Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या भेटीसाठी नितीन गडकरी शिवतीर्थवर
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज रविवार 3 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बनेश्वर वन उद्यानाच्या शेजारी असलेल्या शिवगंगा नदीपात्रात, चंदन तस्करांनी पाण्यात लपवलेले चंदनाचे १५ ते १६ ओंडके आढळून आलेत. भोरच्या नसरापूर पोलिसांनी हे चंदनाचे ओंडके जप्त केलेत. या चंदनाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात लाखोंच्या घरात आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
राज ठाकरेंच्या भेटीसाठी नितीन गडकरी शिवतीर्थवर
राज ठाकरेंच्या भेटीसाठी नितीन गडकरी शिवतीर्थवर
राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
मनसे भाजप जवळीक वाढणार
राज ठाकरेंच्या भाषणाचं भाजप नेत्यांकडून कौतुक
-
संजय पांडे यांच्याकडून 7 पोलिसांच्या बदल्या
मुबई पोलीस कमिशनर संजय पांडे यांनी साथ पोलिसांची केली ताडखा फडकी केली बदली.
समता नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हाके पोलीस निरीक्षक पडवळ, पोलीस उपनरीक्षक व्यवहारे,आणि चार पोलीस
अंमलदर यांची तडखा फडकी बदली
यांची बदली नायगाव सशस्त्र विभागत करण्यात आली.
पासपोर्ट नुतनी करण करण्या साठी गेले असता एका इसमाला मारहाण केली व शिव्या घातल्या
प्रकरणी या इस्माच्य विरोधात कर्नाटक येथे गुन्हे आहे असे पोलिसांचे म्हणणे होते.
-
-
सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी
– सोलापूर शहराजवळील कुंभारी गावात पडतोय मुसळधार पाऊस
– सोलापूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
– अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात
– तर पावसामुळे शहरातील नागरिक सुखावले
-
नाशिक रेल्वे दुघर्टनेत कुठलाही मृत्यू नाही : मध्य रेल्वे
नाशिक रेल्वे दुघर्टना ह्यात कुठलाही मृत्यू नाहीप्रवाशासाठी बस उपलब्ध केले आहे हेल्पलाईन नंबर उबलब्ध केले आहे रिलिप ट्रेन घटनास्थळी पोहचली आहे दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेमध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांची माहिती -
ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य : अजित पवार
ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य आहे
अस भाग्य ठराविक जणांना मिळत
राज्यात 9 ते 10 लाख ऊसतोड कामगार आहेत
त्याच्या शिक्षण आरोग्य, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे
गर्भायश काढण्याच्या घटना घडतायेत
महामंडळाच्या मार्फत आता ऊसतोड कामगारांना ओळख मिळायला हवी
तात्पुरती घरी कशी देता येतील, पेंशन देता कशी येईल यावर विचार करावा लागेल
ऊसतोडणी करता आधुनिक साधन देणं, या साधनांच्या निर्मितीचा विचार करावा लागेल
ऊसतोड कामगारांची सावकारांकडून मोठी आर्थिक पिळवून होत असल्याचं लक्षात आलं आहे
आता ऊसतोड कामगार ही पद्धतच बंद झाली पाहिजे असं वाटत
नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे
किती वर्षे या लोकांनी ऊसच तोडायचा
जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टना माग 10 रुपये दिले नाही तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही
सरळ देत नसतील तर बोट वाकड करावं लागतं
अजित पवार सारखा पण देतो
अजित पवार यांचा साखर कारखानदारांना इशारा
ऊसतोड कामगारांचा जीवावर मोठे होता आणि त्यांच्यांसाठी टनामागे 10 रुपये द्यायला नाही म्हणता, काही तरी वाटलं पाहिजे, सगळं इथेच सोडून जायचं आहे
जो चुकीचे वागेल त्याबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील
-
-
ऊसतोड कामगारांच्या बाबतीत अनेक अभ्यास झाला : अजित पवार
कोरोनामुळे पहिले दोन वर्षे त्या कामाला महत्व देत होता
माणसाचा जीव वाचवायला प्राधान्य देत होतो
काल पासून नियम काढून टाकलेत पण काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे
ऊसतोड कामगारांच्या बाबतीत अनेक अभ्यास झाला
