LIVE | जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
जळगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा घेतला निर्णय. 11 मार्च रोजी रात्री 8 पासून ते 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेदरम्यान असणार जनता कर्फ्यू, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली घोषणा
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
गडचिरोली जिल्हयात दिवसभरात 27 जणांना कोरोनाची लागण
गडचिरोली : जिल्हयात आज दिवसभरात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित 9726 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9462 वर पोहचली आहे. तसेच सध्या 156 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
-
अमरावतीत दिवसभरात 282 जणांना कोरोनाची लागण, तर तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
अमरावती कोरोना फ्लॅश :
अमरावतीत आज 282 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
-आज तीन रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू
-जिल्हात 853 रुग्णांनी केली आज कोरोनावर मात
-जिल्हात आतापर्यंत 40268 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
-आतापर्यंत जिल्हात 33821 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आतापर्यंत 572 रुग्णांचा कोरोनाने उपचारा दरम्यान मृत्यू
-5875 रुग्णांवर उपचार सुरू
-
-
साताऱ्यात वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव, महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात 17 जणांना कोरोनाची लागण
सातारा : साताऱ्यातील शाळेपाठोपाठ वृद्धाश्रमात कोरोनाचा शिरकाव, साताऱ्यातील महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात 17 जणांना कोरोनाची लागण, वृद्धाश्रमातील 55 ते 75 वयाच्या वृद्धांचा बाधितांमध्ये समावेश
-
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोरोना निर्बंधांचा विसर
नाशिक – महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोरोना निर्बंधांचा विसर, स्थायी समिती निवडणुकीनंतर रामायण बंगल्याबाहेर फटाके आणि ढोल वाजवत केला जल्लोष, ढोल वाजवण्यावर बंदी असताना देखील ढोल वाजवत केला जल्लोष, सोशल डिस्टनसिंग न पाळता , मास्क न घालताच भाजपचा जल्लोष
-
नागपूर महापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वणवे आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह
नागपूर : नागपूर महापालिकेचे विरोधी पक्ष नेता तानाजी वणवे आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटीव्ह, काही दिवसात संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेण्याची विनंती
-
-
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्रिसदस्यीय केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल
नाशिक – कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्रिसदस्यीय केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव संदर्भात घेणार आढावा, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात वाढत आहे कोरोना प्रादुर्भाव, नाशिक जिल्हा रुग्णालयात येऊन घेतला आढावा, जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करणार पाहणी
-
नागपुरच्या गणेशपेठ परिसरात एकाची हत्या
नागपूर – नागपुरच्या गणेशपेठ परिसरात एकाची हत्या, रजत संकुल बिल्डिंगमध्ये हत्या, मृतकांचे नाव लक्ष्मण मलिक 65 वर्ष, हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही, पोलीस तपास सुरु
-
पुणे शहर पोलिसांकडून गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याचा गुन्ह्यात अटक
पुणे शहर पोलिसांकडून गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्याचा गुन्ह्यात अटक
निलेश घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांची मोक्काअंतर्गत कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ
येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी निलेश घायवळ केली अटक
निलेश बन्सीलाल घायवळ,संतोष आनंद धुमाळ,मुसाब एलाही शेख अशी अटक केलेल्याची नावे
नुकतीच पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश घायवळ याच्यावर स्थानबद्ध तेची कारवाई करत येरवडा कारागृहात रवानगी केली होती
-
नागपुरात शेतकऱ्याचा मुलाला पोलिसांची मारहाण, व्हिडीओ व्हायरल
नागपुरात शेतकऱ्याचा मुलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, मुलगा शेतात वडिलांचा टीफीन घेऊन जात असताना पोलिसांकडून मारहाण, व्हायरल व्हीडीओवर नागपूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे संतप्त, मारहाणीची चौकशी करुन दोषी पोलीसांवर कारवाईची मागणी, नागपूर जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे यांनी केली मागणी, मारहाणीच्या प्रकरणाची नागपूर पोलीसांत करणार तक्रार, व्हायरल व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती
-
देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले : अनिल देशमुख
देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले, याची आम्ही चौकशी करतोय : अनिल देशमुख
मनसुख हिरेन हत्या प्रकरण ही चौकशी दाबण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकडून करत आहेत, सचिन वाझे हे मनसुख हिरेनशी बोलत होते, चार महिने गाडी त्यांच्याच कडे होती, पोस्ट मॉर्टेम करताना सचिन वाझे हजर होते, प्रत्येक ठिकाणी सचिन वाझे पुराव्यांशी छेड करत आहेत – देवेंद्र फडणवीस
-
माझी चौकशी करा, खुन्यांना वाचवा : देवेंद्र फडणवीस
मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा काही अडचण नाही, खुनी शोधला नाहीत, त्याच्या पलिकडची माझ्याकडे माहिती आहे. माहिती मिळवण्याचा माझा अधिकार आहे. माझी चौकशी करा, पण तुम्ही खुनी लोकांना का सोडताय? देवेंद्र फडणवीस आक्रमक
-
मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणाची चौकशी SIT मार्फत करणार : अनिल देशमुख
मोहन डेलकर आत्महत्या केली. त्यावर त्यांनी आक्षेप घेतलाय की प्रफुल खेडा पटेल हे मला त्रास देत होते. पटेल हे गृहमंत्री होते गुजरात राज्याचे. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. मोहन डेलकर यांच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार – अनिल देशमुख
मनसुख हिरेन आत्महत्येचा तपास NIA करत आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीसांनांनी वाचून दाखवला. ATS याबाबत तपास करुन सत्य समोर आणेल. त्यांच्याकडे काही पुरावे असेल, तर एटीएसकडे द्यावे. राज्य सरकार योग्य तपास करेल, कोणालाही पाठिशी घालणार नाही. शब्द देतो. जे कागदपत्रे आहेत, ती माझ्याकडे किंवा ATS कडे द्या. तपास योग्य होईल – अनिल देशमुख
-
सचिन वाझेवर गंभीर आरोप, शिवसेनेकडून वाचवण्याचा प्रयत्न : आशिष शेलार
सचिन वाझेना अटक व्हायला पाहिजे, सचिन वाझेना वाचवण्याचा प्रयत्न शिवसेना करताहेत. डेलकरांच्या आत्महत्येची चौकशी व्हायला पाहिजे. डेलकरांच्या प्रकरणा मागे वाझेना वाचवू नका सचिन वाझेवर गंभीर आरोप लागले आहेत : आशिष शेलार
-
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्रिसदस्यीय केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल
नाशिक -कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्रिसदस्यीय केंद्रीय पथक नाशिक मध्ये दाखल
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव संदर्भात घेणार आढावा
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात वाढत आहे कोरोना प्रादुर्भाव
नाशिक जिल्हा रुग्णालयात येऊन घेतला आढावा
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करणार पाहणी
-
नागपुराच्या गणेशपेठ परिसरात एकाची हत्या, पोलीस तपास सुरू
नागपूर –
नागपुराच्या गणेशपेठ परिसरात एकाची हत्या
रजत संकुल बिल्डिंग मध्ये झाली हत्या
मृतकांचे नाव लक्ष्मण मलिक 65 वर्ष
हत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही
