LIVE | अमरावतीत जिनिंग फॅक्टरीला भीषण आग, लाखो रुपयांचा कापूस जळून खाक
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
औरंगाबादच्या लॉकडाऊनबाबत उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
औरंगाबाद ब्रेकिंग :-
औरंगाबादच्या लॉकडाऊन बाबत उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार बैठक
जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत होणार बैठक
बैठकीत घेणार लॉकडाऊन बाबत निर्णय
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जाहीर करणार लॉक डाऊन बाबत निर्णय
-
चंद्रपुरात 120 जणांना कोरोनाची लागण
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1286 नमुने तपासणीतून 120 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 0 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 24116
कोरोनामुक्त : 23128
ऍक्टिव्ह रुग्ण : 588
मृत्यू : 400
एकूण नमूने तपासणी : 221063
-
-
अमरावतीत जिनिंग फॅक्टरीला भीषण आग, लाखो रुपयांचा कापूस जळून खाक
अमरावतीत जिनिंग फॅक्टरीला भीषण आग -अमरावती येथील जुने कॉटन मार्केटकडून नवीन कॉटन मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिनिंग फॅक्टरीला भीषण आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे ही आग लवकरच आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे
-
नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ, गेल्या 3 दिवसात 403 रुग्णांची नोंद
नांदेड – कोरोनाच्या रुग्णात सातत्याने वाढ
शनिवारी आढळले 150 रुग्ण
गेल्या 3 दिवसात आढळले 403 रुग्ण
आज एकाचा मृत्यू
आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 605 मृत्यू
785 एक्टिव्ह रुग्ण
23 अतिगंभीर रुग्ण
-
पुणे कोरोना अपडेट
पुणे कोरोना अपडेट ……. – दिवसभरात ९६३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ६५९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. ०५ रूग्ण पुण्याबाहेरील. – ३२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०७३४६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६४६०. – एकूण मृत्यू -४८८५. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९६००१. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६०९.
-
-
नवी मुंबईत मराठा समन्वयकांची चिंतन बैठक
नवी मुंबई
नवी मुंबईत मराठा समन्वयकांची चिंतन बैठक संपन्न.
खासदार संभाजीराजे भोसले यांच्या उपस्थितीत चिंतन बैठक झाली
8 मार्च पासून सुरू होणाऱ्या सुनावणी मध्ये राज्य सरकारने योग्य भूमिका मांडत मराठ्यांना न्याय द्यावा.
न्यायालयीन लढाई लढण्यासाठी मराठा समाजाकडून शुभेच्छा.
न्यायालयीन लढाई लढणाऱ्या वकिलांना दिलेला अहवाल संपूर्णपणे इंग्रजीत भाषांतरित करून द्यावा.
राज्य सरकारने आठ मार्च पूर्वी संभ्रम दूर करावा , आधी पाच बेंच आता 11 बेंच ची मागणी असा संभ्रम निर्माण करू नये.
चिंतन बैठकीनंतर खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली भूमिका.
-
तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कंपनीला आग
पालघर : तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील G 2 मधील विराज कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल, कंपनीच्या मागच्या बाजूला लागली आग, आगीचे कारण अस्पष्ट, आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू
-
अकोला कोरोना अपडेट
अकोला कोरोना अपडेट
आज सकाळ च्या अहवालात 251 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत…
एकूण कोरोना बाधितांचा आकडा 18693 झाला आहे….
आज उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे…
*कोरोनामुळे आतापर्यंत 383 जणांचा मृत्यू …
*तर 13668 जणांनी कोरोनावर मात केली आहे….
*उपचार घेत असलेले रुग्ण 4642 आहेत……
-
वाशी येथे मराठा आरक्षणा संदर्भातील राज्यस्तरीय चिंतन बैठकीला सुरुवात
नवी मुंबई : वाशी येथे मराठा आरक्षण संदर्भात राज्यस्तरीय चिंतन बैठक सुरू
बैठकीत छत्रपती संभाजी महाराज उपस्थित
नवी मुंबईतील वाशी स्पोर्ट्स असोसिएशनच्या हॉलमध्ये बैठक सुरू
-मराठा क्रांती मोर्चातील महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयक उपस्थित
या बैठकात मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरणार आहे
-
मनसुख हिरेन यांचा पाण्यात बुडून मृत्यू, प्राथमिक माहितीतून उघड
सुप्रसिद्ध उद्योजग अनिल अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं भरून आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मनसुख यांचा विसरा, इतर साहित्य प्रिझर्व करण्यात आलं आहे. प्रझर्व केलेलं साहित्य हे केमिकल अॅनालायसीससाठी पाठवण्यात आले आहे.
