LIVE | मावळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
मावळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट
पुणे -मावळ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
-काही ठिकाणी गारपीटीसह पावसाची हजेरी
–
-
एमपीएससी परीक्षेत नाशिकमध्ये 6 हजारहून अधिक विद्यार्थी गैरहजर
– नाशिकमध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत तब्बल 6 हजारहून अधिक विद्यार्थी गैरहजर
– कोरोनाच्या भीतीने विद्यार्थी गैरहजर असल्याची प्राथमिक माहिती
– नाशिकमध्य 46 केंद्रांवर पार पडली परीक्षा
– या परिक्षेसाठी 1460 अधिकारी कर्मचारी करण्यात आले होते नियुक्त
– परीक्षेला एकूण 18071 विद्यार्थी बसणार होते.
-
-
इचलकरंजी शहर परिसरात विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात
इचलकरंजी शहर परिसरात विजेच्या कडकडासह पावसाला सुरुवात
हवेमध्ये गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा
शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला होता
पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
-
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस, पिकांना फटका बसणार
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस
गडहिंग्लज, नेसरी भागात मुसळधार पाऊस
जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण
मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण
गारपीटीसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
शेतात असलेल्या रब्बी पिकांना पावसाचा मोठा फटका बसणार
अनेक गावातल्या आठवडी बाजारांवर पावसाचा परिणाम
-
पंढरपूर तालुक्यात अवकाळी पाऊस, द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान
पंढरपूर : शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची हजेरी
ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अनेक भागात पावसाला सुरुवात
तालुक्यातील टाकळी, कासेगावमध्ये द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान
-
-
बारामती शहर, तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस
पुणे : बारामती शहर आणि परिसरात पावसाची हजेरी -वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात
– शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस
-
सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात तुफान पाऊस, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता
नाशिक – सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात तुफान पाऊस
– ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस
– अचानक जोरदार पाऊस बरसल्याने पिकांच नुकसान होण्याची शक्यता
– तर पावसामुळे वातावरणात गारवा
-
अहमदनगर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस, शेतकरी पुन्हा संकटात
अहमदनगर जोरदार पावसाला सुरुवात
जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस
अनेक ठिकाणी गारा पडल्या
अचानक गारांचा पाऊस झाल्याने अनेक पिकांचं नुकसान
पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात
-
अजित पवार आणि जयंत पाटील पंढरपूरहुन मुंबईकडे रवाना, बैठकीसाठी दिल्लीला जाणार
अजित पवार आणि जयंत पाटील पंढरपूरहुन मुंबईकडे रवाना,
– दोन्ही नेते लगेच दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
– शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत,
-
गृहमंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा दिला पाहिजे – राज ठाकरे
गृहमंत्री गेला पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे
केंद्राने कसून चौकशी केली पाहिजे
कल्पनेच्या बाहेरचे चेहरे तुमच्या समोर येतील
केंद्राने जर यात हस्तक्षेप केला नाही तर हा देश अराजकाकडे चालला आहे असं मी म्हणेल
पोलीस बॉम्ब ठेवतात, त्यांना बॉम्ब ठेवायला सांगितलं जातं ही शुल्लक गोष्ट नाही, साधं काम नाही,
त्यामुळे माझी केंद्राकडे हात जोडून विनंती आहे की त्यांनी चौकशी करावी
-
मला लाज वाटली, महाराष्ट्राचा गृहमंत्री सांगतो की बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा – राज ठाकरे
राज्यात अनेक प्रश्न आहेत
कोरोनाचे आकडे येत आहेत
मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांचं एक वर्ष फुकट गेलं
पालकांच्या नोकऱ्या गेल्याने शिक्षण सोडावं लागलं
बेरोजगारीचा आकडा वाढतोय
आर्थिक परिस्थितीत खराब आहे
हे सर्व असताना एक नवीन प्रकरण येतं आणि लोकांचा विश्वास उडतो या सर्व प्रकरणामुळे
पोलीस भ्रष्टाचारी नाहीत तर हे वरुन सांगतात १०० कोटी वसूल करा म्हणून कतर पोलीस जाणार ना
मला लाज वाटली काल की महाराष्ट्राचा गृहमंत्री सांगतो की बारमध्ये जाऊन पैसे गोळा करा
इतकी घाण अवस्था आहे महाराष्ट्राची
-
कोण्याच्या सांगण्यावरुन गाडी ठेवली गेली याची चौकशी करावी – राज ठाकरे
अंबानींकडून पैसे काढणे इतकं सोपं
मुख्यमंत्र्यांशी संबंध असलेल्या मुकेश अंबानींकडे पोलीस पैसे खायला जातील का?
