Maharashtra News Live Update : राज्यात शिवसेना ही परिवारवादी पक्ष होता; शिवसेनेचे खासदार आमदार आम्हाला येऊन खासगीत सांगतात; रावसाहेब दानवेंची सडकून टीका
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज बुधवार दिनांक 3 ऑगस्ट 2022 जाणून घेणार आहोत राज्यभरातील महत्त्चाच्या घडामोडी. आज पुन्हा एकदा मुंबईकरांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज राजकीय घडामोडींना देखील वेग येण्याची शक्यता आहे. आज शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार यावर शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक, मंत्रालयातील समिती सभागृहातील बैठकीस माजी राज्यमंत्री तथा आमदार शंभूराज देसाई, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित. -
सोलापूर स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे कोट्यवधीचे नुकसानः शिवसेना पदाधिकारी आक्रमक
सोलापूर स्मार्ट सिटीच्या गलथान कारभारामुळे कोट्यवधीचे नुकसान
नुकसानीचा खर्च स्मार्टसिटीच्या सीईओंच्या पगारातून वसुल करा
– शिवसेना पदाधिकारी आक्रमक
-
-
दिल्लीत आज शरद पवारांच्या घरी विरोधी पक्षाची बैठक; शिवसेनाही होणार सहभागी
दिल्लीत आज शरद पवारांच्या घरी विरोधी पक्षाची बैठक;
बैठकीत शिवसेना ही होणार सहभागी
संजय राऊतांच्या अनुपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी लावणार हजेरी
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा
मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या युपीएच्या उमेदवार
संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन
-
अमरावतीमधील आकोटला जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात; दोन व्यापारी ठार
अमरावतीमधील धारणी तालुक्यातील सुसर्दा साप्ताहिक बाजारवरून आकोटला जाणाऱ्या पिकअप वाहनाचा अपघात
पिकअपमधील दोन व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू
एक व्यापारी गाडीखाली दबला असल्याची माहिती
जवळपास दहा प्रवासी गंभीर असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल
-
पुतळा दुकाना समोरून बाजू काढण्यास सांगितल्याने मालकासह पत्नी आणि मेव्हणी बेदाम मारहाण
डोंबिवली पूर्वेला स्टेशन बाहेरील रोडवरील धक्कादायक प्रकार
कपड्याच्या डिस्प्लेसाठी लावलेला पुतळा दुकाना समोरून बाजू काढण्यास सांगितल्याने झाला वाद
एका दुकानदारांनी दुसऱ्या दुकानाच्या मालकासह त्याच्या पत्नी आणि मेव्हणीलाही केली बेदाम मारहाण
मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
जखमी कुटुंबानी मारहाण करणाऱ्या देवराज दुबरिया, मयूर दुबरीया आणि प्रितेश दुबरीया यांच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
-
-
संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्तांना जुगार खेळताना अटक; नगरसेवकासह 26 जणांवर कारवाई
संत तुकाराम महाराज संस्थाचे विश्वस्त आणि देहू नगरपंचायतीच्या नगरसेवक आणि नगरसेविकेच्या पतीला अटक
तीन पत्ति जुगार खेळताना पिंपरी चिंचवड दरोडा विरोधी शाखेकडून 26 जणांना अटक
-चाकण एमआयडीसी जवळील येलवाडी गावातील एका बंद कंपनीमध्ये दुसऱ्या मजल्यावर हा जुगार अड्डा
-या कारवाईमधील धक्कादायक बाब म्हणजे देहूमधील संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे आणि माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे त्याच बरोबर देहू नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक मयूर टिळेकर आणि एका नगरसेविकेचे पती विशाल परदेशी यांचा समावेश
-ह्या कारवाईमध्ये पोलिसांनी 35 लाख 10 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
-
मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
डोंबिवलीतील शिवसेना शाखा राडा प्रकरण
मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी महिला पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
शिवसेना विधानसभा संघटक कविता गावंड याच्या विरोधात गुन्हा दाखल
शिंदे गटातील योगेश जुईकर यांनी राम नगर पोलीस ठाण्यात तक्रार
-
आमदार संजय राठोड यांच्या घराबाहेर पोलिस सुरक्षा ; उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने बंडखोर आमदारांना सुरक्षा
शिवसेनेसोबत बंडखोरी करून माजी मंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले, त्यानंतर त्यांच्या वाहनावर हल्ला
राज्यातील बंडखोर आमदारांच्या घरावर हल्ला चढविला जाण्याची शक्यता
