Mumbai Maharashtra News Live | जुन्नरमध्ये राष्टवादी शरद पवार गटाचा मेळावा
Maharashtra Mumbai Marathi News Live : आज शनिवार दिनांक 11 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : राज्यातील राजकीय घडामोडींचे केंद्र पुन्हा दिल्ली झाले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तातडीने दिल्लीत रवाना झाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षणास विविध विषयांवर चर्चा केली. मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे सुमारे ४० मिनिटे त्यांनी अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर निवडणूक आयोगात सुरु असलेल्या बैठकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची त्यांनी बैठक घेतली. उत्तर पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. राज्यात कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगाने सुरु आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळावर आयसीसीने कारवाई केली आहे. राज्य, देश, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
आंबेगावमधील कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट
पुणे | दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर आंबेगावमधील राष्ट्रवादी कांग्रेसचे कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. दिलीप वळसे पाटील मतदारसंघात आपण सोबत असल्याचा प्रचार करत आहेत. त्यामुळे संभ्रम आहे. कार्यकर्त्यांनी पवारांना साद घातली आहे.
-
मनसेच्या दीपोत्सवाचा आज तिसरा दिवस, मराठी कलाकारांची हजेर
मुंबई : मनसेचं मुंबईत दीपोत्सवाचं 11 वे वर्ष आहे. मनसेकडून संपूर्ण शिवाजी पार्कला आकर्षक विद्युत रोषणाई केली गेली आहे. आजचा तिसरा दिवस असून पहिल्या दिवशी सलीम खान आणि जावेद अख्तर उपस्थित होते. तर काल दुसऱ्या दिवशी अभिनेता विकी कौशल आणि डायरेक्टर अशितोष गोवारीकर उपस्थिती होते. या दोन्ही दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. तिसऱ्या दिवशी आज मनसे नेते नितीन सरदेसाई आणि मराठी कलाकार महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी यांच्या उपस्थितीत आजची रोषणाई विद्युत स्वीच दाबून होणार आहे
-
-
‘विनाकारण मराठ्यांना टार्गेट करु नका’, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
छत्रपती संभाजीनगर | “विनाकारण मराठ्यांना टार्गेट करु नका. मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या”, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलीय.
-
Junnar Pune News | जुन्नर येथे 13 नोव्हेंबरला शरद पवार गटाचा मेळावा
पुणे | जुन्नर येथे 13 नोव्हेंबरला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला खासदार डॉअमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी वाटचालीसंदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत.
-
Sharad Pawar Purandar Tour | शरद पवारांचा उद्याचा पुरंदर दौरा रद्द
मुंबई | शरद पवार यांचा उद्या रविवार 12 नोव्हेंबर रोजीचा पुरंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवार दिवाळी निमित्ताने शेतकऱ्यांची भेट घेत असतात. पुरदंरमधील नीरा आणि सासवड मध्ये होते पवारांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र उद्याचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. शरद पवारांचा दौरा रद्द होण्याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
-
-
Uddhav Thackeray Live | निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाढतो : उद्धव ठाकरे
ठाणे | “ज्यांना सत्तेचा माज आलाय त्यांनी शाखा पाडली. निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाढतो. सत्तेचा माज आलेल्यांवर बुलडोझर फिरवणार”, असा इशारा ठाकरेंनी शिंदे गटाला दिला आहे.
-
Thane | ठाण्यात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने
ठाणे | ठाण्यात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आले आहेत. शाखेची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा परत निघाला आहे. ठाकरेंचा ताफा हा आता ठाण्यच्या दिशेने निघाला आहे. पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवलाय.
