Maharashtra News Live Update : वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची खलबतं, तर औरंगाबादेत मनसेची जय्यत तयारी
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शुक्रवार 29 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, तर पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. सीएनजीच्या दरात दोन रुपये वीस पैशांनी वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी 77 रुपये 20 पैसे किलो सध्या दर झाला आहे. तर पेट्रोल डिझेलच्या भावात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
LIVE NEWS & UPDATES
-
देवेंद्र फडणवीसांची मुंबई बुस्टर डोस सभा
फडणवीस भाजपच्या रथावर विराजमान
मुंबईत भाजपचं जोरदार शक्तिप्रदर्शन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी जंग बांंधला
-
अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल होताच तयारीचा आढावा
पदाधिकाऱ्यांकडून सभेच्या तयारीचा घेतला आढावा
माहिती घेत नियोजन चांगलं करण्याच्या दिल्या सूचना
सभेसाठी किती लोक येतील तेवढं नियोजन आहे का ? तयारी कशी आहे जाणून घेतली माहिती
अमित ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या विद्यार्थी सेनेत होणार 200 पक्षप्रवेश.
-
-
राज ठाकरे औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत
त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे सकळी 10 वाजता स्वागत केलं जाणार आहे.
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
विरोधकांची लायकी नाही हिंदुत्वावर बोलायची
आम्ही आयोध्येत पाहूणे नाही
बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची खरी रक्षक
शिवसेनेने सर्वात जास्त त्यात हिदुत्वासाठी केला
८ जूनला मराठवाड्यात उद्धव ठाकरे सभा घेतील
दंगलीत शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालं
तेव्हा हे बाकीचे लोक शेपूट घालून बसले होते
-
अमित ठाकरेंचे औरंगाबादमध्ये आगमन झाले
– मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंचे औरंगाबादमध्ये आगमन झाले
– अमित ठाकरे हॉटेल रामा येथे काही क्षणात पोहोचतील
-
-
शिवसेना नेते, खासदार आणि प्रवक्त्यांची वर्षा निवासस्थानी बैठक
बैठकीसाठी नेते वर्षावर दाखल होण्यास सुरुवात
१) संजय राऊत
२) अरविंद बी सावंत
३) नीलम गोरे
४) प्रियंका चतुर्वेदी
५) सचिन आहेर
६) सुनील प्रभू
७) किशोरीताई पेडणेकर
८) शीतल म्हात्रे
९) शुभा राऊळ
१०) किशोर कान्हेरे
११) संजना घाडी
१२) आनंदराव दुबे
१३) किशोर तिवारी
१४) हर्षल प्रधान
१५) विनायक राऊत
१६) ओमराजे निंबाळकर
१७) अनिल देसाई
१८) हेमंत पाटील
१९) श्रीरंग बारणे
२०) धर्यसिल माने
२१) संजय मंडलिक
२२) भावना गवळी
२२)श्रीकांत शिंदे
-
रत्नागिरी- सेनेच्या बालेकिल्लात मनसे हनुमान चालिसावरून आक्रमक
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर हनुमान चालिसा आणि महाआरती होणार
रत्नागिरी जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची घोषणा
मनाई आदेशामुळे रितसर परवानगी मागून हनुमान चालिसा पठण केलं जाणार
प्रांन्ताधिकाऱ्यांकडे मनसेचा परवानगीचा अर्ज
परवानगी मिळाली नाही तरी ठरलेले कार्यक्रम होणार मनसेचा इशारा
-
जीएसटी विभागाच्या अधिक्षकासहित एका निरीक्षकाला अटक
कोल्हापुरात सीबीआयकडून लाच घेताना जीएसटी विभागाच्या अधिक्षकासहित एका निरीक्षकाला अटक
50 हजारांच्या लाच प्रकरणात अटक..
कोल्हापुरातल्या जयसिंगपूरमध्ये सीबीआयने लावला होता सापळा..
जीएसटी विभागाचे अधीक्षक महेश नेसरीकर यांच्यासहित निरीक्षक अमित मिश्रा यांना अटक.. केली आहे
जयसिंगपूर न्यायालयामध्ये या दोघांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे
-
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उद्या औरंगाबाद दौऱ्यावर
दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून रंगीत तालीम
हॉटेल परिसरात लावला तगडा बंदोबस्त!
