Maharashtra News Live Update : इम्रान खान सरकारला मोठा झटका, बहुमत सिद्ध करण्याशिवाय पर्याय नाही
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरूवार 7 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.पुण्यातील महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या शेवटच्या कोरोना रूग्णाला डिस्चार्ज मिळाला. पुणे शहरातील सरकारी रूग्णालयात एकही कोरोना रूग्ण नाही. पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांची माहिती दिली. सध्या पुण्यामध्ये कोरोनाचे 98 सक्रीय रूग्ण असून सर्वजण होम क्वॉरंटाईन मध्ये आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पाकिस्तान संसदेत पुन्हा 9 एप्रिलला मतदान
अविश्वास प्रस्तावावर होणार मतदान
इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाचा काहीसा दिलासा
मात्र इम्रान खान यांना पुन्हा अविश्वास ठरावात बहुमत सिद्ध कराव लागणार
-
चंद्रपूर : कुलरचा शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू
मूल शहरातील गजानन मंदिर परिसरातली घटना,
युग महेश जेंगठे ( वय-5 वर्षे) असं मृत मुलाचं नाव,
आज दुपारी खेळताना युगचा हात कुलरच्या स्टँडला लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला,
युगचे वडील महेश जेंगठे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
त्यांना दोन मुले असून युग हा लहान मुलगा होता.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
-
गोव्याचे मुख्यमंत्री चंद्रकांत पाटलांच्या भेटीला
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर मधील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
-
कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार
धावत्या मेल एक्सप्रेस मधून उतरण्याचा प्रयत्न पडला महागात
ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये येऊन कंत्राटदाराच्या मृत्यू
घटना सीसीटीव्हीत कैद
कंत्राटदाराचे नाव प्रदीप भंगाळे
जळगावहून कल्याणला परतत असताना घडली घटना
-
गुणरत्न सादवर्ते Live
परिवहन मंत्री अनिल परब लोकांची चेष्टा करतात
तुम्हा खासगी बसेस चालवण्याच जास्त रस आहे
येणाऱ्या काळात या अपमनाविरुद्ध तक्रार करणार
न्यायालयाने मुदत नाही दिली, हे आमच्यावर सोडले आहे
अजित पवार सिंचनामुळे प्रसिद्ध आहेत
आज न्यायालयाने स्पष्टपणे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मोबदला देण्यास सांगितलं आहे
या लोकांनी जातीच्या नवावार तोडायचा प्रयत्न केला
मात्र लोकांनी एकतेने सरकारचं डोकं ठिकाणावर आणलं
निकालांचं संपूर्ण वाचन केल्यावर कर्मचारी ठरवतील डेपोत जायचं की नाही
-
-
गुणरत्न सादवर्ते Live
शरद पवार आणि अजित पवार, अनिल परब यांच्या भूमिकेमुळे एवढे मृत्यू झाले
शरद पवार गलिच्छ राजकारण करतात
गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना न्यायालयाने आरसा दाखवला
न्यायालयाने सुखकर गोष्ट दिली आहे कष्टकऱ्यांना
आमदारांना लाख रुपये पेन्शन आणि कर्मचाऱ्यांना एवढी कमी पेश्न याची न्यायालयाने दखल घेतली आहे
कोरोनाकाळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पैसा मिळाला नाही
मात्र आज न्यायालयाच्या निर्णयाने कष्टकऱ्यांना दिलासा मिळाला आहे
-
गुणरत्न सादवर्ते Live
दत्ता सामंत यांची शरद पवारांच्या सत्तेतल्या कालखंडात हत्या झाली
मी त्यांना अभिवान करतो
मी महात्मा फुले, आंबेडकर, आहिल्यादेवी होळकरांच्या विचारांना अभिवादन करतो
अनेक भगिनी विधवा झाल्या
मात्र ज्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आधार दिला त्यांचे आभार
चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांचे आभार
अनुराधा पौडवाल, नवनीत राणा यांचे आभार मानतो
पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांना आधार देणाऱ्यांचे आभार
-
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष
आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष
पाहा व्हिडीओ :
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
आयएनस विक्रांतबाबत जो घोटाळा झाल आहे त्याविरोधात हे आंदोलन
हा जनतेचा संपात आहे, हळूहळू वातावरण आणखी तापणार
शिवसेनेचा वाघ शांत दिसतो याचा अर्थ आम्ही काही करत नाही असा नाही
एका मर्यादेपर्यंत संयम पाळला आहे
तुम्ही नामर्द आहात
असे पाठीमागून वार करू नका
आम्ही असे अनेक वार पचवले
अशा कारवाईंने सरकार पडणार नाही
आम्ही गुडघे टेकणार नाही
तुम्ही मुर्खासारखा विचार करत आहात
किरीट सोमय्यांना संजय राऊतांची पुन्हा शिवी
किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केल्याचे स्पष्ट दिसतंय.
