचले, प्रकाश आंबेडकरांकडून शौर्यदिनानिमित्त जयस्तंभाला अभिवादन
-
दोन्ही सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही : प्रकाश आंबेडकर
दरवर्षी लोक जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात, मात्र यावर्षी कोरोना असल्यामुळे घरातूनच अभिवादन करण्याचं शासनाने आवाहन केलं होतं, लोक त्याचा आदर करतील, जोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होत नाही तोपर्यंत या दिवसाचे महत्व कायम राहील, दोन्ही सरकारकडे कोरोनाच्या काळातील प्लॅन नाही, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काही प्लॅन नाही, शासन ठरवत नाही काय निर्णय व्हायला पाहिजे ते, सत्तेत असल्यामुळे फक्त आदेश काढले जातायत, सर्व सुरु झालंय मात्र अजून लोकल सुरु होत नाहीय, दोन्ही सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही, कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात आज बोलणं योग्य ठरणार नाही, एल्गार परिषद घेण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी निर्णय घेतलाय ते काय करायचं ते ठरवतील , मात्र आमचा आणि पी बी सावंताचा जो उद्देश होता तो झालाय.
-
मागील सरकारने जो निधी मजूर केला होता तो अजून आला नाहीय, मात्र एकमेकांना ढकलून चालणार नाही : अजित पवार
महाराष्ट्र शौर्याची भूमी आहे, जय स्तंभ विकास आराखडा मंजूर करा, अशी मागणी समोर आलीय, स्थानिक ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, काही जमिनी या ताब्यात घेतल्या जातील, राज्य सरकारकडून आर्थिक बाजू साभांळली जाईल, मागील सरकारने जो निधी मजूर केला होता तो अजून आला नाहीय, मात्र एकमेकांना ढकलून चालणार नाही, अजित पवारांची माहिती
-
संपूर्ण देश कोरोना मुक्त व्हावा, राजेश टापे यांचं बालाजी मंदिरात साकडं
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाशिम इथल्या बालाजी मंदिरात पूजा अर्चना करत आरती करुन दर्शन घेतलं, संपूर्ण राज्यावरचं संकट जावं, नवीन वर्ष सुखाच जावं, संपूर्ण देश कोरोनामुक्त व्हावा, राजेश टापे यांचं बालाजीकडे साकडे
-
रत्नागिरीत गादीच्या दुकानाला आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू
रसायनी मोहोपाडा येथील गादीच्या दुकानाला आग, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लागली आग, आगीत होरपळून एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर रित्या भाजला, पाताळगंगा एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेला आग विझवण्यात यश आले आहे, आगीचे कारण अद्याप समजले नाही
-
अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन
सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा, कोरोनाचे संकट असल्यामुळे घरातूनच जयस्तंभाला अभिवादन करावे, नागरिकांना आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांकडून विजयस्तंभाला अभिवादन सरकारच्या आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद, बंदोबस्त सर्वत्र व्यवस्थित ठेवण्यात आलाय, कोरोना काळात सुरक्षितता बाळगणं महत्वाचं आहे, अजित पवारांची माहिती
-
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, परिसरात कडक पोलीस बंदोबस्त
पुण्यातील कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, काल संध्याकाळ 5 वाजल्यापासून आज रात्री 12 पर्यंत पुणे – नगर महामार्ग बंद, थोड्याच वेळात ऊर्जामंत्री नितीन राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार , गृहमंत्री अनिल देशमुख विजयस्तंभाला अभिवादन करणार, नागरिकांनी कोरेगाव भीमाला येऊ नये प्रशासनाचे आवाहन, नागरिकांनी ऑनलाईन विजयस्तंभाला अभिवादन करण्याचे आवाहन





