Mansukh Hiren death case : LIVE | माझा कोणावरही संशय नाही, मनसुख हिरेन यांच्या पत्नीची प्रतिक्रिया
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडल्याचे समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
त्यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले, मनसुख हिरेन यांची पत्नीची पहिली प्रतिक्रिया
मी आणि माझे कुटुंब असे होईल याचा कधी विचारही करु शकत नाही.आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. याबाबत तक्रार केली होती. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले.
त्यांना कालही बोलवण्यात आले. ते काल गेले. पण रात्री घरी परतले नाही. रात्री दहानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवलीवरुन तावडे म्हणून एकाचा फोन आला होता. रात्रभर आम्ही वाट बघितली. सकाळपर्यंत ते आले नाहीत. म्हणून आम्ही तक्रार दाखल केली.
जेव्हा जेव्हा पोलिसांचे फोन येत होते तेव्हा ते चौकशीला सहकार्य करत होते. ते आत्महत्या करण्याचा विचार करु शकत नाही. पोलिसांनी याबाबतची अफवा पसरवली आहे. हे चुकीचे आहे. याची चौकशी व्हायला हवी. संपूर्ण कुटुंबाला यामुळे त्रास होत आहे. मला कोणावरही संशय नाही : विमला हिरेन, मनसुख हिरेन यांची पत्नी
-
नाशिक कोरोना अपडेट
नाशिक कोरोना अपडेट –
दिनांक: 5 मार्च 2021
– आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 362
– आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 380
नाशिक मनपा- 222 नाशिक ग्रामीण- 090 मालेगाव मनपा- 048 जिल्हा बाह्य- 020
– नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2127
– आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -05 नाशिक मनपा- 02 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 03 जिल्हा बाह्य- 00
-
-
संपूर्ण प्रकरणाचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय : गृहमंत्री अनिल देशमुख
केश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडल्याचे समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. याचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय घेतला आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
-
विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांकडून विलगीकरणाचा सल्ला
चंद्रपूर:- पालकमंत्री आणि राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण, वडेट्टीवार सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात झाले आहेत सहभागी, कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यावर डॉक्टरांनी दिला विलगीकरणाचा सल्ला, गेल्या काही तासात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी चाचणी करून घेण्याचा सल्ला
-
अकोला कोरोना अपडेट
अकोला कोरोना अपडेट
आज दिवसभरात 406 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…
सकाळी 272 तर सायंकाळी 134 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…
ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 18389 झाला आहे….
आज दिवसभरात 3 जणाचा मृत्यू झाला आहे…
*कोरोनामुळे आतापर्यंत 381 जणांचा मृत्यू …
आज दिवसभरात 250 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…
*तर 13668 जणांनी कोरोनावर मात केली आहे….
*उपचार घेत असलेले रुग्ण 4340 आहेत……
*शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती…..
-
-
गृहमंत्र्यांनी अॅक्शन घेतली नाही : देवेंद्र फडणवीस
सर्व राहणारे ठाण्याचे आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह हा ठाण्याला सापडतो. हे सर्व योगायोग नाही. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी केली आहे. यातील एकाही गोष्टीवर गृहमंत्र्यांनी अॅक्शन घेतली नाही. नेमकं कोणाला वाचवण्याचा प्रयत्न गृहमंत्री करत आहेत? मनसुख हिरेन यांची हत्या झाली, असा आम्हाला संशय आहे : देवेंद्र फडणवीस
-
सीबीआयने सुशांतच्या केसमध्ये काय केलं? : अनिल देशमुख
सीबीआयने सुशांतच्या केसमध्ये काय केलं? यांनी उत्तर द्यावे. तुमच्याकडे जे काही कागदपत्र असतील. त्याची माहिती आम्हाला द्यावी. त्याची आम्हाला मदतच होईल. मुंबईतील बिल्डरला येणाऱ्या धमक्या, सेलिब्रेटी यांना येणाऱ्या धमक्या मुंबई पोलिसांनी बंद केल्या : अनिल देशमुख
-
पोलिसांच्या कतृत्वावर शंका आहे का? : अनिल परब
