Maharashtra News Live Update : दिल्लीतल्या हायव्होल्टेज बैठकीत काय घडलं? राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून कोण?

| Updated on: Jun 15, 2022 | 8:50 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : दिल्लीतल्या हायव्होल्टेज बैठकीत काय घडलं? राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून कोण?
मोठी बातमी

मुंबई : आज बुधवार 15 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2022 07:55 PM (IST)

    यंदाच्या वारीसाठी राज्य शासनाकडून जोरदार तयारी सुरू

    एसटी महामंडळ वारी काळात सोडणार 4 हजार 700 विशेष बस

    वाखरीच्या रिंगण सोहळ्यासाठी असणार 200 बस

    परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

    6 ते 14 जुलै दरम्यान सोडणार विशेष बस

    दोन वर्षानंतर होणारी वारी लक्षात घेता परिवहन महामंडळाचा निर्णय!

  • 15 Jun 2022 07:54 PM (IST)

    आदित्य ठाकरेंनी केली शरयू तिरी आरती

  • 15 Jun 2022 07:33 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत आरती संपन्न

    शरयू तिरी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती

    आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा चर्चेत

  • 15 Jun 2022 07:29 PM (IST)

    ठाणे महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णाची संख्या 323

    आता पर्यंत आता पर्यंत कोरोना बाधित संख्या-1,86,575

    सक्रिय रुग्ण- 1416

    मृत्यू-0

    आता पर्यंत मृत्यू- 2131

    आता पर्यंत उपचार घेऊन बरे झालेले- 1,82,705

  • 15 Jun 2022 06:51 PM (IST)

    राहुल गांधी यांच्या चौकशीचीही बैठकीत चर्चा-सूत्र

    ममतांनी बोलावलेल्या बैठकीत ईडी कडून राहुल गांधी यांच्याबाबत सुरू असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला

    केंद्रीय एजन्सी विरोधी पक्षांना लक्ष्य बनवत आहे ममता बॅनर्जी यांची घणाघाती टीका

    राष्ट्रपती पदाची निवडणूक ही 2024 च्या निवडणुकीची आमच्यासाठी नांदी आहे – ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात केला उल्लेख

  • 15 Jun 2022 06:50 PM (IST)

    राष्ट्रपती पद निवडणूक

    राजनाथ सिंह यांची विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा

    भाजपकडून राजनाथ सिंह यांच्यावर देण्यात आलेली जबाबदारी

    राजधानी मधील विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर ममता बॅनर्जी मल्लिकार्जून खरगे यांच्यासोबत राजनाथ सिंह यांची चर्चा

    भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर विचार करू – खरगे यांची प्रतिक्रिया

    अखिलेश यादव यांच्या सोबतही राजनाथ सिंह यांचा फोनवरून संवाद

  • 15 Jun 2022 06:49 PM (IST)

    नागपूर स्मार्ट सिटी उभारणार ऑटोमेटेड (मॅकेनाईज्ड) मल्टिलेव्हल वाहन पार्किंग

    संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

    सिव्हरेज नेटवर्कचे जी.आय.एस. मॅपिंग होणार

    नागपूर शहरात वाहनांची संख्या वाढत चालली

    दुसरीकडे बाजारपेठेत पार्किंगसाठी पर्याप्त जागा उपलब्ध नाही.

    या समस्येवर तोडगा काढण्यासाठी करण्यात आला प्लान

    शहरात (पॅन सिटी) भागात मॅरीगो राउंड (आकाश झुला) /Puzzle Parking प्रमाणे ऑटोमेटेड/मॅकेनाईज्ड मल्टिलेव्हल कार आणि दुचाकी वाहन पार्किंगची सुविधा निर्माण केली जाणार आहे.

    नागपूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली

  • 15 Jun 2022 06:49 PM (IST)

    कॉंग्रेस भवनाबाहेर केले आंदोलन

    युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

  • 15 Jun 2022 06:48 PM (IST)

    नागपुरात आज पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ

    गेल्या 24 तासात 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    ग्रामीण मध्ये 24 , शहरात 22 तर जिल्ह्याबाहेरील 4 रुग्णांची नोंद

    16 जणांनी केली कोरोना वर मात

    ऍक्टिव्ह रुग्ण संख्या – 253

    एकूण चाचण्या 2033

  • 15 Jun 2022 05:32 PM (IST)

    राष्ट्रपती पद निवडणूक

    शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव नाकारला

    ममता बॅनर्जी यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • 15 Jun 2022 05:32 PM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या भेटीनंतर अयोध्येतील ज्ञानदास महाराज यांची प्रतिक्रिया

    आम्ही आशिर्वाद दिला त्यांचा पक्ष आणी परिवार चांगली चालत राहावा

    त्यांनी पुन्हा आयोध्याला यावे यासाठी मी त्यांना निमंत्रण दिले आहे

    बाळासाहेबांनी 2003 साली नाशिकला कुंभ मेळाव्यात आम्हाला साथ दिली

    आता ते आम्हाला सोडून गेले

    शिवसेना आम्हाला प्रिय आहे

  • 15 Jun 2022 05:28 PM (IST)

    भंडारा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे केला रास्तारोको

    – ईड़ी द्वारे राहुल गांधी यांना त्रास देण्याचा प्रकार.

    – नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशी बोलवण्यात आलं असून या कारवाई विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्त्यावर बसून रास्तारोको केला.

  • 15 Jun 2022 05:28 PM (IST)

    आजही राष्ट्रवादी आक्रमक मोडमध्ये

    – देहू येथील कार्यक्रमात अजित पवार यांच्या भाषणाला विरोध करणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन,

    – शिवाय सांप्रदायिक कार्यक्रमात राजकारण करणाऱ्या भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन,

    – फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम महाराज पादुका मंदिरासमोर आंदोलन,

  • 15 Jun 2022 05:02 PM (IST)

    ममतांनी बोलावलेली बैठक संपली

    थोड्याच वेळात पत्रकार परिषद

    ममता बॅनर्जी घेणार पत्रकार परिषद

    वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार

  • 15 Jun 2022 05:01 PM (IST)

    यावर्षी विक्रमी ऊस गाळप, साखर आयुक्तांची माहिती

    15 जूनला गळीत हंगाम पूर्ण

    138 लाख टन साखर उत्पादन

    134 कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

    राज्यातील सर्व साखर कारखाने बंद

    कुठलाच ऊस शिल्लक नाही

    एकूण 240 दिवस हंगाम चालला

    ब्राझील नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक प्रदेश

    साखर उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर

    यावर्षी 100 लाख टन साखरेचे निर्यात होणार

    निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 75 टक्के

    42 हजार कोटी एफ आर पी शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झालीय

    95 टक्के रक्कम जमा आहे, 4.72 टक्के रक्कम बाकी

  • 15 Jun 2022 04:05 PM (IST)

    शेखर गायकवाड, साखर आयुक्त

    साखर कारखानदारी सुरु झाल्यापासून यावर्षीचा गाळप हंगाम हा सर्वात विक्रमी हंगाम ठरला

    राज्यातील सर्व साखर कारखाने आज बंद झाले

    ब्राझील नंतर महाराष्ट्र हा जागतिक पातळीवरचा दुसरा सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा प्रदेश ठरला

    भारत हा जगाच्या पातळीवर साखर उत्पादन करणारा प्रथम क्रमांकांचा देश ठरला आहे

  • 15 Jun 2022 03:41 PM (IST)

    अयोध्येतून मंत्री आदित्य ठाकरे Live

    कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिर उभा राहत आहे याचा आनंद आहे

    मी या ठिकाणी राजकारण करायला आलो नाही

    योगींशी पत्रव्यवहार करून महाराष्ट्र सदनासाठी परवानगी मागणार

    महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांसाठी जागा असणे गरजेचे

  • 15 Jun 2022 03:36 PM (IST)

