Parambir Singh Letter Live Updates : अनिल देशमुखांच्या बंगल्याबाहेरचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हटवला
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
अनिल देशमुखांच्या बंगल्याबाहेरचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हटवला
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. सध्या मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांच्या सरकारी बंगल्यासमोरचा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला आहे. देशमुख यांच्या बंगल्यातून दोन गाड्या बाहेर पडल्या आहेत.
-
“मला अजून काहीच माहिती नाही, यावर सरकारचे लोक बोलतील”, अनिल देशमुखांच्या 100 कोटी वसुली प्रकरणावर संजय राऊत यांची सावध प्रतिक्रिया
हा सरकारचा विषय आहे. याबाबतीत सरकारचे लोक बोलतील. मी अजून काहीही पाहिलेलं नाही. मी पक्षाच्या बैठकीत आहे. मी या प्रकरणावर काहीही बोलणार नाही, असे उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
-
-
डेलकर प्रकरणात दाबण्यासाठी कुभांड रचलं, 100 कोटी वसुली प्रकरणात काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन डेलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वबचावाकरिता दिसत आहेत. अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपाने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजपा नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होते. जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती डेलकर प्रकरणात का नाही? डेलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? डेलकर प्रकरणात भाजपाचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले, आहे हे पत्रातून स्पष्ट होत आहे, असा आरोप काँग्रेस नेत सचिन सावंत यांनी केला.
महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटेलीया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 20, 2021
-
गृहमंत्र्यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणावर कंगना राणौतची प्रतिक्रिया
जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है #ParambirSingh #AnilDeshmukh #UddhavThackeray #SanjayRaut pic.twitter.com/lTmZFvEo9F
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2021
-
100 कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचासुद्धा सहभाग, नारायण राणेंचा गंभीर आरोप
परमबीर सिंग हे पोलीस अधिकार आहेत. त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते. मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणात वाझे यांना वाचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. परमबीर सिंग यांनी वसुलीची माहिती ठाकरे यांना दिली होती. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी देशमुख यांच्यावर कारवाई का केली नाही. याचा अर्थ मुख्यमंत्री ठाकरे यांचासुद्धा 100 कोटी वसुली प्रकरणात संबंध आहे. एक तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली.
-
-
देशमुख ह्यांनी तत्काळ राजीनामा द्यायलाच हवा, ही घटना राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारी- राज ठाकरे
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
-
बदली झाली म्हणून आकसापोटी आरोप, एकनाथ खडसे यांच्याकडून देशमुखांची पाठराखण
जळगाव : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. “एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर आकसापोटी ते असा आरोप करीत असतात. मात्र चौकशीत तथ्य काय ते बाहेर येईलच,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
-
अनिल देशमुख यांची गच्छंती होणार, जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कारभार- सूत्रांची माहिती
परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप केल्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत आले आहेत. त्यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांना मिळाली आहे. देशमुख यांना उद्या राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा कारभार सोपवण्याची शक्यता आहे.
-
अब तो ये स्पष्ट है, ये सरकार भ्रष्ट है- चंद्रकांत पाटील
परमबीर यांनी लेखी आरोप केले आहेत. हे सरकार भ्रष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. संजय राऊत सांगतात की विरोधक खोटे आरोप करतात. मी म्हणतो की आता संजय राऊत यांनाच गृहमंत्री करा. म्हणजे सोपं होईल. परमबीर सिंग यांनी पत्रात अनिल देशमुख हे 100 कोटी वसुली करायला लावायचे हे सांगितलं आहे. त्यामुळे सचिन वाझे हा पैसै गोळा करण्यासाठी कलेक्टर होता. हे स्पष्ट होत आहे.
-
अनिल देशमुख यांच्या ट्विटनंतर मनसुख हिरेन यांच्या हत्येची पुष्टी- प्रविण दरेकर
अनिल देशमुख यांचं ट्विट हे सगळं काही सांगणारं आहे. एटीएसने मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आता गृहखात्याचा प्रमुख मनसुख हिरेन यांची हत्या झालेचे सांगत असेल तर. हिरेन यांची हत्या झाल्याची पुष्टी मिळते आहे. परमबीर सिंग हे अडकत चालत आहेत हे विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अनिल देशमुख यांना माहीत नव्हतं का?, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
-
Parambir Singh Letter Live Updates : महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही, देशमुख यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा- भाजप
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चांगली चौकशी करण्यात यावी. सरकारतर्फे वुसली रॅकेट चालवले जात असेल तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आम्ही मागणी करतो आहोत. आज देशातील आणि महाराष्ट्रातील सरकारसाठी ही शरमाेची बाब आहे.
