Serum fire LIVE | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी

| Updated on: Apr 15, 2021 | 3:34 PM

Serum Institute Pune news : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Serum fire LIVE | उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी
Pune Serum institute Fire

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. जवळपास साडेतीन तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. पण संध्याकाळी सातच्या सुमारास पुन्हा आग भडकली. आतापर्यंत या अग्नितांडवात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. दुसरीकडे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. (Fire in serum Institute covidshield manufacturer pune)

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Serum Institute Fire VIDEO

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jan 2021 08:49 PM (IST)

    अजित पवारांकडून सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी

    उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

    अजित पवार यांनी दिलेली माहिती सीरममध्ये आग आटोक्यात पाच जणांचे मृतदेह सापडले मृतांपैकी दोन जण पुण्यातले, दोन जण यूपीमधील तर एक जण बिहारमधील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली होती, त्याच इमारतीला आग लागली होती. उद्या फायरचे ऑडिट करण्यासाठी टीम येणार

  • 21 Jan 2021 08:02 PM (IST)

    सीरममधील दुर्घटनेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संवेदना व्यक्त

    सीरममधील आगीच्या दुर्घटनेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जे लोक जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे. आगीची ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

  • 21 Jan 2021 07:35 PM (IST)

    सीरमची आग दुर्दैवी, पण लसीला धोका नाही ही समाधानाची बाब : देवेंद्र फडणवीस

    सीरम इन्स्टिट्यूटला आग लागली ही दुर्दैवी घटना आहे. पण सुदैवाने कोरोना लसीच्या स्टोरेजला कोणताही धक्का बसलेला नाही ही समाधानाची बाब आहे. पुणे पोलीस, फायरब्रिगेड हे आटोकाट प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळेल आणि अधिक हानी होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो : देवेंद्र फडणवीस

  • 21 Jan 2021 07:29 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात सीरमला भेट देणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याची माहिती थोड्या वेळापूर्वी देण्यात आली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार थोड्याच वेळात सीरमला भेट देणार आहेत. तसेच ते आगीच्या ठिकाणाची पाहणी करणार आहेत.

  • 21 Jan 2021 07:08 PM (IST)

    सीरम इन्स्टिट्यूटची आग पुन्हा भडकली

    सीरम इन्स्टिट्यूटची आग पुन्हा भडकली, सहाव्या मजल्यावर लागली आग, अग्निशमन दलाच्या जवानांचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरु

  • 21 Jan 2021 06:55 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा अदर पुनावालांना फोन, उद्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून, उद्या शुक्रवार 22 जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे सिरम इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

  • 21 Jan 2021 05:55 PM (IST)

    वेल्डिंगच्या कामामुळे सीरमच्या इमारतीला आग लागल्याची शक्यता : पुणे महापौर

    आगीत पहिला मजला जळून खाक झाला. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आगीचं कारण अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे वेल्डिंगचं काम सुरु होतं अशी शक्यता आहे, अजून माहिती नाही. – पुणे महापौर मुरलीधर मोहोळ

    सीरम आगीच्या घटनेत 5 जणांचा मृत्यू,  सीरमच्या नवीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मृत झाल्याची माहिती, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती, सीरम इन्स्टिट्यूटच्या या इमारतीत काम सुरू असल्याची माहिती

  • 21 Jan 2021 05:51 PM (IST)

    सीरमच्या आगीत 5 जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्री राजेश टोपे

    मांजरी एसईझेड प्लँटमध्ये आग लागली. लोटा वायरस प्लँटमध्ये ही आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. अग्निशमनदलाने ही आग विझवली. संपूर्ण आग विझल्यानंतर, आत जाऊन पाहिल्यानंतर 5 मृतदेह सापडले आहेत

  • 21 Jan 2021 05:24 PM (IST)

    मी फोन करुन कोणाला डिस्टर्ब केलं नाही : उद्धव ठाकरे

    सीरमला लागलेली आग नियंत्रणात. मी फोन करुन कोणाला डिस्टर्ब केलं नाही. त्यांना काम करु द्या. काम झाल्यानंतर आपण सगळी माहिती घेऊ. अग्निशमन दलाच्या जवानांनी उत्तम काम केलं. जीवितहानी होणार नाही याची काळजी घेतली. आत जे कोणी अडकलं होतं त्यांना बाहेर काढलं.लस सुरक्षित ठेवणं मग ती BCG असो वा कोव्हिशिल्ड त्याला प्राधान्य आहे. आग विझू द्या, सर्वांशी संपर्क करुन अधिक माहिती घेऊ.