-
महादेव अॅप प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे
महादेव अॅप प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी सौरभ चंद्राकर आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. एफआयआरमध्ये 32 जणांची नावे आहेत. 15000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
-
उद्धव ठाकरे यांची पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा
उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा शाखा परिसरात पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी गाडीतून उतरून पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
-
अयोध्येचा विकास 30,500 कोटी रुपयांनी झाला – मुख्यमंत्री योगी
अयोध्येत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, यापूर्वी जेव्हा इथे आलो तेव्हा एकच प्र्श्न असायचा की योगीजी एक काम करा मंदिर बांधा. आता प्रतिक्षेची वेळ आली आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भव्य राम मंदिर उभारले जात आहे. नवीन अयोध्या उभी राहताना आपण पाहत आहोत. अयोध्येचा 30 हजार 500 कोटी रुपये खर्चून विकास करण्यात आला आहे.
-
नरेश म्हस्के कार्यकर्त्यांसह मुंब्र्यात उपस्थित
शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के मुंब्र्यात उपस्थित आहे. त्यामुळे मुंब्र्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न असणार आहे. शाखा परिसरात पोलिसांकडून ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केली जात आहे.
-
मुंब्र्यातील शाखेच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे शाखेची पाहणी करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मविआचे नेतेही उपस्थित आहेत. जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरे यांचं स्वागत करतील. रेतीबंदर परिसरात उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं.
-
उद्धव ठाकरे यांचे शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन
उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शक्तीप्रदर्शन करतील. मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर तणाव निर्माण झाला. त्यात उद्धव ठाकरे यांना पोलिसांना याठिकाणी भेट देण्यास मज्जाव केल्याने त्यात भर पडली होती. पण नंतर सदरची नोटीस रद्द करण्यात आली. आता उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शाखास्थळी पोहचतील. ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
मुंब्रा येथील शाखा पाडल्याने उद्धव ठाकरे या शाखास्थळी भेट देणार आहे. याठिकाणी ते भाषण पण करणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुंबई आणि आसपासच्या उपनगरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंब्र्याकडे येत आहे. दरम्यान कल्याण येथून निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सभेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पण आहेत.
-
उद्धव ठाकरे अवघ्या काही क्षणात मुंब्र्यात
उद्धव ठाकरे अवघ्या काही क्षणात मुंब्र्यात दाखल होतील. रेतीबंदर येथे स्वागतानंतर त्यांचा ताफा मुंब्र्यात दाखल होईल. थोड्यावेळापूर्वी ते ठाण्यात दाखल झाले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते यांनी गर्दी केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे कार्यकर्ते पण शाखेच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. या परिसरावर पोलिस ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवत आहेत.
-
पोलीस ठाण्याजवळच सभा
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत. त्यासाठी मोठा स्टेज उभारण्यात आलेला आहे. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ते आणि ठाकरे गट याठिकाणी यायाला सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहचत आहेत.
-
आज ठाण्यात हायहोल्टेज ड्रामा
ठाण्यामध्ये शिवसेनेतील दोन गटातील वादातून हायहोल्टेड ड्रामा सुरु आहे. मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा बुलडोजर लावून तोडण्यात आली. येथून पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे. शाखा जमिनदोस्त केल्याने तसेच उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने वातावरण चिघळले. या शाखेला उद्धव ठाकरे भेट देणार आहे. यापूर्वी पोलिसांनी त्यांना कलम 144 अन्वये येण्यास मज्जाव केला होता. नंतर ही नोटीस रद्द करण्यात आली. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहचतील. आता ते काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
उद्धव ठाकरे मुंब्राकडे रवाना, मोठा पोलीस बंदोबस्त
शिवसेनेची शाखा पाडल्यावरुन वाद निर्माण झाला असून उद्धव ठाकरे मुंब्र्याकडे रवाना झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत. त्यासाठी स्टेज उभारण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त केला असून राष्ट्रवादी जितेंद्र आव्हाड समर्थक कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते स्टेजकडे जमायला सुरवात झाली आहे.
-
उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये आपला पक्ष वाढवण्यासाठी जात असतील – नाना पटोले
प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करावे लागते आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये जात असतील अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली आहे.
