Maharashtra Breaking News Live : राजकारणी आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करतील, एकजुटीने रहा- मनोज जरांगे पाटील
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...
मुंबई | 10 डिसेंबर 2023 : पाच राज्यांतील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवलेल्या तीन राज्यात अजून मुख्यमंत्री नाही. छत्तीसगडचा मुख्यमंत्री आज निश्चित होणार आहे. भाजपने छत्तीसगड आमदारांची बैठक बोलवली आहे. राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जाणार आहे. मध्य प्रदेशात भाजप आमदारांची सोमवारी बैठक होणार आहे. राज्यात कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उतरणार आहे. पुणे-लोणावळा दरम्यान आज रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्याचा दौरा सुरु आहे. तसेच क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचाही या लाईव्ह ब्लॉगमधून आपण आढावा घेणार आहोत. शिवाय टीव्ही 9 मराठी चॅनेल आणि यूट्यूब लाईव्हवरही तुम्हाला सगळे अपडेट्स पाहायला मिळतील.
LIVE NEWS & UPDATES
-
आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, चन्द्रशेखर बावनकुळे यांचा टोला
अकोला : देवेंद्र फडणवीस आकसापोटी वागणार नाहीत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांना दिलाय. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्याच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला. मुख्यमंत्री कोण असावं या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सल्ला देऊ नये असेही ते म्हणाले.
-
तर कोणत्याही टोकाला आंदोलन करू, जरांगे पाटील यांचा इशारा
लातूर : जर आरक्षण असताना देणार नसतील तर कोणत्याही टोकाला आंदोलन करू. आता आमच्या पुढे पर्याय नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार. काहीही झाले तरी 24 डिसेंबरला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. इथे श्रीमंत आणि गरीब मराठ्यांचा फायदा होणार आहे. ओबीसींनी आणि मराठ्यांनी एकमेकांच्या अंगावर जायचे नाही तर त्याचा ( भुजबळ ) फायदा होईल. ओबीसीत जायचे सर्व निकष मराठा समाजाने पूर्ण केले आहेत. या संधीचे सोने करा, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
-
-
24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांची कसोटी आहे, मनोज जरांगे पाटील
लातूर : 24 तारखेला आरक्षण दिले नाही तर पुढे हा लढा जोरात लढायचा आहे. पोरानं आरक्षण दिले तरच पोरांचे शिक्षण पूर्ण होतील. या अस्तित्वाच्या लढाईत कुठल्याही नेत्यांचे फूट पडू देऊ नका. राज्यातील मराठा समाजात ताकतीने एकजूट झाला आहे. मराठा समाज सध्या ऊन वारा काही बघत नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक घटनेच्या निषेधार्थ उद्या इंदापूर बंद
इंदापूर : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी इंदापूरात मराठा समाजातील आंदोलकांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ पडळकर समर्थकांनी उद्या इंदापूर बंदचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाने राजकिय नेत्यांना केलेली गावबंदी उठवण्यात यावी. तसेच, ज्यांनी पडळकरांवर चपला फेकण्याचा प्रयत्न केला त्यावर गुन्हे दाखल करा. या मागणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
मोदी यांनी राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : मीरा-भाईंदर मधून राम सेना फाउंडेशनच्यावतीने प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रामसेवक राम भक्त अयोध्येला जात आहेत. 47 दिवसांचा प्रवास हे मोठ्या कष्टाचं काम आहे. रामलीलाच्या प्रती दाखवलेले श्रद्धा आणि भक्ती त्यांना सुखरूप आयोध्याला पोहोचतील. हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होतं अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण केलं, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
-
-
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवर साधला संवाद
नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी घातली आहे. याच्या निषेध करत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी फोनवरून संवाद साधला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी उद्या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिले. भारती पवार यांच्या आश्वासनानंतर त्यांच्या निवासस्थानी धडकणारी बाईक रॅली स्थगित करण्यात आली.
-
भारती पवार यांच्या निवासस्थानी जाणारी बाईक रॅली पोलिसांनी अडवली
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानावर धडकणारी बाईक रॅली नाशिक शहरात दाखल झाली आहे. चांदवड तालुक्यातील शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याची मागणी करत बाईक रॅली काढण्यात आली. भारती पवार यांच्या निवासस्थानी जाणारी बाईक रॅली पोलिसांनी शहरातील अशोक स्तंभ येथेच अडवली आहे.
-
कॅन्डल कारखान्याला लागलेल्या आगीमधील दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी- चिंचवड शहरातील तळवडे या ठिकाणी फायर कॅन्डल कारखान्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत सहा जणांचा जागीच होरपळून तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज तळवडे घटनास्थळाची पाहणी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी केली. यावेळी त्यांनी दोषींवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत कामगारांच्या सुरक्षतेविषयी अंमलबजावणी झाली पाहिजे असं म्हटलं आहे.
