LIVE | शरद पवार यांवरील शस्त्रक्रिया पूर्ण, सध्या प्रकृती स्थिर
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
पनवेल महापालीकेत आज 259 नवे कोरोना रुग्ण, आतापर्यंत 1761 जणांचा मृत्यू
पनवेल महापालीकेत आज 259 नवे कोरोना रुग्ण
आज दिवसभरात 341 जण कोरोनामुक्त
महापालिका हद्दीत आतापर्यंत 1761 जणांचा मृत्यू
कोरोनाबधित एकूण रुग्णांची सख्या 72018
-
शरद पवार यांवरील शस्त्रक्रिया पूर्ण, सध्या प्रकृती स्थिर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. ब्रीच कँण्डी रुग्णाालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
-
-
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्या भूमिपूजन, मोजक्या मान्यवरांची उपस्थिती
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते 31 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
-
कोल्हापुरात संभाजीनगर बस स्थानकाच्या रेकॉर्ड रूमला आग, वीस जवानांकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर : संभाजीनगर बस स्थानकाच्या रेकॉर्ड रूमला आग
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी
रेकॉर्ड रूममध्ये कागद असल्याने आगीचा मोठा भडका
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वीस जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न
-
ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर बॉलिवूड लिंक उघड़, अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात
मुंबई : ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर बॉलिवूड लिंक उघड़
बॉलिवूड अभिनेता एजाज खानला एनसीबी अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यात
जयपूरवरुन परतणाऱ्या एजाज खानला विमानतळावरुन ताब्यात घेतलं
एजाजला सोबत घेऊन एनसीबीकडून अनेक ठिकाणी छापेमारी
लवकरच एजाज़ ख़ानला एनसीबी कार्यालयात आणण्याची शक्यता
-
-
शरद पवार चाचण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात, सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजच ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचा ताफा आहे. ते आज फक्त चाचणीसाठी आले आहेत. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे ते कदाचित आजसुद्धा रुग्णालयात भरती होऊ शकतात. शरद पवार यांच्यावर उद्या शस्त्रक्रि्या होणार. पित्ताशयाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार आहे.
-
3 तारखेलासुद्धा कॉंग्रेसची महत्वाची बैठक, मुंबई पालिका निवडणुकीवर चर्चा होणार
3 तारखेलासुद्धा कॉंग्रेसची महत्वाची बैठक होणार
3 एप्रिलला होणाऱ्या बैठकीत मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबतची रणनीती ठरणार
या बेठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई अध्यक्ष भाई जगताप, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहतील
-
2 तारखेला महाराष्ट्र काँग्रेसची महत्त्वाची बैठक, कामाचा आढावा घेतला जाणार
मुंबई : 2 तारखेला काँग्रेसची बैठक
पालकमंत्री, जिल्हाध्यक्षांशी आढावा बैठक
प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत बैठक
पक्ष संघटनेच्या कामाचा आढावा घेतला जाणार
-
कृषी कायद्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक, छगन भुजबळ, दादा भुसे उपस्थित
मुंबई : कृषी कायद्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात बैठक
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, बाळासाहेब पाटील दाखल
-
मुक्ताईनगर वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा क्षेत्रात आग, कारण अस्पष्ट
जळगाव : मुक्ताईनगर वडोदा वनक्षेत्रातील डोलारखेडा क्षेत्रात वनवा पेटल्यामुळे मोठ्या प्रमाणात वन विभागातील वृक्ष जळून खाक झाले आहेत. मात्र वनक्षेत्रात आग लागल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच आग विझवण्यासाठी घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थ धावून गेले. ही आग ब्लोवर मशीन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात आली. वाढत्या उष्णतेमुळे वनवा पेटला असल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे
-
दिपाली चव्हाण आत्महत्येतील दोषींवर कारवाई करा, गॅझेटेड फाॅरेस्ट ऑफिसर असोसिएशन आक्रमक
आरोपींना शासन करा या मागणीसाठी महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड फाॅरेस्ट ऑफिसर असोसिएशन नागपूर तर्फे 15 ते 20 जणांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल
दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखेल चौकशी करण्याची शिष्टमंडळाची मागणी
– उपवनसंरक्षकविनोद शिवकुमार आणि अपर प्रधान एस एम रेड्डी यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी
कारवाई न झाल्यास 2 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा
– कांचन पवार आणि प्रियंका गंगावणे यांचं शिष्ठमंडळ आक्रमक
-
एकनाथ खडसेंना ईडीची तारीख आली कोरोना होतो – गिरीश महाजन
जळगाव –
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची तारीख आली कोरोना होतो, असा सणसणीत टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे
-
मिठी नदीत सापडलेला प्रिंटर निलंबित कॉन्स्टेबल आणि अटक आरोपीचा – सूत्र
सचिन वाझे प्रकरण –
एनआयएच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की मिठी नदीत सापडलेला प्रिंटर विनायक शिंदे निलंबित कॉन्स्टेबल आणि अटक आरोपीचा
सापडलेल्या डीव्हीआर पैकी एक डीव्हीआर सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीचा आहे.