मुलगा आणि दोघे मिळून 711 डबे गोळा केले
हे पैसे लाटले
राज्यभवन ही भाजपची शाखा आहे
राज्यपाल हे त्यांचे शाखाप्रमुख आहेत
राज्यपालांनी मला पत्र दिलं हे पैसे आम्हाला मिळाले नाहीत म्हणून
मग हे पैसे गेले कुठे
याचे उत्तर त्यांनी द्यावे
माझ्यावरचे आरोप सोडून द्या, मी शंभर खून केले, राऊतांचा टोला
मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलं का
म्हणूनच मी सरकार आणू शकलो
माझ्यासाठी पवार मोदींना भेटले हे सर्वांना माहिती आहे
राजभवनात जाऊन जे रोज खिचडी खात आणि पत्ते खेळत बसतात त्यांनीच पुरावे दिले
हा देशद्रोहा सारखा मोठा गुन्हा
आज राज्यसभा या विषयावर बंद पडली
आम्ही प्रश्न विचारले त्यावेळी भाजपचे खासदार गप्प बसले
-
शिवसेनेच आंदोलन सुरू
संजय राऊत यांच्या समर्थनात शिवसेनेच आंदोलन सुरू
किरीट सोमय्या , आणि इडी विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
देशाच्या कानाकोपऱ्यात सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हे दाखल
लोकांना त्यांची फसवणूक झाल्याचे कळले आहे
हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत
हे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ उतलेले कार्यकर्ते
आमच्याविरुद्ध युद्ध पुकारलेल्यांसाठी हा इशारा आहे
या बिनधास्त काय करायचं ते करा
आमच्याविरोधात खोटो पुरावे तयार केले जात आहेत
एका वेळेनंतर तुम्हाला आमच्यापुढे गुडघे टेकावे लागतील
हिंमत असेल तर डोळ्यात डोळे घालून बोला
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
यावरून राज्यसभा स्थगित झाली आहे
भाजप नेत्यांनाही भ्रष्टाचार झाल्याचे पटलं आहे
देशभक्तीच्या नावावर कोट्यवधी गोळा केले
तेच पैसे यांनी निवडणुकीत वापरले
किरीट सोमय्यांनी कोट्यवधी लाटल्याचे पुराव्यासह सांगतो
पवार माझ्यासाठी मोदींना भेटले त्यावरून ओळखून जावा
तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत
पवारांसारखा नेता पंतप्रधानांना भेटतो तेव्हा देशात चर्चा होते
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
आमच्यावर जे हल्ले सुरू आहेत
आमच्यावर ठार मारलं तरी आमची तयारी आहे
यापुढे पंचवीस वर्षे तुमचं राज्य येणार नाही याची व्यवस्था तुम्हीच केली आहे
तुमची कबर तुम्हीच खोदली आहे
आम्ही आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याबाबत बोलत आहोत
मात्र भाजप नेते किरीट सोमय्यांच्या मागे उभा राहतात हा कळस आहे
-
शिवसेना खासदार संजय राऊत Live
मला वाटतं ही सुरूवात आहे
यापुढे जशी त्यांची पाऊलं पडतील तशी आमची पाऊलं पडतील
मी पवारांची जाहीरपणे आभार मानले
माझ्यासारख्या नेत्यासाठी चर्चा केली
माझ्यासरख्या अनेक नेत्यांवर कारवाई सुरू आहेत
पवारांनी माझ्या निमीत्ताने अनेकांची खंत व्यक्त केली आहे
-
संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
2021 सालचा पुरस्कार मेघालय राज्यपाल सत्यपाल मलिक यांना
2020 सालचा पुरस्कार अमरजीतसिंग डुलत माजी RAW प्रमुख यांना प्रदान
दिल्ली शीख समुदाय प्रमुख हरमीतसिंग कालका यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
सरहद्द या सामाजिक संस्थेकडून पुरस्कार अध्यक्ष संजय नहार यांच्या उपस्थितीत
-
संजय राऊत मुंबईत दाखल, मुंबई विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन
संजय राऊत दिल्लीतून मुंबईत दाखल
मुंबई विमानतळावर शिवसैनिकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
संजय राऊतांवर विमानतळाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी
ईडी कारवाईनंतर संजय राऊत चर्चेत