-
Parambir Singh Letter Live Updates : बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?, अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट
होमगार्डचे समादेशक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमखु यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर यांनी केला. यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीसुद्धा सूचक ट्विट करुन देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
-
बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई यासाठीच केली होती का?, प्रसाद लाड यांची खोचक टीका
अरे वा रे देशमुख साहेब काय भारी खेळ चालवला हो!! महिन्याला १०० कोटी? अधिकाऱ्यांना शासकीय बंगल्यावर बोलवून आकडा ठरवायचे ? बार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स उघडण्याची घाई याच साठी केली होती का हो? यांचे पुढील बाप कोण यांची देखील माहिती दयावी!@TV9Marathi @abpmajhatv@BJP4Maharashtra
— Prasad Lad (@PrasadLadInd) March 20, 2021
-
नाशिक शहराला नेमंक काय हवंय, कोणत्या योजना हव्या याची माहिती माझ्याकडे आहे- राऊत
सकाळी सहा वाजता त्यांनी शपथ घेतली, हा मग घोडेबाजार नव्हता का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला केला. नाशिक शहराला नेमकं काय हवंय. काय योजना राबवता येतील यासाठी शिवसेना योजना तयार होतेय. याबाबत सगळी माहिती माझ्याकडे आहे. मी ही माहिती मुख्यमंत्र्यांना देणार, असे संजय राऊत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी सचिन वाझे प्रकरण आणि मुकेश अंबानी स्फोटकं प्रकरणांवर भाष्य केलं. एनआयएला एवढ्या लवकर येण्याची गरज नव्हती. एनआयएला जो तपास करायचा आहे तो करु द्या. मुंबईचे पालीस, माहाराष्ट्राचे एटीएस सक्षम आहे. मात्र, केंद्रात विरोधी सरकार आहे. विरोधी पक्षांची वेगळीच भूमिका आहे. त्यामुळे ते राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राज्यातील सरकारला काहीही फरक पडत नाही, असे राऊत म्हणाले.
दिल्लीत भाजपचे हायकमांड आहे. त्यामुळे राज्यातील भाजपचे नेते हायकमांडला मुजरा करायला गेले असतील. त्यामुळे यात काही नवे नाही. उद्या उद्धव ठाकरे जर देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हाला पण मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे लागेल.
मुंबई पोलीस दल हे सक्षम आहे. पोलीस समर्थ आहेत. मुंबई पोलिसांना सक्षम नवं नेतृत्व मिळालं आहे. अनिल देशमुख यांच्या बदलीचे सध्या चित्र दिसत नाहीये. शरद पवार यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
यावेळी पुढे बोलताना राऊत यांनी कोरोनावर भाष्य केले. कोरोना राज्यभरात वाढत आहे. माझी शिवसेनेच्या नेत्य़ांशी, पालिकांच्या नेत्यांशीही चर्चा केली. नाशिकच्या कोरोनावाढीवर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. राज्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. कारण राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्रात सगळीकडे व्यवस्थित लसीकरण सुरु आहे. मुख्यमंत्री यासंदर्भात लक्ष घालून आहेत.
शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे. आतापर्यंत काँग्रेसने नेतृत्व केलं. देशामध्ये विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि या आघाडीमध्ये जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावे असे वाटत असेल तर यूपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. आतापर्यंत सोनिया गांधी यांनी यूपीएचं नेतृत्व चांगल्या प्रकारे केलं. मात्र, सोनिया गांधी सध्या सक्रिय राजकारणात नाहीयेत. आज अनेक प्रादेशिक पक्ष हे युपीएमध्ये नाहीयेत. पण त्यांना यूपीएमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे यासाठी शरद पवार हे सक्षम नेतृत्व आहे, असं मला वाटतं.
देशाचं महाभारत हे पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. मात्र, आम्ही सगळे ममता बॅनर्जी यांच्याकडून आहोत. भाजपच्या जागा वाढतील. मात्र, बहूमत हे फक्त ममता यांनाच मिळेल. शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा विचार सुरु होता. मात्र, यावेळी ममता यांना पाठिंबा देणे योग्य असल्याचे शिवसेनेचे मत झाले. त्यामुळे शिवसेना बंगालमध्ये निवडणूक न लढता, ममता यांना पाठिंबा देणार.
