LIVE | उस्मानाबादेत रेशन दुकानदारकडून लाच घेताना नायब तहसीलदारासह दोघांना अटक

| Updated on: Mar 23, 2021 | 12:11 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | उस्मानाबादेत रेशन दुकानदारकडून लाच घेताना नायब तहसीलदारासह दोघांना अटक
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Mar 2021 09:23 PM (IST)

    उस्मानाबादेत रेशन दुकानदारकडून लाच घेताना नायब तहसीलदारासह दोघांना अटक

    उस्मानाबाद : रेशन दुकानदारकडून लाच घेताना 3 जणांना अटक

    कळंब तहसीलच्या नायब तहसीलदार परवीन पठाण, रेशन दुकानदार संघटनाचे अध्यक्ष श्रीरंग डोंगरे आणि दुकानदार विलास पिंगळे यांना अटक

    तक्रारदार रेशन दुकानदाराचे 44 हजार 623 रुपयांचे बील काढण्यासाठी 15 टक्के कमिशन म्हणजेच एकूण 6 हजार 700 रुपयांची लाच घेताना अटक

    उस्मानाबाद लाचलुचपत विभागाची कारवाई

  • 22 Mar 2021 07:08 PM (IST)

    अरविंद सावंत यांनी धमकावल्याचा आरोप, नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

    खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात खासदार नवनीत राणा यांची तक्रार

    महाराष्ट्रातील प्रश्नावर संसदेत बोलल्यामुळे संसदेच्या लॉबीमध्ये धमकावल्याचा केला आरोप

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली कारवाईची मागणी

    पोलिसात तक्रार देण्याचीसुद्धा राणा यांची तयारी

  • 22 Mar 2021 06:04 PM (IST)

    राज्यात रोज तीन लाख लोकांचे लसीकरण- राजेश टोपे

    कोरोना संसर्गाची माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलत आहेत. ते कोरोनाविषयक माहिती देत आहेत. राज्य सरकार गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने चालवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच  धार्मिक, सामाजिक, राजकीय सभांना तसेच कार्यक्रमांना बंदी घातली आहे. कोरोन रुग्ण ज्या पद्धतीने वाढत आहेत ते पाहता आता पुन्हा काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची कमी असेल तर त्या जागा तत्काळ भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जे कोव्हीड सेंटर्स बंद केले होते, ते आता पुन्हा सुरु करण्यावर विचार सुरु आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

    राज्यात सध्या 2400 रुग्णालयांत लसीकरणाचा कार्यक्रम सरु  आहे. त्यानंतर आता 600  आणखी रुग्णालयांत लसीकरण करण्यास मंजुरी मिळाली आहे. रोज राज्यात तीन लाखच्या जवळपास लसीकरण होत आहेत. त्याच बरोबर उपकेंद्रापर्यंत लसीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी असा आमचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात यानंतर लसीकरणासाठी जे कोणी अर्ज पाठवतील त्यांच्या अर्जांना मंजुरी मिळण्यासाठी राज्याचा प्रयत्न सुरु आहे. आगामी तीन महिन्यांत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना संसर्ग कसा टाळता येईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे.

    15 मार्च रोजी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, त्या पूर्णपणे पाळणे गरजेचे आहे, त्यासाठी आम्ही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत आहोत. राज्यात होम आयसोलेशन, संस्थात्मक विलगीकरणावर आम्ही जोर देत आहोत.

    अनेक ठिकाणी राज्यात निवडणुका सुरु आहेत. तेथे कोरोना नियम पाळले जात नाहीत. महाराष्ट्रात कोणतीही  लपवालपवी होत नाही. कोरोना रुग्ण आढळला की ते पोर्टलवर अपडेट केले जाते. हाफकीन येथे जर संधी दिली तर तिथेसुद्धा वर्षाला 17 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस तयार करता येऊ शकतात. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, यावेळी बोलताना रोज जर तीस हजार रुग्ण आढळत असतील तर अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते असे उद्धव ठाकरे म्हणाले. असेच रुग्ण वाढले तर आगामी काळात काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. तसेच, हा परिस्थिती जास्त काळासाठी अशीच राहिली तर राज्यात आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील.

    नागपुरात कोरोना वाढत आहे. डॉक्टरांना अत्यंत काळजीपूर्वक आणि गंभीरपणे कोरोनाला थोपवण्याठी गरजेचे आहे. लेट डिटेक्शन होणे हासुद्धा रुग्ण वाढण्यासाठी कारण आहे. आम्ही नागपूर प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येतील.

