LIVE | बीडमध्ये भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक, पाच जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 07, 2021 | 10:40 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | बीडमध्ये भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक, पाच जणांचा मृत्यू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Mar 2021 09:27 PM (IST)

    बीडमध्ये भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक, पाच जणांचा मृत्यू

    बीड: भरधाव ट्रकची दोन वाहनांना धडक

    बीड- परळी रस्त्यावरील मोची पिंपळगाव जवळील घटना

    अपघातात पाच जणांचा मृत्यू

    अपघातानंतर ट्रक पलटला

    ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 07 Mar 2021 08:05 PM (IST)

    राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट

    नाशिक – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट

    मनसे सरचिटणीस गोकुळ नागरे यांचे 5000 रुपये चोराने लांबवले

    मनसे कार्यकर्त्यांनी चोराला पकडून दिल पोलिसांच्या ताब्यात

  • 07 Mar 2021 07:47 PM (IST)

    पुणे कोरोना अपडेट 

    पुणे कोरोना अपडेट – दिवसभरात ९८४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ७५० रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. ०१ रूग्ण पुण्याबाहेरील. – ३४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०८३३०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६६८९. – एकूण मृत्यू -४८९०. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९६७५१. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७४३.

  • 07 Mar 2021 07:25 PM (IST)

    महाराष्ट्रात कोरोनाचा स्फोट, 11 हजार 141 कोरोना रुग्णांची नोंद

    मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधिताचा आकडा वाढता, आज 11 हजार 141 कोरोना रुग्णांची नोंद, तर 38 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, तर ६ हजार ०१३ रुग्णांना डिस्चार्ज

  • 07 Mar 2021 06:32 PM (IST)

    औरंगाबाद 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन

    औरंगाबाद 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन, 4 एप्रिल पर्यंत राहणार अंशतः लॉक डाऊन राहणार

  • 07 Mar 2021 06:03 PM (IST)

    मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, पत्नीकडून तक्रार 

    मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, पत्नीकडून तक्रार

    यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक ATS कडे वर्ग

    दहशतवाद विरोधी पथकाकडून तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत

    पुढील तपास सुरू

  • 07 Mar 2021 05:21 PM (IST)

    कराडमध्ये नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू

    कराड वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू

    संरक्षण कठडा नसलेल्या फरशी पुलावरुन दुचाकी नदीत पडल्याने घडली दुर्घटना कराड तालुक्यातील आंबवडे कोळे येथील घटना

    पोहता येत असल्याने सात वर्षाच्या मुलीने वाचविले पित्याचे प्राण

    दुचाकीवरुन चौघे करत होते प्रवास

    मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे

    कराड पोलिसात घटनेची नोंद

  • 07 Mar 2021 05:11 PM (IST)

    राज्यमंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक, अर्थसंकल्पाबाबत चर्चा

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात राज्यमंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक,

    काही वेळात बैठकीला सुरुवात होणार

    या बैठकीत उद्या सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत चर्चा केली जाणार आहे

    त्यासोबतच गेल्या एक महिन्यापासून रिकामे असलेले विधानसभा अध्यक्ष पद यावर देखील चर्चा केली जाणार असल्याची शक्यता

  • 07 Mar 2021 04:13 PM (IST)

    नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

    सोलापूर – नान्नज माळढोक पक्षी अभयारण्याला आग

    उत्तर सोलापुर तालुक्यातील अकोलेकाटी हद्दीत गवताला लागली आग

    अभयारण्यातल्या तारांचा स्पर्श होऊन ठिणगी पडल्यामुळे लागली आग

    दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्र जळाल्याची प्राथमिक माहिती

    वनविभागाचे वनपाल आणि कर्मचाऱ्यांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

  • 07 Mar 2021 04:06 PM (IST)

    नाणार प्रकल्पग्रस्तांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार

    रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्प प्रकरण नाणार मधील जमीन मालकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटणार

    उद्या सकाळी ११ वाजता कृष्णकुंजवर जमिनमालकांना राज ठाकरेंनी बोलावले प्रकल्पाला वाढत्या समर्थनाच्या पाश्वभूमीवर जमिन मालकांचे म्हणणे राज ठाकरे ऐकणार जमिन मालकांनी मोठ्या संख्येनी कृष्णकुंजवर उपस्थित राहण्याचे आवाहन नाणार मधल्या अनेक जमिन मालकांना आले राज ठाकरे यांच्या बैठकिचे निमंत्रण

  • 07 Mar 2021 03:35 PM (IST)

    राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला, औरंगाबादेत तक्रार दाखल

    औरंगाबाद – राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, ऍड.रत्नाकर चौरे यांनी केली राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल, माध्यमांसमोर राज ठाकरे यांनी मी मास्क घालणार नाही असे वक्तव्य केले होते

  • 07 Mar 2021 03:33 PM (IST)

    गजा मारणे पाठोपाठ कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्याही मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या

    पुणे – गजा मारणे पाठोपाठ कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्याही मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या, शरद मोहोळला दोन महिने पुणे शहरात राहण्यास बंदी, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत साथीदारांसह एका कार्यक्रमात गुंड शरद मोहोळ याने निर्माण केली होती दहशत, पुणे पोलिसांनी दोन महिन्यांसाठी शहरात वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास केली मनाई, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले याबाबतचे आदेश

  • 07 Mar 2021 02:01 PM (IST)

    गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा

    गोवा विधानसभा निवडणुकीत 20-25 जागांवर लढणार; संजय राऊत यांची घोषणा

  • 07 Mar 2021 01:59 PM (IST)

    मला बंगाली भाषिक असल्याचा अभिमान- मिथून चक्रवर्ती

    मी मनातून बंगाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याची मनातून इच्छा होती.  पश्चिम बंगालमध्ये राहणारा प्रत्येक जण बंगाली आहे.

  • 07 Mar 2021 01:07 PM (IST)

    अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश

    अभिनेते मिथून चक्रवर्ती यांचा भाजपमध्ये प्रवेश, कोलकात्यात भाजपच्या रॅली दरम्यान मुकुल राय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

  • 07 Mar 2021 01:06 PM (IST)

    सोलापुरातील मेडिकल गोडाऊनला मोठी आग

    सोलापूर – शहारातील मेडिकल गोडाऊनला मोठी आग, जुनी पोलीस लाईन येथील घटना, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल, आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्न सुरू

  • 07 Mar 2021 11:56 AM (IST)

    ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्पाचा विचार करा; राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

    ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ प्रकल्पाचा विचार करा; राज ठाकरे यांचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

  • 07 Mar 2021 11:05 AM (IST)

    अखेर नाशिक इथे होणारं आगामी मराठी साहित्य संमेलन रद्द

    औरंगाबाद : अखेर आगामी मराठी साहित्य संमेलन रद्द, नाशिक इथे होणारं साहित्य संमेलन रद्द, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संमेलन रद्द, साहित्य महामंडळाच्या बैठकीत निर्णय

  • 07 Mar 2021 10:58 AM (IST)

    नागपूरच्या बुधवारी भाजी बाजारात भाजी खरेदी साठी सकाळी नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टनसिंगला हरताळ

    नागपूरच्या बुधवारी भाजी बाजारात भाजी खरेदी साठी सकाळी नागरिकांची गर्दी, भाजी बाजारात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, रविवार असल्याने नागरिकांनी केली गर्दी, शनिवार रविवार नागपुरात मार्केट बंद मात्र या बाजारात गर्दी वाढल्याने वाढली चिंता, सकाळच्या या बाजारात येतो शेतकऱ्यांचा भाजीपाला

  • 07 Mar 2021 10:35 AM (IST)

    नागपुरात विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, बाजारपेठा बंद, मात्र नागरिक रस्त्यावर

    नागपुरात विकेंड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या, मात्र नागरिक रस्त्यावर, चौकातील सिग्नलवर दिसतात नागरिक, काही विना मास्क फिरत असल्याचं सुद्धा चित्र,नागपूर जिल्ह्यात शनिवार रविवार बंदच आवाहन, मात्र काही नागरिक करीत आहे नियमांचं उल्लंघन

