Maharashtra News Live Update : राज्य सरकारच्या नियमावलीत कोणताही बदल नाही, अजित पवार काय म्हणाले? वेगवान अपडेट  

| Updated on: Jan 15, 2022 | 10:59 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : राज्य सरकारच्या नियमावलीत कोणताही बदल नाही, अजित पवार काय म्हणाले? वेगवान अपडेट   
सांकेतिक फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच राज्यात सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाच्या सरी बरसत आहेत. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jan 2022 10:19 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात आजही रुग्णसंख्या दहा हजारापार

    पुणे जिल्ह्यात आजही रुग्णसंख्या दहा हजारापार,

    दिवसभरात वाढले 10 हजार 281 रुग्ण,

    दिवसभरात झाला 5 जणांचा मृत्यू

  • 15 Jan 2022 10:01 PM (IST)

    नगर शहरात लिफ्ट कोसळल्याने एक जण जागीच ठार

    नगर शहरात लिफ्ट कोसळल्याने एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी….

    जखमी मध्ये दोन महिला आणि एका युवकांचा समावेश…

    मार्केट यार्ड परिसरात बाजार समितीच्या आवारातील घटना…

  • 15 Jan 2022 07:56 PM (IST)

    विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाला रामराम

    विराट कोहलीने (Virat kohli step down as captain) कसोटी संघाचे कर्णधार पदही सोडले असल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. त्याने काही वेळापूर्वीच कर्णधारपद सोडत असल्याचे ट्विट केले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहली विरुद्ध बीसीसीआय (Bcci)असे चित्र निर्माण झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. सर्वात आधी विराट कोहलीने टी-20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याला ते सोडू नको असे सांगितले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी बीसीसीआयने (Bcci) त्याच्याकडील एकदिवसीय क्रिकेटचेही कर्णधारपद काढून घेतले, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी यावरून मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाल्याचेही दिसून आले. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर गेल्या सात वर्षापासून विराट कोहली कर्णधार होता.

    विराट कोहलीचे ट्विट काय?

    संघाला एका योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मी सलग सात वर्ष अखंड मेहनत घेतली. त्यासाठी अविरतपणे झटलो. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे अंत असतो. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार या नात्याला पूर्णविराम लावायची वेळ आता आली आहे. या प्रवासात मी अनेक चढउतार पाहिले, अनुभवले. पण कधीच कुठे कशाची कमी भासणार नाही, यासाठी मनापासून पूर्ण प्रयत्न केले. कोणतीही गोष्ट 120 टक्के क्षमतेनं करायची, या विचाराचा मी आहे. त्याच विचारानं मी काम केलं. पण जर त्याच क्षमतेनं मी एखादी गोष्ट करु शकत नसेन, तर योग्य वेळी जबाबदारीतून स्वतःला मोकळं करणं भाग आहे. अर्थात असं करणं योग्य नाही, याचीही मला जाणीव आहे. पण या बाबतीत मी स्वतःची आणि माझ्या संघाची फसवणूक करु शकत नाही. मनापासून विचार केल्यानंतर मी या निर्णयावर पोहोचलो आहे.

    मी बीसीसीआयचे आभारा मनातो, की त्यांनी मना संधी दिली. देशाच्या संघाचं नेतृत्त्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. या संपूर्ण प्रवासात कधीच कोणत्याही परिस्थितीच हार न मानण्याची शिकवण देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचेही मी आभार मानतो. रवीभाई आणि मला नेहमी प्रोत्साहित करणाऱ्या पडद्यामागील महत्त्वाच्या सर्वजणांचं योगदानही मोठं आहे. तुम्ही जगण्याला दृष्टी देण्याचं मोलाचं काम केलं आहे. आणि सर्वात शेवटी मी एमएस धोनीचे शतशः आभार मानतो. त्याच्यामुळे मी कर्णधार बनू शकलो. धोनीला माझ्यात नेतृत्त्व दिसल्यामुळे, त्यानं भारतीय संघाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी माझं सुचवलं. त्याचे मनापासून आभार. असे ट्विट त्याने केले आहे.