सर्वांना सगळी प्रक्रिया माहिती आहे. जबाब दिलाय तो खरा आहे का खोटा. गृहमंत्र्यांना पोलीस चुकीचे माहिती देत नाही पोलिसांच्या कतृत्वावर शंका आहे का? एनआयए यात आधीच चौकशी करुन गेले. अनिल परब यांची प्रतिक्रिया
-
काही षडयंत्र होत असेल तर त्याचं गांभीर्य मोठं : सुधीर मुनगंटीवार
त्यांनी वाझेचा उल्लेख काेढला पाहिजे. काही षडयंत्र होत असेल तर त्याचं गांभीर्य मोठं आहे. सरकारानं वाझेची भिती दाखवू नये, सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य
-
तपासासाठी पोलीस सक्षम, अर्णवला आत टाकले म्हणून तुमचा राग आहे का? अनिल देशमुख यांचा सवाल
तपासासाठी पोलीस सक्षम, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ठाणे पोलीस याप्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहे. अर्णव गोस्वामीला आत टाकले म्हणून तुमचा सचिन वाझेवर राग आहे का? गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सवाल
-
चंद्रपुरात 176 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
चंद्रपूर: गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत मोठी वाढ, 1493 नमुने तपासणीतून 176 नव्या रुग्णांची नोंद, मृत्यसंख्येने गाठला 400 चा आकडा
24 तासात 1 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 24049
कोरोनामुक्त : 23094
ऍक्टिव्ह रुग्ण : 555
मृत्यू : 400
एकूण नमूने तपासणी : 219777
-
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट, 651 जणांना लागण
अमरावती कोरोना अपडेट
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा महास्फोट
आज दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आज सकाळपासून आढळले 651 कोरोना बाधित रुग्ण
आतापर्यंत जिल्ह्यात आढळले 38447 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत 30749 कोरोना बाधित रुग्णांनी केली कोरोनावर मात
7146 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आतापर्यंत 552 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
-
भंडारा जिल्ह्यात 32 जणांना कोरोनाची लागण
भंडारा कोरोना अपडेट
•भंडारा जिल्ह्यात 32 कोरोना पॉझिटिव्ह •जिल्ह्यात आज 22 रुग्णांना डिस्चार्ज • बरे झालेले रुग्ण 13207 • पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 13844 • क्रियाशील रुग्ण 310 • आज 00 मृत्यू • एकूण मृत्यू 327 • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.40 टक्के
-
अंबानीचे संपूर्ण केसं NIA ला ट्रान्सफर व्हावी, फडणवीसांची मागणी
जी स्कॉर्पिओ सापडली, याची संपूर्ण केसं NIA ला ट्रान्सफर व्हावी, अशी मागणी मी केली. अनेक योगायोग यात पाहायला मिळत आहे. मनसुख हिरेन यांची गाडी क्रॉफर्ड मार्केटला बंद पडली. त्यानंतर गाडी गायब झाली, गाडीच्या मालकांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे. गाडी मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर ते अत्यंत गुंतागुंतीचे आणि चॅलेज झालं आहे. इतका प्राईम विटनेसची मृतदेह मिळतो, त्यामुळे यात गौडबंगाल आहे. मनसुख हिरेन यांना तात्काळ सुरक्षेची मागणी केली होती : देवेंद्र फडणवीस
-
हा विषय अतिशय गंभीर : गिरीश महाजन
हा विषय अतिशय गंभीर आहे. याबाबत आपण कुठेही कमीपणा न मानता, मुंबई पोलिसांची मान खाली जाईल. हा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर इथपर्यंत झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर, देश पातळीवर याची चौकशी व्हावी : गिरीश महाजन
-
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, तात्काळ हे प्रकरण NIA ला द्यावं, देवेंद्र फडणवीस यांची मागणी
ज्यांची गाडी आहे, त्यांचा मृतदेह मिळाला आहे. मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडला आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ हे प्रकरण NIA ला दिलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
-
गाडी मालकाचा मृतदेह सापडला, तेव्हा ते प्रकरण संदेहजनक होतं : सुधीर मुनगंटीवार
जेव्हा गाडी मालकाचा मृतदेह सापडला असेल, तर ते प्रकरण संदेहजनक झाले आहे. : सुधीर मुनगंटीवार
-
मुकेश अंबानी घराबाहेरील गाडीचे प्रकरण, गाडीमालकाचा मृतदेह सापडला
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडल्याचे समोर आलं आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे.
