Maharashtra News Live Update : जेलमध्ये जाण्यापेक्षा राजपालांकडे गेलेलं चांगलं, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

| Updated on: Feb 13, 2022 | 6:10 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : जेलमध्ये जाण्यापेक्षा राजपालांकडे गेलेलं चांगलं, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई : आज  शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर करण्यात येणाऱ्या सोमय्यांच्या सत्काराला काँग्रेसनं विरोध केलाय. आज देखील पुण्यात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Feb 2022 09:26 PM (IST)

    ठाणे महापालिका प्रभाग रचनेवरून शिवसेना – राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने

    ठाणे महापालिका प्रभाग रचनेवरून शिवसेना – राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने आली .

    वादग्रस्त प्रभाग रचनेच्या विरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार – नरेश म्हस्के- महापौर

    तर शिवसेनेचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे काय करत होते? – आनंद परांजपे, राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष

  • 11 Feb 2022 07:15 PM (IST)

    गोव्यात भगवं वातावरण-आदित्य ठाकरे

    शिवसेनेसाठी गोव्यात चांगलं वातावरण आहे

    आम्ही कोविड निगेटिव्हसाठी लढतो पण राजकारण आमचं पॉझिटिव्ह आहे

    संजय राऊत आमची तोफ आहेत

    त्यांचा आवाज ऐकला जातो, त्यावरच टीका होत

    शिवसेना आमच्या राज्यात यावी अशी सर्वांची अपेक्षा आहे

    आमच्याकडे भाजपसारखे मोठे नेते नाहीत

    आम्ही कार्यकर्ते घेऊन प्रचार करतो, ठाकरेंचा भाजपला टोला

  • 11 Feb 2022 05:37 PM (IST)

    किरीट सोमय्या Live

    सोमय्यांना ज्या पायऱ्यावर पुण्यात धक्काबुक्की त्याच पायऱ्यांवर आज भाजपकडून सत्कार

    संजय राऊत यांना माझी विनंती आहे, त्यांनी लाईफलाईन हेल्थकेअर कंपनीची कुणाची आहे, याची स्थापना कधी झाली. याचे उत्तर द्यावे.

    या कंपनीचा मालक चहावाला आहे. या कंपनीला शंभर कोटींचं कॉन्टॅक्ट दिलं.

    त्यामुळे संजय राऊत कोविड पेशेंटच्या जिवाशी खेळण्याचं काम करत आहेत.

    कोविड रुग्णांची हत्या केलेल्यांवर गुन्हा कधी?

    कोविड संपला म्हणून आता वाईनमधून कमाई सुरू केली का?

    आधी ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीला कसं कॉन्ट्रॅक्ट कसं दिलं?

    या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त आणि महापौर यांनी तक्रार दाखल करण्याचे मान्य केले

    अमिताभ गुप्ता ठाकरे, पवारांच्या एजंटसारखे वागत आहेत

    गेल्या शनिवारी इथं एकही पोलीस का नव्हता?

    आज एवढे पोलीस आले कुठून?

    माझ्यावर हत्येचा कट केल्याचे गुन्हा दाखल करा

    याचा सखोल तपास झाला पाहिजे

  • 11 Feb 2022 05:15 PM (IST)

    औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग

    आगीत व्हॅल्यू डी इमारतीचे मोठे नुकसान

    अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवलं नियंत्रण

    आगीत अडकलेल्या दोन जणांना सुखरूप काढले बाहेर

    शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

    दुपारी दोन वाजता लागली होती भीषण आग

  • 11 Feb 2022 03:19 PM (IST)

    गोव्यात पूर्ण बहुमताचं सरकार येईल-फडणवीस

    उत्तर प्रदेशातही भाजपने चांगलं काम केलं आहे

    गोवा लहान असल्याने सर्वांना संधी देऊ शकत नाही

    गोव्याला स्थिर सरकार भाजपनं दिलं

    गोव्याची निवडणूक वेगळी

    गोव्याचा महाराष्ट्रावर परिणाम नाही

    मात्र गोव्याची निवडणूक आत्मविश्वस वाढवणारी

    हिजाबवर कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे

    भारतात कोणतही सरकार काय घालावं हे सांगत नाही

    पण शाळेत गणवेशच घातला पाहिजे

    निवडणुकीच्या तोडावर हा पेटवलेला मुद्दा

    एसटीबाबत सरकारची असंवेदनशिलता समोर आली आहे

  • 11 Feb 2022 03:12 PM (IST)