पण 20 वर्षे कोणाला काही करता आलं नाही
अनेकांना काही करता आलं नाही
पण मविआने हे महामंडळ अस्तित्वात आणलं
ही लोक किती कष्ट घेतात हे ज्यांच त्याला माहिती
प्रतिकूल परिस्थितीत ही सगळी लोक काबाडकष्ट करतात, त्यातून साखर कारखान्यांना ऊस पुरवतात
-
महाराष्ट्रात ऊस कारखाने हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतात : बाळासाहेब थोरात
महाराष्ट्रात ऊस कारखाने हे ऊसतोड कामगारांच्या जीवावर चालतात
अनेक कष्ट हे ऊसतोड कामगार घेतात
त्यांच्या घामावरच ही अर्थव्यवस्था चालते हे विसरुन चालणार नाही
साखर कारखाना असला तरी तुमच्याबद्दल आपुलकी ठेवणारे आम्ही आहोत
गोपीनाथ मुंडे हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री ठेवणारं व्यक्तिमत्व होत
-
हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी : धनंजय मुंडे
नाव जरी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच आहे
त्यांनी तहहायत ऊसतोड मजुरांसाठी दिली
त्यांच्या कार्यकालात त्यांना हे महा मंडळ देणं शक्य झालं नाही
त्यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांना संधी मिळाली पण त्यांनाही हे महामंडळ निर्माण करता आले नाहीत
कदाचित हे महामंडळ माझ्या आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हावं, ही नियतीची इच्छा असावी
आज मुंडे साहेबांनी ही आदरांजली आहे
ऊसतोड भगिनी आहेत, त्यांचा प्रश्न आहे
चार दिवस कमी होतात म्हणून आमच्या भगिनीच गर्भायश काढावा लागत असेल तर काय तोंड घेऊन आम्ही मंत्रिपदी बसलोय
आमच्या भगिनींच्या आरोग्याची काळजीही महामंडळ घेईल
-
माझा जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे बोलतायेत माझा जीवनातला आजचा क्षण सुवर्ण अक्षराने लिहावा असा आहे माझा जन्म ऊसतोड मजुराच्या पोटी झालाय माझा जीवनातला हा दिवस अजित पवार यांच्या शिवाय शक्यच नव्हता हे प्रामाणिकपणे सांगतो मागच्या सरकारच्या काळात मंडळ आलं गेलं
-
विदर्भात रिफायनरी प्रकल्प यावा, आशिष देशमुख ठाम
विदर्भात रिफायनरी व्हावी या साठी मी काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत याना भेटलो
त्यांना विदर्भात ही रिफायनरी यावी यासाठी आग्रह केला त्यांनी माझं म्हणणं मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवल
आता सगळ्या उद्योग संगठण सुद्धा पुढे आल्या आहे
नानार मध्ये त्याला विरोध होत आहे म्हणून तो विदर्भात यावा
विदर्भाचा विकास यामुळे होईल
वेगळा विदर्भ नाही झाला तरी चालेल मात्र रिफायनरी प्रकल्प विदर्भात यायलाच पाहिजे
-
शिवसेना मुंडे परिवार, आणि त्यांचा पक्ष भाजप आम्ही संघर्ष करून अनेक गोष्टी मिळवल्या : उद्धव ठाकरे
नव्या वर्षाची सुरवात झालीये, सर्वांना शुभेच्छा देतो
महाविकास आघाडीच्या शुभेच्छा कोरड्या नसतात, जनतेच्या आयुष्यात सुखा समाधानाचे दिवस आणण्याच्या असतात
या महामंडळाला गोपीनाथ मुंडे यांच नाव दिलं आहे
पक्षभेद विसरून महाविकास आघाडी कस काम करते याच हे उदाहरण आहे
शिवसेना मुंडे परिवार, आणि त्यांचा पक्ष भाजप आम्ही संघर्ष करून अनेक गोष्टी मिळवल्या
जाऊद्या त्या गोष्टीवर मला बोलायचं नाही
मी मुबंईच्या बाहेर अजुन कार्यक्रम घेतले नाहीत
लवकरच मुबंईचा बाहेर कार्यक्रम घेईल, धनंजय मुंडे यांनी बीड मध्ये ऊसतोड कामगारांचा मेळावा घ्यावा त्याला मी येईल
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयता द्यायच्या ऐवजी वही पेन पुस्तक देणार
या नुसत्या घोषणा नाहीत
हल्लीच जग हे दिखाव्याच झालं आहे
पण आम्ही तसं करत नाही
-
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उदघाटन सोहळा सुरु
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उदघाटन सोहळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन राहणार उपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडणार उदघाटन सोहळा
थोड्याच वेळात होणार कार्यक्रमाला सुरवात
-
अकोल्यात सोयाबीन चोरट्यांवर बेड्या!
