LIVE | भांडूपमध्ये भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

| Updated on: Jan 28, 2021 | 11:52 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | भांडूपमध्ये भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Jan 2021 10:06 PM (IST)

    भांडूपमध्ये भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

    भांडूपच्या भीषण आग, सोनापूरमधील कपड्यांच्या गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

    में भीषण आग गारमेंट के गोदाम 8 फायर इंजन 10 वाटर टैंकर मौके पर मौजूद आग बुझाने का प्रयत्न शुरू

  • 28 Jan 2021 07:12 PM (IST)

    राज्यातील सिंचन प्रकल्प का बंद आहेत; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

    राज्यातील सिंचन प्रकल्प बंद असल्याचा दावा करत हे प्रकल्प बंद का आहेत असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे. फडणवीस यावेळी म्हणाले की, अनेकांना चांगलं भाषण करता येतं. पण संघर्षाची वेळ आल्यावर ते लोक पळ काढतात.

  • 28 Jan 2021 06:58 PM (IST)

    मुंबईला नाईट लाईफची गरज, त्यासाठी सुरक्षा पुरवू : अजित पवार

    मुंबईची नाईट लाईफ वेगळी आहे, आजच्या तरुणांना ही योजना आवडेल, आम्ही त्यास सुरक्षा पुरवू. काही लोक याला विरोध करतील पण मुंबईला नाईट लाईफची गरज आहे.

  • 28 Jan 2021 06:57 PM (IST)

    मुंबईचा चेहरामोहरा बदलायला हवा : अजित पवार

    मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे आहे, मुख्यमंत्री सेनेचा आहे. मुंबईचा चेहरामोहरा एकदम बदलता येणार नाही पण मुंबईतील रस्त्यांवर टपऱ्या, बकालपणा दिसत आहे, यात बदल झाला पाहिजे.

  • 28 Jan 2021 06:55 PM (IST)

    हेरिटेज वॉकला मराठी शब्द शोधायला हवा, मराठीचा वारसा जपला पाहिजे : अजित पवार

    हेरिटेज वॉकला मराठी शब्द शोधायला हवा, तसेच आपण मराठीचा वारसा जपला पाहिजे, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत. अजित पवार म्हणाले की, पर्यटन मंत्री चांगलं काम करत आहेत. मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाला नव्हती. आज आदित्य ठाकरे यांच्यामुळे पालिकेत येता आलं.

  • 28 Jan 2021 05:43 PM (IST)

    मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत उद्घाटन

    मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रमाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं आहे.

  • 28 Jan 2021 05:43 PM (IST)

    मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित

    मुंबईत हेरिटेज वॉक कार्यक्रम, महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित

  • 28 Jan 2021 03:55 PM (IST)

    CBSE च्या 10 वी आणि 12 वीचं वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जाहीर होणार: रमेश पोखरियाल निशंक

    केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 2021 च्या CBSE परीक्षांबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड(CBSE) च्या परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

  • 28 Jan 2021 03:02 PM (IST)

    राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट रद्द, मात्र कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    राज ठाकरे यांच्यावरील वॉरंट वाशी न्यायालयाने केले रद्द, मात्र 6 फेब्रुवारीला ठाकरे यांना कोर्टात हजर रहाण्याचे आदेश, जामीन न घेतल्याने कोर्टात हजर रहाण्याचे आदेश, न्यायाधीश बडे यांच्या दालनात झाली सुनावणी, 26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे वाशी येथील मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केले होते, यावेळी गजानन काळे यांनी कार्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता. 30 जानेवारी 2014 ला राज ठाकरे यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला, या प्रकरणी राज ठाकरे यांना 2018 , 2020 समन्स आणि वॉरंट काढण्यात आले होते. आज ते वॉरंट कॅन्सल झाले आहे मात्र 6 फेब्रुवारीला कोर्टात उपस्थित राहणे गरजेचे

  • 28 Jan 2021 01:55 PM (IST)

    देवेंद्रजी, मुंबई मेट्रो – ३ मध्ये तुम्हाला प्रवास व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल: महेश तपासे

    मुंबई मेट्रो – ३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांची अपेक्षा आहे असा टोला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

  • 28 Jan 2021 01:54 PM (IST)

    राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांचा बहिष्कार; गुलाम नबी आझादांची माहिती

    29 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 16 राजकीय पक्षांनी याबाबत प्रसिद्धीत्रक जारी केले आहे. कृषी कायदे ज्या पद्धतीनं लादण्यात आले त्याचा विरोध दर्शवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली.