    पुणे

    महापालिका आवारात सोमय्या यांच्या सत्काराला पालिकेने परवानगी नाकारली

    परवानगी नसली तरी भाजप सोमय्या यांचा सत्कार करणारच

    पुणे शहर भाजपची आक्रमक भूमिका

  • 11 Feb 2022 02:31 PM (IST)

    जगदीश मुळीक, शहराध्यक्ष,भाजपा

    – किरीट सोमय्यांचा सत्कार आम्ही महापालिकेच्या पायऱ्यांवरच करणार,

    – त्यांच्या सत्काराला विरोध करण्याचा काँग्रेस आणि सेनेला अधिकार नाही,

    – याच पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की होते, याच पायऱ्यांवर राष्ट्रवादीचे आंदोलन होते , त्याला कशी का परवानगी दिली, मग आम्हाला विरोध का? मुळीक यांचा सवाल

    – सोमय्या हे भष्ट्राचाराच्या विरोधात लढणारे लढवय्ये आहेत

  • 11 Feb 2022 02:25 PM (IST)

    नागपूर

    नागपुरात काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा समोर झालेल्या आंदोलन प्रकरणात गुन्हे दाखल

    काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांन विरोधात गुन्हे दाखल

    प्रताप नगर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आले गुन्हे दाखल

    काँग्रेस ने केलं होतं गडकरी यांच्या घरा समोर आंदोलन , त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्ते सुद्धा उतरले होते रस्त्यावर

    त्यावरून दोन्ही पक्षावर करण्यात आले गुन्हे दाखल

  • 11 Feb 2022 02:24 PM (IST)

    अमरावती

    राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा

    चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाचा निर्णय, 25 हजार दंड

    2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू ना पडले महागात

    भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी केली होती 2017 मध्ये तक्रार

  • 11 Feb 2022 01:43 PM (IST)

    उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरु

    वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक

    महामंडळ वाटप बाबत ही बैठक असल्याची माहिती

  • 11 Feb 2022 01:19 PM (IST)

    असा आहे वेस्ट इंडिजचा संघ

  • 11 Feb 2022 01:18 PM (IST)

    असा आहे भारतीय संघ

    भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, वॉशिंगटन सुंदर, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

  • 11 Feb 2022 12:48 PM (IST)

    राहुल गांधी गोव्यात दाखल

    राहुल गांधी गोव्यात दाखल

    गोवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार

    राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष

  • 11 Feb 2022 12:11 PM (IST)

    उद्धव ठाकरे कडून कोरोना काळात संजय राऊत यांच्या साथीनं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न : किरीट सोमय्या

    पीएमआरडीएनं त्या कंपनीला कंत्राट का दिलं

    उद्धव ठाकरेंनी त्या कंपनी ब्लॅकलिस्ट का केलं

    पीएमआरडीएकडे त्या कंपनीचा कागद नाही

    उद्धव ठाकरे कडून कोरोना काळात संजय राऊत यांच्या साथीनं लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न

    गेल्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 100 गुंड पाठवले होते

    संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी लागणार

    दुसऱ्या राऊत कडून संजय राऊतांकडे पोहोचला असेल तर जवाब द्यावा लागेल

    संजय राऊत यांना इतकी मस्ती आहे, इतकी गुर्मी आहे

    महाराष्ट्रांच्या लोकांची हत्या करुन काही होणार नाही, असं वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहतात

  • 11 Feb 2022 11:41 AM (IST)

    आपल राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन, इथली हवा शांत : उद्धव ठाकरे

    आपल राजभवन देशातील सर्वोत्तम राजभवन आहे

    पन्नास एकरचा परिसर, समुद्र किनारा, झाडी

    राजकीय हवा कशी असले तरी इथली हवा थंड आहे

    पावसाळ्यात इथं मोर नाचतानाचे फोटो येतात, तर, कधी विषारी साप पकडल्याचे फोटो येतात

    शिवसेना प्रमुखांसोबत येथे यायचो, राज्यपाल यांना भेटायला यायचो

    तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना भेटायला बोलावलेलं त्यावेळी आलेलो

    प्रणव मुखर्जी यांनी भेटायला बोलावलेलं

    जुना वारसा जपून आपण आधुनिककतेकडे चाललो आहोत

  • 11 Feb 2022 11:38 AM (IST)

    अनावश्यक संघर्ष करु नये, राज्यात शांतता राखावी : दिलीप वळसे पाटील

    मालेगावमध्ये हिजाब डे ला परवानगी नाही

    अनावश्यक संघर्ष करु नये

    राज्यात शांतता राखावी

    दोन्ही बाजून समजून घ्यावं, आंदोलन करु नये

    राजकीय पक्षांनी विनाकारण या विषयावरुन अस्वस्थता निर्माण करु नये

    स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत, मॉनिटरिंग सुरु आहे.