अकोल्यात LCB पोलिसांची मोठी कारवाई
चोरीचा 400 क्विंंटलच्यावर सोयाबीन केले जप्त
आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
शेगाव येथून आणले सोयाबीन
बाळापूर पोलीस स्टेशन मध्ये आहे सोयाबीन चोरीची तक्रार
बाळापूर तालुक्यातल्या अंबुजा सोया फॅक्ट्रीमधील सोयाबीनची चोरी
चार आरोपिंना अटक केली असून 8 आरोपी फरार
-
राज ठाकरे सगळ्यांना पुरून ऊरतील : अखिल चित्रे
आमचा बाण योग्य ठिकाणी लागला, वरुण सरदेसाईंनी सचिव नही काबिल बने असं म्हणेन, त्यांना थ्री इडियटचे डायलाॅग्ज सध्या फार आवडतात…
– अचानक ऊगवले, खडबडून जागे झाले, सामनावीर यांना कॅमेरा दिसला की सवय आहे ते सुरू होतात… इतके वर्ष कुणाचा भोंगा वाजवत होता…
– एक्स पार्टिसोबत जाणार नाहीत, ते व्हिडीयोही व्हायरल होत आहेत,
– सुजात आंबेडकरांना बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा पाठ आहेत का ? त्याचं आचरण करावं, न पाहता त्या बोलून दाखवाव्यात, नंतर इतरांना सल्ले द्यावे… imp
– छत्रपतींनाही आदीलशाही, मोगल, कुतीबशाहीचा सामना करावा लागला… राज ठाकरे सगळ्यांना पुरून ऊरतील, हे सगळे वेगवेगळ्या दिशेनं वार करत असतील तर मनसे खंबीर आहे…
-
गोव्यातील सरकारचं खातेवाटप जाहीर
डॉ प्रमोद सावंत, मुख्यमंत्री : गृह, वित्त, दक्षता, कार्मीक, राजभाषा
विश्वजीत राणे : आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने
माविन गुदिन्हो : उद्योग व कौशल्य विकास, पंचायत, वाहतूक, राज शिष्टचार व संसदीय व्यवहार
रवी नाईक : कृषी, हस्तकला व गॅझेटर, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार
नीलेश काब्राल : संसदीय कार्य, पर्यावरण, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम
सुभाष शिरोडकर : जलस्रोत, प्रोव्हेदोरीया, सहकार
रोहन खंवटे : पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, प्रिंटिंग स्टेशनरी
गोविंद गावडे : क्रीडा, कला संस्कृती, आरडीए
बाबुश मोंसेरात : महसूल, कामगार, कचरा व्यवस्थापन
-
सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत सक्रिय
सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीत सक्रिय
कुर्ला परिसरात वंचितची मोठी रॅली
राजकीय वाटचाल सुरु
वंचित राहिलेल्या समजाला सत्तेत नेणं ध्येय असल्याचं सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य
-
संजय राऊतांचा भोंगा सकाळी 9 वाजता वाजतोच, त्याला काय महत्त्व द्यायचं : संदीप देशपांडे
ज्यांची अक्कल घुडग्यात त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये, सध्या ते बिझी आहेत, अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत त्यांचा हिशोब इडीला द्यायचाय, हजारो कोटीं मनपाचे खाल्ले त्याचा हिशोब द्यायचाय, राज साहेब जे बोलले ते झोबलेले दिसतंय… राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी 9 वा. वाजतोच… त्याला काय महत्व द्यायचं. : संदीप देशपांडे
-
गोव्यात डॉ प्रमोद सावंत सरकारचे खातेवाटप रखडलं
गोव्यात डॉ प्रमोद सावंत सरकारचे खातेवाटप रखडलं
खातेवाटप जाहीर करण्यासाठी ठरला होता गुढीपाडव्याचा मुहूर्त
काही मंत्र्यांच्या नाराजीमुळे खातेवाटप जाहीर होऊ शकलं नाही
उद्या खाते वाटप जाहीर होण्याची शक्यता
मंत्रिमंडळ शपथविधी होऊन आठ दिवस लोटले तरी खातेवाटप जाहीर झालेलं नाही
मंत्र्यांच्या खात्यांबाबत गूढ कायम
राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी सल्लामसलत करून मंत्र्यांची खाती निश्चित केली जाणार
सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, उद्योग, पर्यटन या खात्यांसाठी पक्षात चढाओढ, मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग
गृह आणि वित्त खाती मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवणार
-
Raj Thackeray वर बोलू नका असदुद्दीन ओवेसीचा फतवा
औरंगाबाद – काल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या (Masjid) बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. काल झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसीनी (Asaduddin Owaisi)फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही असं ओवेसी यांनी सांगितलं आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
-
राज ठाकरेंवर बोलायला ओवैसीची बंदी
औरंगाबाद ब्रेकिंग :-
राज ठाकरेंवर बोलायला ओवैसीची बंदी
राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसींच्या फतवा
असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं एमआयएम कार्यकर्त्यांना फर्मान
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची माहिती
राज ठाकरे यांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ नका
एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काढले फर्मान
-
वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा (ढोक) शिवारात आढळले सटेलाईटचे तुकडे
– वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघेडा (ढोक) शिवारात आढळले सटेलाईटचे तुकडे
– शनिवारी रात्री आकाशातून पडले आहे साहित्य
– आज सकाळी वाघेडा (ढोक) शिवारात आढळले साहित्य
– सिलेंडरच्या आकाराचे साहित्य असून आतून आहे पोकळ
– बाहेरन त्याला काळ्या धाग्याचे आहे आच्छादन
– घटनास्थळी समुद्रपूर पोलीस दाखल
– साहित्य जप्त करून पोलीस नेणार असल्याची माहिती
– जवळपास तीन ते चार किलो वजनाचा आहे साहित्य
– वाघेडा (ढोक) शिवारात नितीन सुरटे यांच्या शेतात आढळले साहित्य
– नितीन सुरटे यांनी पोलिसांना दिली माहिती
-
ठाणे स्थानक बाहेर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी सुरू
ठाणे स्थानक बाहेर मोदी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी सुरू
हातामध्ये फलक आणि सेनेचे झेंडे घेऊन आंदोलक आक्रमक
-
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफांना टोला
थेट पाइपलाइनचे पाणी पिण्यासाठी, ना की अंघोळीसाठी
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्री हसन मुश्रीफांना टोला
कोल्हापूर मधील थेट पाइपलाइनच्या योजनेचे पाणी हे पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही; असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज रुईकर कॉलनी येथे कॉफी पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपा उमेदवार सत्यजित कदम, सहसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मति मिरजे यांच्या सह भागातील नागरिक उपस्थित होते.
माननीय आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. हे दाखवताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती की, पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू. पण मुळात थेट पाइपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुश्रीफ सध्या गडबडले असल्याने ते अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण जगात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांनी हिंदुंचे मानबिंदू पुनर्स्थापित करुन, हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून दिली. यापूर्वी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंचे दमन केले जात होते. तथाकथित धर्मनिरपेक्ष मंडळींच्या घरात धार्मिक पूजाअर्चाचे अतिशय कटाक्षाने पालन होत होते. पण इतरांना मात्र हिंदुंना धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली पूजाअर्चनेला मज्जाव केला जात होता. त्यामुळे या ढोंगी लोकांपासून माननीय मोदीजींनी सर्वांना मुक्त करुन, त्यांना आपली आराधना करण्याचे स्वतंत्र्य मिळवून दिले आहे.
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, विधानसभेची पोटनिवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होण्याची गरज होती. पण कॉंग्रस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने काहीही केले नाही. उलट कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा भुर्दंड मारला. पण माननीय देवेंद्र फडणवीस आणि दादांनी ४७३ कोटी रूपये देऊन, टोलपासून मुक्त केले. थेट पाइपलाइनची घोषणा करुन आता किती वर्ष झाली. पण आता हा पांढरा हत्ती ठरतोय का? अशी शंका निर्माण होत आहे. कारण थेट पाइपलाईनची घोषणा होऊन बरीच वर्षे झाली, तरी अजून कोल्हापुरकरांना पाणी मिळाले नाही. उलट त्याची कॉस्ट दिवसागणिक वाढत आहे.”
सत्यजित कदम यांनीही महापालिकेच्या कारभाराचा हिशोब मांडला. काॅंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रसेने कोणतीही विकासकामे केली नाहीत. त्यामुळे शहराचा विकास खुंटला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
-
लाकडी लिबोडी पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही सर्व प्रयन्त करत आहेत – अजित पवार
अजित पवार –
– साहेब एवढे चांगले आहेत तर पुतण्या थोडा तरी बरा असेल, अस असताना इंदापूरकरानी मला खासदारकीला मोठं मताधिकक्य दिल होत
– आज दूध 35 रुपये लिटर आहे, दूधाचा व्यवसाय बदलाय आहे,
– लाकडी लिबोडी पाणी पुरवठा योजनेसाठी आम्ही सर्व प्रयन्त करत आहेत,
– ते मंजूर आधीपासून आहेत, कुणाच्या तोंडातला घास काढून घ्यायचा नाही
– आज दत्ता भरनेला विरोध केला होता, त्यांच्या सरकारने आपली वाट लावली होती,
– आपलं पाणी काढून घेतला होतं, सर्व धुरळा उडाला असता,
– माढाच्या खासदारांचे भाषण ऐका,
-
हिंदू म्हणजे बुरसटलेला अस चित्र निर्माण केलं गेलय – चंद्रकांत पाटील
उद्या 9 आणि 10 तारखेला देवेन्द्र फडणवीस कोल्हापूर मध्ये प्रचारासाठी असतील
निवडणुकीला आम्ही विकासाच्या मुद्याकडे नेतोय
निवडणुकीच्या काळात घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले जात आहेत
माझी पक्की माहिती आहे peytm वरून पैसे पाठवण्याचा पर्यंत होतोय
या बाबत आम्ही ईडी ला पत्र लिहणार आहे.
