Maharashtra News Live Update : एकनाथ खडसे म्हणतात भाजपमधील अनेक नेते माझ्या संपर्कात पण…
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज रविवार 19 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत रणनीती तयार झाली. 20 तारखेला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे. उद्या देखील महाविकास आघाडीची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये सुद्धा पुन्हा रणनीती तयार केली जाईल, काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आहे. ज्याप्रमाणे भाजप महाविकासआघाडी आमदारांची संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे. त्या प्रकारे महाविकास आघाडी देखील त्यांच्या आमदाराशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात आज पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
गेल्या 24 तासात 72 नवीन रुग्णांची नोंद
40 जणांनी केली कोरोना वर मात
ऍक्टिव्ह रुग्ण संख्या 329
एकूण चाचण्या – 1942
-
सातारा: कोयना धरणात फक्त 15 टीएमसी पाणीसाठा
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे याचा परिणाम कोयना जलाशयातील पर्यटन झाले ठप्प…
कोयना जलाशय आटल्यामुळे याचा फटका बामणोली,तापोळा पर्यटनाला बसला…
तापोळा, बामणोली भागातील मासेमारी,बोटींग मुख्य व्यवसाय बंद…
पाऊस नसल्याने भागात दुबार पेरणीचे संकट
-
-
पाच वर्षीय मुलीवर अत्याचार
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना…
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील घटना..
पाच वर्षीय बालीकेवर निर्दयी अत्याचार…
अत्याचारानंतर बालीकेला जिवे मारण्याचा प्रयत्न…
सुदैवाने आई धावत आल्याने मुलीचा जीव वाचला….
आरोपी किशोर पवार विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
राहुरी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…
अल्पवयीन मुलीवर राहुरी येथील रूग्णालयात उपचार सुरू.
-
राज्य मागासवर्गीय आयोग करणार तीन जिल्ह्याचा दौरा
ओबीसी आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाकडून विविध जाती जमातींची जन सुनावणी
पुणे, अमरावती , नाशिक जिल्ह्यात होणार जन सुनावणी
30 तारखेला पुण्यात, 5 जूलैला अमरावती,16 जुलैला नाशिकला होणार सुनावणी
विविध जमातीतील नागरिकांची मतं जाणून घेणार आयोग !
-
रामदार आठवले यांची प्रतिक्रिया
विधान परिषद निवडणुकीत भाजपचा पाचवा उमेदवार निवडून येणार अपक्ष आमदारही भाजपला मतदान करणार.
ज्याप्रमाणे राज्यसभेची जागा निवडून आली त्याप्रमाणे ही जागा सुद्धा निवडून येणार
राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना गेल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.
अनेक शिवसैनिकांना वाटते भाजप सोबत राहिले पाहिजे त्यामुळे कदाचित शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता आहे.
-
-
जळगावच्या चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी
गेल्या एक तासापासून पावसाची बॅटिंग सुरू
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट
पावसाअभावी खोळंबलेल्या पेरणीला वेग येणार
-
परभणी श्री गजानन महाराज पालखीचे आगमन
हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात पालखीचं हर्षोल्हासात आगमन,
गण गणात बोते,,, गजानन महाराज की जय,,,, च्या जय घोषाने दुमदुमले परभणी,
परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा येथे आज असणार मुक्काम,
उद्या परभणी शहरात असणार आहे दिंडी मुक्कामी,
कोरोनामुळे 2 वर्ष दिंडीत पडला होता खंड ,
पालखीच्या आगमनाने शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण.
-
राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी रुद्राभिषेक व हनुमान चालींसा केली पठण
नवी मुंबई वाशी सेक्टर 14 येथील इच्छापूर्ती श्री सोमेश्वर जागृत शिव मंदिर येथे रुद्राभिषेक करून शिव चरणी राज ठाकरे यांची हिप बोन ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी व त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करण्यात आली व हनुमान चरणी हनुमान चालींसा पठण करण्यात आलंय
मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
-
पुण्यातील शनिवारवाड्यावर पर्यटकांची गर्दी
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटक शनिवारवाड्यावर
शनिवारवाडा पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक शनिवारवाड्यावर
-
पुण्यातील गुडलक चौकात छात्र भारतीचं आंदोलन
अग्निपथ योजनेच्या विरोधात कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत
अग्निपथ योजनेला विद्यार्थ्यांचा विरोध होतोय
-
महाराष्ट्रातून काँग्रेस कार्यकर्ते राजधानीत दाखल
राहुल गांधी उद्या ईडी कार्यालयात हजर राहणार
राहुल गांधी यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत
राहुल गांधी यांना अटक झाली तर देश पेटून उठेल – महाराष्ट्र युवक कांग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांचा इशारा
-
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या सावदे येथील घटना
धरणगाव तालुक्यातील सावदे झोका खेळताना झोका पडून भिंतीच्या विटा अंगावर पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू तर दोन लहान मुली गंभीर जखमी
जखमींना जिल्हा रुग्णालयात केले दाखल
-
सदाभाऊ खोत उदारी प्रकरणावर Live
नऊ वर्षे कागदपत्रं एवढी चकाचक राहिली