    जे आरोप करत आहेत , त्याच्या कडे ही सर्व माहिती कशी जाते? सर्जिकल स्ट्राईकसारखी माहिती त्यांना आधी कशी कळते? जे आरोप करत आहेत त्यांना संयमाची लस द्यावी लागेल आज दिवसभर खासदारांसोबत बैठक घेतली कर्नाटक बाबत सर्व खासदार यांनी एकत्र येऊन पंतप्रधानाकडे हा मुद्दा मांडा , राज्यातील सर्व खासदारांनी राज्यातील प्रश्नांचा पाठपुरावा करावा जीएसटी चा परतावा प्रलंबित आहे , त्याचा पाठपुरावा केला पाहिजे पक्ष भेद विसरून सर्व खासदारांनी एकत्र येऊन राज्यासाठी काम केलं पाह8जे कारशेड बाबत सर्व खासदार याना प्रेझेन्टेशन दाखवणार राज्य आणि केंद्र सरकार यात तुतू मै मै नको फडणवीस यांना जे अधिकारी माहिती देत होते तेच अधिकारी आता माहिती देत आहेत मग त्यांना दिली जाणारी माहिती चुकीची होती का

  • 21 Jan 2021 04:07 PM (IST)

    Serum Fire : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे महापालिका आयुक्तांच्या संपर्कात

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे महापालिका आयुक्तांच्या संपर्कात, सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीसंदर्भात माहिती घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक सूचना

  • 21 Jan 2021 03:48 PM (IST)

    serum institute Fire : अजित पवारांचा अधिकाऱ्यांना फोन, परिस्थितीचा आढावा

    उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश, दूरध्वनीवरुन घेतली सीरम आगीबाबतच्या परिस्थितीची माहिती, आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचे निर्देश, अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून घेतली माहिती. संस्थेतली अडकलेल्या लोकांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश

  • 21 Jan 2021 03:42 PM (IST)

    पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची आग तासाभरापासून भडकतीच

    पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग, दुपारी २.३५ वा. अग्निशामन दलाला कॉल, तासाभरापासून आग भडकतीच, आग चौथ्या मजल्यावर पसरली

  • 21 Jan 2021 03:39 PM (IST)

    VIDEO : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग

    पुणे : पुण्यातील जगप्रसिद्ध कोरोना लस बनवणारी कंपनी, सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. दुपारी दोन वाजता ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही

    जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेटनंबर ३,४ आणि ५ या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

    नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम?

    ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

  • 21 Jan 2021 02:54 PM (IST)

    शिवसैनिकांनी अखेर बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला

    कोल्हापूर : शिवसैनिकांनी अखेर बेळगाव जिल्ह्यात भगवा ध्वज फडकवला, गनिमी कावा करत बेळगाव जिल्ह्यातील कोनेवाडी गावात शिवसैनिकांनी भगवा फडकला, जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांचा गनिमिकावा यशस्वी

  • 21 Jan 2021 02:52 PM (IST)

    नाशकातील गंगापूर रोड परिसरात मोठी दुर्घटना टळली, जून झाड भर रस्त्यात कोसळलं

    नाशिक : गंगापूर रोड परिसरात मोठी दुर्घटना टळली, जून झाड भर रस्त्यात कोसळलं, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

  • 21 Jan 2021 02:52 PM (IST)

    केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात 25 तारखेला सांगली-कोल्हापूर मध्ये ट्रॅक्टर मोर्चा