पोलीसांकडून कँन्व्हॉयची रंगीत तालीम !
-
Raj Thackeray Aurangabad Live Update : खासदार इम्तियाज जलील Live
आम्ही पक्षाच्या विचारधारेला विरोध करतो
मात्र आम्ही धर्माविरोधत कधी बोलत नाही
आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधातही ठोस भूमिका घेतली आहे
कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन जरूर व्हावे
मात्र सरकारी यंत्रणांनी पुढे यावं
आम्हाला न्यायालय आणि पोलिसांवर विश्वास आहे
औरंगाबादेत आम्हाला शांतता प्रस्थापित करायची आहे
-
Raj Thackeray Aurangabad Live Update : खासदार इम्तियाज जलील Live
मनसेच्या सर्व लोकांना माझ्याकडून इफ्तारचं निमंत्रण
समाजात चांगला संदेश जाईल
दुकानदारांना घाबरण्याचे कारण नाही
हे गेल्यानंतर कुणी दुसरं आलं तरी निमंत्रण देणार
आम्हाला माहोल खराब होऊ द्याचा नाही
-
Raj Thackeray Aurangabad Live Update : राज ठाकरेंच्या सभेच्या वेगवान अपडेट
इम्तियाज जलील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
राज ठाकरेंनी सभेआधी आमच्यासोबत इफ्तार पार्टी करावी
इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना निमंत्रण
राज ठाकरे जलील यांचंं निमंत्रण स्वीकारणार?
-
कोर्टाचा याचिकाकर्त्यांना दणका
– रिपब्लिकन युवा मोर्चाच्या जयकिशन कांबळे यांनी याचिका दाखल केली होती
– मनसे प्रमुख राज ठाकरेंची सभा किंवा रॅली होऊ नये यासाठी त्यांना मनाई हुकुम व्हावा अशी मागणी केली होते
– उच्च न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी घेतली
– पोलिस आयुक्तांचे आदेश कोर्टासमोर सादर केले
– सर्व काळजी पोलिस आयुक्तांनी घेतली ही सर्व बाब
– याचिका 1 लाख रुपये दंड लावून याचिका फेटाळली
– याचिका राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे नमूद केले
– अतुल काळे सहाय्यक सरकारी वकील
-
पालघरमध्ये ओबीसींचा आक्रोश मोर्चा
पालघर – ओबीसी हक्क संघर्ष समिती पालघर जिल्हा आयोजित ओबीसी आक्रोश मोर्चेच्या कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदे हजर, पालघर मधील कोळगाव येथे हजारो ओबीसी समाज बांधव उपस्थित . जिल्ह्यात ओबोसींच राजकीय आरक्षण शून्य टक्के केल्याने ओबीसी समाज आक्रमक . जातनिहाय जनगणना करण्याची ओबीसी समाजाची मागणी,
-
गणेश नाईक यांच्यावर आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण राष्ट्रवीदच्या वाटेवर
मला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच आवडतो
महिला आयोगाने माझी मदत केली आहे
मला पक्षात प्रवेश करायचा आहे
तस पत्र देखील मी दिल आहे, अजून काही रिप्लाय आला नाही
आज रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे मात्र पक्षप्रवेश बद्दल बोलणं नाही झालं
समाजसेवा करायची आहे
-
Raj Thackeray Aurangabad Live Update : राज ठाकरेंच्या सभेच्या वेगवान अपडेट
उद्या सकाळी ८ वाजता राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार आहे
औरंगाबादच्या सभेपूर्वी या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशिर्वाद देणार आहे
-
किशोरी पेडणेकर यांची माहिती
– महिला आघाडीची 14 मेला पक्ष प्रामुख आणि मुख्यमंत्री यांची जाहीर सभा आहे
– त्या निमित्ताने महिला आघाडीवर जबाबदारी देण्यात आली आहे
– रेकॉर्ड ब्रेकिंग ही सभा होणार आहे
– शिवसेनेची महिला आघाडीची ताकत आम्ही दाखवून देणार आहोत
– भैय्या हटाओ बोलणारे आता योगिनची स्तुती करत आहेत
– आम्ही कधी योगींना विरोध केला नाही
– त्यांची भूमिका बदलली त्याचा आम्हाला जास्त आश्चर्य वाटतंय
– पण आम्ही विकासाच्या मुद्यावर आम्ही पुढे जात आहोत
-
राज ठाकरे यांच्या सभेला 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त
5 डीसीपी 7 एसीपी आणि शेकडो पीआय पीएसआयचा असणार बंदोबस्त
प्रत्यक्ष मैदानावर असणार 300 पोलिसांचा वेढा
तर मैदानाबाहेर आणि संपूर्ण शहरात असणार 1700 पोलिसांचा कडा बंदोबस्त
मैदानावर लगावले 15 एचडी CCTV कॅमेरे
राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या मागवण्याल्या
सभेला 40 हजार लोक येण्याची शक्यता
जिल्हा परिषद मैदान आणि कर्णपुरा परिसरात असेल वाहने पार्किंगची व्यवस्था..
