Maharashtra News Live Update : दिशा सालियन संदर्भात पुरावे असल्यास यंत्रणांना द्या, बदनामी टाळा : जयंत पाटील

| Updated on: Feb 23, 2022 | 6:22 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : दिशा सालियन संदर्भात पुरावे असल्यास यंत्रणांना द्या, बदनामी टाळा : जयंत पाटील
breakingImage Credit source: tv9

मुंबई : भविष्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने (‘TV9 Marathi’) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हसते पार पडलं यावेळी त्यांनी संबोंधित करताना राज्यात महाविकास आघाडीच्या काळात कोण कोणती विकास कामे झाली. ही विकास कामे करत असताना सरकारपुढे काय आव्हाने होती. सध्या राज्यात कोणती विकास कामे चालू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक वाढवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे या सविस्तर माहिती दिली. तसेच आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. लालूप्रसाद यांची प्रकृती गंभीर; रुग्णालयाने दिली महत्त्वाची माहिती त्याबाबत आपल्याला आज दिवसभरात अपडेट मिळत राहिल. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Feb 2022 12:53 AM (IST)

    वाशिम शहरातील जुन्या नगरपालिकेच्या इमारतील आग

    वाशिम शहरातील जुन्या नगरपालिकेच्या बिल्डिंगला आग…

    आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल…

    आग कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट…

  • 22 Feb 2022 10:32 PM (IST)

    दिशा सालियन संदर्भात पुरावे असल्यास यंत्रणांना द्या, बदनामी टाळा : जयंत पाटील

    दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मृत्यूचे कारण समोर आलेले नाहीत

    – मात्र तिच्या मृत्यूबाबत तिची बदनामी करतायत

    तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे हे चांगले नाही

    – तिच्या मृत्यूबाबत कोणत्याही नेत्याचा संबंध नाही याची आम्हाला खात्री आहे

    – तिच्या संदर्भात कोणतेही पुरावे असतील तर तपास यंत्रणाना पुरावे द्यावेत

    – उगाच पत्रकार परिषद घेऊन तिची बदनामी टाळावी

  • 22 Feb 2022 09:18 PM (IST)

    लोकल निर्बंध हटणार नाहीत, लस न घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा नाहीच

    कोरोना च्या पार्श्वभूमीवर लसीकरण न झालेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासासहित इतर निर्बंध कायम आहेत. नागरिकांनी मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, हात वारंवार धुणे अशा  कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

  • 22 Feb 2022 08:40 PM (IST)

    मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

    – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यानंतर मोहोळचे आमदार यशवंत माने यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर

    – मुख्यमंत्री म्हणून केला देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख

    – मोहोळमधील परिवार संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटलांसमोर घडला प्रकार

    – चूक लक्षात येताच दिलगीरी व्यक्त करत घेतले उध्दव ठाकरेंचे नाव

    – चुक झाल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल

    – मागील आठवड्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील केला होता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख

  • 22 Feb 2022 07:13 PM (IST)

    गोव्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे उतरणार

    गोव्यानंतर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकरे उतरणार

    24 तारखेला शिवसेना नेते-मंत्री आदित्य ठाकरे यांचा उत्तर प्रदेश दौरा

    शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या दोन जाहीर सभा

    दोमारियागंज आणि कोरांव येथे आदित्य ठाकरेंच्या जाहीर सभा

    शिवसेनेचे 51 उमेदवार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

  • 22 Feb 2022 06:10 PM (IST)

    सोलापुरात संतप्त महिलांनी दारु दुकान फोडले

    – सोलापुरात संतप्त महिलांनी दारु दुकान फोडले

    – देशी दारु दुकानामुळे महिलांचा होत होता मानसिक छळ

    – दारुचे दुकानाचा पत्ता विचारल्याने तळीरामांचा महिलांना होत होता मानसिक त्रास

    – तळीराम घराशेजारीच करत होते लघूशंका तर कधी घाणरडे संभाषण

    – त्यामुळे महिला तसेच मुलीदेखील होत्या दहशतीखाली

    – पोलिस आयुक्तांकडेही केली होती तक्रार मात्र काहीच कारवाई झाली नाही

    – त्यामुळे संतप्त महिलांनी हातोडीच्या सहाय्याने फोडली दारु दुकानाची भिंत

    – सोलापुरातील एसटी स्टॅंड जवळील मोटे वस्तीतील घटना

  • 22 Feb 2022 05:18 PM (IST)

    घर मिळवायला संघर्ष केलात, हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका : उद्धव ठाकरे

    पत्राचाळ पूनर्विकास प्रकल्पाचं दळण गेल्या काही वर्षांपासून दळलं जातं होतं, पण प्रश्न सुटत नव्हता

    पत्राचाळीसाठी आंदोलन करणाऱ्यांना अभिवादन करतो

    गेल्या वर्षी संघर्ष समिती मला भेटायला आली होती. त्यावेळी सुभाष देसाई आणि जितेंद्र आव्हाड होते

    मी त्यांना आंदोलन करु नका विषय सोडवतो, असं म्हटलं होतं

    सुभाष देसाईंना धन्यवाद देतोय ते यासाठी, कोणत्याही कामासाठी भेटायला यायचे त्यावेळी पत्रा चाळीचा विषय काढायचे

    त्यामुळं आजचा दिवस उजाडला, अडचणी डोंगराएवढ्या आहेत पण प्रश्न सोडवायचा म्हटल्या की मार्ग निघतो

    मुंबईत प्रशस्त नसलं तरी हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं

    आज मी एवढेचं सांगेन की चिकाटी असली, जिद्द असली की सर्व काही होतं.

    कामाला सुरुवात होतेय, हक्काची घरं मिळवायला संघर्ष केलाय तो विसरू नका, जे आपल्यातून निघून गेले त्यांना विसरु नका, हे घर विकून मुंबई सोडून जाऊ नका, त्यामुळं जिद्दीनं संघर्ष केला तो जिंकलात

    मुंबईत अनेक जण येतात, पोटा पाण्यासाठी येतात, हक्काचं घर मिळाल्यावर इथं राहतात

    पण हकक्काचं घर मिळाल्यावर विकू  नका आणि मुंबई सोडू नका, ही अट आणि विनंती

    घर झाल्यानंतर चहाला बोलवा, मुख्यमंत्र्यांचं मिश्कील वक्तव्य

  • 22 Feb 2022 04:54 PM (IST)

    समीर वानखेडेंना दिलासा ,पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश 

    समीर वानखेडेंना दिलासा

    पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे निर्देश

    पुढील सुनावणी सोमवारी

    कोपरी पोलिसांना आदेश

  • 22 Feb 2022 04:48 PM (IST)

    पुण्याच्या माणसाला वाशिमला पोस्टिंग दिलं तर त्याला परदेशात दिल्यासारखं वाटतं : राधेशाम मोपलवार

    संबंध महाराष्ट्र हा खूप दूरवर वाटतो

    पुण्याच्या माणसाला वाशिमला पोस्टिंग दिलं तर त्याला परदेशात पोस्टिंग दिल्यासारखं वाटतं

    औरंगाबादच्या माणसाला  गोंदियाला पोस्टिंग दिलं तर खूप लांब वाटतं

    महाराष्ट्रातील दोन शहरातील  प्रवासाचा वेळ कमी करणं हे स्वप्न असल्याचं एमएसआरडीसीचे राधेशाम मोपलवार म्हणाले.

