Maharashtra Breaking News Live | मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर आनंद दवे यांचं महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : रशियाचं 47 वर्षानंतर मिशन मून, चांद्रयान- 3 च्या आधी रशियाचं यान चंद्रावर उतरणार. सोलापुरात 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याऐवजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार. राज्यभरात गणेशोत्सवाची तयारी सुरू. अनेक ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने मोठी कारवाई करत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
Pune News | ‘हिंमत असेल तर…’, आनंद दवे यांचं मेधा कुलकर्णी यांना आवाहन
पुणे | हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना आक्रमक होण्याचं आवाहन केलं आहे. “हिंमत असेल तर मेधा कुलकर्णी यांनी बंडखोर व्हावे. स्पष्ट व्यक्त व्हावे. तिकीट नाकारलं तेव्हाच जर आम्ही सांगितल्याप्रमाणे अपक्ष लढला असता तर आज मंत्री असता. आता सोशल मीडियावर नाराज होऊन उपयोग नाही. त्याची दखलपण घेतली जाणार नाही. आक्रमक व्हा. उपद्रव क्षमता दाखवा. निष्ठावंत मतदारांनी घरी बसून कसबा घडवला. आता कोथरूड तुम्ही घडवा. हिंमत दाखवा”, असं आवाहन आनंद दवे यांनी केलं आहे.
-
Sangli News- इस्लामपुरमध्ये टेलिग्रामवरून ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे फसवणूक
सांगली येथील इस्लामपुरमध्ये टेलिग्रामवरून ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. पैशाचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. 27 बँक खात्यातील 7 कोटी 81 लाखाची रक्कम गोठवली आहे हे अत्यंत धक्कादायक आहेत. सायबर सेलकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
-
-
Jalna News- गोदावरी नदीत बुडून परतूर तालुक्यातील एकाचा मृत्यू
गोदावरी नदीत बुडून परतूर तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी जाताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. नदी पत्रातून पोहत जात असताना दम लागून बुडल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत झालेल्या व्यक्तीचे नाव मारोती खवल असून ते जालन्यातील परतूर तालुक्यातील पाटोदा गावचे रहिवाशी आहेत.
-
Manipur case- मणिपूर हिंसाचार प्रकरणी भंडाऱ्यात ख्रिश्चन समुदाय उतरला रस्त्यावर
मणिपूर हिंसाचार प्रकरणी भंडाऱ्यात ख्रिश्चन समुदाय रस्त्यावर उतरला आहे. मूक मोर्चातून न्यायाची मागणी करण्यात आलीये. भंडारा शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व ख्रिश्चन बांधवांनी काळ्या फित लावल्या होत्या.
-
Chandrapur fire- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात आगीची घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागल्याची घटना नुकताच घडली आहे. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरल्याचे बघायला मिळाले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
-
Pune- पालकमंत्री चंद्रकांत पाटील करणार चांदणी चौकाची पाहणी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील चांदणी चौकाची पाहणी करणार आहेत. उद्या चांदणी चौक उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील चांदणी चौकात दाखल होतील. उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे लोकार्पण सोहळा
-
Nawab Malik News : राजकारणासाठी ईडीचा वापर – अनिल देशमुख
एका खोट्या प्रकरणात नवाब मलिक यांना गोवण्यात आले. एजन्सींचा दुरुपयोग करुन महाराष्ट्रात, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटक, राजस्थानमध्ये सत्ताधारी राजकारण करत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. एजन्सींचा गैरवापर ही दुखद बाब आहे. सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक यांना जामीन दिल्याने आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.
-
Dhule News : सांगवी राडाप्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी
धुळ्यातील सांगवी येथील राडाप्रकरणी पोलिसांनी दहा संशयितांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बॅनर फाडण्यावरुन हा वाद झाला होता.
-
Nawab Malik News : नवाब मलिक झुकले नाही-विजय वडेट्टीवार
नवाब मलिक झुकले नाही. ते लढत राहिले. त्यांच्या लढ्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. खोट्या केसेस टाकणाऱ्यांना ही चपराक असल्याचा टोला त्यांनी लगावला. मलिक यांनी समझोता केला नाही. त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
-
नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. तब्येतीच्या कारणास्तव मलिक यांना २ महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर. 1 वर्ष 5 महिन्यानंतर मलिक बाहेर येणार. फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक तुरूंगात होते.
-
Rahul Gandhi PC Live : मणिपूर जळत असताना मोदी संसदेत हसत होते
मणिपूर जळत असताना पंतप्रधान लोकसभेत हसून बोलत होते. माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अशी परिस्थिती कधीच पाहिली नाही, असे राहुल गांधी म्हणाले. मोदींचा मणिपूर जळत ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
-
Rahul Gandhi PC Live : लोकसभेत स्वत:विषयी नाही, मणिपूरविषयी बोलायचं होतं.
