शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज
दुकानातील संपूर्ण माल जळून खाक
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
कोणतीही जीवितहानी नाही
बदलापूरचं बारवी धरण अखेर १०० टक्के भरलं!
धरणाच्या ११ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला होतो पाणीपुरवठा
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण महिनाभर लवकर भरलं
सात दरवाज्यातून पाच हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू..
टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवण्यात येणार..
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा..
उजनी धरणा सध्या 115.26 टी. एम. सी. पाणीसाठा झाला असून धरणाची टक्केवारी 96.27टक्के झाली आहे..
इंदापूर
उजनी धरणाचे सात दरवाजे उघडले.
सात दरवाज्यातून पाच हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
उजनी धरणा सध्या 115.26 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची टक्केवारी 96.27टक्के झाली आहे
ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी
बदलापूरचं बारवी धरण अखेर १०० टक्के भरलं!
धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला होतो पाणीपुरवठा
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण महिनाभर लवकर भरलं
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचालित दरवाजे पुन्हा उघडले
सध्या धरणाच्या एकूण 4 दरवाजामधून सात हजार क्युसेक विसर्ग भोगावती नदी मध्ये सुरू
शहर परिसरात पाऊस थांबला मात्र धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप कायम
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही संथ गतीने होतेय वाढ
पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 8 इंचावर
चोरी फक्त आम्ही करत नाही इतरही करतात
चोरट्याने एकमेकांची नाव सांगितल्याने एकामागोमाग एक सापडले तब्बल 9 चोरटे
गस्त घालत असताना 1 चोर सापडला आणि झाली 10 गुन्ह्यांची उकल
चोरट्या कडून 9 बाईक आणि 1 रिक्षा व अनेक बॅटऱ्या पोलिसाने केल्या जप्त
कल्याण कोळशेवाडी पोलिसांची अनोखी कामगिरी
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीच्या विचित्र अवस्थेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर
जिल्ह्यात पाऊस नसताना सर्वच भागातून सोडलेल्या धरणाच्या विसर्गाने नद्यांनी सोडले पात्र
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या वर्धा नदीच्या पुरामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत
चारवट या गावी उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकाने सुखरूप काढले बाहेर,
आतापर्यंत या गावातून उपचार व देखरेखीची गरज असलेल्या 10 नागरिकांना बाहेर काढले
वर्धा नदीच्या काठावरील सर्वच गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उद्या नांदेड-हिंगोली-जालना
-संभाजीनगरचाही दौरा करणार
– खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
-आज सायंकाळी 4 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 18 हजार 491 क्युसेक विसर्ग
पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये
नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत
-दहीहंडी उत्सवाची वर्गणी दिली नाही म्हणून स्नॅक्स अँन्ड स्वीट सेंटर दुकानाची केली तोडफोड
-‘तुम्हाला माहिती नाही का, या एरियाचे आम्ही भाई आहोत असं म्हणत 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा धुडगुस
-500 रुपये दहीहंडी उत्सवासाठी लागणारी वर्गणी स्वीट सेंटरच्या मालकाने केवळ 200 रुपये दिली म्हणून राग
-10 ते 12 जणांच्या टोळक्याने केली स्वीट सेंटरची तोडफोड,
-ही तोडफोड करण्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश
-आरोपी प्रसाद राऊत,मनीष उर्फ मन्या कदम,माऊली उपल्ले, यश रसाळ,रोहित शिंदे उर्फ बॉण्ड, सुनील शेट्टी,विजय तलवारे व त्यासोबत तीन ते चार जणांनावर गुन्हा दाखल
-पाच आरोपीना वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
लोकमान्य टिळक स्मारकला देणार भेट
हर घर तिरंगा कार्यक्रमला लावणार हजेरी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर
मुख्यमंत्र्यांच्या दरे गावाला महावितरणची वीज सेवा विस्कळीत
एकनाथ शिंदे यांच्या दरे गावात विजेचा लपंडाव
गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महावितरणचे विद्युत यंत्रणा कोलमडली
महावितरण कडून युद्धपातळीवर काम सुरू
शिवबंधन मलाही बांधले गेले आणि त्यामागची भूमिका शिवसेना सोडायची नाही,
मात्र शिवबंधन बांधून मला आयुष्यभरासाठी राजकारणातून संपवण्याच्या प्रयत्न
शिवबंधन बांधा आणि घरी बसा असा संदेश मला देण्यात आला
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मला शिंदे गटासमोर जावे लागले.
