LIVE | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार

| Updated on: Jan 25, 2021 | 11:54 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार
Breaking News

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jan 2021 10:11 PM (IST)

    महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार

    पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील पाच जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत.

    पद्मभूषण – रजनीकांत देविदार श्रॉफ, ट्रेड आणि इंडस्ट्री

    पद्मश्री पुरस्कार

    • परशूराम आत्माराम गंगावणे, कला
    • नामदेव कांबळे, साहित्य आणि शिक्षण
    • जसवंतीबेन जमनादार पोपट, ट्रेड आणि इंडस्ट्री
    • गिरीश प्रभुणे, समाजसेवा
    • सिंधुताई सपकाळ, समाजसेवा
  • 25 Jan 2021 09:14 PM (IST)

    7 पद्मविभूषण, 102 जणांना पद्मश्री पुरस्कार, पद्म पुरस्कारांची यादी जाहीर

    मुंबई : पद्म पुरस्कारांची यादी जाहीर, 119 लोकांना पुरस्कार जाहीर, 7 लोकांना पद्म विभूषण पुरस्कार, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार

  • 25 Jan 2021 09:01 PM (IST)

    शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

    चीनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात धारातीर्थी पडलेल्या शहीद कर्नल बिक्कुमल्ला संतोष बाबू यांना केंद्र सरकारने मरणोत्तर महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

  • 25 Jan 2021 08:13 PM (IST)

    नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

    नाशिक : नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, दिवसागणिक कोरोना रुग्ण संख्येत घट, नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 130 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर 139 रुग्णांनी कोरोनावर मात. 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू, नाशिक जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा 2042 वर

  • 25 Jan 2021 06:41 PM (IST)

    एकनाथ खडसेंना 28 जानेवारीपर्यंत दिलासा, अटक करणार नाही ईडीची माहिती

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता पुढील सुनावणी 28 जानेवारी रोजी होणार आहे. दरम्यान, तो तोपर्यंत आपण खडसे यांना अटक करण्याची कारवाई करणार नाही, असं ईडीच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितलं.त्यामुळे एकनाथ खडसे यांना 28 जानेवारी पर्यंत दिलासा मिळाला आहे.

  • 25 Jan 2021 06:10 PM (IST)

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन, सोलापुरातील कॉंग्रेस भवन समोर सकल मराठा समाज यांच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. ‘ओबीसी आरक्षणात कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पहारेकरी उभे आहोत’ असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते.  सकल मराठा समाज यांच्यावतीनं वडेट्टीवारांचा निषेध म्हणून विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं.

  • 25 Jan 2021 03:40 PM (IST)

    राजभवनाकडे जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला

    मुंबई : राजभवनाकडे जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. दिल्लीच्या आझाद मैदानावर निदर्शनं करुन शेतकरी  राजभवनाकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच शेतकऱ्यांना अडवण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या मोर्चामध्ये सहभागी आहेत.

  • 25 Jan 2021 03:12 PM (IST)

    असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

    राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बांधवांचं स्वागत, दिल्लीत गेली 60 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमलो

    ही मुंबई नगरी ही चळवळीतील मुंबई आहे. संयुक्त महाराष्ट्र लढयात मुंबई नगरी आणि कामगार वर्ग सामील होते

    देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देत आहात तुमचे मनापासून धन्यवाद देतो.

    ही लढाई सोपी नाही

    ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांची कवडीची  आस्था नाही

    पंतप्रधान शेतकऱ्यांची विचार पूस करत नाही , हे शेतकरी काही पाकिस्तानमधील आहेत का? पंजाबमधील शेतकऱ्यांचं देशासाठी योगदान मोठं आहे

    सरकारच नाकर्तेपणा दाखवत आहे , याचा निषेध करतो

    भाजपने चर्चा न करता मंजूर करण्यात आले. बोलू दिल नाही केलेला कायदा मागे घ्या किंवा नका घेऊ पण देशातील जनता कायदा आणि तुम्हाला उद्ध्वस्त करणार हे नक्की

    महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल भेटले आहेत , इथे शेतकरी भेटणार म्हणून राज्यपाल गेले गोव्याला