मिलकॉर्नर ते औरंगपूर, भडकल गेट ते महापालिका आणि खडकेश्वर ते भडकल गेट हे तीन रस्ते राहणार पूर्णपणे बंद
नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे पोलिसांचे संकेत
-
राज ठाकरेंच्या सभेदिवशीच औरंगाबाद शहरात वंचित बहुजन आघाडीचा शांती मार्च
– वंचित बहुजन आघाडीतर्फे शांती मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले
– शहरातील क्रांती चौक ते पैठण गेट, महात्मा फुले पुतळा, औरंगपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत शांती मार्चसाठी मागितली परवानगी
– शहरात शांतता आणि सद्भावना तसेच धार्मिक सौहार्द रहावे यासाठी काढणार शांती मोर्चा
– हातात मेणबत्ती घेत दोन दोन लोकांच्या गटाने रांग करुन घोषणाबाजी न करता काढणार शांती मार्च
– पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली नाही तरी काढणार शांती मार्च
– वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष संदिप शिरसाट यांची माहिती
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोडयाच वेळात पुण्यातील निवासस्थानी पोहचणार,
– राज ठाकरे आज पुणे मुक्कामी,
– उद्या औरंगाबादकडे रवाना होणार,
– राज यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची घराबाहेर गर्दी
-
– नागपूरात पोलीस भवन उद्घाटन कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या आमदारांची अनुपस्थिती
– भाजपसोबत महाविकास आघाडीचे आमदारही कार्यक्रमात नाही
– शिवसेना आमदार आशिष जैसवाल, काँग्रेस आमदार राजू पारवे, आमदार विकास ठाकरे कार्यक्रमात नाही
– ‘निमंत्रण पत्रिकेत नाव, मात्र आमदारांना सन्मानाने बोलावले नसल्याची माहिती’
– आमदार आशिष जैसवाल आणि आमदार राजू पारवे नागपूर जिल्ह्यात असूनही कार्यक्रमात नाही
– काँग्रेस आमदार विकास ठाकरे पक्षाच्या कामासाठी मुंबईत
– उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
– पोलीस भवन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर भाजपसह महाविकास आघाडीचे आमदारही नाराज!
-
मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर
– मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर
– चंद्रकांत खैरे हे राज ठाकरेंची सभा घरात बसून पाहतील
– बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत होते. त्यांचा आम्हाला आदर आहे आणि आम्ही त्यांची बरोबरी करत नाही
– राज ठाकरे यांना आम्ही हिंदुजननायक असे संबोधतो. त्यांची राजगर्जना 1 मेला होणार
– चंद्रकांत खैरे हेदेखील ही सभा घरात बसून ऐकतील याची मला खात्री
– सभा उधळून लावणार वगैरे असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देखील देत नाही.