सर्व बंडखोर आमदारांना सुरक्षा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील घराबाहेर पोलीस सुरक्षा तैनात
-
शिंदे-फडणवीस सरकारचा 5 ऑगस्टला होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
5 ऑगस्टला होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
राजभवनात सायंकाळी होणार नव्या मंत्र्यांचा शपथविधी
-
दिल्लीतील नॅशनल हेराल्डचं कार्यालय ईडीनं केलं जप्त; सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचा मोठा झटका
दिल्लीतील नॅशनल हेराल्डचं कार्यालय ईडीनं केलं जप्त
कार्यालयावर लावली ईडीनं जप्तीची नोटीस
काल दिवसभर कार्यालयात ईडीनं कागदपत्रांची केली होती तपासणी
आज ईडीनं कार्यालय केलं जप्त
सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचा मोठा झटका
-
राज्यात शिवसेना ही परिवारवादी पक्ष होता; रावसाहेब दानवे यांची टीका
राज्यात शिवसेना ही परिवारवादी पक्ष होता
शिवसेनेचे खासदार आमदार आम्हाला येऊन खाजगीत सांगतात
परिवारवादी पक्ष आहे राज्याचं किंवा जनतेच हित यांना कळत नाही परिवाराचं कळतं
प्रादेशिक पक्षही संपणार आहेत
शिवसेनेचीही तिच अवस्था होणार
तो ही प्रादेशिक आहे राष्ट्रीय पक्ष आहे का ?
-
रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका; हे आता म्हणतायेत निष्ठेचं दुध पाजलं
रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
हे आता म्हणतायेत निष्ठेचं दुध पाजलं
यांनाही कोणीतरी निष्ठेचं दुध पाजलं
बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांनी युती घडवून आणली
त्यावेळी ठरलं होतं, ज्यांचा आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री
त्यावेळी शिवसेनेचे जास्त आमदार आले तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री केला
मग नंतर कोणाबरोबर गेले तेव्हा नाही का निष्ठा आठवली आताचं का निष्ठा आठवली ?
उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र
-
भरधाव ट्रकने शालेय विद्यार्थ्यांना चिरडलं; कर्नाटकातील बेळगाव कॅम्प परिसरातील भीषण अपघात
भरधाव ट्रकने शालेय विद्यार्थ्यांना चिरडलं
कर्नाटकातील बेळगाव कॅम्प परिसरातील भीषण अपघात
अपघातात दहा वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
अरहान बेपारी असं मृत विद्यार्थ्याचं नाव
तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी
अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद
अपघातानंतर संतप्त जमावान ट्रकचालकाला दिला चोप
-
परळीत मुलीची छेड का काढली असं विचारणाऱ्या आईचा चाकूने भोकसून खून; दोन आरोपींना घेतले ताब्यात
परळीत मुलीची छेड का काढली असं विचारणाऱ्या आईचा चाकूने भोकसून खून
परळी तालुक्यातील वानटाकळी तांडा येथील घटना आहे
अल्पवयीन मुलगी असून माझ्या मुलीची छेड का काढली विचारणाऱ्या आईचाच केला खून
वन टाकळी तांड्यावर तणावाचं वातावरण आहे
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल
अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे
-
कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात; तब्बल पंधरा दिवसानंतर दमदार पाऊस
कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात
शहरात पावसाला जोरदार सुरुवात
तब्बल पंधरा दिवसानंतर दमदार पावसाला सुरुवात
-
नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील कन्हान नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यू
– नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील कन्हान नदीत दोन युवकांचा बुडून मृत्यु
– राहुल ठोंबरे आणि उमेश ठाकरे असं मृत्यू झालेल्या तरुणांची नावे
– कन्हान नदीत आंघोळीला गेले असताना घडली घटना
– दोन्ही तरुणांच्या मृतदेहांचा शोध सुरू
– दोघांच्याही मृत्यूने कुटुंबियांचा आक्रोश
-
मिरारोडमधील मयंक सिंग अपहरण आणि हत्याप्रकरणी दोघांना अटक
मीरारोडमध्ये राहणाऱ्या 13 वर्षीय मयंक सिंग नावाच्या मुलाची अपहरण आणि निर्मम हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीला अटक
दोघे आरोपी बेरोजगार असल्याने श्रीमंत घराच्या असलेल्या मयंक याचा अपहरण करून हत्या केल्यानंतर 35 लाखांची खंडणी मागितली
मृतक मयंक सिंग दोन दिवांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता
मयंकचे कुटुंबीयांनी काशिमीरा पोलीस ठाणेत बेपत्ता होण्याची तक्रार दिली
आरोपीने 35 लाख रुपयांची खंडणी मागितली.
