Maharashtra News Live Update : राष्ट्रवादी-भाजपमध्ये टशन, मोदी येणार त्याच दिवशी अजितदादांचा मेळावा
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज मंगळवार 1 मार्च 2022. आज महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिव मंदिरांमध्ये पूजा-अर्चा केली जाणार आहे. परंतु कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही बहुतांश मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आपण राजकीय, सामाजिक यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आझाद मैदानातील उपोषण मागे घेतले. परंतु मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर युद्धभूमी युक्रेनमधून अनेक भारतीय विद्यार्थी मायभूमीत परत येत आहेत. यासारख्या विविध स्तरातील बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
सोलापुरात जबरी चोरी
सोलापुरात दोन व्यावसायिकांच्या घरात घरफोडी
28 तोळे सोने लंपास
-
मुलाची पबजी खेळाच्या भांडणातून हत्या
ठाण्यातील 20 वर्षीय मुलाची पबजी खेळाच्या भांडणातून हत्या
– आरोपी तरुणाने चाकूने केला आपल्याच मित्राचा खून
– ठाण्यातील वर्तक नगर परिसरात घडली घटना, पोलिसांनी 3 आरोपीना केली अटक
– मृत तरुण साहिल जाधव आणि आरोपी यांच्यात पबजीच्या खेळातून काही दिवसापूर्वी वाद झाल्याने तोच राग लक्षात ठेऊन आरोपीने केला खून
– मुख्य आरोपी प्रणव माळीसह, अल्पवयीन दोघांना पोलिसांनी केली अटक, तर 2 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधार गृहात केली रवानगी….
-
-
राज्यपालांविरोधात शिवसेना आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भगतसिंग कोशारी यांचा निषेध शिवसेना भवन इथे शिवसैनिकानी घोषणा देऊन केला
प्रतीकात्मक भगतसिंग कुशारी यांचा वध करताना मावळा दाखवण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला
वेळ आली तर आम्ही मराठी माणूस आणि छत्रपतींचा मावळा काय करू शकतो हे आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केल्याची भावना शिवसेनेच्या उपनेत्या, नगरसेविका विशाखा राऊत यांनी व्यक्त केलीय
भगतसिंग कोशारी यांना इतिहास माहिती नाही, त्यासाठी त्यांना इतिहासाची पुस्तके आम्ही पाठवणार होता अशी माहिती विशाखा राऊत यांनी दिली
-
गिरीश महाजन यांच्या मतदार संघात राज्यपालांचा पुतळा जाळला
राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर जामनेर मध्ये शिवप्रेमी आक्रमक
जामनेर मध्ये राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा जाळला पुतळा
राष्ट्रवादी व शिवभक्तांच्या वतीने राज्यपाल यांच्या विषयी रोष व्यक्त करत राज्यपाल यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा जाळण्यात आला
राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला
-
मंत्री नवाब मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला
मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक
जळगावात भाजपतर्फे घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
-
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यात परिसंवाद मेळावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यात परिसंवाद मेळावा,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा घेणार मेळावा
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात दिग्गजांची हजेरी,
6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची पुण्यात हजेरी,
महापालिका निवडणुकीचं दोन्ही पक्ष एकाच दिवशी फुंकणार रणशिंग ..
-
आमदार रवी राणा यांची माहिती
मी कुठेही गायब झालो नाही मी मुंबई मध्ये आहे ;आमदार रवी राणा…
मी अधिवेशनात जाणार आहे..
माझ्या वर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार आहे .
