Maharashtra Breaking News Live | “ठाकरे गटाचे 2 खासदार-8 आमदार लवकरच शिवसेनेत येणार”

| Updated on: Aug 14, 2023 | 7:13 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Live | ठाकरे गटाचे 2 खासदार-8 आमदार लवकरच शिवसेनेत येणार
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : राज्यात पावसाचा जोर ओसरला. पिकं करपण्याचा धोका. बळीराजा चिंतेत. मुंबईत ट्रान्स हार्बर मार्गावर रात्री 11.50 ते रविवार पहाटे 04.50 पर्यंत मेगाब्लॉक. ठाणे रेल्वे स्थानकाच्या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर रात्री पादचारी पुलासाठी गर्डर्स बसवण्यात आले आहे. 15 ऑगस्टनिमित्ताने मुंबईतील अनेक ठिकाणी मिशन ऑल आउट अंतर्गत नाकाबंदी. रामदास आठवले यांची भाजपकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Aug 2023 09:25 PM (IST)

    Prataprao Jadhav | ठाकरे गटातील 2 खासदार आणि 8 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार : खासदार प्रतापराव जाधव

    बुलडाणा | उद्धव ठाकरे गटाचे 2 खासदार आणि 8 आमदार हे लकरच शिवसेनेत येणार आहेत, असा दावा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. प्रतापराव जाधव यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे.

  • 13 Aug 2023 03:12 PM (IST)

    Sangola News :  सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण

    माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. शरद पवार यांनी पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमासाठी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले आहेत.

  • 13 Aug 2023 03:05 PM (IST)

    Dipak Kesarkar News : दीपक केसरकर ठाण्यातील रुग्णालयात

    शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पोहचले आहेत. एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंत्री केसरकर यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेऊन याविषयी भूमिका मांडणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

  • 13 Aug 2023 03:01 PM (IST)

    Nana Patole News : नाना पटोले मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता ही भेट होईल. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी ही भेट घेण्यात येणार आहे.

  • 13 Aug 2023 02:46 PM (IST)

    Aditi Tatkare News : अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाय योजना करणार

    ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाय योजना करण्यात येतील, असे आदिती तटकरे यांनी सांगितले. ठाणे हा मोठा जिल्हा आहे. सरकारी रुग्णालयाच्या विस्तारीकरण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 13 Aug 2023 02:41 PM (IST)

    Rohit Pawar News : शिंदे गटातील 15 आमदार नाराज

    शिंदे गटातील 15 आमदार नाराज असल्याचा दावा राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी केला. हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात येण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 13 Aug 2023 01:39 PM (IST)

    Thane hospital : मृतांना ५० लाखांची मदत झाली पाहिजे – जितेंद्र आव्हाड

    कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र अव्हाड कळवा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी मृतांना ५० लाखांची मदत झाली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे.. असं वक्तव्य देखील केलं आहे…

  • 13 Aug 2023 01:24 PM (IST)

    उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस सांगोल्याच्या दिशेने रवाना, गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं होणार अनावरण

    उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. याठिकाणी गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पुतळा अनावण सोहळ्याला पवार आणि फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत.

  • 13 Aug 2023 01:15 PM (IST)

    Thane hospital : येथील प्रशासनाला अर्थच नाही – ठाणे रुग्णालयातील घटनेनंतर जिंतेद्र अव्हाड यांचं वक्तव्य

    राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र अव्हाड कळवा रुग्णालयात दाखल झाले आहेत. या रुग्णालयात पॅथलॉजी लॅब नाही, ब्लड टेस्टिंगची व्यवस्था नाही, रुग्णांना खाण्यासाठी दोन अंडी देत नाहीत…. असा प्रश्न उपस्थित करत जिंतेद्र अव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.. शिवाय येथील प्रशासनाला अर्थच नाही… असं वक्तव्य देखील जिंतेद्र अव्हाड यांनी केलं आहे..

  • 13 Aug 2023 12:54 PM (IST)

    Thane news | रुग्णालयात संतापाचं वातावरण

    रुग्णालयात एकाच रात्रीत 17 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ. छत्रपती शिवाजी महाराज ठाणे रुग्णालयात ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते दाखल. रुग्णालय प्रशासन विरोधात ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक. कर्मचारी उद्धटपणे उत्तरं देतात, नातेवाईकांचा आरोप. रुग्णालयात संतापाचं वातावरण.