  • 28 Jan 2021 01:53 PM (IST)

    ..अन्यथा 30 जानेवारीच्या आंदोलनावर ठाम : अण्णा हजारे

    गिरीश महाजन यांनी दिलेल्या ड्राफ्टची अण्णा हजारे यांची तज्ज्ञांची टीम अभ्यास करणार, ड्रॉफ्टमधील उणिवा दुरुस्त करून पुन्हा केंद्राला पाठवणार, समाधानकारक उत्तर मिळाल्यास आंदोलनावर विचार करणार, अन्यथा 30 जानेवारीला आंदोलन करण्याच्या विचारावर ठाम

  • 28 Jan 2021 01:36 PM (IST)

    खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह

    मराठा समाजाच्या वेदना माध्यमांनी सर्वांपर्यंत पोहोचवल्या आहेत.

    अण्णासाहेब पाटील यांचा जन्म एका छोट्या खेड्यात झाला.

    अण्णासाहेब पाटील यांनी शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन काम केले.

    दुसऱ्याचां लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही?

    सर्वांना वाटतं मराठा समाज फार सधन आहे. मात्र, मराठा समाजातील मजुरांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती फार वाईट आहे.

    जास्त मार्क मिळवूनसुद्धा अ‌ॅडमिशन मिळत नसेल तर हा मराठा समाजावरील अन्याय आहे.

    लोकप्रतिनीधी तुमच्या अधिकारासाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुन्हीपण तुमच्या साठी लढणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायलां पाहिजे.

    मला नेत्यांना एकच विनंती करायची आहे की लोकांचा अंत पाहू नका, एकादा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार. हा उद्रेक नक्की होणार.

    आपल्याकडे पुढची पिढी आशेने बघत आहे.

    नरेंद्र पाटलांना आज अण्णासाहेब फाऊंडेशनची स्थापना केली. त्यांनी त्यांचं आयुष्य मराठा समाजासाठी अपर्ण केलं आहे.

    अण्णासाहेब पाटील यांच्या कामाबद्दल मी ऐकूण आहे. त्यांचं काम खूप मोठं आहे.

    राजकारण थांबलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी विचार केलां पाहिजे.

    यांना कोणती भाषा कळते हे समजत नाही. लोकांनी मोर्चे काढले. तरी यांना कळत नाही.

  • 28 Jan 2021 01:18 PM (IST)

    छत्रपती शिवेंद्रराजे यांचे भाषण लाईव्ह

    अण्णासाहेब पाटलांचं काम आपल्याला माही आहे.

    मराठा आरक्षणाबद्दल जी चर्चा सुरु आहे. कोर्टात जी चर्चा सुरु आहे. त्याचा पाया अण्णासाहेब यांनी रचला आहे.

    त्यांच्या कार्याला विसरता येणार नाही.

    अण्णासहेबांच्या कामात खोडा घालण्याचं काम काही शक्तींकडून केलं जातं

    ज्यांना आरक्षणाची गरज आहे. त्यांना हा फायदा मिळू न देण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे.

    आणखी एक कोपर्डीसारखी घटना होण्याचा आपण वाट पहातो आहोत का. आपण कधी एकत्र येणा आहोत.

    मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर राजकारण बाजूला ठेवून समाज म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे.

    मराठा समाजातील प्रत्येकाने या गोष्टीवर विचार करणे गरज आहे.

    मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वांनी राजकीय चौकट बाजूला ठेवण्याची गरज आहे.

    उदयनराजे, संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा पुढे नेला जावा

    प्रत्येक जिल्ह्यात कोणीतरी बैठक घेतो.  नवी मागणी करतो. मात्र, आरक्षणाचा मुद्दा सर्वांनी एकत्र येऊन लढालयला पाहिजे.

    अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील गरजूंना मदत केली.

    नरेंद्र पाटील यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे.

    देवेंद्र फडणवी, नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण कोर्टात टिकवलं

    महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकलं.

    राज्य सरकारवर मराठा समाजाने दबाव टाकणे गरजेचं आहे.

    मराठा आरक्षणावरील स्थगित उठवण्यासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका मांडली पाहीजे.

    हातातोंडाला आलेला घास आपल्याला परत मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी याची दखल घ्यावी.

    मी कोणत्याही पक्षाकडून बोलत नाही. एक मराठा समाजातील घटक म्हणून बोलत आहे.