-
नारायण राणे Live
– मुंबईहून इथे यायला जेवढा वेळ लागला, तेवढाच वेळ इथल्या भाषणाला लागला
– राजकारण आणि उद्योग वेगळे ठेवले तर रिझल्ट मिळतो
– माझे पक्षाचे लोक आल्यानंतर त्यांचं काम करायचं हे माझं काम
– माझ्या नेत्यांना काय लागत, त्यांना काय पाहिजे याचा विचार करणारा मी
– मी येणार म्हणून कमिशनर पळून गेले
– त्यांनी उपस्थित रहायला पाहिजे होतं
– काही जणांनी कमिशनरला वेगळंच सांगितलं
– या पक्षात मी 40 वर्ष काढले
– मात्र सगळे कॉन्ट्रॅक्ट चे काम शिवसेनेच्या लोकांनी घेतले
– नानारला विरोध केला
– सगळ्या जमिनी शिवसैनिकांनी घेतल्या
– याला शिवसेना म्हणतात
– विमानतळावेळी आंदोलन केले
– योगायोगाने सत्ता तीन पक्षांची आली
-
एकनाथ खडसे
राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया
राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य अत्यंत दुर्देवी आहे
राज्यपालांनी छत्रपतींबाबत अभ्यास करून वक्तव्य करायला हव होतं
अभ्यास करून त्यांनी वक्तव्य केलं असतं तर अधिक उचित आणि दिशादायक झाले असते
आता ते म्हणतात यावर अभ्यास करतो आधीचं अभ्यास करायला हवा होता
राज्यपाल महोदयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली असती तर त्यांचं मोठेपण दिसून आलं असतं
अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी राज्यपालांवर केली
-
उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकणार नाहीत : किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
– राज्य सरकारने काल जनतेला कळवलं की नील सोमय्या निर्दोष आहे, त्यांना मुंबई पोलिसांनी निर्दोष ठरवलं नाही तर त्यांची बदली केली,
– संजय राऊत तुम्ही नौटंकीबाज आहेत हे कबूल करा, कसला गेम बिगीन, इडीने बंदूक दाखवली तो डेकोरेटर कुठे आहे…
– पेड मीडिया एजन्सी सल्ला देते, मोदी सरकार मागे लागलीये असं दाखवण्याचा प्रयत्न, पोलीस कमिश्नरची हकालपट्टी का केली ते सांगा?
– उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी किरीट सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाहीत, मेधा सोमय्या, नील सोमय्यांवर कारवाई करू शकणार नाही, घोटाळे ऊद्धव ठाकरे करतात…
-
भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावं : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर –
भारतीयांचा जीव कसा धोक्यात घालावा हे भाजपकडून शिकावं
भाजपकडून धार्मिक राजकारण केले जाते
युक्रेनमधून भारतीयांना आणण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
भाजपकडे कुठलीही फॉरेन पॉलिसी नाही
इतर देशांनी त्यांच्या नागरिकांसाठी महिनाभर प्रयत्न केले, पण भारत सरकारने ती पाऊल उचलले नाहीत
-
नवाब मलिक हटाव देश बचाव, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– भाजपाने देशभक्तीच्या उद्देशाने अभियान सुरु केलेय, नवाब मलिक हटाव देश बचाव
– सूडनाट्याने आमच्यावर कारवाईचा आरोप महाविकास आघाडी करतेय त्याला खोडून काढण्यासाठी आमचे अभियान
– अनिल देशमुखांवर आरोप झाला यात भाजपचा कोणताही संबंध नाही
– ठाण्याचे आमदार सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला ED ने कारवाई केली
– वनमंत्री संजय राठोड यांनी मुलीला आत्महत्या करायला भाग पाडले
– हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतले त्यावर आरोप झाले
– नवाब मलिकने सोमय्यांना आयटम गर्ल म्हटले
– राणेंवर कारवाई झाली
– जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली
– यात भाजपने कोठेही तक्रार केलेली नाही..
– नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होतोय
– सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली
– मुनीरा पटेल यांना पैसे न देता मुनीर पटेल आणि शाहवली खान यांनी कुलमुख्त्यार केले
– यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला त्यामुळे कारवाई झाली .
– विना समन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद केला त्यावर कोर्टाने स्पष्टपणे सांगितले PMLA (१९) ॲक्टनुसार कारवाई केली
– भाजपने नव्हे तर न्यायालयाने मलिकांना कस्टडी दिलीय
– अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले .
– एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा
– गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक अरोपी नव्हेत असा जावई शोध महाविकास आघाडी करतेय
– मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करतायत
– सरकार ST आंदोलन, डॉक्टर आंदोलन करतायत त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही मात्र दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ देतय
-
बँकिंग अर्थतज्ञ पी एन जोशी यांचे निधन
सातारा : बँकिंग अर्थतज्ञ पी एन जोशी यांचे राहत्या घरी निधन92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासबँक ऑफ इंडियाचे ते आधिकारी होते1991 साली युनायटेड वेस्टर्न बँकेचे ते चेअरमन म्हणून 11 वर्षे काम पाहिलेनिवृत्तीनंतर युनायटेड वेस्टर्न बँक अडचणीत आलीयुनायटेड वेस्टर्न बँक आयडीबीआयमध्ये विलिनीकरण होत असताना त्यांनी बँक स्वतंत्र रहावी म्हणून प्रयत्न केलेनंतरच्या काळात सारस्वत को-ऑप बँकेचे संचालक म्हणूनही काम पाहिले -
युक्रेनहून भारतीयांना परत आणण्याची मोहीम शिवसेनेने सुरु केली का? राणेंचा टोला
आज मिशन गंगा अंतर्गत 182 विद्यार्थी परत आले आहेत, त्याचा मला आनंद आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये भारतीय अडकले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम दिलाय, विमान लँड झाल्यानंतर विमानात जाऊन भेटलो, विद्यार्थी भयभीत झाले असून काही मुली घाबरल्या होत्या. त्यांचं स्वागत केलंय, त्यांचं मनोबल वाढवलंय, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे… पालकही भेटलेयत, बोलणं झालं, काय त्रास झाला सगळं सांगितलं, त्यांना देशात पोहोचल्याचं समाधान आहे, असं नारायण राणेंनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी कधी चांगलं म्हटलं आहे का. युक्रेनहून इथे लोकांना आणण्याची ही मोहीम काय शिवसेनेनं सुरू केली का? हा माणूस शुद्धीत असतो का? भारत सरकारने चार मंत्र्यांची नेमणूक केलीये, मला इथे पाठवलं, लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काही काम नाही, असा घणाघातही राणेंनी केला.
-
केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्रातच काम : संजय राऊत
चिखल फेकणाऱ्यांचे हात किती बरबटले आहेत, ते देशाला कळायला हवं : संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्रातच काम, महाराष्ट्र आणि प. बंगालमध्ये कारवाया : संजय राऊत केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या दोन-चार जणांना हाताशी धरुन काय करत आहेत, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली आम्हा सगळ्यांचे फोन टॅप कोणाच्या आदेशाने केले? : संजय राऊत
-
सोलापूर : राज्यपालांविरोधात आंदोलन, शिवसेनेच्या 8 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
सोलापूर : राज्यपालांविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 8 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
– जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांसह विद्यार्थी जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल
– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत बेकायदा आंदोलन केल्याबद्दल गुन्हा दाखल
– छत्रपती शिवाजी महाराज चौकात केले होते आंदोलन
-
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा प्रकरणात सातवी अटक
नागपूर महापालिकेतील स्टेशनरी घोटाळा प्रकरणात आणखी एकाला अटक
वरिष्ठ लिपिक सानिस गोखे याला करण्यात आली अटक
गोखे याचा घोटाळ्यात सहभाग असल्याचं तपासात पुढे आलं
या प्रकरणातील ही सातवी अटक आहे
महापालिकेतील 67 लाख रुपयांचा स्टेशनरी घोटाळा चांगलाच गाजत आहे
-
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला जाणार
– फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार
– त्यांनंतर पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार
– नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे तब्बल 60 दिवस फोन टॅप केल्याच फिर्यादीमध्ये नमूद
– या प्रकरणात तत्कालीन अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्तसह, उपायुक्त असण्याची शक्यता…
– फोन टॅपिंग प्रकरणी 26 नोव्हेंबरला रश्मी शुक्ला यांच्याविरोधात झाला गुन्हा दाखल
-
पिंपरी चिंचवड पोलीस दलात 720 पोलीस शिपाई पदांसाठी भरती
-पिंपरी चिंचवड पोलीस दलात 720 पोलीस शिपाई पदांसाठी भरती घेण्यात आली
-या परीक्षेत काही परीक्षार्थींनी गैरप्रकार केला. यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवत उर्वरित 686 उमेदवारांची निवड यादी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जाहीर करण्यात आलीय
-ही प्रतिक्षायादी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या www.pcpc.gov.in आणि महाराष्ट्र पोलिसांच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
-
पिंपरी चिंचवड शहरात दहावी-बारावीच्या परीक्षेची तयारी
पिंपरी चिंचवड शहरात बारावीची परीक्षा चार मार्चपासून तर 15 मार्चपासून दहावीची परीक्षा
-संपूर्ण शहरात दहावीसाठी 45 मुख्य केंद्र ,तर 95 उपकेंद्र आहेत आणि बारावी च्या परिक्षेसाठी 19 मुख्य केंद्र ,तर 86 उपकेंद्र आहेत
-बारावीसाठी शरीरातील एकूण 17 हजार 490 विद्यार्थी संख्या तर दहावीसाठी 20 हजार 700 विद्यार्थी संख्या
-
नागपूर मनपा – काँग्रेसच्या इच्छुकांसाठी उमेदवारी अर्जाच्या शुल्कात कपात
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांना उमेदवारी अर्जासाठी काँग्रेसने 10 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता
त्यात आता काँग्रेसने कपात करण्याचा निर्णय घेतला
आता सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांना 7500 तर आरक्षित वर्गातील इच्छुकांना 4 हजार डिपॉझिट द्यावे लागणार
इच्छुक उमेदवारांना मिळणार काहीसा दिलासा
इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता
-
नागपुरातील आपली बसच्या 91 बस निघणार भंगारात
नागपुरातील आपली बसच्या 91 बस निघणार भंगारात
वाहन स्कॅपेज पॉलिसी धोरण अंतर्गत 15 वर्ष जुन्या बसची पुनर्नोंदणी बंद करण्यावर विचार सुरु
असे झाल्यास 326 बस पैकी 91 बस पुढील महिन्यात भंगारात निघणार
याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता
-
दहावीतच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, नाशकात मुख्याध्यापकावर गुन्हा
– दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काठीने अमानुष मारहाण
– नाशिकच्या जेलरोड परिसरातील स्कॉटिश अकॅडमीमधील धक्कादायक प्रकार
– शाळेच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण
– वर्गात खिडकीची काच विद्यार्थ्यांकडून फुटल्याने मारहाण केल्याचा आरोप
– उपनगर पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकांच्या विरोधात गुन्हा दाखल
-
राज ठाकरे होणार आजोबा
Amit Raj Thackeray | ‘शिवतीर्था’वर पाळणा हलणार, राज ठाकरे होणार आजोबा https://t.co/oIYW4LP645 #RajThackeray | #AmitThackeray | #MNS | @mnsadhikrut | @RajThackeray | @rahul_zori
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 1, 2022
-
नांदेडच्या सरकारी हॉस्टेलमध्ये राडा, नऊ विद्यार्थ्यांवर गुन्हा
नांदेड जिल्ह्यातील इस्लापुर इथल्या सरकारी हॉस्टेलमध्ये राडा घालणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. किरकोळ वादातून हॉस्टेल मधल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात परवा जोरदार हाणामारी झाली होती. या दरम्यान अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल मधल्या फर्निचर आणि पाच मोटारसायकलची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. या प्रकरणी आदिवासी हॉस्टेलच्या प्राचार्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून इस्लापुर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेतायत.
