Maharashtra Breaking News Live | मोठी बातमी : शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट, ३० मिनिटे चर्चा

| Updated on: Aug 13, 2023 | 7:14 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live | मोठी बातमी : शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट, ३० मिनिटे चर्चा

मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : तब्बल 17 महिन्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे. मलिक आता राष्ट्रवादीतील कोणत्या गटात जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन. पुण्यातील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला फटकारले. समृद्धी महामार्गावरील अपघातांची नितीन गडकरी यांच्याकडून गंभीर दखल. आज पुण्यात बैठक घेणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. यासह राज्य आणि देशविदेशातील बातम्या जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Aug 2023 10:16 PM (IST)

    Manipur case- मणिपूरच्या घटनेवर आदित्य ठाकरेचे मोठे विधान

    आदित्य ठाकरेने नुकताच मणिपूरच्या घटनेवर मोठे भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, अजूनही मणिपूरवर सरकार मधून कोणी बोलत नाहीये. इतर राजकीय घटना घडत आहेत. मणिपूर पेटत असताना कोणी सरकार मधील बोलत नाहीये, हे दुःखदायक आहे.

  • 12 Aug 2023 09:58 PM (IST)

    Pimpri Chinchwad News- जे पी नड्डा यांच्याकडे रामदास आठवले यांची मोठी मागणी

    नुकताच रामदास आठवले यांनी जे पी नड्डा यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. रामदास आठवले म्हणाले की, निवडणूक आयोगाची महाराष्ट्रात आरपीआयला मान्यता मिळावी, यासाठी महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत आम्हाला दोन लोकसभेच्या जागा द्या अशी मागणी आम्ही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे केली आहे.

  • 12 Aug 2023 09:45 PM (IST)

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे विधान

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. काका- पुतण्याची भेट ही एक सामान्य भेट असू शकते, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तसेच देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी म्हणून आपण मोदीजींच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे हे समजावून सांगण्याची भेट असू शकते असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

  • 12 Aug 2023 09:34 PM (IST)

    Solapur News- सोलापुरात कामगारआणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

    सोलापुरातील ओएसिस मॉलबाहेर कामगार आणि ग्राहकामध्ये फ्री स्टाईल हाणामारी बघायला मिळाली. फिल्मी फूड कोर्ट या हॉटेलच्या 10 ते 12 कर्मचाऱ्यांनी एका ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हॉटेलच्या मालकीणीला ग्राहकाकडून अपशब्द वापरल्याने ही घटना घडल्याचे कळत आहे.

  • 12 Aug 2023 08:50 PM (IST)

    राज्यातील काँग्रेस चवतळलेला वाघ – विश्वजित कदम

    सांगली : सत्ताधारी आमदारांना जास्त आणि विरोधी आमदारांना कमी निधी देण्याचा पायंडा पाडला जात आहे हे लोकशाहीला शोभणार नाही,अशी टीका माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. लोकसभेसाठी काँग्रेसला चांगले वातावरण आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस चवताळलेल्या वाघाच्या भूमिकेत आहे. सांगली लोकसभेची जागा यंदा काँग्रेस लढवेल आणि विजय देखील होईल,असा विश्वासही आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला.

  • 12 Aug 2023 08:39 PM (IST)

    अजित पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निरोप पाठवला…. – विजय वडेट्टीवार

    चंद्रपुर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील गुप्त भेटीबाबत आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याला काहीही करून भाजप समर्थनासाठी तयार करा असा निरोप पाठवला असावा असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. एकनाथ शिंदे अथवा अजितदादा पवार यांना सामील करून देखील भाजपची घसरण सुरूच असल्याने भाजपने जनाधार असलेल्या नेत्यांना चूचकारणे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

  • 12 Aug 2023 08:28 PM (IST)

    हुकूमशाही सरकार विरोधात निवडणूक लढणार – पृथ्वीराज चव्हाण

    सांगली : मोदी सरकारच्या हुकूमशाही सरकार विरोधात निवडणूक लढवणार. बहुजन समाजावर हजारो वर्षे अत्याचार केला. त्याच्या हातात सत्ता द्यायची का हे जनतेने आता ठरवायचे आहे. कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयानंतर दक्षिण कर्नाटकमध्ये मोदी सरकारला स्थान नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार आणि त्याबरोबर लढणाऱ्या पक्षासोबत आम्ही आघाडी करून येणाऱ्या निवडणुका लढणार असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. सांगलीच्या इस्लामपूर येथे झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघतील वाळवा शिराळा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा दरम्यान ते बोलत होते.

