LIVE | रायगडमधील पोलादपूरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला

| Updated on: Apr 15, 2021 | 3:26 PM

LIVE |  रायगडमधील पोलादपूरमध्ये वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला
Breaking news

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार वऱ्हाडाचा ट्र्क 300 फूट खोल दरीत कोसळला आहे.  राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jan 2021 07:19 PM (IST)

    संभाजीनगरचा उल्लेख नवीन नाही, औरंगजेब सेक्युलर नव्हता: उद्धव ठाकरे

    नाशिकमधील भाजप नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिक शिवसेनेत परत आले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नाशिकवर शिवसेनेचा भगवा फडकणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

    कोरोनानंतर विकासकामांची पाहणी करण्यासाठी जात आहे. कोयनेला जाऊन आलो. समृद्धी महामार्ग, लोणावळा आणि इतर विकासकामांच्या पाहणीसाठी जाऊन आलो आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत रस्त्यांच्या कामाबद्दल चर्चा झाली. त्यातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. गडकरींसोबत कौटुंबिक संबंध आहेत. औरंगजेब सेक्युलर नव्हता, असा टोला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढील नाशिकचा पुढील महापौर शिवसेनेचा असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

  • 08 Jan 2021 06:01 PM (IST)

    BJP| जेपी नड्डांसोबत देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांची बैठक सुरु, राज्यातील पराभवावर चर्चेची शक्यता

    जेपी नड्डा ,देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार यांच्यात बैठक सुरू झालीय. बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील पराभव आणि आगामी निवडणूक यावर चर्चा होणार आहे.

  • 08 Jan 2021 05:44 PM (IST)

    शेतकरी आणि सरकारी प्रतिनिधींमध्ये तोडगा नाहीच, आठवी बैठकही निष्फळ

    केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची आजची आठवी बैठक निष्फळ ठरली. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आजही कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. 15 जानेवारीला पुन्हा शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची बैठक होणार

  • 08 Jan 2021 05:43 PM (IST)

    केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनाची आठवी बैठक निष्फळ, शेतकरी लॉ वापसीवर ठाम

    केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना ची आजची आठवी बैठक निष्फळ ठरली. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आजही कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. 15 जानेवारीला पुन्हा शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारची बैठक होणार आहे.

  • 08 Jan 2021 03:45 PM (IST)

    ‘उधार‘राजाचे जाहीर आभार!, देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका

  • 08 Jan 2021 03:10 PM (IST)

    पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात, शहराच्या अनेक भागात पावसाची हजेरी

    पुणे : पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शहराच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नवी पेठ, डेक्कन, सिंहगड रोड, पुणे स्टेशन, मंडई परिसरात पाऊस सुरु आहे.

  • 08 Jan 2021 03:07 PM (IST)

    आरक्षणाबाबत केंद्राने सहकार्य करणे अपेक्षित : अशोक चव्हाण

    आरक्षणाबाबत केंद्राने सहकार्य करणे अपेक्षित : अशोक चव्हाण

  • 08 Jan 2021 02:49 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बोलवलं नाही, जनतेच्या प्रश्नावर राजकारण करु नये; भाजप आमदाराची नाराजी

    नागपूर : “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर माझी नाराजी नाही मात्र स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाने दौऱ्यात स्थानिक आमदाराला बोलावलं नाही,” असे म्हणत भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र, ठाकरेंच्या दौऱ्याविषयी त्यांना कळवण्यात आले नव्हते. याच कारणामुळे त्यांना नाराजी व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करायला नाही पाहिजे असं म्हटलं आहे

  • 08 Jan 2021 02:17 PM (IST)

    94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची घोषणा, यंदाचे साहित्य संमेलन नाशकात

    94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची घोषणा, नाशिक इथे होणार यंदाचे साहित्य संमेलन, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकरव ठाले पाटील यांची घोषणा, कोरोनाचे नियम पाळून पार पडणार साहित्य संमेलन

  • 08 Jan 2021 02:17 PM (IST)

    चंद्रकांत पाटील,देवेंद्र फडणवीस दिल्लीत, प्रमुख नेत्यांची भेट घेणार

    महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील,देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. दिल्लीत भाजपच्या अनेक नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

  • 08 Jan 2021 01:06 PM (IST)

    अभिनेत्री कंगना रनौत वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली

    अभिनेत्री कंगना रनौत वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली, चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पोलिसांच्या सूचना, धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी नोटीस

  • 08 Jan 2021 12:04 PM (IST)

    नगरसेवक महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश

    सोलापूरचे शिवसेना नगरसेवक महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश, महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची माहिती

  • 08 Jan 2021 11:55 AM (IST)

    या नियुक्त्या न होण हा विधिमंडळाचा अपमान – संजय राऊत

    राज्यपाल नियुक्त आमदार,  या नियुक्त्या न होण हा विधिमंडळाचा अपमान,  हे घटनेचे मारेकरी, राज्यपालांनी स्पष्ट करावं

  • 08 Jan 2021 11:55 AM (IST)

    प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का? – संजय राऊत

    माझ्यावर कोणताही घाव, वार, हल्ला याचा परिणाम होत नाही, नोटिसा म्हणजे सरकारी कागद, आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळापळ करावी लागेल, ईडी आणी सीबीआय मागे लावण्याऱ्यांनी लक्षात ठेवावं, मी विरोधी पक्षांचा सन्मान राखतो, प्रताप सरनाईक यांना वेगळा न्याय आणी गिरीश महाजन यांना वेगळा का?

