Maharashtra News Live Update : संदीप राऊत माझा नातेवाईक नाही, गुन्हा दाखल करण्याचा ऊर्जा विभागाला आदेश – नितीन राऊत

| Updated on: May 14, 2022 | 5:48 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : संदीप राऊत माझा नातेवाईक नाही, गुन्हा दाखल करण्याचा ऊर्जा विभागाला आदेश - नितीन राऊत
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज शुक्रवार 6 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. देशातील उष्णतेच्या लाटेबाबत दिल्लीत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. उष्णतेच्या लाटेबाबत उपाययोजना करा मोंदीनी आदेश दिला आहे. उष्णतेच्या लाटे मूळे होणाऱ्या मृत्यूंबाबत पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. मे महिन्यात देशात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. आठवड्याभरात केंद्र सरकार देशातील राज्य सरकारांना सूचना करण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 May 2022 08:45 PM (IST)

    वाळू शिल्पातून tv9 मराठीला शुभेच्छा

    वाळू शिल्पातून tv9 मराठीला शुभेच्छा सलग 12 आठवडे नंबर वन राहिलेल्या tv9 मराठी चॅनलला प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वेंगुर्ले-आरवली वाळूशिल्पातून देण्यात आल्या शुभेच्छा, महाराष्ट्राचे नंबर वन चॅनल अशा आशयाचे साकारले वाळूशिल्प.

  • 06 May 2022 08:41 PM (IST)

    उपहारगृह, रेस्टॉरंट परिसरामध्ये अन्न सुरक्षा दर्शक फलक लावण्याचे आवाहन

    उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात प्रवेशद्वाराच्या बाहेर अन्न सुरक्षा दर्शक ए-३ आकाराचे कार्डबोर्ड फलक लावण्याचे आवाहन

    अन्न सुरक्षा दर्शक ए-३ आकाराचे कार्डबोर्ड फलक उपहारगृहामध्ये लावणे केंद्रशासनाने बंधनकारक फलक न लावल्यास प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 नुसार कायदेशीर कारवाई उपहारगृह, रेस्टॉरंट चालकांनी उपहारगृहाच्या परिसरामध्ये दर्शनी भागात अन्न सुरक्षा दर्शक फलक लावण्याचे अन्न व औषधप्रशासन सहआयुक्त शि.स.देसाईंकडून आवाहन

  • 06 May 2022 08:33 PM (IST)

    बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीविरोधात दाखल केलेल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

    बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीविरोधात दाखल केलेल्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या

    राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं नव्हतं मात्र या मागचा उद्देश काय हे कळण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती

    राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचा हा अधिकार असला तरीही यामुळे नागरिकांची मात्र अडचण होऊ शकते

    एक सदस्यीय प्रभाग पद्धती असावी अशी मागणी होती

    मात्र हायकोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत

    कोणत्या कारणावरून याचिका फेटाळल्या यासंदर्भात कोर्ट ऑर्डर रिलीज करणार असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले

  • 06 May 2022 07:58 PM (IST)

    अजित पवार

    – मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचे उदघाटन करणार होते मात्र काही अडचण आली म्हणून थांबले, लवकरच त्याचे उद्घाटन होणार

    – उत्तर भारतीयांना चले जावं म्हंटल या पठ्ठ्याने आणि सर्व बांधकाम थांबलीत,

    – खळ खट्टयाक कुणाला म्हणता येईल, त्याने रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का

    – आता अयोध्या दौऱ्याला यायचं असेल तर माफी मागावी लागेल असे कुणी तरी।म्हटलंय, मला त्यात पडायचं नाहीय

    – भोंग्याचा मुद्दा हाती घेतलाय आणि शिर्डीची काकड आरती भोंग्याविना होतेय

    – भगवे कपडे घालायचे आणि कुणी तरी मोठं होऊन गेलीत त्याचं अनुसरून करायचं

    – शरद पवारांवर काहीजण टीका करत असतात, मात्र पवार साहेब कुठल्या प्रकारचे जातीपातीचे राजकारण करत नाहीयत

  • 06 May 2022 07:20 PM (IST)

    अजित पवार 

    – कायदा सुव्यवस्था अडचणीत आणण्याचं काम कुणी करू नये,

    – अल्टीमेटम देण्याचं काम करू नका? सत्ताधारी असो की विरोधक

    – राष्ट्रवादीचा असला तरी कारवाई करायला लावणार

    – टोल हटाव आंदोलन केले आणि टोल तिथेच राहिलेत, पुढे काय झालं, हायवे चांगले पाहिजे असतील तर टोल द्यावा लागेल

  • 06 May 2022 07:16 PM (IST)

    पुणे

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

    खाजगी कामानिमित्त करणार पुणे दौरा

  • 06 May 2022 07:06 PM (IST)

    अजित पवार 

    – अनेकांनी धरणासाठी कॅनॉलसाठी जमिनी दिल्यात,

    – कवडीमोल भावाने जमिनी त्यावेळी दिल्यात,

    – मात्र आम्ही आल्यावर त्यात बदल केला,

    – आजही आपण शाहू ,फुले आंबेडकरांची नाव घेत असतो

    – काहीजण बोलत असतात, ज्याला आगा ना पिच्छा असतो,

    – मात्र त्याकडे लक्ष देऊ नका

    – आपला कायदा, संविधान या मार्गाने पुढे गेलो तर भारत एकसंघ राहु शकतो

  • 06 May 2022 06:27 PM (IST)

    पुणे

    – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा,

    – महादेवराव बदडे उद्यानाच्या विद्युत नामफलकाचा उदघाटन सोहळा

  • 06 May 2022 05:59 PM (IST)

