LIVE | अकोल्यात दिवसभरात कोरोनाचे 305 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
अकोल्यात दिवसभरात कोरोनाचे 305 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू
अकोला : आज दिवसभरात 305 रुग्ण पॉझिटिव्ह
1951 अहवालात पैकी 1646 जणांचे अहवालात निगेटिव्ह
ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 19891 वर पोहोचला आहे
आज दिवसभरात 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
कोरोनामुळे आतापर्यंत 391 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 321 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे
-
ठाणे जिल्ह्यात 15 इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग बंद, कोरोना प्रादुर्भावामुळे निर्णय
ठाणे : पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग 15 तारखेपासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील covid-19 च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने घेतला निर्णय
शाळे बरोबरच वसतिगृहे आणि आश्रमशाळादेखील बंद ठेवण्याचे आदेश
मात्र हे आदेश जिल्ह्यातील महानगरपालिका आणि अंबरनाथ बदलापूर नगरपरिषद त्यांच्या कार्यक्षेत्रात लागून राहणार नाहीत
उर्वरित भागात म्हणजेच ठाणे ग्रामीण भिवंडी ग्रामीण मुरबाड शहापूर इथे हे आदेश लागू राहतील
-
-
पोलीस निरीक्षकाकडून भाजप नेत्याचा अपमान, संतप्त नेत्यासह कार्यकर्त्यांचा ठाण्यासमोरच ठिय्या
बीड: पोलीस निरीक्षकाकडून भाजप नेत्याचा अपमान
संतप्त नेत्यासह कार्यकर्त्यांचा ठाण्यासमोरच ठिय्या
भाजप नेते नंदकिशोर मुंदडा यांचा ठिय्या
नंदकिशोर हे आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
अंबाजोगाईत तणाव वाढला
-
बुलडाण्यात आढळले 385 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंत 206 जणांचा मृत्यू
बुलडाणा : आज जिल्ह्यात आढळले 385 कोरोना रुग्ण आढळले. दिवसभरात 262 रुग्णांना मिळाली सुटी देण्यात आली. तर बुलडाण्यात आतापर्यंत 19430 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3149 रुग्णावर उपचार सुरु आहेे. जिल्ह्यात आतापर्यंत 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
उल्हासनगरात डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग, आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरु
उल्हासनगरात डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग
उल्हासनगर कॅम्प 5 मधील डम्पिंगला लागली आग
अग्निशमन दल आणि खासगी टँकर्सकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
अनधिकृत डम्पिंगला वारंवार आगी लागण्याच्या घटना
-
-
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 40 नवे कोरोना रुग्ण, 1763 जणांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 40 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1763 जणांचा मृत्यू
सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 298 वर
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 46738 जण बरे
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48799 वर
-
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्णांमध्ये मोठी वाढ, आणखी कडक निर्बंध लागू
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी लादले र्निबध
दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु राहणार, दुकानं शनिवार, रविवारी पी-1 पी-2 नुसार उघडे राहतील
खाद्य व शीतपेयाच्या गाडय़ा रात्री 9 वाजेर्पयत सुरु राहतील
भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील
लग्न आणि हळदी सभारंभ सकाळी 7 ते सायंकाळी 9 वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसार करण्याचे आदेश
नियम मोडल्यास वधू-वर आणि हॉल मालकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार
बार रात्री 9 वाजेर्पयत सुरु राहणार
-
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार, निर्बंध आणखी कडक
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यु असणार,
वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार
सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे दर रविवारी बंद राहणार
धार्मिक विधीसाठी फक्त 5 जणांना परवानगी असेल,
जीम क्रीडांगणे व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश, तसेच वेगवेगळ्या स्पर्धांवरही बंदी घालण्यात आली आहे.
सभा, उपोषण, आंदोलन यावर बंदी घालण्यात आलीये.
सर्व मंगल कार्यालये फंक्शन हॉल, लॉन्स बंद
जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु असेल
-
माजी नगरसेवक आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांना अटक
पुणे : पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानीला अटक करण्यात आलीये. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची जवळीक आहे. मूलचंदानीवर तब्बल 238 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. संबंधित बँकेत 24 कोटींची अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेली आहे. मात्र आत्तापर्यंत दाखल 238 कोटींची चौकशी आता होणार आहे. याआधी बँकेच्या दोघांना अटक करण्यात आलेली होती. तर मूलचंदानीना गेल्या आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र तब्येत बरी नसल्याचं कारण देत रुग्णालयात दाखल होते. तब्येत बरी होताच पोलिसांनी अटक केलेली आहे.
