LIVE | अविश्वास ठराव पारित झालेल्या सभापती उर्मिला गित्तेंचे पती शशिकांत गित्तेंना अटक
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
12 हजार कोटींचा खर्च पालखी मार्गासाठी करणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
संत तुकाराम पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग याच्या तीन पॅकेजवर काम सुरु झालं आहे. पालखी मार्ग सुंदर असेल. पालखी मार्गावर सुंदर रचना असेल. यावर जनतेच्या प्रतिक्रिया मागवण्यात येतील. पालखी मार्ग आणि पुण्यातील चांदणी चौकाबाबत चर्चा करणार आहे. 90 टक्के जमीन अधिग्रहीत झाल्यानंतर कामाला सुरवात होईल. 12 हजार कोटींचा खर्चा पालखी मार्गासाठी करण्यात येईल.
- मुंबई दिल्ली हायवेच्या महाराष्ट्रातील पॅकेजसच्या जमीन अधिग्रहणाचं काम सुरु आहे. नागपूर- हैदराबाद एक्स्प्रेसवे बांधणार आहे.
- मुंबई गोवा हायवे प्रोजेक्ट बद्दल स्टेट बँक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. एक वर्षाच्या आत मुंबई- गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करण्यात येईल.
- मुंबई गोवा महामार्गावर 180 किमी मार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे.
- महामार्ग निर्माण करताना जंगल आणि प्राणी संवर्धनासाठी खर्च करण्यात येत आहे.
- दिल्ली-मुंबई महामार्गाचे काम 45 टक्के पूर्ण झाले आहे. हा महामार्ग जेएनपीटी पर्यंत घेऊन जाणार आहे. महाराष्ट्र सरकारची मदत घेण्यात येणार आहे.
- उत्तर भारतातून दक्षिण भारतात जाणारं ट्रॅफिक मुंबई-पुणे-हैदराबाद येथून जात होता. आता आम्ही सुरत -नाशिक-सोलापूर असा नवीन ग्रीन हायवे उभारणार आहे. यामुळे मुंबई आणि पुण्याची वाहतूक कमी होणार आहे.
- महाराष्ट्र राज्यासाठी 5 हजार 800 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
- महाराष्ट्रासाठी महत्वाचे असणारे देहू-पंढरपूर आणि पंढरपूर आळंदी महामार्ग महत्वाचे आहेत. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. हा महामार्ग चौपदरीकरण असेल. महाराष्ट्र सरकारनं जमीन दिल्यासं पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सभागृह उभारणायत येईल. पालखी मार्गाभोवती चालण्यासाठी गवताचा ट्रॅक तयार करण्यात येईल. पर्यावरण, जमीन अधिग्रहण याचा प्रश्न सोडवला जाईल.
- फास्टॅग 75 टक्के लोकांनी लावला आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येक वाहनामध्ये जीपीएस लावण्यात येईल. त्याद्वारे टोल रद्द होणार नाहीत फक्त टोलनाके रद्द होतील.
- महाराष्ट्रात 9 महिन्यानंतर आलो त्यामुळे राज्यातील काम कसं चाललंय तुम्हालाच माहिती, मविआच्या कामगिरीवर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
-
अविश्वास ठराव पारित झालेल्या सभापती उर्मिला गित्तेंचे पती शशिकांत गित्तेंना अटक
बीड: अविश्वास ठराव पारित झालेल्या सभापती उर्मिला गित्तेंच्या पतीला अटक, शशिकांत गित्ते यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. जमावबंदीचे नियम तोडून गर्दी जमविल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गित्तेंना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. आधी पत्नीवर अविश्वास ठराव, नंतर गित्तेंना अटक झाल्याने परळीत तणाव निर्माण झाला आहे.