  • 22 Feb 2022 04:39 PM (IST)

    सरकार उच्च न्यायलयात उघडं पडलं, उद्धव ठाकरे आज उघडं पडले, प्रशासन उघड पडलं : सदावर्ते

    सरकार उच्च न्यायलयात उघडं पडलं, उद्धव ठाकरे आज उघडं पडले, प्रशासन उघड पडलं,

    न्यायालयानं स्वत: हेरलं, रिपोर्ट आहे तर मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय कुठंय

    जो अभिप्राय न्यायालयासमोर ठेवण्यात आला त्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नव्हती

    मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी नसल्यानं ते सरकारच्या वकिलांची भांबेरी उडाली , त्यानंतर वेळ द्या वेळ द्या असं म्हटलं

    सरकारनं रिपोर्ट देऊ नका असं सांगितलं

    आम्ही महाभारतातले संजय नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या डोक्यात काय चाललंय हे आम्हाला माहिती नाही

    तुम्ही संपाची याचिका ऐकत नाही ती याचिका दुखवट्याची याचिका आहे.

    डंके के चोटवर आम्ही न्यायालयाला सांगितलं

    न्यायालयानं सदावर्तेंना रिपोर्ट वाचायला देण्यास सांगितलं

    येत्या शुक्रवारी रिपोर्ट आम्हाला देण्याचं आणि दुपारी अडीच वाजता सुनावणी करण्याचं निश्चित झालंय

    आज सरकार उघडं पडलेय, सरकारला न्याय मिळवून द्यायचा नाही

    शरद पवारांना कष्टकऱ्यांचा छळ पाहायचाय

  • 22 Feb 2022 04:24 PM (IST)

    न्यायमूर्ती साहेब तुम्ही ऐकताय ती याचिका दुखवट्याची : सदावर्ते

    ही जी याचिका तुम्ही ऐकत आहात,ती संपाची नसून दुखवट्याची याचिका आहे. आम्हाला समितीचा अहवाल देण्यास उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. शुक्रवारी अडीच वाजता सुनावणी होणार आहे, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

  • 22 Feb 2022 04:17 PM (IST)

     गेल्या पाच वर्षात अफवा पसरवण्याची गोबेल्स नीती आणि ठोकशाही चालायची हे जाणवायचं : आदित्य ठाकरे

    जरी मंत्री झाला तरी लोकांच्या मनातील भावना, त्यांची कामं  झाली पाहिजेत यावर आमचं लक्ष आहे.

    गेल्या पाच वर्षात अफवा पसरवण्याची गोबेल्स नीती आणि ठोकशाही चालायची हे जाणवायचं

    लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज ऐकून घेणं आणि काम करणं हिच आमची नीती : आदित्य ठाकरे

  • 22 Feb 2022 04:14 PM (IST)

    Aaditya Thackeray Maha Infra Live : राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल : आदित्य ठाकरे

    मुंबईतील हेरिटेज वॉक बुकिंग फुल असतं

    हायकोर्ट,  बाणगंगा इथं पर्यटन सुरु झालं आहे

    सरकारसह खासगी स्टेकहोल्डरनी पुढं यावं

    मुंबई वर्ल्ड क्लास शहर आहे

    मात्र, पंधरा वर्षानंतर बदल होत असतात

    मुंबई सर्वात पुढं चालली आहे. पुढं चला हे आपलं ब्रीद

    खर प्रदूषण हा लोकांना भेडसावणारा  विषय

    माझी वसुंधरा हा प्रकल्प

    राजकीय प्रदूषणाकडं मी लक्ष देत नाही, ते नैराश्यातून पुढं आलेलं आहे, मी त्याकडे दुर्लक्ष करतो

    मुंबईकरांचा ठाम विश्वास महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आहे

    आरोप करायचा आणि सोडायचं ही फॅशन होत आहे, युवकांना राजकारणापासून दूर घालवण्यासाठी हे होतंय

    उत्तर प्रदेशावरुन लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी आरोप

    राज्यांमध्ये हेल्थी कॉम्पिटेशन राहिली पाहिजे, राज्यांचा विकास झाला तर राज्याचा विकास होईल

  • 22 Feb 2022 04:09 PM (IST)

    Aaditya Thackeray Maha Infra Live : शाश्वत विकास न केल्यास पृथ्वीवरुन नष्ट होऊ : आदित्य ठाकरे

    लाटावर लाटा आल्यातरी महाराष्ट्र घाबरत नसतो

    शाश्वत विकास हे आमचं ध्येय आहे.

    महाराष्ट्रात काम करत असताना हिरवागार करायचा की ओसाड करायचा

    शाळांवर आम्ही काम करत आहोत.  मुंबई महापालिका सीबीएससई आणि आयसीएसई बोर्डासोबत काम करत आहे

    मराठी भाषा दहावीपर्यंत आवश्यक केलं आहे.

    पहिल्यांदा 4 हजार जागांसाठी दहा हजार अर्ज आले.

    सर्व खाती  एकत्र बसून काम करत आहोत

    विकास आणि पर्यावरण सोबत जाऊ शकतं

    जिथं झोपडपट्टी होती, तिथं मुंबईच्या पर्यावरणाला धोका आहे. झाडं नाहीत, उष्णता जास्त आहे.

    उचं बिल्डींग आल्या पण झाडं आहेत.

    परवानगी देत असताना गतीनं देत आहोत. प्रत्येक घराला इलेक्ट्रिक व्हेईकल पार्किंग, सोलर एनर्जी आहे की नाही पाहतो

    शाश्वत विकास केला नाहीतर आपण पृथ्वीवरुन गायब होऊ

    पर्यटन कागदावर राहायचं

    महाराष्ट्रात हॉटेल बनवायचं असेल तर 80 परवानगी आणि 15 खात्यांकडे जावं लागायचं , त्याची संख्या कमी केली.

    स्कुबा डायव्हिंगसाठी जगभरातून लोकं येतात

    महाराष्ट्रात कृषी पर्यटन वाढत चाललं आहे

    अजिंठा वेरुळ इतकी अप्रतिम गोष्ट महाराष्ट्रात आहे.

    मंदिर आहेत, लोणार आहे, माथेरान आहे महाबळेश्वर आहे, अध्यात्मिक पर्यटन, हेरिटेज पर्यटन वाढवू शकतो

    निधी पुरेसा आहे

    आपण दोन गोष्टी करु शकतो

    आपण आपलं वैभव आहे ते दाखवायला लाजत असतो ते बंद करायला हवं

  • 22 Feb 2022 04:04 PM (IST)

    Aaditya Thackeray Maha Infra Live : आम्ही लोकांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतोय : आदित्य ठाकरे

    पहिल्यांदा असं झालंय, स्टेट आणि बीएमसी एकाच सत्तेखाली असल्यामुळे, कुणाचं दुमत नाही, सगळे एकत्र काम करतात, वेगाने रस्ते होतात, रस्ताच्या खाली 42 युटीलीटी आहेत, फायबर ऑप्टीकपासून सगळं, पोलिसांच्या परवानगी घेऊन अनेक गोष्टी कराव्या लागतात, त्याही लगेच मिळायला लागल्या आहे.

    2023 पर्यंत मेट्रो आणि रस्त्याची कामं पूर्ण होणार आहेत. ही काम होत असताना आपल्याला पूनर्वसन करावं लागतं, लोकांची भावना घेऊन पुढं जावं लागतं.

    आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतोय. लोकांशी बोललं की ते आपल्याला जागा देतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 22 Feb 2022 04:02 PM (IST)

    Aaditya Thackeray Maha Infra live : रस्ते बांधताना डिझाईन थिंकिंग आलं पाहिजे : आदित्य ठाकरे

    जास्तीत जास्त शहरं ही वाहनं आल्यानंतर निर्माण झाली आहेत.

