Maharashtra News Live Update : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

| Updated on: Apr 09, 2022 | 11:24 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज शनिवार 9 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. ईडी कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी लावलेल्या योद्धा बॅनरवर गधा असा उल्लेख, संजय राऊत यांच्या चेहर्यावर लावली चप्पल, बाजूला कुत्र्याचा फोटो आणि पक्षाची लाज काढणारा नेता, शिवसेनेचं खाऊन शरद पवारांचे गोडवे गाणारा नेता, झाकणझुल्या अशा खालच्या भाषेचा वापर बॅनरवरती करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Apr 2022 10:00 PM (IST)

    2 पूजाऱ्यावर 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद

    उस्मानाबाद – तुळजाभवानी मंदिरातील 2 पूजाऱ्यावर 307 कलम अंतर्गत गुन्हा नोंद

    तुळजाभवानी मंदिरात पूजाऱ्यांनी केली होती सुरक्षा रक्षकाला मारहाण , सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

    पुजारी कृष्णा जितकर व संदीप टोले यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद

    मंदिरात भाविकांना दर्शन रांगेत सोडण्याच्या कारणावरून केली मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

    2 पूजाऱ्यांनी केली सुरक्षा रक्षक दीपक चौघुले यांना दगड, नारळ व विटांनी केली गंभीर मारहाण

    सुरक्षा रक्षक चौघुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत , उपचारासाठी सोलापूरला दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंद

  • 09 Apr 2022 08:18 PM (IST)

    कोल्हापूरची 21 वर्षांची प्रतीक्षा संपली

    विनोद चौगुले यांच्यानंतर पृथ्वीराज पाटील याने पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा

  • 09 Apr 2022 08:15 PM (IST)

    मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

    महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

    मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश देण्यासाठी आलो होतो

    मंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    शरद पवारांनी साताऱ्याला मैदान दिलं यासाठी त्यांचे आभार

    पुढच्या काळात राज्य सरकार अशा स्पर्धा भरवणार

  • 09 Apr 2022 05:42 PM (IST)

    अनिल परबांचा कर्मचाऱ्यांना ईशारा

    – कायदा हातात घेतल्यावर कोणाचीही सुटका होणार नाही – सदावर्तेंनी आपलं अपयश लपवण्यासाठी त्यांनी कालचे कृत्य केले – जो पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कायदा कारवाई करले

  • 09 Apr 2022 05:18 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील Live

    चौकशी सुरू आहे, यातून काय बाहेर येतंय हे चौकशीनंतर कळेल

    एसटी कर्मचाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन

    कामगारांनी टोकाची भूमिका घेऊ नये

    सदावर्तेंच्या आरोपता काहीही तथ्य नाही

    आरोप करण्याची त्यांना सवय आहे

    मी त्यांचे आरोप फेटाळून लावतो

    पोलिसांनी काय करायचं हे मी बोलणं योग्य होणार नाही

    ते त्यांचं काम करणार

  • 09 Apr 2022 05:05 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी

    पवारांच्या घराबाहेरील आंदोलन भोवलं

  • 09 Apr 2022 04:38 PM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर

    शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या अमरावतीत पोलीस सुरक्षेत वाढ

    आधी 150 ते 200 पोलिसांचा होता बंदोबस्त आता 300 पोलीस राहणार सुरक्षेसाठी तैनात

    शरद पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट

  • 09 Apr 2022 04:13 PM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंवर निकाल वाचनाला सुूरूवात

    गुणरत्न सदावर्तेंचा फैसला काही वेळातच

    सदावर्तेबरोबर अनेक एसटी कर्मचारी अटकेत

  • 09 Apr 2022 03:28 PM (IST)

    आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    संजय राऊत काय माणूस आहे याची कुंडली आमच्याकडे आहे

    एकीकडे शरद पवारांच्या घरावर हल्ला होत असताना दूसरीकडे मुंबईचे आयुक्त आणि संजय राऊत यांची बैठक सुरू होती

    त्याचा आणि याचा काय संबंध तर नाही ना ? नितेश राणेंचा सवाल

    हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात आहे का.? नितेश राणेंची अप्रत्यक्ष टीका

  • 09 Apr 2022 02:50 PM (IST)

    नागपूरात उद्या शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करणार

    – नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती

    – शरद पवार उद्या विदर्भाच्या दौऱ्यावर

    – उद्या सकाळी 10 वाजता शरद पवार यांचं नागपूर विमानतळावर आगमन

    – नागपूर विमानतळावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचा सत्कार करणार

    – शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठी गर्दी होण्याची शक्यता

    – उद्या नागपूर विमानतळावर असणार अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था

    – नागपूर – अमरावती प्रवासादरम्यानंही असणार चोख सुरक्षा व्यवस्था

  • 09 Apr 2022 01:59 PM (IST)

    पहिल्या दिवसापासून दिशाभूल करीत असल्याचा आरोप – अनिल परब

    कायदा हातात घेऊ नका

    पाच महिने एसटी बंद ठेवली

    केलेल्या कारवाई मागे घेण्यात आल्या

    गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे.