लोकसभेत स्वत:विषयी नाही, मणिपूरविषयी चर्चा करायची होती. दोन तासांपैकी अवघी २ मिनिटं मोदी मणिपूरविषयी बोलले – राहुल गांधीची टीका
-
Rahul Gandhi PC Live : मोदींना पंतप्रधानपदाचं गांभीर्य कळत नाही – राहुल गांधी
मोदींना पंतप्रधानपदाचं गांभीर्य कळत नाही. मोदी 2024 साली पंतप्रधान बनतील की नाही हा मुद्दा नाही. सध्या मणिपूर जळत आहे, हा मुद्दा आहे – राहुल गांधी
-
Rahul Gandhi PC Live : मणिपूरमध्ये देशाची हत्या करण्यात आली आहे – राहुल गांधींचे टीकास्त्र
मणिपूरमध्ये देशाची हत्या करण्यात आली आहे. तिथे जाऊन मी जे पाहिलं, ते कधीच पाहिलं नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
-
Rahul Gandhi PC Live : मणिपूरमध्ये सैन्य पाठवल्यास ते दोन दिवसांत शांत होईल. – राहुल गांधी
मणिपूरमधील परिस्थिती गंभीर आहे, ते दोन भागांत विभागलं गेलं आहे. तिथे सैन्य पाठवल्यास वातावरण शांत होईल,असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
-
विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत संजय सिंह राहणार निलंबित
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांचे राज्यसभेतील निलंबन कायम. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत संजय सिंह निलंबित राहतील.
-
Pune MNS | पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरणात मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल
पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड प्रकरणात मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. 10 तारखेला महाविद्यालयात जाऊन मनसैनिकांनी डीनने 10 लाख रुपयांची लाच मागितली त्याविषयी केलं होतं आंदोलन. फरासखाना पोलीस ठाण्यात 7 जणांवर झाले होते गुन्हे दाखल. पोलिसांनी मनसैनिकांना नोटीसा पाठवून गुन्हे केले दाखल. 7 जणांना टेबल जामीन मंजूर करण्यात आला.
-
Congress | मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण
मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीसाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी दिल्लीत जाऊन घेतली होती सोनिया गांधी यांची भेट. भेटीत मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी दिलं होतं नियंत्रण. AICC कडून मुंबईत बैठकीत सहभागी होणाऱ्या नेत्यांची यादी कळवली जाणार. मुंबईतील बैठकीला राहुल गांधीसोबत सोनिया गांधींही हजर राहण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची माहिती
-
Sanjay Raut | राज्यात सत्ता नसतानाही आम्ही हे आव्हान पेललं
मी राज्यसभेत बोलत असताना माझा माईक बंद करण्यात आला. मुंबईतील इंडियाच्या बैठकीचं यजमानपद ठाकरे गटाकडे. राज्यात सत्ता नसतानाही आम्ही हे आव्हान पेललं- संजय राऊत
-
Pune News | राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढील आठवड्यात पुन्हा पुणे दौऱ्यावर. 16, 17 आणि 18 ऑगस्टला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. पुणे दौऱ्यात 17 आणि 18 ऑगस्टला राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार शिवाय पुण्यातील काही कार्यक्रमांना राज ठाकरे हजेरी लावणार.
-
Solapur News | माढा पत्रकार संघाकडून आमदार किशोर पाटलांचा निषेध
शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा माढ्यात निषेध. पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी आमदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. माढा पत्रकार संघाकडून आमदार किशोर पाटलांचा निषेध नोंदवण्यात आलाय.
-
धुळ्यातल्या सांगवीमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा, 13 जणांना अटक
सांगवी राड्याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. वादानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली होती. सांगवीमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र दोन्ही गटांच्या वादात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. या राड्याप्रकरणी 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
नाशिकमध्ये मद्यपी व्यक्तीने साठवण तलावातील पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार
नाशिक | मद्यपी व्यक्तीने साठवण तलावातील पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाशिकच्या त्रंबकेश्वर रोडवरील महिरावणी गावातील ही घटना आहे. बंधाऱ्यातून 3 ते 4 mcft पाणी वाहून गेल्याचा आणि बंधाऱ्याची पाणी पातळी 10 सेंटीमीटरने कमी झाल्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला आहे. जवळपास महिनाभर पुरेल इतकं पाणी वाहून गेल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. बंधारा परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची आणि जलसंपदा विभागाने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-
देवेंद्र फडवणीसांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथी गृहावर गृहविभागाची बैठक
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गृहविभागाची बैठक सुरू आहे. सह्याद्री अतिथी गृहावर या बैठकीला सुरुवात झाली असून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे.