  • 08 Jan 2021 11:53 AM (IST)

    आज जे आपण बोलतो आहोत ते बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं संभाजीनगर आहे, हे भाजपवाल्यांनी विसरु नये – संजय राऊत

    संभाजीनगर हे संभाजीनगरच राहणार आहेत, काँग्रेस विरोध करत असले तरी ते मनातून शिवाजी महाराजांचेच भक्त आहेत, औरंगजेबाजे नाही, संभाजीनगर आज जे आपण बोलतो आहोत ते बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं संभाजीनगर आहे, हे भाजपवाल्यांनी विसरु नये, बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर करावं अशी मागणी, यावर भाजपनं भूमिका स्पष्ट करावी

  • 08 Jan 2021 11:48 AM (IST)

    महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल – संजय राऊत

    महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल, बऱ्याच ठिकाणी हे ऐक्य राखण्यात आम्हाला यश मिळेल

  • 08 Jan 2021 11:47 AM (IST)

    पुढचा महापौर हा शिवसेनेचा असेल – संजय राऊत

    शोभा मगर, दायमाही शिवसेनेत प्रवेश करतील, ते माझ्या संपर्कात आहे, त्यांना शिवसेनेत यायची इच्छा आहे, राजकारणाची हवा बदलते आहे, पुढचा महापौर हा नक्कीच शिवसेनेचा असेल, त्याबाबत कुठलीही साशंकता नाही – संजय राऊत

  • 08 Jan 2021 11:45 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनीही बागुल आणि गीते यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला- संजय राऊत

    मुख्यमंत्र्यांनीही बागुल आणि गीते यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला, त्यांचा मला फोन आलेला त्यात त्यांनी आनंद व्यक्त केला

  • 08 Jan 2021 11:43 AM (IST)

    सुनील बागुल आणि वसंत गीते यांची घरवापसी, शिवबंधन बांधलं

    नाशकातील प्रत्येक पदाधिकारी आणि शिवसेैनिकांनी त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे, मला पहिल्यांदा इथे असं दिसलं की कोणात काही मतभेद नाहीत, सर्वांना या नेत्यांची घरवापसी लवकरात लवकर व्हावी याची घाई होती

  • 08 Jan 2021 11:40 AM (IST)

    नाशिक हा शिवसेनेचा पुन्हा एकदा भक्कम गड बनावा, यासाठी या नेत्यांचं योगदान महत्त्वाचं ठरेल -संजय राऊत

    प्रवेश सोहळा आटोपल्यावर हे दोन्ही नेते मुंबईला येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेती, नाशिक हा शिवसेनेचा पुन्हा एकदा भक्कम गढ बनावा, अभेद्य गड बनावा, यासाठी या दोन्ही नेत्यांचं योगदान यापुढे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, गीते आणि बागुल यांना शिवसेना नवीन आम्हाला ते नवीन त्यामुळे परकेपणाचा प्रश्नच नाही , मी मुख्यमंत्री आणि संपूर्ण शिवसेनेकडून सुनील बागुल आणि वसंत गीते यांचं शिवसेना परिवारात मनापासून स्वागत करतो

  • 08 Jan 2021 11:35 AM (IST)

    संजय राऊत नाशकात, सुनील बागुल आणि वसंत गीतेंसह एकाच व्यासपीठावर

    शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत सुनील बागुल आणि वसंत गीते व्यासपीठावर, संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर

  • 08 Jan 2021 11:33 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मिशन विदर्भ, गोसीखुर्द धरणाची पाहणी

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ‘मिशन विदर्भ’, मुख्यमंत्री विदर्भात दाखल, गोसीखुर्द धरणाची पाहणी करणार, गोसीखुर्द  सिंचन प्रकल्पाचीही पाहणी करणार, त्यानंतर चंद्रपूरसाठी रवाना होणार, मुख्यमंत्री झाल्यानंतरची विदर्भातील दुसरा दौरा, पक्ष वाढीकडेही लक्ष

  • 08 Jan 2021 11:22 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात, विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडतेय, बैठकीला जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आणि राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित

  • 08 Jan 2021 11:20 AM (IST)