मतदान संपल्यावर हा माझ्या लोकांना कसं जेऊ घालत होता
सदाभाऊ खोत यांचा हॉटेलवाल्याला सवाल
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला खोटं लिहून दिलं
मी आमदार आणि मंत्री सव्वादोन वर्षांनी झालो
त्याबबतही तो हॉटेल चालक खोटं बोलला आहे
हे राष्ट्रवादीने कारस्थान रचलेलं आहे
माझ्यावरती खुनी हल्ला करण्याचा हा डाव होता
आज राष्ट्रवादीचं पितळ उघडं झालेलं आहे
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा माझ्यावर हल्ले केले आहेत
-
राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे Live
भाजपमधील अनेक नेते माझ्या संपर्कात
पण अजून कुणी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली नाही
भाजपमध्ये माझ्यावर प्रेम करणारे अनेक नेते आहेत
अनेकांना मी मदत केली आहे
भाजप आमचा विरोधी आहे
आमचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून होणार आहे, मला एकट्याला टार्गेट करण्याचं काही करण नाही
मी आप्पांकडे मत मागण्यासाठी त्यांच्याकडे आलो आहे
एकनाथ खडसे यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट
-
विधान परिषद निवडणुकीच्या वेगवान अपडेट
-पिंपरी चिंचवड मधील भाजपा आमदार लक्ष्मण जगताप उद्या सकाळी 7 वाजता विधानपरिषद निवडणुक मतदानासाठी मुंबईकडे निघाणार
-गेल्या काही दिवस आमदार जगताप आजारी आहेत
-
जळगाव शहरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात
जळगाव शहरात गेल्या दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेले दोन दिवस पाऊस नसल्याने उकाड्यात वाढ झाल्याने गरमी मुळे नागरिक त्रस्त झाले होते मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा वातावरण गारवा निर्माण झाला आहे. तसेच या पावसामुळे शेतीच्या कामाला देखील वेग येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
-
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे
- ५६ वर्षातल्या अनेक गोष्टी ताज्या आहेत. जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर उडाले.
- सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवे. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता. अस म्हटलं जात पायलट त्याचे ट्रेनिंग तसा एखादा कार्यकत्रता गेला तर तो मोठा फटका असतो.
- आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होये आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय.
- नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही, बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या ५६ वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले.
- अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर. ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्नीवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नौकरीचा पत्ता नाही.
- शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात शिवाजी महाराज, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळच वापरा आणि फेका. मग ही लोक भडकणार नाही तर काय. तुम्हाला मत दिल ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याची निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही. प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे.
- महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगल काम करतोय. आमशा १३०० मतांनी पडले. आदिवासी हक्काचा माणूस. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले. हे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणी साठी नविन रक्त. देसाई रावतेंनी सांगितले तुम्ही निर्णय घेतला ते मान्य आम्ही शिवसैनिक. म्हणूनच आपण ५६ वर्षे टिकलो. शिवसेना अजून नुसते ५६ नाही तर अजून खूप पुढे जाणार आहे.
-
शिवसेनाप्रमुख म्हणाले होते आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख म्हणाले होते आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उद्धव ठाकरे
आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय.
-
एक कट्टर कार्यकर्ता गेला
एक कट्टर कार्यकर्ता गेला
या निवडणुकीत तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची गरज नाही. हॉटेलात ठेवले आहे. बडदास्त ठेवावी लागते. यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार नगरसेवक खासदार यांना एकत्रं ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर याच्याहून चांगलं चित्रं दिसलं पाहिजे. आज आमदारच नाही. सर्व कार्यकर्ते आहेत. आपल्या स्वतचे आमदार संख्यने एवढे दिसले पाहिजे. रमेश लटके गेले. एक कट्टर कार्यकर्ता गेला. नुकसान होतं.
-
आणीबाणीच्या काळात मार्मिक छापून द्याययाला तयार कोणी नव्हतं
आणीबाणीच्या काळात मार्मिक छापून द्याययाला तयार कोणी नव्हतं. तेव्हा मार्मिक छापून हातगाडीवरून वाटण्याचं काम रावतेंनी केलं आहे. ८५नंतर मार्मिक लवकरच दैनिकाच्या स्वरुपात भेटायला येणार असं शिवसेनाप्रमुख दरवेळी सांगायचे. पण ते पूर्ण होत नव्हतं. मी साहेबांना म्हटलं दैनिकांची जबाबदारी घेऊ का. तेव्हा त्यांना म्हटलं तुमच्या टीमचा एक माणूस हवा. ते म्हणाले कोण, मी म्हटलं सुभाष देसाई. तेव्हापासून ते माझ्यासोबत जोडले गेले ते आजपर्यंत. सुभाष देसाई रावते वयाने मोठे आहेत. पण ते मला नेता मानून काम करत आहेत. तुम्ही निवृत्त झालात असं समजू नका. तुम्ही मला शिवसेनेच्या कामासाठी हवे आहेत.