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत मुंबईत दाखल
दोन्ही हात उंचावून संजय राऊतांचं कार्यकर्त्यांना अभिवादन
-
दादा हरवले आहेत असे लागले बॅनर
भाजपा आमदार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या प्रचारात व्यस्त
कोथरूड मतदारसंघात दादा हरवले आहेत असे लागले बॅनर
दादा तुम्ही जिथे असाल तिथून परत या अशा आशयाचे लागले बॅनर
गेल्या महिनाभरापासून गायब आहेत सापडल्यास संपर्क करा अशा आशयाची टॅगलाईन ..
समस्त कोथरुडकर असं बॅनरवरती लिहिण्यात आलंय..
-
शिवसेना पुणे शहराच्या वतीने असत्यमेव जयते फाशी आंदोलन
– भाजप नेते किरीट सोमय्या यांचा शिवसेनेकडून जाहीर निषेध
– आयएनएस विक्रांतमध्ये निधीचा अपहार केल्याचा सेनेचा सोमय्यांवर आरोप
– किरीट सोमय्यांच्या पुतळ्याला जाहीर फाशी आंदोलन
– पुण्यातील संत कबीर चौकात आंदोलन
-
-मंत्री छगन भुजबळ सोलापूर विमानतळावर पोहोचले
– सोलापूरहून सांगोल्याला थोड्याच वेळात करणार प्रस्थान
-
परिवहन मंत्री अनिल परब Live
सातव्या वेतन आयोगाप्रमाने पगाराचा निर्णय घ्या-कोर्ट
कामगार अनेक आवाहन करूनही कामावर आले नाहीत
कोर्टाने नोकरी शाबूत ठेवून निर्णय घेण्याबाबत विचारणा केली
शिस्तभंगाची कारवाई आम्हाला करावी लागली
आताही आम्ही कोणतीही कारवाई न करता आम्ही कर्मचाऱ्यांना कामावर घेणार अशी हमी दिली
कोर्टाने कारवाई करून नये असे आदेश दिले आहेत
गोल्या दोन वर्षात एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती वाईट आहे
त्यामुळे काही गोष्टी रखडल्या होत्या
मात्र इतर वेळी त्यांची देणी व्यवस्थित देत आहोत
गेल्या काळात एसटीचे आणि कर्मचाऱ्यांचेही नुकसान झाले आहे
त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामवार येण्याचे आवाहन
कोर्टाने दिलेल्या मुदतीत जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू
त्या कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही असे समजण्यात येईल
आता कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे की कोणाच्या निर्णयाने चालायचं आहे
सदावर्तेंचं ऐकूण कर्मचारी कामावर नाही आले तर नुकसानीची जबाबदारी सादवर्तेंची असेल
-
मुंबई विमानतळावर शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी
ईडीच्या कारवाईनंतर शिवसैनिक संजय राऊतांच्या स्वागतासाठी विमानतळावर
शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन
संजय राऊतांना मुंबई विमानतळावरून गाजत वाजत आणणार
किरीट सोमय्या यांना अटक करण्यासाठीही जोरदार घोषणाबाजी
विमानतळ ते भांडुप, शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
भांडुपचे आमदार सुनील राऊत हेही विमानतळावर पोहोचले
-
आम्हाला काही नेत्यांचे फोन आले होते – वसंत मोरे
आम्हाला काही नेत्यांचे फोन आले होते
मला अपेक्षा नव्हती,
काही लोकांच्यामुळे पुण्यात पक्ष वाढत नाही
गेल्या १४ महिन्यांपासून राज साहेब अनेकदा येऊन गेले
प्रत्येक पक्षात असे असतात
लोकप्रतिनिधी आहे ही सगळ्यात खटकणारी बाब
मला प्रत्येक पक्षातून बोलावलं होत
मी मनसेसोबत अजून कायम आहे
अध्यक्षपद गेल्यानंतर तुमची भूमिका काय आहे
मी शहराध्यक्ष असल्यापासून त्यांनी अनेक फरक झाले आहेत
साईनाथ बाबर यांच्या वार्डात मुस्लिम समाज अधिक आहे
-
रश्मी शुक्ला यांनी कोणाच्या सांगण्यावरून फोन टॅप केले – एकनाथ शिंदे
रश्मी शुक्ला यांनी कोणाच्या सांगण्यावरून फोन टॅप केले – एकनाथ शिंदे
मला घटनेने अधिकार दिला आहे
माझं सुध्दा एक खासगी आयुष्य आहे
त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही
अशा पध्दतीचं त्यांनी उल्लंघन केलं आहे.