दारू दुकानदारांची मिटिंग झाली.अधिकऱयांनी त्यांना दम दिलाय
हे आम्ही सहन करणार नाही ………..
On राज ठाकरे
सामान्य हिंदू ला मनामध्ये आनंद होणार भाषण
मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं
हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे.
हिंदू म्हणजे बुरसटलेला अस चित्र निर्माण केलं गेलय
कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली
फक्त आम्ही एकटे विश्वासघात झाला असे म्हणत होतो आता आणखी ही कोणी म्हणतंय
जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सगळं जे सांभाळायच आहे ते हिंदूनी अशी भावना झाली आहे
चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी बाबत राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्याला 200 टक्के सहमत आहे
त्यांच्या जातीय वादाची अनेक उदाहरण आहेत
प्रत्येक गोष्टीत जात आणण हे काँग्रेस ने केलं नाही
या उलट राष्ट्रवादी आहे
-
बारामतीकराना सकाळचा कार्यक्रमाची सवय झालीय
अजित पवार –
– 2 वर्षात अनेक कार्यक्रम थांबलेत,
– मी सकाळी 6:30 वाजता कार्यक्रम आलोय,
– बारामतीकराना सकाळचा कार्यक्रमाची सवय झालीय,
– तीन विचारांचे सरकार आलं आहे,
– काही जण म्हणत होते हे सरकार पडणार मात्र आज अडीच वर्षे झालेत,
– उद्धव ठाकरेंनी खुप चागल्या प्रकारे हाताळली
– पक्ष प्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्याना अस वाटेल आमच्याकडे दुर्लक्ष होईक का ? मात्र त्यांच्या आत्मसम्मानाला धक्का लागणार नाही याची शाश्वती देतो,
– काही वेळेस जाती जाती अंतर पाठवायचं काम केलं जातं
– काही वेगळ्या प्रकारचे चित्रपट दखवले जातात,
– पूर्वी काळात काय झालं तेच पुन्हा पुन्हा दाखवायाचे विकासापासून दूर घेऊन जायचं
-
राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका
अमरावती ब्रेकिंग*
मंत्री यशोमती ठाकूर 121
राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची टीका.
भाजप आणि राज ठाकरे यांच्यात अँक्जेमेंट झालेली आहे का? अशी भीती वाटायला लागली आहे.यशोमती ठाकुरांचा राज ठाकरे यांना टोला..
राज ठाकरे यांच्या कडून हे अपेक्षित नाही आहे, इलेक्शन संपल व मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली.
राज ठाकरे हे इतकं खोटं कस काय बोलू शकतात याच आश्चर्य वाटत.मंत्री यशोमती ठाकुर….
-
अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते – संजय राऊत
अक्कल दाढ इतक्या उशिरा का ?
टाळ्या सुध्दा भाजपाच्या होत्या आणि स्क्रिप्ट सुध्दा
भोंग्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ
शरद पवारांच्याकडे का जात होते
बहुमत निर्माण झालं म्हणून सरकार निर्माण झालं
मुख्यमंत्र्यांनी काल उद्घाटनं केली
फक्त टीका करायची त्याने काय मिळतं
भारतीय जनता पक्षाची मळमळ दुसऱ्याच्या मुखातून बाहेर काढते
अशा लोकांसाठी आमच्याकडे वेळ नाही
शरद पवारांच्या पददर्शन घ्यायला का केला होता.