-
दिवाकर रावते आणि देसाई यांची ओळख करून देण्याची गरज नाही
दिवाकर रावते आणि देसाई यांची ओळख करून देण्याची गरज नाही
जबाबदारी माझी आहे. पक्षप्रमुख म्हटल्यावर जबाबदारी माझ्यावर आहे. मी विधान परिषदेची उमेदवारी नाही दिली. पण त्यांनी धुसफूस केली नाही. ते आपल्यासोबत आले. दुसऱ्यासाठी झटणारा शिवसैनिक यांच्यात आहेत. दिवाकर रावते आणि देसाई यांची ओळख करून देण्याची गरज नाही. या दोन्ही नेत्यांना जी जी जबाबदारी दिली ती त्यांनी पूर्ण केली.
-
शिवसैनिक आपल्याला सोडून गेले, त्यांना विनम्र अभिवादन करतो.
या ५६ वर्षाच्या वाटचालीत अनेक शिवसैनिक आपल्याला सोडून गेले. त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी त्याग केला नसता तर आज आपण हे पाहू शकलो नसतो. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई हे शिवसेनाप्रमुखांसोबतचे साथी आहेत. शिवसेनेचा पहिला महापौर निवडून येणं १९७१ मध्ये हेच मोठं होतं. त्यावेळी नगरसेवक निवडून येणं हेच मोठं होतं. आज आमदार आपले आहेत. मुख्यमंत्री आपले आहेत.
-
उद्धव ठाकरेंचं पुर्ण भाषण
-
शिवसेनेचा महापौर निवडून येणं एक स्वप्न होतं – उद्धव ठाकरे
आज शुभेच्छा देता, आज चांगला दिवस आहे
५६ वर्षांच्या गोष्टी आजही मनामध्ये ताज्या आहेत
५६ वर्षांपूर्वीच्या एक गोष्ट आठवली
सुरूवातीचा प्रसंग आठवला
त्यावेळी फोडलेल्या नारळाचं पाणी माझ्या अंगावर उडालं होतं.
जबाबदारी काय असते, आपल्यासारखे साथी सोबती
प्रमुखांनंतर काय असं अनेकांना वाटतं होतं.
परंतु त्यांना उत्तर दिल आहे
त्या पिढीतील अनेक लोक आजही सोबत आहेत
शिवसेनेचा महापौर निवडून येणं एक स्वप्न होतं.
तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझी आहे
नव्या दमाची सहकारी रोज येत आहेत.
आजचं हे जे चित्र आहे
-
ते शिंतोडे मला भिजवून टाकतील असं मला वाटलं नव्हतं – उद्धव ठाकरे
उभं राहून बोलू शकतो हे वांद्रे सभेत दाखवून दिलं आहे. नाही तर टिप्पणी यायची उद्धव ठाकरे बसून बोलले. अनेक शतके शिवसेना राहणार आहे. शुभेच्छा देतो राऊतांनी फादर्स डेचा उल्लेख केला. अभिमान नक्कीच आहे. कारण माझ्या वडिलांनीच या पक्षाला जन्म दिला आपल्याकडे थोड्या श्रद्धा अंधश्रद्धा असतात. मग तो पितृपक्ष असतो. त्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. मी नाही मानत. कारण माझ्या आजोबांनी मला नाही शिकवलं. माझा पक्ष हा पितृपक्षच आहे. कारण वडिलांनी स्थापन केला आहे. तेव्हा असं काही नसतं. प्रत्येक दिवस आपला असतो.
५६ वर्षातील अनेक गोष्टी मनात ताज्या आहेत. मी पहिल्यांदा पक्षप्रमुख पदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर नकळत एक क्षण तरळून गेला. शिवसेना स्थापनेचा तो क्षण. शिवाजी पार्कातील ते घर. वन बीएचकेचं घर. माझे आजोबा. दोन काका. माँ. सर्व होते. सर्व प्रसंग सांगणार नाही. तुम्हाला माहीत आहे. सिनेमात आहे. शिवसेना स्थापन झाली. त्या क्षणाचे साक्षीदार मी आणि आमच्या कुटुंबातील एकदोन जण असतील. मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. माझ्यासमोर शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता. नारळाचं पाणी माझ्या अंगावर उडाले होते. जोश होता गंमत होती. ते शिंतोडे मला भिजवून टाकतील असं मला वाटलं नव्हतं. जबाबदारी काय असते हे माहीत नव्हतं. तुमच्यासारखे सवंगडी मिळाले. शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेचं काय याला आपण कणखरपणाने उत्तर देत आलो आहोत. नंतरही देऊ
-
या अग्नीत समिधा टाकण्याचं काम खालो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करत असतात.
हे सगळे लोक आज जे टिरटिर आणि पिरपिर करत आहेत ते भविष्यात शिवसेनेच्या पायाशी असतील. आम्ही ईडी-सीबीआयला घाबरत नाही. अंगावर आलात तर शिंगावर नाही तर पायाखाली तुडवले जाल इतकंच मी सांगतोत.
शिवसेना ही अग्नी आहे. या अग्नीत समिधा टाकण्याचं काम खालो शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करत असतात.