  • 28 Jan 2021 12:48 PM (IST)

    मराठ्यांच्या राजधानीतून ही आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची चळवळ सुरु होत आहे – नरेंद्र पाटील

    सातारा : मराठ्यांच्या राजधानीतून ही आण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची चळवळ सुरु होत आहे – नरेंद्र पाटील

  • 28 Jan 2021 12:46 PM (IST)

    एक मराठा एक लाख मराठा उद्योजक ही संकल्पना राबवत आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे उद्घाटन

    सातारा : ‘एक मराठा एक लाख मराठा उद्योजक’ ही संकल्पना राबवत आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे होणार उद्घाटन, अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची माहिती, आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे उद्घाटनाच्या कार्यक्रम स्थळी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती शिवेंद्रराजे भोसले पोहोचले, मात्र छत्रपती संभाजीराजे यांची कार्यक्रमाकडे पाठ,

  • 28 Jan 2021 12:41 PM (IST)

    भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांना दिल्ली पोलिसांची कारणे दाखवा नोटीस

    भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांना दिल्ली पोलिसांची कारणे दाखवा नोटीस, 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडच्या नियम आणि अटींचे उल्लंघन का झाले याबाबतचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे, परेडच्या नियम आणि अटीं मान्य असल्याचे राकेश टिकेत यांनी पोलिसांना लेखी दिले होते, या आंदोलनात धुमाकूळ घालणाऱ्यांचे नावे दिल्ली पोलिसांनी मागितले आहेत, या सगळ्या प्रकारावर तीन दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे

  • 28 Jan 2021 12:40 PM (IST)

    गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनातून वीएम सिंग यांच्या नॅशनल किसान मजदूर संघटनेची माघार

    नवी दिल्ली : गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनातून वीएम सिंग यांच्या नॅशनल किसान मजदूर संघठनने माघार घेतली, मात्र, राकेश टिकेत यांची भारतीय किसान यूनियन अजूनही आंदोलनाच्या भुमिकेवर ठाम, गाजीपूर बॉर्डर वरील गर्दी ओसरली, चिल्ला बॉर्डर आणि नोयडा बॉर्डरवरील आंदोलन पूर्णपणे मागे

  • 28 Jan 2021 12:38 PM (IST)

    कुणीतरी स्क्रीन शॉट काढून हा खोडसाळपणा केलाय, नावासमोर आक्षेपार्ह उल्लेखप्रकरणी रक्षा खडसेंचं मत

    जळगाव – खासदार रक्षा खडसे यांच्या पक्षाच्या वेबसाईटवर त्यांच्या नावासमोर आक्षेपार्ह उल्लेख, पक्षाच्या ऑफिशियल वेबसाइटवर असा कुठलाही उल्लेख नाही, कुणीतरी स्क्रीन शॉट काढून हा खोडसाळपणा केल्याचं मला वाटते, तरी कोणत्याही महिलेबद्दल असा आक्षेपार्ह लिहणे चुकीचा आहे – भाजप खासदार रक्षा खडसे

  • 28 Jan 2021 12:36 PM (IST)

    पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात 40 वाहनांची तोडफोड, चार जण ताब्यात

    पुणे – पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आलीये, आंबेडकर नगर भागात 40 वाहनांची तोडफोड झाली आहे, चार जणांच्या टोळक्यांनी केली तोडफोड केल्याची घटना आहे, तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न, पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 28 Jan 2021 11:41 AM (IST)

    मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु झाल्यावर मोठी गर्दी उसळेल – विजय वडेट्टीवार

    मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु झाल्यावर मोठी गर्दी उसळेल, लोकलमध्ये गर्दी झाल्यावर कोरोना संक्रमण वाढण्याची भिती, त्यामुळेच लोकल सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री सावध पावलं उचलतायत,  परवा सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याबाबत महत्त्वाची बैठक,  त्या बैठकीत मुंबई लोकलबाबत निर्णय होणार

  • 28 Jan 2021 11:33 AM (IST)

    यासंदर्भात मला कल्पना नाही, राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार,

    राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा ईडी नोटीसीवर बोलण्यास नकार, यासंदर्भात मला कल्पना नसल्याचं विश्वजित कदम यांचं स्पष्टीकरण, सध्या यावर मी बोलणार नसल्याचंही कदम यांचं म्हणणं, विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीकडून नोटीस आल्याची सूत्रांकडून माहिती, बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासंदर्भात कन्या स्वप्नाली कदम यांना नोटीस आल्याची माहिती