हे सगळं वेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे, याला फाटे फोडू नका,
मूळ प्रकरण गाडी का ठेवली गेली, कोण्याच्या सांगण्यावरुन गाडी ठेवली गेली याची चौकशी करावी
केंद्र सरकारने तात्काळ यात हस्तक्षेप करावा अन्यथा लोकांचा पोलीस प्रशासन, सरकार यांच्यावरील विश्वास उडालेला आहे, तो जर मिळवायचा असले तर केंद्राने हस्तक्षेप करावा
-
जर केंद्राकडून याची चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल – राज ठाकरे
मी केंद्र सरकारला विनंती करतो की त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा कारण याचा तपास महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रातून होणार नाही
जर केंद्राकडून याची चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल
कोेण कोण आत जातील याची आपण कल्पनाही करणार नाही
ज्या मुकेश अंबानींकडे सुरक्षेसाठी इस्राईलचे लोक आहेत
तर मध्य प्रदेश पोलिसांची त्यांना सुरक्षा
म्हणजे एखादा मणूस दोनदा जरी गेला तरी चौकशी होते
अशा प्रकारच्या रस्त्यावर एक गाडी 24 तास उभी राहाते, त्यातलं पत्र जर वाचलं तर, नीता भाभी आणि मुकेश भैय्या, धमकी देणारा माणूस आदराने बोलतो का?
ते पत्र गुजराती टोनमध्ये आहे, एखाद्या गुजराती माणसाने लिहिलेलं ते पत्र आहे हे कळतं,
-
वाझे हा उद्धव ठाकरेंचा अत्यंत जवळचा माणूस – राज ठाकरे
सचिन वाझेला शिवसेना पक्षात प्रवेशासाठी कोण घेऊन गेलं होतं,
वाझेंना पुन्हा पोलीस खात्यात आणावं असं उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलं
याचा अर्थ एवढाच वाझे हा उद्धव ठाकरेंचा अत्यंत जवळचा माणूस
उद्धव ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध आहेत, त्यांच्या शपथविधीला अंबानी सहकुटुंब हजर होते
मग वाझे बॉम्बची गाडी कुणी सांगितल्याशिवाय अंबानीच्या घराखाली ठेवेल काय?
पोलीस आयुक्त असू दे किंवा पोलीस अधिकारी यांना बॉम्ब ठेवण्यासाठी कोणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाही
त्यामुळे वाझेंवर ही जबाबदारी झटकून चालणार नाही
-
पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं – राज ठाकरे
बॉम्ब अतिरेकी ठेवतता हे ऐकलं होतं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं
परमबीर सिंग यांना पदावरून का बदलण्यात आलं त्यात ते गुंतलेले होते का?