    इचलकरंजी : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात 25 तारखेला सांगली-कोल्हापूर मध्ये ट्रॅक्टर मोर्चा आंदोलन करणार, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात 25 तारखेला सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा निघून कोल्हापुरात सांगता करणार, केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात सर्वसामान्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहेत, राज्य सरकारने लॉकडाउन काळातील लाईट बिल माफ करावे व वीज बिल नाही भरणार माजी खासदार राजू शेट्टी

  • 21 Jan 2021 12:50 PM (IST)

    शिवसैनिक-कर्नाटक पोलीस समोरासमोर

    शिवसैनिक-कर्नाटक पोलीस समोरासमोर, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणावाचं वातावरण, बेळगावमध्ये भगवा फडकवण्यावर शिवसेना ठाम

  • 21 Jan 2021 12:45 PM (IST)

    शिवसैनिक शिनोळी गावात पोहोचले, बेळगावमध्ये भगवा फडकवण्यावर शिवसेना ठाम

    शिवसैनिक शिनोळी गावात पोहोचले, बेळगावमध्ये भगवा फडकवण्यावर शिवसेना ठाम, कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

  • 21 Jan 2021 12:41 PM (IST)

    महाराष्ट्राला पुरोगामी विचाराकडे न्यायचे असेल तर प्रबोधनकारांचे विचार जनमाणसांपर्यंत पोहोचायला पाहिजे : उर्मिला मातोंडकर

    प्रबोधनकारांनी कधी लेखणी गहाण ठेवली नाही, आपल्या महाराष्ट्राला पुरोगामी विचाराकडे न्यायचे असेल तर प्रबोधनकारांचे विचार आणि कार्य जनमाणसांपर्यंत पोहोचायला पाहिजे – उर्मिला मातोंडकर

  • 21 Jan 2021 12:39 PM (IST)

    शिवसैनिकांच्या पंखात वैचारिक बळ प्रबोधनकारांनी भरलं : उर्मिला मातोंडकर

    अष्टपैकी, कट्टर सुधारणावादी, असं व्यक्तिमत्त्व, हिंदू धर्माबद्दलचे त्यांचे प्रेम, आस्था प्रचंड होती, शिवसैनिकांच्या पंखात वैचारिक बळ प्रबोधनकारांनी भरलं, प्रबोधनकारांचे साहित्य वारंवार वाचलं जावं – उर्मिला मातोंडकर

  • 21 Jan 2021 12:38 PM (IST)

    पुण्यात ‘प्रबोधन’चा शतकोत्सवाला सुरुवात, उर्मिला मातोंडकरांकडून प्रबोधनकार ठाकरेंची आठवण

    पुण्यात ‘प्रबोधन’चा शतकोत्सवाला सुरुवात, उर्मिला मातोंडकरांकडून प्रबोधनकार ठाकरेंची आठवण, या महाराष्ट्राने या देशाला तमाम नररत्न दिली, त्यापैकी एक नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही – उर्मिला मातोंडकर

  • 21 Jan 2021 12:35 PM (IST)

    केंद्रानं राज्याचे 25 हजार कोटी रुपये दिले नाहीत: अजित पवार

    महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण टिकाव यासाठी प्रयत्न करत आहे. प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे. एखादं प्रकरण सुप्रीम कोर्टात असते, त्यावेळी निकाल काय लागतो याची वाट पाहावी लागते. मराठा समाजातील युवकांनी आत्महत्येसारख्या मार्गानं जाऊ नये, असं अजित पवार म्हणाले.एमपीएससीनं याचिका करायला नको होती. आम्ही योग्य मार्ग काढू, असं अजित पवार म्हणाले.

    राज्याला समोर ठेवून, सर्व जाती धर्माच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही. यशवंतराव चव्हाणांच्या मार्गानं हे राज्य चालतं आम्ही त्यांच्या मार्गानं जाणारे आहोत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चांगलं काम सुरु आहे.

