LIVE | मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर बैठकींचं सत्र, अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठकींचं सत्र, गेल्या दीड तासांपासून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यात बैठक सुरु, त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल, परमबीर सिंह यांची बदली होण्याची शक्यता
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
सह्याद्री अतिथीगृहावर उद्या महाविकास आघाडीची बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर उद्या सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात बैठक सुरु आहे, त्यानंतर उद्या सह्याद्रीवर बैठक होणार असल्याची माहिती समोर आलीय, या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
-
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर बैठकींचं सत्र, अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल, दीड तासांपासून डीजी आणि सीपीसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठकींचं सत्र, गेल्या दीड तासांपासून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्यात बैठक सुरु, त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वर्षा बंगल्यावर दाखल, परमबीर सिंह यांची बदली होण्याची शक्यता
-
-
महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद नाहीत : शरद पवार
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचं असेल तिथं आम्ही काँग्रेससोबत आहोत. आमचा इतर राजकीय पक्षांशी संपर्क सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्राची दडपशाही सुरु असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
प्रादेशिक पक्षांसाठी चांगला मंच तयार करण्याचा प्रस्ताव असल्यास त्यावर विचार करु, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे.
राष्ट्रीय तपास संस्था त्या प्रकरणात चौकशी करत आहे. तपासामध्ये अडचण येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यावर बोलण्याची गरज नाही.
महाराष्ट्र सरकारच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
विकासाच्या धोरणावर आमची चर्चा होते. कुणाची बदली करायची यावर चर्चा करत नाही. वाझे प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.
पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आसाममध्ये भाजप विजयी होईलं असं निरीक्षणावरुन वाटलं.
-
शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास मिळतंय याचा आनंद: पी.सी.चाको
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन आनंद होत आहे. शरद पवार देशातील मोठे राजकीय नेते आहेत. काँग्रेसमध्ये अनेक अडचणी आल्यानं राजीनामा दिला. विरोधी पक्षांनी एकत्र येणं गरजेचे आहे. शरद पवार यांचा अनुभव, त्यांचा संपर्क देशातील विरोधी पक्षाला एकत्र करण्यास उपयोगी ठरेल. त्यांच्या नेतृत्त्वात काम करण्यास मिळतंय याचा आनंद आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी काही वर्षांपासून एलडीएफला पाठिंबा देत आहे. डाव्या आणि लोकशाहीवादी पक्षांची युती होत आहे.
-
पीसी चाकोंच्या प्रवेशानं राष्ट्रवादीला केरळमध्ये बळ मिळेल : प्रफुल्ल पटेल
केरळमधील काँग्रेसचे माजी खासदार पीसी चाको याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
काँग्रेसमधून सातवेळा केरळात खासदार होते
चाको यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशामुळे केरळाच्या विधानसभा निवडणुकीत NCP ला राजकीय ताकद मिळणार आहे
-
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.चाको यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.महाराष्ट्रातील घडामोडींवर शरद पवार काय बोलतात याकडे लक्ष लागलं आहे. पी.सी.चाको यांचं स्वागत करतो, असं शरद पवार म्हणाले.
-
सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका, अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य
सचिन वाझेंना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका. वाझे यांचे तीन अर्ज #NIA कोर्टानं फेटाळले. एनआयए कार्यालयात सीसीटिव्ही कॅमेरे नाहीत आणि अटक बेकायदेशीर असल्याचा दावा अमान्य. केवळ वकिलांना भेटू देण्याची मागणी कोर्टानं अशत: मान्य केली. चौकशीच्यावेळी वकिलांनासोबत राहण्याची मुभा
-
घरगुती थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण..
नाशिक: घरगुती थकीत वीज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण..
देवळा तालुक्यातील येथील घटना
मारहाण करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल
वीज बिल वसुलीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून शिवीगाळ केल्याचा आरोप
मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल
-
वसई विरार महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
वसई विरार महापालिकेचा कनिष्ठ अभियंता 30 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
अनाधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याकरिता 30 हजाराची लाच घेतल्याप्रकारांनी कनिष्ठ अभियंता याला रंगेहात अटक करण्यात आले आहे.