ते गुंतलेले होते असं वाटतं तर त्यांची बदली का केली, चौकशी का केली नाही
त्यांना काढून दुसरीकडे बदली केली यातून काय साध्य होतं
तुमच्या अंगावर आलेली गोष्ट झटकून दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचा हा प्रकार होता
-
राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिलं हे अजून बाहेर आलं नाही – राज ठाकरे
काल माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप शंभर कोटी दर महिन्याला आले पाहिजेत असं गृहमंत्री सांगतात
अशी घटना महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासात घडली नाही
एक वर्षे झाले म्हणून १२०० कोटी द्यायला हवी असेल पण लॉकडाऊनमुळे बारबंद होते, त्यामुळे ही वसुली झाली नसेल,
राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिलं हे अजून बाहेर आलं नाही
गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिलं पाहिजे
बॉम्ब अतिरेकी ठेवतता हे ऐकलं होतं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं पाहिलं नव्हतं
या संपूर्ण प्रकरणात अनेक विषय पुढे येत आहेत, पोलिसांचं लॉबिंग एकमेकांवर आरोप करणं,
यामध्ये मूळ विषय मागे सुटतोय, जसं सुशांत सिंग प्रकरणात मूळ विषय मागे सुटला
-
देशाच्या इतिहासात असं कधीही घडलं नाही – राज ठाकरे
राज ठाकरे –
मला जे आता बोलायचे ते बोलून झाल्यावर मी कोणत्याही प्रश्नांना उत्तर देणार नाही, ते माझ्या निवेदनात असेल, का देऊ शकणार नाही किंवा का इच्छा नाही हे पण निवेदनात असेल. कारण प्रश्न विचारल्यावर अनेक विषय निघतात आणि मूळ विषय निघून जातो, त्यामुळे इतर विषयांना मी हात घालणार नाही,
-
उपमुख्यमंत्री अजित पवार 12 वाजता माध्यमांशी बोलण्याची शक्यता
पंढरपूर –
– उपमुख्यमंत्री अजित पवार 12 वाजता बोलण्याची शक्यता
– पंढरपूर विधानसभा उमेदवारी संदर्भात अजूनही बैठक सुरुय,
– बैठकीला जयंत पाटीलही उपस्थित
-
राज ठाकरे काय बोलणार? थोड्याच वेळात मीडियाशी संवाद साधणार
आज रविवार 21 मार्च 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधणार
-
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदानाला सुरुवात
औरंगाबाद
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी मतदानाला सुरुवात
अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष
21 पैकी 18 जागेंसाठी होणार आज मतदान तर दोन जागा याआधीच बिनविरोध
48 उमेदवार रिंगणात असून 1114 मतदार
मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात कोरोना बाधित व संशयित रुग्णांना मतदान करता येईल.
अब्दुल सत्तार-मंत्री संदीपान भुमरे-मंत्री, आमदार आंबदास दानवे प्रतिष्ठा पणाला
-
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात दोघांना अटक
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात दोघांना अटक
दोघांची नाव समोर आली नाहीत
हत्येमागे त्यांचा हात असल्याचा एटीएसचा दावा, एनआयएकडे सुपूर्द प्रकरण, पत्रव्यवहार अजून कागदपत्रे सुपूर्द केलीली नाहीत
कोणाच्या सांगण्यावरुन सहभाग घेतला, रोल स्पष्ट होईल
एक पोलीस अधिकारी आणि एका बुकीचा समावेश
-
सांगलीत डांबरामध्ये अडकलेल्या नागाला जीवदान
सांगली-
डांबरामध्ये अडकलेल्या नागाला जीवदान
सांगली जिल्ह्यातील शिराळकर स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात.असे अनेक प्रसंग घडले
आहेत.असाच प्रसंग शिराळा येथे काल दुपारी घडला. डांबरामध्ये अडकलेल्या नागास तीन तासाच्या प्रयत्नाने
शिराळकरांनी जीवदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे. हे दाखवून दिले आहे.
-
साताऱ्यात वणवा लावण्यास कारणीभुत ठरल्या प्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षकेला ठोठावला दंड
सातारा:
वणवा लावण्यास कारणीभुत ठरल्या प्रकरणी मुख्याध्यापकासह शिक्षकेला ठोठावला दंड…
वाई वनविभागाने दोन्ही शिक्षकांना ठोठावला प्रत्येकी पाच हजार रुपयाचा दंड….
रेळावळे येथील जिल्हा परिषद शाळेत कचरा पेटवत असताना लगतच्या डोंगरावर लागला वणवा….