    राज्याची आर्थिक परिस्थिती घेऊन निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक परिस्थिती आणि कोरोनाचा विचार करुन पावलं उचलावं लागतात. केंद्रानं आमचे येणारे 25 हजार कोटी रुपये येणे आहे. ते अजून आले नाहीत. जयंत पाटील यांच्या इच्छेला पाठिंबा देतो, असं अजित पवार म्हणाले.

  • 21 Jan 2021 12:05 PM (IST)

    टप्प्याट्प्याने नोकरभरती सुरु आहे – अजित पवार

    टप्प्याट्प्याने नोकरभरती सुरु आहे, राज्य सरकारची आर्थिक स्थिती बेताची, पोलीस वैद्यकीय भरतीला प्राधान्य

  • 21 Jan 2021 12:04 PM (IST)

    भाजपचे पुण्याचे नगरसेवक नाराज प्रकरणी मला अधिक माहिती नाही – अजित पवार

    भाजपचे पुण्याचे 16 नगरसेवक नाराज प्रकरण, मला याबाबत अधिक माहिती नाही, मी उद्या पुण्याला जातोय, उद्या मिटिंग लावल्या आहेत, ही ऐकीव माहिती, काही मिळालं नाही की अशा प्रकारच्या बातम्या परसल्या जातात,

  • 21 Jan 2021 12:03 PM (IST)

    उद्धवजींच्या नेतृत्वात उत्तम काम सुरु – अजित पवार

    मी फाईल पेडिंग ठेवणारा माणूस नाही,  अशा प्रकारचे निर्णय एक मंत्री घेत नसतो, संपूर्ण मंत्रिमंडळ निर्णय घेत असते, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची तिजोरी पाहता सगळ्या गोष्टींचा विचार करुन निर्णय घ्यावे लागतात,

  • 21 Jan 2021 12:02 PM (IST)

    एमपीएससीने याचिका दाखल करायला नको होती – अजित पवार

    एमपीएससीने याचिका दाखल करायला नको होती, त्यासंदर्भात मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत… ते माहिती घेतील आणि आम्हाला कळवतील, ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात एखादं प्रकरणं असतं त्यावेळी जास्त बोलता येत नाही, जर ती राज्य सरकारच्या अखत्यारित असतं तर गोष्ट वेगळी, पण हा सगळा विषय कोर्टात, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या पाठीमागे, मराठा तरुणांनो आत्महत्या करु नका, अजित पवारांचं कळकळीचं आवाहन, नियुक्त्या द्या, एमपीएससी विद्यार्थ्यांची विनवणी

  • 21 Jan 2021 12:01 PM (IST)

    तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा, औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेला रोहित पवारांचा अप्रत्यक्ष टोला

    सोलापूर : औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेनेला रोहित पवारांचा अप्रत्यक्ष टोला, औरंगाबादचे नामांतराबाबत शिवसेनेची आग्रही भूमिका आणि भावनिक विषय आहे मात्र रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे, महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करतेय त्यामुळे अनेक प्रश्नावर काम करायचे आहे, एखाद्या शहराचे नाव बदलताना त्या गावातील लोकांचा मतं जाणून घेणे गरजेचे

  • 21 Jan 2021 11:59 AM (IST)

    आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला घरचा अहेर, थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत राज्यशासनाला सवाल

    सोलापूर : आमदार रोहित पवारांचा राज्य सरकारला घरचा आहेर, थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांचा राज्यशासनाला सवाल, वाढीव वीजबीलाची शाहनिशा करण्याची गरज आहे, वाढीव आलेले वीज बील कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढेच बील द्यावे, यासाठी सरसकट धोरण करता येईल का याचा अभ्यास करावा राज्य सरकारने करावा असे मला वाटते,  कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल,  ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का?, तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश काढलेत का?, ते काढले असतील तर त्याचा अहवाल काय आलाय हे पाहावे लागेल, सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, वीज पुरवठा खंडित करण्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

  • 21 Jan 2021 11:58 AM (IST)

    कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली : निलेश राणे

    सिंधुदुर्ग : कोकणातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला जागा दाखवली, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांची विकास करण्याची कुवत नाही, त्यांनी फक्त राणेंवर टिका करण्यात आपला वेळ घालवला, त्यामुळेच यांना कोकणातील जनतेने नाकारलं, राणेंवर खोटीनाटी टीका करून मतं मिळवण्याचे दिवस आता संपले – माजी खासदार निलेश राणे

  • 21 Jan 2021 11:50 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेणार 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लस घेणार, त्याशिवाय इतर सर्व मुख्यमंत्र्यांनाही लस टोचली जाणार, दुसऱ्या टप्प्यात 50 पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना लस दिली जाणार, पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत माहिती, कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 50 पेक्षा जास्त वय असलेल्या खासदार, मंत्र्यांना लस टोचली जाईल, मात्र, लसीकरमाचा दुसरा टप्प कधी सुरु होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही

  • 21 Jan 2021 10:50 AM (IST)

    औरंगाबादेत गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकाचा मृत्यू

    औरंगाबाद : गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलेल्या ग्रामसेवकचा मृत्यू, संजय शिंदे असं मृत्यू झालेल्या ग्रामसेवकाचे नाव, गटविकास अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मंगळवारी केलं होतं विष प्राशन, दोन दिवसांपासून सुरू होते रुग्णालयात उपचार, उपचारादरम्यान ग्रामसेवकचा झाला होता मृत्यू, गटविकास अधिकाऱ्याकडून होत होता सातत्याने छळ, ग्रामसेवक संजय शिंदे हे पैठण तालुक्यातील बिडकीन येथे होते कार्यरत

  • 21 Jan 2021 10:06 AM (IST)

    पुण्यात झळकले जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शुभेच्छांचे फ्लेक्स

    पुणे : पुण्यात झळकले जो बायडन आणि कमला हॅरिस यांचा शुभेच्छांचे फ्लेक्स, पुणेकरांकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो भाऊ बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला अक्का हॅरिस यांना शुभेच्छा

  • 21 Jan 2021 09:23 AM (IST)

    शिवसेनेचा बेळगावातील मोर्चाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

    कोल्हापूर : शिवसेनेचा बेळगावातील मोर्चाच्या पार्श्वभूमी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, कोगनोळी टोलनाक्यावर मोठा पोलिस बंदोबस्त बंदोबस्त तैनात, मोर्चाच्या पार्श्वभूमी प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच दिला जातोय पुढे प्रवेश

  • 21 Jan 2021 09:07 AM (IST)

    पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला, पेट्रोल 92.52 रुपयांवर तर डिझेल 81.63 रुपयांवर

    नंदूरबार : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे, आतापर्यंतचे सर्वाधिक इंधनाचे दर झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्य त्याचा फटका बसत आहे, नंदुरबार मध्ये पेट्रोल 92.52 रुपये, तर डिझेलच्या दर 81.63 रुपये एवढा झाला असल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईची चांगलाच फटका बसत आहे

  • 21 Jan 2021 08:56 AM (IST)

    रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली

    रत्नागिरी : नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ महत्वाच्या घडामोडी, रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समितीने मागितली मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ, मेलवरून समितीच्या लेटरहेड वरून मागितली मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ, रिफायनरी प्रकल्प समर्थ समन्वय समिती मध्ये 45 संघटना, आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

  • 21 Jan 2021 08:36 AM (IST)

    नाशकात शहरातील विकास कामे आणि कर्जाच्या प्रस्तावावरून सेना भाजप वाद पेटला

    नाशिक : शहरातील विकास कामे आणि कर्जाच्या प्रस्तावावरून सेना भाजप वाद पेटला, उड्डाणपुलाच्या भूमीपूजनाचा प्रयत्न केला ,तर सेना स्टाईल ने कार्यक्रम उधळून लावू, शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजपाला थेट इशारा, तर सरकारने प्रशासनावर दबाव टाकल्याने कर्जाचा प्रस्ताव फेटाळल्याचा भाजपचा आरोप, तर भाजपाला उड्डाणपुलाच श्रेय घ्यायचं असल्याने उड्डाणपुलाच्या कामाला स्थगिती दिल्याचा शिवसेनेचा आरोप