अयोध्येला गेलो तेव्हा तिथले शिवसैनिक स्वागतासाठी सज्ज होते. बाळासाहेबांचे नातू येत आहेत, हिंदुत्वाचा भगवा ज्यांनी डौलानं फडकवत ठेवला आहे. त्यांचे नातू वारस येत आहेत म्हणल्यावर तिथे स्वागतासाठी लखनऊपासून अयोध्यापर्यंत सगळे उभे होते.
-
फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येणार नाही – संजय राऊत
जे चित्र देशाने पाहिलं जे स्वागत
आदित्येच्या प्रत्येक ठिकाणी आर्शिवाद दिला
बाळासाहेबांच्या प्रती असलेली त्यांची श्रध्दा होती
आम्हाला कोणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही
५६ वा वाढदिवस आहे
अजून बरंच पुढे आहे
फार घमेड आली आहे काही राजकारण्यांना
एक जागा जिंकली म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं नाही
फार घमेंड करू नका
तेरा घमंड चार दीन का है पगले,
या बादशाहीला नक लावण्याचा ताकद कुणाच्यात झालेली नाही
खरे अग्नीवीर पुढे बसले आहेत
चार वर्षाचं कंत्राट
देशाचं रक्षण कोणी करायचं हे त्यांना कळत नाही
मोदी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र शांत आहे
शिवसेनेकडे असल्यामुळे शांत आहे
प्रयत्न सुरू आहेत, पण तुम्हाला ते जमणार नाही
या देशातल्या परिस्थिती स्थिर करण्यासाठी सैनिक आणले आहे
फडणवीस कटकारस्थान करून चालणार नाही
-
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या शेतमालाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी..
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या शेतमालाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी..
बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा खासदार अनिल बोंडें यांचा आरोप…
शासनाने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकसान भरपाई द्यावी बोंडें यांची मागणी..
शेतकऱ्यांनी आणलेल्या शेतमालाला शेड उपलब्ध करून दिला नाही..
नुकसान भरपाई संदर्भात पणन मंत्री आणि जिल्हाधिकारी यांना पत्र लिहल्याची बोंडेंची माहिती.
-
राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने 21 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक, 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार
राष्ट्रपती निवडणुकीच्या अनुषंगाने 21 जूनला दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक
बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज दुपारी दिल्लीसाठी रवाना होणारं
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वानंतर आता विरोधी पक्षाची दिल्लीत दुसरी बैठक
21 जूनच्या बैठकीला 17 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता
आप आणि बीजु जनता दल बैठकीला उपस्थित राहणार का याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष
-
यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
यंदा प्रथमच मिळणार महिला वारकऱ्यांना आरोग्यविषयक अत्याधुनिक सोयीसुविधा
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ‘आरोग्यवारी’ अभियानाचा पुण्यातून शुभारंभ
राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित
महिला वारकऱ्यांना मिळणार आरोग्यविषयक अत्यानुधिक सोयी सुविधा.
-
चमत्कार म्हणत नाही पण भाजप चा विजय होईल एवढं नक्की त्या दृष्टीने नियोजन झालं – सुधीर मुंनगटीवार
चमत्कार म्हणत नाही पण भाजप चा विजय होईल एवढं नक्की त्या दृष्टीने नियोजन झालं
आमच्या उमेदवाराने आणि पक्ष नेतृत्वाने नियोजन केले पाचव्या उमेदवारासाठी काही आमचे आमदार काही अपक्ष आमदार याना सुद्धा विचारणा केली त्यांनी होकार दिला
अनेक अपक्ष आमदारांना या सरकारच्या कामाबद्दल असंतोष आहे
सरकार विश्वसघात करून सत्तेत आलं मात्र जनेतेची काम होत नाही
त्यामुळे आम्ही विजया साठी आश्वस्त आहो
अनेकांनी सांगितलं आम्हाला या अहंकारी सरकारला धक्का ध्यायच आहे जमिनीवर आणायचा आहे म्हणून आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं
पाचवा उमेदवार विजय होईल त्यापेक्षा जास्त मत पडतील एवढं आस्वासन त्यांनी आम्हाला दिलं
शिवसेनेचे आमदार म्हणाले ते योग्य आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ते हे विसरले आहे त्यांचा शब्द काटे आणतो ज्यांनी भगवा हाती घेतला ते खुर्ची साठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार नाही आज ते बोलतात उद्याला कृती करून दाखवतील
-
शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरला बिबट्या
-शेतकऱ्यांच्या गोठ्यात शिरला बिबट्या….
-पाच शेळ्या सह कोंबड्या केल्या फस्त….
-बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद….
-शेतकऱ्याच्या चालाक्याने बिबट्या जेरबंद…..