    १०७ आंदोलनकर्ते कोर्टात दाखल होणार

    पहिल्या दिवसापासून दिशाभूल करीत असल्याचा आरोप

    अपयश लपवण्यासाठी हे सगळ षडयंत्र आहे

  • 09 Apr 2022 12:46 PM (IST)

    पोलिस गुणरत्न सदावर्तेंना घेऊन कोर्टात दाखल

    पोलिस गुणरत्न सदावर्तेंना घेऊन कोर्टात दाखल

    माझी हत्या होऊ शकते

    हे लोक लोकशाहीचा गळा घोटत आहेत

  • 09 Apr 2022 11:34 AM (IST)

    गुणरत्न सदावर्ते हा नेता वा वकील नाही, तो विरोधी पक्षाने पोसलेला गुंडच आहे – संजय राऊत

    एक मात्र नक्की, काल जो प्रकार घडला ते आंदोलन नव्हतं, तो हल्ला होता. हल्ला करण्याच्या उद्देशाने कुणाच्यातरी पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे केलं, त्यांनी कामगार चळवळीचं नाव बदनाम केलं, इंटेलिजन्स फेल्युअर हा घोळ आहे, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, ते सरकार पाहिल, मात्र कामगारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी प्रमुख नेत्यावर हल्ला करुन गुन्हा केला. पवार साहेब आणि मी एकदम संयमी नेते आहेत.

    गुणरत्न सदावर्ते हा नेता वा वकील नाही, तो विरोधी पक्षाने पोसलेला गुंडच आहे. सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं,

    जंग जंग पछाडताहेत, त्यातून त्यांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्न पडताहेत, आणा ना आणून दाखवा.

    विक्रांत लिलाव-

    माझ्या माहितीप्रमाणे ते पोलीस स्टेशनला गेलेले नाहीत, ते भूमिगत आहेत, फरार आहेत, असं मला सांगण्यात आलंय, ते अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात पोहचलेत, कर नाही त्याला डर कशाला, भाजपाच मंत्र आहे ना तो, आमच्याबाबतीत वापरता. तुम्ही लोकांना प्रश्न विचारता, उत्तरं मागता, जबाव दो जबाव दो, आता तुम्हीपण जवाब द्या, मला जी माहिती होती, ती पोलिसांसमोर ठेवली, आता पोलीस काम करतात. केंद्रीय तपास यंत्रणांचे एजंट म्हणून काही लोक काम करतात, आमच्याकडे तशी पद्धत नाही.

  • 09 Apr 2022 10:28 AM (IST)

    मीडियाला माहित होतं, मग पोलिस काय करत होत – देवेंद्र फड़णवीस

    एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे

    मीडियाला माहित होतं, मग पोलिस काय करत होत

    पोलिसांची चौकशी व्हायला हवी

    अतिशय भयावह असं चित्र होतं.

    त्याची चौकशी व्हायला हवी

    हल्ल्याचा निशेष देखील केला आहे.

    पोलीसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्हं,

  • 09 Apr 2022 09:52 AM (IST)

    पवार साहेबांचा एसटीशी काय संबंध नाही – संजय राऊत

    पवार साहेबांचा एसटीशी काय संबंध नाही

    कोणीतरी यांच्या पाठीमागे आहे

    शरद पवार देशाचे नेते आहेत

    त्यांच्या घरावर हल्ला करण योग्य नाही

    तुम्ही सुध्दा आरश्याचा घरात राहता हे लक्षात ठेवा

    किरीट सोमय्या अंडर ग्राऊंड झाले आहेत

    लोकांना प्रश्न विचारतात, परंतु त्यांच्यावर वेळ आल्यावर का पळत आहेत

    हे कायद्याचं राज्य आहे

    जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजते

    रश्मी शुक्लाचा इशारानुसार फोन टेपिंग केलं आहे

    मी कोणाचं नाव घेणार नाही

    पोलिसांनी काय समज पाठवलं मला माहित नाही

    पोलिसांनी जवाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवले आहेत

    कर नाही त्याला डर कशाला

    किरीट सोमय्यांनी ५८ कोटी रूपये जमा केले आहेत

    पोलिस तुम्हाला विचारतील पैशाचे प्रश्न

    देवाच्या पेटीत टाकलेल्या पैशाचा देखील हिसाब द्यावा लागतो

  • 09 Apr 2022 09:02 AM (IST)

    शरद पवारांचा आजचा सातारा दौरा रद्द

    शरद पवारांचा आजचा सातारा दौरा रद्द

    सुरक्षेच्या कारणास्तव आजचा दौरा रद्द

    नियोजित दौरा रद्द

    काल शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला

    महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शरद पवार यांचा आजचा दौरा झाला रद्द….