-
अजित पवार ,शरद पवार ,सुप्रिया सुळे यांची भेट कौटुंबिक- नाना पटोले
जे जे भाजप सरकारच्या विरोधात आमच्यासोबत राहणार त्यांना घेऊन आम्ही चालणार आहोत आणि पवार कुटुंबाची ही भेट कौटुंबिक आहे त्यामुळे याच्यावर जास्त भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे, नाना पटोले यांनी म्हटले आहे.
-
ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे- नाना पटोले
ड्रग्स प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ललित याला वाचवण्याचे काम सरकार करीत आहे. सरकारमध्ये अनेक लोक या ललित पाटलाच्या ड्रग प्रकरणात सामील आहेत आणि एवढेच नाही तर हा सर्व ड्रग हा गुजरातमधून येतो असेही नाना पटोले म्हणाले.
-
अजित पवारांच्या भेटीपेक्षा शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांचे प्रश्न महत्त्वाचे-नाना पटोले
अजित पवार हे काल गृहमंत्री अमित शहा यांना भेटले यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांच्यावर न बोललेलंच बरं काँग्रेस समोर आज देशातील बेरोजगारी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस समोर कार्य करेल असे नाना पटोले यांनी म्हटले.
-
महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थाची स्थिती अत्यंत दयनीय- नाना पटोले
उद्धव ठाकरे यांच्या मुब्रा दौऱ्यावर नाना पटोले यांचे मोठे भाष्य. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला राज्यातील एखाद्या कोणत्याही भागात न जाता येणे हे मोठे दुर्दैव मनावे लागेल आज महाराष्ट्राची स्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थाची स्थिती नक्कीच दयनीय आहे.
-
Pune – पुण्यात आगीची घटना
वाघोली-केसरनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड या १२ मजली इमारतीत एका सदनिकेत आगीची घटना घडलीये. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात मिळवण्यात आले आहे.
-
सरकारला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा मोर्चा- अब्दुल समीर
सरकारला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी हा मोर्चा आहे. सिल्लोड तालुक्यात पाऊस पडतो, पण हा सर्व पाऊस पूर्णा आणि तापी खोऱ्यात वाहून जातो. आपला सिल्लोड तालुका हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा तालुका आहे. सिल्लोड हा सरसगट दुष्काळग्रस्त तालुका आहे, असे अब्दुल समीर यांनी म्हटले.
-
पोलिसांकडून मुंब्र्याच्या शाखा परिसरात येण्यास ठाकरेंना मनाई
उद्धव ठाकरे यांना पोलिसांकडून मुंब्र्याच्या शाखा परिसरात येण्यास मनाई केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून कलम १४४ ची नोटीस दिली आहे.
-
सर्व व्यवस्थित चाललं आहे काही काळजी करायच कारण नाही- दिलीप वळसे-पाटील
अजित दादा काल दिल्लीला गेले त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली दीड तास त्यांच्यात चर्चा झाली काय चर्चा झाली आहे हे अजित दादा भेटल्याशिवाय मला समजणार नाही. मात्र चाललंय ते सर्व व्यवस्थित चाललं आहे काही काळजी करायच कारण नाही तिन्ही पक्ष हे एकमेकांशी सामंजस्य राखून काम करत आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.
-
अजित पवार दिल्लीचे चरणदास झालेत- संजय राऊत
शाखा उद्ध्वस्त होताना मुख्यमंत्री, गृहमंत्री काय करत होते. उद्धव ठाकरे काय नवाज शरीफ आहेत का? अजित पवार दिल्लीचे चरणदास झालेत. आजारी माणसाला उठून दिल्लीत जाण्याची वेळ महाराष्ट्रावर आली हे दुर्दव्य, असं संजय राऊत म्हणाले.