-
चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलकांची तोडफोड
चंद्रपूर:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलकांची तोडफोड, गेले महिनाभर तिथले पाचशे कंत्राटी कामगार पगारासाठी करत आहेत डेरा आंदोलन, आंदोलनात असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित धोरण अवलंबल्याने काठी- झाडू घेऊन कार्यालयात शिरले आंदोलक, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांच्या कक्षाची काही अंशी तोडफोड, सातत्याने सनदशीर आंदोलन करून अधिकारी जुमानत नसल्याने उग्र आंदोलन छेडत असल्याचा इशारा, आगामी काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोविड काळातील पगार थकविल्याप्रकरणी हाच मार्ग अवलंबण्याचा आंदोलकांचा मानस
-
दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात भीषण आग, पुरातन वास्तू काळवंडण्याचा धोका
औरंगाबाद :-
दौलताबाद किल्ल्याच्या परिसरात भीषण आग
किल्ल्याच्या परिसरातील गवताला लागली मोठी आग
किल्ल्याच्या मोठ्या परिसरात पसरली आग
किल्ला परिसरात धुराचे उंचच उंच पसरले लोट
आगीमुळे किल्ल्याच्या परिसरातील पुरातन वास्तू काळवंडण्याचा धोका
-
वरुण सरदेसाईंना वाय प्लस सुरक्षा का दिली? नितेश राणेंचा सवाल
वरुण सरदेसाई कोण आहे, हा मंत्रालयात का फिरत असतो, कुणाकडे फिरतो, त्याला वाय प्लस सुरक्षा का दिली जाते? असा सवाल भाजप नेते नितेश राणे यांनी केला आहे. जम्बो कोव्हिडमध्ये कुणाला टेंडर दिलं जातं. कोणाच्या सांगण्यावरुन हे टेंडर दिले जातात, असा प्रश्नही राणेंनी केला आहे.
-
अमरावतीतील लॉकडाऊन उद्यापासून शिथील, सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये उद्यापासून शिथिलता
सर्व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राहतील सुरू
लॉजिंग सेवा 25 टक्के क्षमतेत राहील.
हॉटेलमध्ये केवळ पार्सल सुविधा
कोरोना त्रिसूत्रीचे पालन न केल्यास दुकान पाच दिवस होणार सील आणि ८ हजार रूपये दंड….
शाळा, कॉलेज, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, जिम, तरण तलाव, सिनेमागृह, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमावर राहणार बंदी
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आदेश
-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभेसाठी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तसे त्यांनी जाहीर केले आहे. तृणमूल काँग्रेस त्यांच्या 291 उमेदवारांची यादी आज जाहीर करणार आहे. यामध्ये एकूण 50 महिला तर 42 जण मुस्लीम असणार आहेत. ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढतील.
Today, we are releasing a list of 291 candidates which includes 50 women, 42 Muslim candidates. On 3 seats of north Bengal, we not putting up our candidates. I will contest from Nandigram: TMC Chief & West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/0bY1pxxlN1
— ANI (@ANI) March 5, 2021
-
कोरोना महामारीचा अर्थक्षेत्राला मोठा फटका, राज्याची अर्थव्यवस्था 8 टक्क्यांनी घटण्याची शक्यता
राज्याच्या आर्थिक सव्हेक्षण अहवाल
कोरोना महामारीचा अर्थक्षेत्राला मोठा फटका
राज्याची अर्थव्यवस्था उणे 8 टक्के तर देशाची अर्थव्यवस्था उणे 8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता
बांधकाम आणि वस्तुनिर्माण क्षेत्राला मोठा फटका
राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1 लाख 56 हजार 925 कोटींची घट होण्याची शक्यता
-
ओबीसी आरक्षण योग्य आहे, याबाबतचा युक्तीवाद राज्य सरकारने सर्वोच्च न्यालयात योग्य पद्धतीनं मांडला नाही- चंद्रशेखर बावनकुळे
ओबीसी आरक्षण योग्य आहे, याबाबतचा युक्तीवाद राज्य सरकारने सर्वोच्च न्यालयात योग्य पद्धतीनं मांडला नाही- चंद्रशेखर बावनकुळे
– अध्यादेश काढून हे आरक्षण टिकवण्याचं काम फडणवीस सरकारने केलं.
– ओबीसी लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत, याला राज्य सरकार जबाबदार आहे.