    उमरेडचे आमदार राजू पारवे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

    गोसीखुर्द पुनर्वसनाच्या प्रश्नावर काँग्रेस आमदार आक्रमक, उमरेडचे आमदार राजू पारवे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, 27 ग्रामपंचायती आणि 52 गावांतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार

  • 08 Jan 2021 09:59 AM (IST)

    नगर जिल्हयात अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    अहमदनगर जिल्हयात अवकाळी पाऊस, रात्रीपासून रिमझीम पाऊस, सकाळपासुन ढगाळ वातावरण, अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली, अवकाळी पावसाने गहु, कांदा, हरबरा, द्राक्ष आदी पिकांचं‌ होणार नुकसान

  • 08 Jan 2021 09:04 AM (IST)

    राष्ट्रवादी प्रवेशासाठी महेश कोठे मुंबईकडे रवाना

    राष्ट्रवादी प्रवेशासाठी महेश कोठे मुंबईकडे रवाना, महेश कोठेंबरोबर अनेक कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना, पुण्यात पोहचेपर्यंत शरद पवारांच्या कार्यालयातून आधी भेटण्याचे निरोप, महेश कोठे पंचवीस लोकांसोबत आज सकाळी शरद पवारांना भेटणार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये सकाळी 11 वाजता भेटीनंतर सार काही चित्र होणार स्पष्ट

  • 08 Jan 2021 08:21 AM (IST)

    कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनसाठी मालेगाव प्रशासन सज्ज

    कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनसाठी मालेगाव प्रशासन सज्ज, आज शहरातील मदनीनगरच्या आरोग्य केंद्रावर केले जाणार ड्रायरन, या ड्रायरन मध्ये 26 लाभार्थी घेणार सहभाग, सकाळी 10 वाजता सुरू होणार ड्रायरन

  • 08 Jan 2021 08:20 AM (IST)

    पश्चिम रेल्वे मार्गावर प्रथमच मालवाहतूक रेल्वे गाडी महिलांनी चालवली

    पश्चिम रेल्वे मार्गावर प्रथमच मालवाहतूक रेल्वे महिलांनी चालवली, 5 जानेवारी रोजी मुंबई जवळच्या वसई रोड रेल्वे स्थानकातून या गाडीला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून, ही गाडी 6 जानेवारी रोजी गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचली, लोको पायलट कुमकुम सूरज डोंगरे, सहायक लोको पायलट उदिता वर्मा आणि वस्तू गार्ड आकांक्षा राय असे या महिलांचे नावं, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी या महिलाना मोठे प्रोत्साहन दिले, तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवनकर यांनी आपल्या महिला शिष्टमंडळासह या मालवाहतूक चालवणाऱ्या तिन्हही महिलांचा वसई रोड रेल्वे स्थानकात सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या

  • 08 Jan 2021 07:48 AM (IST)

    वसई-विरार नालासोपाऱ्यात पावसाच्या हलक्या सरी

    वसई-विरार नालासोपाऱ्यात पावसाच्या हलक्या सरी, रात्री अडीच वाजल्यापासून थांबून थांबून पडत आहे पाऊस, रस्ते ओले होण्या इतकाच पाऊस, आभाळ पूर्ण भरलेले असून आणखी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अवकाळी पावसामुळे समुद्र किनाऱ्यावर वाळू घातलेल्या बोंबील, जवळा, सुकी मच्छि यांचे नुकसान होण्याची शक्यता

  • 08 Jan 2021 07:47 AM (IST)

    कोरोना लसिकरणाचा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

    कोरोना लसिकरणाचा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची केंद्राकडे मागणी, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहितीएका राज्यात एकाच कंपनीच्या लसीला मान्यता द्यावी, राजेश टोपे यांनी व्यक्त केली अपेक्षा, कोल्ड चेन आणि मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा, राजेश टोपे यांनी केली महत्वपूर्ण मागणी

  • 08 Jan 2021 07:46 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन ठिकाण कोरोना लसीकरणाचा ड्रायरन

    औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन ठिकाण कोरोना लसीकरणाचा ड्रायरन, औरंगाबाद शहर, बजाजनगर आणि वैजापूर या तीन ठिकाणी होणार ड्रायरन, 25 स्वयंसेवकांना दिला जाणार कोरोना लसीचा डेमो, ड्रायरनसाठी औरंगाबादची जिल्हा यंत्रणा सज्ज, सकाळी 9 वाजता सुरुवात होणार ड्रायरनला, 9 ते 11 या वेळेत पार पडणार कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम, बजाजनगरच्या शाहिद भगतसिंग शाळेत होणार कोरोना लसीकरणाचा ड्रायरन, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण देणार लसीकरण बुथला भेट

  • 08 Jan 2021 07:22 AM (IST)