    नवीन शहरं आहेत. धारावी आहे. तिथं हाऊसिंग, कर्मशियल ऑफिस, प्ले ग्राऊंड, हॉस्पिटल यासारख्या गोष्टी एकत्र आणू शकतो का? याचा विचार केला पाहिजे.

    फुटपाथ प्रत्येक रस्त्याला असला पाहिजे.

    नवीन शहरातं रस्ता बनवताना डिझाईन थिंकिंग आलं पाहिजे. कलानगर जंक्शन होतं, तिथं ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी नेलं जायचं.

    आम्ही उद्या परवा काम सुरु करतोय. रस्ता हा टू लेनचा म्हणजेच सारखा असावा

    लास्ट माईल

    लास्ट माईल हे चालता आलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे.

  • 22 Feb 2022 03:58 PM (IST)

    इज ऑफ लिव्हींगसाठी टॅक्टिकल अर्बनायझेशन महत्त्वाचं : आदित्य ठाकरे

    शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पायाभूत विकासावर परिषद घेत आहात याबद्दल तुमचे आभार मानतो, असं म्हटलं.

    युवा नेतृत्त्वाच्या नजरेतून महाराष्ट्राचं आणि मुंबईचं व्हिजन कसे असेल?

    महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करत असताना चांगले अनुभव आहे. होश आणि जोश दोन्हीही आहे. अनुभवी व्यक्तींचा होश असतो आणि युवा नेत्यांचा जोश असतो.

    एमएसआरडीसी आणि एमएमआरडी दोन्ही संस्था इथं आहेत.राज्यात 43 अमृत शहरं आहेत. शहरीकरण वाढत चाललं आहे.

    शहराची हद्द वाढवत असतो, त्यामध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता जोडायचं की शहरीकरण जोडायचं हा प्रश्न आहे.

    शहरात फुटपाथ किती उंचीचे आहेत, दुभाजक किती आहेत? इज ऑफ लिव्हींगसाठी टॅक्टिकल अर्बनायझेशन महत्त्वाचं आहे.

  • 22 Feb 2022 03:53 PM (IST)

    एसटी विलीनीकरणावर शुक्रवारी सुनावणी, ST च्या वकिलांनी वेळ मागितला

    दिवस महत्त्वाचा आहे. संपामुळं एसटी महामंडळाचं संप सुरु झाल्यापासून 1600 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल केली जाणार नाही, असं महामंडळाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. संप काळात केवळ 10 टक्के सेवा सुरु होती. मात्र, आज न्यायालयात एसटीच्या वकिलांनी शुक्रवारपर्यंत वेळ मागून घेतला आहे. त्यामुळं विलीनीकरणाच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

  • 22 Feb 2022 03:42 PM (IST)

    समितीचा अहवाल पाहिलात का? मुख्य न्यायाधीशांचा सवाल

    राज्य सरकारच्या समितीचा अहवाल पाहिलात का? मुख्य न्यायाधीश यांची विचारणा

    महामंडळाच्या वकिलांना विचारणा

  • 22 Feb 2022 03:41 PM (IST)

    MTHL वर मेट्रो चालायला हवी, हे स्वप्न : श्रीनिवास

    MTHL वर मेट्रो चालायला हवी, हे स्वप्न

    एमएमआरडीए संस्थेंच पाच वर्षांचा प्लॅन

    2027 मध्ये एमएमआरडीए अग्रगण्य संस्था म्हणून उभी राहील

    नियोजनबद्ध विकास करणे आणि प्रादेशिक विकास योजना तयार करणे

    एमएमआ रिजनच्या कामात बदल झाले

    मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा फायदा मुंबईला व्हावा म्हणून जॉईंट व्हेंचर आणि पीपीपी मॉडेलवर करता येईल

    दक्षिण मुंबईचा पूनर्विकास झालेला असेल

    पनवेल आणि नवी मुंबईचा विकास करता येईल

    मुंबईतील प्रश्न समजून घ्यायला हवं, सर्व गोष्टी बाहेरून येतात

    कर्मचारी हे बाहेरुन येत असतात

    कच्चा माल आणि मनुष्यबळ येण्याचा प्रश्न आहे

    मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रत्यक्षात आल्यास दक्षिण मुंबईचा विकास होईल

    दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या इमारतींचा विकास होऊ शकतो

    2027 पर्यंत मुंबईचं चित्र बदललेलं असेल, असल्याचं एमएमआरडीएचे श्रीनिवास यांनी म्हटलं.

  • 22 Feb 2022 03:04 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

    एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली.

  • 22 Feb 2022 02:44 PM (IST)

    एसटी विलीनीकरणाबाबत मोठी बातमी

    एसटीच्या विलीनीकरणाबाबत काही वेळातच फैसला

    एसटी कर्मचाऱ्यांचा संपचा आजचा 109 वा दिवस

    कोर्टाचा निर्णय काय येणार?

  • 22 Feb 2022 02:12 PM (IST)

    पाणी दरातील दरवाढ रद्द करण्याची भाजपची मागणी

    जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेली पाणी दरातील दरवाढ रद्द करण्याची भाजपची मागणी,

    – जलसंपदा विभागाचा पाणीदरात प्रचंड वाढ करण्याचा निर्णय हा अत्यंत अन्यायकारक,

    – तसेच सरकारच्या अनागोंदी कारभाराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार असल्याचा आरोप

    – निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलनाचा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

  • 22 Feb 2022 02:03 PM (IST)

    भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बिज्जू प्रधाने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

    – मंत्री जयंत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

    – भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बिज्जू प्रधाने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

    – गर्दी जमविल्याप्रकरणी कोव्हिड प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    – भादवि कलम 188, 279 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीचे रोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल

    – सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 22 Feb 2022 02:02 PM (IST)

    मेधा पाटकरांचा वाईनच्या निर्णयावरून राज्य सरकारला टोला

    आम्ही नशामुक्तीच्या बाजूने आहोत

    सरकारचं कर्तव्य त्यांनी दारूबंदी करावी सकस खायला घालावं

    तेल दारूपेक्षा महाग असणं हे आम्हाला चालणार नाही

    पापाचा पैसा वापरणं आहे, रोजगार वाढवा आणि चांगल्या कर्माने पैसा कमवा

    मेधा पाटकरांचा वाईनच्या निर्णयावरून राज्य सरकारला टोला

    अण्णा हजारे नशामुक्तीच्या बाजूने असतील तर त्यांना माझा पाठिंबा आहे

    कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे

    त्यानं जगाच्या शेतीवर कब्जा करायचं ठरवलंय

    स्वतः 2 लाख 40 हजार एकरचा मालक आहे

    केंद्रानं त्यांना भारतात येण्यासाठी त्यांना आमंत्रण दिलंय

    केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल घेतली नाही म्हणून 1 हजार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला

  • 22 Feb 2022 01:55 PM (IST)

    गर्दी जमविल्या प्रकरणी कोव्हिड प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    – मंत्री जयंत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल

    – भाजप मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या बिज्जू प्रधाने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल

    – गर्दी जमविल्याप्रकरणी कोव्हिड प्रतिबंधक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    – भादवि कलम 188, 279 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीचे रोग अधिनियमानुसार गुन्हा दाखल

    – सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • 22 Feb 2022 01:53 PM (IST)

    मेट्रोचा फायदा 2025 ला समजणार

    येणा-या काळात महाराष्ट्रात विकास आपल्याला पाहायला मिळणार मेट्रो एकदा सुरू झाली की तुम्हाला तुमच्या स्टेशनपर्यंत फक्त पायी जावं लागेल. त्यानंतर तुम्ही तिथून तुमचा प्रवास अत्यंत जलद गतीने कराल. 2025 चं मुंबईकरांसाठी वेगळं असेल.  ज्या पध्दतीने सध्या मुंबईत काम सुरू आहे, त्यांचा फायदा तुम्हाला होणार आहे. हे काम करताना अनेकांची काळजी घेतली. कारण लोकांच्यासाठी तयार करण्यात आलं आहे. याचा फायदा लोकांना व्हावा असं आम्हाला असं कार्यक्रमात बोलताना अधिका-यांनी सांगितलं.