  • 28 Jan 2021 11:12 AM (IST)

    मालमत्ता करात केवळ दहा टक्के सवलत, भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

    अतूल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला, मालमत्ता करात केवळ दहा टक्के सवलत, सरकारने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसल्यची टिका,

  • 28 Jan 2021 10:31 AM (IST)

    सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे, दडपशाही आणायची आहे – संजय राऊत

    लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले म्हणाले, ते खरंच शेतकरी होते का, जे आता फोटो आले आहे पंतप्रधानांसोबतचे, भाजपच्या नेत्यांबाबत, ते लोक कोण आहेत, कुठे फरार झाले आहेत, आधी याचा तपास घ्या, पण सरकारला शेतकऱ्यांना चिरडून टाकायचं आहे, दडपशाही आणायची आहे, त्याचाच एक भाग म्हणजे आंदोलनात फूट पाडून, तिथला एक गट जो भाजपच्या नेतृत्त्वाखाली आतमध्ये घुसला आणि ते लाल किल्ल्यावर गेले, त्यांनी हडकंप माजवला, आंदोलनात फूट, नेत्यांवर गुन्हे, शेतकऱ्यांना पाहून घेऊ अशी भाषा पोलीस करत आहेत,  अधिवेशनात या सर्व प्रश्नांची सरकारला उत्तरं द्यावी लागतील

  • 28 Jan 2021 10:31 AM (IST)

    ही लढाई आपली भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी – संजय राऊत

    वेळगाव सोडा मुंबईही आमचीच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार, असे वेडे बरळत असतात म्हणत संजय राऊतांकडून उत्तर, बेळगाव प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी काल भूमिका स्पष्ट केली, ही लढाई आपली भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी, आम्ही देशाच्या बाहेर जायला सांगत नाहीये, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी, की ते सर्व आमचेच आहेत, उद्या त्यांचंही मतदान घेतलं तर ते हेच सांगतील की बेळगाव महाराष्ट्रात आलं पाहिजे

  • 28 Jan 2021 10:14 AM (IST)

    गिरीश महाजन पुन्हा राळगेणसिद्धीत, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट

    अहमदनगर -भाजप नेते गिरीश महाजन पुन्हा राळगेणसिद्धी येथे दाखल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली भेट, गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यात चर्चा सुरु, 6 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली होती, आज पुन्हा गिरीश महाजन यांनी घेतली भेट, 30 जानेवारीला अण्णा सुरु करणार उपोषण

  • 28 Jan 2021 09:08 AM (IST)

    भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत

    कोल्हापूर : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत, कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्ष सोडण्यावर शिक्का मोर्तब झाल्याची माहिती, गोपळाराव पाटील कार्यकर्त्यासह काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याची शक्यता, चंदगड मधील मोठा गट असलेल्या गोपाळ पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी केला होता भाजपमध्ये प्रवेश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून पक्ष प्रवेशा वेळी दिलेला शब्द पाळला जात नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, पक्षाकडून सन्मानही मिळत नसल्याने पाटील यांच्यासह गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

  • 28 Jan 2021 09:05 AM (IST)

    आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेकडून नव्या चेहऱ्यांना संधी, पालकमंत्री सुभाष देसाईंसोबतच्या गुप्त बैठकीत निर्णय

    औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबतच्या गुप्त बैठकीत निर्णय, मार्च महिन्यात औरंगाबाद महापालिका निवडणूक होण्याची शक्यता, निवडणुका गृहीत धरून शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर असेल महापालिकेचा भर

  • 28 Jan 2021 09:04 AM (IST)

    नाशिकची बाळ यशूची यंदाची यात्रा रद्द

    नाशिक – बाळ यशूची यंदाची यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय, भाविकांच्या दर्शनात खंड होऊ नये यासाठी ऑनलाईन दर्शन, 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार ऑनलाईन नोव्हेना, तर 13 आणि 14 तारखेला ऑनलाईन मेस्सा, नाशिकच्या बाळ येशू यात्रेला दरवर्षी देशभरातून येतात भाविक

  • 28 Jan 2021 09:03 AM (IST)

    धवलसिंह मोहिते-पाटील आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

    सोलापूर – धवलसिंह मोहिते-पाटील आज करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, धैर्यशील मोहिते पाटील दिवंगतमाजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात करणार प्रवेश, शिवसेना, राष्ट्रवादी, आणि आता काँग्रेस असा धवलसिंह यांचा राजकीय प्रवास