  • 15 Jan 2022 06:06 PM (IST)

    अजित पवार लाईव्ह

    नवीन किट मेडीकलमध्ये आलंय बरेचसे नागरिक टेस्ट करतात, मात्र रेकॉर्डवर येताना अडचण येतेय,

    सेल्फ टेस्टींग करणाऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर मेडीकल वाल्यानं घ्या

    राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून मी पैसे द्यायचा निर्णय घेतलाय

  • 15 Jan 2022 06:02 PM (IST)

    अजित पवार लाईव्ह

    राज्य सरकारने जी नियमावली केली, त्यात बदल नाही,

    15 ते 18वयोगटातील मुलांना जे लसीकरण सुरू केलंय यात जिल्ह्यात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे,

    शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना लसीकरण केलं जातं,

    आतापर्यंत 48 टक्के लसीकरण झालंय जिल्ह्यात इतर जिल्हयासारखी परिस्थिती नाही

    भारत सरकारने जो निर्णय घेतलाय यामध्ये 60 वर्षांच वयोमान जे आहे त्यांनी लसीकरण घ्यावं,

    बुस्टर डोसमध्ये 9 महिन्याचं अंतर असलं पाहिजे

  • 15 Jan 2022 06:00 PM (IST)

    महाविकास आघाळीने भाजपचा माज उतरविण्यापूर्वी आपल्या मंत्र्यांचा माज उतरवावा:- चंद्रशेखर बावनकुळे

    महाविकास आघाळीतले मंत्री करोडो रुपयेंचा घोटाळे करून जेल मध्ये आहेत. सत्तेचा माज त्यांना आला आहे. ओबीसी मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आतापर्यंत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले नाही . त्यामुळे सत्तेचा माज त्यांना आला असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना लावला.

  • 15 Jan 2022 03:34 PM (IST)

    ठाण्यात सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने

    ठाण्यात सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने

    शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची

    कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद

    एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

    कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर

    नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

    उड्डाणपुलाच्या लोकर्पणावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित

  • 15 Jan 2022 03:00 PM (IST)

    निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा ते-वडेट्टीवार

    आमची युती फक्त महाराष्ट्रात, इतर राज्यात युती बाबत हायकमांड निर्णय घेईल, येणारी निवडणुक ठरवेल कोणाला किती जागा असा टोला विजय वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला.

    लोकसभेच्या निवडणुका येताच कांग्रेस हायकंमाड UPA मध्ये शिवसेनेला समाविष्ट करून घेण्याबाबत निंर्णय घेतील–विजय वड्डेट्टीवार

  • 15 Jan 2022 02:53 PM (IST)

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरीत महानगर पालिकेचा गलथान कारभार

    -पिण्याच्या पाण्याचा व्हॉल्व लिकेज झाल्याने 50-60 फूट उंच पाण्याचे फवारे

    -लाखो लिटर पाण्याची नासाडी,गेल्या 1 तासापासून ही पाणी गळती सुरू

    -वाहन धडकल्याने व्हॉल्व लिकेज झाला असल्याची पाणी पुरवठा अधिकारी तांबे यांची माहिती

    -एकीकडे शहरात नागरिकांना दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना अशा प्ररकारचा हलगर्जीपणा होत असल्याने नागरिकां मध्ये नाराजीचा सुरू

  • 15 Jan 2022 02:43 PM (IST)

    रत्नागिरी

    राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी

    रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आमदार राजन साळवी यांनी दिली तक्रार

    आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्प बाबत विरोधी भूमिका घेतल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली धमकी

    आमदार राजन साळवी हे लांजा -राजपुर मतदारसंघात सेनेचे आमदार म्हणून 2009 सालापासून कार्यरत आहेत.