-
-
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका आघाडी म्हणून लढवण्याची भूमिका : नवाब मलिक
आगामी काळातील महापालिका निवडणुका औरंगाबाद, मीरा भाईंदर आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातील निवडणुका आघाडी म्हणून निवडणुका लढाव्यात अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. औरंगाबादचं नामांतर पक्षाच्या आणि महाविकासआघाडीच्या अजेंड्यावर नाही. महाविकासआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही. जे चर्चा करतात त्यांची भूमिका आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले
-
CMO कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर पुन्हा एकदा संभाजीनगरचा उल्लेख
CMO कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर पुन्हा एकदा संभाजीनगरचा उल्लेख ट्विट
त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या.” -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 7, 2021
-
विद्याविहार रेल्वेस्थानकाच्या बुकिंग कार्यालयात अधिकाऱ्याचा गळफास
मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकात एका चीफ बुकिंग सुपरवायझरने आपल्या बुकिंग कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.कैलास कदम असं आत्महत्या केलेल्या सुपर वायझरचं नाव आहे. आज सकाळी कदम हे ड्युटीवर आले ते त्यांच्या केबिनमध्ये गेले आणि बराच वेळ झाला म्हणून ते बाहेर आले नाहीत. हे पाहून त्यांच्या सहकार्याने आवाज दिला पण त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली घाटकोपर पोलीस घटनास्थळी पोहचहले त्यांनी कदम यांना राजावाडी रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.पोलिसांनी याची माहिती कदम यांच्या नातेवाईकांना दिली.कदम हे कल्याणच्या कोळसेवाडी विभागात राहत होते.नेमकी कशामुळे कदम यांनी आत्महत्या केली याचा तपास घाटकोपर पोलीस करत आहेत
-
-
औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी
औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींची बैठक
मुंबई- सह्याद्री अतिथीगृह इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पोहचले, राष्ट्रीय महामार्गसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची थोड्याच वेळात बैठक
-
JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख ठरली, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी JEEAdvanced 2021 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा आयआयटी खरगपूरतर्फे 3 जुलै रोजी घेण्यात येईल.
-
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण सुनावणी,अर्णव गोस्वामींसह इतर दोन आरोपी गैरहजर
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाच्या सुनावणीला अर्णव गोस्वामींसह इतर दोन संशयित आरोपी न्यायालयात हजर राहिले नव्हते. सरकारी पक्षातर्फे आरोपींचे अटक वॉरंट काढण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्णव गोस्वामीनी न्यायालयात हजर राहणे सक्तीचे की त्यांना मुभा देण्यात येणार याचा फैसला 6 फेब्रुवारीच्या सुनावणीत होणार.
-
मेटेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, 12 पैकी 6 विषयांवर चर्चा
विनायक मेटे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांशी बैठक झाली, विविध प्रश्नांवर चर्चा झाली. एकनाथ शिंदे, अनिल परब, यांच्यासह संघटनेचे 32 प्रतिनिधी बैठकीला होते. 12 विषय दिले होते, 6 ते 7 विषयांवर सखोल चर्चा झाली. 25 जानेवारीला आरक्षणाबाबत अंतिम सुनावणीबाबत सरकारमार्फत रणनीती आखली जाईल, अनिल परब आणि वकील विजयसिंग थोरात समन्वय करून योग्य रणनीती आखली जाईल. अनिल परब आणि वकील थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी बैठक होईल.
EWS केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेला 23 डिसेंबरला जो GR काढला होता त्यातील काही त्रुटी बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या, यामुळे नवा अध्यादेश काढला जाईल, तोपर्यंत हे आरक्षण लागू राहील.
sebc अंतर्गत 2014 मराठा समाजाच्या उमेदवारांनी नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांना नियुक्ती त्वरित देण्यासाठी मागणी, याबाबत आगामी आठवड्यात निर्णय होईल याबाबत खात्री आहे.
mpsc ने चुकीचा निर्णय घेतला होता याबाबतही चर्चा झाली, हे निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी, याबाबत सुधारणा पत्रक काढलं जाईल. घाईने कोणताही निर्णय घेणार नाही. अशोक चव्हाण यांच्याबाबतही चर्चा झाली त्यांना समितीत ठेवायचं की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
-
मंत्री अनिल परब आणि अॅड.विजयसिंह थोरात यांच्यावर वकिलांच्या समन्वयाची जबाबदारी: विनायक मेटे
राज्य सरकारला 12 विषय दिले होते. त्यापैकी 6 ते 7 विषयांवर निर्णय घेण्यात आली. 25 जानेवारीच्या सुनावणीत सरकार काय नियोजन करणार आहे याविषयावर चर्चा झाली. सरकारशी या चर्चेमध्ये मंत्री अनिल परब आणि अॅड. विजयसिंह थोरात यांनी वकील आणि इतरांशी समन्वय करावा, अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. सोमवारी वकीलांची बैठक घेण्यात येईल, असं शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.