वसई विरार महापालिकेच्या एफ प्रभाग समिती मध्ये कनिष्ठ अभियंता होता कार्यरत.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवार ता 16 रोजी ही कारवाही केली आहे.
निलेश राजेंद्र कोरे असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता याचे नाव असून वसई विरार महापालिकेच्या एफ प्रभागात तो कार्यरत होता
-
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 17 एप्रिल मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे.
-
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटिव्ह
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटिव्ह
शुक्रवारी विधान भवनात अजित पवारांच्या बैठकीत होते उपस्थित…
आज दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अनेक अधिकारी विलगिकरणात…
सौरभ राव यांनी वर्षभर कोरोनाशी लढण्यासाठी आखल्या रणनिती…
-
शरद पवार नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परीषद घेणार आहेत. राज्यातील बड्या नेत्यांनी दिल्लीमध्ये पवार यांची भेट घेतली होती. राज्यातील राजकीय घडामोडींवर शरद पवार काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
-
राज्यपालांचा अवमान करणाऱ्या घटना इतिहास पहिल्यांदाच घडताहेत : चंद्रकांत पाटील
राज्यपालांचा अवमान करणाऱ्या घटना इतिहास पहिल्यांदाच घडताहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.
-
बेळगावसह मराठी भाषिक राहतात तो भाग केंद्रशासित करा, शिवसेनेची भूमिका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग यामध्ये मराठी भाषिक राहतात तो भाग केंद्र केंद्रशासित करावा, ही शिवसेनेचे भूमिका आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासाठी पत्र देखील लिहलेले आहे. लोकसभेत बोलू न देणे हे योग्य नाही. बेळगाव प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे त्याचा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बेळगाव मध्ये जी मारहाण झाली हा पुरावा सुप्रीम कोर्टात सादर करणार आहे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
विरोधकांनी विरोधक म्हणून काम करावं – जयंत पाटील
विरोधकांनी विरोधक म्हणून काम करावं, राष्ट्रपती राजवट लावणे काही सोपं नाही, विरोधकांना आता सत्ता हवी आहे,
-
वाझे प्रकरणी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत – जयंत पाटील
सचिन वाझे प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ द्या, चौकशीअंती योग्य कारवाई करु, दोषींवर कारवाई होईल, वाझे प्रकरणी महाविकास आघाडीत काहीही मतभेद नाहीत – जयंत पाटील
-
रजनीश शेठ हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार
मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्याची शक्यता आहे, रजनीश शेठ हे मुंबई पोलीस आयुक्तपदाचे प्रबळ दावेदार, रजनीश शेठ हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत, आज त्यांच्यात आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात तब्बल तासभर चर्चा
-
सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, चौकशीनंतर योग्य कारवाई केली जाईल : अजित पवार
सचिन वाझे प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, चौकशीनंतर योग्य कारवाई केली जाईल, सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही, दोषींवर कारवाई केली जाईल, सचिन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील, महाविकासआघडीच्या पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाही : अजित पवार
-
कोरोनाचे सर्व नियम लागू आहे : अजित पवार
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करु नका. कोरोनात माझा नंबर लागून गेला आहे. कोरोनाचे सर्व नियम लागू आहे : अजित पवार
-
अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सीताराम गायकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, गायकर हे मधुकर गायकवाड यांचे जुने सहकारी
-
मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत वर्षा बंगल्यावर
मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे वर्षा येथे आले आहेत
थोड्या वेळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कृषी मंत्री दादा भुसे येणार आहेत