  • 13 Aug 2023 12:37 PM (IST)

    Thane news | पेशंटची माहिती नीट दिली जात नाही

    3 दिवसांपूर्वी 5 रुग्णांचा मृत्यू. पेशंटची माहिती नीट दिली जात नाही. जेवण, इतर सोयी सुविधा नाहीत. ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनावर नागरिकांचा संताप.

  • 13 Aug 2023 12:25 PM (IST)

    Rohit Pawar | तुळजाभवानी मातेचे दर्शन, जागरण गोंधळ घालत घातले देवीला साकडे!

    उस्मानाबाद: आमदार रोहित पवार यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन, जागरण गोंधळ घालत घातले देवीला साकडे. राज्यात आज जे काही राजकारण केले जाते, पार्टी व कुटुंबं फोडले जात आहे, खालच्या पातळीवरील राजकारण केले जाते ते कमी व्हावे यासाठी तुळजाभवानी चरणी पार्थना. संघर्ष हा सर्वांना करावाच लागेल, लोकांसाठी लढण्याची तयारी महाराष्ट्राच्या तमाम नागरिक व कार्यकर्ते यांनी दाखवली आहे. राज्यात लवकरात लवकर पाऊस पडू दे! अशी देवीकडे मागणी.

  • 13 Aug 2023 12:09 PM (IST)

    Thane news | छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह

    ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्री 17  जणांचा मृत्यू. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू. मृतांमधील 13 जण आयसीयू मधील तर 4 जण जनरल वॉर्ड मधील. मृतांमधील काही रुग्णाचं वय 80 पेक्षा जास्त. रुग्णालयाच्या कार्यभारावर प्रश्नचिन्ह.

  • 13 Aug 2023 11:58 AM (IST)

    आदित्य ठाकरेंच्या हस्ते सेवा रथाचं लोकार्पण

    ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज वरळी मतदारसंघात

    आमदार सचिन अहिर याच्या संकल्पनेतून जेष्ठ नागरिकासाठी सुरू करण्यात येणार असलेल्या सेवा रथाचे केलं लोकार्पण

  • 13 Aug 2023 11:45 AM (IST)

    आगामी निवडणुकांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

    लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाला तर विधानसभा निवडणूका होतील की नाही सांगता येत नाही

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

  • 13 Aug 2023 11:30 AM (IST)

    ठाण्यातील धक्कादायक बातमी

    ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू

    पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील घटना, ठाण्यात एकच खळबळ

  • 13 Aug 2023 11:16 AM (IST)

    मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर?

    नितीन गडकरी यांनी घेतली मेधा कुलकर्णी यांची भेट

    या भेटीत कय झालं? नाराजी दूर झाली? काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी? वाचा सविस्तर

  • 13 Aug 2023 10:58 AM (IST)

    Maharashtra News Live : शरद पवार सोलापुरात दाखल

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळ्याच्या निमित्ताने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम आयोजित केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज उभारण्यात आले.

  • 13 Aug 2023 10:42 AM (IST)

    Maharashtra News Live : शरद पवार सोलापुरात दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोलापुरात दाखल झाले आहे. त्यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

  • 13 Aug 2023 10:35 AM (IST)

    Sanjay Raut : मुख्यमंत्री आराम करत आहेत – संजय राऊत

    उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आराम करत आहे. त्यासाठी ते गावी गेले आहे. मुख्यमंत्री आराम करण्यासाठी झाला की लोकांची कामे करण्यासाठी झालात? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

  • 13 Aug 2023 10:25 AM (IST)

    Maharashtra News Live : २०१९ मध्ये शिंदे मुख्यमंत्री होणार होते- संजय राऊत

    २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते. परंतु भाजपला ते मुख्यमंत्री नको आहे. २०१९ ला सत्तेचे ५०-५० टक्के वाटप होईल, असे अमित शाह यांनी म्हटले होते. परंतु ते झाले नाही.

  • 13 Aug 2023 10:20 AM (IST)

    Maharashtra News Live : तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी

    13 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान सलग सुट्या आल्या आहेत. यामुळे पर्यटन आणि धार्मिक स्थळावर गर्दी झाली आहे. तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. यामुळे रविवार, सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवस मंदीर पहाटे 1 वाजता दर्शनासाठी खुले राहणार आहे.

  • 13 Aug 2023 10:08 AM (IST)

    Maharashtra News Live : PFI च्या एका कार्यकर्त्यास घेतले ताब्यात

    मालेगावात पुन्हा NIA ची टीम दाखल झाली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने PFI च्या एका कार्यकर्त्यास ताब्यात घेतले आहे. पहाटेपासून PFI चा सदस्य असलेला गुफराण खाण याची चौकशी सुरू आहेत.