-
संभाजीराजेंच्या मागण्या मान्य, सकल मराठा समाजाचा जल्लोष
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सकल मराठा समाज खेड तालुका यांच्या वतीने राजगुरुनगर येथे फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
-
परळीतील वैजनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी
महाशिवरात्रीनिमित्त बीडच्या परळी येथील प्रभू वैजनाथाचे मंदिर सज्ज झाले आहे. सलग दुसऱ्या वर्षी वैजनाथ मंदिराची यात्रा रद्द करण्यात आलीय. केवळ दर्शनासाठी मध्यरात्री बारा वाजल्यापासून मंदिर खुले करण्यात आलंय. तर सायंकाळी सात वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंदिरात प्रभू वैजनाथाची महापूजा पार पडणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आलीय. मंदिर परिसरात 104 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जातेय. 20 पोलीस अधिकारी, दीडशे पोलीस कर्मचारी, 100 होमगार्ड आणि आरसीपीची तुकडी तैनात करण्यात आलीय. महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैजनाथाचे दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविकांनी गर्दी केलीय.
-
नाशिक : महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी
नाशिक -महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची गर्दी
संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
तब्बल 2 वर्षांनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले
आज महाशिवरात्री निमित्त मंदिरात विशेष महापूजेचे आयोजन
-
अकोल्यात महाशिवरात्री निमित्त राजराजेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई
अकोला शहराचे आराध्य दैवत म्हणून नावलौकिक असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवा निमित्त मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आलेली असून दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात भाविकांचा जनसागर उसळणार आहे. अकोला शहरातील राजराजेश्वाराचे मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर असून मंत्रिरात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी राहणार आहे
-
भीमाशंकर ज्योतिर्लिंग दोन वर्षांनी भाविकांसाठी खुले
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर दोन वर्षानंतर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली तर शिवमंदिर आणि सभामंडप विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आला आहे. दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भाविकांना श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी खुले करण्यात आले असुन आज महाशिवरात्रीचा उत्साह भाविकांमध्ये पहायला मिळत असुन आज मंदिर रात्री आणि दिवसभर दर्शनासाठी खुले रहाणार आहे.
-
महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठल मंदिर बेलपत्राच्या पाना-फुलांनी सजले
महाशिवरात्र असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर महादेवाच्या आवडीच्या बेलपत्राच्या पानाने आणि शेवंती, मोगरा, झेंडू अशा विविध पाना-फुलांनी सजवले आहे. ही सजावट श्री विठ्ठल भक्त कोळी यानी केली असून या सजावटीसाठी जवळपास एक टन बेलपत्राच्या पाना फुलांचा वापर करण्यात आला आहे. देवाचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच रुक्मिणी मातेचा गाभारा सुंदर असा पांढऱ्या शेवंतीच्या फुलांनी आणि बेलपत्रांने सजवण्यात आला आहेय तसेच विठ्ठलाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले आहे. तर रुक्मिणीमातेला दुधाळ रंगाची साडी परिधान करण्यात आली आहे त्यामुळे सावळ्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. -
महाशिवरात्रि निमित्त भंडारा जिल्ह्यात भरणाऱ्या प्रसिद्ध गायमुख यात्रा रद्द
भंडारा जिल्ह्यातील प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या गायमुख देवस्थान येथे दरवर्षी माघ महिन्याच्या माघ कृष्ण चतुर्दशीला मोठ्या प्रमाणात महाशिवरात्रीची यात्रा भरत असते. महाशिवरात्रीच्या पाच दिवसापूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातीलच नव्हे तर बाजूच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड व पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यातील भाविक भक्तसुद्धा मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. दोन वर्षांपासून कोरोनाचा पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द झाली होती. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता भंडारा जिल्हा प्रशासनाने यात्रेला स्थगिती दिली आले.
-
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीचा रुद्राभिषेक
अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री 12 वाजता अंबरनाथ गावातील शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने शिवमंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती केली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलंय. त्यामुळं भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये, तसंच भाविकांनी घरीच भोलेनाथाची पूजा करावी, असं आवाहन मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी केलं आहे.
Published On - Mar 01,2022 6:16 AM