ज्यांना जे करायचे ते करु द्या
-
कल्याणमधील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीसा
कल्याणमधील मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीसा
राज ठाकरेंनी दिलेला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम संपल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नोटीसा
मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीसा
खडकपाडा पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांना नोटीसा जारी
-
राज ठाकरे ज्या मार्गाने जाणार त्या मार्गाची पोलिसांकडून पाहणी केल्याची माहिती
अहमदनगर
औरंगाबाद येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अहमदनगरहुन पोलीस बंदोबस्त
अहमदनगर जिल्ह्यातून 80 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश
तर राज ठाकरे ज्या मार्गाने जाणार त्या मार्गाची पोलिसांकडून पाहणी केल्याची माहिती
-
अमरावती विभागात सोयाबीन, आणि कापूस उत्पादन सर्वाधिक घेतले जाते – दादा भुसे
खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली…अमरावती विभागाचे आयुक्त.. पाचही जिल्हाधिकारी उपस्थित होते…
शेतकरी, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते…
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे,वीज, गोपीनाथ मुंडे अपघात विमा या संदर्भात आढावा आम्ही घेतला…
अमरावती, अकोला,यवतमाळ, वाशिम,बुलढाणा ,या पाच जिल्हाचा आढावा घेतला….
अमरावती विभागात सोयाबीन, आणि कापूस उत्पादन सर्वाधिक घेतले जाते…
दोन्ही पिक आणि इतर पिकाचे बियाणे भरपूर आहे..
राज्यातील कोणत्याच शेतकऱ्याला बियाणे आणि रासायनिक खतांची कमी पडणार नाही..हे आश्चसन शेतकऱ्यांना देतो
दिल्ली मध्ये केंद्रीय मंत्री यांच्या भेटी मी घेतल्या..खरीप हंगामासाठी जेवढा खताचा साठा लागतो तो आम्ही केंद्राकडे मागितला….
कापूस आणि सोयाबीन यांचे उत्पादन वाढवण्यासाठी एक कार्यक्रम तयार केला आहे….
महिला शेतकऱ्यांसाठी विविध योजना या कृषी विभागाच्या आहे…
संत्राची रोप दर्जेदार पध्दतीची पोहचली पाहिजे यासाठी एक समिती गठीत केली आहे…बोगस रोप दिल्यास कारवाईचा विचार केला जाईल…
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात पावसाळ्या पूर्वी खत बियाणे कसे पोहचतील या साठी नियोजन केले आहे…
कांदा खरेदीसाठी नाफेडचे केंद्र व्हावे अशीही सूचना आली आहे….
पावसाळा सूरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे देता येईल या संदर्भात आढावा आम्ही घेतला….
-
पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव खाली लिहिण्यात आलं – गिरीष व्यास
उप मुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भवन च उदघाटन करत आहे
यांच्या पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव खाली लिहिण्यात आलं
हा त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे
सोबतच पत्रिकेत विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र असा उल्लेख करण्यात आला तो चुकीचा अर्थ निघत आहे ,
फडणवीस हे महाराष्ट्र विरोधी आहे असं म्हणायचं का असा प्रश्न निर्माण होत आहे
त्याचा निषेध करून हे कोणत्या अधिकाऱ्याने हा प्रकार केला याची चौकशी करण्याची मागणी करत आहो
या पोलीस भवन च्या निर्मानाच सगळं श्रेय फडणवीस यांच आहे त्यानी हे काम मार्गी लावल
सत्ता परिवर्तन झालं असलं तरी फडणवीस यांना संसदीय पद्धतीने मान देणं गरजेचं आहे
अजित पवार आणि गृहमंत्री यांनी या चुकी साठी माफी मागावी
या कार्यक्रमाला भाजप बहिष्कार करत आहे आणि कोणीही भाजप आमदार या कार्यक्रमाला जाणार नाही
नितीन गडकरी यांच नाव पत्रिकेत लिहिलं मात्र त्यांना कल्पना देण्यात आली नाही
या साठी हे सरकार दोषी आहे
-
मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला
– मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला
– बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे पोलिस आयुक्तांच्या भेटीला
– मनसे नेते आणि पोलिस प्रशासनाची बैठक सुरू
-
थोड्या वेळात मनसेचे नेते सभेच्या ठिकाणी पाहणी करतील
थोड्या वेळात मनसेचे नेते सभेच्या ठिकाणी पाहणी करतील
बाळा नांदगावकर, नीतीन सरदेसाई आणि दिलीप धोत्रे
-
महामंडळाच्या नियुक्त्या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता
काँग्रेस राज्य प्रभारी एच के पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची थोड्याच वेळात बैठक