-
शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉली ला अपघात…
सातारा: शिरवळ जवळ महामार्गावर वारकऱ्यांच्या ट्रॉली ला अपघात…
अपघातात 30 वारकरी जखमी 1 वारकऱ्यांचा मृत्यू…
कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी …
हे सर्व वारकरी निघाले होते आळंदीला…
जखमींवर शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू…
आज पहाटेचीची घटना…
-
शिवसेना आमदारांना पक्षादेश बजावला
शिवसेना आमदारांना पक्षादेश बजावला
विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षादेश बजावला
सोमवारी सकाळी 10 वाजता विधान भवनातील पक्ष कार्यालयात आमदारांना निकडणुकीतील उमेदवारांचा प्राधान्यक्रम आणि अन्य सूचना आमदारांना देण्यात येणार
-
गडचिरोली जिल्ह्यातील चिचोडा बॅरेज व मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे काही दरवाजे आज साडेनऊ वाजता उघडण्यात आले
गडचिरोली जिल्ह्यातील चिचोडा बॅरेज व मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे काही दरवाजे आज साडेनऊ वाजता उघडण्यात आले
चिचोडा बॅरेजचे 38 पैकी 38 गेट उघडले असून 11.14 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे
महाराष्ट्रा तेलंगाना सीमावर्ती वसलेल्या मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 पैकी एक दरवाजा गेट उघडण्यात आलेला आहे
लक्ष्मी मेडीगट्टा धरणातून 22.52 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत असून पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच या दोन बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले
गडचिरोली जिल्ह्यात सध्या पाऊस नसला तरी काल रात्रीच्या नोंद मध्ये एक टक्के १% पावसाची नोंद झाली
-
पुण्यातील कबड्डीपटूची गळफास घेऊन आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय
पुण्यातील कबड्डीपटूनं गळफास घेऊन केली आत्महत्या
कोथरूड परिसरातील दोन दिवसापूर्वीची घटना
कुमार शिंदे ( वय 21 ) यानं केली आत्महत्या
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी पोलिसांचा अंदाज
परवा रात्री घेतला गळफास काल उघडकीस आली घटना
-
मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
नवी मुंबई — मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
सायन पनवेल महामार्गावर खारघर जवळ अपघात
खारघर पुलावर 2 ट्रेलर आणि कारमध्ये अपघात
अपघातामुळे बेलापूर पर्यंत वाहतूक कोंडी
-
मुख्यमंत्री आज आमदारांना पवईतील हॉटेलमध्ये मार्गदर्शन करतील – संजय राऊत
पण हा वणवा देशात पेटू शकतो
प्रांतीय वादी असा शिक्का मारला गेला
त्यानंतर देशभरात प्रादेशिक पक्ष तयार झाले
भूमीपुत्राची भूमिका घेऊन प्रादेशिक पक्ष तयार झाले
याचं सगळं श्रेय शिवसेनेला जातं
अब तक ५६
आज मुख्यमंत्री आमदारांना संबोधित करतील
56 वर्ष झाली एक वादळ आहे
कुनचळा लेखणी वाणी बाळासाहेबांची
बाळासाहेब यांनी मूर्त रोवली प्रादेशिक पक्षाची
भूमी पुत्रांची भूमिका
सर्व ठिकाणी प्रादेशिक पक्ष उभा आहे
दिल्लीच्या तक्तापर्यंत सेना आहे
अब तक 56 पुढे देखील जातील
आज सर्व शिवसेनेला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधन करणार
तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत
भारतीय जनता पक्षाने एक भ्रम तयार केला होता
नवाब मलिक आणि अनिल देखमुख यांना मतदानाचा अधिकार नाकारला आहे
हे सगळं दबावाखाली होत आहे
त्यामुळे देशातील न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे.
निवडणुकीची प्रक्रिया होती, ती समजून सांगण्यात आली आहे
जिंकण्यासाठी वीस मतं कुठून आणणारं
-
पुण्यातील कबड्डीपटूनं गळफास घेऊन केली आत्महत्या
पुण्यातील कबड्डीपटूनं गळफास घेऊन केली आत्महत्या
कोथरूड परिसरातील दोन दिवसापूर्वीची घटना
कुमार शिंदे ( वय 21 ) यानं केली आत्महत्या
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असावी पोलिसांचा अंदाज
परवा रात्री घेतला गळफास काल उघडकीस आली घटना
-
मुंबईत कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि वांद्रे भागात मुसळधार पावसाला सुरूवात
मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा दणका दिला
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, अंधेरी आणि वांद्रे भागात गेल्या 30 मिनिटांपासून काळ्या ढगांसह पाऊस पडत आहे.
सध्या या भागात पाणी साचल्यासारखी परिस्थिती कुठेही दिसत नाही.
काळ्या ढगांसह पावसाचा हा व्हिडिओ मालाड आणि कांदिवली पश्चिम भागातील आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की संपूर्ण परिसरात अंधार आहे आणि मुसळधार पाऊस पडत आहे.