    पाणीप्रश्न सोडवल्याशिवाय झोप लागू देणार नाही

  • 15 Jun 2022 03:35 PM (IST)

    अयोध्येत शिवसेनेचं भगवं वादळ

    आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी हजारो कार्यकर्ते अयोध्येत दाखल

    संध्याकाळी शरयू तीरी आरती होणार

    शिवसेनेचे डझनभर नेते अयोध्येत दाखल

    काही वेळातच आदित्य ठाकरे महंतांची भेट घेण्यासाठी जाणार

  • 15 Jun 2022 03:33 PM (IST)

    संत सखाराम महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    अमळनेर येथील दोनशे पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    24 दिवस 550 किलोमीटरचा पायी प्रवास करून आठ जुलै रोजी दिंडी पोहोचणार पंढरपुरात

    दोन वर्षानंतर दिंडी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

  • 15 Jun 2022 03:05 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    चालू उद्योगाची सबसीडी काढून टाकली तर नवीन उद्योग याठिकाणी येतील कसे

    मोदींनी गरिब कल्याणाचा मंत्र दिला आहे

    या सरकारला पैसा खर्च करण्याची गरज नाही

    हर घर जल ही योजना पस्तीस हजार कोटींची आहे

    यातले पाचशे कोटीही या सरकारने खर्च केले नाहीत

    हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे

    आम्ही तुम्ही झोपू देणार नाही, आम्ही तुम्हीला कारभार करून देणार नाही

    जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही

    जोपर्यंत शुद्ध पाणी नळाला येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू

  • 15 Jun 2022 02:59 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    आपण जे टेंडर काढले त्यांचे काम सुरू केलं

    या सरकारने तेच प्रकल्प बंद करण्याचे काम केलं

    समुद्रात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आणि खोरेच दुष्काळमुक्त करायचं

    हा प्लॅन तयार केला, त्याला मान्यता देऊन जीआर काढले. मात्र या सरकारने त्यालाही खोळंबा घातला

    आपण मागेल त्याला शेततळं देण्याच योजना आणली

    पिण्याच्या पाण्याच्या असो, सिंचनाच्या असो सर्व योजनांची हत्या करण्याचं काम या सरकारनं केलं

    या सरकारने वैधानिक विकास मंडळांची हत्या केली

    राज्यपालांना आत्ता अधिकार उरला नाही

    मराठवाड्याची कवचकुंडलं या सरकारने मारून टाकली

    हे सत्तेत खूश आहेत, मालपाणी कमवण्यात हे मगशूल आहेत

    गिरबांची शेतकऱ्यांची अवस्था यांना पाहायची नाही

    माझ्या पाच वर्षाच्या काळात प्रत्येक वेळी आम्ही पैसा दिला

    योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं

    गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री तर या ठिकाणी आले नाही, ते तर सोडा एक पैसाही मिळाला नाही

  • 15 Jun 2022 02:53 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    सरकार हे इश्वर भरोसे चाललं आहे

    पाणी मुख्यमंत्र्यांनी नाही इश्वराने दिलं

    हा भाजपचा मोर्चा नाही हा जालन्याचा आक्रोश आहे

    भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत

    या जालन्यात आम्हाला पाणी पाहायला मिळेल का?

    जालन्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन तयार केलं नसतं तर थेंबभर पाणी पाहायला मिळालं नसतं

    आम्ही क्षणाचाही विचार न करता कोट्यवधींचा निधी पाण्यासाठी दिला

    नवीन सरकारमध्ये सर्व काही ठप्प झालं, या सरकारला स्थगिती देण्याशिवाय काही येत नाही

    जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा तुम्ही काय झोपा काढताय

    कोट्यवधी देऊन थेंबभर पाणी जालण्याच्या नळाला येत नाही तर तुम्हीला राज्यकर्ते म्हणून घ्यायचा अधिकार नाही

    जिथे जलआक्रोश आहे, तिथे तिथे भारतीय जनता पार्टी आहे

    आमच्या माता भगिनींना पाणी मिळावं यासाठी संघर्ष करणार आहे

    जनतेच्या आक्रोशाची दखल जे घेत नाहीत त्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय जनता राहत नाही