    आपले राज्य मोठे आहे. येथे साडे बारा कोटी लोक राहतात. येथे कोरोना वाढतोय. मात्र, महाराष्ट्र राज्य हे पर मिलीयन केसेसमध्ये सातव्या नंबरला आहे. देशात पुदुच्चेरी, गोवा, दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्रपेक्षा जास्त रुग्णवाढ होत आहे.  केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकार चालत आहे. काना मात्रही न बदलता केंद्र सरकारच्या सूचना पाळल्या जात आहेत. केंद्राने कोरोना चाचण्या वाढवणे, ट्रेसिंग वाढवणे अशी सूचना दिल्या आहेत. या सूचना तंतोतंत पाळल्या जातील, असे राजेश टोपे म्हणाले.

    लॉकडाऊन संदर्भात लगेच निर्णय घेतला जाणार नाही. या बाबत गंभीर चर्चा केली जाईल. सर्व नेत्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होईल, असे राजेश टोपे म्हणाले.

  • 22 Mar 2021 05:45 PM (IST)

    अधिकाऱ्याने पत्र दिले म्हणजे लगेच राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही- बाळासाहेब थोरात

    काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पत्रकार परिषद सुरु आहे. यावेळी बोलताना, आमची चर्चा झाली आहे. एखाद्या अधिकाऱ्याने पत्र दिले म्हणजे लगेच राजीनामा घ्यावा हे काही योग्य नाही, असे वक्तव्य केले. परमबीर सिंह यांच्यावर काहितरी दबाव असावा, त्याच दबावातून त्यांनी हे पत्र दिले असावे मला वाटते. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यास आमची हरकत नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

    सिंह यांच्या पत्राला काही आधार नाही. त्यामुळे लगेच देशमुख यांचा राजीनामा घेतला तर रोज अनेक पत्र येतील, असे म्हणत थोरात यांनी देशमुख यांची पाठराखण केली. भारतीय जनता पक्ष हा विरोधामध्ये आहे. सत्ता नसल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. ही घटना घडली त्यामुळे त्यांना संधी मिळाली आहे. त्यातून ते वातावरण तयार करत आहेत. सत्तेसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली.

    या प्रकरणावर आघाडीतील आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसलेलो नाहीत. मात्र, सध्यातरी देशमुख यांचा राजीनामा घ्यावा असे मला वाटत नाही, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

  • 22 Mar 2021 05:17 PM (IST)

    मनसुख हिरेन प्रकरणात वाझे हेच प्रमुख दोषी- प्रविण दरेकर

    मुकेश अंबानींच्या बंगल्यासमोर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो सापडल्यानंतर मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्याशी झालेल्या संभाषणातून वाझे प्रमुख दोषी आहे, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

    या सर्व संभाषणातून दिवसेंदिवस अनेक पुरावे, दस्तावेज या प्रकरणाचे समोर येत आहे.

    निश्चितपणे या प्रकरणाचा अंतिम सत्य, अंतिम उलघडा लवकरात लवकर एटीएस आणि एनआय करण्याशिवाय राहणार असा विश्वास आहे.

  • 22 Mar 2021 05:14 PM (IST)

    नाशिकमध्ये ढगाळ वातावरण, जोरदार पावसाची शक्यता

    – नाशिकमध्ये ढगाळ वातावरण

    – जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

    – काल अनेक भागात अचानक पाऊस कोसळल्याने शेतीचं नुकसान

    – अवकाळी पावसाने बळीराजा चिंतेत

  • 22 Mar 2021 05:13 PM (IST)

    मनसुख हिरेनच्या हत्येमागे सचिन वाझेंचा हात, एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

    मुंबई : मनसुख हिरेनच्या हत्येमागे सचिन वाझेंचा हात

    एटीएसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली माहिती

    विनायक शिंदेने  हिरेन यांच्या हत्येमागे वाझे असल्याची कबुली दिल्याची माहिती

    कालच शिवदीप लांडे यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा उलगडा झाल्याची पोस्ट टाकली होती

    त्यानंतर एटीएसच्या बड्या अधिकाऱ्याने दिली मोठी माहिती

  • 22 Mar 2021 04:13 PM (IST)