  • 22 Feb 2022 01:48 PM (IST)

    5 वर्षात अमुलाग्र बदल झालेला दिसेल 

    खूप प्रगती केलेली असेल

    5 वर्षात अमुलाग्र बदल झालेला दिसेल

    वाहतूक समस्यांची कोंडी सोडविण्यासाठी मदत होईल

    मुंबईकर त्याच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने चालत त्याचं स्टेशन गाठेल

    2025 पर्यंत तुम्हाला तुमचा प्रवास अधिक चांगला झालेल्या पाहायला मिळेल

    मुंबईत आणि इतर ठिकाणी सुध्दा आपल्या बदल झालेला पाहायला मिळेल

    प्रदुषण जपायला मदत होणार

    अजून स्वच्छ हवामान तुम्हाला मुंबईत पाहायला मिळेल

  • 22 Feb 2022 01:42 PM (IST)

    आपलं का सुध्दा मीडियाला समजलं पाहिजे

    एखादं काम आहे, त्याचा फायदा किती होणार याचा विचार करूनच आम्ही कामाला सुरूवात करतो

    विकास ही राजकीय प्रक्रिया

    आपलं का सुध्दा मीडियाला समजलं पाहिजे

    समृध्दी महामार्ग लोकांच्यामुळे लोकांना समजला

    लोकांनी अधिक फोटो काढल्यामुळे महामार्ग व्हायरल

  • 22 Feb 2022 01:30 PM (IST)

    हे सगळं मुंबईकरांसाठी आहे, हे त्यांना समजायला हवं

    हे अंडरग्राऊंड मेट्रो आहे मुंबईसाठी वेगळं आहे

    हे एक पध्दतीचं चॅलेंज आहे

    प्रत्येक ठिकाणी एखाद्या इमारतीला धक्का लागू नये म्हणून काळजी घेतली

    मीठी नदीच्या खालून गेलेलं काम सुध्दा चॅलेज होतं

    काम करणारी टीम उत्तम

    नव्या मेट्रोत ट्रॅक लावणार

    मला मुंबईच्या मेट्रोचा रस्ता लोकांमधून न्यायचा होता

    हे सगळं मुंबईकरांसाठी आहे, हे त्यांना समजायला हवं

  • 22 Feb 2022 01:29 PM (IST)

    दळण वळण सुविधा व्यवस्थित झाली तर महाराष्ट्राचा विकास होईल 

    देशात अनेक ठिकाणी चांगलं काम सुरू आहे

    ज्यावेळी संपुर्ण काम पुर्ण होईल त्यावेळी अनेकांचा प्रवास एकदम सुकर होईल

    महाविकास आघाडीसरकारचं पायाभूत सुविधांकडे लक्ष

    ही सगळी काम करीत असल्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल.

    दळण वळण सुविधा व्यवस्थित झाली तर महाराष्ट्राचा विकास होईल

  • 22 Feb 2022 01:23 PM (IST)

    लोकलचा भार कमी होणार 

    पुढच्यावर्षी फिजिकल काम पुर्ण होईल

    मेट्रोचं अंतिम टप्प्यात

    मुंबईतली वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मदत होईल

    गर्दी आहे म्हणून लोकांनी आत्तापर्यंत अनेक सेवा नाकारल्या

  • 22 Feb 2022 01:18 PM (IST)

    मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपतीच शिवस्मारक नको

    मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपतीच शिवस्मारक नको

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवणार 10 लाख पत्र

    समुद्राच्या बाजूला शिवस्मारक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

    जाणूनबुजून मुंबईतील शिवस्मारकाला उशीर केला जातोय

    पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आल्यास भेटीसाठी वेळ मागणार

    मात्र अरबी समुद्रात स्मारक नको संभाजी ब्रिगडेची आक्रमक भूमिका

    6 जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंत 10लाख पत्र पाठवणार

    संभाजी ब्रिगडेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे यांची माहिती ..

  • 22 Feb 2022 01:16 PM (IST)

    महाविकास आघाडीचं विकासाचं धोरण

    ‘टीव्ही9 मराठी’ने (‘TV9 Marathi’) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी त्यांनी राज्यातील रोडमॅप कसा असावा याविषयी बाबत सरकारची भूमिका मांडली. तसेच सध्या राज्यात लोकांच्या विकासाची कोणती काम चालू आहेत. मुंबई शहरात सध्या वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याची पाहायला मिळते. ती वाहतूक कोंडी कशी सोडवता येईल यावर एकनाथ शिंदे यांनी महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हच्या कार्यक्रमातून लोकांना मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी कशापध्दतीने काम करत आहे, त्याचबरोबर ते जनतेच्या किती हिताचं आहे हेही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

  • 22 Feb 2022 01:07 PM (IST)

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी मांडला राज्याच्या विकासाचा लेखाजोखा

    भविष्यात महाराष्ट्रातील (Maharashtraपायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची न्यूज वाहिनी ‘टीव्ही9 मराठी’ने (‘TV9 Marathi’) महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हचे आयोजन केले आहे. महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हसते पार पडलं यावेळी त्यांनी संबोंधित करताना राज्यात महाविकास आघाडीच्या काळात कोण कोणती विकास कामे झाली. ही विकास कामे करत असताना सरकारपुढे काय आव्हाने होती. सध्या राज्यात कोणती विकास कामे चालू आहेत. राज्यातील पायाभूत सुविधा अधिक वाढवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे या सविस्तर माहिती दिली. रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास यावरच कोणत्याही देशाचे भवितव्य ठरत असते, हेच लक्षात घेऊन राज्यातील रस्ते कसे अधिकाधिक चांगले करताय येतील याकडे सरकारचे लक्ष असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

  • 22 Feb 2022 01:02 PM (IST)

    घरकुल योजनेत नाव नसल्याने शोले स्टाईल आंदोलन.

    घरकुल योजनेत नाव नसल्याने शोले स्टाईल आंदोलन…. संपत डिंबर यांनी केल शोले स्टाईल आंदोलन… कोपरगाव तालुक्यातील टाकळी गावातील प्रकार… घरकुल योजनेतील ड यादीत नाव न आल्याने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महदहनाचा प्रयत्न …. गटविकास अधिकारी , पोलिसांच्या आश्वासनानंतर तासा भरानंतर आंदोलन मागे….

  • 22 Feb 2022 12:59 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस मोर्चाला ओबीसी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानं दाखवले काळे झेंडे

    पुण्यात काँग्रेस मोर्चाला ओबीसी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यानं दाखवले काळे झेंडे,

    ओबीसी आरक्षणासाठी आज काँग्रेसनं काढला मोर्चा

    कार्यकर्त्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात,

    ओबीसी संघर्ष समिती मंत्र्यांना दाखवणार होती काळे झेंडे ..