    असा राज्यपाल पाहिला नाही, त्यांना कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

  • 25 Jan 2021 02:12 PM (IST)

    “मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी”

    शेतकरी नेते अशोक ढवळेंचा मोदी-शाहांवर घणाघात, मोदींचे हम दो म्हणजे मोदी आणि शाह, तर हमारे दो म्हणजे अंबनी आणि अदानी आहेत. मोदी- शाहांनी देशातील सर्व विकायला काढलं, आता हे शेतकऱ्यांना विकायला काढत आहेत. यापुढे म्हणजे त्यांनी देशच विकायला काढला आहे. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही – अशोक ढवळे

  • 25 Jan 2021 02:01 PM (IST)

    गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा : अबू आझमी

    शेतकऱ्याचा अवस्था बिकट आहे, गायीची पूजा जशी केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा, शेतकऱ्याच प्रश्न सोडवले पाहिजेत, शेतकऱ्यांना संपवण्याचं काम सरकार करतंय : अबू आझमी

  • 25 Jan 2021 01:51 PM (IST)

    Farmers protest Azad maidan mumbai | राज्यात कृषी कायदे लागू नाहीत : अजित पवार

    अजित पवार पुणे

    जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडलीय, यंदा फक्त 19 टक्केच खर्च झालाय आंदोलक शेतकऱ्यांच्या सरकारसोबत 12 बैठका झाल्या आहेत, मात्र अद्याप तोडगा निघाला नाही – यासंदर्भात आमच्या तिन्ही पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केलीत – आम्ही राज्यात या कायद्यांची अंमलबजावणी करत नाहीत

  • 25 Jan 2021 01:44 PM (IST)

    LIVE Broadcast : शरद पवार आझाद मैदानात, शेतकरी आंदोलन लाईव्ह

    LIVE Broadcast : शरद पवार आझाद मैदानात, शेतकरी आंदोलन लाईव्ह

  • 25 Jan 2021 01:18 PM (IST)

    शेतकरी मोर्चासाठी शरद पवार सिल्वर ओकवरून निघाले

    शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी  शरद पवार सिल्वर ओकवरून निघाले आहेत. थोड्याच वेळात ते आझाद मैदानावर पोहोचतील. अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या निवासस्थानावरुन म्हणजेच सिल्वर ओकवरुन निघाले आहेत.

  • 25 Jan 2021 12:59 PM (IST)

    पत्री पुलाचा उद्घाटन सोहळा, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित

    पत्री पुलाचा उद्घाटन सोहळा, मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे उपस्थित, खासदार श्रीकांत शिंदे आणि स्थानिक आमदारही उपस्थित, उद्घाटन सोहळ्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल

  • 25 Jan 2021 12:50 PM (IST)

    Farmer protest in Azad maidan Mumbai : फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद, व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा

    शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रेडवरील “फॅशन स्ट्रीटवरील” सर्व दुकानं बंद, दुकानदारांचा ऐतिहासिक निर्णय, दीड किलोमिटर रस्त्याला लागून असलेल्या दुकानदारांचा शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा, तिन्ही कायदे मोदी सरकारने परत घ्यावे, आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं, हे कायदे रद्द झालेच पाहिजेत, व्यापाऱ्यांची भूमिका

  • 25 Jan 2021 12:35 PM (IST)

    राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात सांगलीत ट्रक्टर मोर्चाला सुरुवात

    शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात सांगलीत ट्रक्टर मोर्चाला सुरुवात, सांगली ते कोल्हापूर स्वाभीमानीकडून ट्रक्टर रॅली, कृषी कायदे रद्द करण्यासाठी ट्रक्टर रॅली

  • 25 Jan 2021 12:15 PM (IST)

    आझाद मैदानातून मराठा मोर्चाला सुरुवात

    मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानातून मराठा ठोक क्रांती मोर्चाला सुरुवात, हातात शरद पवारांचा फोटो असलेला फलक घेवून आमच्याकडे लक्ष द्या म्हणत मराठा आंदोनकांची मोर्चाला सुरुवात