त्यांनी त्याचं काम केलं आहे
त्यांना महाराष्ट्रातलं चांगलं काम दिसलं नाही
-
आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला काय – शरद पवार
आमच्यात कुणाचं काय व्हावं याची चिंता भाजपला काय
आम्ही तिन्ही एकत्र आहोत
लोकांना सत्तेचा गैरवापर आवडत नाही
नेत्यांपेक्षा नागरिकांमध्ये लोकशाही बद्दल जास्त प्रेम असत
एका पोलीस अधिकाऱ्याच्या आरोपावरून कारवाई केली जाते
कुणाच्यातरी सांगण्यावरून कारवाई केली जाते हे लोकांना समजत
याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल
-
आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाचा गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे – शरद पवार
आघाडीमध्ये असलेल्या कोणत्याही पक्षाचा गैरसमज असेल तर तो दूर केला पाहिजे
स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर जाऊ नये अशी माझी भूमिका आहे
स्वाभिमानी सारखी संघटना आमच्या सोबत हवी आहे
केंद्र सरकारची भूमिका शेतकरी विरोधात आहे अशा वेळी स्वाभिमानी सारखी संघटना हवी
मला काही राजू शेट्टी यांचे पत्र मिळाले नाही
-
लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधीपक्ष सक्षम असायला हवा – शरद पवार
लोकशाही मजबूत करायची असेल तर विरोधीपक्ष सक्षम असायला हवा
नाहीतर पुतीन सारखं होऊन बसेल
सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलो नाही
तपास यंत्रणांचा वापर आम्ही कधी केला नाही
कोल्हापूरला कधी येऊन गेले तर मी पाहुणे येऊन गेले का असं विचारतो
ईडी हा शब्द कुणाला माहीत होती का? आज याच्या घरी उद्या त्याच्या घरी जातात
आम्ही तुमच्याकडे येणार आहोत रस्त्यात काहीतरी उभा करा असं सांगितलं जातं असं ऐकायला मिळतंय
काहीतरी आर्थिक घडामोडी घडत आहेत असं ऐकायला मिळत आहे
यावर केंद्र सरकारने नियंत्रण आणले पाहिजे
-
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढतात हे कधी पाहिलं नव्हतं – शरद पवार
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज वाढतात हे कधी पाहिलं नव्हतं
भाजपचे राज्य आल्यानंतर भरमसाठ किमती वाढत आहे
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे
या सगळ्याची किंमत सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागते
मात्र या मुद्द्याकडे केंद्र सरकार बोलत नाही
एकेकाळी भाजपचे नेते कांद्याच्या माळा घालून आले होते
सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका या सत्ताधारी पक्षाने घेतली आहे
आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी वेगळं वातावरण जाणीवपूर्वक केला जातो
काश्मीर फाईल हा चित्रपटावरून नागरिकांत संताप निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो
ही घटना घडली त्यावेळी सरकार कुणाचं होतं, त्यांना कुणाचा पाठींबा होता हे देखील पहा
भारतात राहायचं असं म्हणणाऱ्या मुस्लिम आणि हिंदूंवर देखील हल्ले केले
तिथल्या लोकांनी नागरिकांना स्थलांतरित होण्यासाठी साधनं पुरवली होती
हा इतिहास असताना ही फिल्म अशी बनवणं चुकीचं
जनमानसांत विषारी भावना निर्माण करण्याची भूमिका यांची आहे
-
ससून रुग्णालयात चालत होता जुगार
ससून रुग्णालयात चालत होता जुगार.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे स्थानिक पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
बंडगार्डन परिसरात बड्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा.
मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त तर 20 जण ताब्यात …
ससून रुग्णालयात चालत होता जुगार
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टूबीएचके पब मध्ये युवतीचा झालं होता विनयभंग
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा दुसरा धक्कादायक प्रकार
दोन दिवसांपूर्वी याच परिसरात 2 बीएचके हॉटेलच्या पार्किंगमध्ये महिला विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या..त्यानंतर आता जुगार अड्डा….
-
अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल ६.६३ रुपयांनी महागले
पुणे
गेल्या अकरा दिवसांत पेट्रोल प्रतिलिटर ७.५ रुपयांनी, तर डिझेल ६.६३ रुपयांनी महागले. शहरात
शनिवारी पेट्रोल प्रतिलिटर ११७.४, तर डिझेल ९९.७७ रुपये झाले
यामुळे डिझेलदेखील आता १०० रुपयांच्या घरात पोहोचले
-
हेल्मेट सक्ती च्या पहिल्या दिवशी 186 जणांवर कारवाई
नाशिक – हेल्मेट सक्ती च्या पहिल्या दिवशी 186 जणांवर कारवाई
शहरात विविध ठिकाणी विना हेल्मेट दुचाकी चालकांवर केली कारवाई
बेशिस्त वाहन चालकांकडून 93 हजार रुपयांचा दंड वसूल
नाशिककरांची अद्यापही वाहन चालविताना हेल्मेटला नापसंती
-
मुंबई-पुण्यानंतर आता ईडीचे ग्रामीण भागातही चौकशी सत्र
– मुंबई-पुण्यानंतर आता ईडीचे ग्रामीण भागातही चौकशी सत्र
– सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाल्याची सुत्रांची माहिती
– साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलणे, शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची माहिती
– हे संपूर्ण प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती
-
एका नोटिशीने एवढं भाषण बदलले माहिती नव्हतं – सुप्रिया सुळे
– एका नोटिशीने एवढं भाषण बदलले माहिती नव्हतं,
– मात्र कितीही नोटिसा आल्या तरी आम्ही घाबरणार नाहीत,
– लाव तो व्हिडीओ नंतर एवढं भाषण कस काय बदलले,
– राष्ट्रवादीमुळे जातीपातीचे राजकारण सुरू झालं हे त्यांनी याआधी पण म्हटलं आहे, त्यात नवीन काही नाही,
– शरद पवारांवर टीका केल्यावर हेडलाईन होते
-
साताऱ्यात कमी व्याजाने कर्ज देतो असे सांगून लघुउद्योजकांना लाखोंचा गंडा
साताऱ्यात कमी व्याजाने कर्ज देतो असे सांगून लघुउद्योजकांना लाखोंचा गंडा….