-
केंद्र सरकार फंड देत नाही ही राज्य सरकारची रोजचीच बोंबाबोंब: देवेंद्र फडणवीस
कोरोनाकाळात मोठे संकट आला असताना भारतात नरेंद्र मोदी यांच्या सूचना आपण पाळत आलो. वेगवेगळ्या उपाय योजना आपण करत आलो. सर्वात जास्त मृत्यू आणि संख्या महाराष्ट्रामध्ये बघितले. समाजाच्या अनेक क्षेत्रातून कोरोना संकटात अनेकांनी कामे केली, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
रेल्वे स्थानकात एका चीफ बुकिंग सुपरवायझरची आत्महत्या
मुंबईतल्या विद्याविहार रेल्वे स्थानकात एका चीफ बुकिंग सुपरवायझरने बुकिंग कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
-
सुशांतसिंगच्या बहिणींची अडचण कायम, कोर्टानं निकाल राखला
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीनं केलेली याचिका फेटाळण्याची मागणी सुशांतच्या बहिणींने केली होती. मुंबई हायकोर्टानं याप्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे. दोन्ही बाजूंना एका आठवड्यात लेखी बाजू मांडण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.
#SushantSinghRajput death case: Bombay High Court reserve the order on an application filed by his sisters seeking quashing of FIR filed by Rhea Chakraborty, alleging their involvement in his death. Court also asked all the parties to file their written submissions within a week. pic.twitter.com/bCTdhaenS5
— ANI (@ANI) January 7, 2021
-
कर्जत – खालापूरसह खोपोलीमध्ये जोरदार पाऊस
कर्जत – खालापूरसह खोपोलीमध्ये जोरदार पाऊस, सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर जोरदार पाऊस बरसला, अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि वीटभट्टीधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
-
भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा टोरेंट पावर कंपनीच्या कार्यालयावर हल्ला
भिवंडीत मनसे कार्यकर्त्यांचा टोरेंट पावर कंपनीच्या कार्यालयावर हल्ला, मनोज गुळवी कार्यकर्त्यांसह वाढीव वीज बिल संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांना अडवल्याने प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या, भिवंडी शहरातील खंडू पाडा व अंजुरफाटा येथील कार्यालयावर चढविला हल्ला
-
संजय राऊत नाशकात दाखल, कार्यकर्त्यांची बैठक घेणार
संजय राऊत नाशकात दाखल, थोड्याच वेळात कार्यकर्त्यांची बैठक आणि कार्यालयांचे उद्घाटन करणार, उद्या पत्रकार परिषद घेण्याची शक्यता
-
कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 8 जणांचा चावा
कोल्हापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 8 जणांचा चावा, गांधीमैदान आणि दसरा चौकात परिसरातील घटना, 8 जणांवर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
-
भाजपला नामकरणावर बोलण्याचा अधिकार नाही; 5 वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केलं नाही : आदित्य ठाकरे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे माध्यम प्रतिनिधींशी बोलत आहेत. यावेळी ते मुंबईत केल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत सांगत आहेत.
> आजच्या बैठकीत मुंबईतील वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल यावर चर्चा झाली.
> मुंबईतलं पाणी साचणं कसं कमी होईल यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.
> रस्त्यावर लाईट्स, प्लेग्राऊंड, वाहतूक हाताळणी, कचरा व्यवस्थापन यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.
> विरोधकांचं काम टीका करणं आहे. आमचं काम जनतेसाठी काम करणं आहे. आम्ही ते करतो आहोत.
> मी औरंगाबादला जाणार आहे. तेथील विकासकामांचा आढावा घेणार आहे. भाजपला नामकरणावर बोलण्याचा आधिकार नाही. 5 वर्षे सत्तेत असताना त्यांनी काही केलं नाही.
>> आज पाणि तुंबणे आणि रस्त्यावरील वाहतूक यावर चर्चा झाली आहे.
