Maharashtra News LIVE Update | मी उद्या नाशिकच्या बससेवेचा तिकीट काढून आनंद घेणार : पंकजा मुंडे

| Updated on: Nov 01, 2021 | 10:48 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | मी उद्या नाशिकच्या बससेवेचा तिकीट काढून आनंद घेणार : पंकजा मुंडे
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Nov 2021 08:57 PM (IST)

    मी उद्या नाशिकच्या बससेवेचा तिकीट काढून आनंद घेणार : पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे :

    – तुमच्या डोळ्याला दिसणारा विकास केला आहे – धार्मिक म्हणजे अंधश्रद्धाळू नको – मी उद्या नाशिकच्या बससेवेचा आनंद घेणार – मी आमदार नाही त्यामुळे तिकीट काढून आनंद घेणार – कारण नाशिकच्या बससेवेच कौतुक झालंय

    – राजासारखं मन ठेऊन ज्याचं मन असतं त्याला राजकारण म्हणतात – प्रत्येकवेळी खुर्चीवरच बसायचं आहे याला राजकारण म्हणत नाही – मी मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघून म्हणते मी राजकारणात का आले

    – ज्यांना कशाचा अधिकार नव्हता अशा लोकांचा आवाज बनायचं – असं मला मुंडे साहेब सांगायचे – नुसतं भाषण करून काही होत नाही – जिथे विकास कमी तिथं राजकारण आणि राजकारणच – नाशिकमध्ये अनेक चांगली विकास कामं – महिला आमदारांचा अधिक जोर – माझं आणि तुमचं नातं आहे, मी माहेरीच येते – आता कळलं का राजकारणात मला साहेबांनी का आणलं?

    – प्रधानमंत्री इतके जोरदार आहेत की आता कोणी हलवूच शकत नाही – आतापर्यंत असं वाटत होतं प्रधानमंत्र्यांच्या घरातच प्रधानमंत्री होतो – मात्र गरीब कुटुंबातील प्रधानमंत्री झाले

  • 01 Nov 2021 08:46 PM (IST)

    दिवाळीच्या पूर्वसंध्येला वसई ताल्युक्यातील आदिवासी बांधवांना सरकारकडून मोठं गिफ्ट

    वसई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला वसई ताल्युक्यातील आदिवासी बांधवांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. वसईचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी स्वप्नील तांगडे यांनी 306 हेक्टर वनहक्क जमिनी त्यांच्या नावावर झाल्याचे घोषित करून, 50 आधीवाशी बांधवांना प्रमाणपत्र वाटप केले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हे गिफ्ट आधिवासी बांधवाना मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचा वातावरण आहे.

  • 01 Nov 2021 08:44 PM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची गेल्या आठ तासांपासून कसून चौकशी

    माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची गेल्या आठ तासांपासून चौकशी सुरु आहे. देशमुखांच्या चौकशीसाठी ईडीचे दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. याबाबतची संपूर्ण चौकशी केल्यानंतर ईडी अधिकारी पुढच्या कारवाईबाबत निर्णय घेतील

  • 01 Nov 2021 08:36 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही, 44 नवे रुग्ण

    पुणे : दिवसभरात ४४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ८९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. -११७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०४३३०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ६८६. – एकूण मृत्यू -९०७४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९४५७०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४०९८

  • 01 Nov 2021 08:34 PM (IST)

    दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा, कर्मचाऱ्यांनो कामावर रुजू व्हा, मंत्री अनिल परबांचं आवाहन

    एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीणी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर तातडीने रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण दिवाळीनंतर चर्चा करणार असल्याचेही ॲड.परब यांनी स्पष्ट केले.