    नानार रिफायनरी प्रकल्पला स्थानिक जनतेच्या सोबत राहून विरोध दर्शविल्याने त्यांना मोबाईल क्रमांक 92 65 44 05 76 या फोनवरून

    आमदार राजन साळवी यांच्या मोबाईल वर 99 70 16 90 25 यावर दिनांक 10/ 1/ 2022 रोजी पहिला संध्याकाळी साडे सात वाजता फोन आला.

    त्यात अज्ञात इसमाने मोबाईल वरून त्यांना सांगितले की रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख एवढे बोलून त्याने फोन बंद केला

    आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 14 मिनिटाच्या सुमारास परत फोन करून रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे अशी धमकी आल्याने

    आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे .

    दरम्यान राजन साळवी जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • 15 Jan 2022 02:43 PM (IST)

    संध्याताई सव्वालाखे, महाराष्ट्र महिला प्रदेश कांग्रेस अध्यक्ष 121

    – संक्रांतीनिमित्त उद्या महाराष्ट्र्र भर महिला कांग्रेस आंदोलन करणार ,

    – उज्वला गॅस येजनेत महिलांची फसवणुक झालीये, त्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्याचं काम करणार…

    – केंद्र सरकारला संक्रातीच्या निमित्ताने वाण देणार , ऊज्वला योजनेची सबसिडी रद्द केल्याने राज्यभर गॅस बाटले घेऊन आंदोलन करणार…

    आॅन चित्रा वाघ

    – मीडिया समोर येऊन प्रसिद्धीच्या झोकात राहणारे भरपूर जण आहेत , आम्ही महिलांचे प्रबोधन सुरू करत आहोत… इतर राज्यांपेक्षा आपल्या राज्यात महिला सुरक्षित आहेत… मविआवर प्रहार करण्याची सवय झालीये… शक्ती कायदा भाजपने कधीच केला नसता तो या सरकारने केला..

    – किरण माने –

    – प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य… किरण मानेवर अन्याय झालाय… एका नटाला अशा प्रकारची वागणुक देणं चुकीचं आहे…

  • 15 Jan 2022 02:29 PM (IST)

    वर्धा

    – आर्वी गर्भपात प्रकरणाला नवे वळण

    – डॉ.कदम यांच्या घरी मिळाले काळवीट चे कातडे

    – आज सकाळी पोलीसानी घेतली डॉ.कदम यांच्या घराची झडती

    – डॉ.कदम यांच्या घरून 10 फाईल, आणि काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती

    – डॉ.कदम यांच्या घरून काळवीट ची कातडी जप्त केल्याची माहिती

    – वनविभाग आणि पोलिसांचा पंचनामा सुरू

    – डॉ.कदम यांच्या घरी काळवीट ची कातडी मिळाल्याने गर्भपात प्रकरणात पुन्हा खळबळ

    – काळवीटची कातडी नेमकी कधीची अद्याप अस्पष्ट

    – वनविभागाचे कर्मचारी घाटंनस्थळी दाखल

    – आधीच गर्भपात प्रकरणात चर्चेत असलेल्या डॉ. कदम यांच्या अडचणीत वाढ

  • 15 Jan 2022 02:29 PM (IST)

    ठाणे

    ठाण्यात चितळसर पोलिसांनी केला बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश .

    भिवंडी येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या 2 आरोपींना केली अटक .

    195 सिम कार्डसह  लॅपटॉप आणि राउटर केला पोलिसांनी जप्त .

    शासनाचा महसूल बुडवून चालवत होते बनावट कॉल सेंटर.

  • 15 Jan 2022 02:28 PM (IST)

    तुळजाभवानीची भवानी तलवार अलंकार पूजा

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्तभवानी तलवार अलंकार महापूजा करण्यात आली यावेळी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन दागिने व अलंकार घालण्यात आले त्यात राजा शिव छत्रपती असे अक्षर कोरलेले सोन्याची 108 राजमुद्रा असलेली माळ भवानीला घालण्यात आली. स्वराज्य स्थापनेसाठी व दुष्टांचा संहार करून प्रजेचे रक्षण करण्यासाठी तुळजाभवानी देवीने छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली होती त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचे दर्शन घेताना व तलवार घेतानाच देखावा मांडण्यात आला.