  • 25 Jan 2021 12:03 PM (IST)

    मी सैधांतिक दृष्ट्या याचं कधीही समर्थन करु शकत नाही – पंकजा मुंडे

    मी राजकीय, सामाजिक जीवनात आहे, प्रेम, काळजी एकीकडे ते मला वाटत राहिलं आणि मी नेहमी व्यक्तही केलं, मी या गोष्टीचं कधी राजकारण नाही केलं, हा माझ्यातील संस्काराचा भाग आहे, पण, माझ्या माणसाने केलं तर चूक आणि बाकीच्यांनी केलं ते बरोबर असं कसं म्हणता येईल मला, त्यामुळे याबाबत योग्यती तपासणी व्हावी, मात्र, मी सैधांतिक दृष्ट्या याचं कधीही समर्थन करु शकत नाही

  • 25 Jan 2021 11:58 AM (IST)

    मराठा-ओबीसींमध्ये काहीही भांडण नाही – पंकजा मुंडे

    मराठा क्रांती मोर्चाचे झाले तेव्हा ओबीसीने समर्थन केलं, मराठा-ओबीसींमध्ये काहीही भांडण नाही, मराठा-ओबीसीचं राजकारण करु पाहणारे त्याला त्या दृष्टीने पाहतात, मला वाटत नाही की समाजात कागही भिंती असण्याचं कारण आहे

  • 25 Jan 2021 11:53 AM (IST)

    शेतकरी केंद्रीत निर्णय पंतप्रधानांनी वेळोवेळी घेतला – पंकजा मुंडे

    शेतकरी हे बळीराजाचा देश, प्रमुख्याने शेतकऱ्यांवर आधारित निर्णय घेत असताे, शेतकरी केंद्रीत निर्णय पंतप्रधानांनी वेळोवेळी घेतला, आताही सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला तयार आहे, सकारात्मक चर्चेतून विषय सुटू शकतो, सकारात्मक चर्चा करावी

  • 25 Jan 2021 11:51 AM (IST)

    मराठा आरक्षण टिकवण्यात सरकार यशस्वी होऊ शकलं नाही – पंकजा मुंडे

    ओबीसी आरक्षणात स्वतंत्र आरक्षण ते मागत असतील तर त्यात आम्हाला हरकत नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्क न लवता मराठा आरक्षण द्यावं, त्याला आमचा विरोध नाही, भाजपने आरक्षण दिलं मराठा लोक आनंदात होते, पण नंतरचं सरकार ते टिकवण्यात यशस्वी होऊ शकलं नाही,

  • 25 Jan 2021 11:31 AM (IST)

    Omkar Builders : मुंबईतील प्रसिद्ध ओंकार बिल्डर्सवर ईडीच्या धाडी

    मुंबईच्या सुप्रसिद्ध विकासक (बिल्डर) ओंकार ग्रुपवर ईडीची धाड, मुंबईत, ओंकार बिल्डरच्या अनेक ठिकाणांवर धाडी, बँकांकडून कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या बाबतीत ईडी करत आहे कारवाई, सायन ओंकार बिल्डर कार्यालय, ब्यूमोंटे अपार्टमेंट प्रभादेवी, आशियाना बिल्डिंग नेपियन्सी रोड या कार्यालयांवर धाडसत्र, काही दिवसांपूर्वी, जेपी इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील ईडीने कार्रवाई केली होती, ज्यात उत्तर प्रदेशच्या मोठ्या नेत्याच्या पैसे गुंतवलेले आहेत. याच प्रकरणात आज ओंकार बिल्डरकडे ईडीमार्फत कारवाई सुरु

  • 25 Jan 2021 11:15 AM (IST)

    Farmer protest in Mumbai : मुंबईत शेतकरी मोर्चाला परवानगी नाही : विश्वास नांगरे पाटील

  • 25 Jan 2021 11:13 AM (IST)

    Farmer protest in Mumbai : शरद पवार 1 वाजता आझाद मैदानात, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

    शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वत: शरद पवार 1 वाजता आझाद मैदानावर जाणार आहेत. शेतकऱयांना विश्वासात घेऊन हा कायदा पारित केला नाही. शेतकऱयांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा आहे. या आंदोलनात स्वत: मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत मात्र शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी दिली आहे.