मयंक सिंगची आईने ही माहिती जेव्हा पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी कॉलच्या आधारे अफजल आणि इरफान या दोघांना अटक
-
संजय राऊत यांच्या अनुपस्थित अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे यांनी काम सांभाळाव; अरविंद सावंत
संजय राऊत यांच्या अनुपस्थित अरविंद सावंत आणि नीलम गोऱ्हे यांनी काम सांभाळाव
उदय सामंत यांनी किती स्टंट करावे
ज्यांनी रात्र रात्र जागुन यांचे बॅनर लावले त्याच लोकांची नाव हे घेत आहेत.
अब्दुल सत्तार यांना दाखवायचे आहे की मी शिंदेच्या जवळचा आहे..
उद्धव ठाकरेंपासून लांब गेलो आहोत दाखवायचे आहेत त्यामुळे ते असे वागतात.
तुम्ही ज्या शाळेत शिकलात त्या शाळेचा संस्थापक अध्यक्ष इथे आहेत.
तुम्ही राजीनामे द्या, मग लोक मतपेटीतून कसे हल्ले करतात ते बघा
एकनाथ शिंदेना सांगा ते म्हणाले आहेत की 40 पैकी एकही आमदार पडला तर ते राजकारण सोडतील.
आम्ही स्क्रीनशॅाट काढले आहेत. जेंव्हा आमदार पडतील तेंव्हा आम्ही चौकाचौकात बॅनर लावून आठवण करून देऊ
-
अमरावतीमधील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक
अमरावतीमधील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरण.
एनआयएच्या टीम ने काल आणखी दोन आरोपींना घेतले होते ताब्यात.
दोन्ही आरोपींना आज अमरावतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले .
दोन्ही आरोपींना न्यायालयाने सात तारखेपर्यत ट्रांझिट रिमांड
7 तारखेपर्यंत आरोपींना एनआयए न्यायालयात आरोपींना हजर करावे लागणार आहे
-
नाशिक महापालिका आयुक्तांच्या नावाने पैसे मागणारे मेसेज व्हायरल; आयुक्तांनी पोलिसात तक्रार
नाशिक महापालिका आयुक्तांच्या नावाने पैसे मागणारे मेसेज
मनपा आयुक्तांची पोलिसांत तक्रार
मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार असल्याचे भासवून अधिकारी नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस
व्हॉटसअप डीपीला आयुक्तांचा फोटो लावून स्वतः आयुक्त असल्याचे भासविले
लिंक क्लिक करून पैसे पाठविण्याच्या सूचना
फेक मेसेजला बळी पडू नका मनपा आयुक्तांचे अवाहन
-
संजय राऊत यांची उणीव भासेलच, त्यांची जागा कुणी भरू शकत नाही; सचिन आहिर
– सत्तानाट्य झाल्यानंतर ही प्रवक्त्यांची बैठकीत पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केले
– सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. घटनेवर पक्ष चालतो आणि घटनेवर अवलंबूनच निर्णय होईल.
-आम्ही सकारात्मक आहोत, लोकशाहीला धरून जर निर्णय झाला तर लोकशाही जीवंत असल्याचे समोर येईल
– तेजससारखा कार्यकर्ता आणि त्यांने केलेले काम पाहता संघटनात्मक नाही, पण चळवळ म्हणून कार्यरत आहे. पण त्याचे क्षेत्र राजकारण नाहीय. तो वेगळ्या क्षेत्रात आहे.
– संजय राऊत यांची उणीव भासेलच, त्यांची जागा कुणी भरू शकत नाही.
पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्यामागे उभा आहे.
-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे केले स्वागत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांचे केले स्वागत
मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळदेखील उपस्थित
राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी-सेट भेट दिला
औपचारिक बैठकीनंतर राज्यपालांनी आयोजित केले राष्ट्राध्यक्ष तसेच त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ स्नेह भोजन
यावेळी मालदीवचे वित्त मंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फय्याज इस्माईल व परराष्ट्र सचिव अहमद लतीफ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिर्ला समुहाच्या संचालिका राजश्री बिर्ला, हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व पोलीस महासंचालक रजनीश सेठ प्रामुख्याने उपस्थित होते.
-
सांगली
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ऑन उदय सामंत
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निषेधार्त आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण करणं अत्यंत चुकीचे आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणालाही भाषण करण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची गळचेपी आम्ही खपवून घेणार नाही,,, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण.
