Maharashtra Marathi News LIVE | अजित पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार सज्ज, 27 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा

| Updated on: Sep 17, 2023 | 7:08 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करू शकता.

Maharashtra Marathi News LIVE | अजित पवार यांच्या पाठोपाठ शरद पवार सज्ज, 27 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची आजपासून औरंगाबादमध्ये कॅबिनेटची बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. सात वर्षानंतर पहिल्यांदाच ही बैठक औरंगाबादमध्ये होत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणीची आज बैठक होमार आहे. हैदराबादमध्ये होणाऱ्या या बैठकीत पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट. चोवीस तास महत्त्वाचे. यासह राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Sep 2023 08:31 PM (IST)

    Sharad Pawar Pune Meeting | शरद पवार यांची पुण्यात 27 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा

    पुणे | मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची येत्या 27 ऑक्टोबरला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. तर या जाहीर सभेनंतर पुण्यात रोड शो होणार आहे. गणेश कला क्रीडा सभागृहात शरद पवार यांच्या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

  • 16 Sep 2023 08:10 PM (IST)

    Ashish Shelar | आशिष शेलार यांचा उबाठा गटावर निशाणा

    मुंबई | भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधलाय. जी आमच्या मराठी, कोकणी माणसाच्या जीवावर स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या भाजायची ती मंडळी कुठे आहे? ती सगळी मंडळी कुठे लपली आहे, असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला.

  • 16 Sep 2023 06:48 PM (IST)

    Sharad Pawar | ‘ज्या क्षेत्रातलं आपल्याला समजत नाही तिथे विद्यार्थी राहावं’, शरद पवारांचा कानमंत्र

    पुणे | शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे :

    आम्ही पक्ष चालवतो म्हणजे फक्त राजकारण नाही करत समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्रित करुन कामे करणे गरजेचे आहे.

    राजकरण एक राजकरण, आणि निवडणुका एक. निवडणुका सोडून सगळ्यांना एकत्रित करणे आणि राज्याचा अणि देशाचा विकास करणे महत्वाचं आहे.

    शेती क्षेत्रात कामे झाली पाहिजेत. आपल्या पक्षाचा वैद्यकीय विभाग उभा केला आहे. राज्यात कुठं जरी संकट आलं की हे सगळे लोकं जातात अणि मदत करतात.

    ज्या क्षेत्रातलं आपल्याला समजत नाही तिथं ज्याला समजतं त्याच्यासमोर आपण विद्यार्थी बनून राहावं.

    सत्ता हातात असताना कही ना काही उभं करावं लागतं आणि म्हणून हिंजवडीमध्ये साखर कारखान्याचे उद्घाटन करायसाठी गेलो आणि तिथं आयटी पार्क आणला.

    राज्यात दूरदृष्टी असलेले नेते आणि लोक हवेत.

    राज्यात एक काळ असा होता की कारखानदारी खुप कमी होती

    कर्तुत्व दृष्टी ही असतेच पण ते पूर्ण केले पाहिजे.

    माणसे जोडली पाहिजेत. सगळ्यांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. कुणाकडे ज्ञान असेल तर त्याचा आदर करायला शिकलं पाहिजे

  • 16 Sep 2023 06:15 PM (IST)

    Jayant Patil | देशात सध्या सगळ्यात जास्त बेरोजगारी : जयंत पाटील

    पुणे | जयंत पाटील यांच्या भाषणाचे मुद्दे:

    पक्षाचा इंजिनीयर सेल काढण्यासाठी उशीर झाला हे मी मान्य करतो. पण काम आता जोरात सूरू आहे.

    सगळ्या इंजिनीयर लोकांच्या समस्या त्यांच्या बेरोजगारीचे प्रश्न आपल्याला सोडवावी लागतील.

    अनेक इंजिनीयर आज बेरोजगार आहेत. राज्यकर्त्यांनी विकासाचा वेग चांगला ठेवला पाहिजे.

    आपल्या राज्यात प्रकल्प येण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी योजना आणल्या पाहिजेत.

    देशात सगळ्यात जास्त बेरोजगारी सध्या आहे. सगळ्यात जास्त महागाई सध्या आहे

    राज्य आणि केंद्र सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

    बेळगाव हे महाराष्ट्रात आहे असं मानणारे आम्ही सगळे आहोत.

    देशाचा विकस वाढवायचा असेल तर INFRA वाढला पाहिजे.