  • 01 Nov 2021 07:33 PM (IST)

    नवाब मलिक म्हणजे बिघडा नवाब : अमृता फडणवीस

    अमृता फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    मी एक समाजसेविका, सामाजिक कार्यकर्ती आहे. मी राजकारणी व्यक्ती नाही मुंबई रिव्हर अँथम संस्थेने मला संपर्क केला होता नदींचं प्रदूषणाच्या पार्श्वभूमीनर मी रिव्हर मार्च या चळवळीत सहभागी झाली नद्यांची अवस्था पाहून मी स्वत: रडली 26 जुलै 2005 ला मुंबईत महापूर आला होता. त्यामुळे मोठं नुकसान झालं होतं मी नद्यांच्या संवर्धनासाठी गाणं गायलं नवाब मलिक म्हणजे बिघडा नवाब

    माझ्या अंगावर कुणी आलं तर सोडणार नाही

    अमृता नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर 

    मी एक राजकारणी नाही. मी समाजसेविका आहे. आम्ही मुंबईला आलो. तेव्हा अनेक एनजीओनी माझ्याशी संपर्क साधला. मी स्वत: एनजीओशी कनेक्टेड आहे. मुंबई रिव्हर मार्चनेही माझ्याशीही संपर्क साधला. मुंबईत चार नद्या आहेत. त्यांना आपण नाले म्हणतो. त्या नद्यांच्या बाबतीत मला माहिती दिली. मिठी, दहीसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्या आहेत. मी त्या नद्यांची पाहणी केली. धोबीघाटचा तबेलाही पाहिला. तिथेही घाण होती. नर्क झाला होता. मला ते पाहून रडू कोसळले. मी अप्पा पाड्याला भेट दिली. तिथली घाण पाहिली. कचरा कसा होतो हे मी विचारलं.

    नद्यात प्लास्टिक, मृत जनावरे, त्यांचं मलमूत्रं वगैरे आहेत. ते पाहून माझं मन हललं. म्हणून मी त्या रिव्हर मार्च प्रोग्रामशी जोडले गेले. सरकारला काही पॉलिसी द्यायची असेल तर माझ्या माध्यमातून देऊ शकता हे मी त्यांना सांगितलं.

    २००५ मध्ये पूर आला होता. लोकांचं जीवन अस्तव्यस्त झालं होतं. नंतर चितळे समिती आली. त्यात या नद्यांचा उल्लेख नद्या असा केला. त्याला नाला म्हणू नका सांगितलं होतं. नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यास सांगितलं. आम्ही आंदोलने केली. आम्ही तात्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मागे लागलो. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागले. बायको म्हणून नाही तर कार्यकर्ती म्हणून आम्ही मागे लागलो. त्यानंतर टेंडर निघाले.

  • 01 Nov 2021 06:16 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील शासकीय वाहनाने घेतला पेट

    अहमदनगर :

    जिल्हा रुग्णालयातील शासकीय वाहनाने घेतला पेट

    निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या इंडिगो वाहनाने घेतला पेट

    गाडी पार्किंगला उभी असतांना अचानक घेतला पेट

    या आगीत गाडीचे मोठे नुकसान, गाडीचा पुढच्या भागातील लागलेल्या आगीत मशीन जाळून खाक

  • 01 Nov 2021 05:50 PM (IST)

    कणकवलीत काही भागात अवकाळी पावसाचे आगमन

    सिंधुदुर्ग : कणकवलीत काही भागात अवकाळी पावसाचे आगमन. अचानक आलेल्या दमदार पावसाने उडवली दाणादाण. शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. शेतकऱ्यांचे नुकसान. हवामान विभागाने 5 तारखेपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची वर्तवली आहे शक्यता.

  • 01 Nov 2021 05:49 PM (IST)

    डोंबिवलीत मनसेकडून साजरी होणार दिवाळी पहाट

    डोंबिवलीत मनसेकडून साजरी होणार दिवाळी पहाट

    4 नोव्हेंबरच्या रोजी साजरी होणार दिवाळी पहाट

    डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात साजरा होणार कार्यक्रम

    डोंबिवलीत मनसेचे नाव मोठं आहे, ते बोचतय म्हणून आम्हाला परवानगी दिली जात नाही

    मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

  • 01 Nov 2021 05:09 PM (IST)

    गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे राहुल गांधीना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी ठराव मंजूर

    गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे राहुल गांधीना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी गडचिरोलीत काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला जाहीर ठराव. राज्याचे आपत्ती मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रदेश काँग्रेसतर्फे जाहीर ठराव मांडला. या ठरावाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमोदन केले. गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आलेला हा ठराव दिल्लीला पक्षाकडै पाठवण्यात येणार आहे.