-
पोलिसांनी मिंधेपणाची भूमिका घेऊ नये- संजय राऊत
पोलिसांनी मिंधेपणाची भूमिका घेऊ नये, आम्हाला आडवायचं असेल तर अडवून दाखवा. ही खोक्यांची मस्ती- संजय राऊत
-
सिल्लोड तालुक्यामध्ये सरकाविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा
मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांच्या नेतृत्त्वात सिल्लोड तालुक्यामध्ये सरकाविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे.
-
Samruddhi Express way : नागपूरजवळ समृद्धी महामार्वगावरील कर्मचाऱ्यांनी टोलवसूली बंद केली
नागपूरजवळ समृद्धीवरील कर्मचाऱ्यांनी टोलवसूली बंद केली आहे. दिवाळीच्या दिवसातही नियमीत वेतन न दिल्यानं कर्मचारी संतप्त झाले आहे. नवीन कंत्राटदारानं वेतन न दिल्याचा या कर्मचाऱ्याचा आरोप आहे.
-
Maharashtra News : अमित शाहा आणि अजित दादांची भेट पुर्वनियोजित- बावनकुळे
अमित शाहा आणि अजित दादांची भेट अचानक नाही तर पुर्वनियोजित असेल अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. शहांनी आधीच अजित पवारांना भेटण्यासाठी वेळ दिली असेल.
-
Maharashtra News : पुणे वडोदरा मार्गावर लवकरच वंदे भारतची चाचणी
पुणे वडोदरा मार्गावर लवकरच वंदे भारतच एक्सप्रेसची चाचणी होणार आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गाची चाचणी झाल्यानंतर आता पुणे वडोदरा मार्गाचीही चाचणी होणार.
-
Mumbai News : पाऊस पडल्याने मुंबईच्या प्रदूषणात घट
गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईच्या प्रदूषणात गट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत वायू प्रदूषण कमालीचे वाढले आहे. दिवाळीच्या दिवसांत हे प्रदूषण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
-
Maharashtra News : मंत्र्याच्याच मुलाचा सरकार विरोधात मोर्चा
मंत्र्याच्याच मुलाने सरकार विरोधात मोर्चा काढल्याचे समोर आहे आहे. अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी सिल्लोड तालूका दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासाठी मोर्चा काढला आहे.
-
Maharashtra News : दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्याकडून जनतेला शुभेच्छा
दिवाळी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही दिवाळी सगळ्यांना सुख संमृद्धीची जाओ अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
-
IIT मुंबईमध्ये दहशतवाद्याचे समर्थन केल्याच्या विरोधात मुबई विवेक विचार मंच तर्फे आंदोलन सुरू
IIT मुंबईमध्ये दहशतवाद्याचे समर्थन केल्याच्या विरोधात मुबई विवेक विचार मंच तर्फे आंदोलन सुरू. IIT इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात या विवेक विचार मंच कार्यकर्ता घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. प्राध्यापक शामिष्ट शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली
-
ड्रोन कॅमेराच्या साह्याने पोलिसांची आज मुंब्रा शहरावर नजर
मुंब्रा येथील वादग्रस्त शाखेला आज सायंकाळी उद्धव ठाकरे भेट देणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये याकरिता मुंब्रा पोलिसांची शहरात कटाक्ष नजर असणार आहे. पोलिसांचा बंदोबस्त,एसआरपीएफ जवान देखील मुंब्रा शहरात सज्ज असणार आहेत. इतकेच नव्हे तर दोन ड्रोन कॅमेराच्या साह्याने देखील मुंब्रा शहरावर नजर असणार आहे. वादग्रस्त शाखा परिसरात व रेतीबंदर मार्ग अशा दोन ठिकाणी या ड्रोन कॅमेराच्या साह्याने पोलिसांची आज मुंब्रा शहरावर नजर.