  • 16 Sep 2023 05:45 PM (IST)

    NCP | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अभियंता दिवस’ कार्यक्रम, शरद पवारांची हजेरी

    पुणे | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अभियंता दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे यांची देखील सोहळ्याला उपस्थिती आहेत.

  • 16 Sep 2023 05:43 PM (IST)

    Pune News | पुण्यात शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली जाणार

    पिंपरी चिंचवड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास आणि हिंदू साम्राज्य वर्षास साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त पिंपरी चिंचवड परिसरातील शिवप्रेमी नागरिक निगडी येथील भक्ती शक्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. यावेळी ५५ ढोल पथक,  ३५० ताशे आणि १००० पेक्षा जास्त ढोल वादक हे तब्बल ३५ मिनिटे वाजवून भगव्या ध्वजाची मानवंदना दिली जाणार आहे.

  • 16 Sep 2023 05:02 PM (IST)

    Cabinet Meeting News : नदीजोड प्रकल्पाचे भाग्य उजळले

    मराठवाड्यात दुष्काळाचं चित्र पालटण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुनर्जीवित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे अनेक वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात अनेक प्रकल्पांसाठी घोषणांचा पाऊस करण्यात आला. नदीजोड प्रकल्पासाठी 14 हजार कोटी निधीची तरतूद करण्यात आली.

  • 16 Sep 2023 04:41 PM (IST)

    MIM News: नामांतराविरोधात एमआयएमचं आंदोलन

    औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याविरोधात एआयएमआयएम पक्षानं शहरात आंदोलन केले. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये बाचाबाची झाली. छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बऱ्याच वर्षानंतर बैठक झाली. त्यापूर्वी या दोन शहरांच्या नामांतराची उरलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

  • 16 Sep 2023 04:18 PM (IST)

    Sanjay Raut News : संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल 

    संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मी पत्रकार परिषदेत येईल याची मुख्यमंत्र्यांना धाकधूक होत होती. मुख्यमंत्र्यांनी 1 रुपया सुद्धा मराठवाड्याला दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला.

  • 16 Sep 2023 04:05 PM (IST)

    CM News : राऊत नाही आले का? मुख्यमंत्र्यांचा मिश्किल सवाल

    खासदार संजय राऊत मराठवाड्यातील बैठकीला उपस्थिती लावणार असल्याची चर्चा कालपासून रंगली होती. संजय राऊत यांनी याविषयीचे विधान केले होते. दरम्यान शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आले का? असा मिश्किल सवाल केला.

  • 16 Sep 2023 02:15 PM (IST)

    मराठवाडा कॅबिनेट बैठकीनंतर सरकारची पत्रकार परिषद सुरु

    आधीच्या आघाडी सरकारने अनेक कामात खोडा घातला होता. आता तो दूर करुन अनेक कामे मार्गी लावली आहेत. पहिल्या कॅबिनेटपासून आजपर्यंत सर्वसामान्याचे हित पाहीले. 35 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठवाड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 14 हजार कोटी सिंचन प्रकल्पावर खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 16 Sep 2023 01:27 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात आदर्श पतसंस्था ठेवीदारांचा मोर्चा

    एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श पतसंस्था ठेवीदारांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडविले आहे. विना परवागनगी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. प्रोपर्टी विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत, आम्हाला मंत्र्यांना भेटू द्यावे अशी मागणी आमदार जलील यांनी केली आहे.

  • 16 Sep 2023 12:41 PM (IST)

    हे फक्त घोषणा करणार अंमलबजावणी नाही होणार- आदित्य ठाकरे

    राज्य सरकार मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पाची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. यावरून विरोधी पक्षाती नेते नाना पटोले यांनी निशाणा साधताना पैशाीची उधळपट्टी करत असल्याचा आरोप केला होता. तर आदित्य ठाकरे यांनी, हे फक्त घोषणा करणार अंमलबजावणी होणार नसल्याचं म्हटलं आहे. यावर प्रत्युत्तर देताना, विरोधकांना मराठवाड्याचं घेणदेण नसल्याचं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

  • 16 Sep 2023 12:30 PM (IST)

    पुण्यातील खेडमध्ये मराठा समाज आक्रमक

    पुण्यातील खेडमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलकांनी महामार्ग रोखून धरला आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी हे आंदोलन केलं आहे.  पोलिसांचा आंदोलनाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे.