-
नवी मुंबईत घरगुती सिलिंडरमधील गॅस, रिकाम्या सिलिंडरमध्ये भरुन गॅसची चोरी, तिघे जेरबंद
नवी मुंबईत पोलिसांनी केली अनोखी चोरी उघड
घरगुती सिलिंडरमधील गॅस, रिकाम्या सिलिंडरमध्ये भरुन गॅसची चोरी
चोरी करणारे त्रिकुट जेरबंद, 25 सिलिंडर आणि टेम्पो जप्त
-
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज विरोधीपक्षाच्या खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत एक निवेदन दिले. सुप्रिया सुळे यांनी या निवेदनात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि तेवढीच धक्कादायकही आहे. सातवेळा खासदारकी भूषवणारे मोहन डेलकर इतके निराश झाले होते, वैफल्यग्रस्त झाले होते की त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. आपण आपल्या सहकाऱ्याला गमावलं आहे. तुम्ही लोकसभेचे प्रमुख आहात. त्या नात्याने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जावी, अशी मागणी केली.
-
अकोल्यात कोरोनाचे 235 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 389 वर
अकोल्यात कोरोनाचे 235 नवे रुग्ण आढळले आहेत.
एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 19821 वर पोहोचला आहे
येथे कोरोनामुळे आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू झालाय.
तर आतापर्यंत 14342 जणांनी कोरोनावर मात केली आहे
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5090 आहे
-
एसटीच्या विकासासाठी मोठी तरतूद- अजित पवार
एसटी महामंडळ कोरोनामुळे चांगलेच संकटात आले.
मात्र, एसटीच्या विकासासाठी आम्ही या वर्षी मोठी तरतूद केली आहे.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तीस हजार कोटींचा भार उचलला आहे.
आम्ही शेतकऱ्यांना वीजबिलात 66 टक्के सूट दिली आहे.
सर्व योजनांना आवश्यक तो निधी दिला जाईल. कोणत्याही खात्याला निधी कमी पडणार नाही, याची मी खात्री देतो.
आमच्या सर्व योजना गोरगरीबांसाठी आहेत.
एक एप्रिलपासून महिलांच्या नावावऱ घर घेतलं तर त्यांना मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाईल.
-
सर्व विभागांना मागील वर्षाच्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त तरतूद केली- अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार विधानपरिषदेतून बोलत आहेत.
ते चालू आर्थिक वर्षात राज्याच्या विकासासाठी कोणत्यी तरतुदी केल्या आहेत याची ते माहिती देत आहेत.
रस्ते विकासासाठी 10 हजारवरुन 12 हजार कोटींची तरतूद केली आहे.
-
राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून काढणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली, विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती योजनेत 50 टक्क्यांची कपात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती योजनेत 50 टक्क्यांची कपात
– राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत केली 50 टक्क्यांची कपात,
– विद्यापीठानं शिष्यवृत्ती योजनेत आणि विद्यार्थ्यांंमध्येही केली कपात,
– पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळायची 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती,तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 18 हजार ,
– शिष्यवृत्तीत कपात करत आणली 6 हजार रुपयांवर,
– मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना,
– कपात केल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्णय मागे घ्या अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा.
-
औरंगाबादेत माथेफेरुचा चौघांवर चाकू हल्ला, मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
औरंगाबाद :
औरंगाबादेत माथेफेरुचा चौघांवर चाकू हल्ला
चाकू हल्ल्यात एकाच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
औरंगाबादच्या अंगुरीबाग परिसरात घडली घटना
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली धक्कादायक घटना
दानिश सय्यद असे मृत तरुणाचे नाव
तर शेख सलीम, शेख बाबा, शेख जब्बार असे तिघे गंभीर जखमी
पोलिसांनी हल्लेखोर नितीन उर्फ गब्या खंडागळेला केली अटक
क्रांतिचौक पोलिस ठाण्यात गुन्ह दाखल
-
नागपूर जिल्ह्यात उद्याच्या महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी
नागपूर जिल्ह्यात उद्याच्या महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी
– महाशिवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात होणारी गर्दी टाळा
– वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जिल्हा प्रशासनाचं आवाहन
– उत्सव घरीच साजरा करण्याचं आवाहन
– मंदिरात गर्दी होणार नाही, याकडे प्रशासनाचं लक्ष
– मंदिरातील गर्दीमुळे कोरोना संक्रमणाची भिती
-
बीडमध्ये वाहनाच्या धडकेत गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
