LIVE | यवतमाळमध्ये लग्न कार्यासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक, नववधूसह 13 जखमी
राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर
LIVE NEWS & UPDATES
-
यवतमाळ – लग्न कार्यासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक
यवतमाळ – लग्न कार्यासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला ट्रकची धडक – नववधूसह 13 जण जखमी – यवतमाळच्या वणी मार्गावरील चौपाल सागर नजीकची घटना – मुंबईहुन वणीला लग्न कार्यासाठी जात होते जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात केले दाखल
-
सुशांत सिंह ड्रग प्रकरणात एनसीबी टीमची मोठी करवाई, दिया मिर्जाच्या माजी मॅनेजरसह एकीला अटक
– सुशांत सिंह ड्रग प्रकरणात एनसीबी टीमची मोठी करवाई
– दोन महिलांना केली अटक
– त्यात एक महिला अभिनेत्री दिया मिर्जाची माजी मैनेजर
– राहिला म्हणून अटक ह्या महिले सोबत त्याची एक मैत्रीण ही अटक
– एका ब्रिटिश व्यवसाई करण सजदानी ह्याला ही घेतलाय ताब्यात
– मुंबई ड्रग व्यावसायाच्या इंटरनेशनल कनेक्शन उघड़
– एकूण 75 किलो गांजा, 1.1 किलो अमेरिकन आर्टिशनल मेरुआना बड उच्च क्वालिटी आणि 125 संसयित गांजा ज्प्त
-
-
सिंधुदुर्गात काही भागात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
सिंधुदुर्गात काही भागात वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आणखी संकट कोसळलं आहे.
-
नाशिक शहरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
नाशिक – शहरात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पाऊस, अवेळी होत असलेल्या या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची भीती, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात
-
सिन्नर इथे शेतात चार ते साडेचार वर्षाची बिबट मादी पिंजऱ्यात आडकली
नाशिक – सिन्नर इथे शेतात चार ते साडेचार वर्षाची बिबट मादी पिंजऱ्यात आडकली, गेल्या काही दिवसांपासून होता परिसरात वावर, ग्रामस्थ होते भीतीच्या छायेत, बिबट्याचा बछडा पकडला गेला असला तरी मादी बिबट्या मात्र अद्याप वनविभागाच्या जाळ्यात नाही
-
-
जिथे बॅलेटवर निवडणूक तिथे भाजपचा पराभव, भाजपचा परतीचा प्रवास सुरु- काँग्रेस
चंद्रकांतदादांची अवस्था डोनाल्ड ट्रम्पसारखी, पराभवाची कारणमीमांसा जे पी नड्डांसमोर करताना त्यांना नाकी नऊ आलं असेल, जिथे बॅलेटवर निवडणुका झाल्या तिथं भाजपचा पराभव झालाय. भाजपचा परतीचा प्रवास सुरु झालाय – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
-
भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत
-
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड 24 जानेवारीला
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची 24 तारखेला होणार निवड, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांची माहिती, 24 जानेवारीच्या बैठकीत होणार साहित्य संमेलन अध्यक्षांच्या नावाची घोषणा, 24 जानेवारी रोजी नाशिक इथे साहित्य महामंडळाची बैठक, यावर्षी साहित्य संमेलन अध्यक्ष पदांची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावरून चर्चा
-
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर, शेतकऱ्य़ांशी कृषी कायद्यावर चर्चा करणार, बंगालमध्ये संपर्क अभियान करणार
-
नागपुरात आणखी एक हत्या, अल्पवयीन मुलाची चाकूने वार करुन हत्या
नागपुरात आणखी एक हत्या, अल्पवयीन मुलाची चाकूने वार करुन केली हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती,रात्रीच्या वेळी घडली घटना, राजेश डाहरे असे मृतकांचे नाव असून तो 16 वर्षाचा होता, या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू
-
नागपूर रेल्वे सुरक्षा दलच्या जवानांची मोठी कारवाई, 9 लाख रुपये किमतीचा 89. 5 किलो गांजा जप्त