वाझे यांनी स्वत: NIA यांच्या चौकशीत हे सांगितले
मिठी नदितून मिळालेल्या वस्तु त्याला दाखवण्यात आल्या
आता एनआयएला संशय आहे की मुकेश अंबानी यांना धमकी देणारा पत्र या प्रिंटरने लिहिले गेले असेल.
ज्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जाईल
एनआयएच्या तपासात दुसरा जो प्रिंटर मिळाला आहे , एनआयएच्या म्हणणे प्रमाणे शक्यतो तपासणीची दिशाभूल करण्यासाठी दूसरा प्रिंटर आणून ठेवला असावा
जेणेकरून फॉरेन्सिक तपासणीत दिशाभूल केली जाउ शकेल
-
रत्नागिरी एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचा मुख्य सर्व्हर हॅक
रत्नागिरी- एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाचा मुख्य सर्व्हर हॅक
सर्व्हर हॅक झाल्याने राज्यातील एमआयडीसीच्या कार्यालयातील कामकाज ठप्प
२२ मार्चपासून कार्यालयातील आँन लाईन काम ठप्प
एमआयडीसी कार्यालयांना संगणक सुरु न करण्याचे आदेश
एमआयडीसी कार्यालयातील लहान मोठ्या उद्योजकांची माहिती, व्यवहार आणि शासकीय योजनांची माहिती कार्यालयीन संगणकात
रत्नागिरीसह राज्यातील १६ प्रादेशिक कार्यालयातील कामकाज ठप्प
-
एखाद्या कामासाठी किती चिकाटी असावी हे भारत भालके यांच्याकडून पाहायला मिळालं – जयंत पाटील
पंढरपूर
जयंत पाटील –
एखाद्या कामासाठी किती चिकाटी असावी हे भारत भालके यांच्याकडून पाहायला मिळालं
आमचं अस झालं, गड आला पण सिंह गेला
कारखान्यांचे प्रश्न मार्गी लागले पण नाना राहिले नाही
35 गावांच्या पिण्याचा पाण्यासाठी त्यांनी खूप आग्रह धरला
प्रसंगी आमच्या समोर अधिकाऱ्यांना दमदाटी केली
-
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीची रणधुमाळी
पंढरपूर
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीची रणधुमाळी
महाविकास आघाडी कडून भागिरथ भालके यांना उमेदवारी
महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा तनपुरे मठात मेळावा
मेळाव्यात राष्ट्रवादीचे जयंत पाटील करताहेत मेळाव्याला संबोधित
-
मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीला टेकू, कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात
-मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीला टेकू
-कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात
-अभियंताच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर
– शेकडो कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार
-प्रश्न मार्गी लागत नसल्याने खंत
-भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता
-सुरक्षित आणि सुस्थितीत असलेल्या इमारतीत कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी
-
गोकुळ दूध संघ निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
कोल्हापूर –
गोकुळ दूध संघ निवडणुकीत सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
नेत्यांनीच केले शासनाच्या नियमांचे उल्लंघन
मास्क न वापरता उमेदवार व कार्यकर्त्यांनी केला करवीर उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रवेश
निवडणूक अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमांची पायमल्ली
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शासकीय कर्मचारी व नेत्यांनीच फासला हरताळ
-
आगे आगे देखो होता है क्या…शरद पवार – अमित शहा भेटीवर शिंदेचे सूचक वक्तव्य
राम शिंदे –
– आगे आगे देखो होता है क्या…शरद पवार – अमित शहा भेटीवर शिंदेचे सूचक वक्तव्य,
– पंढरपूर पोटनिवडणुकीत सरकारची लिटमस टेस्ट आहे,
– भाजप ही निवडणूक जिकणार,
– जनतेला थ्रेट देण्याचा प्रयन्त म्हणजे लॉकडाऊन लावणे, सरकार त्याचा प्रयन्त करतेय
-
परमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेवर उद्या सुनावणी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या जनहित याचिकेवर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सिंग यांच्या जनहित याचिकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
-
टीडीएस बँकेची निवडणूक, कल्याणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकाची निवडणूक आहे. कल्याणमधील के. सी .गांधी शाळेत निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. या ठिकाणी उमेदवाराच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. काही लोकं विना मास्क दिसत होते. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शाळेच्या आवरातून बाहेर काढले.