– राज्य सरकारने सोमवारच्या आधी सर्वोच्च न्यायालयात स्टे मागावा- चंद्रशेखर बावनकुळे
-
गडचिरोलीमध्ये पोलीस कमांडो-नक्षलवादी यांच्यात दोनवेळा गोळीबार
गडचिरोली : जिल्ह्यात पोलीस कमांडो नक्षलवादी यांच्यात दोनवेळा गोळीबार
चकमकीत नक्षलवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस जवान जखमी
भामरागड तालुक्यात छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या कोपर्शीच्या जंगलातील घटना
घटनास्थळ घनदाट जंगल पर्वतरांगानी वेढलेला अबुझमाडचा परिसर आहे
राञीपासून या भागात गडचिरोली पोलीस दलाच्या सी सिक्स्टी कमांडो यांचे नक्षलवाद्यांच्या विरोधात अभियान सुरु असुन दोन वेळा नक्षलवाद्यासोबत जवानांची चकमक
नक्षलवाद्यांचा हल्ला जवानांनी परतावुन लावला माञ एक जवान जखमी झालाय
जवानांच्या मदतीसाठी गडचिरोली पोलीस दलाचे हेलिकॉप्टर रवाना
-
कल्याणमधील भातसा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन व्यक्ती बुडाल्या
कल्याण : भातसा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन व्यक्ती बुडाल्या
खडवली परिसरात घडला प्रकार
मोहम्मद शफीक सय्यद आणि नफिस शेख अशी बुडालेल्यांची नावं
अग्निशमन दल आणि टिटवाला पोलिसांकडून शोध मोहीम सुरू
-
शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम एसआरए घोटाळा केल्याचा आरोप
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्यावर कांदिवलीत एसआरए घोटाळा केल्याचा आरोप
– योगेश कदम दापोलीचे आमदार
– मुंबईत सुमुख हिल्स प्रकल्पात अनेक खोट्या परवानग्या, आणि अवैध कामं केल्याचा आरोप
– ज्या कंपन्या अस्तित्वात नाही त्यांना कंत्राट दिल्याचा आरोप
– सोसायटी निर्माण झालेली नसतानाच रुपरेशा योजना, एसआरए मंजुरी, आणि हायवे एनओसीची कागद तायार केल्याचा आरोप
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर जे. जे. शासकीय रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यांनी कोव्हॉक्सीन ही लस घेतली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला यावेळी त्यांच्यासोबत तेथे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे आदी उपस्थित होते.
-
सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे प्रकरण, प्राध्यापकाला 5 वर्षांची शिक्षा
बीड: सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे प्रकरण
प्राध्यापकाला पाच वर्षाची शिक्षा
बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा
2017 मध्ये घडलं होतं प्रकरण
पाच वर्षांच्या कारावासासह आठ हजारांचा लावला दंड
गजानन करपे आसे प्राध्यापक गुन्हेगाराचे नाव
-
शहरातील रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारांच्या वर, नव्या 904 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
पुणे – शहरातील रुग्णसंख्या पुन्हा पाच हजारांच्या वर
– गुरुवारी झाली 904 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
– शहरात सद्यस्थितीला 5 हजार 886 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण
– या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त दोन्ही महापालिका आयुक्तांची घेणार बैठक
– शहरात निर्बंध आणखी कडक होण्याची भीती
-
सोलापुरात विक्रीसाठी तयार असलेल्या निर्यातक्षम दीड लाख रुपयांच्या एक टन डाळिंबाची चोरी
सोलापुर : विक्रीसाठी तयार असलेल्या निर्यातक्षम दीड लाख रुपयांच्या एक टन डाळिंबाची चोरी
सांगोला तालुक्यातील वासुद येथील घटना
सांगोला तालुक्यातील दुसरी घटना
प्रल्हाद केदार यांच्या बागेतील डाळिंब रात्रीत केली साफ
डाळिंब चोरीच्या घटनेने शेतकऱ्यात भीतीचे वातावरण
शोधाशोध करूनही डाळिंब सापडल्याने सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
तापसी आणि अनुराग वाकडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू
पुणे : तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप वाकडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये
गेल्या दोन दिवसांपासून इन्कम टॅक्स विभागाकडून त्यांची चौकशी सुरू
तापसी आणि अनुरागसह इन्कम टॅक्स विभागाची टीमदेखील त्याच हॉटेलमध्ये
इन्कम टॅक्स विभागाच्या दोन पथकांकडून या दोघांची चौकशी सुरू
-
औरंगाबादेतील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराची महाशिवरात्र वेरूळ यात्रा रद्द