-
ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB पुन्हा समन्स बजावणार
ड्रग्ज प्रकरणात अर्जुन रामपालच्या बहिणीला NCB पुन्हा समन्स बजावणार, कोमल रामपाल अर्जुन रामपालची बहीण, कोमल रामपालचे NCB च्या चौकशी-तपास कार्यात असहकार्य, कोमल रामपाल काल NCB कार्यालयात चौकशीसाठी हजर रहाणे अपेक्षित होते, पण त्या कारण न देताच गैरहजर राहिल्या, अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप कोमल रामपालवर, कोमल रामपाल चौकशीसाठी सहकार्य करीत नसल्याने या प्रकरणात NCB कायदेशीर सल्लाही घेण्याच्या तयारीत
-
US Capitol | अमेरिकेच्या संसदेत पुन्हा लोक कामावर परतले
अमेरिकेच्या कॅपिटल भवन परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर आता पुन्हा लोक कामावर परतले आहेत, तर दुसरीकडे चीनने स्टॅच्यु ऑफ लिबर्टीची खिल्ली उडवली आहे
-
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपची सिंधुदुर्गात ट्रक्टर रॅली
कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपची सिंधुदुर्गात ट्रक्टर रॅली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नारायण राणे रॅलीत सहभागी
-
कृषी विधेयक शेतकऱ्याच्या हितासाठी – नारायण राणे
शेतकरी देशाचा प्रमुख घटक, कृषी विधेयक शेतकऱ्याच्या हितासाठी, सिंधुदुर्गातून नारायण राणे लाईव्ह
-
उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं? – नारायण राणे
उद्धव ठाकरेंना शेतीतलं काय कळतं? राहुल गांधींना शेतीतलं काय कळत? मग ते त्याला विरोधच करणार, राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
-
उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये राहून सरकार चालवत आहेत : नारायण राणे
सरकार चालवण्यासाठी सरकारडे पैसै नाहीत. सराकरी कर्मचाऱ्यांचे पैसै देण्यासाठी सरकारकडे पैसै नाहीत. उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये राहून सरकार चालवत आहेत. असा पहिला मुख्यमंत्री आहे जो घरात राहून काम करतोय : नारायण राणे
-
महापौर किशोरी पेडणेकरांना धमकी, मनोज दोढियाला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीप्रकरणी मनोज दोढियाला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज दोढियानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
-
महाज्योतीच्या बैठकीत विद्यार्थी आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात चर्चा
महाराष्ट्रातून ओबीसी विद्यार्थी प्रतिनिधी नागपुरात, महाज्योतीला बार्टी आणि सारथीच्याच धर्तीवर निधी द्यावा ही मागणी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या एम फिल आणि पीएचडीसाठी बार्टीसारखी मदतीची मागणी, आपली परिस्थिती सांगत मंत्री वडेट्टीवार यांच्यासमोर रडला विद्यार्थी, परभणीचा बंजारा समाजाचा विद्यार्थी एमफिल करतोय, पायी रोज 24 किलोमीटर जातो, शेती नाही, आई अपंग, शिकायचे कसे हा मंत्र्यांना सवाल?, महाज्योतीच्या बैठकीत विद्यार्थी आणि मंत्री विजय वडेट्टीवार चर्चा सुरु
-
केंद्राकडे 26 हजार कोटींची थकबाकी – अजित पवार
केंद्राकडे 26 हजार कोटींची थकबाकी आहे, आता दर आठवड्याला पैसे मिळत आहेत,
-
भाई जगताप यांच्याशी चर्चा झाली, निवडणुकीत एकत्र राहण्याचा प्रयत्न – अजित पवार
भाई जगताप यांच्याशी चर्चा झाली, निवडणुकीत एकत्र राहण्याचा आमचा प्रयत्न आहे
-
बिल्डरला दिलेली सवलत ही ग्राहकांच्या फायद्याची : अजित पवार
ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीने मुद्रांक शुल्काचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्या निर्णयाचा फायदा हा ग्राहकांनाच होणार आहे, यामुळे बांधकाम विभागाला उभारी येईल, विरोधकांकडे सध्या काही काम नाही, त्यामुळे ते असं सर्व बोलत असतात, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहे
-
नामांतरणाबाबत एकत्र चर्चेकून मार्ग काढू : अजित पवार
तिघांचं सरकार चालत असताना कधी कुठला विषय निघू शकतो, तसाच हा शहराचा नामांतराचा मुद्दा आला आहे, नामांतरणाबाबत एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढू
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिकेत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं मित्रपक्षांसोबत जाण्याची भूमिका आहे. वरिष्ठ नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील. आघाडी करुन निवडणूक लढावी, अशी माझी भूमिका आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आलीय त्याला अडचण येऊ नये, अशी भूमिका आहे.