    संजय राऊत

    शिवसेनेसाठी अयोध्या नवीन नाही

    मविआ सरकार पाडण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न

    मविआ सरकार पडण्याच्या तारखांवर तारखा दिल्या

    केंद्र सरकार सूड भावनेने वागत राहिलं

    विरोधक सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घालून बसलेत

    इतर सर्व निवडणुका मविआ एकत्र लढणार

    भविष्यात आढळराव पाटील संसदेत असतील

  • 06 May 2022 05:31 PM (IST)

    पुणे

    एमपीएससी आयोगाच्या अनागोंदी कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

    एमपीएससी गट ब संयुक्त पुर्व परीक्षा 2021 ची उत्तरतालिका आज प्रसिद्ध झालीये

    आयोगानं 8 प्रश्न रद केलेत आणि 3 प्रश्न बदलून देण्यात आलेत

    या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे

    मार्क कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे

    गट ब 1 हजार पदासाठी ही भरती होतीये

  • 06 May 2022 05:09 PM (IST)

    एकनाथ शिंदे बाईट

    – केडीएमसीत विकासाची कामे होतायत. त्यामुळं सेनेवर विश्वास ठेवून ते प्रवेश करतायत. ही काही फोडाफोडी नाही. यापूर्वी भाजपच्या काही नगरसेवकांनीही प्रवेश केलाय.विकासावर त्यांचा विश्वास आहे.अजूनही काही येतील.

    गजानन पाटील, तालुकाप्रमुख

    – सेनेचे विकासाचे काम सुरूय.बदललेल्या भूमिकेमुळं नव्हे तर विकास होईल असं वाटतंय, त्यामुळं प्रवेश केला

    श्रीकांत शिंदे,खासदार

    – भाजपच्या अनेक नगरसेवकांनी प्रवेश केला..गजानन पाटीलसह मोठ्या लोकांनी प्रवेश केलाय.येणा-या काळातही प्रवेश होतील.

  • 06 May 2022 04:48 PM (IST)

    चंद्रपूर

    हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो : मुनगंटीवार

    हनुमान चालीसा म्हणणे हा काही राजद्रोहाचा गुन्हा असू शकत नाही.

    राजद्रोहाचा गुन्हा केव्हा लागतो, हे पोलिसांना ठाऊक असायला हवे. पण राजा काहीही करू शकतो,

    तसेच सरकारही करू शकते, असेच म्हणावे लागेल. मात्र हा प्रकार काही बरोबर नाही. पोलिसांनी लावलेला गुन्हा न्यायालयाने काढून टाकला.

    ज्या पोलिसांनी हे केले, त्यांची जेव्हा केव्हा चौकशी होईल, तेव्हा या पोलिसांना तडीपार व्हावे लागेल,

    एवढे मात्र नक्की, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राणा दाम्पत्याच्या संदर्भात दिली.

  • 06 May 2022 04:47 PM (IST)

    कोल्हापूर

    उदय सामंत प्रेस

    शाहू गौरव ग्रंथ 10 हजार विद्यार्थ्यांपर्यत पोहचवणार

    शिवाजी विद्यापीठ च्या परीक्षा ऑफ लाईन होणार

    शिणोली इथं अभ्यासक्रम सुरू झालेत

    भविष्यात स्वतःच्या जागेत करण्यासाठी

    मास्टर शिक्षणासाठी सीमा भागातील विदयार्थी आले तर त्यांना वसतिगृहात फी सवलत मिळणार आहे …………………

    बाळासाहेब देसाई अद्यासनाला 3 कोटी निधीला मंजूर

    36 लाखाचा चेक दिला आहे

    विद्यापीठाच्या समस्या जाणून घेण्यासाठी वर्षभर उपक्रम घेतला

    या अंतर्गत 300 ते 400 अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या दिल्या हे या उपक्रमाच यश ……………..

    On राणा

    न्यालायलाने दिलेल्या निर्णयाच पालन करण आमची जबादारी

    त्याचा आदर करत शासन पालन करेल

    पण जे लोकप्रतिनिधी कायदा बिघडवत त्यांनी हे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्यावे

    स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी अशी कृत्य करू नयेत ………………

    On शिवसेना इन्कमिंग

    ज्या महानगरपालिका क्षेत्रांत निवडणूक आहेत तिथे फक्त मनसेच नाही तर आमच्या मित्र पक्षां मधील लोक ही सेनेत येण्यास इच्छुक आहेत

    अनेक ठिकाणी अन्य पक्षातील माजी आमदार नगरसेवक सेनेत येत आहेत

    महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना एक नंबर चा पक्ष असेल

    आघाडी बाबत मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो आम्हाला बंधनकारक असेल

    …………

    On पडळकर

    आपण कोणावर टीका करतो याच भान असलं पाहिजे

    टीका केल्यावर हेडलाईन होते

    उद्धव साहेब आणि पवार साहेबांच्यावर होणारी टीका स्वतःचा टीआरपी वाढण्यासाठी असते

    या पेक्षा वेगळा उद्देश त्या मागे नसतो

  • 06 May 2022 02:37 PM (IST)

    माझ्या नावाचा वापर करणारा संदीप राऊत माझा नातेवाईक नाही – नितीन राऊत ऊर्जामंत्री

    – माझ्या नावाचा वापर करणारा संदीप राऊत माझा नातेवाईक नाही

    – संदीप राऊत वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ऊर्जा विभागाला दिलेय

    – आडनावात साम्य असलं म्हणुन तो माझा नातेवाईक होत नाही

    – संदीप राऊत नावाच्या व्यक्तीशी मी कधीही भेटलो नाही

    – राज्यात वीज निर्मितसाठी कोळशाची टंचाई कायम

    – नाशिक, कोराडी, पारस, येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त दीड दिवसांत कोळसा

    – भुसावळ येथील महाजेनकोच्या प्लान्टमध्ये फक्त अडीच दिवसांत कोळसा

    – कोळसा टंचाई आहे, पण योग्य नियोजन करतोय

  • 06 May 2022 02:21 PM (IST)

    आम्ही नसताना BMC पथक दोन वेळा घरी येऊन गेले – रवी राणा

    नवनीत जींची तबियत मध्ये पेन आहे

    मी जेल मध्ये असताना माझ्या घराला BMC ने नोटीस लावली आहे. नवनीत जी लीलावती रुग्णालयात आहेत..