  • 22 Feb 2022 12:59 PM (IST)

    परमबीर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

    परमबीर विरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई आगामी ९ मार्चपर्यंत रोखण्याचा आदेश

    परमबीरविरोधातील सर्व तपास सीबीआयकडे सोपवायचा असल्यास सुप्रीम कोर्ट 9 मार्चला निर्णय देणार

    9 मार्च पर्यंत परमवीर यांना दिलासा

  • 22 Feb 2022 12:58 PM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या चाफेकर चौकात शिवसेनेचे आंदोलन

    -पिंपरी चिंचवड च्या चाफेकर चौकात शिव सेनेने आंदोलन केले

    -लिंक रोड कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, चुकीच्या पद्धतीन उभारण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर च्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय

    -स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या विरोधात ही सेनेने या वेळी घोषणाबाजी केली

  • 22 Feb 2022 12:51 PM (IST)

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमजीत सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू

    सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

    महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड खंबदा युक्तिवाद करीत आहेत

    तर ऍड पूनित बाली हे परमजित सिंग यांच्या वतीने युक्तिवाद करीत आहेत

  • 22 Feb 2022 12:43 PM (IST)

    भारत सरकारने आयातीवरील कर कमी करावा 

    भारत सरकारने आयातीवरील कर कमी करावा

    टेस्लाचा लाभ यापुर्वीच झाला आहे

    टेस्लाला लागणारे सुटे भाग महाराष्ट्रातून जात आहेत

    टेस्ला आलातर त्याचा आम्हाला आनंद आहे

    कोविडमुळं जगाचं नुकसान झाल

    सगळ्यात पहिला सावरला महाराष्ट्र

    लॉकडाऊन अचानक जाहीर झाल्याने लोक घाबरली

    सगळ्याचे रोजगार कसे वाचवायचे याबाबत मिटिंग

  • 22 Feb 2022 12:40 PM (IST)

    पायाभूत सुविधांचा रोजगाराचा थेट संबंध 

    बाळासाहेबांनी पुणे-मुंबई हायवेची कल्पना मांडली

    अनेकांनी ही टीका केली

    सध्या त्याला काय फायदा

    त्याकाळी पुण्याची लोकसंख्या 20 लाख होती

    दोन लाख लोकांना मिळाला रोजगार

    रस्त्यांमुळं अनेकांना रोजगार

    वैभवाच्या दिशेने लोकांना येता येईल

    रोजगार तरूणांना मिळाला पाहिजे

  • 22 Feb 2022 12:37 PM (IST)

    विजेवरती चालणारी अनेक वाहन बाजारात येतील

    विजेवरती चालणारी अनेक वाहन बाजारात येतील

    डेटासेंटर भविष्यात महत्त्वाचा ठरणार

    डेटासेंटरसाठी आकर्षक धोरण

    मोठे गुंतवणूक ह्यात उतरणार

    भारतातली सगळी माहीती त्या डेंटासेंटरमध्ये राहणार

    येणा-या कंपन्यांना आम्ही सगळं काही पुरवू

    तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे.

  • 22 Feb 2022 12:34 PM (IST)

    समृध्दी 700 किलोमीटर लांबाीचा महामार्ग आहे

    समृध्दी 700 किलोमीटर लांबाीचा महामार्ग आहे

    त्याच्यात अनेक केंद्र उभी राहिली पाहिजे

    ज्या दहा जिल्ह्यातून जातो, तिथं रोजगार निर्मिती झाली पाहिजे

    सगळं काम परस्पराला पूरक आहे

    विजेवरती चालणारी वाहनं सध्या खूप गरजेची आहेत

    तीन ठिकाणी हे प्रोजेक्ट सुरू आहेत

    आदित्य ठाकरेंना विजेवरती चालणारी वाहनं बाजारात आणायची आहेत

  • 22 Feb 2022 12:31 PM (IST)

    टाटाच्या पुढाकाराने ज्यावेळी हे तयार होईल त्यावेळी लाखो रोजगार तयार होतील

    आपण इलेक्टॉनिक्स प्लॅट तयार करतोय

    पेट्रोलनंतर इलेट्रॉनिक्सला प्राधान्य

    बल्क ड्रक पार्क रायगडला तयार होतोय

    सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत

    जेन ज्वेलर्री पार्क तयार होतंय

    टाटा समुह आणि अॅक्टीसला जागा दिली

    टाटाच्या पुढाकाराने ज्यावेळी हे तयार होईल त्यावेळी लाखो रोजगार तयार होतील

  • 22 Feb 2022 12:17 PM (IST)

    वाहतूक कोंडी सगळ्यात मोठी समस्या 

    वाहतूक कोंडी सगळ्यात मोठी समस्या

    लोकांना वाटत विकास होईल

    रोज वाहने वाढत आहेत

    55 उड्डान पूल बांधले त्यांचं महत्व आता समजतंय

    वेस्टर्न हायवे आणि इस्टर्न हायवे सुपरफास्ट करतोय

    मुंबईतला माणूस थेट बाहेर पोहचला पाहिजे, तर मुंबईचा माणूस थेट बाहेर पोहोचला पाहिजे

    सिडकोचे नवे प्रोजेक्ट सुरू आहेत

  • 22 Feb 2022 12:14 PM (IST)

    शासनाच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत 

    शासनाच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत

    विकासाची केमिस्ट्री लोकांना आवडते, लाखो दर्शक आज कार्यक्रम पाहत असतील

    सरकारवरती नेहमी टीका केली जाते

    ज्या देशाचा किंवा इन्फास्ट्रक्चर चांगलं असेल तर त्या भागाचा विकास होतो.

    समृध्दीमुळे मुंबई -पुणे प्रवास कमी काळात होणार

    लोकांचा वेळ वाचणार, इंधन देखील वाचणार, पर्यावरणाची देखील काळजी घेतली

    साडेअकरा हजार झाडे लावली आहेत.

  • 22 Feb 2022 12:10 PM (IST)

    समुध्दी महामार्ग तयार करताना अनेक अडचणी आल्या

    समुध्दी महामार्ग तयार करताना अनेक अडचणी आल्या

    पैसे मिळतील असं काही वाटतं नाही – शेतकरी

    शेतक-यांना विश्वास नव्हता त्यामुळे मी सही केली

    मी सांगतो तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, ज्यावेळी पैसे पोहोचले त्यावेळी मला स्वत:हून फोन आले

    10 हेक्टर जमीन आम्ही खरेदी केली,

    हॉटेल आणि घराला सुध्दा काही लोकांनी समृध्दी नाव दिलं

    लोकांना तिथल्या हाताला काम मिळेल, व्यवसाय मिळेल म्हणून काम करतोय आम्ही….