तीन महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल….
एका संशयित महिलेला पोलिसांनी केली अटक…
आरोपी महिलांकडून आत्तापर्यंत 4 जणांची 6 लाख 7 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड
-
युपीएचं अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार
युपीएचं अध्यक्षपद घेणार नाही – शरद पवार
यावेळेला पहिल्यांदा अजित पवारांची निवड झाली.
राज ठाकरे तीन ते चार महिने गायब होतात.
उत्तर प्रदेशचं कौतुक केलं
ते काहीही बोलू शकतात
युपीच्या काळात काय घडलं त्याची कारण वेगळी आहेत
शेतकऱ्यांची आत्महत्या झाली
मोदींच्या संबंधात काय भूमिका मांडली होती हे महाराष्ट्राने पाहली होती.
त्याच्या भूमिकेत सातत्य नसतं
ते अयोध्येला जाणार आहेत
मागच्या निवडणुकीचा आकडा तुम्हाला माहित आहे
मनसेचा निवडणुकीतील आकडा हातावर मोजण्या इतका असतो
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा आकडा रोज वाढतोय
प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो
कांद्याच्या किमती वाढल्या, शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत असतील तर माझा विरोध नाही
अशी फिल्म निघाल्यानंतर पाहिली पाहिजे याचा अर्थ काय समजायचा
त्यातून राजकीय फायदा घ्यायचा
त्याच कामावर लक्ष नाही
देशात विष कसं पसरेल यावर त्यांचं लक्ष आहे
साधारण युक्रेन आणि रशियामध्ये काय
आपण कोणाची बाजू घेतली नाही.
युपीएची जबाबदारी घेणार नाही
मी त्याच्यात पडणार नाही
कुणे पुढे येत असले तर त्यांना मदत करणार
काही वास्तव गोष्टी दुर्लक्षित करून जाणार नाही
कॉंग्रेस देशाच्या प्रत्येक राज्यात जिल्ह्यात आहे
त्या पक्षांना घेऊन काय करायचं असेल तर नक्की करेन
कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे
देशात लोकशाही पक्ष असणं गरजेचं आहे.
आम्ही सगळेजण सत्तेचा गैरवापर करावा यामध्ये वाढलेलो नाही
आजपर्यंत स्वातंत्र्याच्यानतर राजकीय नेत्यांना गोत्यात आणण्यासाठी कोणीही वापर केलेला नाही
सातत्याने आज एजन्सीच्या माध्यमातून टार्गेट केलं जातंय
केंद्र सरकार यावर नियंत्रण लावलं जातं नाही
भाजपाला शिवसेनेची चिंता का ?
आणिबाणीच्या काळात एक निर्णय चुकला
त्याच्यानंतर ज्यांच्याहातात सत्ता गेली, त्यांनी दोन वर्षात सत्ता गेली
अनिल देशमुख यांना चुकीच्या पद्धतीने अटक
देशाच्या एका विचाराच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र करून विचार करून
स्वाभिमानी पक्ष हा आमच्या आघाडीतून बाहेर जावा असं वाटत नाही
नेहमी शेतकऱ्यांची भूमिका मांडणारा प्रश्न
मला काय हातात मित्र मिळालेलं नाही
रोज टीका करायची
आरोप करायचे त्याच्यातून प्रसिध्द व्हायचे हेच त्यातून स्पष्ट होत आहे
-
सोलापुरात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 400 चारचाकी तर 1600 दुचाकींची खरेदी
सोलापुरात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर 400 चारचाकी तर 1600 दुचाकींची खरेदी
– सोलापुरात गुढीपाडव्यानिमित्त वाहनासोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री
– कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर नागरिकांनी केली मोठ्याप्रमाणात खरेदी
– या वाहन खरेदीच्या माध्यमातून तब्बल 45 कोंटीची उलाढाल
– एकीकडे इंधन दरवाढ होत असतानाच दुसरीकडे वाहन खरेदी मात्र मोठ्याप्रमाणात सुरु
-
शेतकऱ्यांनी एकाच दिवशी भरले 5 कोटी रुपये
50 टक्के थकबाकी भरून 100 टक्के थकबाकी मुक्ती चा लाभ घेण्यासाठी 4532 शेतकऱ्यांनी घेतला पुढाकार
शेतकऱ्यांनी एकाच दिवशी भरले 5 कोटी रुपये
महावितरणच्या कृषी धोरणाचा लाभ घेतला शेतकऱ्यांनी
31 मार्च होता शेवटचा दिवस
-
वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता पोलीस अधीक्षकांच्या कर्मचाऱ्यांना सूचना
बुलडाणा
वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता पोलीस अधीक्षकांच्या कर्मचाऱ्यांना सूचना,
उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारी 2 ते 4 सावलीचा आधार घेत सेवा द्यावी,
पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना,
ट्राफिक पोलिसांना ही विशेष सूचना,
टोपी घालूनच सेवा देण्याची सूचना,
-
महिनाभरात शहरात 355 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त
गांधीबाग झोन बनले आहे बंदी असलेल्या प्लास्टिकचे हब
महिनाभरात शहरात 355 किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त
शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा होत आहे सर्रास वापर
एकट्या गांधीबाग 237 किलो प्लास्टिक जप्त
या पोटी महापालिकेच्या शोध उपद्रव पथकाने 38 लाख 5 हजार एवढा दंड केला वसूल
-
ग्राहकाकडून गोळा केलेले 10 लाख रुपये भरलेच नाही
बुलडाणा
ग्राहकाकडून गोळा केलेले 10 लाख रुपये भरलेच नाही,
नांदुरा येथील भारत फायनान्स इंक्युजन लिमिटेड मधील प्रकार,
आरोपी मिलिंद अंभोरे वर अफरातफरीचा गुन्हा दाखल,
आरोपी नांदुरा शाखेत मॅनेजर पदावर कार्यरत होता,
मात्र सदस्यांनी भरलेली कर्ज फी आणि विमा फी शाखेत भरलेच नाही
-
नाशिक सहकारी साखर कारखाना तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा झाला सुरू
नाशिक – नाशिक सहकारी साखर कारखाना तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा झाला सुरू
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या उदघाटन प्रसंगी राजकीय टोलेबाजी
भुजबळांची देखील कारखान्याकडे थकबाकी – आमदार माणिकराव कोकाटे यांचा भुजबळांना टोला
तर, आधी कारखाना बंद का पडला होता याचा शोध घ्या –
छगन भुजबळ यांचा पलटवार
-
नागपूरच्या आपली बसच्या ताफ्यात लवकरच 55 इलेक्ट्रिक बस होणार दाखल
नागपूर च्या आपली बस च्या ताफ्यात लवकरच 55 इलेक्ट्रिक बस होणार दाखल
15 एप्रिल ला 25 बस मिळणार
शहरात सध्या 365 आपली बस धावत आहे
नागपूर स्मार्ट अँड सस्टनेबल सिटी डेव्हलोपमेंट 15 इलेक्ट्रिक मिडी बस
तर केंद्र सरकार कडून 40 बस मिळणार
या बस मुळे नागपूरकरांना दिलासा मिळणार तर सोबतच पर्यावरण रास होणार ना
-
गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यात सट्टा लावणाऱ्या आरोपीना अटक
-पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुंडा विरोधी पथकांने आयपीएल मधील गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल या सामन्यात सट्टा लावणाऱ्या आरोपीना अटक केलीय
-काळेवाडी मधील एका फ्लॅट मध्ये सट्टा घेण्याचे हे काम सुरू होते या प्रकरणी सनी इर्फ भुपेंद्र गिल, रिक्की खेमचंदानी आणि सुभाष अग्रवाल या 3 आरोपीना अटक केलीय
-सनी सुखेजा असं फरार आरोपीचे नाव आहे.विशेष म्हणजे सट्टा खेळला जात असल्याची माहिती आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली होती.त्यांच्या सुचनेनंतर ही कारवाई करण्यात आली
-या कारवाईत 25 लाख रोख, 8 मोबाईल जप्त करण्यात आले.कारवाई नंतर आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ही घटनास्थळी भेट दिलीय
-
आयपीएल सट्टेबाज पोलिसांच्या रडारवर
बुलडाणा
जिल्ह्यात सट्टेबाज बुकींचे पसरले जाळे,
दररोज होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल,
आयपीएल सट्टेबाज पोलिसांच्या रडारवर,
सट्टाबाजाचे हॉटस्पॉट म्हणून चिखली आणि खामगाव ची ओळख,
मोठमोठे मासे यात गुंतले असून सर्वसामान्य नागरिकांची राखरांगोळी
Published On - Apr 03,2022 6:17 AM