-
पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार,
पंढरपूर – पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून समाधान आवताडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार,
आवताडेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील, राम शिंदे , सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार,
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपकडून सभेचे नियोजन
-
रस्त्यात केक कापून बर्थडे सेलिब्रेशन, बर्थडे बाॅयसह 15 जणांवर गुन्हा
सातारा : वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बाॅयसह 15 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा,
कोरोना आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करुन रस्त्यात केक कापल्याप्रकरणी युवकांवर गुन्हा,
घटना स्थळावरुन पोलिसांनी युवकांच्या दुचाकी घेतल्या ताब्यात…
-
इस्लामपूरमध्ये सव्वा सहा लाखाची वीज चोरी, पेपर मिल मालकावर गुन्हा
सांगली –
इस्लामपूरमध्ये सव्वा सहा लाखाची वीज चोरी
पेपर मिलच्या मालकावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मीटर मध्ये फेरफार करून केली वीज चोरी
इस्लामपूर midc मधील जिजामाता पेपर मिल असे मिल चे नाव असून
श्रीकांत पाटील असे मिल मालकाचे नाव आहे
-
सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्ज व्याजमाफीला मुकणार
सांगली –
जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्ज व्याजमाफीला मुकणार
जिल्ह्यातील साखर कारखाने नी एकरकमी एफआरपी रक्कम न दिल्याचा फटका बसणार
हजारो शेतकरी अडचणीत शेतकरीच्यात तीव्र नाराजी
नियमाप्रमाणे कारखाने नी14 दिवसाच्या आत एफआरपी भरणे बंधनकारक मात्र
जिल्ह्यातील 2ते 3 कारखाने वगळता सर्वच कारखान्यानी एफ आरपी ची पाडले तुकडे
-
विदर्भात पारा वाढला, विदर्भातील शहरांचे कमाल तापमान चाळीशी पार
नागपूर –
विदर्भात पारा वाढला, विदर्भातील शहरांचे कमाल तापमान चाळीशी पार
नागपूरचा पारा 40.5 अंशावर
सर्वाधिक तापमानाची ब्रम्हपुरी मध्ये 43.3 नोंद,
उन्ह आणि उकाड्यानं नागरिक हैराण,
तापमान आणखी वाढण्याची शक्यता
-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डीएन जाधव यांचा निधन
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डीएन जाधव यांचा निधन
नेरुलच्या एका खाजगी रुग्णालयात झाला हार्ट अटैक ने काल रात्रि मृत्यु
74 वर्षे त्याच होता वय
आज सातारा च्या पुशेगाव मध्ये त्यांच अंत्यसस्कार
-
नागपुरात 2016 साली झालेल्या मनीष श्रीवास हत्या प्रकरणात पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात
नागपूर –
नागपुरात 2016 साली झालेल्या मनीष श्रीवास हत्या प्रकरणात पोलिसांनी जोरदार कारवाईला सुरुवात
या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी रणजित सफेलकर याच्या कडील वाहनांची केली जप्ती
3 वाहन केली जप्त एक स्कार्पिओ , एक fortuner एक हुंडाई आणि एक अक्टिव्ह गाडी सह 2 तलवारी केल्या जप्त
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केला या हत्या प्रकरणाचा उलगडा
तपासला आला आता वेग
-
नागपुरात धारदार शस्त्राने एकाची हत्या, तीन ते चार जणांनांकडून हत्या
नागपूर –
नागपुरात धुळवळ शांततेत सुरू असताना रात्री त्याला लागलं गालबोट
मोक्षधाम परिसरात एकाची हत्या
धारदार शस्त्राने केली हत्या, तीन ते चार जणांनी मिळून केली हत्या
लखन गायकवाड अस मृतकांचे नाव असून तो त्याच परिसरातील राहिवासी आहे
हत्येचं कारण पोलीस शोधत आहे
-
औरंगाबादेत जेवण दिलं नाही म्हणून तरुणांची हॉटेलमध्ये तोडफोड
औरंगाबाद –
जेवण दिलं नाही म्हणून तरुणांची हॉटेलमध्ये तोडफोड
औरंगाबाद शहरातील बीड बायपास वरील घटना