-
ठाकरे गटाचे पाय आता लटपटायला लागलेत- संजय शिरसाट
ठाकरे गटाचे पाय आता लटपटायला लागलेत. आमच्या नखाची बरोबरी करायची त्यांची लायकी नाही. 31 डिसेंबरपर्यंत संजय राऊत जेलमध्ये जाणार . बेताल वक्तव्य करण्यात संजय राऊत मास्टर! – संजय शिरसाट
-
मुख्यमंत्र्यांच्या जीवावर बॅनर फाडणाऱ्यांची मस्ती ठाण्यातील शिवसैनिक उतरवणार – ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची टीका
बॅनर फाडणाऱ्यांची मस्ती ठाण्यातील शिवसैनिक उतरवणार. समोरासमोर लढण्याची ताकद तुमच्या मनगटात नाही म्हणून तुम्ही रात्री बॅनर फाडता. ठाण्यातील उद्धव ठाकरेंचे बॅनर फाडल्यानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
-
कोल्हापूरमध्ये दुधाच्या दरावरून ठाकरे गट आक्रमक, दूध संघाच्या संकलन केंद्रावर मोर्चा
कोल्हापूरमध्ये दुधाच्या दरावरून ठाकरे गट आक्रमक. गोकूळ दूध संघाच्या संकलन केंद्रावर ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला आहे.
-
पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
पुणे नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. चाकण ते वाकीदरम्यान चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. दिवाळीच्या सलग सुट्ट्या आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
-
नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका – जरांगे पाटील
नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका. नेत्यांची बाजू आरक्षणाच्या बाजूने असेल तरच तुम्ही त्या कार्यक्रमाला जा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.
-
1 डिसेंबरपासून ताकदीने साखळी उपोषण करा – जरांगे पाटील
आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका. शांततेत आंदोलन करा. 1 डिसेंबरपासून ताकदीने साखळी उपोषण करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
-
काल आजारी माणूस दिल्लीत कोणालातरी भेटायला गेला – संजय राऊतांचे टीकास्त्र
आत्तापर्यंत आजारी माणसाला इतर लोक भेटायला यायचे, विचारपूस करायचे. पण काल पहिल्यांदाच पाहिलं की आजारी माणूस कोणालातरी भेटायला दिल्लीला गेला . अजित पवारांच्या दिल्लीवारीवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
कमळाचा आधार घेतलात तरी 2024 ला तुमचा पराभव निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
-
आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही – संजय राऊत
आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही, आमची अजूनही संघर्ष करण्याची तयारी आहे, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेची शाखा तोडून शिंदे गटाने त्यांचा डीएनए दाखवून दिला, अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
-
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो हीच आमची दिवाळी – संजय राऊत
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो हीच आमची दिवाळी. आम्ही पक्षाशी बेईमानी केली नाही हाच आमचा आनंद आहे, असे संजय राऊत म्हणाले.
-
Live Update : सर्वांना दिवाळीचा सण आनंदाने जावा – शरद पवार
सर्वांना दिवाळीचा सण आनंदाने जावा आशा शुभेच्छा शरद पवार यांनी जनतेला हिल्या आहेत. ‘कधी कधी संकटं येतात त्यांना तोंड देऊन पुढे जायचं. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार असतात. दिवाळी सण सर्व संकटं विसरून एकत्र येण्याचा सण आहे..’ असं देखील शरद पवार म्हणाले.
-
Live Update : अजित पवार दिल्लीहून रात्री पावणे बारा वाजता पुण्यात दाखल
अजित पवार दिल्लीहून रात्री पावणे बारा वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर अजित पवार पुण्यात परतले आहेत. आता अजितदादा बारामतीतील कौटुंबिक दिवाळी कार्यक्रमात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-
Live Update : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यात वातावरण तापलं
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याआधी ठाण्यात वातावरण तापलं आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त लावलेले बॅनर फाडले असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आरोप केले आहेत.