    कॅबिनेटमध्ये सुध्दा चर्चा केली, विदर्भ मराठवाडा, कोकण अनेक भागात विकास होईल

    नक्षल भागात विकासाकडे नेण्याच काम करतोय, शिक्षण आरोग्यासाठी काम करतोय

  • 22 Feb 2022 12:01 PM (IST)

    कोस्टल हायवेचं काम युध्द पातळीवर 2023 पर्यंत काम होईल

    विकासाच्या मुद्द्यावर आपण कार्यक्रम आयोजित केलं आहे

    राज्य सरकारच्या माध्यमातून शासन काय करतंय

    विकासाच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन

    कोस्टल हायवेचं काम युध्द पातळीवर 2023 पर्यंत काम होईल

    शिवडी नावा-शेवा सगळ्यात मोठा प्रकल्प, 2023 पर्यंत पुर्ण होईल

  • 22 Feb 2022 11:57 AM (IST)

    7 मार्च नंतर दिशा सलीयन प्रकरणाचा उलगडा होणार

    7 मार्च नंतर दिशा सलीयन प्रकरणाचा उलगडा होणार

    सर्व पुरावे तयार आहेत

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

    या प्रकरणात कोणा कोणाचा सहभाग आहे हे लकवरच स्पष्ठ होईल

    प्रकरणाचा उलगडाया होऊ नये साठीच सारी फडफड आणि शिवराळ भाषा सुरू आहे

    चंद्रकांत दादा यांची शिवसेना नेत्यांवर टीका

  • 22 Feb 2022 11:55 AM (IST)

    टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण

    – २०१८ मधील अपात्र परीक्षार्थीची सायबर पोलिसांकडून छाननी सुरू,

    – हि संख्या जवळपास २ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता,

    – २०१८ मधील टीईटी परीक्षेत ९ हजार ६७७ परीक्षार्थी पात्र ठरले होते.

    -२०१८ मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील अपात्र परीक्षार्थीपैकी किती जणांना पैसे घेऊन पात्र केले याची छाननी सुरू केली आहे,

  • 22 Feb 2022 11:54 AM (IST)

    गडचिरोलीतील तरूणांसाठी उद्योगाची निर्मिती करणार – एकनाथ शिंदे

    मी अनेकदा गडचिरोलीतील तिथल्या अनेक गोष्टींना भेटी दिल्या आहेत. त्यावेळी मला तिथं नेमका काय पॉब्लेम आहे हे मला समजलंय त्यामुळे तिथल्या तरूणांच्या हाताला अधिक काम मिळावं म्हणून प्रयत्न करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी टीव्ही9 मराठीची आज कॉनक्लेव्ह’कार्यक्रमात सांगितलं आहे.

  • 22 Feb 2022 11:51 AM (IST)

    गडचिरोलीमध्ये जाऊन करतो

    गडचिरोलीमध्ये जाऊन करतो

    नक्षलवादी का घडला विकास नाही

    तिथं शाळा, रस्ते याची वानवा आहे त्यामुळे तिथं नक्षलवादी घडला

    तिथल्या मुलांसाठी चांगल्या योजना आखल्या आहेत

    तिथल्या लोकांच्या रोजगारासाठी उद्योग सुरू केले आहेत

    तरूणांना रोजगार मिळालं तर नक्षल वादाकडे वळतील

  • 22 Feb 2022 11:47 AM (IST)

    मुंबई ठाण्याला जाणारा रस्ता बांधला आहे

    मुंबई ठाण्याला जाणारा रस्ता बांधला आहे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार योग्य काम करतंय नगर विकास विभागातून अमुलाग्र बदल होत आहे कस्टर फील्डचा सुध्दा नागरिकांना अधिक फायदा होईल

  • 22 Feb 2022 11:45 AM (IST)

    टिव्ही 9 गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बातम्या दाखवते

    टिव्ही 9 गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या बातम्या दाखवते समृध्दी महामार्ग आणि लांबपर्यंत नेट आहोत विकासाला महाविकास आघाडीकडून विकासाला अडथला आणला नाही मुंबई ते सिंधुदुर्ग रस्त्याचे काम सुरु आम्ही आवर्जुन टिव्ही 9 बघतो वर्षभरात समृध्दी महामार्ग सुरू होईल

  • 22 Feb 2022 11:28 AM (IST)

    नितेश राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया

    – प्राथमिक तपास हा मालवणी पोलिसांनी केलाय त्यामुळे प्राथमिक

    – मालवणी पोलिसांचा अहवाल आल्यावर त्यात काय तथ्य आहे हे पाहणे गरजेचे

    – त्या अहवालात किती तथ्य आहे हे पाहून याची चाचपणी केली जाईल

    – महिला आयोग कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही

    – एकाद्या महिलेची मृत्यूपश्चात बदनामी होते हे खेदजनक आहे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होती

  • 22 Feb 2022 10:48 AM (IST)

    दिशा सॅलियन प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची महिला आयोगाकडून दखल

    – मालवणी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांना 48 तासांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश

    – अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची माहिती दिली जाईल

    – महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची सोलापुरात माहिती

    – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सॅलियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला होता आरोप

    – दिशा सॅलियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी, अशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती मागण

    – ‘समाज माध्यमासमोर महिलांची बदनामी करणे निंदनीय, लोक भान विसरत चाललेत का असा प्रश्न पडतो’

  • 22 Feb 2022 10:18 AM (IST)

    एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात, खासदार रवींद्र गायकवाड यांची सुटका

    एअर इंडिया कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या प्रकरणात 2 कलमातुन माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची सुटका ,कलम 355 नुसार चालणार खटला

    2017 साली शिवसेनेचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली होती एअर इंडिया कर्मचाऱ्यास प्रकरण विमानात मारहाण

    2 कलमातून मुक्ताता केल्याने गायकवाड यांना दिलासा मिळाला, मारहाण प्रकरण नंतर गायकवाड देशभर चर्चेत आले होते

    बिजनेस क्लासचे तिकीट दिले नाही म्हणून खासदार रवी गायकवाडांकडून एअर इंडिया कर्मचाऱ्यांस विमानातच चपलेने मारहाण

    गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते.

    कलम 308 ( सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे) आणि कलम 201 ( पुरावे नष्ट करणे, खोटी माहिती देणे ) या आरोपातून रवींद्र गायकवाड यांची दिल्लीच्या कोर्टाने मुक्तता केली

  • 22 Feb 2022 10:10 AM (IST)

    उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्याविरोधात महापालिकेनेच केला गुन्हा दाखल

    जन्मतारखेचा खोटा दाखला सादर करून नोकरी मिळवणे, त्याआधारे महापालिकेची फसवणूक करणे, पीएचडीचे खोटे प्रमाणपत्र सादर करणे असे आरोप

    महापालिकेच्या महासभेत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात झाला होता ठराव

    त्यानंतर महापालिकेनं मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केला गुन्हा

    गुन्हा दाखल होताच भदाणे झाला फरार, फोनही बंद

  • 22 Feb 2022 10:09 AM (IST)

    भारतीय जनता पार्टी हा पक्ष सध्या प्रतिगामी राहिलेला नसून तो पक्ष पुरोगामी झालेला आहे – रामदास आठवले

    येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका आम्ही भाजपसोबत युती करून लढणार आहोत भारतीय जनता पार्टी हा पक्ष सध्या प्रतिगामी राहिलेला नसून तो पक्ष पुरोगामी झालेला आहे. संविधान बदलण्याचा कुठलाही विषय नसून उलट संविधानाचं पालन भारतीय जनता पार्टी जास्त करते अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी आणि भाजपसोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी आणि यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून यासाठी मी संजय राऊत यांच्या सोबत बोलणार असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे रामदास आठवले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी

  • 22 Feb 2022 10:07 AM (IST)

    पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाच काम अंतिम टप्प्यात

    पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाच काम अंतिम टप्प्यात

    वनाज ते गरवारे महाविद्यालय इथपर्यंतचा मार्ग लवकरच सुरू होणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला करणार मेट्रोचं उद्घाटन

    गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानकाचं काम अंतिम टप्प्यात

    इस्केलेटर, तिकीट काऊंटर, सगळी तयारी पुर्ण

    6 मार्चला मेट्रो सुरू होण्याची शक्यता

  • 22 Feb 2022 09:51 AM (IST)

    जिल्ह्यातील 2600 पैकी 850 कर्मचारी कामावर हजर

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 400 बसेस पैकी 144 बसेस च्या फेऱ्या सुरु आहेत. जिल्ह्यातील 2600 पैकी 850 कर्मचारी कामावर हजर आहेत.संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यात 238 कर्मचारी यांचे कामगार करण्यात आले आहे. कामगार संपावर असल्याने 50 चालकांना करार तत्वावर कामावर घेतले आहे.