-
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना ठार मारण्याची धमकी
सोलापूर – बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना ठार मारण्याची धमकी
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी
पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल
बार्शी शहर पोलीस ठाण्यात भांदवि 507 नुसार गुन्हा दाखल
-
पुण्यात ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला, भक्तांचा मात्र विरोध
– पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रमातील दोन भूखंड विक्रीला
– गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी वाढल्यामुळे भूखंड विक्रीचा निर्णय
– भूखंड विक्रीला मात्र ओशो भक्तगणांचा विरोध
– पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात 28 एकरचा ओशो आश्र
– देश-विदेशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात
-
औरंगाबादेत सोमवार पासून लॉकडाऊन, महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती
औरंगाबादेत सोमवार पासून लॉकडाऊन
औरंगाबाद महापालिकेच्या वरीष्ठ सूत्रांची माहिती
सोमवारपासून औरंगाबादेत होणार कडकडीत लॉक डाऊन
औरंगाबादचा वाढता कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाचे कठोर पाऊल
औरंगाबादेत कोरोना संसर्गाचा आकडा पोहोचला 500 जवळ
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करणार लॉकडाऊन
-
नागपुरात भारत बायोटेकच्या नेझल कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु
– नागपुरात भारत बायोटेकच्या नेझल कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु
– नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालीटी रुग्णालयात चाचणी सुरु
– नागपुरात दोन दिवसांत आठ स्वयंसेवकांना दिली लस
– पहिल्या फेजची मानवी चाचणी झाली सुरु
– देशात चार शहरात नेझल लसीची चाचणी सुरु
-
मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास योग्य पद्धतीने होईल- बाळासाहेब थोरात
अहमदनगर : मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या चौकशी संदर्भात गृह विभागाने निर्णय घेतला आहे
घटना का घडली, कशी घडली याचा तपास करण्यात येणार आहे.
हा तपास योग्य पद्धतीने होईल.
मुंबई पोलीस जगातल्या प्रसिद्ध यंत्रणेपैकी एक आहेत.
भाजपच्या काळातदेखील मुंबई पोलिसांनीच तपास केलेला आहे.
तर पोलीस निरपेक्ष भावनेने पारदर्शक तपास करत आहे.
बाळासाहेब थोरात यांची मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली कोरोनाची लस
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली कोरोनाची लस
– नागपूरातील एम्स रुग्णालयात घेतली कोरेनाची लस
– ‘कोरोना लस सुरक्षित आहेत’
– सर्वांनी कोरोना लस घेण्याचं केलं आवाहन
– गडकरींच्या हस्ते 1000 लोकांना निःशुल्क कोरोना लसीकरण
– नितीन गडकरींच्या हस्ते निःशुल्क लसीकरण शिबिराला सुरुवात
-
तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाची औरंगाबादेत पदयात्रा
औरंगाबाद : तानाजी सावंतांना मंत्रिपद मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाची पदयात्रा
औरंगाबाद ते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगापर्यंत निघणार पदयात्रा
मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी
औरंगाबाद शहरातील नगर नाक्यावरून पदयात्रेला सुरुवात
शिवसेना आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी
-
एल्गार परिषद वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, शर्जिल उस्मानीची उच्च न्यायालयात धाव
– पुण्यातील एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या शर्जिल उस्मानी यांची उच्च न्यायालयात धाव
– पुणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची शर्जिल यांची मागणी.
– माझा गुन्हा हा निराधार असल्याचं शर्जिल यांचं मत
– 2 फेब्रुवारीला पुणे पोलिसांनी आयपीसी कलम153 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
– सुनावणी प्रलंबित असताना पोलिसांनी कडक कारवाई करू नये, असं शर्जिल यांनी कोर्टामध्ये म्हटलं आहे.
– पुढील आठवड्यात शर्जिल उस्मानीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे
– काही निवडक संदर्भानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचा शर्जिल उस्मान यांचा आरोप
-
मिलिंद एकबोटे यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
पुणे : मिलिंद एकबोटे यांच्यावर जातीय तेढ निर्माण होईल असे वक्त्यव्य केल्याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
मिलिंद रमाकांत एकबोटे हे समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष
कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महापालिकेच्या वतीनं सुरु आहे. यावरून एकबोटे यांनी महापालिकेवर टीका करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप.