  • 16 Sep 2023 12:16 PM (IST)

    खेडमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन

    पुण्यातील खेडमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे. मराठा समाजाने पुणे- नाशिक महामार्ग रोखला असून आंदोलन स्थळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 16 Sep 2023 12:09 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित आघाडीचा मोर्चा, सरकारविरोधात आंदोलन

    वेगवेगळ्या मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला आहे. क्रांती चौकात हा मोर्चा सुरू असून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

  • 16 Sep 2023 12:03 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठकीला सुरूवात

    छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट बैठकीला सुरूवात झाली असून मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारतर्फे मोठे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडत आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 16 Sep 2023 11:52 AM (IST)

    मंत्रीमंडळाच्या बैठकीवर जयंत पाटील यांचे ट्विट चर्चेत

    मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे . दुष्काळी परिस्थिती असताना सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

    दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिलं आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. मी त्याचं स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

  • 16 Sep 2023 11:45 AM (IST)

    ५० खोके हे मंत्र्यांच पॅकेज – आदित्य ठाकरेंचा निशाणा

    सरकारकडून फक्त घोषणाबाजी सुरू आहे. आमचे मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर घेऊन जातात,आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

  • 16 Sep 2023 11:42 AM (IST)

    शेतकरी हतबल पण सरकारकडून मदत नाही – आदित्य ठाकरे

    शेतकरी हतबल झालेत, त्यांची परिस्थिती बिकट आहे पण सरकारकडून १ रुपयाची देखील मदत मिळालेली नाही – आदित्य ठाकरे

  • 16 Sep 2023 10:57 AM (IST)

    सरकारच्या ‘त्या’ आदेशाविरोधात ‘स्वाभिमानी’ आक्रमक; राजू शेट्टी म्हणाले, आम्हाला अडवून दाखवाच…

    राज्याबाहेर ऊस गाळपाला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मुख्य सचिव राजेश कुमार यांनी तसे आदेश दिले आहेत. ऊस गळीत हंगाम जेमतेम दोन ते तीन महिने राहणार असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाय.  जिथे चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस घालू, अशी स्वाभिमानीची भूमिका आहे.  आम्हाला अडवून दाखवा, असा इशाराच राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे.

  • 16 Sep 2023 10:45 AM (IST)

    तापी नदीला पूर, शेतातही पाणी शिरलं

    मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या पावसामुळे तापी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.  अतिमुसळधार पावसामुळे तापी नदी ओसाडून वाहत आहे.  नदीकाठच्या शेतात पाणी शिरलं आहे. त्यामुळे तापी नदी काठ परिसरातील केळी पिकांसह इतर पिकं धोक्यात येण्याची शक्यता आहे.

  • 16 Sep 2023 10:30 AM (IST)

    राज्याचा विकास हे एकमेव ध्येय- अजित पवार

    सध्या आमच्या समोर केवळ विकासाचं उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या समोर केवळ राज्याचा विकास आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं अजित पवार म्हणालेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

  • 16 Sep 2023 10:15 AM (IST)

    नंदुरबारमध्येआठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार

    नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.  पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे. नवापूर तालुक्यातील मध्यम आणि लघु बंधाऱ्यांचा पाणीपातळीत वाढ झाली आहे. रायगण नदीला पूर आलाय. रायगण गावाजवळील धबधबा वाहू लागला आहे.

  • 16 Sep 2023 09:54 AM (IST)

    Sanjay Raut : बॅनरवर हुतात्मांचे नाही तर ठगांचे फोटो

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या बॅनरवर हुतात्मांचे फोटो नाहीत. त्या बॅनरवर ठगांचे फोटो लावले आहेत, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लावला आहे. संभाजीनगरात मंत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण होत आहे, असे त्यांनी सांगितले.

  • 16 Sep 2023 09:47 AM (IST)

    Marathwada Cabinet Meeting | बैठकीत दुष्काळावर चर्चा होणार

    संभाजीनगरात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यातील दुष्काळ बद्दल चर्चा होणार आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहोत असे भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

  • 16 Sep 2023 09:33 AM (IST)

    rain | तापी नदी काठावरील गावांना इशारा

    जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाची पाण्याची वाढली आहे. या धरणाचे चार दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहे. धरणातून 1 लाख79 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग तापी पात्रात केला जात आहे. यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 16 Sep 2023 09:18 AM (IST)

    Ajit Pawar | अजित पवार बैठकीच्या ठिकाणी दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीच्या स्थळी दाखल झाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मराठवाड्याची ब्लू प्रिन्ट मुख्यमंत्री सादर करणार असल्याची शक्यता आहे.