औरंगाबाद : बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराची महाशिवरात्र वेरूळ यात्रा रद्द
बारावी ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर यात्रा स्थगित
शिवरात्रीनिमित्त सामान्यांना दर्शन घेता येणार नाही
अन्य भाविकांनी घरूनच दर्शन घ्यावे- प्रशासनाकडून विनंती
शिवरात्रीच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महत्त्वाचा निर्णय
मंदिराच्या पूजेसाठीदेखील मोजक्याच नागरिकांना परवानगी
मंदिर ट्रस्ट सदस्यांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट, त्यानंतर घेतला निर्णय
-
नागपुरात काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल यांचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : काँग्रेसचे प्रदेश महासचिव जिया पटेल यांचा आत्महत्येचा प्रयत्न
दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलाला थेअरीच्या आठ पैकी सात विषयात शून्य गुण दिल्याने आत्महत्येचा प्रयत्न
महाविद्यालयात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न
पदाधिकाऱ्यांनी अडविल्यामुळं अनर्थ टळला
-
जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ, बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी उमरगा तहसीलमधील 4 जणांची चौकशी
सोलापुर – खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणीत वाढ
बनावट जात प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणाऱ्या खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या चौकशीनंतर उमरगा येथील चौघांची चौकशी
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयातील चौघांची चौकशी
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून चौकशी
अनुसूचित जाती प्रभागांमध्ये मोडणाऱ्या बेडा जंगम प्रमाणपत्र सादर करून खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीनी लढवली आहे निवडणूक
शहर पोलीस आयुक्तालयात खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांची शहर गुन्हे शाखेकडून यापूर्वी कसून चौकशी
चौकशीनंतर उमरग्यातील चार साक्षीदारांची झाली चौकशी
बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी आधीच शिवसिद्ध बुळा याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
-
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ आक्रमक, कुसुमाग्रज यांचे निवासस्थान ते संमेलनस्थळ असा काढणार मोर्चा
कोल्हापूर :अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी दलित महासंघ आक्रमक
अण्णा भाऊंना भारतरत्न देण्यासंदर्भातील ठराव नाशिकमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात करण्याची मागणी
मागणीसाठी दलित महासंघ साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भव्य मोर्चा काढणार
कुसुमाग्रज यांचे निवासस्थान ते संमेलनस्थळ असा काढणार मोर्चा
दलित महासंघाचे प्रा.मच्छिंद्र सकटे यांची माहिती
-
साहित्य संमेलनाला 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव नाशिक पालिकेने फेटाळला
नाशिक – साहित्य संमेलनाला 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव पालिकेने फेटाळला
नियमात बसत नसल्याने प्रस्ताव शासनाकडे
कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचं कारण
नियमात 3 लाखांपेक्षा जास्त निधी देता येत नसल्याचे देखील पालिकेकडून स्पष्ट
-
नाशिकमध्ये स्थायी समिती निवडणूक 9 मार्चला होणार
नाशिक : स्थायी समिती निवडणूक 9 मार्चला होणार
मनसेच्या मदतीने भाजप पाचव्यांदा स्थायी समिती राखण्याची शक्यता
शहराच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात ठेवण्यासाठी सगळ्याच पक्षांचा प्रयत्न
आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर स्थायी समितीची निवडणूक महत्वाची
स्थायी समितीचे सर्वच सदस्य अज्ञात स्थळी रवाना
-
उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आज अनेक नेते नाशिकमध्ये
नाशिक – उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्ठांच्या लग्नासाठी आज अनेक नेते नाशिकमध्ये
राज ठाकरे , देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे, शरद पवार हजेरी लावणार
नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये पार पडणार विवाह सोहळा
विवाह सोहळ्याच्या पार्शवभूमीवर संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
