Maharashtra News Live Update : केंद्राचा मराठीच्या बाबतीत दुजाभाव का? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल

| Updated on: Feb 27, 2022 | 11:42 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : केंद्राचा मराठीच्या बाबतीत दुजाभाव का? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज रविवार 27 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो. दोन दिवस उलटल्यानंतरही यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati sambhaji raje) यांच्या उपोषणाचा पहिला दिवस पुर्ण झाला, आझाद मैदानात आज नेमक्या कोणत्या गोष्टी होणार. युक्रेनमधून अनेक विद्यार्थी भारतात परतले आहेत इत्यादी सर्व घटकांच्या बातम्या आज आपण दिवसभरात पाहणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Feb 2022 10:09 PM (IST)

    शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी अजूनही धाड सुरूच

    शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी अजूनही इनकम टॅक्सची धाड सुरूच

    गेल्या तीन दिवसांपासून राहत्या घरी सुरू आहे चौकशी

    जनसंपर्क कार्यालयाजवळ महाराष्ट्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात,

    उद्या यशवंत जाधवांच्या घरची कारवाई थांबणार की चौथ्या दिवशीही चौकशी सुरूच राहणार ?

  • 27 Feb 2022 08:42 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    बाहेरील लोक उद्योगासाठी, नोकरीसाठी महाराष्ट्रात आल्यानंतर इंग्रजीत बोलावं लागणार

    मुख्यमंत्र्यांनी सांगितली परदेशातली आठवण

    कोणत्या भाषेला विरोध करू नका, मात्र मराठी जपा

    अनेक जिल्ह्यातल्या, भागातल्या या भाषांचा सन्मान करा

    हे सर्व मराठी भाषेचे वैभव आहे

  • 27 Feb 2022 08:40 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    जागतिक मराठी परिषदेला अनेक लोक जमतात

    मात्र काहीजण तिथेही इंग्रजीत बोलतात

    मला त्याचे वाईट नाही वाटलं, मात्र घरात मराठी बोललं पाहिजे

    आमच्यावर इंग्रजी शाळेत शिकल्याची टीका झाली

    इंग्रजी शिकलं पाहिजे उत्तम इंग्रजी आलं पाहिजे

    मात्र घरी आल्यावर मराठी बोललं पाहिजे

    माझी दोन्ही मुलं मराठी उत्तम बोलतात

  • 27 Feb 2022 08:38 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    उद्योगधंद्यात मराठी माणसांनी घुसले पाहिजे

    त्यामुळेच मराठी पाठ्यासाठी आमचा आग्रह

    पुढच्या वर्षीचा मराठी भाषा दिन बंद हॉलमध्ये होऊ नये

    जाहीरपणे तो भव्यपणे झाला पाहिजे

    जगभर मराठी माणसं पसरली आहेत

  • 27 Feb 2022 08:35 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हवा

    तो आमचा अधिकार आहे

    मुंबई आम्हाला रक्त साडून मिळवावी लागली

    मराठीच्या बाबतीत केंद्रचा दुजाभाव का?

    मुख्यमंत्र्यांचा केंद्राला सवाल

  • 27 Feb 2022 08:33 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करण्यासाठी शिवसेनेची स्थापना

    शिवराय संचलन पहायला लोकांची गर्दी होते

    लोकाधिकार समिती आणि शिवसेनेने ते दरवाजे उघडले

    हे मोठं काम शिवसेनेने केलं

    त्यावेळी आमच्यावर संकुचित असल्याची टीका झाली

  • 27 Feb 2022 07:41 PM (IST)

    रशिया-युक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम

    आज पंतप्रधान मोदी घेणार महत्वाची बैठक

    नवी दिल्लीत आज रात्री महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन

    उत्तर प्रदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर मोदी महत्वाची बैठक घेणार

    दोन्ही देशातल्या युद्धबाबत होणार महत्त्वाची चर्चा

    गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांसह वरिष्ठ मंत्री बैठकीला उपस्थित असणार

  • 27 Feb 2022 06:04 PM (IST)

    मराठा आरक्षण आंदोलन पेटले

    उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत , शहरात उद्या दिवसभर लक्षणिक उपोषण आंदोलन