  • 15 Jun 2022 02:39 PM (IST)

    राष्ट्रपतीपद निवडणूक बाबत बैठक

    राष्ट्रपती पद निवडणूक बाबत बैठक

    थोड्याच वेळात दिल्लीत बैठक

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बैठकस्थळी पोहचल्या

    मंत्री सुभाष देसाई बैठकीत सहभागी होणार

  • 15 Jun 2022 01:17 PM (IST)

    उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार-एकनाथ शिंदे

    उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार

    शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदेंची

    आदित्य ठाकरे थोड्याच वेळात अयोध्येकडे रवाना होणार

  • 15 Jun 2022 01:02 PM (IST)

    जालन्यात जल आक्रोश मोर्चा, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे सगळं होतंय-फडणवीस

    फडणवीसांच्या नेतृत्वात जलआक्रोश मोर्चा

    सगळ्या मराठवाड्याची स्थिती हीच आहे-फडणवीस

    सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे सगळं होतंय-फडणवीस

    ही गर्दी म्हणजे जनतेच्या मनातला आक्रोश-रावसाहेब दानवे

    सरकार त्यांच्या हातात, उपाययोजना तेच करणार- रावसाहेब दानवे

    जालन्यात जल आक्रोश मोर्चाला मोठी गर्दी

    सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही सगळं होतंय, देवेंद्र फडणवीस

    लोकांना थेंबभर पाणी मिळत नाहीय

    129 कोटी रुपयांची पाण्याची योजना दिली होती, राज्य सरकारनं दोन वर्षात काम रखडवलं

  • 15 Jun 2022 01:00 PM (IST)

    ही नोटीस आल्याचं मला कालच कळालं-अनिल परब

    ही नोटीस आल्याचं मला कालच कळालं

    परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

    मी चौकशीला सामोरं जाणार

  • 15 Jun 2022 12:38 PM (IST)

    संभाजीराजे छत्रपती यांची इन्स्टा पोस्ट

  • 15 Jun 2022 12:35 PM (IST)

    दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

    दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.

     दिपाली सय्यद यांचं ट्विट

  • 15 Jun 2022 12:33 PM (IST)

    नवनीत राणा प्रकरणाची उद्या बोरिवलीत कोर्टात सुनावणी

    खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा उद्या बोरिवली न्यायालयात हजर होणार आहेत.

    नवनीत राणा प्रकरणाची उद्या बोरिवलीत सुनावणी होणार आहे.

    उद्या बोरिवली न्यायालयात जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे.

  • 15 Jun 2022 12:23 PM (IST)

    पुण्यातील नवले पुलावर अपघात

    पुण्यातील नवले पुलावर अपघात

    अपघातात दोन जण जखमी

    सातत्याने नवले पुलाजवळ अपघाताच्या घटना घडतायेत

    मिक्सर टँकर आणि चारचाकीचा अपघात झाला आहे

  • 15 Jun 2022 12:21 PM (IST)

    गोंदियात ट्रकची ट्रँक्टरला धडक, एकाचा मृत्यू, 6 जखमी

    -गोंदियात ट्रकने दिली ट्रँक्टरला धडक

    -भीषण अपघातात एक जागीच ठार सहा जण गंभीर जखमी

    -संतप्त नागरिकांनी जाळला ट्रक

    -रेती भरलेल्या ट्रकने दिली धडक

    -दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुरदाडा येथील घटना

    गावात तणावाचे वातावरण

  • 15 Jun 2022 12:19 PM (IST)

    खासदार नवनीत राणा अवमान प्रकरण, विशेषाधिकार समितीसमोर अधिकारी हजर राहणार

    संसदेच्या चौकशी समितीसमोर रजनीश शेठ, मनुकुमार श्रीवास्तव, संजय पांडे हजर राहणार

    खासदार नवनीत राणा अवमान प्रकरण

    विशेषाधिकार समितीसमोर हे बडे अधिकारी राहणार हजर

  • 15 Jun 2022 11:57 AM (IST)