    महाराष्ट्र केसरी कुस्तीचा आज होणाऱ्या फायनल साठी शरद पवार राहणार होते हजर…

    काही कारणास्तव दौरा रद्द झाल्याचे विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 09 Apr 2022 08:34 AM (IST)

    निकिता चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडी कडे सोपवावा का ?

    निकिता चौधरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा सीआयडी कडे सोपवावा का ?

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकार ला मागितलं उत्तर

    जून पर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

    प्रताप नगर मधील रहिवाशी निकिता चौधरी चा झाला होता संशयास्पद मृत्यू

    15 मार्च ला ती कार्यालयात गेली त्यानंतर घरी पोहचली नाही

    मात्र दुसऱ्या दिवशी तिचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळून आला होता

  • 09 Apr 2022 08:29 AM (IST)

    किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी बजावलं समन्स, आज हजर राहण्याचे आदेश

    – काल किरीट हे दिलेलीत होते पण संध्याकाळनंतर कुणाचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये, त्यांचे पुत्रही गेल्या १ आठवड्यापासून नाॅट रिचेबल झालेयत…

    – संजय राऊतांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स देण्यात आले आहे…

    – आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत किरीट सोमय्यांनी 58 कोटी रुपये गोळा केले, राजभवनात जमाही केले नाहीत असा संजय राऊत यांचा आरोप आहे.

    तर किरीट सोमय्या म्हणतात, आधी 58 कोटी रुपये गोळा केल्याचा पुरावा द्या, मी तर फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलं. 35 मिनिटांत इतकी रक्कम कशी काय जमा होऊ शकते हा त्यांचा सवाल आहे,

    – त्यामुळे किरीट आज ट्रांबे पोलीस ठाण्यात हजर होणार का हा मुळ प्रश्न…

  • 09 Apr 2022 08:24 AM (IST)

    कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे – अजित पवार

    ती लोक कुठं तरी कमी पडली आहे

    मीडिया बरोबर माहिती घेत आहे,

    हे जर मीडियाने शोधल आणि संबंधित यंत्रणेला का माहीत झालं नाही

    याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

    पवार साहेबांनी ६० वर्षे समाजकारण आणि राजकारण करीत आहेत

    कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे

    सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही

    कालच्या प्रकारामधील सत्य पोलिस शोधून काढतील

    सुप्रियाने देखील त्यांना हात जोडून विनंती केली आहे

    टोकाचं वागण्याचा प्रयत्न करू नका

    पोलिस हे सगळं पाहतील

    पोलिसांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत काहीही बोलण योग्य नाही

    त्याला काहीही अर्थ नाही

    पालकमंत्र्यांना सुध्दा सांगितलं होतं

    याच्यामागे कोण आहे, हे पोलिस शोधून काढतील

  • 09 Apr 2022 07:35 AM (IST)

    एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्टेशनवर ठिय्या

    एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्टेशनवर टिय्या

    रेल्वे स्टेशनवर पोलिस बंदोबस्त वाढला

    काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    पोलिसांनी कारवाई केली आहे

    रेल्वे प्रशासनाने इथून जाण्यास सांगितले आहे

    आम्ही मुंबईत असुरक्षित असल्याचे कर्मचाऱ्यांची भावना

  • 09 Apr 2022 06:31 AM (IST)

    कॉंग्रेसचे अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची एकसष्टीनिमित्त ओपन जीपमधून रॅली

    – कॉंग्रेसचे अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची एकसष्टीनिमित्त ओपन जीपमधून रॅली

    – अक्कलकोटमधील या रॅलीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे ओपन जीपमध्ये सामील

    – यावेळी क्रेनद्वारे मोठा हार घालत तिन्ही नेत्यांचे जंगी स्वागत

    – माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या एकसष्टीनिमित्त अक्कलकोटमध्ये त्यांचा नागरी सत्कार

    – या सत्काराला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे आदींची उपस्थिती.

Published On - Apr 09,2022 6:29 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.