बीड-
वाहनाच्या धडकेत गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
गेवराईच्या गढीजवळील घटना
विवेक कांबळे असं मयत कर्मचाऱ्याचे नाव
अपघातानंतर अज्ञात वाहनाचे पलायन
घात की अपघात याचा तपास सुरू
-
पुण्यात पुन्हा लॉकडाऊनच्या केवळ अफवा, जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
पुणे –
– पुण्यात पुन्हा लोकडाऊनच्या केवळ अफवा,
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे स्पष्टीकरण,
– पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी तो नियंत्रणात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती,
– त्यामुळे सध्या तरी पुणे शहरात लॉकडाऊन केले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांची माहिती,
– मात्र पुणेकरांनी मास्क वापरणे, एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर राखणे, नियमित हात धुणे आदी उपायांनी काळजी घ्यावी आणि याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये,
– जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन,
– येत्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन
-
त्रंबकेश्वर महाशिवरात्रीच्या उत्सवाला यंदा भाविकांना परवानगी नाही
नाशिक –
त्रंबकेश्वर महाशिवरात्रीच्या उत्सवाला यंदा भाविकांना परवानगी नाही
यंदा त्रंबकेश्वर महादेव मंदिरातील महाशिवरात्री उत्सव भाविकांविना
कोरोना च्या पार्शवभूमीवर महाशिवरात्रीचा उत्सव मंदिरात साधेपणाने होणार
मोजकेच पुजारी करणार महाअभिषेक आणि महापूजा
महाशिवरात्री निमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्रंबकेश्वर देवस्थानचा महत्वपूर्ण निर्णय
-
नाशकात वादग्रस्त शहर बस सेवेला पुन्हा ब्रेक
नाशिक –
वादग्रस्त शहर बस सेवेला पुन्हा ब्रेक
स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली बस सेवा आणखी लांबणीवर
जून पर्यंत बस सेवा सुरू न करण्याचे आयुक्त कैलास जाधव यांचे आदेश
शहर बस सेवेला कोरोना मूळे पुन्हा एकदा लागला ब्रेक
-
नागपुरात भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाची चिंता वाढणार?
नागपूर –
नागपुरात भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात पक्षाची चिंता वाढणार?
भाजपचे २५ ते ३० टक्के नगरसेवक काठावर पास झाल्याची माहीत
सर्वेक्षणाचा आधार घेऊन निवडणूकीत तिकीटवाटप होण्याची शक्यता
‘सर्वेक्षणात निराशाजनक कामगीरी असलेल्यांची कामगीरी सुधारणार’
महानगरपालिकेचे सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे यांनी केलं स्पष्ट
किती नगरसेवकांची कामगीरी निराशाजनक? भाजपकडून संख्या सांगण्यास नकार
-
पुण्यात 24 तासात 1 हजार 86 नव्या कोरोनाबाधितांची वाढ
पुणे –
– कोरोना संसर्गाचा प्रभाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय,
– मंगळवारी दिवसभरात १ हजार ८६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ,
– एप्रिल, २०२० मध्ये दिवसाकाठी वाढणारी कोरोनाबाधितांच्या संख्येची पुनरावृत्ती शहरात पुन्हा सुरू,
– काल दिवसभरात शहरात ६ हजार ९० संशयितांनी कोरोनाची तपासणी,
– पॉझिव्हिट रुग्णांची टक्केवारी १७. ८३ टक्के इतकी आहे,
– गेल्या काही महिन्यातील हा सर्वाधिक पॉझिव्हिटी रेट,
– शहरात कोरोनाचे ७ हजार २० रूग्ण उपचार घेत आहेत.
-
नाशकातील गंगापूर परिसरात हॉटेल गंम्मत जमातला भीषण आग
नाशिक –
गंगापूर परिसरात हॉटेल गंम्मत जमातला भीषण आग
रात्रीच्या सुमारास लागली आग
शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज.
आगीत जिवीत हानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणात हॉटेलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश
-
नागपूर शहरात आता 60 केंद्रांवर लसीकरणाची सोय
नागपूर –
नागपूर शहरात आता 60 केंद्रांवर लसीकरणाची सोय
एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला
सरकारी आणि खाजगी मिळून 60 केंद्रांवर होत आहे लसीकरण
सरकारी रुग्णालयात निशुल्क तर खाजगी मध्ये 250 रुपये भरून लसीकरण
दोन शिफ्ट मध्ये होत आहे लसीकरण
सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत सुरू आहे लसीकरण
-
नागपूर महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाईची मोहिम
नागपूर
– महानगरपालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाईची मोहिम
– मंगळवारी एका दिवसांत ३०८ अतिक्रमणाचा सफाया
– अतिक्रमण विरोधी कारवाईत मनपाकडून चार ट्रक साहित्य जप्त
– मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्या आदेशानं सुरु आहे कारवाई
– अतिक्रमण हटवण्याचा काही भागात होतोय विरोध
-
रस्ता भटकून आलेला वाघिणीचा बछडा नऊ तासांनी पुन्हा जंगलात
वर्धा
– रस्ता भटकून आलेला वाघिणीचा बछडा नऊ तासांनी पुन्हा जंगलात