    राज्यातील मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी, हिम्मत असेल तर जिल्ह्यात या – आमदार राणाजगजीतसिंह पाटील उपोषण आव्हान

    जिल्ह्यात आलात तर प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल

    सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावावी

    छत्रपती संभाजी राजे यांना उस्मानाबाद जिल्ह्यात वाढता पाठिंबा

  • 27 Feb 2022 04:43 PM (IST)

    40 लाखांची विदेशी दारु जप्त

    सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 40 लाखांची विदेशी दारु जप्त केली

    – मद्य वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याचा बनाव रचून ठोक विक्रेता आणि वाहन चालकाने संगनमत करत विक्री केली होती 40 लाखाची दारु

    – करमाळा तालुक्यातील जातेगाव जवळ अपघात झाल्याचा बनाव रचून नगर जिल्ह्यातील दारु विक्रेत्याला दारु विक्री केली होती

    – कंटेनरमधील 1000 दारु बॉक्सपैकी 595 विदेशी मद्याच्या पेट्या विक्री करुन रस्त्यावरून कंटेनर पलटी झाल्याचा रचला होता बनाव

    – या प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल

    – यामध्ये आरोपी जहीर अत्तार आणि विष्णू डमाळे यांना अटक करण्यात आलीय तर कंटेनर मालक गुलाम अन्सारी आणि खरेदीदार दामू जाधव हे दोघे फरार आहेत.

    – सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिली माहिती

  • 27 Feb 2022 03:45 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

    – राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी जिल्हाध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल,

    – विद्यार्थ्यांकडून 5 लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल,

    – करण मधुकर कोकणे असे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षाचे नाव,

    – डिजीटल मार्केटींगचे कार्यालय सुरु करण्यासाठी कोकणे आणि त्याचा साथीदार अमर पोळ या दोघांनी मागतली खंडणी,

    – अमर पोळ हा वैद्यकीय परीक्षेत नापास झाला असून कोकणे हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा जिल्हाअध्यक्ष आहे,

    -राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर खंडणी दाखल झाल्याने खळबळ

  • 27 Feb 2022 01:49 PM (IST)

    गोव्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येईल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

    – गोव्यात पुन्हा भाजपाचेच सरकार येईल

    – मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास

    – प्रमोद सावंत यांनी अष्टविनायकाचे अग्रस्थान असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरात दर्शन घेतले,

    – गोवा राज्यात भाजपच्यावतीने केलेल्या विकासात्मक कामामुळे पुन्हा राज्यात भाजपची सत्ता येईल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गोव्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी मोरगावच्या मंदिरात अभीषेक पुजा व आरती करुन मंदिर परीसरातील विविध मुर्तींचे दर्शन घेतले.

  • 27 Feb 2022 01:09 PM (IST)

    ठाकरे सरकारने खोट बोलून छत्रपती संभाजी महाराज यांची फसवणूक केली – आमदार राणा जगजीतसिंह पाटील

    राजे उपोषण करित आहेत आणी सरकार त्याची दखल घेत नाही हे दुर्दैवी

    मराठा समाजाचा अंत पाहू नका , आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा सरकारला इशारा

    छत्रपती यांची फसवणूक म्हणजे सामान्य जनतेचा अपमान

    अजून वेळ गेली नाही त्यामुळे ठाकरे सरकारने सावरावे, समाजाचा उद्रेक झाल्यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार

    एका राज्यात 2 मागासवर्ग आयोग हे कुठल्या नियमात बसते , मराठा समाजासह इतर समाजावर अन्याय व फसवणूक

    तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राणा पाटील यांचे लक्षणिक उपोषण सुरु

    मुस्लिम समाजासह अन्य लोकांनी सहभागी होत दिला पाठिंबा

  • 27 Feb 2022 01:06 PM (IST)

    इतर पक्ष नाटकं करतात आपण परखडपणे बोलतो – आदित्य ठाकरे

    मराठीचं काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया…

    मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे झुकली नाही…आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही

    सुभाष देसाईंनी आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केलीय… ती समजायला जरा अवघड…जीआर वाचायला घेतला तर समजत नाही…देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी…

    मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत…

    मराठी बदलते आहे…मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत…

    गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करत आहोत…

    जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न…

  • 27 Feb 2022 01:04 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 10 वीच्या मुलीचा विनयभंग, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    वस्तीगृहाचे संचालक असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या विरोधात त्यांच्याचं वस्तीगृहातील 10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने संचालकांविरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा आंधळगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

  • 27 Feb 2022 01:00 PM (IST)

    मुंबईचं महत्व कमी करण्याकरता केंद्रानं कुटील कारस्थान रचले – गजानन किर्तीकर

    एअर इंडीया मुख्यालय आणि इतर अनेक कार्यालयं मुंबईतून स्थलांतर केले

    मुंबईचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातो

    पहिली बुलेट ट्रेन मुंबई – पुणे होणार होती मात्र ती मुंबई-अहमदाबाद करण्यात आली

    अहमदाबादेला स्मार्ट सिटी करण्याचा हा खटाटोप

  • 27 Feb 2022 12:56 PM (IST)

    एसटी आगारातील कर्मचा-याची गळफास घेऊन आत्महत्या

    -पिंपरी चिंचवड मधील वल्लभनगर एसटी आगारातील बसवाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर

    -संजय सरवदे वय 43 असं कर्मचाऱ्यांच नाव असून ते सांगवी भागात वास्तव्यास होते

    -राज्यात एसटी कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनात ते सहभागी होते त्यामुळे कामावर रुजू नव्हते

    -काल रात्रीच्या सुमारास जेवण करून संजय सरवदे हे बाथरूम मध्ये गेले बराच वेळ ते बाहेर न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी आत तपासणी केली असता त्यांनी गळफास घेतला असल्याचे आढळून आले

  • 27 Feb 2022 12:44 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांचा ज्वलंत विषय आहे – नितीन राऊत

    एसटी कर्मचाऱ्यांचा ज्वलंत विषय आहे, त्यांच्या पोटाशी आणि जीवाशी संबंधित विषय आहे या विषयावर राज्य शासन प्रयत्न करत आहे. आम्ही प्रयत्नशील आहोत त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी असं नितीन राऊत म्हणाले आहेत.

  • 27 Feb 2022 12:25 PM (IST)

    मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक

    अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उद्या पंढरपूर बंदची हाक दिली आहे . खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबईत आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या पंढरपूर बंद ठेवण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यानी आज झालेल्या कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीत घोषणा केली

  • 27 Feb 2022 12:22 PM (IST)

    माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्याच उघड – दिलीप वळसे पाटील

    पुण्याचा माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मागच्या सरकारच्या काळात बेकायदा फोन टॅपिंग केल्याच उघड

    यामध्ये जे जे सहभागी आहेत त्यांना चौकशीसाठी बोलावणार

    फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती

    या समितीत त्या दोषी आढल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

  • 27 Feb 2022 12:17 PM (IST)

    उस्मानाबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आंदोलन सुरु

    मराठा आरक्षण आंदोलन पेटले

    छत्रपती संभाजी महाराज याच्या मराठा आरक्षण आमरण उपोषण आंदोलनाला वाढता पाठिंबा

    भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तुळजाभवानी देवीची आरती करून केली उपोषण आंदोलनाला सुरुवात

    तुळजापूर येथे लक्षणिक उपोषण आंदोलन सुरु

    मराठा समाजाचा अंत पाहू नका , सगळं चूकच सुरी आहे

    उद्रेक होण्या अगोदर सावरून मराठा समाजाला आरक्षण द्या

    आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा सरकारला इशारा

    छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आंदोलन सुरु

  • 27 Feb 2022 12:09 PM (IST)

    दिशा सालियनच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली

    राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. यानंतर दिशा सालियनच्या आईच्या सांगण्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 27 Feb 2022 11:56 AM (IST)

    जळगावमध्ये केळीच्या बागा कापल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस

    जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केळीच्या पट्ट्यात समाजकंटकांनी अक्षरश: हैदोस घातला असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाजकंटक केळीच्या बागा कापून टाकत आहेत. रविवारी सकाळी देखील अशाच दोन घटना उघडकीस आल्या.

    यानंतर कऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासनाने अशी कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सावदा शहरातील मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रॅक्टर आडवे लावून वाहतूक रोखून धरली होती.