  • 25 Jan 2021 11:12 AM (IST)

    Farmer protest in Mumbai : आम्ही कार्यकर्त्यांसह मोर्चात सहभागी होऊ : बाळासाहेब थोरात

    शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी कायदे बनवले. त्यांचं आंदोलन दिल्लीत सुरु आहे, तरी सरकारला त्यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. आमचं या मोर्च्याला समर्थन आहे. आम्ही- आमचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील : बाळासाहेब थोरात

  • 25 Jan 2021 11:02 AM (IST)

    भंडाऱ्यात भाजपचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चा – फडणवीस

    भंडाऱ्यात भाजपचा वेगवेगळ्या मागण्यांसाठी मोर्चा आहे, धान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, सत्ता पक्षाच्या नेत्यांनी मोठा घोटाळा केला आहे, वीज बिलासंदर्भात या सरकारने बेईमानी केली आहे, त्या बेईमानीविरोधात आमचं आंदोलन, विजेची बिलं कमी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत

  • 25 Jan 2021 10:58 AM (IST)

    महाराष्ट्रातील कायदा चालतो मग देशातील कायदा का चालत नाही- फडणवीस

    महाराष्ट्रातील कायदा चालतो मग देशातील कायदा का चालत नाही, ही ढोंगबाजी का, वाहत्या पाण्यात हात धुण्याचा प्रयत्न सुरु आहे, याला शेतकऱ्यांचा कुठलाही पाठिंबा नाही

  • 25 Jan 2021 10:56 AM (IST)

    काँग्रेस पक्षाने २००६ च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करा असं म्हटलं होतं – फडणवीस

    काँग्रेस पक्षाने २००६ च्या जाहीरनाम्यात बाजार समिती रद्द करा, आम्ही निवडून आलो तर बाजार समिती रद्द करु असं का म्हटलं याचं उत्तर दिलं पाहिजे, काँग्रेस-राष्ट्रवागदीचे याचं उत्तर दिलं पाहिजे की २००६ मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा का मंजूर केला

  • 25 Jan 2021 10:54 AM (IST)

    धुळ्यात आपल्या मागण्यासाठी युवक मोबाईल टॉवरवर चढला, पोलीस घटनास्थळी दाखल

    धुळे शहरातील साक्री रोड परीसरात युवक आपल्या मागण्यासाठी मोबाईल टॉवर वर चढला, पोलीस घटनास्थळी, आंदोलनाचं करण अद्याप स्पष्ट नाही, 500 फूट टॉवरवर चालून युवकच आंदोलन

  • 25 Jan 2021 10:47 AM (IST)

    सांगली – या वर्षातील हळद सौद्याला सांगलीत मुहूर्तावर सुरुवात

    सांगली – या वर्षातील हळद सौद्याला सांगलीत मुहूर्तावर सुरुवात

    ऑनलाईन पद्धतीने होणारे सौदे ऑफलाईन सुरू

    सेलम हळदीला मिळाला पहिल्याच बोलिला 7501 दर

    अजूनही हळद दर वाढण्याची शक्यता.

    सांगली ही हळदी साठी देशातील मोठी बाजार पेठ.

  • 25 Jan 2021 10:33 AM (IST)

    पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर पहिली प्रतिक्रिया…

    “कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं. आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच”, असंही पंकजा मुंडेंनी अधोरेखित केलंय.

  • 25 Jan 2021 10:30 AM (IST)

    धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

    औरंगाबादः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर पहिल्यांदा भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करत होत्या. अखेर पंकजा मुंडेंनी आज यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे.