वाई तालुक्यात रेनावळे येथील घटना
-
अकोल्यात आज 18 केंद्रांवर एमपीएससी’ची परीक्षा,4977 विद्यार्थी देणार परीक्षा
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( एमपीएससी ) राज्यसेवा पूर्व परीक्षा आज घेण्यात येत असून अकोला शहरातील 18 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून,जिल्ह्यातील 4 हजार 977 परीक्षार्थी एमपीएससी’ची परीक्षा देणार असून,जिल्हा प्रशासनामार्फत परिक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे
-
इस्लामपूर येथील कुटे टोळीला मोक्का
सांगली –
इस्लामपूर येथील कुटे टोळीला मोक्का
जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा गुन्हेगारांना दणका
खून मारामारी जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे कुटे टोळीवर दाखल आहेत
संदीप कुटे रुतीक महापुरे अनिल राठोड अशी मोका लावलेल्या गुन्हेगाराची नावे
2 वर्षात 40 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई
-
इंद्रायणी नदीत वाळू चोरी ,1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड
– इंद्रायणी नदीत वाळू चोरी ,1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
– वाळू चोरी प्रकरणी चौदा जण ताब्यात
– त्यांच्या जवळून वाळू साठ्यासह जेसीबी, पोकलेन, ट्रॅकर यासह 1 कोटी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत
– बुर्डेवस्ती, च-र्होली, इंद्रायणी नदी जवळ पहाटे तीनच्या सुमारास दरोडा विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली
– या आरोपीना न्यायालयाने दोन दिवसांची सुनावणी पोलीस कोठडी
-
नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारन्यात वाघाच्या शावकाचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारन्यात वाघाच्या शावकाचा मृत्यू
नियमित गस्ती दरम्यान वनरक्षक करांडला यांना सायंकाळी एक वाघाचा बछडा मृतावस्थेत निदर्शनास आला.
मृत बछडयाच्या शरीराचा वरील भाग हिंस्त्र वन्यप्राण्यांचे खाल्लेला होता.
मृत बछडा हा T1 या वाघिनीचा असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदरचा बछडा याच परिसरात दोन दिवसांपूर्वी कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसून आला होता.
बछड्याची आई T1 हिचे वास्तव्य घटनास्थळ परिसरात असून ती सद्यस्थिती T 9 या नर वाघासोबत मागील काही दिवसांपासून नियमितपणे राहत असल्याचे सनियंत्रणात आढळून आले आहे.
T9 या नर वाघाने सदर बछड्यास ठार मारले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
पुढील कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार करण्यात येत आहे.
-
अमरावतीत असली-नकली तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करुन डोक्याचे केस कापले
अमरावती
जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्या अंतर्गत धक्कादायक प्रकार
असली नकली तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना नग्न करुन डोक्याचे केस कापले
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
चार असली तूतीयपंथीया विरुद्ध गुन्हे दाखल
-
पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई, दररोज 6 लाख दंड वसूल
पुणे :
विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू
विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांवर दररोज सरासरी ६ लाख रुपये दंड वसूल
१९ मार्चअखेरपर्यंत २ लाख ५६ हजार ८२१ जणांवर कारवाई
१२ कोटी ४४ लाख ११ हजार रुपये दंड आतापर्यंत वसूल
-
अमरावतीत पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
अमरावती जिल्हात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 9 तालुक्यात काढणीला आलेल्या गहू, हरभरा व कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.. आता गहू व हरभरा, कांदा काढण्याची तयारी शेतकरी करत होते.. मात्र हातात आलेलं पीक निसर्गाने हिरावून नेलं आहे..यात सर्वाधिक गहू पिकांचं नुकसान झाले आहे. काढणीवर असलेला गहू जमीनदोस्त झाला आहे
-
नंदूरबार जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट
नंदूरबार जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट, शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, शनिवारी दुपारी आलेला दहा ते पंधरा मिनिटे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर होते शेती पिकाचे नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या गहू आणि कापणीला आलेले हरभरा या पिकांना गारपीट व अवघड सर्वाधिक फटका बसला आहे