खोट सांगून माझी बदनामी देखील केली आहे.
समाज विघातकाच्या यादीमध्ये माझ नाव टाकण्यात आलं आहे.
यापुर्वी देखील माझा फोन टॅप होत असल्याने मी पत्रव्यवहार केला होता.
मी फडणवीसांना भेटून देखील शंका व्यक्त केली होती.
माझ्या ज्यावेळी रश्मी शुक्ला यांच्याशी भेट झाली होती, त्यावेळी देखील शंका व्यक्त केली होती.
-
ओबीसी आरक्षण टिकावे म्हणून पंकजा मुंडे जोतिबाला साकडे घातले आहे
पंकजा मुंडे यांची महाविकास आघाडीवर टीका पुरोगामी महाराष्ट्र मध्ये आता असलेले आघाडी सरकारचे मंत्रिमंडळ हे डागी मंत्रिमंडळ आहे
-शिराळा चे माजी मंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले त्यावर मुडे याचे वक्तव्य- एक व्यक्ती गेला म्हनुन पक्ष संपला असे वाटत नाही नाईक यांच्या बदल आदर आहे
– शरद पवार आणि मोदी यांच्या भेटी कडे बातमी म्हणून बघते, भाजप चा स्थपणा दिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले असावेत असे माझे मत
– बंधू म्हणून मीडिया समोर सांगणे शक्य नाही महादेव जानकर आमच्यापासून दूर जाऊ नयेत अशी आमची इच्छा आहे एखाद्या निवडणुकीत त्याची भूमिका असू शकते माझ्यावर नाराज नाहीत त्यामुळे ते भाजप वर नाराज नाहीत असे मी गृहीत धरते
-ओबीसी आरक्षण टिकावे म्हणून पंकजा मुंडे जोतिबाला साकडे घातले आहे
मुडे साहेब नेहेमी म्हणायचे राजकारण हे बेरजे चे गणित असले पाहिजे वजाबाकी चे नाही नवनवीन चेहरे जोडून सांगलीत पक्षाची ताकद वाढली आहे गोपिचद आता आमच्या बरोबर आहेत
-
आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे
मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले. मी नाही सांगणार.
आता मला गुन्हेगार केलं आहे, तर त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार, आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
-
निधी जमा झाला होता का?
साहेब 10 वर्ष झाले, राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला, आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे, आरोप का आला, कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली. संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं.
निधी जमा झाला होता का?
मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले. मी नाही सांगणार.
-
एवढं हास्यास्पद काम उद्धव ठाकरेच करु शकतात
एफआयआरची कॉपी मिळाली, इन्चार्ज मला टोप्या लावत होते, एवढं हास्यास्पद काम उद्धव ठाकरेच करु शकतात. एका नागरिकांनी तक्रार केली की, यात 58 कोटीचा व्यवहार झाला, असं मी वर्तमानपत्रात वाचलं. संजय राऊत बोलतात, तर बोलून गेले. नील सोमय्याच्या खात्यात पैसे खात्यात जमा झाले. अमित शहांना पैसे दिले असंही म्हणाले, त्याचं पुढं काय झालं. एक दीड महिना झाला एसआयटी लावली, काय झालं पुढे, राऊत म्हणाले 426 कोटी वाधवानने दिले, काय झालं पुढे. माझी काही हरकत नाही, माझी चौकशी करा.