  • 01 Nov 2021 04:27 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकार तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आहे : सुप्रिया सुळे

    सुप्रिया सुळे यांच्या भाषणातील मुद्दे :

    – महाविकास आघाडी सरकार तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आहे,

    – आर्यन खानला जितके दिवस जेलमध्ये होता त्यादिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत ते बघा

    – त्या दरवाढीकडे लक्ष जाऊ म्हणून आर्यन खानच्या बातम्या सुरू होत्या,

    – सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलंय

    – संसदेत मी गॅसचे दर कमी करा यासंदर्भात मागणी करणार,

    – महापालिकेतील भाजपने 58 कोटी रुपये सिग्नल रिपीयर करण्यासाठी खर्च केलेत

  • 01 Nov 2021 04:22 PM (IST)

    पाटणा गांधी मैदान स्फोट प्रकरण, 4 आरोपींना फाशीची शिक्षा, दोघांना जन्मठेप

    पाटणा गांधी मैदान ब्लास्ट प्रकरण ४ आरोपींना फांसी २ आरोपींना जन्मपठेप २ आरोपींना १० वर्षाचा कारावास १ आरोपीला ७ वर्षाचा कारावास NIA स्पेशल कोर्टाकडून शिकशा २०१३ मध्ये झाला होता ब्लास्ट नरेंद्र मोदींच्या रैली सभेदरम्यान ब्लास्ट झाला होता

  • 01 Nov 2021 04:02 PM (IST)

    पंकजा मुंडेंच्या उपस्थिती भुजबळांचा ओबीसी पर्वचा नारा

    छगन भुजबळ यांच्या भाषणातील मुद्दे :

    – गोपीनाथ मुंडे केंद्रात असते तर obc बाबत अडचणी झाल्याचं नसत्या

    – गोपीनाथ मुंडे असते तर आम्हालाही काही अडचण झाली नसती

    – obc जनगणना, obc आरक्षणावर घटना दुरुस्ती होत नाही तों पर्यंत ‘आपण सर्व obc पर्व’ असा नारा

    – पंकजा मुंडेंच्या उपस्थिती भुजबळांचा ओबीसी पर्वचा नारा

    – पंकजा मुंडे आणि भुजबळांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण

  • 01 Nov 2021 03:37 PM (IST)

    जळगावात शेतकरी आक्रोश मोर्चात गिरीश महाजनांच्या हातात ट्रॅक्टरची स्टेअरिंग

    जळगाव :

    शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपने काढलेल्या आक्रोश मोर्चात भाजप नेते गिरीश महाजन स्वतः ट्रॅक्टर चालवताय

    महाविकास आघाडी सरकार हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, शेतकऱ्यांना मदत देऊ म्हणणारे हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे,

    अतिवृष्टी, वादळ अशा नैसर्गिक संकटात मदतीचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे

    महाविकास आघाडी सरकार हे ड्रग्ज, गांजा, भ्रष्टाचार आणि वसुलीत गुंतलेले सरकार असल्याचा घणाघाती आरोप गिरीश महाजन यांनी केलाय

    या सरकारला शेतकर्‍यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची काहीएक देणेघेणे नसल्याचा आरोपही गिरीश महाजन यांनी केला

    महाविकास आघाडी सरकार विरोधात जनतेत तीव्र रोष आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, मजूर, विद्यार्थी व व्यापारी असे सर्वच घटक हैराण झाले आहेत, असेही गिरीश महाजन म्हणाले

  • 01 Nov 2021 03:36 PM (IST)

    आटपाडी बस डेपोबाहेर ठिय्या आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आक्रमक

    सांगली :

    आटपाडी बस डेपोबाहेर मागील काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आक्रमक

    आटपाडी बस डेपोमधील अधिकाऱ्यांनी बाहेरच्या डेपोतील एस टी चालक-वाहक आणून बस डेपोतून बाहेर काढून बस सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलक आक्रमक

    दुसऱ्या डेपोवरून बोलेलेले एसटी चालक-वाहक परत पाठवा अशी आंदोलकांची मागणी

  • 01 Nov 2021 03:34 PM (IST)

    जळगावात भाजपकडून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा

    जळगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात

    भाजप नेते, माजीमंत्री गिरीश महाजन हे करताय मोर्चाचे नेतृत्त्व, मोर्चात भाजपचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी

    जिल्हाभरातील शेतकऱ्यांचा देखील मोर्चात सहभाग

    महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    शेतकऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याची आहे प्रमुख मागणी

    शेतीचा वीज पुरवठा खंडित करू नये, रखडलेली कर्जमाफी त्वरित द्यावी, अतिवृष्टी व वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशा आहेत इतर मागण्या

  • 01 Nov 2021 03:05 PM (IST)

    लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार, दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानची तयारी

    शिर्डी :

    लवकरच शिर्डीत ऑफलाईन पास सेवाही सुरू होणार दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानची तयारी ऑफलाईन पास व भक्तांसाठी प्रसादालाय सुद्धा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सुट्टीच्या काळात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन साई संस्थान निर्णय घेणार याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून लवकरच निर्णय होणार साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची माहिती

  • 01 Nov 2021 03:00 PM (IST)

    सचिन वाझेला 6 दिवसांची पोलीस कस्टडी

    सचिन वाझेला 6 दिवसांची पोलीस कस्टडी, गुन्हे शाखेकडे 67 ऑडिओ क्लिप आहेत, त्यांची चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेने वाझेची चौकशी मागितली, अखेर कोर्टाकडून वाझेला 6 दिवसांची पोलीस कस्टडी

  • 01 Nov 2021 02:56 PM (IST)

    ‘बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाची चौकशी ही अशोकराव चव्हाण यांच्या कर्जप्रकरणी’

    बुलडाणा :

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आयकर विभागाची चौकशी ही अशोकराव चव्हाण यांच्या कर्जप्रकरणी,

    बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांचे स्पष्टीकरण,

    तर ठेवीदारांच्या ठेवी सुद्धा सुरक्षित,

    बुलडाणा अर्बनमधील कारखान्याच्या कागदपत्रांच्या संदर्भात चौकशी पूर्ण झाल्याची माहिती,

  • 01 Nov 2021 02:50 PM (IST)

    अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात, तर नागपुरात त्यांच्या घराबाहेर शुकशुकाट

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईत ईडीच्या कार्यालयात पोहचले आहेत. मात्र नागपुरात त्यांच्या घरासमोर शुकशुकाट आहे. रोज त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाव्यतिरिक्त तिथे कोणीच नाही. विशेष म्हणजे यापूर्वी जेव्हा नागपुरात सिव्हिल लाईन्स परिसरातील अनिल देशमुख यांच्या घरात सीबीआय किंवा ईडीचा छापा पडायचा तेव्हा नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते अनिल देशमुख यांना समर्थन म्हणून त्यांच्या घरासमोर गोळा व्हायचे. मात्र आज अनिल देशमुख यांच्या घरासमोर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
    बंगल्यात काही मोजक्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही नाही. देशमुख कुटुंबातील कोणतेही सदस्य नागपुरात उपस्थित नाही, अशी माहिती आहे
  • 01 Nov 2021 02:37 PM (IST)

    माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे निधन

    जालना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. 1977 आणि 1989 साली असे दोन वेळा त्यांनी भारतीय जनसंघाकडून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र नंतर त्यांनी राष्ट्रवादीशी जुळवुन घेत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. शरद पवार यांच्यासोबत राहत त्यांनी त्यांचा मुलगा चंद्रकांत दानवे यांना राष्ट्रवादीकडून आमदार केले होते. चारच दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते

  • 01 Nov 2021 02:35 PM (IST)

    समीर वानखेडे NCB कार्यालयात दाखल, अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यासोबत वानखेडे यांची चर्चा

    नवी दिल्ली :

    समीर वानखेडे NCB कार्यालयात दाखल

    एससी आयोग कार्यालयातून वानखेडे NCB मुख्य कार्यालयात

    अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यासोबत वानखेडे यांची चर्चा

  • 01 Nov 2021 02:13 PM (IST)

    …तर मी ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती : देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (औपचारिक गप्पा) फडणवीसांना आणखी एक टोला :

    – मंत्रालयात वॉर रुम होती, मी विचार केला वॉर कुणाशी करायचा, म्हणून मी त्याचे नाव बदलून संकल्प कक्ष केले – नव्या योजना आखण्यासाठी याचा वापर करायचा होता – पण कोरोनामुळे तिथेले अधिकारी दुसरीकडे द्यावे लागेल – आता परत चालना देत आहोत