-
वाशिम
पाच दिवसाच्या विश्रातीनंतर मंगरुळपिर तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू
-
Gopichand Padalkar : सांगली आमदार गोपीचंद पडळकर ऑन उदय सामंत
माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध
पुण्यात माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलाय
आदित्य ठाकरे यांचा दौरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गळ्यात भगवे मफलर घालून गर्दी भासवत आहेत आमदार गोपीचंद पडळकर
-
Uday Samant Attack : सामंत यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना पोलीस कोठडी
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरणातील शिवसैनिकांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
शिवाजीनगर सत्र न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
राजकीय आकसापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींच्या वकिलाकडून कोर्टात युक्तीवाद
हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे घटनास्थळावर उपस्थित नव्हते
राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला
सरकारी वकिलांनी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून लावत 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे…
-
मेधा पानसरे म्हणतात…
तपासात प्रगती नसताना खटला सुरू करण्याची परवानगी न्यायालयाने दिले होती
याचा खटल्यावर तपास होऊ शकला असता
त्यामुळ तपास यंत्रणा बदलण्याची मागणी अभय नेवागी याच्या सूचनेनुसार केली 22 एप्रिल 202 ला केली होती
नालासोपारा केस मध्ये एटीएस ने मोठा तपास केलाय ज्यात काही
हिंदुत्ववादी लोकांच्या घरी शस्त्रसाठा सापडला होता
दाभोलकर पानसरे मधले काही आरोपी पकडले होते त्यामुळे एटीएस चा आधीपासूनच तपासात संबंध आहे
-
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
तपास एटीएसकडे देण्याची पानसरे कुटुंबियांनी केली होती मागणी
पानसरे हत्येचा तपास आता एसआयटी कडून एटीएस कडे वर्ग होणार
न्यायालयाच्या आदेशावर पानसरे कुटुंबियांनी केलं समाधान व्यक्त
लवकरात लवकर हत्या प्रकरणाचा छडा लागण्याची व्यक्त केली आशा
-
दादरमधील स्वामी नारायण मंदिराजवळ चोरी, संशयिताला अटक
मुंबईतील समता नगर पोलिसांनी दादर येथील स्वामी नारायण मंदिराजवळून नऊ चोरीच्या दुचाकींसह मेव्हणा आणि मेव्हण्याला अटक केली
हे आरोपी जालना येथून दुचाकी चोरून मुंबईत विकायचे आणि मुंबईतून दुचाकी चोरून महाराष्ट्रातील जालना आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांना विकायचे
मुंबईतील विविध ठिकाणांहून चोरलेल्या नऊ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत
-
अनिल गोटे म्हणाले…
कोनशिला प्रकरण… अनिल गोटे यांची प्रतिक्रिया
दोंडाईचा येथील कोणाशीलेवरील आधी उपमुख्यमंत्र्यांच नाव नंतर मुख्यमंत्र्यांचं
मी हे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आधीच सांगितलं होतं की, हे लोक तुमच्या सोबत कसे वागतील. समोरून mic काढून घेणं. जे सांगू तेच बोलन. चिट्टी लिहून देणं.
तुमच्या आमच्या युतीत तुमची पात्रता काय हे दर्शवण्याचा प्रयत्न भाजपने केलाय….
मुख्यमंत्री मराठा समजामधून आले आहेत. म्हणून भाजप त्यांचा जाणीवपूर्वक अपमान करत आहे….
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली याचा गुजाराती लोकांना मराठ्यांचा राग आहे.
-
वैभव नाईक यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया, म्हणाले…
वैभव नाईक यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचा दौरा होता त्या भागातून जाण्याचे टाळायला हवं होतं. हे टाळलं असत तर पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या.जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये जे आमदार गेले त्यांच्याबद्दल रोष आहे.शिवसैनिकांनी शांत राहायला हवं, आदित्य ठाकरेंचे अनेक दौरे आपल्याला उत्स्फूर्तपणे करायचे आहेत.आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे तो डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांकडून केला जात आहे”, असं नाईक म्हणाले आहेत.
-
शिवसेना नेते बबनराव थोरात यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना मुंबई पोलिसांनी
चिंचपोकळीमधून त्यांच्या घरातून ताब्यात घेऊन पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलंय
हिंगोलीत त्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यासंदर्भात भडकावू भाषण केले होते
रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि पुणे पोलिसांना सोपवलं
-
मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रकाश आमटे यांची भेट
पुणे दौऱ्यावर असताना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. प्रकृती साथ देत नसली असली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली.