-
“आज पडळकर यांच्यावर चप्पलफेक झालीय, उद्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर होऊ शकते”
आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक झालीय. मात्र, उद्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर ही चप्पलफेक होऊ शकते. मनोज जरंगे महारष्ट्र फिरत आहेत आणि जाती जातीत वाद निर्माण करत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची निंदा करतो. मनोज जरांगे यांनी दुटप्पी भूमिका घेणे थांबवली पाहिजे, लबडपणा ही जरांगे यांनी थांबवावा, आरक्षण मिळाले पाहिजेत, यासाठी आमही सहमत आहोत, असं भाजप प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी म्हटलं आहे.
-
नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य महामार्गाव शिवशाही एसटी बसला आग लागली
नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य महामार्गावर शिवशाही एसटी बसला आग लागली. निफाड तालुक्यातील चांदोरी शिवरातील टाकळी फाट्या जवळील डोंगराई हॉटेल समोर बसला आग लागली. शिवशाही बस मध्ये एकूण 25 प्रवासी होते. आगीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक माहिती समजत आहे. नाशिक वरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात असताना ही घटना घडली.
-
घरी सांगून आलो आहे, नाही आलो तर कुंकू पुसून तयार राहायचं- मनोज जरांगे पाटील
आण्णासाहेब जावळे यांनी बलिदान दिले, आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा दिवस जवळ आला आहे. गेलेले बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नाही. टीम तयार करा, गावाच्या गावे जागृत करा. हे आंदोलन तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी उभे केलेले नाही. घरी सांगून आलो आहे, नाही आलो तर कुंकू पुसून तयार राहायचे- मनोज जरांगे पाटील
-
राजकारणी आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करतील. एकजुटीने रहा- मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षणावरून मराठा समाजाचे ध्येय विचलित करायचे आहे असे भुजबळ याला वाटते. नोंदीच्या आधारे मराठा समाजाला 24 डिसेंबरला सरसगट आरक्षण दिले जाईल. राजकारणी आपल्यात फूट पडण्याचा प्रयत्न करतील. एकजुटीने रहा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमधील सभेमध्ये बोलताना केलं आहे.
-
ऊसदरावरून सुरू असलेली चर्चा फिस्कटली, स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक
सांगली – ऊसदरावरून सुरू असलेले चर्चा फिस्कटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते वसंतदादा साखर कारखान्याच्या गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ठिकाणी पोलिसांनी आणि कार्यकर्ते यांच्यात जोरदार धूमश्चक्री सुरू आहे.
-
राजू शेट्टी यांचे ऊस दरासाठी कारखान्यात ठिय्या आंदोलन
सांगली – ऊस दरावरून आक्रमक झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे सध्या वसंतदादा साखर कारखाना प्रणित दत्त इंडिया साखर कारखान्यावरती काटा बंद आंदोलनाला आपल्या कार्यकर्त्यांसह बसले आहेत.
-
उत्तन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक
भाईंदरच्या उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महाराष्ट्र राज्य समन्वय बैठक होत आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित लावली आहे. त्यांच्याबरोबर गिरीश महाजन, सुरेश खाडे, भारती पवार, अतुल सावे, मंगलप्रभात लोढ़ा आदी नेते उपस्थित आहेत,
-
राजू शेट्टी यांचा सरकारला मोठा इशारा
ऊस दरावरून आक्रमक झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार राज्य सरकारने बघायची भूमिका घेऊ नये लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार असे त्यांनी म्हटले आहे.
-
भांडुपमध्ये परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात मराठी संघटनांचा एल्गार
परप्रांतीय मासे विक्रेत्यांच्या विरोधात भांडुपमध्ये मराठी संघटनांनी एल्गार पुकारला आहे. आज सकाळी भांडुप रेल्वे स्थानकावर मुंबईसह महाराष्ट्र वाचवा एकीकरण समितीचे कार्यकर्ते स्थानिक कोळी महिला यांनी भांडुपमध्ये मासे विक्रीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मासे विक्रेत्यांना अडविले.
-
मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत मोठे विधान
ज्यांनी टोकाचा लढा दिला. समाजाच्या न्यायासाठी उभे आयुष्य झोकून दिलं असे अण्णासाहेब पाटील साहेब यांना कैलासवासी म्हणायला सुध्दा त्रास होतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
-
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. स्मृती इराणी यांच्या हस्ते होणार राममंदिराचे रामायण पुस्तकाचे प्रकाशन. शिवाय भाजपकडून पुण्यात “दो धागे प्रभु श्रीराम के लिए” उपक्रमाचं आयोजन
–
-
राज्य आणि केंद्राचे भाजप सरकार नापास- नाना पटोले
राज्य आणि केंद्राचे भाजप सरकार नापास झालं आहे जनतेच्या भावना लक्षात घेता मोर्चा काढला जाणार आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं , शेतकरी संकटात आहे त्यांच्या भावना घेऊन सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News : समुद्रामध्ये कोणी ट्रॅक्टर चालवतं का?- आदित्य ठाकरे
समुद्रामध्ये कोणी ट्रॅक्टर चालवतं का? शिंदेंचे ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो पोहून मला हसू आलं असं आदित्य ठाकरे म्हणाले. मला विचारलं असतं तर मी फोटोसाठी पोज सांगितली असती असंही ते म्हणाले.