  • 27 Feb 2022 11:55 AM (IST)

    पुण्यात गादीच्या कारखान्याला आग

    धायरी, डीएसके रस्ता, चव्हाण बाग येथे एका गादीच्या कारखान्यामधे आग

    पुणे मनपा व पी एम आरडीए अग्निशमन दलाच्या फायरगाडी व वॉटर टँकर दाखल.

    आग विझवण्याचे काम सुरू

  • 27 Feb 2022 11:53 AM (IST)

    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेवून बदनामी – संजय राऊत

    केंद्रीय तपास यंत्रणांना असं वाटत आहे की इन्कम फक्त महाराष्ट्रात आहे सर्वात जास्त टॅक्स मुंबई आणि महाराष्ट्र देतो केंद्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे त्रास देतो याची नोंद जनता घेत आहे.

    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही अशी बदनामी करण्याची मोहीम सगळीकडे सुरू आहे पण आम्ही वाकणार नाही

    मराठी माणसाचे एका बाजूला बदनामी करायची आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू द्यायचा नाही मराठीची आर्थिक कोंडी करायची मराठी माणसाच्या हातात पैसे राहू द्यायचे नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मराठी कट्टा यांसारखे कार्यक्रम घेऊन ढोंग करायची आणि विरोधक करायचा हे लोक भारतीय जनता पार्टीची आहेत

  • 27 Feb 2022 11:29 AM (IST)

    शिवसेनेकडून मराठी भाषा दिवस साजरा

    शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, पर्यावरण, पर्यटन राजशिष्टाचार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते सुभाष देसाई, उद्योग मंत्री यांच्या शुभहस्ते होणार आहे.

    सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार मा.श्री.गजानन कीर्तिकर, महासंघाचे कार्याध्यक्ष, शिवसेना नेते, माजी खासदार मा.श्री.आनंदराव अडसूळ आणि शिवसेना सचिव, महासंघ सरचिटणीस, खासदार मा.श्री.अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

  • 27 Feb 2022 11:26 AM (IST)

    दक्षिण मुंबईतील बत्तीगुल, रेल्वेचा खोळंबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही अंधारात

    मुंबई: टाटा ग्रीड फेल्यूअर झाल्याने दक्षिण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला. कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. बत्तीगुल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. तसेच वीज नसल्याने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचाही खोळंबा झाला. मात्र, आज रविवारचा दिवस असल्याने चाकरमान्यांची गैरसोय झाली नाही. तब्बल तासाभराच्या खोळंब्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाश्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

  • 27 Feb 2022 10:56 AM (IST)

    राहूल शेवाळेंची महिला आयोग सक्षम प्राधिकरणकडे तक्रार

    दिशा शालीयान यांच्या फॅमिलीला त्रास होत होता, म्हणून त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला आयोग सक्षम प्राधिकरणकडे शिवसेनेचे खासदार राहूल शेवाळे यांनी तक्रार केली आहे.

  • 27 Feb 2022 10:53 AM (IST)

    महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोहोचवणार

    दिल्लीत पोहचलेल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थासाठी त्यांच्या शहरात पोहचविण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. यासर्व विद्यार्थ्यांची विमानाच्या प्रवास तिकिटांची जबाबदारी घेतली आहे. सोबतच पाच वाहने आणि महाराष्ट्र सदनात थांबण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्राचे जवळपास 1270 विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती पुढे आली आहे. दिल्लीत आलेल्या दुसऱ्या विमानाने 19 विद्यार्थी पोहचत आहेत.

  • 27 Feb 2022 10:51 AM (IST)

    जिंतूर येथे भाजप -राष्ट्रवादी मध्ये राडा

    जिंतूर येथे भाजप -राष्ट्रवादी मध्ये राडा ,

    आमदार बोर्डीकर आणि माजी आमदार भांबळे यांचे कार्यकर्ते भिडले ,

    औदयोगिक वसाहत संचालक मंडळ निवडीच्या मतदानात झाला प्रकार ,

    दगळफेकीत कार्यकर्तेसह काही पोलीस कर्मचारी ही जखमी ,

    नगरसेवक आदित्य भाजप आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचे गट आमने-सामने ,

  • 27 Feb 2022 10:51 AM (IST)

    पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थी लॅपटॉप आणि महिलांना शिलाई मशीन वाटप

    वडाळा येथे निको हॉल मध्ये विद्यार्थी आणि महिलांना शिलाई मशीन लॅपटॉप मोबाईल फोन वाटप करण्यात आला शिवसेना चे नगरसेवक अमय घोले यांनी गरजू विद्यार्थी आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता हा कार्यक्रमात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला लॅपटॉप शिलाई मशीन मोबाईल वाटप करण्यात आला

  • 27 Feb 2022 10:50 AM (IST)

    रोमानियामार्गे भारतीय विद्यार्थी भारतात

    रोमानियामार्गे भारतीय विद्यार्थ्यांना लष्करी संरक्षणात आणण्यातं आलं,

    युक्रेनच्या रस्त्यावर सगळीकडे चक्काजाम,

    नागरिक रोमानियामार्गे देश सोडण्याच्या तयारीत,

    काल मुंबईत विद्यार्थी झाले दाखल

  • 27 Feb 2022 10:38 AM (IST)

    बोटणीकल गार्डन साठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे – नितीन गडकरी

    बोटणीकल गार्डन साठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे.. नागरिकांनी सुद्धा आपल्या घरी असलेल्या फुलांच्या जाती आम्हाला द्याव्या त्या आम्ही तिथे लावू

    नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने कोणाच्या मनात काही कल्पना असेल त्यांनी त्या पुढे आणाव्या इनोव्हाटिव्ह गोष्टींना प्रोत्साहन द्यावे

    या चर्चा सत्रात पत्रकारांना बोलावं मात्र कव्हर करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी नको

    आम्ही एक इलेक्ट्रिक बस आणली ती वृद्ध लोकांना शेगाव ला जाण्यासाठी ठेवली त्याचा मोठा फायदा होत आहे

    काही गोष्टी करत असताना अनेक अडचणी येतात खास करून हेरिटेज मध्ये असलेल्या वास्तू त्या साठी परवानगी मिळत नाही

    हेरिटेज वस्तूला विकसित करत असताना त्या विकसित तर होईल मात्र त्यात बदल होऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे

  • 27 Feb 2022 10:36 AM (IST)

    मुलुंड-ट्रॉम्बे मधील वीज खंडीत

    मुलुंड-ट्रॉम्बे वरील MSEB 220kv ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाल्यामुळे मुंबईच्या बहुतांश भागांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, अशी माहिती बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे….

  • 27 Feb 2022 10:10 AM (IST)

    मुक्ताईला दोन किंटल द्राक्षाची आरस

    मुक्ताईनगर – मुक्ताई यात्रा उत्सव निमित्त आज मुक्ताई मंदिर संस्थानच्या वतीने आदिशक्ती मुक्ताई ला दोन किंटल द्राक्षाची आरस करण्यात आली त्यामुळे आदिशक्ती मुक्ताई मूर्ती विलोभनीय दिसून येत होती

  • 27 Feb 2022 10:10 AM (IST)

    तेच ते काम करून सगळे कंटाळले आम्ही सुद्धा कंटाळलो त्यामुळे कट्टा हा प्रयोग चांगला आहे – नितीन गडकरी

    तेच ते काम करून सगळे कंटाळले आम्ही सुद्धा कंटाळलो त्यामुळे कट्टा हा प्रयोग चांगला आहे

    वेगळ्या गोष्टी आऊट ऑफ बॉक्स व्हायला पाहिजे त्या या ठिकाणी होणार आहे

    मी सध्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती देशाच्या कानाकोपऱ्यात शोधत आहो .. नागपूर च्या बोटणीकल गार्डन ला फ्लावर गार्डन बनवायचं आहे त्या साठी 25 कोटी रुपये सुद्धा देण्याचं ठरविलं आहे

    काही फुल नागपूर च्या वातावरणात होत नाही त्यासाठी नेट लावून ते जगवयाच ठरविलं

    त्याच काम सुरू झालं

    फुटाळा तलावाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही फूड पार्क , रिव्हलविंग रेस्टोरेनत , 3 मजली पार्किंग त्या ठिकाणी तयार करणार

    माझ्या घरी सिमला मिरची , संभार सारख्या भाज्या लावतो त्या आम्ही खातो

  • 27 Feb 2022 09:54 AM (IST)

    यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूचं

    सलग तिसऱ्या दिवसही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे…

    शुक्रवारी सकाळी पासून सुरु असलेल्या छापेमारी अजूनही सूर आहे मध्यरात्री नंतर काही अधिकारी अधिकारी त्यांच्या घरातून बाहेर गेले तसेच काही अधिकारी अजूनही यशवंत जाधव यांच्या घरात ठाण मारून बसले आहेत..