-
विरारमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या
:-विरारमध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या.नितीश चौरसिया (वय 38) असे आत्महत्या करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव असून ते अंधेरीला इंजिनीयर म्हणून रेल्वे खात्यात कार्यरत होते.विरार पश्चिमेच्या राम निवास बिल्डींगमधील तिसऱ्या माळ्यावर काल रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे.आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून विरार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत मुंबई च्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.आता विरार पोलिसांच्या तपासा नंतरच ही आत्महत्य का केली हे समोर येणार आहे.मात्र रेल्वे डिपार्टमेंट मध्ये इंजिनीअर या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने स्वतःच्या रिवाल्वरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. -
वसई-विरार नालासोपारा शहरात उघडझाप करीत पाऊसाची हजेरी
वसई-विरार नालासोपारा शहरात उघडझाप करीत पाऊसाची हजरी
वसई नालासोपारा भागात ढगाळ वातावरण आहे तर विरार मध्ये मात्र पाऊस सुरू आहे
परिसरात आभाळ पूर्णता काळकूट झाला असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे
विरार पश्चिमेच्या ओल्ड विवा कॉलेज समोरील आज सकाळी 9:30 वाजताची ही दृश्य आहेत
-
आम आदमी पार्टीच अग्निपथ विरोधात आंदोलन
आम आदमी पार्टी च अग्निपथ विरोधात आंदोलन
आंदोलनाला होत आहे सुरवात
-
हाॅटेल ट्रायडेंटमध्ये आमदारांची चाय पे चर्चा…
हाॅटेल ट्रायडेंटमध्ये आमदारांची चाय पे चर्चा…
– शिवसेनेच्या भूमिकेवर आमदारांची चर्चा…
– दोन्ही जागांवर विजय निश्चित होईल यासाठी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार असल्याची माहीती…
– फिड हाॅटलाईनला
-
डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरण
डॉ. नरेंद्र दाभोळकर खून प्रकरण
कोल्हापूरच्या संजय अरुण साडविलकर यांनी शनिवारी न्यायालयात दिली साक्ष
वीरेंद्र तावडे याने पिस्तूल आणि गोळ्या बनवायला मला यांनी सांगितल्या मात्र, मी त्या बनविल्या नाहीत, अशी साक्षी मध्ये दिली माहिती
कोल्हापूरमध्ये संजय साडविलकर सराफा व्यावसायिक
मंगळवार पेठेतल्या हिंदू एकता कार्यालयात हिंदू संघटनांच्या बैठका दरम्यान वीरेंद्र तावडे यांच्याशी भेट झाल्याचे साडविलकर यांनी सांगितले
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू
या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोपनिश्चिती
डॉ. दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता
-
अमित शहा उद्या पासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर
नाशिक – अमित शहा उद्या पासून दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर
उद्या दुपारी नाशिकच्या त्रंबकेश्वर मध्ये होणार आगमन
मंगळवारी पहाटे त्र्यंबकेश्वर मंदिरात अमित शहा करणार योग्य साधना
श्री मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटलचा शिला न्यास देखील करणार
-
पाऊस लांबल्याने नाशिकवर पाणी कपातीचे संकट
नाशिक – पाऊस लांबल्याने नाशिकवर पाणी कपातीचे संकट
जुलै महिन्यात पाणी कपात होण्याची शक्यता
गंगापूर सह जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ
30 जून पर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाण्याचे फेर नियोजन करणार
पाणी जपून वापरण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
-
पुणे बेंगलोर महामार्गावरील बायपास रोडवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद
पुणे बेंगलोर महामार्गावरील बायपास रोडवर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केलं जेरबंद
लूटमार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली अटक
चौघांकडून अकरा गुन्ह्यांची उकल तर अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
रोहित मोरे, गंगाराम गावडा, अक्षय सोनवणे आणि शुभम सातपुते अशी अटक केलेल्या चौघांची नाव
चाकू आणि जंबियाचा याचा धाक दाखवून करत होते लूटमार
-
जांभळाचा भाव पोहचला 400 रुपयांवर, मधुमेह ग्रस्तांकडून जांभळाला मोठी मागणी
जांभळाचा भाव पोहचला 400 रुपयांवर..
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात जांभूळ बाजारपेठेत…
मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी जांभळाच्या बियांच्या पावडरचेही सेवन करतात..
मधुमेह ग्रस्तांकडून जांभळाला मोठी मागणी….