  • 25 Jan 2021 10:24 AM (IST)

    पाली खंडोबा यात्रा रद्द झाली असल्याने पाली आणि मंदिर परिसरात शुकशुकाट

    कराड – पाली खंडोबा यात्रा रद्द झाली असल्याने पाली व मंदिर परिसरात शुकशुकाट

    लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणाऱ्या पालीच्या खंडोबाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस

    खंडोबा मंदिर 30 जानेवारी पर्यंत दर्शनासाठी बंद राहणार

    मोजक्या लोकांच्या उपस्थितीत यात्रेचा होणार धार्मिक सोहळा

    पाली गाव व मंदिर परिसरातील दहा किलोमीटर मध्ये जाण्यास नागरिकांना मज्जाव

    पोलीस प्रशासन व मंदिर समितीकडून चोख व्यवस्था

  • 25 Jan 2021 10:23 AM (IST)

    शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा

    सांगली – दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा.

    मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गावा गावातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन निघाले.

    सांगली जिल्ह्यातील अनेक गावातून शेतकरी मोर्चामध्ये होणार सहभागी.

    मोर्चाच्या ठिकाणी ट्रॅक्टर जमा होऊ लागले.

    मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त केला तैनात.

    सांगली विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून ते कोल्हापूर असा मार्ग आहे.

  • 25 Jan 2021 10:15 AM (IST)

    ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा एल्गार

    औरंगाबाद :   रविवारी जालन्यात ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत कुछ यादे म्हणत आपल्याच सरकारला काही वाद्यांची आठवण करुन दिली होती. आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन पंकजांनी आक्रमक भूमिका घेतलीय. ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असा एल्गार पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. त्या औरंगाबादमध्ये बोलत होत्या. (Bjp Pankaja Munde Statement on OBC Census)

  • 25 Jan 2021 10:11 AM (IST)

    धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं

    धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे, तरीही नैतिक आणि संविधानिकदृष्ट्या, कायदेशीदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करणार नाही, तरीही कुठलीही अशा गोष्टीमुळे कुटुंबाला आणि कुटुंबातील मुलांना याचा त्रास होता, एक महिला म्हणून मी या विषयाकडे संवेदनशीलपणे बघते, हा विषय कोणाचाही असता तरी याचं राजकीय भांडवल मी कधीही केलं नसतं

  • 25 Jan 2021 10:08 AM (IST)

    सरकारचे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचेच – पंकजा मुंडे

    सरकारचे निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचेच, आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी आणि त्यांच्या कॅबिनेटने घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, आताही सकारात्मक चर्चा करण्यास सरकार तयार

  • 25 Jan 2021 10:06 AM (IST)

    शेतकरी मोर्चाबाबत सरकार सकारात्मक – पंकजा मुंडे

    शेतकरी मोर्चाबाबत सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत, यातून सरकार मार्ग काढेल, सरकार सकारात्मक आहे

  • 25 Jan 2021 10:04 AM (IST)

    माझे ट्विट सध्या हिंदीत कारण मी राष्ट्रीय स्तरावर काम करतेय – पंकजा मुंडे

    माझे ट्विट सध्या हिंदीत कारण मी राष्ट्रीय स्तरावर काम करतेय, त्यामुळे माझी मतं मी हिंदीत व्यक्त करते,

  • 25 Jan 2021 10:03 AM (IST)

    ओबीसींची जनगणना ही झालीच पाहिजे – पंकजा मुंडे

    ओबीसींची जनगणना ही झाली पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी वेळोवेळी मांडली आहे, खासदार प्रीतमं मुंडेंनेही याबाबत लोकसभेत मुद्दा उचलला, आता जनगणना होणार आहे, ती होत असताना सकारात्मक पाऊलं उचलली गेली पाहिजे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट  स्पष्ट होईल आणि आपल्याला त्या समुदायाला न्याय देणं सोपं होईल

  • 25 Jan 2021 09:45 AM (IST)

    पुणे पालिकेच्या शिक्षण विभागात पदोन्नती घोटाळा

    पुणे पालिकेच्या शिक्षण विभागात पदोन्नती घोटाळा, शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांना अनधिकृत पदोन्नती आणि हंगामी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम केल्याचा धक्कादायक प्रकार, पालिकेच्या शिक्षण मंडळातील घोटाळा, सध्या पालिकेचं शिक्षण मंडळ बंद करण्यात आलंय, मात्र शिक्षण मंडळाच्या विद्यमान शिक्षणप्रमुख मिनाक्षी राऊत,सुधाकर तांबे आणि रामचंद्र जाधव यांना पालिकेचा दणका, पालिकेच्या अतिरीक्त आयक्त रुबल अग्रवाल यांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, पदोन्नतीतला घोटाळा संशयाच्या भोवऱ्यात, पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच अतिरीक्त आयुक्तांची नोटीसीची तंबी, कारवाई होणार ?