राज्यातल्या मुद्द्यासंदर्भात होणार चर्चा
महामंडळाच्या नियुक्त्या संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता
-
उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होणार
उद्या सकाळी आठ वाजता राज ठाकरे पुण्यातून औरंगाबादसाठी रवाना होणार
वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करुन औरंगाबाद कडे मार्गस्थ होणार
राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा
तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक पुण्यातून जाणार
-
राज्यातील वीज निर्मिती केंद्रांत मोठी कोळसा टंचाई – नितीन राऊत
– राज्यातील वीज निर्मिती केंद्रांत मोठी कोळसा टंचाई
– काही प्लांटमध्ये दीड दिवस पुरेल येवढाच कोळसा
– काही वीज निर्मिती केंद्रात चार ते पाच दिवस पुरेल येवढा कोळसा
– गरजेपेक्षा फक्त ८० टक्के कोळसा महाजनकोला मिळतोय
– केंद्र सरकारला कोळशाचे नियमित पैसे दिलेय, पण केंद्र सरकारकडून भेदभाव
– केंद्र सरकारला कोळशाचे या महिन्यात १४९८ कोटी रुपये दिलेस
– रेल्वे रॅकचे पैसे दिलेय.
– राज्यात सध्या भारनियमन नाही.
– पुढच्या काळात काय परिस्थिती असेल हे कोळशावर अवलंबून आहे
– पावसाळ्यासाठी कोळसा साठवण्याचंही चॅलेंज आहे
– सध्या मिळणारा कोळसा पुरेसा नाही
– केंद्र सरकार जीएसटीचे २७ हजार कोटी देत नाही. केंद्र सरकार सापत्न पणाची वागणूक करतेय
– इम्पोर्टेड कोल या आठवड्यात येईल. देशी विदेशी कोळसा मिसळवून वापरू
– १ लाख ३८ हजार मेट्रीक टन कोळशाची गरज, पण ८० टक्के मिळतोय
-
राणा दांपत्य यांच्या निवासस्थानी पोलिसांचा 24 तास बंदोबस्त..
अमरावती :राणा दांपत्य यांच्या निवासस्थानी पोलिसांचा 24 तास बंदोबस्त..
हनुमान चालीसा च्या मुद्द्यावरून मुंबईच्या तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी 23 तारखेला चांगलाच राडा केला होता
यात एका शिवसैनिकाने दगडफेक सुद्धा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
पुढील काळातही राना दाम्पत्याच्या निवास्थानी अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पाच पोलिसांचा 24 तास बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. नुकतीच पोलिसांनी राणा यांच्या निवास स्थानी तंबू उभारला
.यात एक पोलीस अधिकारी व चार पोलीस कर्मचारी राहणार आहेत
-
औरंगाबादची राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी संघटना आजही ठाम आहे
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी 16 अटींचे उल्लंघन केल्यास सभेत महापुरुषांच्या नावाने घोषणाबाजी करणार
– औरंगाबादची राज ठाकरेंची सभा उधळण्यावर भीम आर्मी संघटना आजही ठाम आहे
– महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते औरंगाबादला दाखल होणार
– सभेतील भाषणात राज ठाकरेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास भर सभेत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देणार असल्याचा इशारा
– भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळेंची सोलापुरात माहिती
-
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज ऐवजी उद्या सुनावणी पार पडणार आहे.
मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर (bail Application) आज ऐवजी उद्या सुनावणी पार पडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचं कल्म लावण्यात आलं. दरम्यान, राणा दाम्पत्याकडून मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती. या सुनावणीत राणा दाम्पत्याला बेल मिळणार की जेलमध्येच (Jail or Bail) राहावं लागणार, या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची शक्यता होती. मात्र ही सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयात लेखी युक्तीवाद स्वीकारल्यानंतर कोर्ट जामीन अर्जावर आज सुनावणी करणार होतं. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी 26 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीनंतर याबाबतची माहिती दिली होती. फक्त जामीनच नव्हे, तर घराचं जेवण मिळावं, यासाठीही देखील राणा दाम्पत्यानं अर्ज केला होता. त्यावरही उद्या होणाऱ्या सुनावणीत नेमका काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. विशेष सरकारी वकिलांकडून राणा दाम्पत्याला जामीन मिळू नये, यासाठीआज प्रयत्न होताना पाहायला मिळण्याची शक्यताय.