वाढीव वीज देयके आणि कृषी विभागाशी संबधित विषयांवर बैठक आहे
-
बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर काहीही चर्चा झाली नाही : जयंत पाटील
वर्षावरील बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी चर्चा केली, या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर काहीही चर्चा झाली नाही, असं त्यांनी सांगितलं, ते गृहखात्याचं काम आहे, त्याबाबत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर निर्णय घेतील
-
अनिल परब यांनी स्पष्टीकरण द्यावं : नितेश राणे
वरुण सरदेसाईंना सरंक्षण कशासाठी दिलं. रमेश मोरे प्रकरणही बाहेर काढ, तोंड उघडायला लावालं, तर अनेक प्रकरण बाहेर काढू, अनिल परब यांनी स्पष्टीकरण द्याव : नितेश राणे
-
खरी माहिती बाहेर येऊ नये म्हणून धमक्या : नितेश राणे
मी माझ्याकडील माहिती NIA ला दिली. माहिती खरी की खोटी हे त्यांनी ठरवावं. वरुण सरदेसाईंचं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, खरी माहिती बाहेर येऊ नये म्हणून धमक्या : नितेश राणे
-
शालेय पोषण आहार विकणारी टोळीचा पर्दाफाश, सांगली जिल्हा परिषद पथकाची कारवाई
सांगली –
शालेय पोषण आहार विकणारी टोळीचा पर्दाफाश
सांगली जिल्हा परिषद पथकाची कारवाई
विक्रीस आणलेला तांदूळ हरभरा मसूर मूग घेऊन जाणार टेम्पो पकडला
रविवार सुट्टीचा गैरफायदा घेऊन तासगाव शहरात शालेय पोषण आहार विक्रीस आणलेला हरभरा 175 किलो तांदूळ 20
पोती मसूर डाळ 40 किलो मूग डाळ 150 किलो असा माल वाहतूक करणारा टेम्पो पथकाने पकडला
बालकाच्या शालेय पोषण आहार वर डल्ला मारून तोंडचा घास पळणारी टोळी पकडले ने शहरात खळबळ
-
इचलकरंजीत गांजा पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड
इचलकरंजी –
शहरामध्ये गांजा पुरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड
पोलिसांनी पार्वती इंडस्ट्रीज मध्ये गांजा पुरवणाऱ्या चौघांना घेतले ताब्यात
पार्वती इंडस्ट्रीज मध्ये गांजा घेऊन येणाऱ्या चार आरोपींकडून पाच किलो गांजा व चार आरोपींना घेतले फोर व्हीलर केली जप्त
हातकणंगले व शिरोळ तालुक्यामध्ये हे आरोपी पुरवत होते गांजा
शहराचे डीवायएसपी बीबी महामुनी यांच्यासह पथकातील सुनील पाटील मोसिन पठाण जावेद आंबेकरी सागर हारगुले या सर्वांनी मारला छापा
-
‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक, महत्त्वाचे नेते उपस्थित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थान वर्षावर बैठक, अजित पवार, बाळसाहेब थोरात, जयंत पाटील, अनिल परब उपस्थित, 9 वाजता बैठक सुरु
-
सातारा जिल्हयातील 712 बसेसचे लोकेशन होणार ट्रॅक
सातारा जिल्हयातील 712 बसेसचे लोकेशन होणार ट्रॅक
एसटी महामंडळाने बनवली व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम
प्रवाशांना मिळणार एसटीची अचुक माहिती
जिल्हयातील 11 आगारामध्ये उपक्रम
-
सोलापूर भाजप नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द
सोलापूर –
भाजप नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द
उच्च न्यायालयाने केले सदस्यत्व रद्द
तीन अपत्य असल्याच्या कारणावरून सदस्यत्व रद्द
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राजश्री चव्हाण भाग 26 मधून आल्या होत्या निवडून
उमा पारसेकर यांनी चव्हाण यांना तीन अपत्य असल्याची केली होती तक्रार
आधी जिल्हा न्यायालयाने,त्यानंतर उच्च न्यायालयाने सदस्यत्व ठरवले रद्द
पारसेकर यांच्या कडून राजश्री चव्हाण यांच्या तीन अपत्य बाबत दिलेले पुरावे न्यायालयाने धरले ग्राह्य
-
पुणे कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये आग, 25 दुकाने पूर्णपणे जळून खाक
पुणे
कॅम्प परिसरातील शिवाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास आग
आगीत 25 दुकाने पूर्णतः जळाली
आगीचे नेमकं कारण समजु शकले नाही,
अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ गाड्यांच्या साहाय्याने काही तासात ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली
-
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान बंदोबस्ताला असलेले विशेष शाखेतील पाच कर्मचारी करोनाबाधित
पुणे –
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान बंदोबस्ताला असलेले विशेष शाखेतील दोन पोलीस अधिकारी तसेच तीन कर्मचारी करोनाबाधित