-
अजित पवारांचा कारखाना नाही
कधी मिळणार कारखाना?
प्रयत्न आपला आहे, एखाद महिना लागू शकतो. अजित पवारांचा कारखाना नाहीय, तर अजित पवार, शरद पवारांनी त्यासाठी मदत करावी. अजित पवारांवर कारवाई हा नंतरचा भाग झाला. अजित दादा म्हणतात हक्क सोडतो, चांगली गोष्ट, सोडून द्या, शेतकऱ्यांना कारखाना देऊन टाका, मोदी साहेबांनी नवीन कायदा आणायचा नाही, बदल करायचा नाही, तर फक्त कारखाना परत देण्यासाठी पवार कुटुंबियांनी मदत करावी
-
अजित पवारांना कोर्टाने उत्तर दिलेलं आहे
अजित पवारांना कोर्टाने उत्तर दिलेलं आहे बेनामी होल्डर आहेत तर त्यांनी बोलायची गरज काय कायद्यात तरतूद आहे की, अशा प्रकारे जप्त झालेली प्रॉपर्टी, 27 हजार शेतकऱ्यांचा अर्ज आला, आता ईडीने सांगितलं आम्हाला हरकत नाहीय, शेतकरी जर तो कारखाना चालवू इच्छितात, तर कोर्ट एनओसी द्यायला तयार आहेत.
-
डोंबिवली शिवसेनेतर्फे किरीट सोमय्याच्या विरोधात निदर्शने
डोंबिवली शिवसेनेतर्फे किरीट सोमय्याच्या विरोधात निदर्शने…
डोंबिवली : डोंबिवली शहर शाखेतर्फे आज भाजप नेते किरीट सोमय्याच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.किरीट सोमय्या याच्या INS विक्रांतच्या नावावर गोळा केलेल्या निधी घोटाळ्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी करत शिवसेने डोंबिवली पोलिसांना निवेदन दिले.तसेच सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली…
-
संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आक्रमक
नाशिक – संजय राऊत यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक आक्रमक
किरीट सोमेय्यांची तिरडी काढून केलं आंदोलन
शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचे आंदोलन
-
महाराष्ट्र नव निर्माण सेना कडून देण्यात आलं नागपूर पोलीस आयुक्तना निवेदन
महाराष्ट्र नव निर्माण सेना कडून देण्यात आलं नागपूर पोलीस आयुक्तना निवेदन
मस्जिद वर लागलेले अवैध भोंगे काढण्यासंदर्भात देण्यात आलं निवेदन
हाय कोर्ट च्या आदेशच पालन करत काढण्यात यावे भोंगे
हनुमान चालीसा पठण आम्ही मंदिरात करू मात्र त्या समोर मस्जिद असेल तर त्यासाठी आम्ही काही करू शकत नाही
मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात देण्यात आलं निवेदन
-
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे आंदोलन
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे आंदोलन
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात शिवसेनेचे आंदोलन
किरीट सोमय्या आणि केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन
किरीट सोमय्या प्रकरणी शिवसेना आक्रमक
-
अभिनेत्री आसावरी जोशींचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
अभिनेत्री आसावरी जोशींचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश
मी कलाकार आहे, कलाकारांसाठी एक झटणारा पक्ष आहे
लोक कलावंत आणि इतर कलावंत
कलाकारांचे प्रश्न मांडले जातात.
मला जबाबदारी दिलेली मी पार पाडेन
राजकारणात आली असली तरी राजकारण विरहीत काम करीन
-
२२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा न्यायालयाचे आदेश – गुणरत्न सदावर्ते
२२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा न्यायालयाचे आदेश – गुणरत्न सदावर्ते
कोणतीही अपील सादर केली जाणार नाही
सातवा वेतन आयोगाच्या जवळ-जवळ या शब्दाने तर वाट लावली
२२ एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हा
आम्ही हे सांगू शकतो
आम्ही भारतीय आहोत पाकिस्तानी नाहीत
याच्यापुढं असं होऊ नये याची काळजी घ्यावी, असं न्यायालयाने खडसावलं
तुम्ही आदेश पारित करा
लिखित आदेश आम्ही वाजू
सरकारवरती आमचा विश्वास नाही
आमदारांची पेन्शन लाखाची घरात, कामगारांची पेन्शन तीन हजाराच्या घरात
माननीय न्यायालयाने सांगितली आहे
संविधानाचा मोठा विजय आहे.