-
विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं – संजय राऊत
विरोधी पक्षाने काही मुद्दे उपस्थित केली असतील तर त्याचा तपास करायला हवा
ती हत्या की आत्महत्या याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.
ही हत्या की आत्महत्या हे लवकर समोर येणे गरजेचे आहे.
मनुसख हिरेन यांचा मृत्यू धक्कादायक आहे.
मात्र, विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं आहे.
हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एनआयएची गरज नाही.
हा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहेत.- संजय राऊत
-
सोलापुरात 946 सक्रिय कोरोना रुग्ण, नव्या 70 रुग्णांची भर
सोलापुर – ग्रामीण भागात 45 तर शहरात 25 नव्या कोरोना रुग्णांची भर
जिल्ह्यात 946 सक्रिय रुग्णावर उपचार सुरू
शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 573 वर
आतापर्यंत शहरातील 664 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53 हजार 419 वर
आतापर्यंत ग्रामीण भागातील 852 जणांचा कोरोनाने मृत्यू
-
कोकण रेल्वे विद्युतीकरणावर धावण्यास सज्ज, वर्षाला 200 कोटी रुपये वाचणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे विद्युतीकरणावर धावण्यास सज्ज
विद्युतीकऱणावर इंजीन यशस्वी धावल्यानंतर आता रेल्वे गाड्यांचे नियोजन
पहिल्या टप्यात 10 रेल्वेगाड्या विद्युतीकरणावर धावणार
इंजिनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर आता सीआरएस चाचणीही लवकरच
तुतारी एक्स्प्रेस ,मंगला एक्स्प्रेस, मत्सगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती या गाड्या विजेवर धावण्यासाठी नियोजन
वर्षाला कोकण रेल्वेचे 200 कोटी रुपये वाचणार
प्रदुषण मुक्त प्रवासासोबत कोकण रेल्वेचा प्रवास होणार वेगवान
-
रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतींची निवड 22 मार्चला
रत्नागिरी- जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतींची निवड 22 मार्चला
पंचायत सभापतींची निवड 16 मार्चला होणार
रत्नागिरी, लांजा, खेड, राजापूर आणि खेड पंचायत समितीच्यआ सभापती पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु
-
बीडमध्ये नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव, 6 कर्मचाऱ्यांसह 12 विद्यार्थ्यांना कोरोना
बीड: गेवराईच्या नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव
सहा कर्मचाऱ्यांसह 12 विद्यार्थी कोरोनाबाधित
प्राचार्य, आद्यपक, आचारी आणि मेस कर्मचारी बाधीत
विद्यार्थ्यांवर तत्काळ उपचार सुरू
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन अलर्ट
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची नवोदयला भेट
-
पुण्यात कोरोनाचा 830 नवे रुग्ण आढळले, 9 जणांचा मृत्यू
पुणे शहरात 5 मार्च रोजी 830 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
– एकूण 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे
– एकूण बाधितांची संख्या आता 2 लाख 6 हजार 383 वर
– आतापर्यंत 4 हजार 881 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
– दरम्यान 551 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डीस्चार्ज देण्यात आला
– आजपर्यंत 1 लाख 95 हजार 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत
-
पुण्यात आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के प्रवेशाच्या जागांसाठी तीन दिवसांत 58 हजार 311 अर्ज
पुणे : आरटीईच्या माध्यमातून 25 टक्के प्रवेशाच्या जागांसाठी तीन दिवसांत 58 हजार 311 अर्ज
– 2020-21 या शैक्षणिक वर्षात करोनामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सतत कोलमडले होते
-दरम्यान एकूण 9 हजार 431 शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून या शाळांमध्ये 96 हजार 629 रिक्त जागा आहेत
– प्रवेशासाठी आरटीई पोर्टलवर 3 मार्चपासून सुविधा उपलब्ध झाली असून ती 21 मार्चपर्यंत राहणार आहे.
-
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ 6 एप्रिलला होणार
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 57 वा दीक्षांत समारंभ 6 एप्रिलला होणार
पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडणार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉअनिल सहस्त्रबुद्धे ऑनलाईन पद्धतीने होणार सहभागी
77 हजार 300 विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रसाठी केली नोंदणी
प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाईन नोंदणीचा अर्ज विद्यार्थ्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा विभागात जमा करावा लागणार
-
मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण, पोलिसांकडून लवकरच अहवालाचे सादरीकरण
ठाणे : काल ठाण्यातील मुंब्रा खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मनसुख यांचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणला होता. काल या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे पोस्ट मार्टम सुरू होते. चार डॉक्टर च्या टीम ने मिळून हे पोस्ट मार्टम केलं असून या पोस्ट मार्टम चे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. अद्याप या पोस्ट मार्टम चा अहवाल हा रिजर्व ठेवण्यात आला आहे. पोस्ट मार्टम चा अहवाल लवकरच मिडियासमोर सादर करणार असल्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले आहे.