राज ठाकरे आणि फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी
राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांशी बैठक; तर फडणवीस करणार विकास कामाचं उद्घाटन
-
नागपुरात जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांचं सदस्यत्व रद्द होऊन पुन्हा निवडणूक होणार
नागपूर :OBC आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
– विद्यमान काही ZP सदस्यांचं सदस्यत्व रद्द होऊन पुन्हा होणार निवडणूक
– नागपूर जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली
– नागपूर जिल्हा परिषदेत 4 जागा कमी होण्याची चर्चा
– नागपूर जिल्हा परिषदेत एकूण 58 जागा, 16 जागा OBC साठी राखीव
-
औरंगाबादेत सोमवारपासून सुरू होणार खासगी रुग्णालयात लसीकरण
औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवारपासून सुरू होणार खासगी रुग्णालयात लसीकरण
खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यास महापालिकेची परवानगी
सुरुवातीला पाच रुग्णालयात होणार लसीकरण
धुत, बजाज, एमजीएम, मेडकव्हर आणि हेडगेवार रुग्णालयात होणार लसीकरण
सोमवारपासून नोंदणी करून खाजगी रुग्णालयात घेता येणार लस
-
नागपुरात घरी लग्न समारंभासाठीही लागणार परवानगी, ग्रामीण भागांतही निर्णय लागू
नागपूर : घरी लग्न समारंभासाठीही लागणार परवानगी
– ग्रामीण भागांतही निर्णय लागू
– जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे आदेश जारी
– लग्नासाठी संबंधित ग्रामपंचायत, गटविकास अधिकाऱ्याची लागणार परवानगी
– वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय
-
सराफा दुकानात चोरीचा प्रयत्न, चोरट्याला बेड्या
पिंपरी चिंचवड : सराफाच्या दुकानात सोन्याची साखळी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरट्याकडून दुकानदाराच्या हातातून सोन्याची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न
चोरट्याला भोसरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-राजू मसकेरी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव
– भोसरी परिसरातील न्यू रावत ज्वेलर्स या दुकानात घडली होती
– त्याच्याकडून चोरीची चेन आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत
-आरोपी राजू मसकेरी याने मुंबई, ठाणे,नवी मुंबई येथे अशा प्रकारच्या चो-या केल्याचे समोर
-
स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये नागपूरची 44 व्या स्थानापर्यंत घसरण
नागपूर : स्मार्ट सिटी रॅकिंगमध्ये नागपूरची 44 व्या स्थानापर्यंत घसरण
– राहण्यास योग्य शहरांच्या रॅकिंगमध्ये नागपूरची झेप
– राहण्यास योग्य शहरांच्या रॅकिंगमध्ये नागपूर 25 व्या स्थानी
– शहरी विकास मंत्रालयातर्फे ‘इज ॲाफ लिव्हिंग इंडेक्स’ जाहीर
– राहण्यासाठी लोकांची नागपूरला पसंती
-
औरंगाबादेत 357 नव्या कोरोना रुग्णांची भर, कोरोनाबाधितांचा आकडा 51644 वर
औरंगाबाद : औरंगाबादेत 357 नव्या कोरोना रुग्णांची भर
कोरोनाबधितांचा आकडा पोहोचला 51644 वर
तर आतापर्यंत 47730 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
सध्या रुग्णालयात 2635 जणांवर उपचार सुरू
तर आतापर्यंत 1279 जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू
-
पिंपरी-चिंचवड मनपाकडून ‘रेकॉर्डब्रेक’ मालमत्ता कर जमा, 122 कोटींची वसुली
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात ‘रेकॉर्डब्रेक’ मालमत्ता कर जमा
– शहरातील मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रित करून फेब्रुवारी महिन्यांत तब्बल 122 कोटी रुपयांची वसुली
-जकात आणि एलबीटी रद्द झाल्यांनतर महापालिका उत्पन्नाचा मोठा स्रोत झाला बंद, त्यामुळे करसंकलन विभागाच्या उत्पन्नावर पालिकेची मोठी भिस्त
-
गंगापूर साखर कारखान्यातील घोटाळ्याचा वाद चिघळला, तक्रारदार कृष्णा पाटील डोनगावकर यांच्या गाडीवर हल्ला
औरंगाबाद : गंगापूर साखर कारखान्यातील घोटाळ्याचा वाद आणखी चिघळला
घोटाळ्याचे तक्रारदार कृष्णा पाटील डोनगावकर यांच्या गाडीवर हल्ला
गंगापूर शहरातील मुख्य रस्त्यावर झाला हल्ला
दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी गाडीवर केली दगडफेक
दगडफेकीत गाडीचं मोठं नुकसान
हल्ला प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Published On - Mar 05,2021 9:19 PM