  • 21 Jan 2021 08:35 AM (IST)

    गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरण, हायकोर्टानेही जामीन नाकारला

    औरंगाबाद : भाजप आमदार प्रशांत बंब यांना हायकोर्टाचाही झटका, गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हायकोर्टानेही नाकारला जामीन, हायकोर्टाने सहा आरोपींचा नाकारला जामीन, यापूर्वी जिल्हा न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालयानेही नाकारला आहे जामीन, हायकोर्टाने जामीन नाकारल्याने आरोपींवर अटकेची टांगती तलवार, गंगापूर साखर कारखान्यातील 17 कोटींच्या घोटाळा प्रकरणी दाखल आहे गुन्हा

  • 21 Jan 2021 08:33 AM (IST)

    बेळगावमधील एकीकरण समितीचा महामोर्चा स्थगित, मात्र शिवसेना ठरल्याप्रमाणे आंदोलन करणार

    कोल्हापूर : शिवसेना आज बेळगावमध्ये जाणारच, बेळगावमधील एकीकरण समितीचा महामोर्चा स्थगित, मात्र शिवसेना ठरल्याप्रमाणे आंदोलन करणार, शिनोळी या गावातून भगवा झेंडा घेऊन शिवसैनिक बेळगावमध्ये दाखल होणार, शिवसैनिकांना कर्नाटक पोलीस परवानगी देणार का?, चंदगड तालुक्यातील शिनोळी गावापासून शिवसेनेचे आंदोलन सुरू होणार, कोल्हापूरातून शिवसैनिक थोड्याच वेळात रवाना होणार

  • 21 Jan 2021 08:32 AM (IST)

    बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला स्थगिती

    औरंगाबाद : बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीला स्थगिती, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिली स्थगिती, 22 जानेवारी पर्यंत सहकार विभागाला मत मांडण्याचे आदेश, निवडणुकीतील अनियमिततेबाबत दाखव होती याचिका

  • 21 Jan 2021 07:30 AM (IST)

    पुण्यातील आणखी 60 उद्याने सुरु करण्यास मान्यता, पीएमसी आयुक्तांचे आदेश

    पुणे : महापालिका प्रशासनाची शहरातील आणखी 60 उद्याने सुरु करण्यास मान्यता, 25 जानेवारीपासून ही उद्याने सुरु होणार, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आदेश, यापूर्वी 29 ऑक्‍टोबर रोजी 81 उद्याने सुरू, दरम्यान, उद्यानांमध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षांच्या आतील लहान मुलांना बंदी कायम, शहरात महापालिकेची सुमारे 200 उद्याने, आयुक्तांच्या या आदेशानंतर तब्बल 9 महिन्यानंतर पुणेकरांसाठी आणखी 60 उद्याने खुली होणार

  • 21 Jan 2021 07:27 AM (IST)

    पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार

    पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार, पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यातून रेल्वेमार्गासाठी 575 हेक्‍टर जमिनीचे संपादन करण्यात येणार, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांशी थेट वाटाघाटी करुन जमिनी खरेदी करण्यात येणार असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती, भूसंपादनासंदर्भात रेल्वे विभागाकडून हवेलीमधून सहा प्रस्ताव दाखल, या 575 हेक्‍टर जमिनीसाठी 1300 ते 1500 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता, थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून जमिनीची खरेदी केली जाणार

  • 21 Jan 2021 07:25 AM (IST)

    नागपुरात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी 668 कोंबड्यांची कत्तल

    नागपूर :नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रसार रोखण्यासाठी मोहीम सुरु, एक किलोमीटर परिसरातील 668 कोंबड्या मारून त्याची विल्हेवाट लावण्यात आली, नागपूर जिल्ह्यातील वारंगा गावातील कोंबड्यांचे अहवाल पोझिटिव्ही आले होते, जिल्ह्यात बर्ड फ्लू चा शिरकाव कसा झाला याची चौकशी सुरू करण्यात आली, प्रशासनाने घाबरून न जाण्याचे केले आवाहन