-
हिंदुत्व आम्ही सोडणार नाही – चंद्रकांत खैरे
हिंदुत्व आम्ही सोडणार नाही
राज ठाकरेंच्या बाबतीत लोकांना माहित आहे
बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्यावरती लोकांचं प्रेम आहे
चंद्रकांत खैरेंचा राज ठाकरेंना टोला
-
मनसेच्या सभेला दोन दिवस बाकी
मनसेच्या सभेला दोन दिवस बाकी
मनसैनिकांकडून सोशल मीडीयावर प्रचारबाजी
तुम्ही कोण आहात हे आतून बघा स्वाभिमान गहाण टाकू नका
ऐतिहासिक सभेला दोन दिवस बाकी अशा आशयाचे पोस्टर व्हायरल
मनसैनिकांकडून जोरदार तयारी. सुरू
-
राज ठाकरेंच्या विषयावर विद्यार्थ्यांना पीएचडी करता येईल – संजय राऊत
वारंवार त्यांची आर्थिक कोंडी केली जाते.
बिगर भाजप राज्यांना त्रास दिला जात आहे
त्या दिवशी महाराष्ट्रात अनेक सभा आहेत
औरंगाबाद पोलिस तुम्हाला उत्तर देतील
ज्याने देशाचा पैसा गोळा केला आहे
दिलासा घोटाळ्याचे लाभार्थी आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे
पंतप्रधान एका पक्षाचे नसतात, ते देशाचे नेते आहेत.
महाराष्ट्र सरकार नेहमी कायद्याचं पालन करत. राजकीयदृष्ट्या भोंग्यांचा विषय तापवण्याचा प्रयत्न आहे. योगी कोण भोगी कोय, हा संशोधनाचा विषय आहे.
-
पुण्यात उन्हाचा कडाका वाढला, गुरुवारी नोंदवलं गेलं 41 अंश 8 सेल्सिअस तापमान
पुणे
पुण्यात उन्हाचा कडाका वाढला…उकाड्याने पुणेकर हैराण
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमानात 1.2 अंशांनी वाढ झाली
पुण्यात गुरुवारी नोंदवलं गेलं 41 अंश 8 सेल्सिअस तापमान
आज शहरातील तापमानचा पारा पोहोचणार 42 अंशावर
-
मनसेने भोंगा चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध केलाय
मनसेने भोंगा चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध केलाय
3 मे ला संपूर्ण देशात मनसे हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करणार आहे.
मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या चित्रपटाचे सर्व हक्क घेतले आहेत. तसा कायदेशीर करार त्यांनी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शकाबरोबर केलाय.
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच आलं समोर
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याच आलं समोर
वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी अजित पवारांनी भरला 27 हजारांचा दंड
अजित पवारांच्या पाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सुनिल शेळके वाहतुकीचे नियम मोडण्यात आघाडीवर
चंद्रकांत पाटलांकडे दंडाच्या रकमेची सर्वाधिक 14 हजार 200 रुपयांची थकबाकी
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना 5 हजार 200 तर, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी करण्यात आलाय 600 रुपये दंड
-
लसीकरणात नाशिक जिल्हा राज्यात 14व्या स्थानी
नाशिक – लसीकरणात नाशिक जिल्हा राज्यात 14व्या स्थानी
12 ते 14 वयोगटातील लसीकरणात नाशिक राज्यात दुसऱ्या स्थानी
57 लाख 40 हजार 847 लोक लसीकरणास पात्र ठरले
12 ते 14 वयोगटातील 2 लाख 21 हजार 842 बालक पात्र
-
पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
नाशिक – पुढील तीन दिवस उष्णतेची लाट
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पारा राहणार 40 अंशा पुढे
वाऱ्याचा वाहण्याचा वेग कमी झाल्याने वाढली उष्णतेची लाट
पुणे हवामान विभागाने सांगितल्यानुसार अंदाज
-
अमित राज ठाकरे येणार औरंगाबाद दौऱ्यावर
अमित राज ठाकरे येणार औरंगाबाद दौऱ्यावर
राज ठाकरे यांच्या सभेसाठी अमित ठाकरे करणार औरंगाबाद दौरा
आज दुपारनंतर अमित ठाकरे दाखल होणार औरंगाबाद शहरात
अमित ठाकरे करणार सभेच्या तयारीची पाहणी
कार्यकर्त्यांच्या बैठकांनाही लावणार उपस्थिती
-
राज ठाकरेंच्या सभेला 2000 पोलिसांचा वेढा
राज ठाकरेंच्या सभेला 2000 पोलिसांचा वेढा..