    यशवंत जाधव यांच्या इमारती खाली पोलिसांच्या ही बंदोबस्त दिसून येतेय.

  • 27 Feb 2022 09:36 AM (IST)

    रशिया युक्रेन युद्धाचा फटका भारतीयांना

    रशिया युक्रेन युद्धाचा फटका भारतीयांना

    युक्रेनमधून विमान नवी दिल्लीत दाखल

    ऑपरेशन रंगा अंतर्गत 250 भारतीय विद्यार्थी दाखल

    महाराष्ट्रातले 30 विद्यार्थी नवी दिल्लीत दाखल

    30 पैकी 3विद्यार्थी आपल्या घरी रवाना

    27 विद्यार्थी सध्या महाराष्ट्र सदनात

    काही वेळात दुसरे विमान नवी दिल्लीत दाखल होणार

  • 27 Feb 2022 09:16 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये 1 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त

    -गेल्या काही महिन्यापासून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सामाजिक सुरक्षा विभागाने आणखी एक कारवाई करत 1 लाख 16 हजार रुपयांचा गुटखा जप्त केलाय

    -आकुर्डी च्या दत्तवाडी मध्ये एक इसम गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती त्यानुसार कारवाई करत गुटखा जप्त केलाय

    -या प्रकरणी अतुल छाजेड, आलम उर्फ सलमान पठाण या दोघांवर गुन्हा दाखल केलाय

  • 27 Feb 2022 09:15 AM (IST)

    मालेगावमध्ये माजी महापौरांसह दोन नगरसेकांवर गुन्हा दाखल

    – माजी महापौरांसह दोघा नगरसेकांवर गुन्हा दाखल..

    -जमिनीच्या वादातून गोळीबार प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यावर काढली होती मिरवणूक..

    – जमावबंदी आणि मुरवणूक काढल्या प्रकरणी माजी महापौर अब्दुल मलिक, त्यांचे बंधू AIMIM चे मनपा गटनेते खालिद परवेज, नगरसेवक माजीद युनूस इसा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

  • 27 Feb 2022 09:13 AM (IST)

    शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव ₹१०० कोटींचा घोटाळा

    शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत जाधव ₹१०० कोटींचा घोटाळा

    आयकर विभागाने करोडो रुपयांची रोख रक्कम आणि 10 बँक लॉकर्स जप्त केले

    फिक्सर विमल अग्रवाल आणि BMC मुंबई महापालिकेचे ५ कंत्राटदार आणि यशवंत जाधव कुटुंबीयांच्या ३३ जागांवर छापे

    रविवारी देखील धाडी सुरू

  • 27 Feb 2022 08:49 AM (IST)

    नाशिकमध्ये बनावट नोकरभरतीचा पर्दाफास

    नाशिकमध्ये बनावट नोकरभरतीचा पर्दाफास

    दहावी पास युवकास एक्ससाइज च्या निरीक्षक पदाचे नियुक्तीपत्र

    एक्ससाइजच्या संचालकाची बनावट स्वाक्षरी शिक्का वापरुन नियुक्ती पत्र

    औरंगाबाद येथील ठक बाजाविरूद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल

  • 27 Feb 2022 08:48 AM (IST)

    नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल

    नारायण राणे आणि नितेश राणे विरोधात गुन्हा दाखल दिशा सालियानच्या पालकांनी केली होती तक्रार महिला आयोगाकडे तक्रार

  • 27 Feb 2022 08:46 AM (IST)

    गडचिरोली विद्युत प्रवाहच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार

    गडचिरोली विद्युत प्रवाह च्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार प्रकरण वाढलेली आहेत,

    मुलचेरा तालुक्यातील जंगलात विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने चितळाची शिकार करण्यात आली