-
नंदूरबारमध्येस एमपीएससी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 144 कलम लागू, परीक्षार्थिंशिवाय कुणालाही प्रवेश नाही
नंदूरबार : आज एमपीएससीची पूर्व परीक्षा होत आहे त्यामुळे नंदुरबार शहरातील सहा केंद्र स्थापन केला आहे परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरसोय होऊ नये शांतता व सुव्यवस्था रहावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी 144 कलम लावण्यात आलेला आहे दोनशे मीटरच्या परिसरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही आहे परीक्षार्थींना सोडून
-
फरार आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन
पिंपरी चिंचवड
– फरार आरोपींना पकडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन
-या ऑपरेशन ऑल आउट मध्ये 383 गुन्हेगारांची तपासणी
– पिस्तुल,चाकूसह सराईताना अटक,38 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
-
उल्हासनगरात गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन महिलेची हत्या
उल्हासनगर :
उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील 26 सेक्शन येथे 40 वर्षीय महिलेची हत्या
विद्या तलरेजा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव
गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या, पोलिसांनी रात्री उशिरा मृतदेह घेतला ताब्यात
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
-
पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी पूर्ण, जिल्ह्यातील 77 परीक्षा केंद्रांवर 31 हजार उमेदवारांची बैठक व्यवस्था
पुणे
एमपीएससी परीक्षेची पूर्ण तयारी
जिल्ह्यातील 77 परीक्षा केंद्रांवर सुमारे 31 हजार उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात
परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या सुमारे 2 हजार 700 कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआय चाचण्या केल्या आहेत प्राप्त
अहवालामध्ये सुमारे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
परीक्षा केंद्रांवर कर्मचा-यांची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर तीन कर्मचारी नियुक्त
प्रत्येक वर्गामध्ये कमीत कमी 12आणि जास्तीत जास्त 24 उमेदवार असणार
परीक्षेसाठी येणा-या प्रत्येक उमेदवाराचे तापमान तपासणी
आयोगाने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीकडून तीन वेळा परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन
सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत
-
आय कार्ड दाखवून विद्यार्थ्यांना आणि पालकांना सोडण्यात येईल, नागपूर पोलिसांचं आवाहन
नागपूर –
नागपूर पोलिसांचं एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना आवाहन
सोबत आय कार्ड ठेवण्याचा आवाहन
शहरात कोरोनामुळे कडक निर्बंध घालण्यात आले त्यामुळे ठिकठिकाणी चेकिंग केली जात आहे
त्यामुळे आय कार्ड दाखवून विध्यार्थ्यांना आणि पालकांना सोडण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या
विद्यार्थ्यांनी कुठलीही चिंता न करता आपल्या परिक्षेकडे लक्ष द्यावे
झोन 2 डीसीपी विनिता साहू यांचं आवाहन
-
नाशिकमध्ये आज 46 केंद्रांवर होणार एमपीएससी परीक्षा
नाशिकमध्ये आज 46 केंद्रांवर होणार एमपीएससी परीक्षा
18 हजार 23 विद्यार्थी परीक्षेत होणार सहभागी
कोरोना नियमांचं पालन करूनच परीक्षेची करण्यात आलीये तयारी
विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज देणार
कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करूनच परीक्षा होणार
-
नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
भाजपला रोखण्यासाठी संजय राऊतांची रणनीती
सहा सदस्यीय कोअर कमिटी केली तयार
नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याचा संजय राऊतांचा विश्वास
-
गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा – तृप्ती देसाई
राज्यात नेमके काय चालले आहे, हे महाविकासआघाडी सरकार आहे की “महावसुली सरकार”आहे, वाझे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत आणि व्हाट्सअॅप चॅटचे पुरावे सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे,परंतु गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल-तृप्ती देसाई
Published On - Mar 21,2021 8:42 PM