  • 15 Jan 2022 02:28 PM (IST)

    अजित पवार

    जे कोरोनाबाधित नाहीत त्यांना लगेचच परत आणणार कोरोनाबाधितांना क्वारंन्टाईन काळ पूर्ण झाल्यावर आणणार आसाममध्ये अडकलेल्या तरुणांवर अजित पवारांची प्रतिक्रिया

  • 15 Jan 2022 02:18 PM (IST)

    अजित पवार

    दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदी निवड सुनील चांदेरे यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड एकमताने निवड करण्यात आली शेतकऱ्यांसाठी चांगलं काम व्हावं हेच उद्दिष्ट्य पारदर्शक कारभार व्हावा असं आमचं सांगणं आहे आताच्या कामात बँका चालवणं स्पर्धात्मक कागदपत्रं पूर्ण असतील त्याला मदत व्हावी पवार साहेबांविषयी बोलताना तारतम्य बाळगावं

  • 15 Jan 2022 02:13 PM (IST)

    नवी दिल्ली

    नवी दिल्ली उत्तर प्रदेश साठी भाजपची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

    विद्यमान वीस आमदारांचे तिकीट कापलं

    पहिल्या टप्प्यातील 57 जागांची पहिली उमेदवारांची यादी जाहीर

    एकशे सात जागांवर उमेदवारांची घोषणा

    पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 57 उमेदवारांची भाजपकडून घोषणा

    दुसऱ्या टप्प्यातील 48 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा

    21 नव्या उमेदवारांना भाजपकडून उत्तरप्रदेशात संधी

    तरुण महिला आणि डॉक्टरांचा उमेदवारांमध्ये समावेश

  • 15 Jan 2022 02:12 PM (IST)

    कोल्हापूर

    घराच्या परिसरात अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या मानसिंग बोंद्रेला अखेर अटक

    कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी रत्नागिरीत ठोकल्या बेड्या

    सावत्र भाऊ अभिषेक बोंद्रे यांनी केली होती तक्रार

    उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्यावर पोलिसांनी केली अटक

  • 15 Jan 2022 02:11 PM (IST)

    नवी दिल्ली

    दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचे गोव्यात आगमन

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांचा गोवा दौरा

    पक्षाच्या उमेदवारांसाठी घरोघरी प्रचार करणार

    गोव्याच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आज पक्षाचे व्हिजन जाहीर करणार

  • 15 Jan 2022 02:11 PM (IST)

    रत्नागिरी

    दापोली येथील झालेल्या त्या तीन हत्या चोरी साठी झाल्याचे उघड

    वणोशी येथील तीन वृद्ध महिलांचा हत्या झाल्याचे स्पष्ट

    चोरीच्या उद्देशाने खून झाल्याचे पोलिसांनी केले स्पष्ट

    1 लाख 62 हजार 150 रुपयांच्याच दागिन्यासाठी झाली हत्या

    दापोली पोलिसांच्या तपासाला मोठे यश

  • 15 Jan 2022 01:26 PM (IST)

    अभिनेता किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट

    किरण मानेंनी घेतली शरद पवारांची भेट

    अभिनेता माने यांना मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे

  • 15 Jan 2022 01:19 PM (IST)

    पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे यांची निवड  

    – प्रा.दिगंबर दुर्गाडे यांची पुणे जिल्हा बँक अध्यक्ष पदासाठी निवड

    – सुनील चांदेरे यांची उपाध्यक्षपदी निवड

    – थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

  • 15 Jan 2022 12:07 PM (IST)

    ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या स्थानी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध क्षेत्रातील व्यवसायिकांशी संवाद साधत आहेत. स्टार्टअप उद्योजकांबाबत मोदी बोलत आहेत. इनोव्हेशनला घेऊन भारतात अभियान राबवले जात आहे. त्यामुळेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताच्या रॅकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. भारात आधी 81 व्या स्थानावर होता. आता भारत 46 व्या स्थापर्यंत आला आहे. भारताचा स्टार्टअप इकोसिस्टम देशभरात गाजत आहे