  • 12 Aug 2023 08:23 PM (IST)

    मोठी बातमी : शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट, ३० मिनिटे चर्चा

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाली. उद्योजक अतुल चोरडीया यांच्या घरी ही भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. दरम्यान, अजित पवार यांनी मीडियाला चुकवण्यासाठी २ गाड्या बदलल्या. शरद पवार यांनी गाडीच्या काचा खाली घेत मीडियाला दर्शन दिले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात किमान ३० मिनिटे चर्चा झाली.

  • 12 Aug 2023 04:44 PM (IST)

    Vande Bharat Train News : महाराष्ट्रातून धावणार पाचवी वंदे भारत

    महाराष्ट्राला पाचव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. मुंबई ते कोल्हापूर या दरम्यान ही ट्रेन धावेल. त्यामुळे इतर ट्रेनवरील प्रवाशांची गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. हा लांब पल्ला अवघ्या काही तासात गाठता येणार आहे.

  • 12 Aug 2023 04:31 PM (IST)

    Mumbai-Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

    मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी घाटात एलपीजी वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. तसेच गॅस गळती टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

  • 12 Aug 2023 04:11 PM (IST)

    Sanjay Raimulkar : आमदार संजय रायमुलकर यांची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ

    आमदार संजय रायमुलकर यांनी शिवीगाळ केल्याचे ग्रामपंचायत सदस्याने आरोप केला आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या पासेससाठी सदस्याने फोन केला होता. आमदार रायमुलकर यांची शिवीगाळ असणारी ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.

  • 12 Aug 2023 04:04 PM (IST)

    Nitin Gadkari News : नितीन गडकरी यांनी काढली मेधा कुलकर्णी यांची समजूत

    पुण्यातील नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला. पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा झाला. पण कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची तीव्र नाराजी चर्चेत राहिली. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी गेले. त्यांनी त्यांची समजूत काढली. पक्षातील वरिष्ठांना भेटून विषय संपवण्याचे गडकरींचे कुलकर्णीना सूचना केली.

  • 12 Aug 2023 03:59 PM (IST)

    Jalgaon News : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुदतबाह्य औषधांचा वापर

    जळगावात वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चक्क मुदतबाह्य औषधांचा वापर करत अल्याचा प्रकार समोर आला आहे. गाठिंची तपासणी करणारी किट मुदतबाह्य असल्याचे समोर आले आहे. अन्न आणि औषध विभागाच्या छापेमारीमध्ये हा सर्व प्रकार समोर आला आहे.

  • 12 Aug 2023 03:38 PM (IST)

    Chetan Tupe : आमदार चेतन तुपेंनी घेतली अजित पवारांचा भेट

    हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनीदेखील अजित पवारांची भेट घेतली आहे. चेतन तुपेंनी प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठी अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तुपे हे देखील काल शरद पवारांच्या बैठकीला उपस्थित होते.

  • 12 Aug 2023 03:33 PM (IST)

    अजितदादांकडून पटोले आणि वडेट्टीवारांच्या टिकेचा समाचार

    प्रकल्पांबाबत मी मिटींग घेतल्यास विरोधकांच्या पोटात का दुखतयं असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही वेडे नाही असेही अजित पवार म्हणाले. खरं तर मला हे बोलायचं नव्हतं पण बोलंलो नोही तर एकच बाजू लोकांना दिसते असेही अजित पवार म्हणाले.

  • 12 Aug 2023 03:13 PM (IST)

    Pune Traffic : पुण्यामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डबलडेकर पुल उभारणार- फडणवीस

    रोजच्या वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांच्या नाकी नऊ आले आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी शहरात डबल डेकर पुल उभआरणाप असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पुण्याला वाहतूक कोंडी मुक्त शहर बणवणार असल्याचेही ते म्हणाले.

  • 12 Aug 2023 02:00 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुण्यातील कचऱ्याचा उपयोग करून रिंग रोड तयार करणार

    कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे. पुण्याला पेट्रोल- डिझेल पासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदूषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही. आम्ही आमचे टॉयलेटचे पाणी विकून 300 कोटी रुपये कमावतो – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:55 PM (IST)

    Pune Chandani Chowk : देशाच्या विकासाचं केंद्र पुणे अशी ओळख निर्माण करणार

    देशाच्या विकासाचं केंद्र पुणे अशी ओळख निर्माण करणार. चांदणी चौकातील पुलाचं नाव अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांनी ठरवावं – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:47 PM (IST)

    Pune Chandani Chowk : इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा

    पुणे आता अधिक वाढवू नका. पुणे प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेट ला रहायला यायचो तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. मला भारतातुन पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचेय. इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:45 PM (IST)