  • 22 Feb 2022 09:16 AM (IST)

    नाशिक रोड परिसरात युवकावर कोयत्याने हल्ला

    जामीनासाठी पैसे न दिल्याने संतप्त चौघांकडून युवका वर हल्ला

    नाशिक रोड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा

    कोयता लोखंडी रॉड ने जखमी करत वाहनांचेही केले नुकसान

  • 22 Feb 2022 09:15 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील पाच गर्भपात केंद्रामध्ये आढळला मुदतबाह्य औषध साठा…..

    मेळघाट मधील एक गर्भपात केंद्र केले सील…

    त्रिसंदस्यीय समितीच्या पाहणी दरम्यान समोर आले वास्तव..

    167 सोनोग्राफी तर 135 गर्भपात केंद्रांची आकस्मिक तपासणी…

    वर्धा जिल्ह्यातील आर्वी प्रकरणा नंतर जिल्ह्यात नेमली चौकशी समिती

  • 22 Feb 2022 08:38 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिका उत्पन्नात 1 हजार कोटींची घट

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिका उत्पन्नात 1 हजार कोटींची घट,दोन वर्षातील स्थिती

    -कोरोना,लॉकडाऊन व ठेवींवरील व्याजदर कमी झाल्यामुळे गेल्या दोन वर्षात महापालिकेचे उत्पन्न एक हजार कोटींने घटले

    -महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

  • 22 Feb 2022 08:37 AM (IST)

    मालेगांव दंगल प्रकरण..

    -१२ नोव्हेंबर मालेगांव दंगली प्रकरणी ९ संशयितांना जामीन देण्यावर मालेगांव न्यायालयात आज युक्तिवाद..

    -आज सरकारी पक्ष बाजू मांडणार..

    -दंगलीत सहभाग न आढळलेल्या दोघांचे ३६९ कलम कमी करण्यात आले आहे.

    -संशयित बाहेर पडल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करणार नाहीत, पुरावे नष्ट करणार नसल्याची हमी देत जामीन मंजूर करण्याची विनंती न्यायालयाला संशयितांच्या वकिलांनी केली आहे.

    -दंगलीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या कोणत्याही संशयितास अद्याप जामीन मिळालेला नाही.

  • 22 Feb 2022 08:36 AM (IST)

    गडचिरोली सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला सिरोंचा येथील उर्स उत्साहात साजरा

    गडचिरोली सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेला सिरोंचा येथील उर्स उत्साहात साजरा

    हजरत वली हैदर शाह बाबा रहमतुल्ला यांच्या उर्स मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र सह तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते,

    ही दर्गा जवळपास चारशे वर्षे जुनी असून प्राचीन काळापासून या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो

    हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व धर्माचे भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येत असतात

    तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेत मोफत अन्नदान, प्रसाद वाटप व कव्वालीचे मनोरंजन कार्यक्रमही आयोजित करण्यात आले

    अहेरीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी संदल काढून उर्स यात्रेचे शुभारंभ केलं

    मोठमोठे अधिकारी यांनी या यात्रेला भेट दिली व दर्शन घेतले

  • 22 Feb 2022 08:36 AM (IST)

    गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास मुदतवाढ

    -गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास मुदतवाढ; दोन महिन्यात केवळ 510 अर्ज,20 एप्रिल 2022 पर्यंत मुदतवाढ

    -पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे

    – 20 एप्रिल 2022 पर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली

    -दरम्यान, 20 डिसेंबर 2021 पासून आजपर्यंत दोन महिन्यात नियमितीकरणासाठी केवळ 510 अर्ज आले आहेत

    -. महापालिकेने 20 डिसेंबर 2012 ते 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत नागरिकांकडून अर्ज मागविले होते. या कालावधीत 510 अर्ज आले आहेत. गुंठेवारीची योजना यशस्वीरित्या राबविण्याकरिता अर्ज स्वीकारण्यास 20 एप्रिल 2022 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे

  • 22 Feb 2022 08:33 AM (IST)

    रत्नागिरी एसटी विभागात २२ कंत्राटी चालकांची निवड

    २२ पैकी १५ कंत्राटी चालक कामावर झाले हजर

    रत्नागिरी विभागात ५० कंत्राटी चालकांचे उद्दीष्ट

    गुहागर आणि रत्नागिरी आगारात कंत्राटी चालक भरतीला प्राधान्य्

    गेले तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे सुरु आहे काम बंद आंदोलन

  • 22 Feb 2022 08:11 AM (IST)

    नीलगाईची शिकार केल्याने एकाला अटक

    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा शिवारात करंट लावून नीलगाईची शिकार केल्याचं प्रकरण उघड

    आरोपीला करण्यात आली अटक

    अशोक कुकडकर अस आरोपीच नाव असून त्याचे इतर तीन साथीदार यांनाही अटक करण्यात आली

    मृत निलगाईचे पोस्टमार्टम करून नमुने फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करीता पाठविण्यात आले

  • 22 Feb 2022 08:08 AM (IST)

    विवाह बाह्य संबंधात अडथळा ठरतो म्हणून आईने केला मुलाचा खून

    औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या खंडाळा गावातली घटना

    सार्थक रमेश बागुल असं खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव

    संगीता बागुल असं आरोपी आईचं तर साहेबराव पवार असं प्रियकर आरोपीचं नाव आहे

    मुलाचा खून मृतदेह तलवाडा शिवारात फेकला होता

    आईने स्वतःच पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

    या घटनेमुळे वैजापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 22 Feb 2022 08:06 AM (IST)

    कोरोना संकट कमी होत असतानाच मुलांसाठी ही एक दिलासादायक बातमी

    देशात 12 ते 18 वयोगटा साठी कोर्बोवॅक्स या लसीला DCGI ने मंजुरी दिली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून भारतात बनवल्या गेलेल्या या लसीला मंजुरी देण्यात आल्याने आता 12 ते 18 वयोगटातील भारतीयांना लवकरच ही लस दिली जाणार आहे कोरोना संकट कमी होत असतानाच मुलांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे

  • 22 Feb 2022 08:05 AM (IST)

    नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जायका मोटर्सला भीषण आग… आगीत स्पेअर पार्टस

    चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जायका मोटर्स ला भीषण आग… आगीत स्पेअर पार्टस,

    कॉम्प्युटर आणि महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाल्याची माहिती,

    शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती,

    जायका मोटर्स मध्ये होते टाटा कंपनीच्या नवीन वाहनांची विक्री आणि जुन्या वाहनांची दुरुस्ती,

    आगीत लाखो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता

  • 22 Feb 2022 08:05 AM (IST)

    राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे 19 लाख 11 हजार दस्तांची नोंदणी

    राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे 19 लाख 11 हजार दस्तांची नोंदणी

    या दस्त नोंदणीतून राज्य शासनाच्या तिजोरीत 24 हजार 606 कोटींचा महसूल जमा

    2021-22 हे आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा कालावधी आहे.