-
भामरागड तालुक्यातील जवळपास 50 टक्के अनेक विभागातील पदे रिक्त
भामरागड तालुक्यातील जवळपास 50 टक्के अनेक विभागातील पदे रिक्त
महसूल विभागातील 30 टक्के पदे रिक्त तर आरोग्य विभागातील 25 टक्के पदे रिक्त पंचायत समिती अंतर्गत तर जवळपास 40 टक्के पदे रिक्त असल्याची बाब समोर आली
शिक्षण विभागात आहे बत्तीस टक्के पदे रिक्त
एक ग्रामसेवकांवर 3 ग्रामपंचायतचे कार्यभार
भामरागड तालुका आदिवासी संस्कृती व जल जंगल नटलेला
आदिवासींच्या विकासासाठी राज्य सरकारचा दुर्लक्ष असून या भागातील रिक्त पदे ताबडतोब भरण्यात यावी अशी मागणी स्थानिकाकडून होत आहे
-
पुणे जिल्ह्यातील भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात शेतकरी भात पिकाची बीज प्रक्रिया तयार करण्यात मग्न
-पुणे जिल्ह्यातील भाताचे आगार असलेल्या मावळ तालुक्यात शेतकरी भात पिकाची बीज प्रक्रिया तयार करण्यात मग्न
-मावळ तालुक्यातील अनेक गावागांवात शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरु झालीय
-तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदशनखाली ही रोपवाटिका तयार केली जात असून यातून अधिकच उत्पन्न मिळाव हे उद्दिष्ट कृषी अधिकऱ्यांचं आहे
-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह इतर ठिकाणचे देखील पोलीस असतील
आळंदी, पुणे
-अलंकापुरी आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 21 जून ला पालखी सोहळा पार पडतोय, गेल्या दोन वर्षांनंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणाऱय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल होतील
-ह्या सोहळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल दीड हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा पालखी सोहळ्यात तगडा बंदोबस्त असणार आहे
-पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासह इतर ठिकाणचे देखील पोलीस असतील
-
कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस लांबला असला तरी शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा
जिल्ह्यात पाऊस लांबला असला तरी शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा
शेती आणि पाण्यासाठी 25 जुलैपर्यंत पुरेल इतका जिल्ह्यात पाणीसाठा
राधानगरी धरण किती टक्के पाणीसाठा अजूनही शिल्लक
परिस्थिती पाहून पंचगंगा आणि भोगावती नदीवरील काढलेले बंधाऱ्याचे बर्गे पुन्हा बसले जाणार
जलसंपदा विभागाच नियोजन
-
ठाणे जिल्ह्यात 837 नवे कोरोना रुग्ण
ठाणे जिल्ह्यात 837 नवे कोरोना रुग्ण
ठाणे जिल्ह्यात हळू हळू कोरोना रुग्ण वाढत आहे.
मात्र मृत्यूची नोंद नाही.
ठाणे महापालिका हद्दीत 287 ,नवी मुंबईत 292 रुग्ण,तर कल्याण डोंबिवलीत 119 रुग्णाची नोंद झाली .भिवंडी महापलीक क्षेत्रात 5 रुग्णाची नोंद.उल्हासनगर 15,अंबरनाथ 0,बदलापूर7,ग्रामीण 29 रुग्णाची नोंद ….
-
राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक
राज्यातील कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक
अमेरिकेतील मियामी कारागृहाच्या धर्तीवर पीपीपी तत्त्वावर नवीन कारागृहे उभारण्यासाठी सरकारला नव्याने प्रस्ताव पाठवला जाणार
अप्पर पोलिस महासंचालक तथा कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांची माहिती
राज्यातील प्रमुख कारागृहातील कैद्यांचा वाढता ताण लक्षात घेता विशेषतः मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी पाच हजार कैद्यांचे बहुमजली कारागृह उभारण्याचा प्रस्ताव
राज्यात नऊ मध्यवर्ती कारागृहे, 28 जिल्हा, 13 खुली, महिला, किशोर, विशेष कारागृहे आणि एक खुली वसाहत अशी एकूण 54 कारागृहे
राज्यातील कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता 23 हजार 942असताना 35 हजारांच्या पुढे कैद्यांचे वास्तव्य आह
एकूण क्षमतेच्या दीड पट कैद्यांची गर्दी वाढल्याने त्यामुळे कारागृहातील सोयी-सुविधांवर मोठा ताण
राज्यातील सर्वांत मोठ्या येरवडा कारागृहात कैद्यांची संख्या एकूण क्षमतेच्या तीन पट
-
संडे स्ट्रीटनिमित्त मुंबई पोलिसांचा नरिमन पॉईंटला कार्यक्रम
संडे स्ट्रीटनिमित्त मुंबई पोलिसांचा नरिमन पॉईंटला कार्यक्रम, अक्षय कुमारची कार्यक्रमाला उपस्थित
-
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
या दोन्ही पालख्यांचे 22 जून रोजी शहरात आगमन होणार
23 जून रोजी पालखीचा शहरात मुक्कामी असेल तर 24 जून रोजी पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार
पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची विशेष शाखेकडून आखणी
पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांसोबत गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तात राहणार
तर राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे 600 जवान आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे देखील बंदोबस्तात असणार
-
नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नरखेड तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून 3 जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. नरखेड तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून 3 जणांचा मृत्यू
विजेचा कडकडाटही झाला.
यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून नरखेड तालुक्यातील तिघांना जीव गमवावा लागला.
तसेच दोन बैलही दगावले.
पहिल्याच पावसात शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अजून पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही आणि तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
-
जून अखेपर्यंत पावसानं हुलकावणी दिल्यास पुणेकरांवर पाणी टंचाईची वेळ येण्याची शक्यता
जून अखेपर्यंत पावसानं हुलकावणी दिल्यास पुणेकरांवर पाणी टंचाईची वेळ येण्याची शक्यता
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रात अवघा 3.57 टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक
खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरणात एवढाचं पाणीसाठा शिल्लक आहे
एका आठवड्यात 1 टीएमसी इतका पाणीसाठा संपला आहे
महापालिकेला दिवसाला दीड टीएमसी एवढं पाणी लागतं
धरणातील सद्यस्थिती
खडकवासला 0.33 पानशेत 1.59 वरसगाव। 1.64 टेमघर 0.0
एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे…
-
राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय मात्र काही ठिकाणी अजूनही पहिला पाऊसदेखील झालेला नाहीये
शेतकऱ्यांची पेरणी थांबलेली आहे
मात्र दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुर्व मोसमी पाऊस झालाय मोसमी पावसाची शक्यता दोन दिवसांत वर्तवण्यात आलीये…
-
पुण्यातील श्नीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचं यंदाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष
पुण्यातील श्नीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचं यंदाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष
या निमित्ताने मंदिरावर होणार पुष्पवृष्टी
हेलिकॉप्टरनं केली जाणार पुष्पवृष्टी
सकाळी 9 ते 10 हा कार्यक्रम होणार आहे ….