    Pune Chandani Chowk : नितीन गडकरींचा पुणेकरांना खोचक टोला

    पुणे हे विद्येचं माहेरघर,सगळेच अभ्यासू; म्हणून निर्णयात उशीर! अभ्यासू लोकांमुळेच पुणे मेट्रोचं काम उशिरा सुरु झालं. नागपूर मेट्रोचा प्लॅन एक तासात मंजूर झाला. नितीन गडकरींचा पुणेकरांना खोचक टोला. डिसेंबरपर्यंत पालखीमार्गाचं काम पूर्ण करणार.रस्ते बनवण्यासाठी कचऱ्याचा वापर केला जाऊ शकतो.

  • 12 Aug 2023 01:42 PM (IST)

    Pune Chandani Chowk : चांदणी चौकातील पुलाचं नाव अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांनी ठरवावं- नितीन गडकरी 

    पुण्याला आता डबल इंजिन लागले आहे, आधी एक दादा होते आता दोन दादा झालेत, आणि दादा दादाच आहेत. माझं खातं भष्ट्राचारमुक्त आहे, त्यामुळे मी ठेकेदारांना शिव्या घालतो. येणाऱ्या पाच वर्षात आपला देश आटोमोबाईलमध्ये एक नंबरला आला पाहिजे त्यासाठी पुण्याचं महत्व आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही देशाला पुढे घेऊन जाऊ. चांदणी चौकाचे नाव जे काही आहे ते दोन्ही दादांनी मिळून ठरवावे. मी त्याला मान्यता देईन – नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:38 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुण्याला भविष्यात स्काय बसची गरज

    पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न. अजितदादा, चंद्रकांतदादांना हवेतून चालणाऱ्या बसचा डेमो दाखवणार. पुण्यात भविष्यात स्काय बसची गरज.

  • 12 Aug 2023 01:25 PM (IST)

    Pune Chandani Chowk : मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल

    चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर. मलेशिया, सिंगापूर इथल्या तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाण पूल. पुण्यात ४० हजार कोटींची कामे भविष्यात पूर्ण करणार. पुण्यातील चौक आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होते.- नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:12 PM (IST)

    Pune Chandani Chowk : अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण

    पुण्यातील रस्त्यांसाठी मेधा कुलकर्णी यांची वारंवार मागणी. अडचणींवर मात करून चांदणी चौकातील रस्त्याचं काम पूर्ण. आधी हजारो कोटी खर्च करून सुद्धा वाहतुकीची समस्या सोडवली गेली नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

  • 12 Aug 2023 01:00 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुरंदरमधील विमानतळाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेणार – देवेंद्र फडणवीस

    पुरंदरमधील नवीन विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या आपल्याकडे आहेत. फक्त भूसंपादनाचा विषय बाकी आहेत. आता अजितदादा आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे तिकडच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचा विषय मिटवता येणार.

  • 12 Aug 2023 12:53 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुण्यातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या – देवेंद्र फडणवीस

    पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर फ्लायओवर उभारणार. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा. वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. कात्रज कोंढवा रोडच्या भूसंपादनासाठी 200 कोटी दिलेत.

  • 12 Aug 2023 12:50 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुणे बुद्धिवंतांच शहर – देवेंद्र फडणवीस

    अजित दादांमुळे चांदणी चौकाचा इतिहास कळला. पुणेकरांना ट्राफिक जॅममुळे दिवसा ढवळ्या चांदण्या पाहायला मिळत होत्या. म्हणून या चौकाला चांदणी चौक असं नाव पडलं, असं मला आधी वाटलं होतं. पुणे मेट्रोसाठी जे वन कार्ड तयार करणयात आले आहे, ते कार्ड पीएमपीसाठी पण तयार करता येईल ते बघायला पाहिजे. देशात आता वन कार्ड प्रस्तावित आहे.

  • 12 Aug 2023 12:43 PM (IST)

    Pune Chandani Chowk : पुण्यात ध्वजारोहन दरवर्षी राज्यपाल करतात – अजित पवार

    पुण्यातील पालकमंत्रीपदावरुन कोणताही वाद नाही.

  • 12 Aug 2023 12:40 PM (IST)

    Pune Chandani Chowk : आम्ही काय बेअक्कल आहेत का ? – अजित पवार

    मुख्यमंत्री पदाच्या खुर्टीवर आमचा डोळा आहे. अशा बातम्या दिल्या जातात. अरे पण खुर्ची एक मग दोघांचा डोळा कसा असेल?, आम्ही काय बेअक्कल आहेत का ?. नितीन गडकरींनी पुण्यातील रस्त्यांसाठी 40 हजार कोटी देण्याचं आश्वासन दिले आहे.