    धर्मगुरुंनी कोणाला प्रक्षुब्ध करणार वक्तव्य करु  नये असं आवाहन

  • 11 Feb 2022 11:01 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनात दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले आहेत. राजभवनातील दरबार हॉलच्या उद्घाटनासाठी ते  पोहोचले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

  • 11 Feb 2022 10:15 AM (IST)

    गोवा मुक्ती लढ्यावेळी आज बोलणारी लोकं कुठं होती? संजय राऊत

    गोवा मुक्ती लढ्यावेळी आज बोलणारी लोकं कुठं होती

    गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र, राममनोहर लोहिया, समाजवादी लोक आणि गोव्यातील क्रांतिकारक होते

    नरेंद्र मोदींनी गोव्याशी भावनिक नातं सांगितलं, गोव्यानं सर्वांना भरभरून दिलं आहे

    गोव्यानं इंदिरा गांधी, वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे या सर्वांना दिलं

  • 11 Feb 2022 10:11 AM (IST)

    आज आदित्य ठाकरे वास्कोत सभा घेतील, नंतर पेडणेमध्ये जातील : संजय राऊत

    शिवसेनेला गोव्याचा इतिहास अधिक माहिती आहे

    गोवामुक्तीच्या लढ्यात महाराष्ट्र होता

    महाराष्ट्र गोमंतकवादी पक्ष मूळचा पक्ष

    शिवसेना 11 जागा लढतेय

    आज आदित्य ठाकरे वास्कोत सभा घेतील, नंतर पेडणेमध्ये जातील,

    उद्या साक्रीत सभा घेतील

    गोव्यात लोकसभा निवडणूक देखील लढणार

  • 11 Feb 2022 09:47 AM (IST)

    जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क काढायचा नाही : अजित पवार

    जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क काढायचा नाही

    मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू

    तोपर्यंत मास्क घालणं आवश्यक आहे, मंत्रिमंडळ बैठकीवेळी तशा बातम्या चालवू नका

    मुंबई चांगली दिसावी म्हणून उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ, आदित्य ठाकरे यांना वाटतं

    चांगल्या उद्देशानं हे मला पाहायचं होतं,

    राष्ट्रपती महोदय महाराष्ट्रात असल्यानं आज मुंबईत होतो

    तुम्हाला न समजल्यानं सकाळी चांगली पाहणी झाली झाली.

    महामंडळाच्या नियुक्तीमध्ये कोणतीही अडचण नाही

    पक्ष नाव देत आहेत कोणतीही अडचण नाही

    लतादीदी गेल्यानंतर अशा प्रकारचे मुद्दे काढू नये

    देशात आणि मुंबईत अन्य महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत

    कोस्टल रोड कधी पूर्ण होणार, विकासकामं कधी होणार, अर्थसंकल्पात काय असणार याबाबत विचारलं पाहिजे

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा नियोजनासंदर्भातील निधी बाबत तुम्हाला पाहायला मिळेल.

  • 11 Feb 2022 09:41 AM (IST)

    चांगलं काम कोण करत असेल तर ते पाहायला आवडतं : अजित पवार

    कोरोनाच्या संकटाच्या काळात अडचण न येता काम झाली पाहिजेत

    आदित्य ठाकरे, आदिती तटकरे यांना त्यांच्या पक्षांनी संधी दिली

    जिल्हा वार्षिक आरखडा तयार करत असताना, जिल्हा नियोजनासाठी शहरी लोकसंख्या, ग्रामीण भाग, लोकसंख्या याचा त्यासाठी अभ्यास केला जातो

    मुंबईला कमी निधी मिळतो तो वाढवून द्यायला पाहिजे

    आदित्य ठाकरे यांनी सीएसआरच्या माध्यमातून विकासकामं करण्याचा प्रयत्न केला

    चांगलं काम कोण करत असेल तर ते पाहायला आवडतं

    लोकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो, लोकांकडून काही सूचना मिळाल्या

    स्वच्छतेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे, हे करताना झाडं तोडली जाणार नाहीत याचा प्रयत्न

    झाडं टिकवून विकासकामाचा प्रयत्न

    फ्लाय ओवर आहेत त्याखाली नुतनीकरण आणि सौंदर्यीकरण केलं

    महानगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यानं ते काही गोष्टी करतात

    महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्याशी संबंधित असल्यानं सर्वजण एकत्र येऊन काम करतात.