  • 25 Jan 2021 09:32 AM (IST)

    निफाडचा किमान पारा घसरला, 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

    लासलगाव : निफाडचा किमान पारा घसरला, 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद

  • 25 Jan 2021 09:32 AM (IST)

    बनावट सहीच्या आधारावर पुणे महापालिकेने एका ठेकेदाराला 5 कोटी अदा केले

    बनावट सहीच्या आधारावर पुणे महापालिकेने एका ठेकेदाराला केलेत 5 कोटी अदा, महापालिकेतील सेवानिवृत्त अतिवरीष्ठ अधिकाऱ्याची बनावट सही करून पैसा लाटला, पुणे महापालिकेच्या मलनिस्सारण प्रकल्प विभागामध्ये हा घोटाळा झाल्याची माहिती, पालिका पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या संगनमताने हा गंभीर प्रकार घडल्याची चर्चा, दरम्यान याप्रकरणाचा पालिकेच्या मुख्य लेखापाल उल्का कळसकर तपास करत आहेत.

  • 25 Jan 2021 08:20 AM (IST)

    -आजपासून नाशिक बेळगाव विमानसेवेला सुरुवात

    नाशिक – आजपासून नाशिक-बेळगाव विमानसेवेला सुरुवात, नाशिक विमानतळाने ओलांडला 2 लाख प्रवाशांचा टप्पा, नाशिककरांचा विमानसेवेल उदंड प्रतिसाद, लॉकडाऊन नंतर अवघ्या 1 महिन्यात 15 हजार नाशिककरांनी केला विमान प्रवास, मार्चपर्यंत गोवा , चेन्नई , कोलकाता विमानसेवा देखील होणार सुरू

  • 25 Jan 2021 08:04 AM (IST)

    नाशकात कंपनीच्या आवारातून कॉपर चोरणारे तिघे जण अटकेत

    नाशिक : कंपनीच्या आवारातून कॉपर चोरणारे तिघे जण अटकेत, सातपूर एमआयडीसी मध्ये एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारातून चोरले होते कॉपर चे बंडल, वडाळा गावात हे कॉलर विकतानाच पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात, या त्रिकुटाने आणखीही काही चोऱ्या केल्या का याचा तपास सुरू

  • 25 Jan 2021 08:03 AM (IST)

    सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी 900 कोटींचा प्रकल्प

    सायबर गुन्ह्याविरुद्ध लढण्यासाठी 900 कोटींचा प्रकल्प, प्रकल्पाअंतर्गत सायबर गुन्हे विभाग अत्याधुनिक करणार,  गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती, राज्यात सायबर गुन्हे वाढल्याबाबत व्यक्त केली चिंता

  • 25 Jan 2021 07:49 AM (IST)

    नागपुरात आपली बसच्या प्रवाशी संख्येत वाढ

    नागपुरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या आपली बसच्या प्रवाशी संख्येत वाढ, कोव्हिडमुळे ऑक्टोबर महिन्यात बस सुरु झाली मात्र प्रवाशी संख्या 20 टक्के होती, आता त्यात वाढ होऊन 50 टक्के इतकी प्रवाशी संख्या झाली, दररोज 52 हजार प्रवाशी करतात आपली बस मधून प्रवास, 55 मार्गावर धावतात 170 बसेस, प्रवाशी संख्या वाढत असल्याने महापालिकेचा महसुल सुद्धा वाढत आहे, नागरिकांमध्ये आता कोविड संदर्भातील भीती कमी व्हायला झाली सुरवात

  • 25 Jan 2021 07:44 AM (IST)

    गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेले ‘आरटीई’ प्रवेश संकटात, राज्य सरकारकडून निधी वितरीत केला जात नसल्याचा आरोप

    गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेले ‘आरटीई’ प्रवेश संकटात, राज्य सरकारकडून निधी वितरीत केला जात नसल्याचा आरोप, सरकारविरोधात नागपूर जिल्ह्यातील शिक्षणसंस्था चालकांचा संताप, 2020-21 चा ‘आरटीई‘ प्रवेश कार्यक्रम जाहीर, ‘निधी नाही तोपर्यंत प्रवेश नाही’ शिक्षणसंस्था चालकांचा इशारा, हजारो विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर संक्रांत

  • 25 Jan 2021 07:13 AM (IST)

    नागपूर महानगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात, निधी नसल्याने शहरातील विकास कामांवर मोठा परिणाम

    नागपूर : नागपूर महानगरपालिका मोठ्या आर्थिक संकटात, गेल्या सरकारने मंजुर केलेल्या 157 कोटींपैकी एक रुपयाही मिळाला नाही, निधी नसल्याने शहरातील विकास कामांवर मोठा परिणाम, ‘महाविकास आघाडी सरकार मुद्दामून निधी देत नसल्याचा आरोप’, भाजपचे प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांचा आरोप, निधीअभावी शहरातील 80 पेक्षा जास्त विकास कामं रखडली

  • 25 Jan 2021 07:10 AM (IST)

    एकनाथ खडसे यांच्यावरील ईडीच्या एफआयआर प्रकरणात आज सुनावणी

    मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावरील ईडीच्या एफआयआर प्रकरणात आज सुनावणी होणार आहे

  • 25 Jan 2021 07:09 AM (IST)

    शरद पवार आझाद मैदान येथील कृषी कायद्याच्या निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार

    मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज आझाद मैदान येथील कृषी कायद्याच्या निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनात ते सहभागी होणार आहेत

  • 25 Jan 2021 07:07 AM (IST)

    राजद्रोह प्रकरणात अभिनेत्री कंगना आणि रांगोली चंदेल यांच्यावर आज सुनावणी

    राजद्रोह प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत आणि बहीण रांगोली चंदेल यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे

  • 25 Jan 2021 07:01 AM (IST)

    मुबंई-पुणे हायवेवर खंडाळा घाटात KTM बाईकला अपघातात, एकाचा मृत्यू

    रायगड : मुबंई-पुणे हायवेवर खंडाळा घाटात KTM बाईकला अपघातात, एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी, अम्रुतांजन ब्रिजजवळ खडांळा हद्दीत बँट्रीहिल जवळ पहाटे झाला अपघात, पुण्याहुन मुबंईकडे जाताना झाला अपघात, गंभीर जखमी पवना रुग्णालयात उपचारार्थ दाखल

  • 25 Jan 2021 06:39 AM (IST)

    येवला आणि चांदवड तालुक्याच्या हद्दीवर डोंगरावर वणवा, झाडे-झुडपे, गवत जळून खाक होण्याच्या मार्गावर

    येवला आणि चांदवड तालुक्याच्या हद्दीवर कातरणी शिवारात वनविभागाच्या हद्दीत असलेल्या डोंगराला भीषण आग,  संपूर्ण डोंगर आगीने वेढला गेला असून डोंगरावरील झाडे-झुडपे गवत जळून खाक होण्याच्या मार्गावर, जवळील शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने शेतकऱ्यांना आग विझवता आली नाही, आगीचे कारण अद्यापही समजले नाही

  • 25 Jan 2021 06:33 AM (IST)

    विवाह सोहळ्यात जेवण केल्याने जवळपास 200 जणांना विषबाधा, उदगीर तालुक्यातील घटना

    लातुर : विवाह सोहळ्यात जेवण केल्याने जवळपास 200 जणांना विषबाधा, उदगीर तालुक्यातल्या वाढवणा येथील घटना, चक्कर, उलटी अशी लक्षणे अनेकांना जाणवल्याने दवाखान्यात केले भरती, वाढवणा, जळकोट आणि उदगीरच्या दवाखान्यात वऱ्हाडी रुग्णांवर सुरू, उपचार, कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याची डॉक्टरांनी दिली माहिती

Published On - Jan 25,2021 10:11 PM

Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.