-
Maharashtra News : मराठा आरक्षणाच्या लढाईत समाजकंटक शिरलेत- गोपिचंद पडळकर
मराठा आरक्षणाच्या लढाईत समाजकंटक शिरलेत, समाज कंटकांचा आरक्षणाचा हेतू नाही त्यांना अशातंता पसरवायची आहे असं पडळकर म्हणाले. यामागचा मुख्य सुत्रधार आम्हालासुद्धा माहिती आहे असंही ते म्हणाले.
-
Maharashtra News : फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत- मनोज जरांगे
फडणवीस मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत आहेत असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे, तर मुख्यमंत्री शिंदे यांचं जरांगेंनी कौतूक केलं आहे. आमचा शिंदेंवर विश्वास आहे, फडणवीसांवर आमचा विश्वास नाही असं ते म्हणाले.
-
Maharashtra News : सिंधुदूर्गातील देवगड समुद्रात बुडालेल्या तरूणाचा शोध आजही सुरू
सिंधुदूर्गातील देवगड समुद्रात बुडालेल्या तरूणाचा शोध आजही सुरू आहे. मालवणमधील स्कुबा डायव्हर्सकडून शोधमोहिम सुरू आहे. 6 जणांपैकी चार मुलींचे मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. यात एकाला वाचवण्यात यश आले आहे. बुडालेले सर्व सैनिक शाळेतील विद्यार्थी असल्याचे सांगितल्या जात आहे.
-
Maharashtra News : जे लोकं हरतात ते इव्हीएमवर खापर फोडतात- फडणवीस
जे लोकं हरतात ते इव्हिएमवर खापर फोडतात. एकही व्यक्ती इव्हिएम हॅक करू शकलं नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
Maharashtra News : दादागिरी कराल तर दादागिरीने उत्तर देणार – छगण भुजबळ
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र दादारिगी कराल तर दादागिरीने उत्तर देवू असा इशारा छगण भुजबळ यांनी इंदापूरच्या सभेमध्ये मनोज जरांगेंना दिला. मी महापौर झालो तु ग्रमपंचायतीचा सदस्य होवून दाखव असा टोलाही त्यांनी लगावला.
-
Maharashtra News : देवगड हापूसचे आगमण यंदा लांबणार
देवगड हापूसचे आगमण यंदा लांबणार आहे. अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा फटका आंबा उत्पादनाला बसणार आहे. यामुळे हापूस बाजारात उशीराने दाखल होण्याची शक्यता आहे. एपीएमसीच्या घाऊक व्यापाऱ्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. तर दूसरीकडे उत्पन्न कमी झाल्यास दरवाढ होण्याचीही शक्यता आहे.
-
“मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर..”- गोपीचंद पडळकर
“मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होतं की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणं नसून समाजात अशांतता पसरवणं आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते,” असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय.
-
चप्पल फेक प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर जोरदार टीका
सांगली – चप्पल फेक प्रकारानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “ओबीसी समाज अत्यंत संयमाने, शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दूधाचे दर मिळाले पाहिजेत, या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाज करत मिडीयात मुलाखती दिल्या आणि म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते” असं ते म्हणाले.
-
मराठ्यांचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास- मनोज जरांगे पाटील
मराठ्यांचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे. जे अधिकारी जाणूनबुजून नोंदी सापडू देत नसतील ते कामापासून दूर होणार आहेत. कितीही ढोल वाजवत बसलात तरी आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार. चौका – चौकात 50 हजार लोक जमत आहेत. जरा विचार करा. हा विषय गांभीर्यानं घेतला पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात एकीकडे बाजार समित्या बंद
निफाड (नाशिक)- कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात एकीकडे बाजार समित्या बंद आहेत. तर दुसरीकडे या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. गारपीट आणि अवकाळीने ओला झालेला कांदा खराब होतो. कांदा विक्री कुठे करावी असा मोठा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर उभा आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय रद्द करा आणि बाजार समित्यातील कांद्याचे लिलाव सुरळीत करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-
देवेंद्र फडणवीसांचा डाव उधळूनच लावणार- मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Live News : कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरु कराव्यात – मनोज जरांगे
कामातून गेलेला माणूस लवकरच गोळ्या सुरु कराव्यात, शहाणा माणूस असता, तर उत्तर दिलं असतं… असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.