-
संजय राऊत यांच्याकडे एक सुध्दा कागद आहे – किरीट सोमय्या
संजय राऊत यांच्याकडे एक सुध्दा कागद आहे
ती माहिती जनतेसमोर ठेवावी
जरंडेश्वर कारखानाबाबत मी ईडी कार्यालयाला भेट देणार आहेत
५८ कोटी रूपये चोरल्याचा आरोप
तक्रारीची कॉपी देण्यास नकार
मी पोलिसांची चौकशीचं स्वागत आहे
आमची कुशाल चौकशी करावी
कागदोपत्री त्यांच्याकडे काहीच पुरावा नाही
-
किरीट सोमय्या, महापुत्र एका भयंकर मी काल बाहेर काढलंय – संजय राऊत
किरीट सोमय्या, महापुत्र एका भयंकर मी काल बाहेर काढलंय
यांचा जीव तीळतीळ तुटला असेल
तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात
ज्या युद्ध नौकेमुळे भारत युद्धात विजयी झाला.
त्याचे पुरावे समोर आले, संजय राऊत काहीही बोलतात
देशासाठी युद्ध नौका अत्यंत म्हत्त्वाची होती.
आमच्या महाराष्ट्रात लिलाव
तुम्ही अभ्यासक्र बोलतात, मग हे काय आहे
गदाराला महाराष्ट्रात गाडल्याशिवाय शांत बसणार नाही
देशद्रोही लोक आहेत त्यांना तुरूंगात टाकू
लोकांना मुर्ख बनवण्याचे धंदे सुरू केलेत
आयएनएस विक्रांत जरी त्यांनी भंगारात घालवली
भ्रष्टाचाराविरोधात महाराष्ट्रभर आज आंदोलन करू
भाजपाचे भ्रष्टाचारी लोकांना जातील तिथे लोक जोडे मारतील
खंजीर खूपसलं तरी शिवसैनिकांचं मनोबल खचणार नाही.
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली पैसे गोळे केले.
किरीट सोमय्यांनी निवडणुकीत वापरले
पीएससीच्या बॅंकेतून चलनात आणले
मुलुंडच्या कार्यालयात ठेवण्यात आले.
मनीलॉन्ड्रींग झाला आहे
ई़डीने मनावर घेतलं तर कारवाई होऊ शकते
पैसे जमा करण्यासाठी ७०० बॉक्स वापरले
सगळे पैसै मुलुंडच्या कार्यालयात ठेवले होते
जुहूमधल्या एका बिल्डर पैसे ठेवले होते
एवढं होऊनही देवेंद्र फडणवीस त्यांची वकीली करतात
-
साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस
साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस
उन्हामुळे महाराष्ट्र केसरीच्या सकाळच्या सत्रातील स्पर्धा प्रथमच रद्द झाल्या आहेत.
5 आखाडे बनवण्यात आल्यानं लढती घेणे शक्य
त्यामुळे संयोजकांनी हा निर्णय घेतला आहे
संध्याकाळच्या सत्रात रंगणार कुस्त्या !
-
अमरावतीत साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात जमावबंदी लागू
अमरावतीत साहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात जमावबंदी लागू….
मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर शाईप्रकरणी आमदार रवी राणा दुपारी १ वाजता सह्यायक पोलीस आयुक्त कार्यालयात चौकशीला राहणार हजर
आमदार रवी राणा हे पोलीस चौकशीला हजर राहणार असल्याने गर्दी जमू नये म्हणून परिसरात जमावबंदी लागू.
सह्यायक पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात राहणार पोलिसांचा कडक बंदोबस्त .