  • 12 Aug 2023 12:34 PM (IST)

    Pune Chandani Chowk : कोल्ड पण नाही वॉर पण नाही – अजित पवार

    दोन दिवसांच्या बातम्या बघा अजित पवारांनी मिटिंग घेतली, त्यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आम्ही जरी निर्णय घेतला तरी फायनल निर्णय मुख्य घेत असतात. विरोधी पक्षनेते नवीन आहेत, त्यांना कुठे दिसेल तिथे कोल्डवॉर दिसले.

  • 12 Aug 2023 12:32 PM (IST)

    Pune Chandani Chowk : वाहतूक कोंडीने कुणालाही सोडलं नाही – अजित पवार

    चांदणी चौकाचे लोकार्पण होत असताना पुणेकरांना आनंद होत आहे. न्यायालयीन अडथळे दूर करून कामं पूर्ण करण्यात आली. विक्रमी वेळेत जुना पूल पाडण्यात आला. आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनाही येण्याची इच्छा होती. ते सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकले होते, वाहतूक कोंडीने कुणालाही सोडलं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्बेत ठीक नसल्यामुळे ते आज आले नाहीत मीडियाने ते लक्षात घेतले पाहिजे.

  • 12 Aug 2023 12:30 PM (IST)

    Pune Chandani Chowk : नेता असावा तर गडकरींसारखा – अजित पवार

    पुणेकर चांगलं काम करणाऱ्यांना विसरत नाहीत. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा सर्वांनाच अनुभव. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार.

  • 12 Aug 2023 12:21 PM (IST)

    Raigad News : शिंदे गट – ठाकरे गट रायगडमध्ये आमनेसामने

    ठाकरे गटाकडून रायगडमध्ये JSW कंपनीविरोधात मोर्चा सुरुंय. मोर्च्यादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

  • 12 Aug 2023 12:17 PM (IST)

    Pune Chandani Chowk : चांदणी चौक हा गेम चेंजर ठरणार – चंद्रकांत पाटील

    नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने त्यांनी रोड बांधलेत, त्यांना रोडकरी म्हणायचे. मात्र आता त्यांना विकासकरी म्हणतात. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आज उपस्थित नाहीत ते त्यांच्या मूळ गावी आहेत.

  • 12 Aug 2023 12:13 PM (IST)

    Pune Chandani Chowk : नीलम गोऱ्हे यांच्याकडून मोदींचं कौतुक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नुसतेच रस्ते बांधत नाहीत तर ते देश बांधत आहेत. आतंकवाद, पाणी कुठलाही प्रश्न असो मोदी त्याकडे लक्ष देतात.

  • 12 Aug 2023 12:10 PM (IST)

    chandni chowk : चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास सुरुवात

    पुणे शहरातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. पुणे शहरासाठी चांगला मार्ग शोधल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करत असल्याचे विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

  • 12 Aug 2023 11:48 AM (IST)

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन : नाराजीनाट्यानंतर मेधा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे थोड्याचवेळात लोकार्पण होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित आहेत.

    नाराजी नाट्यानंतर मेधा कुलकर्णी याही व्यासपीठावर दाखल झाल्या आहेत. निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. मात्र आता त्या कार्यक्रमासाठी आल्या आहेत.

  • 12 Aug 2023 11:29 AM (IST)

    पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमस्थळी दाखल

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे थोड्याच वेळात होणार लोकार्पण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

  • 12 Aug 2023 11:11 AM (IST)

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

    पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी आले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीबद्दल अद्यापही अनिश्चिती आहे.

  • 12 Aug 2023 10:57 AM (IST)

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं थोड्याच वेळात उद्घाटन

    पुण्यात चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची लगबग

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी, तर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी पुण्यात दाखल

  • 12 Aug 2023 10:45 AM (IST)

    चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अपडेट्स

    पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता उद्घाटन

    थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार दाखल होणार

  • 12 Aug 2023 10:30 AM (IST)

    नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

    नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी पुणे भाजपचे पदाधिकारी उपस्थित

    माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक धीरज घाटे उपस्थित

  • 12 Aug 2023 10:17 AM (IST)

    चांदणी चौकात उद्घाटनाची लगबग

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज चांदणी चौकातील पुलाचं आज उद्घाटन करणार

    चांदणी चौकातल्या मार्गिका पाहा टीव्ही 9 मराठीवर ड्रोनच्या माध्यमातून…

  • 12 Aug 2023 10:02 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवार यांचा मेट्रो प्रवास