नागपूर रेल्वे सुरक्षा दलच्या जवानांची मोठी कारवाई, 9 लाख रुपये किमतीचा 89. 5 किलो गांजा जप्त, विशाखापट्टणम – निजामुदिन एक्स्प्रेस मधील कारवाई, 6 आरोपींना केली अटक, 11 पाकीटमध्ये ठेऊन केली जात होती तस्करी, चंद्रपूर ते नागपूर दरम्यान गस्त घालत असताना गांजाची तस्करी होत असल्याचं निदर्शनास आले, त्यावरुन करण्यात आली कारवाई
-
नागपुरात कोरोनामुळे आतापर्यंत 4000 जणांचा मृत्यू
नागपूरात आता पर्यंत कोरोना मुळे 4000 नागरिकांचा मृत्यू, यात शहरातील 2667 ग्रामीण भागातील 707 तर जिल्ह्या बाहेरील 626 जणांची नोंद झाली, सर्वाधिक 1406 मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले, काल 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला तर 456 नवीन रुग्णांची भर पडली, बाधितांची एकूण संख्या 127110 झाली असून रुग्ण संख्येच्या तुलनेत 3. 14 टक्के मृत्यू झाले, नागपुरात कोरोनाचा पहिला मृत्यू 4 एप्रिल रोजी झाला होता
-
‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात 5 टक्के सवलत, केंद्राकडून कायद्यात बदल
‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात 5 टक्के सवलत, केंद्र सरकारकडून वाहन कायद्यात बदल, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) मार्गावर प्रवास करणाऱ्या ‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात 5 टक्के सवलत, राज्य रस्ते विकास महामंडळाची घोषणा, 11 जानेवारीपासून ही सवलत योजना सुरg होणार असून, ती मर्यादित कालावधीसाठी असेल.
-
गीते-बागुलांपोठोपाठ आणखी नेते भाजपातून शिवसेनेत जाण्याची शक्यता, आज भाजपची नाशकात बैठक
वसंत स्मृती कार्यालयात आज भाजपची बैठक, वसंत गीते आणि सुनील बागुल यांच्या पाठोपाठ आणखी काही पदाधिकारी, नेते भाजपातून सेनेत जाण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या कोअर कमिटीची नाशिक येथील वसंतस्मृती कार्यालयात बैठक होणार आहे
-
‘औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं ही जनतेची भावना’, एकनाथ शिंदेकडून भूमिका स्पष्ट
‘औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं ही जनतेची भावना’, औरंगाबादच्या नामकरणावरुन शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनीही औरंगाबादच्या नामकरणारवर भूमिका स्पष्ट
-
करोनावरील लसीकरणानंतर खूण म्हणून बोटावर शाई लावली जाणार
करोनावरील लसीकरणानंतर खूण म्हणून बोटावर शाई लावली जाणार, पुढच्या आठवड्यापासून करोनावरील लसीकरण सुरु होण्याची शक्यता, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
-
पुण्यात पावसामुळे पिकांवर संकट, हरभरा आणि गहू पिकावर कीड-रोग वाढण्याची शक्यता
पुणे पावसामुळे पिके संकटाच्या फेऱ्यात, राज्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका, हरभरा आणि गहू पिकावर कीड-रोग वाढण्याची शक्यता
-
लग्न आटपून येणारा वऱ्हाडींचा टेप्मो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 66 जण जखमी
लग्न आटपून रत्नागिरीला परत येत असताना वर्हाडातील टेम्पोचा अपघात, टेम्पो दरीत कोसळला, टेम्पो चालकाला अंदाज न आल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे अपघात झाल्याचा अंदाज, टेम्पोमध्ये जवळपास 66 जण होते, तिघांचा मृत्यू, इतरांना वाचवण्यात यश, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण जवळ सातारा जिल्ह्यातील कोंडुशी येथिल घटना
-
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग, दहा नवजातांचा होरपळून मृत्यू
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली, शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजता ही आग लागली असून सतरा बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आले
Published On - Jan 09,2021 8:46 PM