गद्दार कोण, महाराष्ट्राची जनता सांगेल, रामदास कदम यांनी आयुष्यात कधीही विश्वासघात केला नाही
कधीही बेईमानी केली नाही, कधीही हरामखोरी केली नाही, माझ्या मुलाला राजकारणातून दूर करण्याचा प्रयत्न
रामदास कदम शिंदे यांच्यासोबत मंत्री होण्यासाठी गेले नाहीत, विधान परिषदेचे सदस्यही झाले नाहीत
मला दोन मुलगे आहेत, एकनाथ शिंदे जी आहेत, माझे मित्र देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्या पाठीशी खांबाप्रमाणे उभा राहण्यासाठी मी शिंदे गटात गेलो आहे,
मीडिया मध्ये मंत्रिमंडळात माझ्या नावाची चर्चा होत असेल
रामदास कदम यांनी महिला पोलिसांसोबत राखी बांधून रक्षाबंधन केले साजरे
मला एकुलती एक बहीण आहे, तीही गावातच आहे,
आज या महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन करून माझ्या बहिणीची उणीवही पूर्ण झाल्याचे मत
महिला पोलिसांच्या मी नेहमी त्यांच्या पाठीशी खांबाप्रमाणे उभी राहणार
जेव्हाही काही अडचण असेल तेव्हा तुम्ही आम्हाला सांगा
-गोंदियातील अत्याचार पीडितेची मनसे नेत्या रिटा गुप्ता यांनी घेतली भेट
-दिले मदतीचे आश्वासन
-लवकरात लवकर आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार
चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी गावात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावात स्मशानभूमीला जोडणाऱ्या पायवाटेवर पुलाची निर्मिती रखडली
जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यानी सोडले आहे पात्र
याचा फटका अंत्ययात्रेच्या मार्गाला बसला, शेवटी स्थानिकांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत केले अंत्यसंस्कार,
ग्रामीण भागातील रखडलेल्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष
राजौरीमध्ये दहशदवाद्यांचा मोठा कट उधळला
चकमकीत दोन दहशदवाद्यांचा खात्मा, तीन जवान शहीद
सध्या या ठिकाणी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
कोल्हापूर
पूरग्रस्तांना दिलेल्या निधीवरून राजू शेट्टीची नाराजी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणाला डोक्यावर घेणार
राजू शेट्टींचा सवाल
आधीच्या सरकारने फसवणूक केली
त्यापेक्षा जास्त फसवणूक या सरकारने केली
शेट्टींचा घणाघात
परभणी
कारखान्याने सोडलेल्या वेस्ट मटेरियलचा दूषित पाणी नदीत जात असल्याने नदीचा पाणी दूषित
संतप्त ग्रामस्थांची तहसीलदारांकडे तक्रार
पावसाच्या पाण्यामुळे त्या खड्यातले विषारी पाणी इंद्रायणी नदीत
नदीचा पाणी दूषित
परिसरातील नागरिक आणि जनावरांना धोका
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातून 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसाने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ
पाणी विसर्ग सोडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सीमेवरील सैनिकांसाठी पाठविल्या एक हजार राख्या
जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमातील लेकींनी पाठवल्या एक हजार राख्या
एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी
सैनिकांच्या सुरक्षित आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी सामूहिक प्रार्थनेचे आयोजन
खासदार नवनीत राणा यांच्या घरी रक्षाबंधनाचा उत्साह
खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह
नवनीत राणांनी बांधल्या सुरक्षेत असलेल्या सी.एस. एफ.च्या जवानांना राख्या
नवनीत राणांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
खडकवासला धरणाच्या पाणीपातळीमध्ये झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अति पर्जन्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 9 हजार 416 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाना पटोलेंकडून महाविकास आघाडीमध्ये फुटीचे संकेत
आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही – पटोले
आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही – पटोले
विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती
आम्हाला विचारलं जात नसेल तर विचार करावा लागेल – पटोले
खासदार संजय मंडलिक यांच्या घरावरील मोर्चाला शिवसैनिकांकडून स्थगिती
राजीव गांधी पुतळ्याजवळ भाषणानंतर आंदोलन संपलं
रक्षाबंधन असल्यांन पोलिसांच्या विनंतीला मान देत शिवसैनिकांनी आंदोलन स्थगित केले
शिंदे गटाने पाठीत खंजीर खूपसला
प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी – चतुर्वेदी
चित्रा वाघ यांच्यावरही केली जोरदार टीका
खाद्यतेल कारखान्यावर अन्न औषध प्रशासनाचा छापा
1 कोटी रुपयांचे खाद्य तेल जप्त
कमी दर्जाच्या तेलाची विक्री सुरू असल्याचे आले समोर
नाशिकच्या शिंदे गावामध्ये असलेल्या कंपनीवर छापा
तेल डब्ब्यांवर लावण्यात आलेल्या लेबलमध्ये देखील चुका
शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर आज शिवसैनिकांचा मोर्चा
मंडलिक यांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानी काढला जाणार मोर्चा
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर घराच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंती सोहळा
पद्मश्री विखे पाटलांची 122 वी जयंती.
केरळचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांची उपस्थिती
मराठी साहित्य संमेलनाचे भारत सासणे कार्यक्रमाचे अध्यक्ष.
पद्मश्री विखे पाटील यांच्या नावे दिल्या जाणा-या पुरस्काराचे आज वितरण
लोणी प्रवरानगर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी पुरस्कार वितरण आणि जयंती सोहळा
तब्बल 26 तासानंतर मोहाडी येथील पाणी ओसरल्याने मध्यप्रदेशकड़े जाणारा भंडारा- तुमसर मार्ग पुन्हा सुरू झाला आहे. बुधवारी मोहाडी बस स्टॉप जवळ चंदू बाबा नाला ओव्हरफ्लो झाल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी ओसले असून, पुन्हा वाहतूक सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपाची खेळी
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, मात्र पूरस्थिती जौसे थे
पुराचे पाणी शिरले नदी काठच्या गावांमध्ये
नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
धरणाचे पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने पाणीपातळीत वाढ
मंत्री उदय सामंत 14 ऑगस्टपासून रत्नागिरी दौऱ्यावर
मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उदय सामंत येणार रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
योगेश कदम यांच्या खेड मतदार संघापासून दौऱ्याला सुरवात
दौऱ्यादरम्यान चिपळूनच्या वाशिष्ठी नदीची पहाणी करणार
जून, जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस व ऑगस्टच्या 8 तारखेपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराचा मोठा फटका पिकांना बसला आहे. नागरिकांवर स्थलांतरणाची वेळ आली आहे. अनेक गांवाचा संपर्क देखील तुटला आहे. दरम्यान शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी जिल्ह्यातील काही तालुक्यांना भेट देत पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला.
रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता
नव्या मंत्रिमंडळाचा कोकणासाठी महत्त्वाचा निर्णय
100 विद्यार्थी क्षमतेच्या महाविद्यालयासाठी 522 कोटी रुपये
महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच दिल्लीला मंजुरीसाठी पाठवला जाणार
मंत्री उदय सामंत यांची माहिती
कँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आज औरंगाबाद दौऱ्यावर
नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आज निघणार आझादी गौरव पदयात्रा
शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून क्रांती चौकापर्यंत पदयात्रेचे आयोजन
अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट!
पहिल्या फेरीत 42 हजार जागांपैकी फक्त 27 हजार 190 प्रवेश
पहिल्या फेरीत 36 टक्के जागा रिक्त
नव्याने आलेल्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत सजली
इमारतीच्या समोरील बाजूने एलईडी लाईटच्या माळा
तिरंगा रंगाची विद्युत रोषणाई
जालन्यामधील स्टील व्यवसायिकांवर आयकर विभागाचे छापे
58 कोटी रुपयांची रक्कम, 32 किलो सोन्यासह 390 कोटींची मालमत्ता जप्त
प्राप्तिकर विभागाच्या 100 अधिकाऱ्यांनी टाकला छापा
12 मशिनच्या मदतीने 14 तास नोटांची मोजणी
वऱ्हाडाच्या गाड्यातून आले होते प्राप्ती कर विभागाचे अधिकारी
मराठा समाजासाठी लवकरच बैठक घेणार
आरक्षणासह इतर मागण्या तातडीने मार्गी लावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
जालना जिल्ह्यात भांबेरी गावात मराठा समाजाकडून विविध मागण्यांसाठी उपोषण
याप्रकरणी मराठा नेते नरेंद्र पाटलांंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लवकरच सर्व प्रश्न मार्गी लावू मुख्यमंत्र्यांचे निवेदनाला उत्तर
मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीच्या फरशी पुलावरून दोन तरुण वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. पुलावरून जात असताना दुचाकी घसरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दालचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.