पोलीस तपास सुरू
-
सचिन वाझे यांनीच हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप, देवेंद्र फडणवीस
मनसुख हीरेन यांच्या पत्नीनं दिलेल्या जबाब महत्त्वाचा, सदर गाडी सचिन वाझेकडे चार महीने होती, सचिन वाझे यांनीच हत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय, सचिन वाझे यांना तत्काळ अटक का करण्यात आली नाही,
-
सचिन वाझेंनी पतीचा खून केल्याचा संशय; फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज वाचला
मनसुख हिरेन प्रकरणातील विमला हिरेन यांचा जबाब फडणवीस विधानसभेत वाचून दाखवला, तीन दिवस ते सचिन वाझेकडे होते , सचिन वाझेच्या सांगण्यावरून तक्रार करुन घेतली – देवेंद्र फडणवीस
-
सचिन वाझेंना अटक का झालेली नाही, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
मनसुख हिरेनच्या पत्नीचा जबाब, सचिन वाझे म्हणत होते माझ्या पतीला सदर केसमध्ये अटक हो, जामीनावर मी तुला सोडवून घेतो, त्यानंतर ते तणावामध्ये होते, धनंजय गावडेच्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचं लोकेशन आहे,
-
विनामास्क फिरणाऱ्या तरुणांना काढायला लावल्या उठबश्या
सांगली – विनामास्क फिरणाऱ्या तरुणांना काढायला लावल्या उठबश्या, महापालिकेच्या टास्क फोर्सची कारवाई, सांगली बस स्थानक परिसरात टास्क फोर्सकडून धडक कारवाई
-
चंद्रपूरच्या दारुबंदी समीक्षा समितीला अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ
चंद्रपूर : चंद्रपूरच्या दारुबंदी समीक्षा समितीला अहवाल सादर करण्यासाठी 10 दिवसांची मुदतवाढ… 17 मार्च पर्यंत समितीला राज्य सरकार ला सादर करायचा आहे अहवाल, समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या समितीच्या 15 जानेवारी ते 5 मार्च दरम्यान 11 बैठका झाल्या असून समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे. समितीचे सदस्य सचिव हा अहवाल लवकरच राज्य सरकार ला सादर करतील.
-
राज्यातील पाच जिल्ह्यातील कोरोना अपडेट
नागपूर, 5 दिवसात 6193 कोरोना, 46 कोरोना बाधितांचा मृत्यू
अमरावती 5 दिवसात 2869, 29 रुग्णांचा मृत्यू
बुलढाणा 5 दिवसात 3045 रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
अकोला 5 दिवसात 1732 कोरोना रुग्ण,11 रुग्णांचा मृत्यू
यवतमाळ 5 दिवसात 1184 कोरोनाबाधित, 12 रुग्णांचा मृत्यू
-
नागपुरात 5 दिवसात 6193 कोरोनाचे नवे रुग्ण, 46 कोरोना बाधितांचा मृत्यू
नागपुरात 5 दिवसात 6193 कोरोनाचे नवे रुग्ण, 46 कोरोना बाधितांचा मृत्यू
अमरावती 5 दिवसात 2869, 29 रुग्णांचा मृत्यू
बुलढाणा 5 दिवसात 3045 रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
अकोला 5 दिवसात 1732 कोरोना रुग्ण,11 रुग्णांचा मृत्यू
यवतमाळ 5 दिवसात 1184 कोरोनाबाधित, 12 रुग्णांचा मृत्यू
-
मुंबईत सर्वात आधी नाईट कल्ब निर्बंध घालण्याची शक्यता : अस्लम शेख
काही ठिकाणी कोरोना रुग्णांचा वाढ होत आहे. तर काही ठिकाणी ते कमीही होत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश घेण्याचे निर्णय सांगितला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वाटलं, त्या ठिकाणी नाईट कर्फ्यू लावला जाईल. संचारबंदी लावण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत सर्वात आधी नाईट कल्ब निर्बंध घालण्याची शक्यता आहे. गर्दी असलेल्या ठिकाणी निर्बंध असल्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडून लक्ष ठेवले जात आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन, निर्बंध यासारखे अनेक निर्णय घेतले जात आहेत. : अस्लम शेख
-
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट होणार
कोल्हापूर
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे होणार थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट
केंद्रीय पुरातत्व विभागाची घेतली जाणार मदत
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
मंदिराच्या छतावरील सिमेंट कोब्याचा असेसमेंट रिपार्ट देखील पुरातत्व विभागाला दिला जाणार
केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार मंदिराचे संवर्धन होणार
-
सालापूर मनपाच्या नगररचना कार्यालयातील आवेक्षकांना प्रत्येकी शंभर अनाधिकृत बांधकामे शोधण्याचे उद्दिष्ट
सोलापूर –
मनपाच्या नगररचना कार्यालयातील आवेक्षकांना प्रत्येकी शंभर अनाधिकृत बांधकामे शोधण्याचे उद्दिष्ट
पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिलेले उद्दिष्ट
अन्यथा मानधनासह कामावर संकट येण्याचा दिला पालिका आयुक्तांनी इशारा
अनाधिकृत बांधकामे शोधून त्यावरील कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
-
राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण, पुण्यात आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण
पुणे
राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण
पुण्यात आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण
दुबईहून पुण्यात आलेल्या व्यक्तीला झाला होता पहिला कोरोना संसर्ग
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 9 हजार 316 जणांना गमवावे लागले प्राण
तर जिल्ह्यात 4 लाख 20 हजार 877 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण, त्यापैकी 3 लाख 97 हजार 588 जण कोरोना मुक्त
आजच्या दिवशी पुणे जिल्ह्यात 1 हजार 412 कोरोनाचे रुग्ण
-
नाशिक शहरात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू
नाशिक – शहरात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू
सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी
सर्व धार्मिक स्थळं शनिवार रविवार बंद
बार आणि हॉटेल्स रात्री 9 पर्यंत उघडे राहणार, त्यानंतर मात्र फक्त पार्सल काउंटर
शाळा, महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस बंद
शहरातील सर्व आठवडे बाजार देखील बंद ठेवण्याचा निर्णय
-
नाशिक आणि पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला मंजुरी
नाशिक – नाशिक आणि पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला मंजुरी
अर्थसंकल्पात नाशिकच्या विकासाला चालना देणारा निर्णय
सेमी हायस्पीडचा राज्यात पहिला प्रयोग
उयोगासह कृषि विभागाला होणार फायदा
235 किलोमीटर चा एकूण रेल्वे मार्ग
तर 200 किलोमीटरच्या ताशी वेगाने धावणार रेल्वे
-
कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेता महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर
नाशिक –
कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेता महापालिका आयुक्त अॅक्शन मोडवर
पालिकेत विना मास्क प्रवेश केल्यास जागेवरच 1 हजारांचा दंड
एका कामासाठी एकाच व्यक्तीला प्रवेश
ज्या विभागात काम, त्या अधिकाऱ्यांशी खातरजमा करुनच सोडणार आत
कर्मचाऱयांना देखिल ओळख पत्राशिवाय परवानगी नाही
-
औरंगाबादेत नव्याने 388 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
औरंगाबादेत नव्याने 388 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 53,357 वर
आजपर्यंत एकूण 1296 जणांचा मृत्यू
3,052 रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 49,009 रुग्ण कोरोनामुक्त
-
अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग
कोल्हापूर :
अल्पवयीन मुलाकडून 7 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग
कोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे बुद्रुक पैकी वसुदेव धनगरवाड्यावरील घटना
14 वर्षीय मुलांकडून 7 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग
आईच्या फिर्यादीवरून 14 वर्षीय मुलाच्या विरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात
-
नागपूर जि.प.च्या 16 आणि पंचायत समीतीच्या 15 सदस्यांचं सदस्यत्त्व रद्द
नागपूर जि.प.च्या 16 आणि पंचायत समीतीच्या 15 सदस्यांचं सदस्यत्त्व रद्द, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाचे निर्देश जारी, 16 सदस्यांचं सदस्यत्त्व रद्द झाल्यानंतर नागपूर जि. प. 42 सदस्यसंख्या, 2020 साली ओबीसी प्रवर्गातून निवडूण आलेल्यांचं सदस्यत्त्व रद्द, रद्द जागांवर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता
-
कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या शहरातील लॅब पुणे पालिकेकडून सील
पुणे – कोरोनाची चाचणी करणाऱ्या नागरिकांची अपूर्ण माहिती देणाऱ्या शहरातील लॅब पालिकेकडून सील, लॅबच्या या चुकांमुळे जवळपास 30 टक्के रुग्णांचा शोध घेण्यात अडचणी येत असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोधच लागत नाही, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, त्यामुळे या तीनही लॅबची कोविड चाचणी यंत्रे सील करण्यात आलेत, पुणे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांची माहिती, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे
-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या घटल्या, रुग्ण वाढले
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या घटल्या, रुग्ण वाढले
– जिल्ह्यातील 24 तासांत अवघ्या 6614 कोरोना चाचण्या
– 24 तासांत 1272 नवे रुग्ण आणि 11 मृत्यूची नोंद
– नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता
– जिल्ह्यातील क्रियाशिल रुग्णांची संख्या 11076 वर पोहोचली
-
शिलेदार संस्थेच्या रणरागिणींनी केला रायगड किल्ल्यावरील हिरकणी कडा सर
रायगड – शिलेदार संस्थेच्या रणरागिणींनी केला रायगड किल्ल्यावरील हिरकणी कडा सर, जागतिक महिला दिनी अनोखा उपक्रम, हिरकणीच्या पराक्रमाची आठवण ताजी
-
वाघीणीशी झालेल्या झुंजीत अवनी वाघीणीची बछडी जखमी
नागपूर – वाघीणीशी झालेल्या झुंजीत अवनी वाघीणीची बछडी जखमी,
– अवनीच्या बछडीच्या पायाला आणि कवटीला मार
– चार दिवसातंच अवनीच्या बछडीला आणलं परत
– पेंचमध्ये उपचार सुरु, उपचारानंतर पुन्हा परत सोडणार
– आईपासून दुरावलेल्या बछडीला चार दिवसांपूर्वीच जंगलात सोडलं होतं
-
महिला दिनी नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्याचा प्रयत्न
महिला दिनी नागपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचं लग्न लावण्याचा प्रयत्न
– मुलगाही अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती
– कोंदामेंढी गावात अल्पवयीन मुलांचं लग्न लावण्याचा प्रयत्न
– बालसंरक्षण विभागाने थांबवला अल्पवयीन मुलांचा विवाह
– मुला- मुलीचा जन्माचा दाखला मागीतल्यावर प्रकार उघड
– गावाने ग्रामसभा घेऊन बालविवाह न करण्याचा केला ठराव
-
नागपूर मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा
नागपूर मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा
– नागपूर शहरात कोरोना प्रतिबंध लसीच्या तुटवड्याची शक्यता
– मनपा प्रशासनाने मागीतले अडीच लाख डोज
– मनपाकडे सध्या 18 ते 19 हजार लसीचे डोज
– नागपूर ग्रामीण भागात केवळ 5 हजार डोज शिल्लक
-
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आझ पाणीपुरवठा बंद राहणार
09 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील 100/22KV सब स्टेशनच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून त्यामुळे भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे, त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांत मंगळवार 09 मार्च रोजी पाणीपुरवठा संध्याकाळी होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील
-
शिरोळ तालुक्यातील महिलांकडून दोन दारु अड्डे उध्वस्त
इचलकरंजी : शिरोळ तालुक्यातील अब्दुल लाट येथील महिला दिनाच्या दिवशीच महिलांनी दोन दारु अड्डे उध्वस्त केले, गावठी दारूमुळे संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने रणरागिणी आक्रमक झाल्या, सोमवारी सायंकाळी महिला दिनाचा कार्यक्रम आटपून संतापलेल्या महिलांनी गावठी दारूचे अड्डे उध्वस्त केले, अब्दुललाटमधील माळभाग आणि झेंडा चौकातील तळ्याशेजारील दारू अड्डा उध्वस्त करून सर्व साहित्याची जाळपोळ केली
Published On - Mar 09,2021 10:21 PM