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने प्रवास केला रुबी हॉल ते वनाजपर्यत प्रवास त्यांनी मेट्रोने केला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

  • 12 Aug 2023 09:56 AM (IST)

    Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौक इथे पुलाच्या कार्यक्रमाला येणार का? हा प्रश्न होता. परंतु प्रकृती बरी नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष कार्यक्रमाला येणार नाही. ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Aug 2023 09:47 AM (IST)

    Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची खुर्ची कार्यक्रमस्थळी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदनी चौक इथे पुलाच्या कार्यक्रमाला येणार का? हा प्रश्न आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नावाची खुर्ची व्यासपीठावर ठेवण्यात आली आहे. व्हीआयपी खुर्चीवर नावे लिहिली आहेत.

  • 12 Aug 2023 09:20 AM (IST)

    Ajit Pawar : अजित पवार मेट्रोने प्रवास करणार

    पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार मेट्रोने प्रवास करणार आहेत. चांदणी चौक उद्घाटन सोहळ्याला अजित पवार मेट्रोने जाणार आहेत. रुबी हॉल क्लिनिक मेट्रो स्टेशन ते वनाज मेट्रो स्टेशनपर्यंत अजित पवार आज मेट्रोने प्रवास करणार आहेत.

  • 12 Aug 2023 09:05 AM (IST)

    Chandni chowk : मुख्यमंत्री येणार की नाही?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते पुण्याच्या कार्यक्रमात जाणार की नाही यावर संभ्रम आहे. दरम्यान डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

  • 12 Aug 2023 08:53 AM (IST)

    Chandni chowk : चांदणी चौकाला एनडीए ब्रिज नाव देण्याची मागणी

    चांदणी चौकाला एनडीए ब्रिज नाव द्यावे अशी मागणी चेंज इंडिया फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. बदनाम चांदणी म्हणण्याऐवजी एनडीए ब्रिज म्हणा चेंज इंडिया फाऊंडेशनचं म्हणणं आहे. दारूच्या , बिअरच्या बॉटल लटकावून प्रतिकात्मक सह्यांची मोहिम राबविण्यात आली आहे.

  • 12 Aug 2023 08:43 AM (IST)

    EYE Flu : डोळ्यांची साथ वाढली, ४ लाख लोकं बांधित

    महाराष्ट्रात अनेक मोठ्या शहरात डोळ्यांची साथ झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत ४ लाख लोकं बाधित झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • 12 Aug 2023 08:40 AM (IST)

    PUNE NEWS : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची आज बैठक

    अजित पवार आणि शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटची या बैठक एकत्र येणार असल्याची काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. परंतु अजित पवार आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

  • 12 Aug 2023 08:22 AM (IST)

    PUNE NEWS : गडकरी फडणवीस काहीवेळात पुणे विमानतळावर पोहोचतील

    पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पुणे विमानतळावर काहीवेळात पोहोचतील.

  • 12 Aug 2023 08:14 AM (IST)

    PUNE NEWS : त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

    पुणे शहरातून गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह 75 तासानंतर नीरा नदी पात्रात सापडला आहे. त्या शवविच्छेदन झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

  • 12 Aug 2023 08:06 AM (IST)

    PM Narendra Modi : ते सूर्याचे मालक नाहीत; ठाकरे गटाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका

    अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत जे लांबलचक भाषण केले. त्यात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त तीन मिनिटे बोलले. मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

  • 12 Aug 2023 07:48 AM (IST)

    CM Eknath Shinde : पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी?; चर्चांना उधाण

    पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी आहेत. उड्डाणपूलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक आपल्या कार्यक्रमात केला बदल केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे उद्घाटक असतानाही शिंदे कार्यक्रमाला येणार नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

  • 12 Aug 2023 07:33 AM (IST)

    Ganesh Festival : गणेशोत्सवासाठी 351 बसेस फुल्ल, मुंबईतून सुटणार 1100 गाड्या

    कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 19 ते 28 सप्टेंबरदरम्यान साजरा होत आहे. एस.टी. महामंडळाच्या मुंबई विभागाने यंदा गणेशोत्सवासाठी 1100 गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यातील 351 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून त्यामध्ये 151 गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे.

  • 12 Aug 2023 07:23 AM (IST)

    Nitin Gadkari : समृद्धी महामार्गांवरील अपघातांची नितीन गडकरी यांच्याकडून गंभीर दखल; आज पुण्यात आढावा बैठक

    केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी समृद्धी महामार्गावरील अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. गडकरी आज पुण्यात या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

Published On - Aug 12,2023 7:19 AM

Follow us
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.