हॉटेलमधील टेबल खुर्च्यांसाह कम्प्युटरचीही केली तोडफोड
बीड बायपास वरील मैथिली हॉटेलमध्ये झाली तोडफोड
मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा हॉटेल व्यवस्थापनाचा दावा
बाळापूर गावातील तरुणांनी तोडफोड केल्याची हॉटेल चालकांची तक्रार
-
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्य़ामध्ये ग्राहकांकडे वीजबिलाची तब्बल 687 कोटी रुपयांची थकबाकी
पुणे :
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्य़ामध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे वीजबिलाची तब्बल ६८७ कोटी रुपयांची थकबाकी
त्यामुळे थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई तीव्र करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांत ६५ हजारांहून अधिक थकबाकीदारांची वीज तोडण्यात आली
-
औरंगाबादेत तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाला पोलिसांची बेदम मारहाण
औरंगाबाद –
पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या जखमी तरुणाला पोलिसांची बेदम मारहाण
औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
डोकं फुटलेल्या अवस्थेत तरुण तक्रार देण्यासाठी गेला होता पोलीस ठाण्यात
सुनील मगर असं जखमी पीडित तरुणाचं नाव
दीपक जाधव या पोलीस कॉन्स्टेबलने केली बेदम मारहाण
जखमी तरुणाच्या कुटुंबालाही मारहाण केल्याचा कुटुंबाचा दावा
जखमी तरुण सुनील मगर आणि सोनू घुरी या आरोपींमध्ये झाला होता वाद
आरोपी आणि पोलिसांची मिलीभगत असल्यामुळे मारहाण झाल्याचा पीडित तरुणाचा दावा
मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
-
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या 35 हजार 493 जागा रिक्त
पुणे –
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या 35 हजार 493 जागा रिक्त
प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अनेकदा संधी देण्यात आली.
मात्र, तरीही प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यात
पुणे विभागात अकरावी प्रवेशासाठी 304 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी
त्यात 1 लाख 7 हजार 215 एवढ्या प्रवेशाच्या जागा
प्रवेशासाठी 1 लाख 3 हजार 204 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी
87 हजार 532 अर्ज भरल्यानंतर लॉक केले गेले
87 हजार 414 अर्जांची पडताळणी पूर्ण
71 हजार 722 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
-
भिवंडीत वस्तीगृहालाआग, 74 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश
भिवंडी तालुक्यात सोनारी ग्रामपंचायत हद्दीत दिन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना वस्तीगृहाला अचानक लागली आग
अडकलेल्या तब्बल 74 विद्यार्थी- विद्यार्थिनींना बाहेर काढण्यात यश
सुदैवाने जीवित हानी टळली
-
एमआयडीसीचं सर्व्हर हॅक, हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी
एमआयडीसीचं सर्व्हर हॅक झाल्याची धक्कादायक माहिती समोर, हॅकर्सकडून पाचशे कोटींची मागणी
Midc च्या अधिकृत मेल आयडीवर 500 कोटींच्या मागणीचा मेल आल्याची विश्वसनिय सूत्रांची माहिती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा ( एमआयडीसी ) सर्व्हर हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
महाराष्ट्र पोलीस अकादमी उपनिरीक्षक दीक्षांत सोहळा
नाशिक –
– महाराष्ट्र पोलीस अकादमी उपनिरीक्षक दीक्षांत सोहळा – आज सकाळी 8 वाजता ऑनलाइन पार पडणार सोहळा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ऑनलाईन सोहळ्याला राहणार उपस्थित – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडणार दीक्षांत सोहळा
Published On - Mar 31,2021 12:28 AM