    अयोध्येतून शिवसेना नेते संजय राऊत Live

    सरकारविरोधात बोलल्यास धमक्या दिल्या जातात

    प्रश्न निर्माण केले जातात

    फार लक्ष देऊ नका,

    शिवसेना आणि अयोध्या हे फार जिव्हाळ्याचे संबंध

    बृजभूष यांना मी आता ओळखत नाही, अनेक वर्षांचे संबंध आहे

    आज पहिली बैठक आहे, मंथनातून काय बाहेर पडतं पाहू

    राष्ट्रपतीपदावर संजय राऊतांचं भाष्य

    उत्तर प्रदेशात आम्हाला मोठं नेतृत्व मिळत नाहीये,

    आमचे प्रयत्न सुरू आहे

  • 15 Jun 2022 11:50 AM (IST)

    ‘जल आक्रोश मोर्चा’साठी देवेंद्र फडणवीस जालन्यात दाखल

    जल आक्रोश मोर्चासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जालन्यात दाखल

    मामा चौकातून निघतोय जल आक्रोश मोर्चा

    मोर्चासाठी शेकडो नागरिक जमायला सुरुवात

    ढोल ताशांच्या गजरात नागरिक मामा चौकात जमतायत एकत्र

    थोड्याच वेळात मामा चौकातून मोर्चाची होणार सुरुवात

  • 15 Jun 2022 11:43 AM (IST)

    अनिल परब शिर्डी दौऱ्यावर

    अनिल परब शिर्डी दौऱ्यावर

    ईडी चौकशीला हजेरी लावली नाही

    समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिलेले नाहीत

  • 15 Jun 2022 11:39 AM (IST)

    सरकार सुडबुद्धीनं काम करत आहे-नवनीत राणा

    सरकार सुडबुद्धीने सगळं काही करत आहे

    महाराष्ट्रात अनेक इतर विषय आहेत

    आज कोणत्या चेहऱ्याने हे अयोध्येत जाऊन दर्शन घेत आहे

    राज्यसभेत तोंडावर पडले, विधानपरिषदेतही तेच होणार

    मुख्यमंत्री औरंगाबादेत पाणीप्रश्नावर बोलले नाही

    औरंगजेबच्या कबरसंदर्भात काही बोलत नाही, हनुमान चालीसावर लगेच बोलतात

  • 15 Jun 2022 11:36 AM (IST)

    राणा दाम्पत्य प्रकरणी पुढील सुनावणी 27 जूनला

    राणा दाम्पत्य प्रकरणी पुढील सुनावणी 27 जूनला

    राणा दाम्पत्य प्रकरणी पुढील सुनावणी 27 जूनला

    राणांच्या वकिलांची माहिती,

    आज कोर्टात राणांनी हजेरी लावली

    सुनावणी 27 जूनला पावणेतीनला सुनावणी

  • 15 Jun 2022 11:35 AM (IST)

    पहिले मंदिर फिर सरकार-आदित्य ठाकरे

    पहिले मंदिर फिर सरकार

    आदित्य ठाकरेंवर फुलांचा वर्षाव

  • 15 Jun 2022 11:18 AM (IST)

    हा राजकारणाचा विषय नाही, आमच्या आस्थेचा विषय-आदित्य ठाकरे

    शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत

    शिवसेनेचं जोरदार शक्तीप्रदर्शन

    हा राजकारणाचा  विषय नाही,आस्थेचा विषय आहे- आदित्य ठाकरे

    ढोल ताशांच्या गजरात आदित्य ठारेंचं स्वागत

    अयोध्येसाठी येताना संपूर्ण महाराष्ट्राचा आनंद दिसत होता

  • 15 Jun 2022 10:38 AM (IST)

    नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर पुन्हा टीका

  • 15 Jun 2022 10:36 AM (IST)