  • 15 Jan 2022 11:05 AM (IST)

    अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा बँक संचालकांची बैठक सुरू, अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी नावं निश्चित होणार 

    पुणे : अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा बँक संचालकांची बैठक सुरू

    – सर्किट हाऊस येथे बैठकीला सुरुवात

    – बैठकीत अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठी नावं निश्चित होणार

    – अजित पवार नेमकं कुणाला संधी देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष

  • 15 Jan 2022 10:28 AM (IST)

    पार्थ पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, दोघांत दोन तास चर्चा

    पुणे : पार्थ पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट,

    – सर्किट हाऊसमध्ये घेतली अजितदादांची भेट

    – दोन तास अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यात चर्चा

    – नेमकी कुठल्या विषयासंदर्भात भेट घेतली हे समजू शकलं नाही

    – अजित पवार आज दिवसभर पुणे दौऱ्यावर

  • 15 Jan 2022 10:09 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील 24 एसटी कर्मचारी बडतर्फ, 12 टक्के एसटी वाहतूक सुरू

    रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील  24 एसटी कर्मचारी बडतर्फ

    12 टक्के एसटी वाहतूक सुरू

    जिल्ह्यातील तब्बल 24 कर्मचार्‍यांना शुक्रवारी बडतर्फ करण्यात आले.

    रत्नागिरी एसटी विभागात आता 12 टक्के एसटी वाहतूक सुरू आहे

    सोमवारपासून एसटी फेर्‍यांमध्ये वाढ होण्याची शक्यता

    आतापर्यंत 699 कर्मचारी कामावर हजर

    तर कोल्हापूर मार्गावर जिल्ह्यातून 5 गाड्या दररोज सुरू

    देवरूख, रत्नागिरी, राजापूर बसस्थानकातून कोल्हापूर गाड्या सुटत आहेत.

    तर 238 चालक, वाहक कामावर हजर

  • 15 Jan 2022 09:07 AM (IST)

    बुलडाण्यात आधी क्यूआर कोड स्कॅन अन् नंतरच पोलिसांना पेट्रोलिंग करण्याची परवानगी

    बुलडाणा : आधी क्यूआर कोड स्कॅन करा अन् नंतरच पेट्रोलिंग करा

    जिल्ह्यात लवकरच यंत्रणा कार्यान्वित होणार

    जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असणार क्यूआर कोड पॉईंट

    यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार

    यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया सुरू

    जिल्हा पोलीस अधिक्षकांचा पुढाकार

  • 15 Jan 2022 09:03 AM (IST)

    एकाच ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर पुणे महापालिकेकडून कारवाई

    पुणे : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर महापालिकेकडून कारवाईला सुरुवात

    1200 वाहनांवर केली कारवाई

    ज्या वाहन मालकांनी प्रतिसाद दिला नाही मालकांना बजावल्या नोटिसा

    अशी वाहनं जप्त करायला केली सुरुवात

    पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

  • 15 Jan 2022 07:02 AM (IST)

    पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक

    पुणे  – पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक

    – अध्यक्षपदी जुन्या आणि उपाध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची राष्ट्रवादीची रणनीती

    – आज दुपारी एक वाजता होणार निवडणूक

    – त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व संचालकांची 10 वाजता घेणार बैठक

    – माजी आमदार रमेश थोरात, आमदार अशोक पवार आणि दिलीप मोहिते पाटील यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत

  • 15 Jan 2022 07:01 AM (IST)

    गोंदियामध्ये खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित 

    गोंदिया : खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी 5 पोलीस निलंबित

    -जप्ती केलेली दारू पोलीस रेकॉर्डवर दाखवून 3 युवकांना फसविले

    -बनावट धाड टाकणे प्रकरण पोलिसांना भोवले

    -सलेकसा पोलीस ठाण्यातील येथील घघटना

Published On - Jan 15,2022 6:16 AM

Follow us
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.