    चंद्रपुरात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावर कारची झाडाला धडक, 2 जण जखमी

    चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प मार्गावर अनियंत्रित कारची झाडाला धडक

    वेगवान कार झाडाला धडकल्याने कारचे मोठे नुकसान

    कारमध्ये बल्लारपूर परिसरातील 2 मद्यधुंद व्यक्ती असल्याची माहिती

    वनविभागाला सूचना मिळताच बचाव पथकाने 2 जखमींना बाहेर काढून रुग्णालयात केले रवाना

    वन्यजीवांची मोठी वर्दळ असलेल्या मार्गावर पर्यटक वाहनांचा अतिवेग हे वनविभागापुढचे आव्हान

  • 22 Mar 2021 03:22 PM (IST)

    अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन, चंद्रकांत पाटालांसह 50 कार्यतकर्त्यांविरोधात गुन्हा

    पुणे : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने केलेल्या आंदोलनप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षासह कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळिक, माजी आमदार योगेश टिळेकर, यांच्यासह इतर 40 ते 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी दिली फिर्याद

    कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना भाजप प्रदेशाध्यक्षासह शहराध्यक्षांनी विनापरवानगी केलं आंदोलन

    त्यामुळे संबंधितांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल

  • 22 Mar 2021 02:20 PM (IST)

    परमबीर सिंग हे केंद्र सरकार बोलका पोपट, विनायक राऊत यांची टीका 

    परमबीर सिंग भ्रष्टाचारी, परमबीर सिंग यांनी अनुप डांगेंना त्रास दिला, परमबीर सिंग हा केंद्र सरकार बोलका पोपट : विनायक राऊत यांची टीका

  • 22 Mar 2021 02:12 PM (IST)

    गृहमंत्री अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया

    मला कोव्हिड झाल्याने मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी रुग्णालयात अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला. तिथून बाहेर पडत असताना अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. माझ्या अंगात विकनेस होता. त्यामुळे रुग्णालयाच्या इथे पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देऊन मी होम क्वारंटाईन झालो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो : गृहमंत्री अनिल देशमुख

  • 22 Mar 2021 01:24 PM (IST)

    पत्रकारांच्या प्रश्नांना शरद पवार म्हणाले इनफ इज इनफ

    पत्रकारांच्या प्रश्नांना शरद पवार म्हणाले इनफ इज इनफ

    शरद पवारांनी दिलेल्या माहितीनुसार १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीला अनिल देशमुख रुग्णालयात

    मात्र, १५ फेब्रुवारीला अनिल देशमुख पत्रकार परिषद घेत होते, पत्रकारांकडून प्रश्नांचा भडीमार

    मात्र, मला त्याबाबत काहीही माहिती नाही, माझ्या माहितीप्रमाणे ते १५ फेब्रुवारीला रुग्णालयात होते, शरद पवारांचं उत्तर

    त्यानंतर अनिल देशमुखांकडून याची माहिती घेण्यात आली

    त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ती व्हीसी होती

  • 22 Mar 2021 01:21 PM (IST)

    15 फेब्रुवारीला अनिल देशमुख स्वत: पत्रकार परिषद घेत होते, या प्रश्नावर शरद पवार अनुत्तरीत 

    15 फेब्रुवारीला अनिल देशमुख स्वत: पत्रकार परिषद घेत होते

    या प्रश्नावर शरद पवार अनुत्तरीत

  • 22 Mar 2021 01:17 PM (IST)

    सचिन वाझे यांनी जे केले याची जबाबदारी ही प्रशासकीय प्रमुखाची जबाबदारी – शरद पवार

    सचिन वाझे यांनी जे केले याची जबाबदारी ही प्रशासकीय प्रमुखाची जबाबदारी, सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री जबाबदार नाही का, या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर

  • 22 Mar 2021 01:16 PM (IST)

    अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

    जे आरोप केले त्यात तथ्यच नाही

    मग चौकशीचा मुद्दा येतो कुठून

    अनिल देशमुखांना हटवण्याचा प्रश्नच नाही

  • 22 Mar 2021 01:15 PM (IST)

    परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही – शरद पवार

    देशमुख हॉस्पिटलमध्ये होते, परमबीर सिंग यांनी आरोप केलेत त्या काळात ते रुग्णालयातच होते

    त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये आता ताकद राहिली नाही

    अनिल देशमुख मुंबईत नव्हते, रुग्णालयात होते

    त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही

    परमबीर सिंगांनी पत्रात उल्लेख केलेल्या कालावधीत अनिल देशमुख रुग्णालयात होते

    त्यामुळे त्यांचा राजीनामा नाही.