-
व्याजदर ‘जैसे थे’; कर्जदारांना तूर्त दिलासा नाही
रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्याच्या सलग तिसऱ्या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. कडाडलेले टोमॅटो आणि भाज्यांच्या दरामुळे महागाई वाढू लागल्याने नजीकच्या काळात व्याजदरात कपातीची शक्यता नसल्याचं बँकेने स्पष्टपणे सांगितलं.
-
टॅक्सी चालकांविरोधात तक्रारीसाठी व्हॉट्सॲप नंबर
रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी गैरवर्तन केल्यास, भाडं नाकारल्यास किंवा जादा भाडं घेतल्यास ग्राहकांना आता ईमेल आणि व्हॉट्सॲप नंबरवर तक्रार करता येणार आहे. ग्राहकांनी 9152240303 या मोबाइल नंबरच्या व्हॉट्सॲप आणि mh03autotaxicomplaint@gmail.com ईमेलवकर तक्रार नोंदविण्याचं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
-
लोकसभेचं कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्थगित
लोकसभा कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केला. या गोंधळानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
-
Mumbai Train Firing : चेतन सिंहला कोर्टात हजर करणार
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये चार जणांची हत्या करणाऱ्या आरोपी चेतन सिंहला बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. जीआरपीच्या पथकाने कडेकोट बंदोबस्तात आरोपी चेतन सिंगला बोरिवली लॉकअपमधून ताब्यात घेतले आहे.
-
Dhule News : धुळ्यात दोन गटात तुफान राडा
धुळ्याच्या सांगवीत दोन गटात तुफान राडा झाला. बॅनर फाडण्यावरुन हा सर्व वाद झाला. आमदार काशीराम पवारांच्या वाहनांवर जमावाचा हल्ला केला. गाड्यांची तोडफोड केली.
-
Nitin Desai death case : नितीन देसाई प्रकरणात आरोपींना दिलासा नाहीच
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात एडलवाईज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय. रसेष शहा आणि इतर अधिकाऱ्यांना हायकोर्टाने कोणताही दिलासा दिलेला नाही. पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.
-
Chandrayaan-3 Update | रशियाच लूना 25 चंद्रावर कधी उतरणार?
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. आता रशियाने लूना 25 मिशन लाँच केलं आहे. त्याबद्दल जाणून घ्या. वाचा सविस्तर…
-
Vijay Wadettivar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न सुरु. हम करे सो कायदा सुरुंय. जनतेने विरोध न केल्यास हुकूमशाहीत जगावं लागेल. प्रकल्पांसाठी शिंदेंनी सुरु केलेल्या वॉर रुममध्ये कोल्ड वॉर सुरुंय.
-
High Court Hearing news : मुंबई महापालिकेकडून कोर्टात युक्तीवाद सुरु
सहा महापालिकेचे आयुक्त कोर्टात हजर. रस्त्यावरील खड्डे आणि मॅनहोलवर युक्तीाद सुरु
-
Jalna news : मविआच्या काळातील कामांवरील स्थगिती उठवली
जालन्यातील कामांवरील स्थगिती राज्य सरकारने उठवली. उच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी स्थगिती उठवली.
-
Dhule news : धुळ्यातील चारणपाड्यात दोन गटात दगडफेक
बॅनर फाडल्याचा जाब विचारायला गेल्याने दोन गटात तुफान दगडफेक.
-
Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा सचिन तेंडुलकरला अल्टीमेटम
सचिनने ऑनलाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी, अन्यथा सचिनच्या घरी जाऊन आंदोलन करणार.
-
Sanjay Raut Live : तुम्ही 9 वर्षात मणिपूरसाठी काय केलं?, संजय राऊत यांचा सवाल
मणिपूरच्या चर्चेवर सत्ताधारी पळ काढतात. देशातील जनतेने फ्लाईंग किसचं स्वागत केलंय. तुम्हीही मणिपूरला जाऊन फ्लाईंग किस द्या. देशाच्या जनतेला फ्लाईंग किस द्या.
-
Sanjay Raut Live : केंद्रात इंडिया आणि महाराष्ट्रात मविआ – संजय राऊत
2024 ला सत्ताबदल नक्की होणार. विरोधकांना दिलेल्या त्रासाचा हिशोब होणार. मंत्रीपदारुन सत्ताधारी आमदारांमध्ये मारामाऱ्या होतील.
-
Maharashtra News Live : रेल्वे सेवा विस्कळीत
विरारमध्ये मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे वैतरणा सफाले दरम्यान दीड तासांपासून मालगाडी ट्रकवर थांबली आहे. विरारवरून डहाणू जाणाऱ्या ट्रॅकवर मालगाडी थांबल्याने डहाणूकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
-
Maharashtra News Live : डॉक्टरावर गुन्हा दाखल
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गर्भवतीचे मृत्यू प्रकरणात डॉक्टरसह दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टर साहिल खोत, डॉ. साक्षी सेठी व रुग्णवाहिका चालक संजय शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
-
Tomato News : मुंबईत टोमॅटोचे दर कोसळले
मुंबईच्या भायखळा भाजी मार्केटमध्ये कालपर्यंत 130 ते 140 रुपये किलो असलेला टोमॅटो आज शंभर रुपयांवर आले आहे. टोमॅटोची आवक वाढल्यामुळे दर घसरले आहेत.