    – ठरल्याप्रमाणे जर सगळं झालं असतं तर मी ही ठरल्याप्रमाणे फोटोग्राफी केली असती आणि तुम्हाला प्रदर्शनाला बोलवलं असतं (मुख्यमंत्री व्हायची कोणतीही योजना, इच्छा नव्हती असं यातून सूचित केलंय )

    – फोटोग्राफी आणि राजकारणात एक्सपोजिंग महत्त्वाचं असतं आणि नंतर डेव्हसपिंग महत्त्वाचं असतं

  • 01 Nov 2021 01:48 PM (IST)

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 71 एसटी कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    सांगली-

    आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह 71 एस टी कर्मचाऱ्यांवर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    आटपाडी बस डेपो, वर्कशॉपला एस टी कर्मचाऱ्यांनी कुलूप घालून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

    आटपाडी बस डेपो मध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच,

    एसटी चे विलिनीकरण राज्य सरकार मध्ये करा या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी बस डेपो, वर्कशॉपला एस टी कर्मचाऱ्यांनी घातले होते कुलूप

  • 01 Nov 2021 01:47 PM (IST)

    20 वर्षीय युवतीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार

    – अमरावती जिल्ह्यातील धक्कादायक घटना.. – 20 वर्षीय युवतीवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार.. – लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत घटना.. – सततच्या त्रासाला कंटाळून युवतीने केली लोणी पोलिसात तक्रार – आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

  • 01 Nov 2021 12:34 PM (IST)

    ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार, अनिल देशमुखांकडून व्हिडीओ ट्विट

    अनिल देशमुख – 

    ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला ‘ECIR’ ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल.

    उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे

  • 01 Nov 2021 12:04 PM (IST)

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

    अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल

    १०० कोटी वसुली प्रकरणात देशमुख यांच्यावर आरोप

    वकिल इंद्रपाल सिंह देखील ईडी कार्यालयात दाखल

  • 01 Nov 2021 11:08 AM (IST)

    अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे – किरीट सोमय्या

    किरीट सोमय्या –

    अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे

    नातेवाईकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले

    अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आले

    बिल्डर्सकडून अजित पवारांच्या खात्यात पैसे आले

    मोहन पाटील यांच्या खात्यात पैसे आले

    पवारांच्या जावयाकडे एवढी संपत्ती कशी आली?

    1 हजार 50 कोटींची संपत्ती आली कुठून

    अजित पवारांची याचं उत्तर द्यावं

  • 01 Nov 2021 10:48 AM (IST)

    ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशांनी माझ्याशी बोलू नये – फडणवीस

    ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशांनी माझ्याशी बोलू नये

    ड्रग्ज संदर्भातही बोलू नये

    या सदर्भातील सर्व पुरावे आपल्या पुढे मांडेल

    शरद पवारांना मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सर्व पुरावे पाठवणार आहे

  • 01 Nov 2021 10:46 AM (IST)

    …तर अख्खी एनसीपी पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे

    देवेंद्र फडणवीस –

    भाजपचं ड्रग्ज कनेक्शन नवाब मलिकांनी सांगितलं

    मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत

    मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तर अक्खी एनसीपी पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे

    दिवाळीच्या दिवशी नवाब मलिकांनी लवंगी ला

    याचं कारण म्हणजे मी काचेच्या घरात राहात नाही

    ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशांनी माझ्याशी बोलू नये

  • 01 Nov 2021 10:42 AM (IST)

    जाणीवपूर्वक मलिकांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला – नवाब मलिक

    जाणीवपूर्वक मलिकांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला

    याच्यामागील मानसिकता ही दिसतेय

    फोटो काढण्यासाठी हे लोक आले होते, त्यामुळे त्यांच्याशी माझी किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही संबंध नाही

  • 01 Nov 2021 10:38 AM (IST)

    लवंगी फोडून मोठा आवाज करण्याचा नवाब मलिकांचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

    दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका फोडून मोठा आवाज करण्याचा आव नवाब मलिक आणत आहेत