  • 22 Mar 2021 01:10 PM (IST)

    मुख्य प्रकरण महत्त्वाचं – शरद पवार

    मुख्य केस काय आहे तर संबधीत गोष्टी अंबनीच्या घराखाली गाडीत कशा आल्या, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे

    गाडी कुणाची होती?

    कुणाच्या ताब्यात होती?

    कुणी वापरली? आणि गाडीमालक हिरनची हत्या

  • 22 Mar 2021 01:08 PM (IST)

    मुख्य प्रकरण सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होतं – शरद पवार

    काल एटीएसने दोघांना अटक केली, हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणात ही अटक झाली आहे, यावरुन एक स्पष्ट होत आहे, हिरेन यांची हत्या का झाली

    त्यांची हत्या करणारे जे पोलीस वाटतात, त्यांना एटीएसने अटक केली

    आता तपासात सत्य बाहेर येईल

    उद्या-परवा कधी येईल माहिती नाही

    मात्र मला आनंद आहे, मुख्य केस जे सीपींच्या आरोपानंतर दुर्लक्षित होत होती, अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांची, त्याबाबत चौकशी होत आहे

  • 22 Mar 2021 01:06 PM (IST)

    लक्ष विचलित करण्यासाठी आरोप – शरद पवार

    शरद पवार –

    लक्ष विचलित करण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे

    हिरेन हे त्या जीपचे मालक होते, त्यांची हत्या झाली

    एटीएसने त्यामध्ये दोघांना अटक केली आहे

    हिरेन केसमध्ये एटीएस करेक्ट दिशेला आहे

    ही केसमधून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत होता

    शरद पवारांचा पलटवार

  • 22 Mar 2021 01:03 PM (IST)

    मुख्य प्रकरण हे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याचं – शरद पवार

    महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, परमबीर सिंग यांनी जे जे मेन्शन केलं आहे, वाझेप्रकरणात, त्याबद्दल माझं म्हणणं आहे, मुख्य केस कोणती आहे? अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी पार्क करण्याची आहे.

  • 22 Mar 2021 01:02 PM (IST)

    परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत – शरद पवार

    परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वाझेंना बोलवले होते असे पत्रात नमूद केले आहे

    त्यानंतर गृहमंत्री मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले असे लिहिलंय

    मात्र आमची भेट मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात झाली होती

    परमबीर सिंग हे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गप्प का होते

    ते आरोपासाठी महिनाभर का थांबले

    परमबीर सिंग यांच्या बदलीची माहिती त्यांना मिळाल्यानंतर हे आरोप केले असावेत

    मला त्यात पडायचं नाही

  • 22 Mar 2021 01:01 PM (IST)

    आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले?, शरद पवार यांचा सवाल 

    फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना

    परमबीर सिंग यांचा आरोप

    आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले

    शरद पवार यांचा सवाल

  • 22 Mar 2021 12:58 PM (IST)

    देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे – शरद पवार

    देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे

    १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता

    त्यामुळे या दरम्यान अनिल देशमुख होम कॉरेन्टाईन होते

  • 22 Mar 2021 12:58 PM (IST)

    अनिल देशमुखांबाबत रुग्णालयाने सर्टिफिकेट दिलं आहे – शरद पवार

    शरद पवार –

    मी नागपूरमधील रुग्णालयाकडून काही कागदपत्र मिळवली आहेत, त्या रुग्णालयाने सर्टिफिकेट दिलं आहे,

    अनिल देशमुख हे १७ दिवस भरती होते

    ६ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत कोव्हिड-१९ आजारामुळे भरती होते

    इथे स्पष्ट माहिती आहे, देशमुख हॉस्पिटलमध्ये होते

    त्यांना १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला आणि १५ दिवसांचा होमक्वारंटाईन सांगितलं

  • 22 Mar 2021 12:57 PM (IST)

    ५ ते १५ फेब्रुवारी अनील देशमुख हे कोरोनामुळे भरती होते – शरद पवार

    शरद पवार –

    अनिल देशमुख यांच्याबाबत तुम्ही काल मला प्रश्न विचारले मी तुम्हाला आज बोलतो असे सांगितले होते

