Maharashtra News Live Update : ‘महाराष्ट्रात लोकशाहीचा मुडदा पाडू नका’, किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

मुंबई : आज शनिवार 5 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. तर, दुसरीकडे कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद अद्याप सुरुच आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (Elections) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हुडहुडी काही प्रमाणात कमी झाली आहे. या बातम्यांसह आपण सर्व महत्त्वाच्या घडामोडी येथे पाहणार आहोत.