आमदार रवी राणा यांना पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर रवी राणा पोलीस ठाण्यात चौकशीला जाणार…
-
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा चाय पे चर्चा उपक्रम
सासणे मैदान परिसरात चाय पे चर्चा च आयोजन
केशव उपाध्ये,माजी खासदार धनंजय महाडिक ही उपस्थित
-
खाजगी ट्रॅव्हल व टँकर चा अपघात 3,जण ठार तर 8 जण जखमी
खाजगी ट्रॅव्हल व टँकर चा अपघात 3,जण ठार तर 8 जण जखमी
वाशिम ते अकोला जाणाऱ्या महामार्गावरील वाशिम शहरातील वाटाणे लॉन समोर खासगी ट्रॅव्हल्स व टँकर मध्ये अपघात झाला असून ,या भीषण अपघातात 3 जण ठार झाले आहेत इतर 8 जण जखमी झाले असून जखमींना पुढील उपचाराकरिता वाशिम शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…..
-
नवाब मलिक यांच्यावरून इम्तियाज जलील यांनी साधला शरद पवारांवर निशाणा
नवाब मलिक यांच्यावरून इम्तियाज जलील यांनी साधला शरद पवारांवर निशाणा
नवाब मलिक यांच्याबद्दल मोदींशी चर्चा का केली नाही
नवाब मलिक यांनी काही चूक केलीय म्हणून चर्चा केली नाही का
इम्तियाज जलील यांचा ट्विटच्या माध्यमातून पवारांना सवाल
पवार – मोदी भेटीनंतर इम्तियाज जलील यांनी साधला पवारांवर निशा
-
उष्णतेच्या लाटांचा नागपूरी संत्रा बागांना फटका
– उष्णतेच्या लाटांचा नागपूरी संत्रा बागांना फटका
– वाढत्या तापमानामुळे अंबीया बहाराच्या संत्र्याची गळ
– उष्णतेच्या लाटांमुळे संत्र्यांच्या नविन कलमांना मर
– कडाक्याच्या उन्हामुळे संत्रा बागायतदारांना मोठा फटका
-
विदर्भात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा
– विदर्भात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा
– तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली
– पाच दशकांमध्ये नागपूर उष्णतेच्या लाटेत पहिल्या नंबरवर
– उष्णतेच्या लाटेत चंद्रपूर दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर
– नागपूरात मार्च वगळता एप्रिल, मे, जून आणि जुलैत मागच्या पाच दशकातील सर्वाधिक उष्णतेच्या लाटांची नोंद
– नागपूरमध्ये १९६९ ते २०१९ दरम्यान उन्हाळय़ात सर्वाधिक २४६ उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. चंद्रपूर शहरात १७९ तर अमरावती शहरात १६९ उष्णतेच्या लाटांची नोंद
-
अमरावती मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरण
अमरावती मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरण….
चौकशीसाठी एक वाजता आमदार रवी राणा जाणार राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये……
यापूर्वी दोन वेळा आमदार रवी राणा यांना पाठवल्या होत्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या पोलिसांनी नोटिशी.
शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या वर आहे.कलम 307 अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल…
काही अटी शर्थीवर जिल्हा सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामीन मंजूर….
शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणांच्या पोलीस चौकशीकडे सर्वाचे लक्ष
-
मेट्रोच्या तिजोरीत सुमारे 80 लाखांचे उत्पन्न जमा
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात सुमारे 6 लाख प्रवाशांनी महिनाभरात प्रवास केला
त्यातून मेट्रोच्या तिजोरीत सुमारे 80 लाखांचे उत्पन्न जमा
एकूण प्रवाशांत पुण्यातील चार लाख तर, पिंपरी चिंचवडमधील दोन लाख प्रवाशांचा समावेश
-
टीईटी परीक्षा प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने आणखी दोघांना केली अटक
टीईटी परीक्षा प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने आणखी दोघांना केली अटक
कलीम गुलशेर खान (बुलढाणा), राजेंद्र विनायक सोळुंके (नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे
या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी स्वप्नील पाटील तसेच संतोष हरकळ यांना पैसे दिल्याचे तपासात उघड
राजेंद्र सोळुंकेने 40 अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी स्वप्नील पाटील याला पैसे आणि यादीही दिली
तर कलीम खानने राज्यातील 650 अपात्र उमेदवारांची यादी आणि 1 कोटी रुपये आरोपी हरकळ याला दिल्याचे तपासात उघड
या दोघांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश
Published On - Apr 07,2022 6:16 AM