-
लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल कंपनीत स्फोट, दुर्घटनेस्थळी आमदार भास्करराव जाधव दाखल
रत्नागिरी – घरडा केमिकल कंपनीमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेस्थळी आमदार भास्करराव जाधव दाखल, कंपनी व्यवस्थापन, पोलीस अधिकारी, कामगार प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती, प्रत्यक्ष घटनास्थळाचीही पाहणी
-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद मिरजमध्ये
सांगली- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद मिरजमध्येही उमटले आहेत. शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकार आणि कन्नडिगांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. मिरजमध्ये रस्ता रोको करत कर्नाटकच्या गाड्यांवर भगवे आणि काळे ध्वज लावून मराठी भाषिक आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हाफकीन संस्थेस भेट
-
नागपूरात लॉकडाऊन वाढणार?
नागपूरात लॉकडाऊन वाढणार?
लॉकडाऊन संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक सुरु
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक
बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती,
जिल्ह्यातील खासदार, आमदार, व्यापारी संघटना आणि संपादकांशी ऑनलाईन संवाद साधणार पालकमंत्री नितीन राऊत,
जिल्ह्यात कोरोनाची भयावह स्थिती बघता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
-
लोटे एमआयडीसी मधील घरडात कंपनीत स्फोट, पाच कामगार जखमी
लोटे एमआयडीसी मधील घरडात कंपनीत स्फोट
पाच कामगार जखमी
आज सकाळची घटना यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर
सर्वांना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटाचे कारण मात्र समजू शकलेलं नाही.
पोलीस घटनास्थळी दाखल
-
माजी आमदार विजय भांबळे यांना कोरोनाची बाधा
जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांना कोरोनाची लागण झालीये. सध्या ते होम क्वारंटाईन असून त्यांची प्रकृतीदेखील चांगली आहे….त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन भांबळे यांनी केले आहे…समाजमाध्यमावर त्यांनी संदेश पोस्ट केला आहे.
-
सातारा कारागृहातील 3 कैद्यांना कोरोनाची बाधा
सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 3 कैद्यांना कोरोनाची लागण…
शाळा,शासकीय कार्यालयानंतर आता कारागृहात कोरोनाची पुन्हा इन्ट्री….
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार
-
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य शासन उदासीन…?
बारामती : प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य शासन उदासीन..? – प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जाहिर करुन प्रक्रिया राबवण्याची मागणी.. – मागील वर्षापासून शिक्षक बदल्या खोळंबल्या.. – इतर विभागातील बदल्यांची प्रक्रिया होवूनही शिक्षक बदल्यांचा प्रश्न प्रलंबित.. – शासनाने तात्काळ शिक्षक बदली धोरण जाहिर करण्याची विविध संघटनांची मागणी
-
जुन्या भांडणाचा राग, नातवाने आजोबाला संपवलं
नातवानेच केला आजोबांचा डोक्यात सुरयाने वार घरातील जुन्या कारणावरून भांडण साक्री जिल्यातील साक्री तालुक्यातील खळबळ जनक घटना
आत्माराम पारधी असे मृत व्यक्ती चे नाव असून नातू ज्ञानेश्वर पारधी पसार झाला असून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
सांगलीच्या फुटीर नगरसेवकांविरोधात भाजप आक्रमक
सांगली महापालिका महापौर उपमहापौर निवडणूक फुटीर 6 नगरसेवकांविरोधाक भाजपकडून पुणे विभागीय आयुक्तांकडे आपत्रतेसाठी 6 स्वतंत्र अर्ज दाखल निवडणूक व्हीप डावलून केले विरोधी मतदान नगरसेवक पद रद्द करावे अशी अर्जाद्वारे केली मागणी भाजप शहर जिल्हा आदेक्ष दीपक बाबा शिंदे यांची माहिती
-
मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल
कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल,
– तक्रारदार महिला आणि राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
– कोथरुड भागातील रामबाग कॉलनीतील ऊसाचे गुऱ्हाळ अनधिकृत जागेत सुरु आहे,
– त्यामुळे सोसायटीमधील नागरिकांना त्रास होत असल्याचं गणेश कुंज सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे,
– यासंदर्भात मेधा कुलकर्णी यांची महापालिकेकडे तक्रार
-
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची भेट घेणार
शिवसेना नेते संजय राऊत आज नाशिकमध्ये
सेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची घेणार भेट
शिवसेना कार्यालयात घेणार संघटनात्मक आढावा
आगामी महापालिका निवडणुकांकच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती
मात्र राऊतांच्या अचानक दौऱ्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रमात
-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, नाशिकमध्ये आज आणि उद्या पुन्हा ‘बंद’
नाशिक – शहरात आज आणि उद्या पुन्हा बंद
वाढता कोरोनाचा प्रभाव बघता शनिवार रविवार संपूर्ण राहणार बंद
गेल्या शनिवार रविवार देखील नाशिककरांनी दिला होता प्रशासनाला प्रतिसाद .