    त्यामुळे महसुलात आणखी वाढ होण्याची शक्‍यता

    राज्याला महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो.

    या आर्थिक वर्षात शासनाने नोंदणी व मुद्रांक विभागाला 32 हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.

    जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्‍ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार, शेअरबाजार अशा विविध दस्तांच्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क जमा होते.

    मुद्रांक शुल्कातून नोंदणी विभागाला हा महसूल मिळाला

  • 22 Feb 2022 08:04 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेचा 230 कोटीचा अर्थसंकल्प सादर

    यंदाच्या अर्थसंकल्पात 85 कोटीची झाली घट

    आरोग्य विभागाच्या निधीत 3 कोटी रुपयांची कपात करण्यात आलीये,

    समाविष्ट गावं आणि मुद्रांक शुल्कातील कपातीमुळे महसूलात घट

    2022-23 साठी 230 कोटी 50 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला

  • 22 Feb 2022 08:04 AM (IST)

    मानव विकास मिशनच्या बस नसल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

    मानव विकास मिशनच्या बस नसल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास,

    शाळेपर्यंत पोहचण्यासाठी रोजच कारावी लागते। तारेवरची कसरत,

    बुलडाणा जिल्ह्यातील चित्र,

    एसटी बस बंद असल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोय त्रास

  • 22 Feb 2022 07:33 AM (IST)

    वाघोदा येथे दोन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला शिक्षा…

    दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…

    शिवदास उर्फ काल्या भाईदास ठाकरे या नराधमाला शिक्षा…

    अवघ्या दिड वर्षात तपासासह सुनावणी पुर्ण करून ठोठावण्यात आली शिक्षा…

    जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय…

  • 22 Feb 2022 07:22 AM (IST)

    नागपूर जिल्हा परिषदेची ३८.७० कोटींचा अर्थसंकल्प सादर

    – नागपूर जिल्हा परिषदेची ३८.७० कोटींचा अर्थसंकल्प सादर

    – अर्थसंकल्पात बांधकाम, आरोग्य आणि शिक्षणावर भर

    – गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटींची वाढ

    – कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यावर चार कोटी २३ लाख रुपयांची तरतूद

    – सार्वजनिक बांधकाम विभागासाठी सहा कोटींची तरतूद

  • 22 Feb 2022 07:22 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेच्या ८४ कर्मचाऱ्यांवर कारवाई

    – नागपूर महानगरपालिकेच्या ८४ कर्मचाऱ्यांवर कारवाई

    – स्वच्छतेत हयगय केली म्हणून मनपा प्रशासनाची कारवाई

    – एक जमादार निलंबीत, ८४ कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन तापणार

    – मनपाच्या दोन स्वच्छता निरिक्षकांना एक हजारांचा दंड

  • 22 Feb 2022 06:55 AM (IST)

    नागपूरमध्ये मामीकडून सोळा वर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण

    – मामीकडून सोळा वर्षीय भाच्याचे लैंगिक शोषण

    – नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील धक्कादायक घटना

    – २१ वर्षीय मामीविरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    – मामीने भाच्याच्या लैंगिक छळाचे व्हीडीओ चित्रीकरण केल्याचा प्रकार उघड

    – व्हीडीओ चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत करत होती लैंगिक शोषण

  • 22 Feb 2022 06:54 AM (IST)

    पुण्यातील 34 समाविष्ट गावात पालिकेच्या अजूनही सोयी सुविधा नाहीत

    सुविधा नसताना मिळकत कर मात्र पालिकेच्या नियमानुसार वसूल करायला सुरुवात,

    जोपर्यंत सुविधा देत नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायत दराने मिळकत कर घ्या,

    पालिकेच्या विरोधात पं. स समिती सदस्य. सचिन घुलेंची हायकोर्टात जनहित याचिका,

    पालिकेनं सुविधा देण्याची केली मागणी..

  • 22 Feb 2022 06:52 AM (IST)

    पुण्यात पाण्याच्या दरात वाढ करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव

    पाण्याच्या दरात वाढ करण्याचा जलसंपदा विभागाचा प्रस्ताव,

    2019 पर्यंत दरवाढ निश्चित करण्यात आली होती, मात्र आता 2023 पर्यंतची दरवाढ निश्चित करण्यात आलीये,

    घरगुती, औद्योगिक, आणि कृषीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरात ही वाढ असणार आहे,

    या आधी एक हजार लिटरसाठी 30 पैसे द्यावे लागायचे आता 1.50 पैसे द्यावे लागतील,

    याचा परिणाम अप्रत्यक्ष नागरिकांवर.होणार आहे त्यामुळे जर दरवाढ केली तर निवडणूकीत पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हं आहेत ..

  • 22 Feb 2022 06:51 AM (IST)

    स्टेस्टस ठेवून आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

    माय लास्ट लोकेशन इज माडगी ब्रीज ‘ स्टेस्टस ठेवून आयटीआयच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

    निकाल नापास आल्याचे नैराश्य. पोलिसांच्या शोध मोहीम सुरु.

    पुलावर आढळले सायकल अन् जॅकेट. अनुराग यांनी आत्महत्या केला की आत्महत्येचा बनाव केला हा संशोधनाचा विषय आहे.

    मृतकाचा 48 तास लोटुनही मृतदेह गवसला नाही.

  • 22 Feb 2022 06:50 AM (IST)

    वर्धा जिल्ह्यात झालेल्या गर्भपाताच्या घटनेनंतर पुणे महापालिकेनं सोनोग्राफी सेंटरची केली धडक तपासणी

    वर्धा जिल्ह्यात झालेल्या गर्भपाताच्या घटनेनंतर पुणे महापालिकेनं सोनोग्राफी सेंटरची केली धडक तपासणी

    तपासणीत 36 केंद्रावर आढळली अनियमितता , आरोग्य विभागान बजावली नोटीस,

    महापालिकेला लेखी उत्तर देण्याचे आदेश त्यानंतर कारवाई केली जाणार.

    शहरात 600 सोनोग्राफी सेंटर आहेत त्यापैकी 570 केंद्राची तपासणी पुर्ण झालीये

    मासिक अहवाल सादर न करणं, माहिती अपुर्ण असणं यासाठी ही कारवाई करण्यात आलीये…

  • 22 Feb 2022 06:49 AM (IST)

    महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये

    महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये केला बदल,

    भाजपच्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आदला बदल,

    8 सदस्यांची मुदत या 28 फेब्रुवारीला संपतीये, त्यासाठी राष्ट्रवादीनं हा बदल केलाय,

    भाजप, काँग्रेस, शिवसेनेनं आपल्यात कोणताही बदल केला नाही

    राष्ट्रवादीनं विशाल.तांबे आणि अश्विनी कदम यांना संधी दिलीये…

  • 22 Feb 2022 06:48 AM (IST)

    पुण्यात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कधी सुरू करणार पर्यटकांचा सवाल

    राजीव गांधीं प्राणिसंग्रहालय खूलंं होण्यासाठी पर्यटकांची प्रतिक्षा

    राजीव गांधी प्राणिसंग्रहालय कधी सुरू करणार पर्यटकांचा सवाल,

    सगळे व्यवहार सुरळीत होतायेत मग प्राणिसंग्रहालय बंद का ? लवकर सुरू करा पर्यटकांची मागणी,

    मात्र राज्य शासनाने अजूनही प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याने प्राणिसंग्रहालय बंद प्रशासनाची माहिती …

Published On - Feb 22,2022 6:44 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.