    ते कोणत्या मानसिकतेत आहेत हे सर्वांना माहित आहे

    जो फोटो त्यांनी ट्विट केलाय कालच रिव्हर मार्चच्या लोकांनी त्यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं की आणच्या क्रिएटिव्ह टीमने हायर केलेला हा व्यक्ती होता

    हा फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे

    त्या गाण्याच्या शुटिंगवेळी हे सर्व फोटो काढण्यात आले आहेत

    संपूर्ण टीमने काढलेले हे फोटो आहेत

    माझ्या पत्नीसोबतच नाही तर माझ्याहीसोबत काढलेले फोटो आहेत

  • 01 Nov 2021 09:18 AM (IST)

    जयदीप राणा दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये – नवाब मलिक

    जयदीप राणा दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये

    जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला

    जयदीप राणा दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये

  • 01 Nov 2021 09:14 AM (IST)

    मी नावखेडेंच्या पत्नीवर, मुलांवर कोणतीही वैयक्तित टीका केलेली नाही – नवाब मलिक

    मी वानखेडेंच्या दुसऱ्या पत्नीचं नाव नाही घेतलं

    मी नावखेडेंच्या पत्नीवर, मुलांवर कोणतीही वैयक्तित टीका केलेली नाही

    अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मला धमकी दिली जाते

  • 01 Nov 2021 09:10 AM (IST)

    हलदार यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार – नवाब मलिक

    वानखेडेंनी बनावट कागदपत्रे दाखवली

    ज्यांच्यावर संशयाची सुई त्यांना हलदार जाऊन भेटले

    हलदार यांची राष्ट्रपतींकडे तक्रार करणार

  • 01 Nov 2021 09:08 AM (IST)

    संविधानिक पदावरील व्यक्ती वानखेडेंना क्लिनचीट कशी देतो? – नवाब मलिक

    नवाब मलिक –

    अरुण हलदार वानखेडेंच्या घरी जाऊन तपासणी करतात

    त्यांचे कागदपत्र तपासून योग्य असल्याचं सांगतात

    सामाजिक न्यायमंत्री दाऊद वानखेडेंसोबत परिषद घेतात

    या दोघांचेही वर्तन खेदजनक

    संविधानिक पदावरील व्यक्ती वानखेडेंना क्लिनचीट कशी देतो?

    अरुण हलदार आणि वानखेडेंच्या भेटीवर मलिकांनी आक्षेप घेतला आहे

  • 01 Nov 2021 09:07 AM (IST)

    समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रं दाखवून नोकरी मिळवली : मलिक

    समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रं दाखवून नोकरी मिळवली : मलिक ज्यांच्यावर संशयाची सुई, त्यांना जाऊन हलदर भेटले, आणि त्यांनी हलदर यांना क्लीन चिट दिली  : मलिक

  • 01 Nov 2021 08:28 AM (IST)

    दहा लाखांची बॅग पळवणारा अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद, 9 दिवसांची पोलीस कोठडी

    अहमदनगर

    दहा लाखांची बॅग पळवणारा अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद, 9 दिवसांची पोलीस कोठडी

    कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती

    ही रक्कम दुचाकीवरून बॅगमध्ये मार्केटकडे घेऊन येत असताना दोन हमाल कामगारांनी ही बॅग हिसकावून पळवुन नेली होती

    पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त माहिती मिळताच सापळा रचून केले आरोपाला अटक

  • 01 Nov 2021 08:21 AM (IST)

    सहा वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून निर्घृण हत्या, हातकणंगले तालुक्यातील खोची इथली धक्कादायक घटना

    कोल्हापूर –

    सहा वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून निर्घृण हत्या

    कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील खोची इथली धक्कादायक घटना

    गावच्या दफनभूमीजवळ झुडपात आढळला मृतदेह

    संशयित आरोपी प्रदीप पोवार पोलिसांच्या ताब्यात अटक

    काल दुपारपासून चिमुकली झाली होती बेपत्ता

    चिमुकलीचे आई-वडील शेतात करतात मोलमजुरी

  • 01 Nov 2021 08:20 AM (IST)

    रत्नागिरीतील लांजा एसटी डेपोतील वाहतूक ठप्प, एसटी डेपोचे कर्मचारी उतरले संपात

    रत्नागिरी-लांजा एसटी डेपोतील वाहतूक ठप्प

    मध्यरात्रीपासून लांजा एसटी डेपोचे कर्मचारी उतरले संपात

    एस टी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासाठीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लांजा एसटी डेपो च्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे संपाची हाक