    आम्ही नसताना BMC पथक दोन वेळा घरी येऊन गेले

    त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी मी घरी आलो होतो.. पण दुपारी दीड वाजेपर्यंत कोणीही आले नाही..

    मला नवनीत जी ची तबियत महत्वाची आहे त्यामुळे मी आता लिलावतीला निघालो आहे..

    आमच्या सोबत द्वेषाचे राजकारण चालू आहे..

    ज्या बिल्डिंग मध्ये मी घर घेतले आहे. त्या इमारतीची बिल्डर ने पूर्ण परवानगी घेतली आहे.. त्यांना जे मेजरमेन्ट घ्यायचे ते त्यांनी घ्यावे आमची हरकत नाही..

    सध्या पावर चा दुरुपयोग सुरू आहे. त्यांनी कितीही द्वेषाचे राजकारण केले तरी आम्ही सर्व सहकार्य करायला तयार आहोत

    जेल प्रशासन ने नवनीत जिला सहकार्य केले नाही. त्यांची ताबियायत खराब होती.. आताही त्यांना पेन आहे.. काही रिपोर्ट करणे सुरू आहे.

  • 06 May 2022 01:46 PM (IST)

    इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या

    इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येण्यासाठी हरकती व सूचना मागविल्या

    मुंबई दि ६ : इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात यावी यादृष्टीनं राज्य शासनाने पाऊले टाकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने प्राथमिक उद्घोषणा करून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

    कोल्हापूर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून नागरी क्षेत्र आणि लोकसंख्याही वाढली आहे. सध्या केवळ कोल्हापूर महानगरपालिका असून खासदार धैर्यशील माने आणि इतर लोकप्रतिनिधींची इचलकरंजी महानगरपालिका करण्यासंदर्भात मागणी होती.

  • 06 May 2022 01:45 PM (IST)

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगरसेवक व पदाधिकारी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    • मा. नगरसेवक आणि नगरसेविका

    १) सौ. पूजा गजानन पाटील, माजी नगरसेविका, घारीवली, काटई, उसरघर २) श्री. गजानन पाटील, मनसे तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ३) श्री. प्रकाश माने, माजी नगरसेवक तथा जिल्हा सचिव, मनसे

    • पदाधिकारी

    १) श्री. सुभाष तुकाराम पाटील, विभाग अध्यक्ष, मनसे २) श्री. पांडे अण्णा, उप विभाग सचिव, मनसे ३) श्री. निशांत पाटील, शाखा अध्यक्ष, मनसे ४) श्री. भास्कर गांगुर्डे, शाखा अध्यक्ष, मनसे ५) श्री. विठ्ठल शिंदे, शाखा अध्यक्ष, मनसे

    • विद्यार्थी सेना, मनसे

    १) श्री. प्रवीण परदेशी, अध्यक्ष, विद्यार्थी सेना विभाग, मनसे २) श्री. संदीप मोरे, शाखा अध्यक्ष, विद्यार्थी सेना विभाग, मनसे

  • 06 May 2022 01:44 PM (IST)

    नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जेलरनं इंग्रजासारखी वागणूक दिलीय – किरीट सोमय्या

    नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जेलरनं इंग्रजासारखी वागणूक दिलीय

    मी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली

    शेड्युल कास्ट मधून आलेल्या नवनीत राणांवर राजद्रोहावर आरोप केला.

    कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की, राजद्रोहाचा १२४ ए सेक्शन सिद्ध होत नाही.

    ज्यांनी राजद्रोह लावण्याचा द्रोह केलाय त्यांना जेल मध्ये टाकले गेले.

    खासदार २२ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करताहेत

    माफियागिरी करणा-या गृहमंत्रीवर कारवाई करणार का ?

    पोलिसांचा माफिया म्हणून वापर करणा-या प्रत्येकावर करावी.

    शरद पवार म्हणतात राजद्रोह कलम काढून टाका आणि गृहमंत्री महिला खासदारावर राजद्रोहाचा कलम लावतात… यावर शरद पवार साहेब माफी मागणार का ?

  • 06 May 2022 01:18 PM (IST)

    ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्या;अमरावती विद्यापीठावर एन एस यु आयचा मोर्चा

    ऑफलाईन परीक्षा रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्या;अमरावती विद्यापीठावर एन एस यु आयचा मोर्चा…

    शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थी धडकले संत गाडगेबाबा बाबा अमरावती विद्यापीठावर..

    मोर्चात प्रदेशाध्यक्ष आमिर शेख मंत्री यशोमती ठाकूर यांची कन्या आकांक्षा ठाकूर यांचा सहभाग..