आज देखील अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण शहर राहणार बंद
-
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी
शिवसेना उपतालुका प्रमुखांच्या आत्महत्येनंतर झाला जोरदार राडा
शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील खजिनदार यांनी केली होती प्रेयसीच्या घरात आत्महत्या
आत्महत्या केल्यानंतर हजारोंचा जमाव जमला होता पोलीस ठाण्यात
यावेळी चंद्रकांत खैरे यांनीही पोलीस निरीक्षांवर ओरडण्याचा केला प्रयत्न
पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनीही दिलं जोरदार प्रतिउत्तर
चंद्रकांत खैरे आणि राजश्री आडे यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ व्हायरल
-
आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर होणार
नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील आरक्षण सोडत येत्या मंगळवारी होणार
ओबीसी प्रवर्गातील जागा रद्द करून तेथे फेर निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते
त्या नुसार या निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली
मंगळवार 23 मार्चला आरक्षण सोडत निघणार आहे
यात जिल्हा परिषद 16 आणि पंचायत समित्या मधील 31 जागा आहे
-
कोरोना काळात नियमभंग करणाऱ्यांकडून 2 कोटी 39 लाखांचा दंड वसूल
-कोरोना काळात नियमभंग करणाऱ्यांकडून दोन कोटी 39 लाखांचा दंड वसूल
-कोरोना काळात मास्क न वापरणे,मर्यादेपेक्षा अधिक वेळ दुकाने सुरु ठेवणे तसेच अन्य नियम न पाळणा-यांवर पोलीस कारवाई सुरू आहे
-पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कोरोना काळात विनामास्क आणि अन्य कारवायांमध्ये तब्बल दोन कोटी 39 लाख 68 हजार 800 रुपयांचा दंड केला वसूल
-प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणा-यांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे आतापर्यंत शहरात 11 हजार 908 खटले दाखल
-
जप्त वाहनांचा 25 मार्चला होणार ई-लिलाव
पिंपरी-चिंचवड आरटीओकडून जप्त वाहनांचा 25 मार्चला होणार ई-लिलाव
-मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 22 वाहनांचा जाहीर लिलाव पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे ई-लिलाव पध्दतीने 25 मार्च रोजी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार
-यामध्ये बस, ट्रक, डी-व्हॅन, पिकअप व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, जेसीबी या वाहनांचा समावेश असून ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जाणार
-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी नागरिकांच्या माहितीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव येथील तहसिलदार कार्यालय आणि पिंपरी- चिंचवड येथील उप प्रादेशिक कार्यालयाच्या सूचना फलकांवर लावण्यात आली
-
कारंजात मार्च महिन्यातच पाणी पातळी घटली, पाण्यासाठी वणवण!
वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील नारेगाव येथे मार्च महिन्यातच पाण्याची पातळी खालावल्याने विहिरी, कूपनलिका आटल्या आहे. यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे… पिकांनाही देण्याकरिता पाणी नसल्याने पिके सुकत आहेत
-
तुर्भेतील एक्पोर्ट हाऊसमध्ये आजपासून ‘जम्बो कोव्हीड लसीकरण सेंटर’ कार्यान्वित
तुर्भे येथील एक्पोर्ट हाऊस मध्ये आजपासून ‘जम्बो कोव्हीड लसीकरण सेंटर’ कार्यान्वित
15 बुथ टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन
आजपासून पहिल्या टप्प्यात 2 शिफ्टमध्ये 4 – 4 असे 8 बुथ कार्यरत होणार
12 तास कार्यरत असणार हे जम्बो लसीकरण केंद्र
सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत 4 बुथ तसेच दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत 4 बुथ लसीकरणासाठी सज्ज
-
सांगली जळगावात सत्तांतर घडवून आणलं त्यानुसार दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करा
सांगलीत , जळगावात सत्ताबदल झाला. त्याला फार मोठे नैतिक अधिष्ठान नसले तरी नैतिक किंवा अनैतिक यावर बोलण्याचा अधिकार भाजपने गमावला आहे. जळगावात भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असे खडसे यांनी आता सांगितले. मग आता जे सत्तांतर घडवून आणले त्यानुसार ही सर्व आश्वासने पूर्ण करा. सत्तापालट कारणी लागो. तरच करेक्ट कार्यक्रम सत्कारणी लागला असे म्हणता येईल. सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी आहे. यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील!
Published On - Mar 20,2021 11:24 PM