    या संपामुळे सामान्य नागरिकांचे होत आहेत मोठे हाल

  • 01 Nov 2021 08:19 AM (IST)

    वसुबारस निमित्त पुण्यातील देवाची आळंदी सजली

    पुणे

    – वसुबारस निमित्त पुण्यातील देवाची आळंदी सजली आहे

    – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलीये

    – गोमतेच्या प्रतिकृती लाऊन गाभारा सजविण्यात आलाय

  • 01 Nov 2021 08:18 AM (IST)

    वाखरी ग्रामपंचायतीच्या ना हरकत देण्याच्या ठरावाला वारकरी संप्रदायाचा विरोध

    सोलापूर –

    वाखरी ग्रामपंचायतीच्या ना हरकत देण्याच्या ठरावाला वारकरी संप्रदायाचा विरोध

    वाखरी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत 23 नवीन बियरबार ,बियरशॉपी ना दिले आहे ना हरकत ठराव

    संतांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत दारू आणि बिअरबार नकोत अशी वारकर्‍यांची भूमिका

    वारकरी फडकरी समाज संघटना कार्तिकी महापूजा दिवशी उपमुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

    पालखी मार्गावरील वाखरी ग्रामपंचायतीने  28 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत बिअर शॉपी आणि बार सुरू करण्याचे 23 अर्ज मंजूर

  • 01 Nov 2021 08:17 AM (IST)

    आमदार प्रशांत बंब यांची अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर धाड

    औरंगाबाद –

    आमदार प्रशांत बंब यांची अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर धाड

    अवैध धंद्यांच्या अड्ड्यावर धाड टाकून अवैध धंदे पाडले

    प्रशांत बंब यांच्या मतदार संघात सुरू होते बेकायदेशीर दारू अड्डे

    अवैध देशी दारूचे अड्डे, मटका सेंटर विरोधात प्रशांत बंब आक्रमक

    कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशांत बंब यांनी टाकली दारू अड्ड्यावर धाड

    धाडीनंतर पोलिसांना बोलवून सर्व अवैध दारू अड्डे केले बंद

    मंदिर मस्जिद आणि सार्वजनिक ठिकाणी सुरू होते दारू आणि मटक्यांचे अड्डे

  • 01 Nov 2021 08:16 AM (IST)

    नागपूर मेडीकल आणि मेयो रुग्णालयातील ‘डे – केअर’ वॅार्ड बंद

    – नागपूर मेडीकल आणि मेयो रुग्णालयातील ‘डे – केअर’ वॅार्ड बंद

    – सिकससेल आणि थॅलेसेमियाचे रुग्ण अडचणीत

    – कोरोनाच्या नावाने दीड वर्षांपासून बंद असलेला ‘डे – केअर’ वॅार्ड आताही बंद

    – ‘डे – केअर’ वॅार्ड बंद असल्याने गरिब रुग्णांचे मोठे हाल

    – सिकससेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांकडून ‘डे – केअर’ वॅार्ड सुरु करण्याची मागणी

  • 01 Nov 2021 07:22 AM (IST)

    विमा कंपनीने फेटाळले जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांची नावे

    सोलापूर – विमा कंपनीने फेटाळले जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांची नावे

    अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती मुळे झालेल्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी 14 हजार शेतकऱ्यांनी केला होता विमा कंपनीकडे दावा

    जिल्ह्यातील तब्बल 98 हजार शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई देण्याची प्राथमिकता विमा कंपनी दर्शवली

    जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आली होती अतिवृष्टी

  • 01 Nov 2021 07:21 AM (IST)

    नागपूर विमानतळावरुन आता लखनौ, चेन्नईसाठी फ्लाईट

    – नागपूर विमानतळावरुन आता लखनौ, चेन्नईसाठी फ्लाईट

    – नागपूर विमानतळावरुन जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांची संख्या आता २८

    – नागपूर विमानतळावर उड्डाणाचे वेळापत्रक बदललं

    – नागपूरवरुन बंगळुरुसाठी जाणाऱ्या प्रवाशांना RTPCR बंधनकारक

  • 01 Nov 2021 07:21 AM (IST)