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

  • 06 May 2022 01:16 PM (IST)

    मनसेचे दोन नगसेवक मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार

    मनसेचे दोन नगसेवक मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार

  • 06 May 2022 01:13 PM (IST)

    शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची खताची टंचाई जाणवू देणार नाही – अजित पवार

    माझी सर्व ग्रा्मपंचायतींना विनंती आहे

    रीतसर कारवाई केली जाईल

    खतांची मागणी २२ मेट्रीक टनाची आहे

    शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची खताची टंचाई जाणवू देणार नाही

    पुण्यातील ग्रामपंचायतींनी नियोजन करून काम करावी

  • 06 May 2022 01:08 PM (IST)

    शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलं – उद्धव ठाकरे

    शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात काम केलं

    महाराजांनी आजोबांना बोलावलं होतं

    शाहू महाराजांची किर्ती होती.

    राजा कसा असायला पाहिजे

    सध्या कोणतं पुस्तकं लिहितोय

    तोचं खरा शाहू महाराज होऊ शकतो.

    माझ्या राज्यातले सगळे सुखी असले पाहिजेत

    शाहू महाराज लढले, संघर्ष केला

    हे सगळं करताय ते तुमच्या संस्थानात करा

    म्हणजे आपल्या देशाता काय चाललंय.

    जे काही माझ्या आजोबांकडून ऐकलं आणि वाचतोय

    मी सगळ्यात मोठा हाय

    छत्रपती शाहू महाराजांनी काम केलं

    बाम्हणांच्या विरोधात भाषण केलेली नाही

    ज्या रणभूमीवर मी उभा आहे,

    हा माणूस साधा सुला नव्हता

    छत्रपती शिवाजी महाराजांना ९० वर्षे जगले असते तर या देशाचं काय झालं असतं

    ज्या वृत्तीने महाराजांना छळलं,

    आपण एक निश्चय करूया

    अपेक्षित असलेलं राज्य

    शाहू राजांना विनम्रपणे अभिवादन करतो

  • 06 May 2022 12:37 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या सभांमुळे राज्य सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे

    -राज ठाकरे यांच्या सभांमुळे राज्य सरकारच्या पाया खालची वाळू सरकली आहे

    -यामुळेच सांगली आणि परळी मधून अटक वॉरंट काढण्यात आले आहे

    -जब सरकार हमसे डरती है पुलीस को आगे करती है

    -राणा दाम्पत्याच्या प्रकरणात सरकार तोंड घाशी पडल आहे

    -पोलिसांच्या,सत्तेचा दुरुपयोग करून आमची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जातोय

    -आम्ही या दडपशाही ला आम्ही भीक घालत नाही

    -या सरकारची घटिका जवळ आली आहे याचे हे लक्षण आहे.

  • 06 May 2022 12:35 PM (IST)

    पाण्यासाठी भाजप आणि मनसे चे तीव्र आंदोलन

    पाण्यासाठी भाजप आणि मनसे चे तीव्र आंदोलन

    औरंगाबाद शहरातील सिडको पाणी पुरवठा केंद्रावर आंदोलन सुरू

    आंदोलनात शेकडो कार्यकर्ते बसले ठिय्या देऊन

    अनेक महिला आंदोलनात सहभागी

    भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा कार्यालय केले बंद

  • 06 May 2022 12:35 PM (IST)

    मांजरी ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा

    – मांजरी ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा,

    – पिण्याच्या पाण्यासह,ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वछतागृह अद्याप उपलब्ध नसल्याने मोर्चा,

    – पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट २३ गावात मांजरी गावचा देखील समावेश,

    – महापालिकेकडून सुविधा मिळत नसल्याने मांजरी ग्रामस्थ आक्रमक

    – राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अजित घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 06 May 2022 12:03 PM (IST)

    शाहू महाराज जिथे गेले तिथे तिथे कार्यक्रम घेण्याच माझ वर्षभराच नियोजन – संभाजीराजे छत्रपती

    शाहू महाराजांनी पाहिलं आरक्षण दिल

    शाहू महाराजांनी सर्वांगीण विकास केला

    हे काम जगभर पोहचवण्यासाठी प्रयत्न गरजेचं

    शाहू महाराज जिथे गेले तिथे तिथे कार्यक्रम घेण्याच माझ वर्षभराच नियोजन

    जो आराखडा शाहू मिल चा दाखवला त्यासाठी राज्य सरकार पैसे देतंय

    पण केंद्राची सुद्धा ही जबादारी आहे

    केंद्राने देखील यासाठी फंड दिलाच पाहिजे

    खासदार की टर्म संपताच संभाजीराजेचा भाजप वर निशाणा

    मुंबईत शाहू महाराजच स्मारक झालं पाहिजे

  • 06 May 2022 12:01 PM (IST)

    समाजात दुही पसरविण्याचे काम राष्ट्रवादीने केले

    -समाजात दुही पसरविण्याचे काम राष्ट्रवादीने केले……

    -भीमा कोरेगावरून माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे शरद पवारावर टिकास्त्र……

    -भीमा कोरेगाव दंगलीला संभाजी भिडे जबाबदार…..

    -भिडेनी दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहीत केल्याचा राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांचा खळबळजनक आरोप……

    -भीमा कोरेगाववरून भाजपाचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार आमनेसामने

  • 06 May 2022 12:01 PM (IST)

    राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यानंतर वारकरी मंडळीकडून त्याच्या धोरणाला विरोध होत आहे

    राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय हाती घेतल्यानंतर वारकरी मंडळीकडून त्याच्या धोरणाला विरोध होत आहे. भोंगे बंद ठेल्यास पहाटेची काकड आरती भोंग्या विना होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत. अनेक वेळा कीर्तने ही रात्री 9 ते 11 या वेळेत असतात त्यामुळे त्याचा फटका वारकरी व सप्ताह मंडळानं बसणार आहे, काही बंद झाले तरी काकड आरती महत्वाची असल्याने ती बंद होऊ नये अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली

  • 06 May 2022 11:50 AM (IST)