-
समान किमान कार्यक्रमावर सरकारचा कारभार : अजित पवार
समान किमान कार्यक्रमावर सरकारचा कारभार, कधीकधी अशा गोष्टी घडतात, त्यामागची पार्श्वभूमी काय हे बघावं लागेल, मी राज्याचा एक घटक म्हणून त्याबाबत चुकीचं वक्तव्य करणं हे योग्य नाही, संबंधित मंत्र्यांशी चर्चा करुन नेमकं काय झालंय याची सहानिशा करेन
-
मनमाडमध्ये मोर्चा काढून कोरोना नियमांचे उल्लंघन, 11 जणांवर गुन्हा
मनमाडमध्ये मोर्चा काढून कोरोना नियमांचे उल्लंघन, 11 जणांवर नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, आम्ही नांदगावकर कृती समितीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल, नांदगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आल्याने आणि रेल्वे फाटक बंद केल्याने आम्ही नांदगावकर कृती समितीच्या वतीने 4 तारखेला नांदगाव शहर बंद ठेवून काढण्यात आला होता मोर्चा
-
नागपूरच्या सदर परिसरात एका कंपनीला भीषण आग
नागपूरच्या सदर परिसरात मोठी आग, छावनी परिसरात एका कंपनीत आग लागल्याची माहिती, अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना, पेंटच्या कंपनीत होत आहे ब्लास्ट
-
महाडमध्ये मध्यरात्री लग्न वऱ्हाडीच्या बसचा अपघात, 15 जण जखमी
महाडमध्ये मध्यरात्री लग्न वऱ्हाडीच्या बसचा अपघात, 15 जण जखमी, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, जखमींवर महाडमधील रानाडे हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु, महाडमधून कोल्हापूरला जाताना आकले गावाजवळ झाला आपघात.
-
थोरातांकडून संजय राऊतांचं कौतुक
सामना वृत्तपत्र, संजय राऊत त्याचे संपादक, त्यांची कायमच एक चांगली भूमिका राहिली आहे, तिनही पक्ष एकत्र कसे येतील यासाठी त्यांनी नेहमी भूमिका घेतली आहे,
-
प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे -थोरात
आम्ही महाविकास आगाडी सरकारमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकाला त्याचा पक्ष वाढवण्याचा हक्क आहे,
-
सरकारमध्ये आमचा समान अधिकार – बाळासाहेब थोरात
सरकारमध्ये आमचा समान अधिकार, काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतराला विरोध आहे, नामांतर करुन वातावरण बिघडायला नको, सामाजिक तेढ वलाढू नये याची काळजी घेतली पाहिजे – बाळासाहेब थोरात
-
सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम करावं: बाळासाहेब थोरात
छत्रपती संभाजी महाराज विमानतळाबाबतचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे, आता केंद्र आणि भाजपची जबाबदारी आहे. शहराची नावं बदलून सर्वसामान्यांच्या जीवनात काही बदल झाला का? सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या आनंदासाठी काम , तेढ निर्माण करणं नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तीन पक्षांमध्ये मतमतांतर होऊ शकतात, पण याचा सरकारवर काहीही परिणाम नाही, चर्चेने सर्व प्रश्न सोडवू, संजय राऊतांनी तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील याची अग्रलेखातून काळजी घेतली.