    या विद्युत ताराला शाॅक लागून गायीच्या वासरू ही आपला प्राण सोडला,

    काल उशिरा रात्री वनविभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहेत

    या अगोदर याच भागात मुलचेरा आलापल्ली जंगल क्षेत्रात वाघिनीचे पण शिकार करण्यात आले होते

  • 27 Feb 2022 08:44 AM (IST)

    मालेगावच्या रामपुरा येथील शेतक-यांच्या झोपड्यांना आग

    मालेगावच्या रामपुरा येथील कोवळ्या डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या झोपडी आग लागल्याने पाच शेतक-यांचे शेतीपयोगी साहित्यासह जणांवरांचा चारा जळून खाक झाल्याची घटना घडली. आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

    झोपडीला आग लागून झोपडीतील शेततळ्याचा फ्लाॅस्टिक कागद, टोमॅटो बांधणी बांबू, पीव्हीसी पाईप, स्प्रिंग कलर पाईपचे सात बंडल, ठिबक सिंचन साहित्य तसेच शेतीपयोगी औजारे जळून खाक झाली. आगीने रौद्र रूप धारण केले होते.

  • 27 Feb 2022 08:37 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच सोडला साप

    शिरोळ तहसील नंतर आता थेट कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच सोडला साप

    पहाटे अज्ञात शेतकऱ्याने सोडला साप

    शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात राजू शेट्टी यांचा सुरू आहे बेमुदत धरणे आंदोलन

    आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सरकारी कार्यालयात सोडले जाताहेत साप

  • 27 Feb 2022 08:19 AM (IST)

    नीलम गोऱ्हे कोरोना पॉझिटिव्ह

    विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे कोविड पॉझिटिव्ह

    ट्विट करत पॉझिटिव्ह आल्याची दिली माहिती

    संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घेण्याच केलं आवाहन

  • 27 Feb 2022 07:40 AM (IST)

    खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधातील फेरनिवडणूक याचिका उच्च न्यायालयाने केली रद्द

    मतदानामध्ये तफावत असल्यानं झालेली निवड रद्द करून फेरनिवडणूक घेण्यासाठी दाखल केली होती याचिका

    वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवार उमेदवार अरुणा माळी यांनी दाखल केले होती याचिका

    झालेलं एकूण मतदान आणि मोजलेली मते यामध्ये 177 मतांचा आढळला होता फरक

    मात्र ही याचिका रद्द ठरवत याचिकाकर्त्या कडून न्यायालयीन खर्च वसूल करण्याचा न्यायालयाचा निर्णय

  • 27 Feb 2022 07:39 AM (IST)

    नागपूर – मालमत्ता कराच्या गहाळ रेकॉर्डबाबत पोलीस तक्रार करा

    मालमत्ता कराच्या गहाळ रेकॉर्डबाबत पोलीस तक्रार करा

    राज्य माहिती आयुक्तांचे मनपाला निर्देश

    उच्च स्तरीय चौकशीचे आदेश

    महापालिकेकडून अनेक व्यक्तीने भरलेल्या मालमत्ता कराचा रेकॉर्ड गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार आला आहे समोर

  • 27 Feb 2022 07:38 AM (IST)

    शेतीला दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी निलेश कोगनोळी यांनी लिहिलं रक्तान पत्र

    शेतीला दिवसा वीज देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांन उर्जामंत्र्यांना लिहिलं रक्तान पत्र

    कागल तालुक्यातील गोरंबे इथल्या निलेश कोगनोळी लिहलं पत्र

    राजू शेट्टी यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यान रक्तान पत्र लिहीत असल्याचा केलेला उल्लेख

  • 27 Feb 2022 07:37 AM (IST)

    नागपुरातील रेशन दुकान आज पासून बंद ठेवण्याचा दुकानदारांचा इशारा

    नागपुरातील रेशन दुकान आज पासून बंद ठेवण्याचा दुकानदारांचा इशारा

    3 ते 4 तास सर्व्हर डाऊन राहत असल्याने , पॉश मशीन च्या डोके दुखीने दुकानदार त्रस्त