    सजंय राऊत लाईव्ह

    शिवसेना नेते संजय राऊत लाईव्ह

    आठ मेला उद्धव ठाकरेंची औरंगाबादमध्ये भव्य सभा होणार – राऊत

    राऊतांचा पुन्हा विरोधकांवर निशाणा

  • 06 May 2022 11:38 AM (IST)

    ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत अद्याप काही निर्णय नाही – विजय वडेट्टीवार

    – ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत अद्याप काही निर्णय नाही

    – राज्य सरकारने केलेल्या कायद्याला स्थगिती नाही, पण निवडणूक घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

    – पावसाळ्याच्या आधी महानगरपालिका निवडणूका होण्याची शक्यता दिसत नाही, पण याबाबत अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोगाचा

    – पावसाळ्यात जनरली निवडणुक होत नाही

    – यावर मध्य प्रदेशच्या याचिकेवर निर्णय येण्याची अपेक्षा आहे, तोच निर्णय आम्हालाही लागू होईल

    – विरोधकांच्या तोंडाला झाकन नाही, मर्यादा नाही

    – गवळी आणि वाघच्या मागे नागपूरपासून दिल्ली पर्यॅत ओरडणारे लोक आहेत. पुढे त्यांची नाव उघड करु.

    – राज्य सरकारला ओबीसींच्या बाबतीत बदनाम करण्याचं काम विरोधात करतायत. आन्ही प्रामाणिकपणे लढतोय. भाजपने आरक्षण दिलं का? ओबीसींना जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा केंद्रात आमचं सरकार

    – ओबीसींना आरक्षण देणारेही आम्हीच आणि लढतोय आम्हीच. हे विरोधक उपऱ्यासारखे बोलतात.

    – सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाजू मांडतात का? वकील मांडतात. आणि भाजप यापेक्षा आणखी तोणते वकील लावणार होते

    – पिटीशन वेगळी होती, पण गवळीची पिटीशन पुढे आले. यात अनेकांचे हात आहे. त्यावेळेस उघड करु आम्ही.

    – आता पुढे कसं जायचं याबाबत निर्णय झालाय. पर्याय काय आम्ही शोधतोय.

    – देशातील सहा राज्यात ही स्थिती, तिथे एक कायदा आणि विरोधकांची सत्ता आहे तिथे वेगळा कायदा

    – आम्हाला बदनाम करण्याचं काम झालंय

    – ओबीसींशिवाय निवडणुका होऊ नये, हा प्रयत्न पण सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून

    ……

    On Danave

    – टॅलेंट आहे, महाराष्ट्र चालवू शकेल असा मुख्यमंत्री असावा. जाती पातीचं विष पेरु नये. या राज्यांनी मनोहर जोशी, फडणवीस मुख्यमंत्री झालेय

    – ज्याच्या नशिबी राजयोग आहे, ज्या्ंच्यात महाराष्ट्र चालवण्याची क्षमता आहे. तो मुख्यमंत्री व्हावा. महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल

    …..

    On corona death

    – देशात दिलेल्या आकडेवारीपेक्षा जास्त कोरोना मृत्यू, गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्याचे पुरावे आहे

    – महाराष्ट्राने आकडे लपवले नाही

    – गुजरातमध्ये कोरोना मृत्यूचे आकडे लपवले

  • 06 May 2022 11:36 AM (IST)

    नाशिक महापालकेतील 800 कोटी भूसंपादन प्रकरणात झालेल्या अनियमितेचि मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश – पुणे नगररचना संचालक करणार या प्रकरणाची चौकशी – भाजपच्या अडचणी वाढणार – सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश – पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    -नाशिक महापालकेतील 800 कोटी भूसंपादन प्रकरणात झालेल्या अनियमितेचि मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश – पुणे नगररचना संचालक करणार या प्रकरणाची चौकशी – भाजपच्या अडचणी वाढणार – सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश – पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

  • 06 May 2022 11:31 AM (IST)

    वारकरी संप्रदायाने भोंग्यावरून सरकारला दिला अल्टिमेटम

    वारकरी संप्रदायाने भोंग्यावरून सरकारला दिला अल्टिमेटम

    वारकरी संप्रदाय भोग्यावरून खवळले

    वारकरी संप्रदायाच्या नादी लागाल तर इतिहास घडेल

    आमचे भोंगे कधीही बंद होणार नाही आमच्या भोंग्या वर जर बंदी आणली तर ते चालणार नाही

    हिंदूधर्म जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे हिंदू जागा झाला तर तुमचं चालणार नाही सरकारला वारकरी संप्रदायाचा इशारा

    -भोंगे बंद करणे हा जाणून बुजून या शासनाच्या आपल्या वारकरी संप्रदाय आणलेला गदा आहे

    या राजकारणी लोकांना धर्म नकोय

    -या शासनाला वारकरी संप्रदायाला सुख द्यायचं नाही

    -अनादिकालापासून काकड आरती चालू आहे त्यावर गदा आणू नये

    -आम्हाला परधर्माचा काही घेणेदेणे नाही आमच्या हिंदू धर्माला स्वतंत्र पाहिजे

    -आम्ही कुणाचे ऐकणार नाही *शासन असो किंवा कोणी असो

    आम्ही जे बोलतो तसंच करतो कारण हा महाराष्ट्र शिवरायावर चालतो

    आम्ही या अन्यायाच्या विरोधात लढा देऊ

    सर्व हिंदू समाजाने एकत्र होत लढा देऊ * ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवा

    भोग्या वर बंदी आणू नका आमचे सप्ताह सुरूच राहतील

    काकडा आरती व आमच्या गदा आणू नका

    -वारकरी संप्रदायाच्या कोणी नादी लागू नये -नाहीतर पुढे इतिहास घडेल

    वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रावर गदा आणला तर वारकरी संप्रदाय तुम्हाला दाखवून देईल