-
केंद्रातील विरोधी पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार : संजय राऊत
विरोधी पक्ष आज जरी कमजोर असला तरी तो फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणार. देशाला घडवण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान आहे. सर्व पक्षात अंतर्गत वाद होतात. वाद होणे हे लोकशाहीचे लक्षण आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
-
नायलॉनच्या मांजाने आणखी एका युवकाचा गळा कापला, खासगी रुग्णालयात उपचार सुरु
नाशिक : नायलॉनच्या मांजामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एका युवकाचा नायलॉनच्या मांजाने गळा कापला आहे. दुचाकीवर जात असताना हा अपघात झाला आहे. या युवकाचे नाव मयूर कुलकर्णी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-
अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसात तक्रार
अनधिकृत बांधकाम प्रकरणी अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसात तक्रार, जुहू येथील सहामजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतरित केल्याचा आरोप
-
प्राणिसंग्रहालयातील हरणांवर कुत्र्यांचा हल्ला, 4 हरणांचा मृत्यू
पुणे : कात्रज प्राणी संग्राहालयातील 4 हरणांचा मृत्या झाला आहे. 4 भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्या वेळी प्राणीसंग्रहालयात प्रवेश करुन हरणांची शिकार केल्याचं सांगण्यात येत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात 2 नर आणि 2 मादी हरणांचा मृत्यू जाला आहे. तसेच एक हरिण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना कुत्र्यांना डॉग स्कॉडमार्फत भूल देऊन पकडण्यात आले आहे.
-
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
सोलापुर : सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करणे, आणि पैसे मागणे या कारणावरून पोलिसांनी केली त्यांनी अटक केली होती. तसेच पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. याच आरोपांखाली न्यायालयाने राजेश काळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
-
टेम्पो चालकाला झोप लागल्याने मावळमध्ये अपघात, एकाचा मृत्यू
पुणे : मुंबईवरून पुण्याच्या दिशेने औषधी घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात मावळमधील पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात 1 ठार, 1 जण जखमी झाला आहे. टेम्पो चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी 7.15 वाजता हा अपघात झाला. घटनेची माहिती होता शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे.
-
राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात घट केल्यामुळे खर घरेदीत वाढ, 9 टक्क्यांनी घर खरेदी वाढली
पुणे : गेल्या वर्षभरात पुण्यातील घर खरेदीमध्ये 9 टक्के वाढ झाली आहे. नाईटफ्रँक इंडियाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात विकल्या गेलेल्या घरांपैकी 51 टक्के घरे 50 लाखांपुढील आहेत. या अहवालानुसार वर्षभरात पश्चिम पुण्यातील घर खरेदीमध्ये 36 टक्के, पूर्व पुण्यात 58 टक्के, उत्तर पुण्यात 47 टक्के आणि मध्य पुण्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. घर खरेदीला चालना मिळावी म्हणून सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
औरंगाबादेत तब्बल 314 कोटींची पाणीपट्टी थकली, पाणीपट्टी वसुलीचा महापालिकेला बसतोय फटका
औरंगाबादेत तब्बल 314 कोटींची पाणीपट्टी थकली, पाणीपट्टी वसुलीचा महापालिकेला बसतोय फटका, पाणीपट्टी थकल्यामुळे महापालिकेचं आर्थिक नियोजन कोलमडले, निवासी नळांसह व्यावसायिक नळांचीही थकली पाणीपट्टी, पाणीपट्टी वसुलीचं महापालिकेसमोर मोठं आव्हान
-
औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाचा होणार कायापालट
औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाचा होणार कायापालट, 100 खटाच्या रुग्णालयात आता 265 खाटांची मंजुरी, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल 360 पदांची होणार भरती, औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा, कर्करोग उपचाराबरोबर संशोधनालाही मिळणार चालना
-
औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाचा होणार कायापालट, 265 खाटांची मंजुरी
औरंगाबाद : औरंगाबादमधील कर्करोग रुग्णालयाचा आता कायापालट होणार आहे. हे रुग्णालय 100 खाटांचे असून त्याला आणखी 265 खाटांची मंजुरी मिळाली आहे. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह तब्बल 360 पदांची भरती येथे होणार आहे. दरम्यान सरकारच्या या निर्णयामुळे कर्करोगावर संशोधन करणाऱ्यासाठीही चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे
-
पतंग पकडण्याच्या नादात गमावला जीव, 12वर्षांच्या मुलाला रेल्वेने चिरडलं
नागपूर : पतंग पकडण्याच्या नादात रेल्वेखाली आल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. श्रीकृष्णधाम झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर हा अपघात झाला आहे. एन्टा विनोद सोळंकी असं मृत मुलाचं नाव आहे. मृत मुलगा आपल्या आजीसोबत पुलाखाली राहत होता.