-
नाशिकमध्ये कोरोनाचा धोका कायम, 24 तासांत 222 नवे रुग्ण
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम
– गेल्या 24 तासात जिल्ह्यात 380 रुग्ण पॉझिटिव्ह
– तर उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू
– यात सर्वाधिक 222 रुग्ण आढळले शहरात
– जिल्ह्यातील मृत्यूचा एकूण आकडा गेला 2127 वर
-
पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा, कारण गुलदस्त्यात
पिंपरी चिंचवड : उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा
-5 महिन्यात दिला राजीनामा
-राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात
-वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला असल्याचं महापालिका गटनेते नामदेव ढाके यांचे स्पष्टीकरण
-
नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजप युवा मोर्चाकडून निषेध
नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजयुमोर्चाने केला निषेध
– संतप्त कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंच्या प्रतिमेला जोडे मारुन नोंदवला निषेध
– ‘राममंदिर उभारणीसाठी टोलवसुलीचा भाजपला ठेका दिला का’
– नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे नागपुरात निषेध व्यक्त
– भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला निषेध
-
औरंगाबाद महापालिकेत बनावट नियुक्तीपत्र तयार करून 12 जणांना नोकरी, तक्रार दाखल
औरंगाबाद महापालिकेत बनावट नियुक्तीपत्र तयार करून 12 जणांना नोकरी
औरंगाबाद महापालिकेच्या अग्निशमन विभागातील प्रकार
बनावट लेटरहेड, आयुक्तांची बनावट सही करून तब्बल 12 जणांना दिली नौकरी
बोगस नौकरी मिळवण्याचा प्रकार आयुक्तांनीच काढला बाहेर
बनावट नियुक्ती पत्र प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
-
महाशिवरात्रीला मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग राहणार बंद, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय
औरंगाबाद : महाशिवरात्रीला मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग राहणार बंद
घृष्णेश्वर, परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही तिन्ही ज्योतिर्लिंग राहणार बंद
तिन्ही ज्योतिर्लिंगाच्या उत्सव आणि यात्रा प्रशासनाकडून रद्द
महाशिवरात्रीला भक्तांसाठी मंदिर असणार कडकडीत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज
-
नागपूर जिल्ह्यात 14 मार्चपर्यंत निर्बंध कायम; शाळा, महाविद्यालये आणि आठवडी बाजार बंद राहणार
नागपूर : नागपूर जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत निर्बंध कायम
– नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने काढले आदेश
– शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार राहणार बंद
– वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर निर्णय
– सात मार्चपर्यंत लावलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत कायम
– धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रमावर बंदी
– लॅान, मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह समारंभावर बंदी
-
भिवंडी शहरातील नारपोली सोनीबाई कंपाऊंड येथे आग
भिवंडी शहरातील नारपोली सोनीबाई कंपाऊंड येथे आग
लागलेल्या आगीत तीन यंत्रमाग कारखाने जाळून खाक
भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी दाखल
आगीत यंत्रमाग कारखाना जाळून खाक
-
मुथूट समूहाचे अध्यक्ष एम.जी. जॉर्ज मुथूट यांचे वयाच्या 72 व्या वर्षी नवी निधन
मुथूट समूहाचे अध्यक्ष एम.जी. जॉर्ज मुथूट यांचे वयाच्या 72 व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. त्यांनी तरुण वयात कौटुंबिक व्यवसायात म्हणजेच मुथूट गटात प्रवेश केला होता. 1969 सली ते या समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि 1993 मध्ये अध्यक्ष झाले होते. -
विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण, उपचार सुरु
राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्रई विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली. कोरोना सदृश लक्षणे आढळल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशन निमित्त मुंबई येथे असून आज कोरोना चे लक्षण दिसल्याने मी माझी कोव्हीड टेस्ट केली,टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार मी घेत आहे. लवकरच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल .(1/2)
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 5, 2021
Published On - Mar 06,2021 8:19 PM