-
Live News : सरकार विरोधी घोषणा, शेतकरी यांचे आंदोलन सुरु
दुधाला 40 रुपये भाव मिळावा यासाठी आडगाव येथे शेतकरी यांचे आंदोलन सुरु झालं आहे. शेतकरी सरकार विरोधी घोषणा, दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करत आहेत.
-
Live News : राजकीय वादातून गावातील बस स्टँड जेसीबीच्या साह्याने केला जमीनदोस्त
राजकीय वादातून गावातील बस स्टँड जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी दोन जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील वाळद गावात ही घटना घडली आहे. गावातील राजकीय वादातून ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानक पाडल्याची चर्चा… ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून बस स्टँड पाडले असल्याची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
-
Live News : मंत्री छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर
पुण्यातील सर्किट हॉऊसमध्ये आज भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाबद्दल आढावा बैठक घेणार… नुकतीच भिडेवाड्याची जागा पालिकेने घेतली ताब्यात… लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणारं… कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त… सर्किट हॉऊस मध्ये येणाऱ्या नागरिकांना आत येण्यास मज्जाव
-
नागपुरातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येणार
नागपूर जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक आणि जैविक तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे 8773 स्त्रोत तसेच शाळा आणि अंगणवाडीतील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी केली जाणार आहे. सदर तपासणी 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत. दररोज 40 जैविक व 40 रासायनिक नमुन्यांची तपासणी करायची आहे. नमुने भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवायचे आहेत. त्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
-
नाशिकच्या माडसांगवी गावातील मळे परिसरात बिबट्या जेरबंद
गेल्या महिनाभरापासून नाशिक शहरालगतच्या माडसांगवी गावातील चारी नंबर ७ परिसरात रात्री नागरिकांना बिबट्याचा मुक्त संचार आढळला होता. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. वनविभागाने येथे १० ते १२ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात अखेरीस बिबट्या जेरबंद झालाय. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील माडसांगवी-आडगाव शिव परिसरातील नवले यांच्या घरासमोर बांधलेली दोन वासरे बिबट्याने काही दिवसांपूर्वी फस्त केली, तर एक श्वानही बिबट्याने फस्त केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. या पिंजऱ्यात शनिवारी बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
-
मनोज जरांगे पाटील यांचा आजचा दौरा
मनोज जरांगे पाटील यांचा आज मराठा संवाद दौऱ्याचा दहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची सकाळी दहा वाजता लातूर जिल्ह्यातील औसा इथं मराठा संवाद सभा घेणार आहेत. दुपारी बारा वाजता टेंभी येथे क्रांतीसुर्य अण्णासाहेब जावळे यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. दुपारी एक वाजता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील किल्लारी येथे मराठा संवाद सभा होईल. सायंकाळी सात वाजता धाराशिव जिल्ह्यातील उमरगा इथं जाहीर सभा आणि त्याच ठिकाणी मुक्काम असेल.
-
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रावर काही सदस्यांची नाराजी आहे. सरकारने मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी दिलेल्या TOR वरती सदस्यांची नाराजी पाहायला मिळतेय. एका समाजाला मागास ठरवण्यासाठी आयोग कसं काय काम करु शकते ? काही सदस्यांची यावर नाराजी आहे. आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मापदंड निश्चित केले आहेत. मराठे मागासलेलं आहेत. असा अहवाल सरकारला हवा आहे का ? बैठकीत काही सदस्यांनी हा सवाल उपस्थित केला. आणखी एक सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
-
Maharashtra News : छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर
राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यातील भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाबद्दल ते आढावा बैठक घेणार आहे. नुकतीच भिडेवाड्याची जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारले जाणार आहे.
-
Maharashtra News : मोबाईल टॉवर टप्प्याटप्प्याने हटवणार
नाशिक शहरातील खाजगी इमारतींवरील मोबाईल टॉवर टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहे. शहरात अनधिकृत मोबाईल टॉवरची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या जागांवरच मोबाईल टॉवरला परवानगी देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिका ५०० टॉवरसाठी जागा देणार असून २५ कोटी रुपयांचा त्यातून महसूल मिळणार आहे.
-
Maharashtra News : शेतकरी संघटना आक्रमक, तीन ठराव मंजूर
कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेत तीन ठराव मंजूर करण्यात आले.
-
Maharashtra News : पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा आज मेगाब्लॉक
पुणे ते लोणावळा दरम्यान रेल्वेचा आज मेगाब्लॉक होणार आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीच्या तांत्रिक कामासाठी एक दिवसाचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे पुण्यातून लोणावळ्याकडे जाणाऱ्या सात लोकल आज बंद राहणार आहेत.
Published On - Dec 10,2023 7:08 AM