-
विदर्भातील कापूस नुकसानीच्या पंचनाम्याचं भिजत घोंडग
विदर्भातील कापूस नुकसानीच्या पंचनाम्याचं भिजत घोंडग, काही ठिकाणी पंचनामे, तर काही ठिकाणी कागदावर, अनेक शेतकऱ्यांच्या कापूस नुकसानीचे पंचनामे नाही, नागपूरसह विदर्भातील अनेक शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत, गुलाबी बोंडअळीमुळे यंदा 70 टक्के कपाशीचं नुकसान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं एकरी 25 ते 40 हजारांचं नुकसान, सरकारचे पंचनाम्याचे आदेश कागदावरच
-
कोल्हापूरमध्ये शुक्रवारी चार ठिकाणी कोरोना लसीकरणाचं ड्रायरन
कोल्हापूर मध्ये उद्या चार ठिकाणी होणार कोरोना ड्रायरन, पुलाची शिरोली,कसबा बावडा सेवा रुग्णालय,पंचगंगा रुग्णालय, आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं होणार ड्रायरन, प्रशासनाकडून ड्रायरनची तयारी पूर्ण, सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत राबवली जाणार प्रक्रिया
-
श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद रद्दच, औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवक पद रद्दच, औरंगाबाद खंडपीठाने दिला महत्वपूर्ण निर्णय, शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्यामुळे छिंदम यांचे नगरसेवकपद केले होते रद्द, नगर महापालिका आणि राज्यशासनाने केले होते नगरसेवक पद रद्द, शासन निर्णयाच्या विरोधात छिंदम यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव, अखेर उच्च न्यायालयानेही श्रीपाद छिंदम यांना दिला झटका
-
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना EOW ची नोटीस
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना EOW ची नोटीस, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बजावली नोटीस, 2009 मध्ये महापालिकेतील व्यवहारासंबंधात मुबंई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं बजावली नोटीस, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे गिरीष महाजन यांच्यानंतर आता प्रसाद लाड यांच्यावरही मुंबई पोलिसांची नजर, प्रसाद लाड सध्या भाजपचे उपाध्यक्ष तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे
-
चाळीसगाव परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
चाळीसगाव परिसरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली असून शहर वासीयांची धावपळ उडाली, आज लग्नाची मोठी तिथी आहे, हळदीचा कार्यक्रम आणि त्यानंतर नाचगाणी ही खानदेशात प्रथाचं असल्याने लगीन घरी देखील पावसामुळे धावपळ उडाली, तर अनेक कार्यक्रम रद्द करावी लागली -
अल्पवयीन मुलाकडून दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून खून, साताऱ्यातील धक्कादाक घटना
दहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून खून, साताऱ्यातील म्हसवे येथील लमानीवस्तीमधील घटना, खून करणारा युवकही अल्पवयीन, गेली तीन दिवसापासून हा अल्पवयीन युवक होता बेपत्ता, मुलगा हरवल्याची आईची सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल, खून करणारा अल्पवयीन युवक पोलिसांच्या ताब्यात -
इचलकरंजीत 31 डिसेंबरला दारु पिऊन वाहन चालवणे पडले महागात, तिघांना शिक्षा
इचलकरंजी शहरात 31 डिसेंबरला दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांना पडले चांगलेच महागात, शहरातील तीन वाहनधारकांना न्यायालयाने सुनावली शिक्षा, एकाला तीन हजार रुपये दंड, दोघांना दहा हजार रुपये दंड सुनावला, न्यायालयाने सुनावली शिक्षा दंड नाही भरला तर तीन महिने साधी कैद, इचलकरंजी शहर वाहतूक पोलिसांनी केली होती कारवाई
Published On - Jan 07,2021 8:16 PM