  • 28 Jan 2021 09:02 AM (IST)

    टिप्पर गॅंगचा म्होरक्या समीर पठाणला अटक, भद्रकाली पोलिसांनी समीर पठाणला इगतपुरीतून घेतलं ताब्यात

    नाशिक – टिप्पर गॅंगचा म्होरक्या समीर पठाणला अटक, भद्रकाली पोलिसांनी समीर पठाणला इगतपुरीतून घेतलं ताब्यात, अपहरण करून मारहाण केल्याचा होता आरोप, फरार समीर पठाण सध्या शिवसेनेच्या अवजड वाहतुक सेनेचा पदाधिकारी, कुख्यात समीर पठाणच्या वाढदिवसाला लोकप्रतिनिधींनी लावली होती हजेरी

  • 28 Jan 2021 09:02 AM (IST)

    खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून तक्रार दाखल

    औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने तक्रार दाखल, खासदार इम्तियाज जलील आणि अभियंता अशोक येरेकर यांच्या विरोधात तक्रार, हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याचा तक्रारीत उल्लेख, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल, काल झाली होती इम्तियाज जलील यांच्यासमोर बाचाबाची, बचाबाचीच व्हिडीओ झाला होता सोशल मीडियात व्हायरल

  • 28 Jan 2021 08:59 AM (IST)

    टेबल बुक करून देखील जागा न मिळाल्याने वाद, नाशिकच्या हॉटेलमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन हाणामारीत

    नाशिक – टेबल बुक करून देखील जागा न मिळाल्याने वाद, नाशिकच्या एसएसके हॉटेलमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसन हाणामारीत, हॉटेल मालकासह व्यवस्थापक, कर्मचार्यांविरोधात जबरी लुटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल, तर व्यवस्थावकाच्या तक्रारीवरून ग्राहकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल, परस्पर विरोधी गुन्हे दाखल असले तरी अद्याप कोणालाही अटक नाही, मुंबई नाका पोलिसांचा तपास सुरु

  • 28 Jan 2021 08:58 AM (IST)

    नाशकात 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु, विद्यार्थ्यांचा मात्र अल्प प्रतिसाद

    नाशिक – 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु, विद्यार्थ्यांचा मात्र अल्प प्रतिसाद, पाचवी ते आठवीच्या वर्गांमध्ये पहिल्या दिवशी फक्त 25 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, पालकांचे संमती पत्र न मिळाल्याने अनेक खाजगी शाळा अजूनही बंदच, ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण सुरू असल्याने शिक्षकांची मात्र तारेवरची कसरत, शाळांमध्ये कोरोना संदर्भात उपाययोजना करून देखील पालकांमध्ये मात्र भीती कायम

  • 28 Jan 2021 08:57 AM (IST)

    सरपंच पदाची लॉटरी जाहीर होताच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु

    सोलापूर : सरपंच पदाची लॉटरी जाहीर होताच काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु, करमाळा तालुक्यातील देवळाली, हिवरवाडी ,मांगी ,साडे, देवीचामाळ ग्रामपंचायतीसाठी काठावर बहुमत, दगाफटका टाळण्यासाठी अनेक सदस्य सहलीला, तर अनेक ठिकाणी अपक्ष सदस्याला भलतेच महत्त्व प्राप्त

  • 28 Jan 2021 08:56 AM (IST)

    कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस 3 फेब्रुवारीपासून धावणार

    कोल्हापूर : कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस 3 फेब्रुवारीपासून धावणार, रेल्वे प्रशासनाने काढले आदेश, दोन दिवसात होणार बुकिंगला सुरुवात, महालक्ष्मी एक्सप्रेस नंतर हरिप्रिया एक्सप्रेस ही सुरू होत असल्याने प्रवाशांतून समाधान, लॉकडाऊनमुळे गेल्या 26 मार्च पासून बंद होती रेल्वेसेवा

  • 28 Jan 2021 08:26 AM (IST)

    निफाडचा किमान पारा घसरला, 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

    निफाडचा किमान पारा घसरला, 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद, कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात नोंद

  • 28 Jan 2021 08:26 AM (IST)

    नाग नदीत बोटीने प्रवासाचं गडकरींचं स्वप्न साकार होणार का?

    नागपुरातील नाग नदिचं होणार पुनरुज्जीवन, नाग नदी पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणासाठी 1700 कोटी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा नाग नदी पुनरुज्जीवनामुळे नागपूरच्या सौंदर्यात पडणार भर,  नाग नदीत बोटीने प्रवासाचं गडकरींचं स्वप्न साकार होणार का?