    आयुक्तांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सुचना देण्यात आल्याचे सांगितले

    माझ्याकडे कागदपत्र आहेत ५ ते १५ फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे भरती होते

  • 22 Mar 2021 11:58 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरु होणार, महापौरांची घोषणा

    पुण्याचे महापैर मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद 

    • गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे
    • त्यामुळं शहरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न सुरु
    • शहरातील विविध भागात 550 कोविड केअर बेड उपलब्ध
    • खासगी रुग्णालयात ही बेड उपलब्ध करुन देण्याच्या सूचना
    • जम्बो कोविड सेंटर सुरु करतोय
    • पुढच्या आठ ते दहा दिवसांत 550 बेड उपलब्ध होतील
    • आज 55 बेड उपलब्ध होतील
  • 22 Mar 2021 11:49 AM (IST)

    मनसुख हिरेन यांच्या हत्या आणि कटात 11 जण सहभागी होते, सूत्रांची माहिती

    मनसुख हिरेन यांच्या हत्या आणि कटात 11 जण सहभागी होते

    प्रत्यक्ष हत्येच्या ठिकाणी 4 ते 5 जण उपस्थित होते, त्यानंतर मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, याठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता

    हत्येच्या दिवशी 4 मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सऍप कॉलवर बोलत होते

    हे नंबर अनोळखी होते, हेच सिमकार्ड बुकी नरेश गोर याने उपलब्ध करून दिले असण्याची शक्यता आहे

    या सर्व कटाचे सूत्रधार सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावे एटीएसला मिळाले आहेत

  • 22 Mar 2021 11:45 AM (IST)

    एटीएस चिफ जयजित सिंह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीला

    – एटीएस चिफ जयजित सिंह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीला

    – मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे वर्ग होणार आहे

    – त्या पार्श्वभूमिवर एटीएसची महत्वाची बैठक पार पडणार

    – पण त्या आधी एटीएस प्रमुख हे गृहमंत्र्यांच्या भेटीला

    – त्यामुळे या भेटीला अदिकचं महत्व प्राप्त झालंय

  • 22 Mar 2021 11:44 AM (IST)

    नांदगावात महिला सावकाराची दादागिरी, व्याजाचे पैसे परत केले नाही म्हणून आदिवासी दाम्पत्याला जबर मारहाण

    नांदगाव :

    महिला सावकाराची दादागिरी

    व्याजाने घेतलेले पैसे वेळेवर परत केले नाही म्हणून आदिवासी दाम्पत्याला केली जबर मारहाण

    नांदगावच्या पिंप्राळे येथील धक्कादायक घटना

    मारहाणीचा व्हिडीओ झाला व्हायरल

    पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची घेतली दखल

  • 22 Mar 2021 11:42 AM (IST)

    शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांना धक्का, पटेल फाउंडेशनचे शाहेद पटेल राष्ट्रवादीत दाखल

    बीड : शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांना धक्का

    पटेल फाउंडेशनचे शाहेद पटेल राष्ट्रवादीत दाखल

    101 प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

    आ. संदीप क्षीरसागर यांचे पारडे जड

    नगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काका पुतण्यात रस्सीखेच सुरू

  • 22 Mar 2021 11:40 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी

    औरंगाबाद –

    जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेने मारली बाजी

    शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विजय

    अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे दोन्ही मंत्री जिल्हा बँकेवर विजयी

    शिवसेनेच्या पॅनलला काँग्रेसनेच केला होता टोकाचा विरोध

    चुरशीच्या लढाईत अखेर शिवसेनेचा विजय

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शिवसेनेचे वर्चस्व

  • 22 Mar 2021 11:40 AM (IST)

    राज्यात राष्ट्रपती शासन लावा, रामदास आठवले अमित शाहांसमोर मागणी करणार

    महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी मी आज अमित शाह यांच्याकडे करणार आहे. माझ्या मागणीचे पत्र मी देणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे – रामदास आठवले

  • 22 Mar 2021 10:58 AM (IST)