    लखनौ विमानतळावर आदित्य ठाकरेंच्या स्वागताची तयारी

    लखनौ विमानतळावर आदित्य ठाकरेंच्या स्वागताची तयारी

    थोड्याच वेळात आदित्य ठाकरे विमानतळ परिसरात दाखल होणार

    रामलल्लाच्या दर्शनासाठी आदित्य ठाकरे थोड्याच वेळात दाखल होणार

  • 15 Jun 2022 10:30 AM (IST)

    अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत

    अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत

    साई रिसॉर्टप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे होते आदेश

    अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे

    काही कामानिमित्त मुंबई बाहेर असल्याची माहिती आहे

  • 15 Jun 2022 09:18 AM (IST)

    देशात केंद्र सरकारनं हुकुमशाहीचं टोक गाठलंय-संजय राऊत

    केंद्रीय तपास यंत्रणांची मारून मुटकून कारवाई सुरू

    अयोध्येत जोरदार तयारी सुरू

    आदित्य ठाकरे अयोध्येच्या दिशेनं रवाना

    आदित्य ठाकरे रामलल्लाच्या चरणी येणार

    आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी अयोध्येत जय्यत तयारी

    अयोध्येत गेल्या 35 वर्षांपासून येतोय

    हनुमान चालीसा हातात घेऊन आम्हाला राजकारण शिकवू नका

    लोकशाहीचं गळा घोटण्याचं काम केलं जातंय

    सुहास कांदे यांचं पद्ध देखील चुकीच्या पद्धतीनं बाद केलं

    महाराष्ट्र सरकार पाडण्याचे प्रयत्न

    मत बाद करण्यासाठी राज्यातून केंद्राला फोन सुरू होते

    रबर स्टॅम्प पाहिजे की राष्ट्रपती पाहिजे

    राज्यसभेत मविआचं मत फुटलेलं नाही

    राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार योग्यच

    राहुल गांधींची चौकशी म्हणजेच हुकुमशाहीचं टोक

    स्वातंत्र्याची लढाई पुन्हा लढवावी लागेल

  • 15 Jun 2022 09:04 AM (IST)

    आज राज्यातील तीन अधिकाऱ्यांना संसदेत हजर रहावं लागणार

    खासदार नवनीत राणा अवमान प्रकरण

    आज राज्यातील तीन अधिकाऱ्यांना संसदेत हजर रहावं लागणार

    संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर जबाब नोंदवला जाणार

    राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ दिल्लीत दाखल

    मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेही दिल्लीत दाखल

    राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्लीत हजर राहावे लागणार

    भायखळा जेलचे अधिक्षक यशवंत भानुदास यांनाही हजर राहाव लागणार

    आज दुपारी साडेबारा वाजता संसदेत होणार जबाब नोंदवला जाणार

  • 15 Jun 2022 08:28 AM (IST)

    राम मंदिर देणगीत 22 कोटी रुपयांचे चेक बाऊन्स

    राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून देणगी

    देणगीसाठी आलेले 22 कोटी रुपयांचे चेक बाऊन्स

    विश्व हिंदू परिषदेच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

    उत्तर प्रदेशातील अयोध्यामधील सर्वाधिक चेक बाऊन्स

    2 हजार देणगीदारांचे चेक बाऊन्स झाल्याने मोठी खळबळ

    राम मंदिरासाठी आतापर्यंत 3400 कोटी रुपये निधी जमा

    देशभरातून गोळा करण्यात आला होता राम मंदिर उभारण्यासाठीचा निधी

  • 15 Jun 2022 07:22 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशी

    सकाळी 11 वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयात जाणार

    गेल्या दोन दिवसात 21 तास झाली चौकशी

    सलग तिसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी होणार

  • 15 Jun 2022 07:07 AM (IST)

    कांजूरमार्ग कारशेडची जागा कुणाची? आज निकाल

    मुंबई उच्च न्यायालयात कांजूरमार्ग प्रस्तावित मेट्रो कारशेड

    याचिकेवर काल दोन्हीकडून युक्तिवाद पूर्ण

    न्यायालयाने निकाल राखीव ठेवत आज निकाल देणार असल्याचं सांगितलं

    त्यामुळे मुंबई मेट्रो कारशेड कुठे होणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे.