  • 13 Aug 2023 10:01 AM (IST)

    Narendra Modi | पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना खास आवाहन

    ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोशल मीडिया अकाऊंटचा डीपी चेंज करण्याच आवाहन केलय. पंतप्रधान मोदी यांनी स्वत: आपल्या टि्वटरच्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे.

  • 13 Aug 2023 09:49 AM (IST)

    Mumbai-pune road | मुंबई-पुणे मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला

    सलग सुट्ट्या असल्यानं मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. परिणामी द्रुतगती मार्गावर याचा ताण आलाय. वाहनांच्या वाढलेल्या संख्येने बोरघाटात मंद गतीने वाहतूक सुरु आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनं कासवगतीने पुढं सरकत आहेत. कोणाला पर्यटनस्थळी तर कोणाला आपापल्या गावाला पोहचायचं आहे.

  • 13 Aug 2023 09:35 AM (IST)

    WI vs IND | वेस्ट इंडिज विरुद्ध विजयासह टीम इंडियाचा रेकॉर्ड

    टीम इंडियाने काल सीरीजमधील चौथ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला. मालिकेत आता बरोबरी साधली आहे. या विजयासह टीम इंडियाने काही रेकॉर्ड केले. वाचा सविस्तर….

  • 13 Aug 2023 09:19 AM (IST)

    Shivsena : मुंबईत शिंदे गटाला बसू शकतो मोठा झटका

    मुंबईतील जोगेश्वरी येथील शिंदे गटातील पदाधिकारी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच समजतय. विभाग प्रमुखाच्या जाचाला कंटाळून राजीनामा देण्याच्या तयारीत. विभाग प्रमुख विजय धीवार यांच्या जाचाला कंटाळून कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेली धूसफूस पक्षासाठी ठरतेय डोकेदुखी.

  • 13 Aug 2023 08:58 AM (IST)

    राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 13 Aug 2023 08:20 AM (IST)

    शरद पवार देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर 

    शरद पवार देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत.

  • 13 Aug 2023 08:12 AM (IST)

    अहमदनगर जिल्हयातील दिग्गज नेते बीआरएसमध्ये, 35 पेक्षा अधिक सरपंचांचा समावेश

    राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्हयातील सहकारातील दिग्गज नेते त‌सेच श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकूटे यांनी तेलंगणा येथे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थित बीआरएस मध्ये प्रवेश केला. अशोक सहकारी कारखान्याचे संचालक, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी तसेच 35 हून अधिक सरपंचांनी देखील बीआरएसचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे जिल्हयात बीआरएसची ताकद अधिकच वाढली आहे.

  • 13 Aug 2023 08:02 AM (IST)

    Ganesh Festival : कोकणात जाण्यासाठी 22 नव्या गाड्या, पश्चिम रेल्वेवरून धावणार विशेष गाड्या

    कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे पाठोपाठ पश्चिम रेल्वेवरही गणेशोत्सव काळात विशेष गाड्या चालवणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवात 22 विशेष गाड्यांची भर पडली आहे.

  • 13 Aug 2023 07:46 AM (IST)

    sharad pawar : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर, दोन कार्यक्रमात होणार भेट

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार आहेत. आधी सोलापुरात आयटी पार्कच्या कार्यक्रमात हे दोन नेते भेटतील. त्यानंतर सांगोल्यात गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात हे दोन नेते भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 13 Aug 2023 07:25 AM (IST)

    satara : साताऱ्यात धोम बलकवडी कॅनोलमध्ये कार बुडाली, पाच तरुण सुदैवाने बचावले

    साताऱ्यात धोम बलकवडीच्या कालव्यात एक कार बुडाली. त्यामुळे कारमधील पाचजण यात बुडाले. मात्र, स्थानिकांनी तात्काळ उड्या मारून या पाचही जणांना वाचवले आहे.

  • 13 Aug 2023 07:24 AM (IST)

    nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात नो व्हीआयपी दर्शन, मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय

    नाशिकच्या त्र्यंबेकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेएश्वर मंदिरात भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय.

  • 13 Aug 2023 07:18 AM (IST)

    Ramdas Athawale : रामदास आठवले यांना हव्यात लोकसभेच्या दोन जागा, भाजपकडे मागणी

    केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी भाजपकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे आठवले यांनी ही मागणी केली आहे.

Published On - Aug 13,2023 7:17 AM

Follow us
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.