    सचिन वाजेंच्या अफाट संपत्तीबद्दल ईडी लवकरच चौकशी करु शकते

    सचिन वाजे यांच्या अफाट संपत्तीबद्दल ईडी लवकरच चौकशी सुरू करू शकते

    सचिन वाजे यांच्या कंपन्यांच्या खात्यात झालेल्या व्यवहारांवर ईडीची नजर आहे

    सचिन वाजे एपीआयच पदभार सांभाळताना लक्झरी वाहने कशी घेतला आहेत, नोट मोजणीचे यंत्र आणि मालमत्तेचा तपशील शोधला जात आहे

    एनआयए लवकरच सचिन वाजे यांच्या बेहिशेबी मालमत्ता तपासणीची माहिती ईडीकडे देऊ शकते

  • 22 Mar 2021 10:41 AM (IST)

    डोंबिवलीच्या कोपर पुलाचे 8 गर्डर दाखल

    डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणार अति महत्वाच्या असलेल्या कोपरपुलाचे काम गेल्यावर्षापासून रखडलेले आहे. मात्र आता पुलाच्या कामाला वेगाने सुरवात झाली असून आता कोपर पुलाचे 8 गर्डर दाखल झाले आहेत काही गार्डरचे लोंचिंग आज करण्यात येणार आहेत. राजाजी पथ येथे सुरु असलेल्या कोपर ब्रिजच्या दुरुस्तीचे कामाचे ठिकाणी रेल्वे ट्रॅक पासुन ते डोंबिवली पुर्वेकडील राजाजी पथ पर्यत असे तीन टप्प्यात गर्डर चढविण्यात येणार आहेत

  • 22 Mar 2021 08:42 AM (IST)

    नागपूर जिल्ह्याच्या जुनी कामठी येथील हरदास नगर येथे हत्या

    नागपूर –

    नागपूर जिल्ह्याच्या जुनी कामठी येथील हरदास नगर येथे हत्या,

    27 वर्षीय विवेक हमने असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव,

    हत्तेचं कारण अद्याप अस्पष्ट,

    पोलिसांचा तपास सुरू

  • 22 Mar 2021 08:38 AM (IST)

    नागपुरात गृहमंत्र्यांविरोधात आंदोलन करणारे भाजप नेते, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

    नागपूर –

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आंदोलन करणारे भाजप नेते व कार्यकर्त्यां विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला

    तर देशमुख यांच्या घरा समोर आंदोलन करणाऱ्या युवा मोर्च्या च्या कार्यकर्त्यां वर सुद्धा गुन्हा दाखल

    नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    तर परमबीर सिंग आणि भाजप विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्या आणि नेत्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल

    नागपुरात काल आंदोलनाचा दिवस होता मात्र साथ रोग नियंत्रण कायद्या च्या अनुषंगाने हे गुन्हे दाखल करण्यात आले

  • 22 Mar 2021 08:35 AM (IST)

    राज्यातल्या परीस्थितीची काँग्रेस हायकमांडकडून दखल, काँग्रेस हायकमांडनं अहवाल मागवला

    राज्यातल्या परीस्थितीची काँग्रेस हायकमांडकडून दखल

    सध्याच्या परीस्थितीचा काँग्रेस हायकमांडनं अहवाल मागवला

    प्रभारी एच के पाटील यांची यांनी व्हीसीनं बैठक

    नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर केली चर्चा

    काल रात्री उशीरा व्हीसीनं झाली बैठक

  • 22 Mar 2021 08:34 AM (IST)

    नाशिकच्या मुक्तीधामच्या तिन्ही इमारतींमध्ये कोव्हिड रुगणांची व्यवस्था

    नाशिक –

    मुक्तीधामच्या तिन्ही इमारतींमध्ये कोव्हिड रुगणांची व्यवस्था

    कोरोना संकट वाढल्याने महापालिका आयुक्तांचे आदेश

    नाशिकरोड मधिल कोव्हिडं सेंटर फुल्ल झाल्याने इतर जागांकबी पाहणी सुरू

    शहरातील इतरही भक्त निवासांची पाहणी सुरू

  • 22 Mar 2021 08:33 AM (IST)

    नाशकात औद्योगिक वसाहतींमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

    नाशिक –

    औद्योगिक वसाहतींमध्ये चोरी करणारी टोळी जेरबंद

    गेल्या अनेक दिसांपासून अल्युमिनियम आणि कॉपर ची करत होते चोरी

    सापळा रचून सातपूर पोलिसांनी घेतलं चोरांना ताब्यात

    या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

  • 22 Mar 2021 08:33 AM (IST)