-
Live Update : राज्यात ड्रग्ज प्रकरण गाजत असतानाच रत्नागिरी पोलीस ॲक्शन मोडमध्ये
रत्नागिरी जिल्ह्यातील आमली पदार्थ तस्करी प्रकरणी २५ जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. रत्नागिरीच्या जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून प्रस्ताव मांडण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ड्रग्जचे कनेक्शन आसाम, पंढरपूर आणि साताऱ्यापर्यत असल्याचे उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आमली पदार्थांविरोधात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
-
Entertainment Update | रश्मिका मंदानाच्या ‘डीपफेक’ व्हिडीओ प्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या ‘डीपफेक’ व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी घेतला मोठा निर्णय, पुढे होणार तरी काय? काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती… वाचा सविस्तर
-
Mns news | संदीप देशपांडे यांची आशिष शेलार यांच्यावर टीका
मराठी बद्दल एवढं प्रेम असेल तर गुजराती पंतप्रधान ऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा. एवढं बोलायची देखील हिम्मत दाखवतील का?. मराठी कलाकारांवरती अन्याय होतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभे राहतं?. मनसे नेते संदीप देशपांडे यांची आशिष शेलार यांच्यावर टीका. आशिष शेलार यांनी मनसेने दीपोत्सव कार्यक्रमात सलीम-जावेद यांना बोलावल म्हणून मनसेवर केलेली टीका.
-
Pune news | ‘या’ भागांसाठी पुण्यातून जादा बसेस सोडणार
दिवाळीनिमित्त पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी. गावी जाण्यासाठी अनेक प्रवाशांनी स्वारगेट बस स्थानकात केली मोठी गर्दी. आज सकाळपासूनच गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग. स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा. पुणे एसटी प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त 100 पेक्षा अधिक जादा बसेस. पुण्याहून मराठवाडा, नागपूर, कोल्हापूरला जाण्यासाठी सोडण्यात येणार जादा बसेस.
-
Pune news | पुण्यात कशी आहे हवेची गुणवत्ता?
पुण्यात हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली. पुणे शहरासह जिल्ह्यात हवा प्रदूषणात मोठी वाढ. महापालिका यंत्रणा अलर्टवर. महापालिकेकडून 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण पथकांची नियुक्ती, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये पार पडली संयुक्त बैठक.
-
Maharashtra News | नाट्य परिषदेची कार्यकारणी बिनविरोध
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कार्यकारणी बिनविरोध झाली. पुणे शाखेच्या कार्यकारणीची निवडणूक बिनविरोध झाली. एकूण 19 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2023 ते 2028 या कालावधीसाठी कार्यकारणी असणार आहे.
-
Maharashtra News | पाऊस पडल्यानंतर मुंबईची हवा सुधारली
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पडत असलेल्या पावसामुळे मुंबईतील हवा सुधारली आहे. मुंबईत जवळपास सर्वच ठिकाणी हवा समाधानकारक असल्याचे निरीक्षण ‘सफर’ या संस्थेच्या पाहणीत दिसून आला.
-
Maharashtra News | पुण्यात यंदा वाहन विक्रीचा विक्रम
पुण्यात यंदा वाहन विक्रीचा विक्रम झाला आहे. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत पुण्यात 20 हजार वाहनांची विक्री झाली आहे. दुचाकीच्या खरेदीवर पुणेकरांनी भर दिला आहे. परंतु यंदा इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटली आहे.
-
Maharashtra News | पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस
उत्तर पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये साचले. अवकाळी पावसाचा फाटका काढणीला आलेल्या शेती पिकांना बसणार आहे.
-
Maharashtra News | गुप्तधन काढून देण्याच्या नावावर सात लाखांत फसवणूक
वृद्धाला करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत:च लखपती होणाऱ्या दोघांना गोंदिया पोलिसांनी अटक केली आहे. गुप्तधन काढून देण्याच्या नावावर त्यांनी वृद्धाची सात लाखांत फसवणूक केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
Published On - Nov 11,2023 7:19 AM