    शासनाने लक्षात ठेवावा

    राजकारण्याला सत्ताआणि खुर्ची पाहिजे धर्म नकोय

    आम्हाला भोंगे बंद नकोय ते कोणत्याही धर्माचे असो

  • 06 May 2022 11:30 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दैरा रद्द

    देवेंद्र फडणवीस यांचा परभणी दैरा रद्द ,

    वायरल फिव्हर झाल्याने दौरा रद्द झाल्याची आयोजक आनंद भरोसे यांची माहिती ,

    केंद्रीय मंत्री भागवत कऱ्हाड काहीवेळात होणार परभणीत दाखल ,

    माजी मंत्री बबनराव लोणीकर ही राहणार उपस्थित .

  • 06 May 2022 10:21 AM (IST)

    माझ्या भागातील आवाज हा पुर्णपणे कमी केला आहे – वसंत मोरे

    ठाण्याच्या सभेपुर्वी मला बोलावलं होतं

    संपुर्ण पक्ष पुण्यात होता.

    माझ्या आरती वगैरे झालं नाही

    माझ्या भागातील आवाज हा पुर्णपणे कमी केला आहे

    मी रस्ता चुकतोय का ?

    मी राज मार्गावरती आहे आणि राहिन

    मी अस्वस्थ नाही आहे.

    मागच्या काळात पुण्यात चांगलं केलं आहे

    माझ्या प्रभागात सहा मशिदी आहेत. त्या लोकांना सांगितलं आहे.

    साईकडे त्याची वेगळी जबाबदारी नव्हतो

    नेमका त्या दिवशी मी कुटुंबियासोबत होतो. मला यायला थोडा उशीर झाला.

  • 06 May 2022 09:32 AM (IST)

    कालिचरण बाबा, संभाजी भिडे, राज ठाकरे हे एकाच माळेचे मणी – सचिन खरात

    – कालिचरण बाबा, संभाजी भिडे, राज ठाकरे हे एकाच माळेचे मणी

    – तुमच्या विचाराला महाराष्ट्र राज्यात थारा नाही

    – आरपीआय खरात गटाच्या सचिन खरात यांची टीका

    – सोलापूर दौऱ्यावर आलेल्या कालीचरण महाराजांनी राज ठाकरेंचे केले होते समर्थन

    – कालिचरण बाबा, राज ठाकरे आणि संभाजी भिडे यांना पाठिंबा देतात यात जागतिक आश्चर्य काय आहे

    – एकमेकांना प्रमाणपत्र देणारे हे सगळेच एका माळेचे मणी आहेत

    – मात्र संविधान आणि कायदा पाहिल्यावर पायाखालची वाळू सरकून हे लोक पळकुटे होतात

    – त्यामुळे महाराष्ट्र हा संत तुकाराम महाराज, रयतचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांचा आहे

    – या महाराष्ट्र राज्यात तुमच्या विचाराला थारा नाही हे कायम ध्यानात ठेवा

    – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरातांची टीका

  • 06 May 2022 09:32 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात 2819 मंदिरांपैकी 370 मंदिरांना देण्यात लाऊडस्पीकर वापराची परवानगी 

    जळगाव जिल्ह्यात 2819 मंदिरांपैकी 370 मंदिरांना देण्यात लाऊडस्पीकर वापराची परवानगी

    तर जिल्ह्यात एकूण 663 मशीद पैकी 608 मशीदींना देण्यात आली लाऊड स्पीकर वापरण्याची देण्यात आली परवानगी

    लाऊड स्पीकर ची परवानगी घेण्यासाठी पोलिसांचा तीन दिवसांचा अल्टिमेटम

    3 दिवसानंतर विनापरवानगी लाऊड स्पीकर आढळल्यास होणार कारवाई

  • 06 May 2022 09:31 AM (IST)

    सोलापूर कचरा डेपोतील आग 36 तासानंतरही धुमसतीच आहे

    – सोलापूर कचरा डेपोतील आग 36 तासानंतरही धुमसतीच आहे

    – 3 तारखेला सायंकाळी 7 वा लागलेली आग अद्यापही चालूच

    – जवळपास 150 पेक्षा अधिक पाण्याचे बंब रिकामे झाले मात्र अद्यापही आग आटोक्यात नाहीच

    – 53 एकरावर पसरलेला आहे कचरा डेपो

    – धुराचे लोट अद्यापही सुरुच आहेत

    – आग आटोक्यात आणण्यासाठी पुढील चार दिवस लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे

  • 06 May 2022 09:31 AM (IST)

    दहावी आणि बारावीचा निकाल वेळेतचं लावण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा प्रयत्न

    दहावी आणि बारावीचा निकाल वेळेतचं लावण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा प्रयत्न

    बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात 10 जूनच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे

    तर दहावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात 20 जूनच्या दरम्यान लावण्यासाठी प्रयत्न केले जातायत

    पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात असून वेळेत निकाल लावण्याचा बोर्डाकडून प्रयत्न केला जातोय….

  • 06 May 2022 09:30 AM (IST)

    कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता – गोपीचंड पडळकर

    जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला,

    कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल..

    तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का?

    गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का?

    शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली,ते शेतकरी बहुजन नाहीत का?

    आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी,एसटी ,भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं?

    धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचं कोणत बहुजन धोरणं होतं?

    सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला,

    पण जेंव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात.

    कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता

    .मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या.

    बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही.

    आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता.

    हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही

    कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो.