    नाशकात विनामास्क फिरणाऱ्या 513 नागरिकांना पोलिसांनी ठोठावला दंड

    नाशिक –

    विनामास्क फिरणाऱ्या 513 नागरिकांना पोलिसांनी ठोठावला दंड

    सुमारे 1 लाख रुपये दंडापोटी केले वसूल

    विनामास्क नागरिकांची केली जाते आहे तपासणी

    तपासणीत 4 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

    कोरोना संकट वाढत असताना अनेक नागरिक मात्र बेजवाबदार

  • 22 Mar 2021 07:38 AM (IST)

    गजा मारणे मिरवणूक प्रकरण, आतापर्यंत 100 जणांना अटक

    पुणे

    तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 100 जणांना पोलिसांनी आतापर्यंत केलं गजाआड

    या मिरवणुकीसाठी वापरलेल्या 27 आलिशान गाड्या आणि 64 मोबाइलही केले जप्त

  • 22 Mar 2021 07:32 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील शिराळाच्या सरपंचपदी 23 वर्षांची सरपंच

    राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या, आता गावागावात सरपंच निवडीला सुरुवात झाली आहे, गावचा सरपंच म्हणजे चांगला अनुभवी व्यक्ती, राजकारणात मुरलेला असावा, त्याचं वय त्याची प्रतिष्ठा हे सर्व बघितल्या जात असते, तरी अमरावती जिल्ह्यातील शिराळा या १८ हजार लोकवस्तीच्या गावाचा गाढा २३ वर्षाची उच्च शिक्षित असलेली अंकिता मिलींद तायडे ही तरुणी हाकणार आहे, नुकतीच तिची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे

  • 22 Mar 2021 07:31 AM (IST)

    पुण्यात श्वानप्रेमी महिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

    पुणे –

    शहरातील टेकड्यांवर फिरायला गेल्यानंतर बरोबर श्वानांना नेण्याच्या बंदी विरोधात पाषाण भागातील दोन श्वानप्रेमी महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

    टेकडीवर जाताना नागरिकांनी बरोबर त्यांच्या श्वानांना घेऊन येऊ नये, असा वनविभागाचा आदेश

    या आदेशाविरोधात पल्लवी कुलकर्णी आणि शर्मिला कर्वे यांनी अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत दाखल केली ही याचिका

    मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठात याचिका दाखल

  • 22 Mar 2021 07:04 AM (IST)

    वाशिममध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गहू, हरबरा, पपई, केळी कांदाबीज उन्हाळी पिकासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान

    वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने गहू, हरबरा, पपई, केळी कांदाबीज उन्हाळी पिकासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान, जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील 6 हजार 697 शेतकऱ्यांचं 4 हजार 880 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल, येत्या काही दिवसांत संपूर्ण पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी दिली

  • 22 Mar 2021 06:49 AM (IST)

    जळगावात अवैध धंद्याच्या अड्ड्यावर धाड, 51 जण ताब्यात, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

    जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा परिसरातील अवैध धंद्याच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक आर्चित चांडक आणि पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 51 जणांना ताब्यात घेतले असून 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

  • 22 Mar 2021 06:45 AM (IST)

    अमरावतीत जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह रात्रीपासून पावसाला सुरुवात

    अमरावती –

    जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह रात्रीपासून पावसाला सुरुवात

    शेतकऱ्यांच्या गहू पिकाला बसला फटका, शेतकरी चिंतेत

  • 22 Mar 2021 06:43 AM (IST)

    सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न – सामना अग्रलेख

    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जो आरोपांचा धुराळा उडवला, त्यामुळे गृहखात्याची प्रतिमा नक्कीच मलिन झाली, हा सरकारच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे आणि विरोधी पक्षाच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. परमबीर सिंग यांच्या निलंबणाची मागणी कालपर्यंत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता, आज परमबीर विरोधकांची डार्लिंग झाले आहेत आणि परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरकारवर निशाणा साधीत, महाविकास आघाडी सरकारजवळ चांगले बहुमत आहे, बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे, एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत आणि कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरु नये – सामना अग्रलेख

  • 22 Mar 2021 06:40 AM (IST)

    प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपालांची भेट

    वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे उद्या दिनांक 22 मार्च रोजी दुपारी सव्वा बारा वाजता राज्यपालांची भेट घेणार, या भेटीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी ते करणार आहेत

Published On - Mar 22,2021 9:23 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.