    माहिमचा किल्ला आहे तिथं एक एकर जागा आहे

    धोबी घाट पाहिला त्या स्पॉटवर उभं राहून लोक पाहतात

    हे करत असताना लोकांना विस्थापित व्हावं लागतं, त्यांना कुणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही,याची दक्षता आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचं अजित पवार म्हणाले

  • 11 Feb 2022 09:29 AM (IST)

    महाराष्ट्राची अनलॅाकिंगच्या दिशेनं वाटचाल : विजय वडेट्टीवार

    – महाराष्ट्र अनलॅाकिंगच्या दिशेनं वाटचाल करत आहेत

    – या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र पुर्णताहा अनलॅाक होण्याच्या दिशेनं वाटचाल

    – राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होतेय

    – महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात येत आहे

    – नागपूरात आठवडाभरासाठी निर्बंध

  • 11 Feb 2022 08:03 AM (IST)

    आरोग्य विभाग परीक्षा पेपर फुटी प्रकरणी औरंगाबादच्या शिक्षकाला अटक

    आरोग्य विभाग परीक्षा पेपर फुटी प्रकरणी औरंगाबादच्या शिक्षकाला अटक..

    आरोग्य विभाग गट ड परीक्षा पेपर फुटीत शिक्षकाचा सहभाग..

    अर्जुन भरत बनावत उर्फ राजपूत या औरंगाबादच्या माजी शारीरिक शिक्षण शिक्षकाला पोलिसांनी केली अटक..

    न्यायालयाने 19 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी..

  • 11 Feb 2022 07:58 AM (IST)

    पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर

    पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेचे रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर,

    जोपर्यंत अवैध टँक्सीज बंद होत नाहीत तोपर्यंत संपवावर ठाम राहणार,

    बघतोय रिक्षावाला संघटनेचा आग्रमक पवित्रा,

    काल आरटीओ कार्यालयावर काढला होता मोर्चा,

    आजपासून संपावर जाण्याचा निर्णय,

    अजित दादांकडे टँक्सीज बंद करण्याची मागणी …

  • 11 Feb 2022 07:16 AM (IST)

    नाशिक महापालिकेवर सत्ता पुन्हा भाजपची येणार, पदाधिकाऱ्यांचा अहवाल

    नाशिक महापालिकेवर सत्ता पुन्हा भाजप ची येणार

    मुंबईत झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांचा वरिष्ठांसमोर अहवाल

    महापालिकेत झालेली काम लोकांपर्यंत पोहोचवा – चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचना

    तर, प्रभाग रचनेत शिवसेनेनं हस्तक्षेप केल्याचा भाजप नेत्यांनी केला आरोप

    मुंबईतील बैठकीला महापौरांसह सर्व आमदार होते उपस्थित

  • 11 Feb 2022 06:22 AM (IST)

    पुण्यातील प्रभाग रचनेवर आतापर्यंत 429 हरकती प्रशासनाला प्राप्त

    पुण्यातील प्रभाग रचनेवर आतापर्यंत 429 हरकती प्रशासनाला प्राप्त

    प्रभाग रचनेवरील हरकती सोमवारपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार

    रविवारी सुट्टीमूळे हरकती नोंदवण्याचं काम राहणार बंद

    14 फेब्रुवारी दूपारी 3 पर्यंत या हरकती नोंदवता येतील,

    प्रभाग रचनेची तोडफोड करण्यात आली असा आरोप, भाजपा ,मनसेकडून केला जातोय

    राजकीय पक्षांनीही या संदर्भात हरकती नोंदवल्याची माहिती आहे…

  • 11 Feb 2022 06:18 AM (IST)

    भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर

    भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर,

    महापालिकेच्या पायऱ्यांचवरचं भाजपा करणार सोमय्यांचा सत्कार,

    महापालिकेची सूरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश,

    सोमय्यांना धक्काबुक्की केलेल्या पायऱ्यांवरच सोमय्यांचा सत्कार होणार,

    काँग्रेस करणार सोमय्यांना विरोध !

  • 11 Feb 2022 06:11 AM (IST)

    पुण्याच्या लांडेवाडीच्या घाटात घुमणार भिर्रर्र आवाज

    बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर आज लांडेवाडीच्या घाटात घुमणार भिर्रर्र आवाज

    बंदी उठवल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीच्या घाटात होणार

    शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं बैलगाडा शर्यतीच आयोजन

    आज आणि उद्या अशी दोन दिवस चालणार बैलगाडा शर्यत

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली शर्यतीला सशर्त परवानगी

    सकाळी 7 वाजता फुटणार शर्यतीचा नारळ

Published On - Feb 11,2022 6:10 AM

Follow us
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.