  • 06 May 2022 09:29 AM (IST)

    भारतातील अतितीव्र उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार

    भारतातील अतितीव्र उष्णतेची लाट आणखी आठवडाभर कायम राहणार

    12 मे पर्यंत उष्णतेची लाट अशीच कायम राहणार

    नासानं विशेष अहवालात अंदाज केला व्यक्त

    नासानं मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यातील उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करून काही छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत

    27 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी 45.9 अंश सेल्सिअस इतक्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली असं नासानं म्हटलं आहे…

  • 06 May 2022 09:11 AM (IST)

    पीएमपीएलएम बसमध्ये प्रवाशांना येत्या काळात मोफत इंटरनेट वापरता येणार

    पीएमपीएलएम बसमध्ये प्रवाशांना येत्या काळात मोफत इंटरनेट वापरता येणार

    त्यासाठी बसमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा बसविण्यास संचालक मंडळाची मान्यता

    त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून ‘स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव’ मागवण्यात आलेत

    पीएमपीएलएमच्या ताफ्यात स्व-मालकीच्या आणि कंत्राटी मिळून दोन हजार बस

    या सर्व बसमध्ये प्रवाशांना ही सुविधा दिली जाणार

  • 06 May 2022 08:29 AM (IST)

    राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची आज स्मृती शताब्दी

    राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची आज स्मृती शताब्दी

    दहा वाजता 100 सेकंद स्तब्ध राहून दिली जाणार शाहुराजांना मानवंदना

    कोल्हापुरातील नर्सरी बागेतल्या शाहूंच्या समाधीस्थळावर दिली जाणार मान्यवरांकडून मानवंदना

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची मानवंदना कार्यक्रमाला ऐनवेळी दांडी

    शाहूप्रेमी मध्ये नाराजीचा सूर

  • 06 May 2022 08:00 AM (IST)

    मंजुरी एका कामाची , विकास काम मात्र दुसरी कडे

    मंजुरी एका कामाची , विकास काम मात्र दुसरी कडे

    विधिमंडळ अनुसूचित जाती जमाती समितीचे सीईओ ना चौकशी करण्याचे दिले आदेश

    दलित वस्ती कामात भ्रष्टाचार ?.

    भ्रष्टाचार झाल्याचा समिती चा सदस्य चा आरोप

    समितीने नागपुरात घेतला आढावा

  • 06 May 2022 07:59 AM (IST)

    वैतरणा धरणाजवळ अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली..

    नाशिक – वैतरणा धरणाजवळ अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली..

    ग्रामीण पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा..

    तीन संशयितांना पोलिसांनी केली अटक

    पूर्ववैमन्सयातून तिघा मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राचा काढला काटा..

    चालत्या गाडीत तिघांनी मिळून चिरला मित्राचा गळा..

    गुन्ह्यात वापरलेले कार तसेच हत्यार देखील हस्तगत

    पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा केला होता प्रयत्न

  • 06 May 2022 07:42 AM (IST)

    नागपूरात ७४ धार्मिक स्थळांचा भोंग्यासाठी पोलीसांकडे अर्ज

    – नागपूरात ७४ धार्मिक स्थळांचा भोंग्यासाठी पोलीसांकडे अर्ज

    – ७४ धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांनी भोंग्याच्या परवानगीसाठी पोलीसांकडे केला अर्ज

    – भोंग्याची परवानगी घेण्याचं, नागपूर पोलिसांनी केलं होतं आवाहन

    – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस भोंग्यांना देणार परवानगी

    – राज ठकरेंच्या इशाऱ्यामुळे शहरातील पोलीस बंदोबस्त कायम

  • 06 May 2022 07:41 AM (IST)

    राज्याच्या उपराजधानीत पुन्हा वाढतेय गुन्हेगारी

    – राज्याच्या उपराजधानीत पुन्हा वाढतेय गुन्हेगारी

    – नागपूरात गेल्या चार महिन्यात २० खुनाच्या घटना

    – चार महिन्यात नागपूरात ८८ बलात्काराच्या घटांमुळे खळबळ

    – जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यातील गुन्हेगारीचं वास्तव

    – २०२१ च्या तुलनेत गुन्हे कमी असल्याचा पोलीसांचा दावा

    – २० पैकी १२ खुन कौटुंबिक किंवा नातेवाईकातील कलहामुळे

  • 06 May 2022 07:41 AM (IST)

    त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली.

    राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 11 मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

    अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलतर्फे घेतली जाते. एमएचटी-सीईटी, एमबीए, एमसीए, पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळण्याबाबतच विद्यार्थी आणि पालकांकडून मागणी होत होती.

    त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार

  • 06 May 2022 07:40 AM (IST)

    गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास जूनअखेरपर्यंत मुदतवाढ

    -गुंठेवारीनुसार बांधकामे नियमित करण्यास जूनअखेरपर्यंत मुदतवाढ

    -पिंपरी-चिंचवड शहरातील 31 डिसेंबर 2020 पूर्वीची अनधिकृत बांधकामे गुंठेवारी पद्धतीने नियमित करण्यासाठी अर्ज करण्याकरिता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय

    -30 जूनपर्यंत नागरिकांना अर्ज करता येतील,अशी माहिती बांधकाम परवानगी विभागाकडून देण्यात आलीय

    -दरम्यान 20 डिसेंबर 2021 पासून चार महिन्यात नियमितीकरणासाठी केवळ 950 अर्ज आले आहेत

    -नागरिकांनी पाठ फिरवल्याने मुदतवाढ देऊनही योजनेला वेग येत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