  • 07 Mar 2021 10:33 AM (IST)

    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनमाड येथील रविवारी भरणार आठवडे बाजार बंद

    मनमाड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज रविवारी भरणार आठवडे बाजार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला बंद, दर रविवारी मनमाड येते भरत असतो आठवडे बाजार त्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील शेतकरी , छोटे दुकानदार आपला माल विकण्यासाठी येतात, पुढील आदेश होई पर्यंत आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद ने प्रसिद्ध केले पत्रक

  • 07 Mar 2021 10:32 AM (IST)

    कार दरीत कोसळली, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरातील घटना

    कार दरीत कोसळली, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरातील घटना, पुणे नाशिक महामार्गावर अपघात, माहुली घाटात कार 70 फुट खाली कोसळली, आज सकाळी घडली घटना, गुजरातचे तीघे तरूण बालंबाल बचावले, कारने पाच पलट्या खावूनही तरूण सुदैवाने बचावले, गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात, महामार्ग पोलीसांनी केली अपघातग्रस्तांना मदत, काही दिवसांपूर्वी झाला होता असाच अपघात

  • 07 Mar 2021 08:25 AM (IST)

    नागपूर जिल्हापरिषद मधील 16 जागांवार होणार फेर निवडणूक, निवडणूक आयोगाने पत्र दिले

    नागपूर जिल्हापरिषद मधील 16 जागांवार होणार फेर निवडणूक, निवडणूक आयोगाने दिले पत्र, ओबीसी प्रवर्गाच्या सर्वच जागांवरील निवडणूक रद्द, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया नुसार नागपूर जिल्हापरिषद मधील ओबीसी प्रवर्गासाठी असलेल्या 16 पैकी 4 जागा अतिरिक्त ठरल्या, आता सगळ्याच पक्षाच या कडे लागलं लक्ष

  • 07 Mar 2021 06:58 AM (IST)

    नागपुरात कोरोनाचा धोका वाढतोय, सलग चौथ्या दिवशी हजारावर रुग्ण वाढत असल्याने वाढली चिंता

    नागपुरात कोरोनाचा धोका वाढतोय, सलग चौथ्या दिवशी हजारावर रुग्ण वाढत असल्याने वाढली चिंता, गेल्या 24 तासात 1183 नवीन रुग्ण आढळले तर 9 जणांचा झाला मृत्यू, सक्रिय रुग्णांनी ओलांडला 10 हजारचा टप्पा, एकीकडे लसीकरणा चा जोर वाढतो आहे तर दुसरी कडे रुग्ण संख्येत सुद्धा वाढ होत आहे

  • 07 Mar 2021 06:51 AM (IST)

    पुणे महापालिका कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करणार

    पुणे – पुणे महापालिका कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करणार, वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय, दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोवीड केअर सेंटर सुरू केले जाणार, मंगळवारपासून हे दोन्ही केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाची तयारी सुरु, दळवी रुग्णालयात 75 आॅक्सिजन बेड तर रक्षक नगर स्टेडीयम येथे सुमारे 300 बेडची व्यवस्था केली जाणार

  • 07 Mar 2021 06:42 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी घेतली कोरोना लस

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी घेतली कोरोना लस, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन घेतली लस

  • 07 Mar 2021 06:28 AM (IST)

    अकोल्यात तरुणाचा दगडाने ठेचून हत्या

    अकोला शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील नेहरुपार्क चौकात एका 25 ते 30 वर्षीय शामकुमार गोरे या युवकाची दगडाने ठेचून हत्या, रात्री 3 ते 4 च्या सुमारास झाली हत्या, जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती

  • 07 Mar 2021 06:24 AM (IST)

    चिपळूणमध्ये आईनेच घेतला एक महिन्याच्या मुलीचा जीव

    रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात आईनेच घेतला एक महिन्याच्या मुलीचा जीव, एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बकेट मध्ये बुडवून मारले, दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली याच्या रागाच्या भरात घेतला मुलीचा जीव, सदरच्या घटनेने सावर्डे हादरले

Published On - Mar 07,2021 9:27 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.