-
संत ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व असणाऱ्या अंकली शितोळे सरकारांचे अश्व आज पुण्यात दाखल होणार
संत ज्ञानेश्वर महाराजांचे अश्व असणाऱ्या अंकली शितोळे सरकारांचे अश्व आज पुण्यात दाखल होणार
पुण्यात आल्यानंतर श्नीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला देणार मानवंदना
अश्व थेट गाभाऱ्यात करणार प्रवेश
माऊलींच्या अश्वाचा मान हा कर्नाटकातील शितोळे सरकारांचा आहे
आज माऊलींचे अश्व पुण्यात दाखल होतील
21 तारखेला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतंय….
-
स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरासाठी आणखी 25 इ बस खरेदी करणार
स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरासाठी आणखी 25 इ बस खरेदी करणार
संचालक मंडळाची खरेदी साठी 35 कोटी च्या प्रस्तावाला मान्यता
नागपूर शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुरू आहे प्रयत्न
या आधी 15 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली टाटा मोटर्स सोबत हा करार झाला आहे
आता आता त्यात आणखी 25 बस ची भर पडणार
-
उमेदवार निवडून येण्याचा नाना पटोलेंना विश्वास
आजच्या बैठकीत रणनीती तयार झाली, 20 तारखेला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील अशी तयारी झालेली आहे
उद्या देखील महाविकास आघाडीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये सुद्धा पुन्हा रणनीती तयार केली जाईल, काही अडचण येणार नाही असं मला वाटतं आहे
ज्याप्रमाणे भाजप महाविकासआघाडी आमदारांची संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे, त्या प्रकारे महाविकास आघाडी देखील त्यांच्या आमदाराशी बोलण्याचा प्रयन्त करते आहे, तशी माहिती उद्या येऊन जाईल तशी रणनीती देखील तयार आहे
ऑन उद्याच्या बैठकीत शरद पवार गैरहजर
उद्याच्या बैठकीत पवार साहेब नसतील तरी उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळेजण उपस्थित राहतील मात्र पवार साहेबांचा मार्गदर्शन त्याच्यामध्ये राहणारच आहे
ऑन अग्नीपथ योजना
देशाच्या सुरक्षा योजनेत नरेंद्र मोदी छेडखनीच काम नरेंद मोदी करत आहेत. त्यामुळे देशातील लोक नरेंद्र मोदी यांना माफ करणार नाही तरुणांची चेष्टा करतात. आम्ही सांगतो तरुणांनी कायदा हातात घेऊ नका. काँग्रेसला संयोग करा काँग्रेस जुन्या पद्धतीचे धोरण आणून देशाला पुन्हा उभारण्याचं बळ देईल
-
मुंबई उपनगरात काही भागात पावसाला सुरुवात
मुंबई उपनगरात काही भागात पावसाला सुरुवात
वेस्टन एक्सप्रेस हायवे खार येथे पावसाला सुरुवात
रिमझिम पाऊस होत आहे
-
नागपुरात पहाटे पासून पावसाला झाली सुरवात
नागपूर ब्रेकिंग –
नागपुरात पहाटे पासून पावसाला झाली सुरवात
साधारण स्वरूपाचा पाऊस असला तरी जिल्ह्यात पाऊस ला सुरवात झाली।
शेतकऱ्यांच्या पेरणी च्या कामाला आता वेग येणार
तर उकाड्याने त्रस्त नागपूरकरा ना काहीसा दिलासा
गेल्या दोन दिवसात पावसाचं वातावरण तयार झालं
मात्र आज सकाळ पासूनच पावसाला सुरुवात झाली
-
स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरासाठी आणखी 25 इ बस खरेदी करणार
स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत नागपूर शहरासाठी आणखी 25 इ बस खरेदी करणार
संचालक मंडळाची खरेदी साठी 35 कोटी च्या प्रस्तावाला मान्यता
नागपूर शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी सुरू आहे प्रयत्न
या आधी 15 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली टाटा मोटर्स सोबत हा करार झाला आहे
आता आता त्यात आणखी 25 बस ची भर पडणार
-
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या वाढवत आहे प्रशासनाची चिंता
नागपूर ब्रेकिंग –
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या वाढवत आहे प्रशासनाची चिंता
प्रशासन अलर्ट मोड वर
काल 24 तासात 56 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
रुग्ण संख्येत 48 टक्केनी वाढ
297 ऍक्टिव्ह रुग्ण असून सगळे रुग्ण गृहवीलगिकर्णत आहे
24 तासात 2304 चाचण्या करण्यात आल्या
Published On - Jun 19,2022 6:36 AM