त्यांच्या संपर्कातील पोलीस कर्मचाऱ्यांचे करण्यात आलं विलगीकरण
गुरुवारी 11 तारखेला शास्त्री रस्त्यावर केलं होतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन
जवळपास दोन हजाराहून अधिक विद्यार्थी या आंदोलनात झाले होते सहभागी
-
भूजल पातळी खालावल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट
नंदुरबार –
भूजल पातळी खालावल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाईचे संकट
प्रशासनाच्या नियोजनाअभवी नागरिकांची भटकंती
उपाय योजना करण्याची मागणी
-
सोलापुरात कोरोनाचे 164 नवे रुग्ण
सोलापुर –
शहर, जिल्ह्यात कोरोनाचे 164 रुग्ण
शहरात कोरोनाचे 76 रुग्ण तर ग्रामीण भागात 88 रुग्ण
तर अज्ञात व्यक्तीसह तीन जणांचा कोरोनाने मृत्यू
-
सोलापुरातील जिल्हा परिषदेतील हॉटेलचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह
सोलापूर–
जिल्हा परिषदेतील हॉटेलचालकाचा अहवाल पॉझिटिव्ह
पुढील दहा दिवस जिल्हा परिषदेच्या आवारात अनाहुत पाहुण्यांना प्रवेश बंद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढले आदेश
-
नागपुरात लॅाकडाऊनमुळे लोक बाहेर न पडल्याने भाजी विक्री मंदावली
नागपूर –
लॅाकडाऊनमुळे लोक बाहेर न पडल्याने भाजी विक्री मंदावली
– भाजीपाल्याची विक्री मंदावल्याने भाज्यांच्या दरात मोठी घसरण
– नागपूरच्या ठोक बाजारात भाज्या दोन रुपये किलोंपासून सुरुवात
– पालक २ रु. मेथी ५ रु. टोमॅटो ५ रु. वांगी ५ रुपये किलो
– भाज्यांचे दर पडल्याने शेतकरी हवालदील
-
कोरोना रुग्ण संख्येत अहमदनगरात विक्रमी वाढ, 24 तासांत 559 नवे रुग्ण
अहमदनगर
कोरोना रुग्ण संख्येत जिल्ह्यात विक्रमी वाढ गेल्या २४ तासांत ५५९ नवे रुग्ण
जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी क्षमतेच्या ५० टक्के ग्राहक संख्येचे काटेकोरपणे पालन करावे,
अन्यथा गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारची हॉटेल बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा इशारा
हॉटेल, रेस्टॉरंट्स, सिंगल स्क्रीन थीएटर्स ५० टक्के क्षमतेने चालणार.
राजकीय, सामाजिक धार्मिक कार्यक्रमांना मनाई.
लग्नात ५० तर अंत्यविधीला २० जणच उपस्थित राहू शकतात
-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद प्रशासन अॅक्शन मोडवर
औरंगाबाद :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासन अॅक्शन मोडवर
खाजगी रुग्णालयांनी बेड ची संख्या वाढवावी,अन्यथा कारवाई चा इशारा
शहरातील नामांकित रुग्णालयाना बजावल्या नोटीसा
-
कोरोना काळात शाळा बंद, नागपुरात नृत्य शिक्षकांकडून गांजाची तस्करी
नागपूर –
कोरोना काळात शाळा बंद पडल्यामुळे तेलंगणा राज्याच्या वारांगना मधील एका शाळेतील नृत्य शिक्षकांने चक्क सुरु केली चक्क गांजाची तस्करी, नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी या शिक्षकाला गांजा तस्करी करत असताना नागपुरात केली अटक, 13 लाख किमतीचा 91 किलो गांजा आणि पाच लाख रुपये किंमतीची गाडी केली जप्त
-
नाशिक जिल्हा परिषदेच्या 40 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
नाशिक –
जिल्हा परिषदेच्या 40 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
4 दिवसात 40 हुन अधिक जणांना लागण
विना कारण येणाऱ्या नागरिकांना जिप मध्ये ‘नो एन्ट्री’
मास्क न वापरणार्यांना जागेवरच दंड
लसीकरण केंद्र वाढवा – जिल्हा परिषद अध्यक्षांचे सीईओ ना पत्र
-
नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा 2 हजारच्यावर आकडा
नागपूर –
नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा 2 हजारच्यावर आकडा
गेल्या 24 तासात 2297 रुग्णांची नोंद
तर 12 जणांचा कोरोना मुळे मृत्यू
नागपूर जिल्ह्यात सलग तीन दिवसा पासून रुग्ण संख्या 2 हजार च्या वर असल्याने
प्रशासनाची वाढली चिंता
शहरातील कोरोना ची स्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याची शक्यता
-
कोरोना हॉटस्पॉटमध्ये नाशिक राज्यात नंबर 1, अवघ्या 11 दिवसात आढळले 4500 रुग्ण
नाशिक –
कोरोना हॉटस्पॉटमध्ये नाशिक राज्यात नंबर 1
अवघ्या 11 दिवसात आढळले 4500 रुग्ण
नाशिकमध्ये कोरोना चा प्रसार 80 टक्क्याने होत असल्याचं स्पष्ट
नाशिकमध्ये लॉक डाऊन अटळ ?
महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू
रुग्ण ट्रेसिंग पासून गर्दी नियंत्रणापर्यंत मनपाचे पथकं तैनात
-
कोरोना प्रतिबंध नियम न पाळणाऱ्या पुण्यातील 4 हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
पुणे
कोरोना प्रतिबंध नियम न पाळणाऱ्या पुण्यातील 4 हॉटेल्सवर पुणे पोलिसांची कारवाई
क्षमते पेक्षा जास्त लोकांना हॉटेल मध्ये प्रवेश देणे ,डिस्टसींग चे नियम न पाळणे यासाठी केली ही कारवाई
हॉटेल मर्फीज, हॉटेल टल्ली, हॉटेल द डेली, हॉटेल पब्लिक अशी या चार हॉटेल्स ची नाव
हॉटेल व्यवस्थापक व मालकांवर गुन्हे दाखल
चारही हॉटेल कोरेगाव पार्क परिसरातील
-
पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचे 1 लाख डोस उपलब्ध
पुणे
पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचे 1 लाख डोस उपलब्ध
यामध्ये कोव्हॅक्सीनच्या 50 हजार तर कोव्हिशील्ड लसीच्या 50 हजार डोसचा समावेश
कोव्हिशिल्डच्या 50 हजार डोस पैकी पुणे महापालिकेला 20 हजार, पिंपरी-चिंचवडला 10 हजार तर ग्रामीण भागासाठी 20 हजार डोस वितरीत केले जाणार
तर कोव्हॅक्सिनच्या 50 हजार डोस पैकी पुणे महापालिकेला 25 हजार, पिंपरी-चिंचवड महापालिकेला 10 हजार आणि तर ग्रामीण भागाला 15 हजार लसींचे डोस वितरित केले जाणार
जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती
-
परभणी जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक, पुणे, मुंबईकडे जाणारी आणि येणारी प्रवासी वाहतूक राहणार बंद
परभणी –
जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक, पुणे, मुंबईकडे जाणारी आणि येणारी प्रवासी वाहतूक राहणार बंद, एसटीची नांदेड, औरंगाबादला जाणारी आणि येणारी वाहतूकही बंद, 16 ते 23 मार्च दरम्यान वाहतूक बंद, जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले बंदचे आदेश, कोरोनामुळे वाहतूक बंदीचा निर्णय
-
कोरोनाचा कहर वाढला, आज तब्बल 515 कोरोनाबाधित
कोरोनाचा कहर वाढला, आज तब्बल 515 कोरोनाबाधित, प्रशासनची चिंता वाढली, सोशल डिस्टन्सिंग आणि नियम पाळण्याचा प्रशासनाचं आवाहन
-
पुणे शहर पोलीस दलातील साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस
पुणे
शहर पोलीस दलातील साडेसहा हजार पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस
वर्षभरात शहर पोलीस दलातील 1 हजार 530 पोलीस कोरोना बाधित
शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्यावर पोलीस दलातील 42 पोलीस कोरोना बाधित
त्यापैकी 16 पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत
उर्वरित 26 पोलीस कर्मचारी वैदयकीय तज्ञांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात
84 पोलिसांनी लसीचे दोन्ही डोस घेतले
काही पोलिसांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ते कोरोना बाधित
याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे मत विचारात घेतले जाणार असल्याची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती
Published On - Mar 16,2021 11:19 PM