  • 28 Jan 2021 08:25 AM (IST)

    नवी मुंबईत ट्रकला आग, आगीत टाटा कंपनीचा ट्रक जळून खाक

    नवी मुंबईत ट्रकला आग, आगीत टाटा कंपनीचा ट्रक जळून खाक, सकाळी 7 च्या सुमारास आग आग लागल्याची माहिती, रबाळे रेल्वे स्टेशन समोर ठाणे पनवेल हायवे वरील घटना, आगीत कुठलीही जीवितहानी नाही, आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 28 Jan 2021 08:22 AM (IST)

    पुणे शहरात बुधवारी 83 टक्के लाभार्थींचे लसीकरण

    पुणे – बुधवारी दिवसभरात पुणे शहरात 83 टक्के लाभार्थींचे लसीकरण, लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून शहरात झालेले हे सर्वाधिक लसीकरण,  को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक अडथळे कमी झाल्यामुळेही लसीकरण वाढल्याचे चित्र, 1700 लाभार्थींना लस देण्याचे नियोजन होते. त्यांपैकी 1403 जणांचे लसीकरण, रुबी हॉल क्लिनिकमध्ये १०० टक्के, जहांगीर रुग्णालयात 90 टक्के , के ईएम रुग्णालयात 101 टक्के लसीकरण झाले, ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सर्वात कमी 39 टक्के लसीकरण झाले,  पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांची माहिती.

  • 28 Jan 2021 08:21 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात विदर्भातील सर्वाधीक रेती तस्करी

    भंडारा जिल्ह्यात विदर्भातील सर्वाधीक रेती तस्करी, जिल्ह्यातील कोथुर्णा घाटावरील रेतीचोरी ‘टीव्ही 9’च्या कॅमेऱ्यात कैद, जिल्ह्यातील जवळपास सर्व घाटांवर सर्रास होते रेती तस्करी, लिलाव न होताच घाटावरील रेतीचा वारेमाप उपसा,  राज्य सरकारच्या रोज कोट्यवधी रुपयांचा महसूल चोरीला, रेती तस्करांना राजकीय नेत्यांचा आशिर्वाद असल्याचा आरोप, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता आरोप, प्रत्येक रेतीच्या गाडीवर नेत्यांचं कमिशन असल्याचा भाजपचा आरोप

  • 28 Jan 2021 07:18 AM (IST)

    नागपुरात इंधन दरवाढीमुळे स्टार बससेवेला महिन्याचा एक कोटीचा फटका

    इंधन दरवाढीचा फटका नागपूर शहर बससेवेला, इंधन दरवाढीमुळे स्टार बससेवेला महिन्याचा एक कोटीचा फटका्, नागपूर मनपाचा परिवहन विभाग मोठ्या आर्थिक संकटात, डिझेलचा दर ६२ रुपयांवर गेल्यानं वाढलं संकट

  • 28 Jan 2021 06:41 AM (IST)

    भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला भीषण आग

    भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीस भीषण आग ,घटनास्थळी भिवंडीसह कल्याण, ठाणे, उल्हासनगर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल

  • 28 Jan 2021 06:40 AM (IST)

    जळगाव जंगलात भीषण आग

    जळगाव : शिरसोली रस्त्यावर रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात जंगलात रात्री अचानक आग, अग्निशमन बंबांसह मोहाडी येथील ग्रामस्थांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, शिरसोली रोडवर रुस्तमजी शाळेलगत  जंगलाला अचानकपणे आग, बघता बघता सात ते आठ किलो मीटरपर्यंतच्या जंगलात ही आग वेगाने पसरली, आगीचा प्रकार लक्षात येताच चौधरी नामक व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. या दरम्यान मोहाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ही आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, ग्रामस्थांसह तरूणांकडुन झाडाच्या फांद्या तोडून ग्रामस्थांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या चार अग्निशमन बंबाच्या सहायाने आग विझविण्यात आले

  • 28 Jan 2021 06:35 AM (IST)

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बगंरुळहुन  मानवरहित मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, बगंरुळहुन  मानवरहित मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल, एमएमआरडीएने ट्विट्ट करत दिली माहिती, मे 2021 पासुन हि मेट्रो सेवा सुरु करु करण्याचा मानस, एकनाथ शिंदे यांनी बंगरुळ ला जाउन केली होती मेट्रोची पाहणी

Published On - Jan 28,2021 10:06 PM

Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.