-
Tomato News : टोमॅटोच्या बाजार भावात ५० टक्के घसरण
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहे. गेल्या चार दिवसांत दरात 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. नाशिक, पिंपळगाव आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे.
-
pune chandni chowk bridge : चांदणी चौक पुलाचे उद्या लोकार्पण
पुणे शहरातील चांदणी चौक उड्डाणपूलासह रस्ते उद्या शनिवारी वाहतुकीसाठी खुले होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे.
-
टोमॅटोचे दर पडल्याने ग्राहकांना मोठा दिलासा
२०० रुपये किलोचे टोमॅटोचे दर आले ४० ते ४५ रुपये किलोंवर आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूरच्या ठोक बाजारात सध्या टोमॅटोचे दर ४० ते ४५ रुपये किलो आहे. टोमॅटोची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. येत्या काळात टोमॅटोच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
-
वसईत भाजपाला खिंडार..
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसईतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपाला खिंडार पडली असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर जशी निवडणुक जवळ येईल तसे बदल पाहायला मिळतील अशी देखील चर्चा आहे.
-
पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार
पुणेकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. चांदणी चौक उड्डाणपूलासह रस्ते उद्या वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन करण्यात येणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू होते. उद्याच्या कार्यक्रमाची प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
-
देशातील महिला अत्याचारांच्या विरोधात ठाकरे गटातर्फे 1 लाख सह्यांची मोहीम
देशभरात महिलांवरील अत्याचार, मणिपूर येथे घडलेली घटना, असंख्य बेपत्ता झालेल्या मुलींचा आणि महिलांचा न लागलेला शोध याविरोधात एक लाख सह्यांची मोहीम ठाकरे गटातर्फे राबविण्यात आली आहे.
-
बच्चू कडू यांचा सचिन तेंदुलकर यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम
बच्चू कडू यांनी सचिन तेंदुलकर यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर सचिनने माघार घेतली नाहीतर, त्यांच्या घरी जाऊन प्रहार स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. सचिन तेंदुलकर यांनी ॲानलाईन गेमच्या जाहिरातीतून माघार घ्यावी. माघार घेतली नाहीतर नारळपान देऊन सचिन तेंदुलकर यांना ॲानलाईन गेमच्या जाहिरातीतून माघार धेण्याची विनंती करु असं बच्चू कडू यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
-
दुर्मिळ जातीच्या अजगराला जीवदान
औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड गावाच्या हद्दीत एका दुर्मिळ जातीच्या अजगराला सर्पमित्र मनोज गायकवाड यांनी जीवदान दिले आहे. त्यामुळं त्यांचं नागरिकांनी कौतुक केलं आहे.
-
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
पुण्यातील सिंहगड परिसरात रस्त्यावरील मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचं उजेडात आलं आहे. हवेली पोलीसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून एकाला ताब्यात घेतलं आहे. शैलेश सर्जेराव देडे असे अटक केलेल्या मसाज सेंटर चालकाचे नाव आहे. नांदेड फाट्याजवळील स्पर्श मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मसाज सेंटरची तपासणी केली असता संशयास्पद वस्तू आढळून आल्याने मसाज सेंटर चालकाला ताब्यात घेतले आहे.
-
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस रविवारी सांगोल्यात एकाच मंचावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोल्यात एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचा एक फुटल्यानंतर पवार फडणवीस प्रथमच एकत्र येणार आहेत. सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे रविवारी अनावरण करण्यात येणार आहे.
-
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस 20 ऑगस्टपासून जापानच्या दौऱ्यावर, अनेक करारांवर सह्या होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 20 ऑगस्ट रोजी जापानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी उद्योग आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक करारांवर सह्या होणार आहे. त्यामुळे राज्यात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार आहे.
-
Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार, गुजरात हायकोर्टाच्या न्यायाधीशाची बदली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार देणारे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत प्रच्छक यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह गुजरात उच्च न्यायालयाच्या आणखी तीन न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली आहे.
-
thane patient death : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांचा मृत्यू; ठाणे हादरले
ठाण्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावला आहे.
-
Ganesh Festival : गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर एक लेन सुरू करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी मुंबई- गोवा महामार्गावर एक लेन सुरू करण्यात येणार आहे. गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच या महामार्गावर मंत्री रवींद्र चव्हाण हे लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Published On - Aug 11,2023 7:22 AM