    या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे

    या प्रकरणात ऑक्टोबर 2020 मध्ये कांजूरमार्ग परिसरातील 6 हजार एकर जमीन आदर्श वॉटर पार्क अँड रिसॉर्ट या खासगी कंपनीला देण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते

    राज्य सरकारकडून कोर्टात असा दावा करण्यात आला आहे की सदर जागेच्या मालकी हक्काचा आदेश कंपनीने न्यायालयाची दिशाभूल करून मिळवला आहे

  • 15 Jun 2022 06:59 AM (IST)

    राज्यातील शाळा आजापासून पुन्हा गजबजणार

    नेहमी शाळा 13 जूनच्या सुमारास सुरु होतात,

    यंदा कोरोनाच्या उपाययजोना करण्यासाठी शाळांना दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला होता.

    शाळा उघडल्यानंतर दोन दिवसांनी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात आलंय.

    शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्याचे प्रयत्न

    येत्या शैक्षणिक वर्षात 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू झालं

    आज 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या

    तसे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले होते.

    राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना हे आदेश देण्यात आले होते.

  • 15 Jun 2022 06:52 AM (IST)

    ‘शिवसेनेची महाराष्ट्रात एक आणि अयोध्येत दुसरी भूमिका’

    शिवसेनेची भूमिका महाराष्ट्रात एक आणि अयोध्येत दुसरी आहे, अशी सरड्यासारखी भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या अयोध्या दौऱ्याला आपला वैचारिक विरोध असल्याचं अयोध्येतील हनुमान गढीचे मुख्य महंत राजू दास महाराज यांनी स्पष्ट केलंय. जो शिवसेना पक्ष आत्ता-आत्तापर्यंत सनातन धर्म संस्कृती आणि हिंदुत्वाची भूमिका मांडत होता, त्या पक्षाला आता कोणत्या असहाय्यतेमुळे भूमिक बदलावी लागत आहे, असा प्रश्नही महंतांनी उपस्थित केलाय. यानिमित्ताने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray)दौऱ्याला अयोध्येतील प्रमुख हनुमानगढीच्या महतांचा वैचारिक विरोध असल्याचं स्पष्ट झालंय.

  • 15 Jun 2022 06:48 AM (IST)

    नवनीत राणा, रवी राणांना आज कोर्टात हजर रहावं लागणार

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत

    आज (15 जून) मुंबईतल सेशन कोर्टात हजर राहवं लागणार आहे. कारण याच प्रकरणात आज त्यांची सुनावणी होणार आहे.

    मुख्यमंत्र्यांचं निवसस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठणाचा हट्ट राणा दाम्पतल्याला चांगलाच महागात पडल्याचेही दिसून आले.

    राणा यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हा दाखल झाले

    त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटकही गेली. हे अटक प्रकरणही दिल्लीपर्यंत गाजलं.

  • 15 Jun 2022 06:40 AM (IST)

    अनिल परब आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का?

    राज्याच्या राजकारणातून आत्ता एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे

    एकीकेड आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीत सध्या शिवसेनेचे (Shivsena) नेते व्यस्त आहे

    अशातच शिवसेनेच्या गोटातलं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे

    शिवसेना नेते आणि परिहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स (ED) बजावले आहे

    आज चौकशीला त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे

    त्यामुळे आज अनिल परब हे ईडीसमोर चौकशीला हजर राहणार का?

    दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांची चौकशी होणार आहे

    गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने परबांच्या मुंबईतील घरावर

    कार्यालयावर आणि रत्नागिरीतील रिसॉर्टवर तसेच परबांच्या निकटवर्तीयांवर धाडसत्र राबवलं होतं

    त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामपंयातीकडून काही कागदपत्रही ताब्यात घेतली होती

Published On - Jun 15,2022 6:36 AM

Follow us
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....