    ऐन दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

    पुणे :

    ऐन दिवाळीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता

    पुणे वेधशाळेने वर्तवली हलक्या पावसाची शक्यता

    तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा

    कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत काही ठिकाणी १ नोव्हेंबरपासून पावसाचा अंदाज

    मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत काही भागांत १ नोव्हेंबरपासून तीन ते चार दिवस, तर पुणे, सोलापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी २ नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज

  • 01 Nov 2021 07:19 AM (IST)

    कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत नागरिक करतायत बाजारात गर्दी

    – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी करण्यासाठी होत असलेली गर्दी बघता प्रशासनाच नागरिकांना कोरोना नियम पाळण्याच आवाहन

    – कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत नागरिक करतायत बाजारात गर्दी

    – जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत असतानाच नागरिक पुन्हा हलगर्जीपना करत असल्यामुळे कोरोना पुन्हा वाढण्याची शक्यता

  • 01 Nov 2021 07:19 AM (IST)

    टी 20 सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोन बुकींना नाशिकमध्ये ठोकल्या बेड्या

    – टी 20 सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोन बुकींना नाशिकमध्ये ठोकल्या बेड्या

    – श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर, घेत होते बेटिंग

    – गुन्हे शाखा युनिट 1 ने ठोकल्या बेड्या

    – वासीम शेख,अमोल नागरे अशी संशयितांची नाव

  • 01 Nov 2021 07:19 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेकडे तब्बल 10 हजार उमेदवारांनी फिरवली पाठ

    – नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या परिक्षेकडे तब्बल 10 हजार उमेदवारांनी फिरवली पाठ

    – आरोग्य विभागातील गट “ड च्या पदाच्या भरतीसाठी जिल्ह्यासाठी 27 हजार 313 उमेदवारांनी केला होता अर्ज

    – मागील परीक्षेवेळी झालेला गोंधळ बघता इतक्या मोठ्या संख्यने उमेदवार गैरहजर असल्याचं बोललं जातंय

  • 01 Nov 2021 06:29 AM (IST)

    कोथरुडमध्ये ‘सोनेरी चंदेरी’ पहाट या दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात

    पुणे

    कोथरुडमध्ये ‘सोनेरी चंदेरी’ पहाट या दिवाळी पहाट कार्यक्रमाला सुरुवात

    ‘महक’ प्रस्तुत पंचतारांकित गंधर्वांच्या अजरामर गीतांची-किश्श्यांची अनोखी दिवाळी पहाट

    भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेल्या गाणी सादर केली जाणार

  • 01 Nov 2021 06:20 AM (IST)

    जळगावात महार्गावर धावत्या ट्रकला लागली आग

    जळगाव – जळगावात महार्गावर धावत्या ट्रकला लागली आग

    मानराज पार्क जवळील रेल्वे पुलावर घडला अपघात

    महामार्गावर दुपारी काही अंतरावर कार ला लागली होती आग

    ट्रक ला आग लागल्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली

    ट्रक मध्ये धान्य भरण्याचे खाली पोत्यांचे गठ्ठे असल्याने लागली मोठी आग

    अग्निशमन दलाची गाडी उशिराने येऊन देखील विझली नाही आग

  • 01 Nov 2021 06:18 AM (IST)

    वसईच्या जुन्या अंबाडी ब्रिजवर अनाधिकृत प्रवेश करणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात 

    वसई –

    वसईच्या जुन्या अंबाडी ब्रिजवर अनाधिकृत प्रवेश करणाऱ्या आयशर टेम्पोचा अपघात

    आज रात्री 10 वाजता ही घटना घडली आहे

    जुना अंबाडी पुल कमकुवत असल्याने अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यासाठी लोखंडी पोल लावण्यात आले आहेत

    आयसर टेम्पो चालकाला ही घटना लक्षात न आल्याने त्याने आपला टेम्पो चक्क ब्रिजवर घातल्याने लोखंडी पोल ला अडकून टेम्पोचा वरचा टप हा तुटून चेंदामेंदा झाला आहे

    या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र टेम्पोचे नुकसान झाले आहे

Published On - Nov 01,2021 6:14 AM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.