    हरिद्वारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, रेल्वे लाईनच्या ट्रायलदरम्यान ट्रेनखाली येऊन चार जणांना मृत्यू

    हरिद्वारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, रेल्वे लाईनच्या ट्रायलदरम्यान चार जणांना ट्रेनखाली येऊन मृत्यू, मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून घटनेबाबत शोक व्यक्त, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

  • 08 Jan 2021 06:51 AM (IST)

    महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढल्या पाहिजेत – अजित पवार

    ना मला, ना तुला, ना तिसऱ्याला!; मुंबईबाबत अजित पवारांचं मोठं विधान, मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष भाई जगताप वारंवार सांगत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी याबाबत काल महत्त्वाचं विधान केलं, महाविकास आघाडीने एकत्र निवडणुका लढल्या पाहिजेत, असा आग्रहच अजित पवार यांनी यावेळी धरला.

  • 08 Jan 2021 06:50 AM (IST)

    मुख्यमंत्री सोबत नेमकी कोणती चर्चा झाली?, राज्यात उलटसुलट चर्चांना उधाण

    मुख्यमंत्री सोबत नेमकी कोणती चर्चा झाली?, नितीन गडकरींनी काल मनोहर जोशींची आधी भेट, त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही घेतली, यावरुन राज्यात उलटसुलट चर्चा, गडकरी भाजप सेनेला जवळ आणू पाहतायत का असा प्रश्न काल दिवसभर चर्चेत होता, यावर सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही एकमेकांविषयी स्नेह आहे, हे खरं आहे की राजकीय दृष्टीकोनातून अंतर येऊ शकत

  • 08 Jan 2021 06:47 AM (IST)

    मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर

    मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांची शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेणार

  • 08 Jan 2021 06:46 AM (IST)

    शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्याच दुपारी 2 वाजता बैठक

    शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्याच दुपारी 2 वाजता बैठक, सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या, पण तिढा सुटलेला नाही, आता आज पुन्हा बैठक होणार, त्यापूर्वी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली, कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीशिवाय कुठल्याही प्रस्तावावर विचार करण्यास तयार असल्याचं तोमर म्हणाले

  • 08 Jan 2021 06:44 AM (IST)

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटलांना सोनिया गांधींनी दिल्लीत बोलावलं

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटलांना सोनिया गांधींनी दिल्लीत बोलावून घेतलं, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीबाबत आज चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते

  • 08 Jan 2021 06:43 AM (IST)

    सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेला झटका; विरोधी पक्षनेते महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

    सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेला झटका; विरोधी पक्षनेते महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी कार्यलयात शरद पवार यांच्या उपस्थित करणार प्रवेश

  • 08 Jan 2021 06:42 AM (IST)

    भाजप नेते वसंत गीते आणि सुनील बागुल शिवसेनेत प्रवेश करणार

    भाजप नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार, संध्याकाळी 6 वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश, भाजप नेते वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी घेतली संजय राऊत यांची भेट, तब्बल 2 तास गीते बागुल यांनी केली राऊत यांच्याशी चर्चा, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक भाजपला मोठा धक्का, आणखी काही नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा

  • 08 Jan 2021 06:40 AM (IST)

    संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर, पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार

    संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर, पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार, याच दरम्यान काही प्रवेश होण्याची शक्यता, तर राऊत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन नंतर पत्रकारांशी बोलण्याची शक्यता

  • 08 Jan 2021 06:40 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भंडारा दौरा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भंडारा दौरा, सकाळी 10.20 वाजता ते गोसीखुर्द धरण आणि तिथल्या सिंचन व्यवस्थेची पाहणी करणार, दुपारी 1 वाजता चंद्रपूर दौऱ्यावर असणार , ब्रम्हपूरी येथे दुपारी 1 वाजता येणार

  • 08 Jan 2021 06:30 AM (IST)

    राज्यातील 30 जिल्ह्यांत आणि 25 महापालिका क्षेत्रांत लसीकरणाची रंगीत तालिम होणार

    राज्यातील चार जिल्ह्यांत 2 जानेवारीला करोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला, आता आज राज्यातील 30 जिल्ह्यांत आणि 25 महापालिका क्षेत्रांत लसीकरणाची रंगीत तालिम होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, दरम्यान, 2 जानेवारीला पुणे, नंदुरबार, जालना, नागपूर या जिल्ह्यांत तसेच नागपूर आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यात आली

  • 08 Jan 2021 06:25 AM (IST)

    पुण्याच्या कुरकुंडी गावातील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांचे निधन

    पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरकुंडी गावामधील जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांचे निधन, आसाम येथील तेजपुर येथे नाईक पदावर होते 102 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये नियुक्ती वर होते जवान संभाजी राळे, संभाजी राळे यांच्या मागे आई-वडील ,तीन बहिणी परिवार

Published On - Jan 08,2021 7:10 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.