  • 21 Jan 2021 07:17 AM (IST)

    नागपूर शहराला आज पासून सुरळीत पाणी पुरवठा

    नागपूर : नागपूर शहराला आज पासून होणार सुरळीत पाणी पुरवठा, 65 टक्के भागात गेल्या 6 तारखे पासून होत होता एक दिवसा आड पाणी पुरवठा, 300 एमएमच्या मोठ्या पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात झाले होते लिकेज, लिकेज दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने घेतला होता एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय, संपूर्ण लिकेज दुरुस्त करण्यात आले त्यामुळे आज पासून शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार, उन्हाळ्यात आता नागपूरकरांना पाणी  समस्येचा सामना करावा लागणार नाही

  • 21 Jan 2021 07:02 AM (IST)

    नागपुरात पोलीस स्टेशन हद्दीत गळा चिरून युवकाची हत्या

    नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत गळा चिरून युवकाची हत्या, बाजार परिसरातील बाबा बिअर बार समोर झाली हत्या, प्रशांत घोडेस्वर नावाच्या युवकाची हत्या, रात्री उशिरा झाली हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती, पोलीस तपास सुरू

  • 21 Jan 2021 06:42 AM (IST)

    टेमघर धरणाच्या गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा शेवटचा टप्पा यंदा फेब्रुवारीत सुरु होणार

    पुणे : टेमघर धरणाच्या गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा शेवटचा टप्पा यंदा फेब्रुवारीत सुरु होणार, त्यासाठी टेमघर धरण रिकामे करण्यात येत असून धरणात आज 38.69 टक्के पाणीसाठा शिल्लक, त्यानंतर धरणाच्या मजबुतीकरणाचा टप्पा पुढील वर्षी सुरू करण्याचे नियोजन, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांची माहिती, टेमघर धरणाची क्षमता 3.71 टीएमसी, 2017 मध्ये धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती, तेव्हापासून या धरणाच्या गळतीच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम राज्य सरकारकडून सुरू, गळती रोखण्यासाठी केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी, मागील वर्षी पर्यंत झालेल्या कामामुळे धरणाची गळती 90 टक्के थांबली

  • 21 Jan 2021 06:40 AM (IST)

    टीम इंडिया आज घरवापसी करणार, मुंबई विमानतळावर स्वागताची तयारी

    मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजय मिळवून आज भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधीत्व करणारे मुंबईचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सकाळी 8.45 वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील, एमसीएचे अध्यक्ष आणि अ‍ॅपेक्स कैऊन्सिल विमानतळावर त्यांचे स्वागत करतील

  • 21 Jan 2021 06:38 AM (IST)

    सुप्रसिद्ध सराफा व्यापारी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा

    पुणे : सुप्रसिद्ध सराफा व्यापारी पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सला 1 कोटी 60 लाखांचा गंडा, चंदीगड येथे शाखा उडण्यासाठी स्वत:ला व्यापार करण्यासाठी आणि चंदीगड येथे शाखा उघडण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून घातला गंडा, सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग यांची पोलिसांकडे फिर्याद, त्यावरुन पोलिसांनी पंजाब येथील रोहितकुमार शर्मा याच्याविरुद्ध केला गुन्हा दाखल

  • 21 Jan 2021 06:30 AM (IST)

    वाशिममध्ये पुलाचा कठडा तोडून चारचाकी नदीत कोसळली, चार जण गंभीर

    वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जऊळका येथून सुदी गावाकडे जाणारे सुप्रो हे चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून पडले नदीत, अपघातात चार जण गंभीर, जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं वाशिम च्या रुग्णालयात
  • 21 Jan 2021 06:24 AM (IST)

    गडचिरोलीत विषारी दारु पिऊन दोघांचा मृत्यू, एक गंभीर

    गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे विषारी दारु पिऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली, गंभीर असणाऱ्या एका रुग्णाला चद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले,

Published On - Jan 21,2021 8:49 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.