    -शहरात एक लाख हुन अधिक अनधिकृत बांधकामे आहेत, काही कागद पत्रांची पूर्तता करत ती नियमित करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे मात्र त्याला प्रतिसाद दिसत नसल्याचे चित्र आहे

  • 06 May 2022 07:11 AM (IST)

    कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणाचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर दिला

    कुख्यात गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणाचा निकाल जिल्हा सत्र न्यायालयाने अखेर दिला

    या खून खटल्यातील 6 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली

    तर मुख्य आरोपी गोरख बबन कानकाटेसह 9 जणांची निर्दोष मुक्तता

    28 मे 2015 रोजी कुख्यात गुंड आप्पा लोंढे याची उरुळी कांचन परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती

    या प्रकरणी 15 जणांवर पोलीसांनी आरोपत्र दाखल केले होते

  • 06 May 2022 07:10 AM (IST)

    नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यांवर तुरूंगात जे इंग्रजांच्या काळातील अत्याचार आठवले

    – नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यांवर तुरूंगात जे इंग्रजांच्या काळातील अत्याचार आठवले, ते दिल्लीत नेत्यांना ब्रिफ करणार…

    – ठाकरे सरकारच्या विरोधात केलेल्या आरोपांचा जो तपास सुरू आहे त्याला गती मिळावी यासाठी पाठपूरावा करणार…

    – दृष्टीकोन हे पाॅलिटिकल शब्द, सर्वसामान्यांना वाट्टं की एका दलित खासदारांवर ऊद्धव ठाकरे यांनी जातीने अत्यंचार केला हे सगळं बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात ऊद्धव ठाकरे यांना शोभणारं नाही…

    – हो मग ७ कोटी रुपये नंदकिशोर चतुर्वैदीने कशा प्रकारे मनी लाॅंड्रींग करून आदीत्य ठाकरेंच्या खातेयात टाकले त्याचं ऊत्तर द्या…संजय राऊतांमध्ये हिंम्मत नाही,

    – स्वता संजय राऊत यांच्या गाड्या, यांचे विमानाचे तिकीट, फाॅरेन वार्या, हे सगळे प्रविण राऊत यांच्या कंपनीतून येत होती, प्राॅपर्टी अटॅच झाली ना…

    – भगवा हा छत्रपती शिवरायांच्या काळातला… हिंदुत्वाचा भगवा आहे, हे त्याला हिरवा करत आहे, त्यांना देव कधी तरी सद्बूद्धी देणार…

    – ऊद्दव ठाकरे आणि त्यांचा भोंगा यांच्याकडे एकही पुरावा नाही, संपुरेण कुटूंबाने घोटाळा केला…

    – सगळ्या नेत्यांना हिशोब तर द्यावाच लागेल…

  • 06 May 2022 07:03 AM (IST)

    नागपूरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप

    नागपूरात स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप

    – शहरातील बऱ्याच भागात कचरा संकलन ठप्प

    – नागपूरात कचरा संकलन करणाऱ्या एव्हीजी कंपनीतील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

    – या कंपनीकडे बाजारपेठांचा भाग असल्याने बाजारात चाचले कचऱ्याचे ढीग

    – घरांमधील कचराही संकलित न झाल्याने नागरिकांनाही अडचणींना सामना करावा लागतोय

    – काम बंद आंदोलनामुळे लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर आणि हनुमाननगर या पाचही झोनमधील कचरा उचलला नाही

  • 06 May 2022 06:47 AM (IST)

    देशातील उष्णतेच्या लाटेबाबत दिल्लीत बैठक

    देशातील उष्णतेच्या लाटेबाबत दिल्लीत बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

    उष्णतेच्या लाटेबाबत उपाययोजना करा – मोदींचा आदेश

    उष्णतेच्या लाटे मूळ होणाऱ्या मृत्यूंबाबत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता

    मे महिन्यात देशात उष्णतेची लाट कायम राहणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज

    आठवड्याभरात केंद्र सरकार देशातील राज्य सरकारांना सूचना करणार

  • 06 May 2022 06:47 AM (IST)

    राजधानीत मोफत वीज बंद होणार बंद

    राजधानीत मोफत वीज बंद होणार बंद

    मागेल त्याला सबसिडी देणार असल्याचा दिल्ली सरकारचा निर्णय

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा राजधानी दिल्लीतील नागरिकांना मोठा झटका

    यापूर्वी 200 युनिट वीज मोफत दिली जात होती

    येत्या 1 ऑक्टोबरपासून मोफत वीज देण्याचा निर्णय मागे घेतला जाणार

  • 06 May 2022 06:47 AM (IST)

    देशात खाद्य तेलाच्या किमती लवकरच कमी होणार

    देशात खाद्य तेलाच्या किमती लवकरच कमी होणार

    तेलावरचा कर केंद्र सरकार कमी करण्याची शक्यता

    देशातील सर्वसामान्य नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

    वाढत्या महागाई बाबत केंद्र सरकार तेला वरचा कर कमी करण्याची शक्यता

    देशांतर्गत बाजारपेठेत तेलाच्या किमती नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार

  • 06 May 2022 06:47 AM (IST)

    तिवसा शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

    अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून तिवसा शहरासाठी वाढीव पाणी आरक्षण मंजूर..

    पालकमंत्री यशोमती ठाकुरांची माहिती.

    तिवसा शहर वासीयांना भविष्यात मिळणार मुबलक पाणी.

    तिवसा शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

    तिवसा नगरपंचायतीसाठी अप्पर वर्धा धरणातून आता 0.30 दलघमी वाढीव मोठ्या प्रमाणात पाण्याच्या हक्क जलसंपदा विभागाकडून मंजूर

Published On - May 06,2022 6:44 AM

Follow us
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.