– मंगळवारी सकाळी हेटीकुंडी परिसरातील शेतात आला होता बछडा
– शेतकरी शेतात गेल्यावर दिसला होता वावरत
– वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नऊ तासात बछड्याला लावले पुन्हा जंगलात हुकावून
– पाण्याच्या शोधात वाघिणीपासून भटकला होता बछडा
– परिसरात नागरिकांमध्ये खळबळ
-
आज बार्शी शहर बंद राहणार
सोलापुर-
आज बार्शी शहर बंद राहणार
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बार्शी बंदचे आयोजन
व्यापारी संघटनांनी पुकारला आहे बंद
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण केले तर जीवे मारण्याची पनवेल येथील पाटील नामक तरुणाने दिली आहे धमकी
-
नागपुरात 9 प्रतिष्ठानांवर कारवाई, महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई
नागपूर –
काल नागपुरात 9 प्रतिष्ठानांवर कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई
दुकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रुपये 50 हजारांचा दंड वसूल केला
पथकांनी 97 प्रतिष्ठाने आणि मंगल कार्यालयांची तपासणी केली
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक करत आहे कारवाई
-
जीएसटी नागपूर विभागाने बनावट बिलांचे रॅकेट पकडले
नागपूर
– जीएसटी नागपूर विभागाने पकडले बनावट बिलांचे रॅकेट
– अस्तित्त्वात नसलेल्या १८ कंपन्यांचे ५०० कोटींचे व्यवहार
– महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापा टाकून कारवाई
– बनावट बिलांचे रॅकेट मधील आरोपी गजाआड
– लबाडीने ४० कोटींपेक्षा जास्त टॅक्स क्रेडिटचा लाभ
– टोळीचा मुख्य सुत्रधार जळगाव परिसरातील असल्याची माहिती
-
निम्न वर्धा प्रकल्पाचा लघु कालवा फुटल्याने शेती जलमय
वर्धा –
– निम्न वर्धा प्रकल्पाचा लघु कालवा फुटल्याने शेती जलमय
– देवळी तालुक्यातील तांभा ते हिवरा शिवारातील घटना
– तीन ते चार शेतकऱ्यांचे नुकसान
– नुकसान भरपाईची मागणी
– कालव्याची देखरेख न झाल्याने मागील अनेक दिवसांपासून होती पाण्याची पाझर
– जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
-
सोलापुरातील मोहोळ पोलीस स्टेशन तुरुंगातील 13 आरोपी कोरोना पॉझिटीव्ह
सोलापूर –
मोहोळ पोलीस स्टेशन तुरुंगातील 13 आरोपी कोरोना पॉझिटीव्ह
तीन आरोपींची कोरोना चाचणी सोमवारी पॉझिटीव्ह आल्याने उर्वरित जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती
मोहोळ पोलीस ठाण्यात अठरा आरोपींपैकी एकूण 13 आरोपी कोरोना पॉझिटीव्ह
13 आरोपीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू
-
नाशकात जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना बाबतचे निर्बंध आणखी कठोर
नाशिक – जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना बाबतचे निर्बंध आणखी कठोर
शनिवार रविवार शहरातील सर्व दुकान, धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचा निर्णय
सोमवार ते शुक्रवार सगळ्या आस्थापना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत राहणार सुरू
अंत्यविधी साठी आता फक्त 20 जणांनाच परवानगी
वेळ पडल्यास निर्बंध आणखी कठोर करण्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे संकेत
-
अकोल्यात 24 तासात 173 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह
अकोला कोरोना अपडेट
24 तासात 173 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत
2151 अहवालात पैकी 1978 जणांचे अहवालात निगेटीव्ह आले आहेत
एकूण कोरोना बाधितांचा आकडा 19500 झाला आहे
दिवसभरात 3 जणाचा मृत्यू झाला आहे
कोरोनामुळे आतापर्यंत 389 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 233 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे
तर 14342 जणांनी कोरोनावर मात केली आहे
उपचार घेत असलेले रुग्ण 4769 आहेत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची माहिती
-
मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
रायगड –
मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलर आणि ट्रकचा जोरदार अपघातात, दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी
केमीकल ड्रम भरलेल्या ट्रकमुळे दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी
पुण्याकडे जाताना बोरघाटाच्या सुरुवतीला झाला अपघात
पुण्याकडे जाणारी वाहतुक थाबंवली आहे
ट्रकमधले ड्रम गरम होऊन ब्लास्ट होत असल्याने फायर ब्रिगेड टिमला अडचणी.
बोरघाट वाहतुक पोलीस, महामार्ग पोलीस, आय आर बी यत्रंणा, पेट्रोलीगं टिम, खोपोली नपा फायर ब्रिगेड, उत्तम स्टील फायर ब्रिगेड टिम, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टिम, आगीवर नियत्रणांच्या प्रयत्नात.
एक्सप्रेस वे-वर रात्री आगीच्या ज्वाळा, धुरांचे लोट
Published On - Mar 10,2021 10:48 PM