    धान्य वितरण करण्यात येत आहे अडचणी

    वारंवार सर्व्हर डाऊन राहत असल्याने ग्राहकांना होत होतो त्रास

    या समस्या दूर होत नाही तो पर्यंत दुकान बंद ठेवण्याचा इशारा

  • 27 Feb 2022 07:27 AM (IST)

    आजरा शहरात अवैद्य चंदन तुकड्यांसह हजारोंचा मुद्देमाल जप्त

    आजरा शहरात अवैद्य चंदन तुकड्यांसह हजारोंचा मुद्देमाल जप्त

    कोल्हापूर वन विभागाची कारवाई

    अवैद्य चंदन साठ्या प्रकरणी दोघांना केली अटक

    राजेंद्र चंदनवाले आणि विनायक चंदनवाले अशी अटक केलेल्या दोघांची नाव

  • 27 Feb 2022 07:27 AM (IST)

    नालासोपारा रेल्वे स्थानकात महिलेची छेड काढणारा अट

    नालासोपारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील सरकता जिन्यावर महिला प्रवाशीची पाठीमागून छेड काढना-या आरोपीच्या अवघ्या 24 तासात मुसक्या आवळण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे.

  • 27 Feb 2022 07:25 AM (IST)

    पुण्यातील उंड्री पिसोळी येथील एका गादीच्या गोडाऊनला मध्यरात्री लागली आग

    उंड्री पिसोळी येथील एका गादीच्या गोडाऊनला मध्यरात्री लागली आग

    आग लागल्याच्या वेळी कामावर एकही कामगार नसल्याने जीवितहानी टळली

    अग्निशामक दलाच्या जवळपास 10 गाड्यांनी आग आणली नियंत्रणात

    आग कशामुळं लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही

  • 27 Feb 2022 07:24 AM (IST)

    पुणे महापालिकेची जबाबदारी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक गळ्यात

    पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली लढविल्या जाणार

    प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा

    प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची घोषणा केल्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आले

    भाजपची निवडणुकीची तयारी शेवटच्या टप्प्यात

    बूथ स्तरापर्यंतच्या रचना पूर्ण तर शहर, विधानसभा आणि प्रभागनिहाय निवडणूक व्यवस्थापन समितीची रचना लवकरच पूर्ण होणार असल्याची पाटील यांची माहिती

  • 27 Feb 2022 07:22 AM (IST)

    नागपूरमध्ये मनपा इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याच्या तयारीत का ?

    मनपा इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेण्याच्या तयारीत का ?

    पेट्रोल डिझल ची बसते आहे झळ, 1 एप्रिल पासून धोरण

    राज्य शासनाने प्रदूषण मुक्ती साठी इलेक्ट्रिक वाहन धोरण केलं .. त्यानुसार अंमलबजावणी करण्याची तयारी

    पदाधिकारी आणि अधिकारी यांना कार्यालयीन कामकाजासाठी यापुढे इलेक्ट्रिक वाहन घेतली जाणार

    याबाबत चा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या स्थायी समिती च्या बैठकीत ठेवण्यात येणार

  • 27 Feb 2022 06:28 AM (IST)

    सोलापूर जिल्हा दूधसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा विजय

    सोलापूर जिल्हा दूधसंघाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचा विजय

    दूध संघ बचाव पॅनलचा उडवला धुव्वा

    राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरा साठेंच्या सुनेला पराभवाचा धक्का

  • 27 Feb 2022 06:25 AM (IST)

    संभाजीराजे आजाद मैदानात मंचावर झोपले

    मुंबईतील आजाद मैदानात संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या विभिन्न मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

    रात्री संभाजीराजे आजाद मैदानात मंचावर झोपले आहेत, तसेच मंचासमोर मराठा समाजाचे नागरिक झोप काढत आहेत..

  • 27 Feb 2022 06:24 AM (IST)

    दोन दिवस उलटल्यानंतरही यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू

    गेल्या दोन दिवस उलटूनही शिवसेना नेते व मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे…

    शुक्रवारी सकाळी पासून सुरु असलेल्या छापेमारी अजूनही सूर आहे मध्यरात्री नंतर काही अधिकारी अधिकारी त्यांच्या घरातून बाहेर गेले तसेच काही अधिकारी अजूनही यशवंत जाधव यांच्या घरात ठाण मारून बसले आहेत..

Published On - Feb 27,2022 6:21 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.