-
छत्रपती संभाजीराजेंकडून परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा, 9 ऑगस्टला तुळजापुरातून सुरुवात
छत्रपती संभाजीराजेंकडून परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा
9 ऑगस्टला तुळजापुरातून सुरुवात
तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांना प्रवेश नाकारण्यात आला होता
याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी केली परिवर्तनाच्या क्रांतीची घोषणा
-
नाशिक मासिक पाळी प्रकरण; पीडित मुलगी करणार राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार
नाशिक मासिक पाळी प्रकरण
पीडित मुलगी करणार राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार
मासिक पाळीमुळे शिक्षकाने शाळेत वृक्षरोपण करू दिले नाही
पीडित मुलीने केला होता आरोप
नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी आश्रम शाळेतील प्रकार
चौकशीनंतर आदीवासी विभागाची शिक्षकाला क्लिनचीट
मुलगी शाळेत हजरच नसल्याची रिपोर्टमध्ये नोंद
आता मुलगी राज्य बालहक्क आयोगाकडे तक्रार करणार
-
पदाधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं, उदय सामंत हल्ल्याप्रकरणात शिवसेना आक्रमक
उदय सामंत यांच्या वाहनावरील हल्ला प्रकरण
सेनेच्या पुणे शहर प्रमुखांसह पाच जणांना अटक
पदाधिकाऱ्यांना अटक झाल्याने शिवसेना आक्रमक
खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा सेनेचा आरोप
कार्यकर्त्यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला जमण्याचे आदेश
10 वाजता सर्व कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमणार
-
पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी भागात वाहनांची जाळपोळ, आरोपींचा शोध सुरू
पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडी भागात अज्ञात दोन व्यक्तींनी पेटवली वाहने
एक चारचाकी आणि तीन दुचाकींचा समावेश
बुधवारी पहाटे चारच्या सुमारास घडली घटना
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू
-
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवसेनेत प्रवेश करणार
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके शिवबंधनात अडकणार
लक्ष्मण हाके आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार
मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊन सेनेत प्रवेश करणार
लक्ष्मण हाके यांना सेनेकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
-
उदय सामंत हल्लाप्रकरण; पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंना अटक
आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर मंगळवारी झाला होता हल्ला
हल्ल्यात वाहनाची मागची काच फुटली
पुण्याच्या कात्रज परिसरात हल्ला
हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरेंना अटक
-
उमेश कोल्हे हत्याप्रकरण; एनआयएचे पथक पुन्हा अमरावतीत
मेडीकल व्यवसायिक उमेश कोल्हे हत्याप्रकरण
एनआयएचे पथक पुन्हा अमरावती शहरात दाखल
फरार आरोपी शोधाच्या पार्श्वभूमीवर पथक अमरावतीत
विश्वसनीय सुत्रांकडून माहिती
पोलिसांकडून वृत्ताला अधिकृत दुजोरा नाही
आतापर्यंत याप्रकरणात सात आरोपींना अटक
-
राज्यात विजेच्या मागणीत वाढ ; 4 हजार मेगावॅटने वाढली मागणी
राज्यात पाऊस ओसरताच विजेच्या मागणीत वाढ
मंगळवारी विजेच्या मागणीत 4 हजार 242 मेगावॅटची वाढ
राज्यात वीजेची मागणी पोहोचली 21 हजार 748 मेगावॅटवर
राज्यातील अनेक भागात पूर ओसरल्याने पुन्हा उद्योग सुरू झाले
उद्योगांसाठी अतिरिक्त विजेची गरज
-
नागपुरात विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक
नागपुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीबाबत प्रश्नचिन्ह
शहरात धावतात अनफीट आणि धोकादायक स्कूल बसेस
नागपूर आरटीओच्या कारवाईत तब्बल 232 स्कूल बस दोषी
शहरातल्या 107 बसेस मुलांची वाहतूक करण्यासाठी अनफीट
300 पेक्षा जास्त स्कूल बसेसची अद्याप फिटनेस चाचणी नाही
पालकांच्या चिंतेत भर
-
मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका; सीएनजीच्या दरात 6 रुपयांची वाढ
मुंबईकरांना महागाईचा फटका
सीएनजीच्या दरात वाढ सुरूच
सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांची वाढ
पीएनजीचेही दर वाढले
Published On - Aug 03,2022 6:41 AM