  • 16 Sep 2023 09:05 AM (IST)

    Eknath Shinde | मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये दाखल

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. संभाजीनगर विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा दोन दिवसांचा संभाजीनगर दौरा आहे.

  • 16 Sep 2023 08:58 AM (IST)

    Congress | काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आज महत्त्वाची बैठक

    आगामी लोकसभा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आज हैदराबादमध्ये बैठक होणार आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आपल्या दिल्लीतील निवासस्थानाहून निघाल्या आहेत.

  • 16 Sep 2023 08:44 AM (IST)

    IND vs SL | फायनलआधी टीम इंडियाला इशारा

    आशिया कपच्या सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडियाचा काल बांग्लादेशने 6 धावांनी पराभव केला. उद्या होणाऱ्या फायनलआधी टीम इंडियासाठी हा एका इशारा आहे. वाचा सविस्तर….

  • 16 Sep 2023 08:25 AM (IST)

    Nashik rain | नाशिक जिल्ह्यात पावसाचा कुठला अलर्ट?

    नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट. दोन दिवस पाऊस झाल्यास पाणी टंचाई काही प्रमाणात दूर होऊ शकते. आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस होण्याची शक्यता आहे.

  • 16 Sep 2023 08:05 AM (IST)

    Nagpur Rain | नागपूरमधील कुठली धरणं 100 टक्के भरली

    सततच्या पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच तोतलाडोह आणि नवेगाव खैरी ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तोतलाडोह धरणाचे 14 पैकी 10 दरवाजे 0.4 मीटरने उघडले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी धरणाचे सर्व 16 दरवाजे 0.3 मीटरने उघडले. नवेगाव खैरी धरणातून 500 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नवेगाव खैरी धरणातून पाणी पेंच नदीत सोडण्यात आलं. नदीशेजाच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे.

  • 16 Sep 2023 08:00 AM (IST)

    Ganesh Festival : गणेशोत्सवासाठी पुण्यात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त; बॉम्बशोधक पथकही सतर्क

    पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे शहरात 7000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 5000 पोलीस कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, त्यासोबतच बाहेर गावावरून आलेले 1300 पोलीस कर्मचारी शहरात तैनात असणार आहेत. शहरभरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पाहणी करणार आहे. गणेशोत्सव काळात ही चारवेळा पाहणी होणार आहे.

  • 16 Sep 2023 07:47 AM (IST)

    maharashtra cabinet meeting : औरंगाबादमध्ये अख्खं मंत्रिमंडळ दाखल, अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कार्पेट

    आजपासून दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. या बैठकीसाठी येणाऱ्या अधिकारी आणि मंत्र्यांसाठी रेड कारपेट टाकण्यात आलं आहे. 2 दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादमध्ये दाखल झालं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. औरंगाबादच्या स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

  • 16 Sep 2023 07:36 AM (IST)

    maharashtra cabinet meeting : कॅबिनेट बैठकीवर 15 मोर्चे, वंचितचे कार्यकर्तेही धडकणार

    औरंगाबादमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ औरंगाबादेत दाखल झालं आहे. या बैठकीवेळी औरंगाबादमध्ये एकूण 15 मोर्चे निघणार आहेत. मोर्चाचा रुट क्रांती चौक ते भडकल गेट असा असणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा लक्षवेधी ठरणार आहेत. तर यावेळी सहा धरणे, निदर्शने होणार आहेत. सर्व निदर्शने भडकल गेट येथे होणार आहेत. सरकारला एकूण 4 निवेदने दिली जाणार आहेत.

  • 16 Sep 2023 07:31 AM (IST)

    maharashtra cabinet meeting : आजपासून कॅबिनेटची बैठक, औरंगाबादला छावणीचं स्वरुप

    तब्बल सात वर्षानंतर आजपासून दोन दिवस औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी शहरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी शहरात आयपीएस दर्जाचे 6 वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे 23 पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक 115, पीएसआय 296, पोलीस 1700, महिला पोलीस 147, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, होमगार्ड 500 असा एकूण 3 हजार पोलीस बंदोबस्त असणार आहे.

Published On - Sep 16,2023 7:24 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.