10 -15 HD CCTV कॅमेरे असणार प्रवेशद्वारावर..
सभेच्या ठिकाणी असणार 1500 पोलिसांचा बंदोबस्त..
इतर जिल्ह्यातून बोलवण्यात आले राज ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलीस..
राज्य राखीव दलाच्या 6 तुकड्या आल्या मागवण्यात..
-
राज ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्णत्वाकडे
राज ठाकरे यांच्या सभेची तयारी पूर्णत्वाकडे
स्टेज बॅरिगेटिंग आणि आसन व्यवस्थेचे काम वेगाने सुरू
80 मंजुरांच्या साहाय्याने रात्रंदिवस सभेचे काम सुरू
बॅरिगेटिंग आणि सुरक्षा कक्षाचे काम पूर्ण
फक्त स्टेज आणि साउंड सिस्टीमचे काम बाकी
उर्वरित कामेही वेगात सुरू
-
नागपूर पोलिस भवनच्या कार्यक्रम पत्रिकेत तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव
– नागपूर पोलिस भवनच्या कार्यक्रम पत्रिकेत तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव
– आज नागपूर उपमुख्यमंत्री अजीत दादा आणि गृह मंत्र्यांच्या हस्ते पोलीस भवनचं लोकार्पण
– आजच्या कार्यक्रमात सन्मानिय उपस्थितांमध्ये अनिल देशमुख यांचं नाव
– कारागृहात असलेल्या अनिल देशमुख यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव असल्याने चर्चेला उधान
-
पारा वाढला, विदर्भात २ मे पर्यॅत ॲारेंज अलर्ट जारी
– पारा वाढला, विदर्भात २ मे पर्यॅत ॲारेंज अलर्ट जारी
– हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट कायम
– विदर्भातील अकोला, चंद्रपूर, वर्धा, ब्रम्हपूरीचं तापमान ४५ पार
– नागपूर, यवतमाळ आणि अमरावतीचा पारा ४४ पार
– पुढील काही दिवसांत विदर्भात तापमान वाण्याची शक्यता
-
पाच राज्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट तीव्र झाली असून पाच राज्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे राजधानी नवी दिल्लीचे तापमान सध्या 45 डिग्री वर गेलं असून एक मे पर्यंत उष्ण लहरींची ही परिस्थिती कायम राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे राजस्थान हरियाना उत्तर प्रदेश आणि ओरिसा या राज्यांनाही उष्ण लहरींचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात दिसून येण्याची शक्यता आहे
-
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंहगडावर इलेक्ट्रिक बस धावणार
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंहगडावर इलेक्ट्रिक बस धावणार
बस सुरू झाल्यानंतर गडावरील खासगी वाहनांना घाट रस्त्यावर प्रवेश मिळणार नाही
गडाच्या पायथ्याला गाडी लावून पर्यटकांना बसने सिंहगड सर करता येणार
बसच्या नव्या पर्यायामुळे सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगड घाटात होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे
गडावर बसच्या चार्जिंग स्टेशनचेही काम झाले पूर्ण
-
मुंबई, पुण्यामध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प
करोनाप्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसला राज्यातील 15 ते 59 या वयोगटातील नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद
संपूर्ण राज्यात आतापर्यंत फक्त 75 हजार नागरिकांनी घेतला बुस्टर डोस
मुंबई, पुण्यामध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प
तर आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यासह 18 जिल्ह्यांमध्ये अद्याप एकाही नागरिकाने हा डोस घेतलेला नाही
राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांची माहिती
Published On - Apr 29,2022 6:36 AM